अबू आझमीची लावणी..!

उपटसुंभ's picture
उपटसुंभ in जे न देखे रवी...
10 Nov 2009 - 12:40 pm

(शांता शेळके, आशा भोसले आणि लता मंगेशकर यांची क्षमा मागून)

(कालच्या विधानसभेतील प्रसंगानंतर अबू आझमी असंच काही म्हणत असावेत)

मनसेच्या कदमांनी,
आणि शिशिर शिंद्यांनी,
कानाखाली आवाज ऐसा काढीला...
हात नका लावू माझ्या दाढीला...

पर्वा केली नाही मी विनंतीची,
मतं मोठी माझ्यासाठी हिंदीची.. हिंदीची बाई हिंदीची
धावला वसंता पुढे, वांजळेही जोडीला...
हात नका लावू माझ्या दाढीला...

निलंबन झालं मोठ्या थाटात जी थाटात.
चार डबे चार वर्ष यार्डात जी यार्डात.
नऊ डबे अजुन बाकी "इंजिनाच्या" गाडीला...
हात नका लावू माझ्या दाढीला...

मने जिकली मराठी माणसाची,
मती गुंग झाली सेना भाजपाची... भाजपाची बाई भाजपाची
काय म्हनु दादरच्या राजा, तुमच्या कुरघोडीला...
हात नका लावू माझ्या दाढीला...

(या घटनेतून काहीतरी शहाणपण शिकुन आझमी असंअही म्हणतील अशी आशा करतो)

धन्य धन्य भाषा ज्ञाना- तुकयाची...
तीच बोली महाराष्ट्राच्या हृदयाची.. हृदयाची बाई हृदयाची...
मराठीत बोलीन मीही, हिंदीहट्ट सोडीला..!
हात नका लावू माझ्या दाढीला..!

-- अभिजीत दाते

मूळ गीत -- रेशमाच्या रेघांनी
कवयित्री -- शांता शेळके
प्रेरणा -- मनसेचा विधानसभेतील राडा

हास्यविनोदविडंबनराजकारण

प्रतिक्रिया

टारझन's picture

10 Nov 2009 - 12:54 pm | टारझन

व्वा !! जियो !!

-- उपट**

माझी दुनिया's picture

10 Nov 2009 - 1:26 pm | माझी दुनिया

अस्सेच म्हणते.
____________
माझ्या लिखाणावर सर्व प्रकाशकांची मोजकी प्रतिक्रिया असते : साभार परत !
_____________
माझी दुनिया

JAGOMOHANPYARE's picture

10 Nov 2009 - 1:01 pm | JAGOMOHANPYARE

निलंबन झालं मोठ्या थाटात जी थाटात.
चार डबे चार वर्ष यार्डात जी यार्डात.
नऊ डबे अजुन बाकी "इंजिनाच्या" गाडीला...
हात नका लावू माझ्या दाढीला...

अगदी छान . वरच्या या ओळी मात्र जास्त छान जमल्या आहेत...

***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

गणपा's picture

10 Nov 2009 - 8:36 pm | गणपा

मस्तच रे उपटसुंभा..
पण ते शेवटच कडव प्रत्यक्षात कधी उतरेल अस वाटत नाही.
अहो कुत्र्याचं शेपुट आहे ते...

झंडुबाम's picture

10 Nov 2009 - 1:14 pm | झंडुबाम

एकदम सहि

विसोबा खेचर's picture

10 Nov 2009 - 1:24 pm | विसोबा खेचर

मस्त! :)

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Nov 2009 - 1:31 pm | बिपिन कार्यकर्ते

हाहाहाहा!!!

बिपिन कार्यकर्ते

श्रावण मोडक's picture

10 Nov 2009 - 2:43 pm | श्रावण मोडक

+१

अवलिया's picture

10 Nov 2009 - 1:40 pm | अवलिया

मस्त !

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

प्रभो's picture

11 Nov 2009 - 5:01 am | प्रभो

--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

आशिष सुर्वे's picture

10 Nov 2009 - 1:41 pm | आशिष सुर्वे

झकास्स!!

माझी ठेवणीतली दाद देतुया..

@

^
^
^
^
^
..

(ही माझी 'फेटा' उडवून देण्याची ठेवणीतली दाद आहे)..

-
कोकणी फणस

विशाल कुलकर्णी's picture

10 Nov 2009 - 1:42 pm | विशाल कुलकर्णी

क्या बात है दाते साहेब ! जबरा....
शॉल्लेट आवडली !

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

मदनबाण's picture

10 Nov 2009 - 1:44 pm | मदनबाण

मस्त... :)

मदनबाण.....

आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.

फ्रॅक्चर बंड्या's picture

10 Nov 2009 - 2:51 pm | फ्रॅक्चर बंड्या

१ नंबर

स्वाती२'s picture

10 Nov 2009 - 7:52 pm | स्वाती२

भारी आहे लावणी!

बाकरवडी's picture

10 Nov 2009 - 8:21 pm | बाकरवडी

लय भारी हाय बगा..............:)

:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी

अनिल हटेला's picture

10 Nov 2009 - 8:29 pm | अनिल हटेला

एकदम टकाटक.......:-)

बैलोबा चायनीजकर !!!
Drink Beer,
Save Water !!

;-)

सूहास's picture

10 Nov 2009 - 8:32 pm | सूहास (not verified)

हे वाचलच नव्हत..

लावणी एक नंबर ..खर तर अबू आझमीची लावणीच्या एवजी
अबू आझमीची चटणी किंवा अबू आझमीची धोपटणी पण चालले असते

सू हा स...

हुप्प्या's picture

11 Nov 2009 - 2:13 am | हुप्प्या

इंजिनाच्या डब्यांचे कडवे लईच खास!

अबुची अब्रूच काढली की राव!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Nov 2009 - 7:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभिनंदन..........!!!

अबू आझमीची लावणी

शेवटच्या चार ओळी वगळल्या आहेत आणि नावाबाबत जरासा गोंधळ केलाय का त्यांनी ?

-दिलीप बिरुटे

शक्तिमान's picture

11 Nov 2009 - 7:06 pm | शक्तिमान

एक नंबर!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

सुधीर काळे's picture

11 Nov 2009 - 8:45 pm | सुधीर काळे

उपटसुंभ-जी,
सुरेख व असली!
जय हो!
सुधीर
------------------------
ही लिंक वाचा: http://tinyurl.com/yf7l59q

उपटसुंभ's picture

12 Nov 2009 - 11:12 am | उपटसुंभ

लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद दिलीप..!
असे प्रकार चालतात म्हणून हल्ली लिहावंसंच वाटत नाही..!

निखिलराव's picture

12 Nov 2009 - 11:31 am | निखिलराव

अभिनंदन..........!!!

निखिलराव's picture

12 Nov 2009 - 11:33 am | निखिलराव

अभिनंदन..........!!!

jaypal's picture

12 Nov 2009 - 12:54 pm | jaypal

आजच इमेल आल्ल्ला आहे. मुळ रचना कर्त्यास सलाम.
==========================================
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

इतकी झकास व गाव्य लावणी आहे, पण त्यामानाने प्रतिसाद फारच कमी वाटतात.
दाते-जी, लावण्या लिहिण्याचं काम चालू ठेवा पुढेही!
अवांतरः उपटसुंभ व अभिजीत दाते ही नावें एकाच व्यक्तीची आहेत कां?
सुधीर
------------------------
सीना हो ज़ख्म ज़ख्म तो ढलते हईं कैसे गीत? फुर्सत अगर मिले तो कभी बाँसुरीसे पूछ!

परवाच वाचली होती लावणी पण प्रतिसाद उशिरा देतोय त्याबद्दल क्षमस्व! मस्तच झालंय विडंबन.
रेशमाच्या बाबांनी नंतर त्याच लावणीचं हे दुसरं इतकं फर्मास विडंबन आहे! जियो!! :)

चतुरंग

अमृतांजन's picture

16 Nov 2009 - 10:50 am | अमृतांजन

ही लावणी मला आताच इ-मेलवरुन फॉर्वर्ड झाली. छानपैकी जेपेग करुन ती सगळ्यांना पाठवली जातेय!