पाककृती

देवीका's picture
देवीका in पाककृती
8 Jan 2021 - 09:16

माझे युट्युबर्स वरील पाककृतींचे विडिओ!!

बर्‍याच दिवसाने आज आले आणि पाहिले की, इथे आपले युट्युबचे काम प्रमोट करु शकतो( हा माझा अजूनही अंदाजच आहे पण वाटले की, अश्या प्रमोशनला बंदी नसावी.) जर असलीच तर मी हा लेख काढून टाकेन, अ‍ॅडमिन कृपया मला तसे कळवा.
खरे तर मी काही व्यवसायिक युट्युबर नाही आहे, म्हणजे पुर्णपणे छंद म्हणून काढलेला प्रयत्न होता. तो सुद्धा माझ्या आईसाठी.

मी_देव's picture
मी_देव in पाककृती
3 Jan 2021 - 15:25

फिश टिक्का मसाला (व्हिडिओ सोबत)

साहित्य:
फिश मॅरीनेट आणि फ्राय करण्यासाठी:

फिश फिलेट ५०० ग्रॅम
मीठ १/२ टिस्पून
हळद १/२ टिस्पून
लाल तिखट २ टिस्पून
धणेपूड १ टिस्पून
मिरपूड १/२ टिस्पून
गरम मसाला १ टिस्पून
आले लसूण पेस्ट २ टिस्पून
लिंबाचा रस १ टेबलस्पून
मोहरी तेल २ टेबलस्पून

साहना's picture
साहना in पाककृती
22 Dec 2020 - 03:12

फ्लॅट मध्ये चुलीचा स्वाद

चुलीवर आपण जेंव्हा काही ऍन बनवतो तेंव्हा लाकडाच्या धुराचा वास त्या अन्नात आपसूक घुसतो. आधुनिक मुलांना कदाचित हा वास आवडणार नाही पण गावांतून शहरांत गेलेल्या अनेक लोकांना हा वास मिस होतो. मक्याचे कणीस, पापड किंवा अगदी "नुस्तें" जरी गॅस वर बनवले तरी त्या लाकडाच्या धुराच्या वासाच्या शिवाय त्याची चव तेव्हडी चांगली वाटत नाही.

मी_देव's picture
मी_देव in पाककृती
18 Dec 2020 - 19:06

पनीर पराठा (व्हिडिओ सोबत)

मागील दोन्ही पाकृ नॉन-व्हेज होत्या, म्हणून खास, पनीर प्रेमींसाठी.. सोप्पा आणि झटपट होणार पदार्थ

साहित्य:

  • मल्टि ग्रेन / गव्हाचे पीठ - १ १/२ कप
  • मीठ
  • तेल

पनीरचे सारण:

मी_देव's picture
मी_देव in पाककृती
6 Dec 2020 - 13:30

मटण दम बिर्याणी (व्हिडिओ सोबत)

लागणारे जिन्नस:

मी_देव's picture
मी_देव in पाककृती
22 Nov 2020 - 13:14

केळीच्या पानातील ग्रिल्ड पापलेट (व्हिडिओ सोबत)

दिवाळीचा फराळ खाऊन कंटाळा आला असले म्हणून हि खास चमचमीत पापलेट रेसिपी

जिन्नस:

मी_देव's picture
मी_देव in पाककृती
13 Nov 2020 - 18:58

बेसन लाडू (व्हिडिओ सोबत)

तर मंडळी फराळ तर करून झालाच असणार, पण तरीही पाकृ आणि व्हिडिओ देत आहे..
*** सर्व मिपा सदस्यांना दिवाळीच्या शुभेच्छा **

जिन्नस:

साजूक तूप - १ कप
बेसन - २ कप
काजू - पाव कप
पिस्ता - पाव कप
वेलची पावडर - १ टीस्पून
पिठीसाखर - दिड कप

मुक्तचिंतक's picture
मुक्तचिंतक in पाककृती
3 Nov 2020 - 04:12

बॉईल्ड अंडा भुर्जी

तुम्हाला कधीमधी मस्त तिखट, झणझणीत, spicy खाण्याची इच्छा होते. नवरात्र आत्ताच संपलेले असतं. गेले काही महिने घरचचं खाल्लेलं असत, बाहेरच चमचमीत खाण्याची इच्छा असूनही खाता येत नसतं, अश्या वेळेस काय करावं असा यक्षप्रश्न तुमच्यासमोर असतो !

मी_देव's picture
मी_देव in पाककृती
25 Oct 2020 - 14:58

पालक चकली (फोटो-विडिओ सोबत)

काही दिवसापूर्वी माझ्या सौच्या पणजीआजीने दिलेल्या कृतीने हि चकली करून पहिली. मुलाला खूप आवडली. या वेळी पुन्हा करताना व्हिडीओ केला.
इकडे भाजणी सहसा मिळत नाही म्हणून यावेळी पीठं आणि मसाला भाजून पीठ तयार केलं. छान झाली.

जिन्नस:

कंजूस's picture
कंजूस in पाककृती
24 Oct 2020 - 11:38

परवल की मिठाई ( फसलेली)

परवल की मिठाई. ( फसलेली.)
फोटो १
परवल की मिठाई गाजर कीस भरून.

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in पाककृती
15 Oct 2020 - 17:10

खुसखुशीत कोंबडी

आजचे जेवण
- दक्षिण अमेरिकन/ टेक्सास पद्धतीची खुसखुशीत कोंबडी
चांगले आंबट ताक , काली मिरी, मीठ यात थोडा मैदा + थोडे मक्याचे पीठ कालवावे आवरणासाठी पाहिजे असल्यास लसूण
- कोंबडी चे तुकडे ( त्वचेसकट) वरील आवरणात घोळवून घावी
- ओव्हन १८० अंश सेल्सियस ला तापवून चांगले खुसखुशीत होई पर्यंत हे तुकडे भाजून घयावे

साहना's picture
साहना in पाककृती
13 Oct 2020 - 07:40

अननस खाण्याची जुनी पद्धती

काही दिवस साधी अननस खाण्याच्या ह्या पद्धतीचा व्हिडीओ पहिला आणि आठवण झाली ली लहान असताना कोंकणात अश्याच प्रकारे आम्ही अननस खात असू,

https://www.youtube.com/watch?v=ExCZ5TyqN4I

मी_देव's picture
मी_देव in पाककृती
6 Oct 2020 - 10:34

कोळंबी लोणचं

आज जवळपास ३ वर्षाने मिपा वर आलो.. खुप मोठा ब्रेक झाला. असो..

लागणारे घटक:

Gk's picture
Gk in पाककृती
22 Sep 2020 - 12:24

पायनॅपल स्वीट करी Pineapple sweet curry

लागणारा वेळ:
१ तास
लागणारे जिन्नस:
1 अननस बारीक चिरून

तिखट , मीठ

कांदा कापून

फोडणी साठी तेल , मोहरी , जिरे , हिंग , आले किस, सुक्या मिरच्या 4 , कढीपत्ता

अर्धी वाटी गूळ

क्रमवार पाककृती:
अननस बारीक चिरून थोडेसे पाणी , मीठ व भरपूर लाल तिखट घालून कुकरच्या भांड्यात ठेवून कुकर मधून शिजवून घ्यावे

Bhakti's picture
Bhakti in पाककृती
9 Sep 2020 - 18:23

हिरव्या टमाटरची चटणी

आमच्या अहोंच अस काम आहे ,भाजीपाला आणायला सांगितला तर हमखास तीन चार हिरवे टमाटर आणतात.आता हे कधी पिकणार ? या विचारात न पडता ,मैत्रिणीच्या डब्यात असणारी सगळी माझ्याच वाट्याची असणारी टमाटर हिरवी चटणी आणि तिचा स्वाद जिभेवर रेंगाळतो. साधारण ३-४ वेळा प्रयत्न करून ही अंतिम केलेली पाककृती लिहिते.

गणेशा's picture
गणेशा in पाककृती
30 Aug 2020 - 15:58

Food - Kitchen Affairs - २. शिरा

उशिरा का होईना, आमचा किचन मध्ये एकदाचा प्रवेश झाला. लग्नानंतर बायकोला, मी आधी स्वयपाक करत होतो असे सांगण्याची risk घेतली होती खरी, पण १-२ दा चहाच (ऑफकोर्स ती करते त्या पेक्षा भारीच) काय तो मी तिला करुन दिला बाकी किचन मध्ये मी शक्यतो कधी लुडबुडलो नाहीच.
तशी बायकांपेक्षा पुरुषांच्या हाताला चव जास्त असते, असे माझे ठाम मत आहे.

देवीका's picture
देवीका in पाककृती
27 Aug 2020 - 14:35

तळणीचे मोदक - मैदा न वापरता

तळणीचे मोदक, कोकण सोडून इतर भागात ज्यास्त करतात. कोकणात करतच नाही असे नाही पण, तांदूळ मुबलक प्रमाणात असल्याने तांदूळाचे उकडीचे मोदक करतात.

पण आजकाल, असा प्रश्ण नाही, ज्याला जे आवडेल, जमेल तसे त्याने करावे.

बहुतेकदा, मैदा वापरूनच करतात. पण मैदा प्रकृतीला चांगला नाही, तेव्ह हि कृती मी माझ्या, आईची मैद्याशिवाय मोदक कसे करावे ती देत आहे.

Bhakti's picture
Bhakti in पाककृती
24 Aug 2020 - 09:50

काठियावाडी मिरच्या

मिपाकर तुम्हाला वाटत असेल गणपतीमध्ये गोडधोड सोडून हे काय तिखट मिरची?खूप खूप मोदक करून,खाऊन झाले.

तेव्हा अशाच लोळत पडलेल्या दोन पोपटी लांब लांब मिर्च्यांकडे लक्ष गेले.आल्या तेव्हा चांगल्या तरतरीत होत्या,आता पार आळसावल्या होत्या.चिडून कि काय लाल व्ह्यायला लागल्या होत्या.विचार करीत असतील आम्हाला ही घेते की म्हाताऱ्या झाल्यावर फेकते.

मृगतृष्णा's picture
मृगतृष्णा in पाककृती
23 Aug 2020 - 11:01

पालक मसाला डोसा

" पालक " ही पालेभाजी घरातील सर्व सदस्यांनी खावी अशी इच्छा एकंदरीत सगळ्या "पालकांची " असते , सगळ्या पालकांची म्हणजे अगदी आजी - पणजी पासून सगळे आपापल्या मुलांना सांगताना आपण ऐकतो, कारण सगळ्यांना ही पालेभाजी आवडेलच असे नाही . आजकाल "पालक - पनीर " या हॉटेल मध्ये मिळणाऱ्या आणि त्यात पनीर आहे म्हणून खाणाऱ्यांचं प्रमाण थोडे बहुत अधिक आहे.

देवीका's picture
देवीका in पाककृती
21 Aug 2020 - 23:46

नेवरी/नेवर्‍या/करंजी

गणराया निघालाच आहे , तर गौरीचे आगमन आता थोड्याच दिवसात होणार आहे.
आमच्या घरी, गोव्यात गौराईला नेवरी करायची पद्धत आहे. इतर वेळी सुद्धा, मोदकांबरोबर बहिण म्हणून 'नेवरी' करतातच. पण पाच सवाष्ण स्त्रियांना, नेवरी ओटीत द्यावी लागते.
आता, जुनी प्रथा आहे. पदार्थ बनवण्याची आवड आणि उत्साह असल्याने तर त्या( प्रथेच्या) निमित्ताने आनंद म्हणून केली जाते व सर्वांनाच खाउ घालतो.