थालीपीठ-एक मराठमोळा पदार्थ

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जनातलं, मनातलं
27 Feb 2023 - 8:35 am

ब्रिस्क वाॅक करताना कानात कुंडले घालून मराठी गाणी ऐकणे बरेच दिवसापासूनचा नियम.दररोज प्रमाणे सकाळचे फिरणे संपले व सोसायटीतील मुलांच्या बागेत बाकावर सकाळचं कोवळं उन खाण्यासाठी येऊन बसलो. हिरवटसर पिवळ्या गवतावर सध्या सुरू असलेली पानगळ एक वेगळेच चित्र रेखाटत होती.शांत वातावरण, कोवळे उन आणी मंद वारा यांच्या संगनमताने उबदार थंडी सुखावत होती.

सध्या परीक्षेचा हंगाम असल्याने बागेत मुलांचा गलका नव्हता पण पाखरांचा चिवचिवाट मात्र आनंदात भर टाकत होता.झोपाळा,घसरगुंडी सर्व काही शिक्षा दिल्यासारखे गपचूप उभे होते. तेवढ्यात समोरून दोन साळुंक्या दोन मैत्रीणीं सारख्या रमत गमत जमीनीवर आपलं भक्ष टिपत चालल्या होत्या. त्यांच लक्ष माझ्याकडे नव्हतं पण मी मात्र त्यांच्या कडे लक्ष देऊन बघत होतो. त्यांनी मला बघीतले व भुर्रकन उडून रिकाम्या झोपाळ्यावर जाऊन बसल्या.जड लोखंडी झोपाळा उगाचच हलल्या सारखा वाटला.

सकाळचा व्यायाम झाल्यामुळे चुस्त शरीर व प्रसन्न मन निसर्गाच्या सान्निध्यात आणखीन आनंदी झाले. नगरसेवक कृपा बेंचवर बसून व्हाट्स अपवर आलेले मेसेजेस बघायला सुरुवात केली.एक मिपा सदस्यानी खालील टेक्स्ट,स्टेटस म्हणून टाकले होते.

"मराठी माणसाला 'थालीपीठ' म्हणजे काय हे एखाद्या दुसऱ्या माणसाला समजावून सांगायची वेळ आली की तो दुसरा हा दुसराच बनून राहतो. कारण आपल्याला जेव्हा थालीपीठाची आठवण येते, त्यावेळेला ती नुसत्या एका चवदार पदार्थाची नसते.ज्या स्वयंपाकघरात आपण पाटावर बसून ते थालीपीठ खाल्लेलं असतं ते स्वयंपाक घर, थालीपिठा बरोबर त्याच्यावर आईने हलकेच ठेवलेला ताज्या लोण्याचा गोळा, थालीपीठ थापताना आईच्या हातातल्या बांगड्यांचा किणकिणाट, घरभर सुटलेला तो खमंग वास, रंग, रस, गंध,स्पर्श या आठवणींचे असंख्य भोवरे त्या एका शब्दाबरोबर गुंजन करायला लागतात. आणि आपल्याप्रमाणे, ह्या शब्दाच्या उच्चाराने आणखी कुणाला हाच अनुभव येतो हे समजल्यावर तो परका माणूस आपला माणूस होऊन जातो. शेवटी माणूस म्हणजे त्याच्या स्मृतिकोशात साठत गेलेल्या असंख्य संदर्भाचं चालतं बोलतं गाठोडं आहे.
- पु. ल. देशपांडे"

स्टेस्टस वाचल्यानंतर, आठवणींचे असंख्य भोवरे त्या एका शब्दाबरोबर गुंजन करायला लागले व पु. ल.नीं वर लिहील्या प्रमाणे स्मृतिकोशात साठवलेल्या गाठोड्यातल्या असंख्य संदर्भाच्या गाठी सुटून इतस्ततः पसरू लागल्या.

पानशेत फुटी नंतर आमच्या वडलांची बदली एका खेडेगावात झाली. तसे तालुक्याचे गाव पण आकारानुसार खेडेगावच. एका मोठ्या वाड्यात रहायला जागा घेतली.पुर्ण वाड्यात आम्हांला धरून दोनच भाडेकरू,मालक दुर निरा नरसिंगपूर येथे. भाडे पाच सात रूपये ते सुद्धा वर्षा दोन वर्षातून एकदा घ्यायला यायचे. संपूर्ण वाडा आमच्याच बापाचा आसल्या प्रमाणे आम्ही वागायचो. आंगणात मोठं उबंराचे झाड,परसदारी मोठी जास्वंद, शेवगा आणी शेज्यार्याचां पेरूच्या झाडाच्या झुकलेल्या फांद्या. पुढे वडीलांनी भाजीपाला लावला. उकिरडा हा प्रत्येक घराचा त्या वेळेस अविभाज्य घटक,वडिलांनी त्याचे खताच्या खड्डय़ात रूपांतर केले. तेच खत भाजीपाला पिकवताना टाकायचे.

त्यावेळेस आमच्याकडे गाय होती. भरपुर दुधदुभते.दुधावरच्या सायीवर मात्र आईचा खडा पहारा असायचा (दुध गाळून पिणाऱ्या महानुभावांची किव येते,हे परमेश्वरा ते कुठे चुकताहेत त्यांनाच कळत नाही). आठवड्यात एकदा ताक व लोणी बनायचे. ज्या दिवशी लोणी बनायचे त्या दिवशी आई भाजणीचे खमंग थालीपीठ जरूर करायची.

भाजणी बनवणे एक मोठीच प्रक्रिया होती. आठरा प्रकारची धान्ये, कडधान्य,जीरे,धणे एकत्र करून भाजणी हा खमंग प्रकार गीरणीत किवां घरीच दळायचा. भाजणी बनवणे सुरू झाल्या पासूनच आम्ही मुले धुतलेली बाजरी,डाळ इ. खायचो.आईने पकडले तर पाठीत धपाटा पडायचा. थालीपीठाचे अनेक प्रकार,धपाटा सुद्धा एक प्रकारचे कणकेचे गोड थालीपीठ. गुळाच्या पाण्यात गव्हाचे पिठ व थोडा सोडा टाकून आई बनवायची. आताच्या प्लम केक पेक्षा भारी. भाजणीचे थालीपीठ हा सर्वांचा राजा. यानेअमराठी माणसालाही वेड लावले आहे.

एरवी गिरणीत जायला टाळाटाळ करणारी मुलं,भाजणीचे पिठ दळून आणायला पायावर नेहमी तय्यार असायची. मेल्यानों, कच्ची भाजणी खाऊ नका आशी तंबी जरूर मिळायची . भाजणी खरोखरच खुप खमंग असायची.धणे,जिरे, बाजरी, ज्वारी, हरबारा डाळ इ. यांचे विषेश प्रमाण एकत्र दळल्यानंतर काय मस्त वास यायचा. गरम गरम चिमूटभर पिठ तोंडात टाकायचा मोह कुणालाही आवरत नसे.

त्यावेळेस घराघरात चुल, शेगडीवरच जेवण बनायचे. स्वयंपाक घरात सर्व मुले गोल करून गरम थालीपीठ केव्हा मिळेल याची वाट बघत बसायचो.

आमची आई भाजणीचे पिठ गरम पाण्यात मळून त्याचा छोटा गोळा पाढंर्‍या शुभ्र कापडाच्या चौकोनावर गोल थापायचा. त्याला मध्यभागी पाच छिद्र पाडायची त्यात साजूक तुप टाकायची. चुलीवरच्या गरम तव्यावर भाजून घ्यायचे.घरचे साजूक तुप त्या छिद्रातून तव्यावर थालीपीठच्या खाली पसरायचे. खालील भाग मस्त खरपूस तळून निघायचा. मऊ आणी कुरकुरीत असे भाजलेले थालीपीठ आमच्या थाळ्यात बरोबर घरचेच लोणी, लोणचे,ताक दही असायचे. कांदेनवमीला कांद्याचे,भाजणीचे थालीपीठ मुख्य पदार्थ जरूर असायचा.

स्वयंपाक घर,माजघर,ओसरी, अंगण,पडवी, गोठा परसदार असा घराचा पसारा आसायचा.आता याची जागा किचन, हाल,बेडरूम, बाथरूम यांनी घेतली आहे. ताट,पाट,वाटी काळाच्या ओघात लुप्त झालेत व त्यांची जागा डायनिंग टेबल, खुर्ची,काटे चमचे प्लेट्स यांनी घेतली आहे. थालीपीठाच्या जागी पिझ्झा व लोण्याच्या गोळ्या ठिकाणी बटर चिज दिसून येत आहे. मुलांचा गोंधळ संपलाय.एक,दोन खंडूळी( मुले) डायनिंग टेबलवर नाहीतर सोफ्यावर समोर टिव्हीवर किंवा मोबाईल बरोबर एकटेच जेवताना कसले तोबरे भरून रवंथ करताना दिसतात.

आता, काप गेली आणी भोकं राहीली आहेत.

थालीपीठ हा अस्सल मराठमोळा पदार्थ. रंगरूप ओबडधोबड. नुसतं बघून प्रेमात पडावं असा तर नव्हेच.पण एकदा जिभेवर चव रेंगाळली की बस्स....

माझी लाडाची मैना गावाकडं रायली
माझ्या जीभेची होतीया कायली

थालीपीठ हा पदार्थ खूप जुना असणार. माणूस शेती करू लागला आणि त्याला धान्य भाजता आणि दळता येऊ लागलं अगदी तेव्हाचं.ते बनवण्याच्या प्रक्रियेत जो सोप्पेपणा आहे ना, त्यावरूनच ते स्पष्ट होतं.दुर्गाबाई भागवतांनी त्यांच्या ‘खमंग’ मध्ये थालीपिठाला पहिलं स्थान दिलंय.

थालीपीठ नुसतं चवीनं श्रीमंत नाही, तर ते पौष्टिकही आहे. त्यातल्या धान्यांमधून, कार्बोहायड्रेट मिळतात. हल्ली डाएटची काळजी करणाऱ्यांमध्ये ज्वारी-बाजरी ही भरड धान्ये भलतीच डीमांडमध्ये आहेत, त्यांची थालीपिठात उपस्थिती असते. सोबत प्रथिनांनी समृद्ध असलेली कडधान्ये आहेतच. शिवाय भाजून घेतल्याने पचायला हलके.

सहज सुचलं,

गेले ते स्वयंपाक घर
आले ते किचन
काळ्याशार डायनिंग टेबलवर
सजतयं तंदूरी चिकन

पाटावरचा थाट गेला,
गेला आमटीचा भुरका
टेबलावर सजलायं काटा अन चमचा

खुर्चीवर बसून ग्लोबल
चर्चा करतयं
घरात काय चाललंय
याची कोण पर्वा करतयं

थालीपीठ ,वडापाव हार्वर्डला गेलं
पिझ्झा आणी बर्गर बनून आलं

पैशाच्या मागे पळ पळ पळतयं
नाती गोती मागं सुटली
हे कुणाला कळतयं

काळाचा महिमा
जग पुढं चाललयं
सारं जरी कळत आसलं
तरी कुठं वळतयं

थालीपीठ आणी लोण्यासाठी
आजही मन माझं झुरतयं.

मराठमोळ्या थालीपीठा बरोबर मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

27 Feb 2023 - 12:41 pm | प्रचेतस

थालीपीठासारखाच खमंग लेख.
सर्वच प्रकारची थालीपीठे अत्यंत आवडतात. त्यातही भाजणीचे थालीपीठ विशेष आवडीचे.

Nitin Palkar's picture

27 Feb 2023 - 1:25 pm | Nitin Palkar

ज्या दिवशी लोणी बनायचे त्या दिवशी आई भाजणीचे खमंग थालीपीठ जरूर करायची... याचे कारण वाचायला आवडेल.
लोणी काढवल्यावर जी खरपुड उरते तिला एक वेगळाच स्वाद असतो. त्याच भांड्यात थालीपीठ लावले तर तो स्वाद थलिपीठाला देखील येतो ही असेल का?.
थालिपीठाची भजणी करताना अठरा प्रकारची धान्ये, कडधान्य,वापरत ती कुठची?
मेथीची थालिपीठे सुद्धा खूप चविष्ट लागतात. गरम गरम थलिपीठावर ठेवलेला लोण्याचा गोळा वितळायच्या आत थालीपीठ संपवायला मजाच येत असे. लोण्याच्या ऐवजी दह्याबरोबर देखील थलिपीठ छान लागते.
लोणी काढवल्यावर जी खरपुड उरते तिला आमच्याकडे बेरी म्हणतात, त्याच भांड्यात भात शिजवलेला देखील आमच्याकडे आवडीने खाल्ला जातो.
या बेरीत साखर किंवा गूळ टाकून तिच्या बरोबर चपाती देखील खाता येते... थोडेसे स्मरणरंजन .
असो. लेख खरोखरच प्रचेतस यांनी म्हटल्या प्रमाणे खमंग झाला आहे.

कानडाऊ योगेशु's picture

27 Feb 2023 - 2:20 pm | कानडाऊ योगेशु

लोणी काढवल्यावर जी खरपुड उरते

आम्ही तिला बेरी म्हणतो.साखर घालून खाल्ल्यावर फार छान लागते.

आम्ही तिला बेरी म्हणतो.साखर घालून खाल्ल्यावर फार छान लागते.

+१०००

आमच्याकडे मी आणि माझे बाबा दोघेही बेरीमध्ये साखर घालून खाण्याचे शौकीन! ज्या दिवशी लोणी कढवले जाते त्या दिवशी आम्ही दोघेही घरात असण्याचे प्रसंग विरळाच येतात पण एखाद्या दिवशी चुकून-माकून दोघेही असलो तरी असेल त्या बेरीची वाटणी करून खाणे आम्हाला मान्य नाही, ती कोणीतरी एकानेच खावी ह्यासाठी दुसरा त्यादिवशी त्यागमूर्ती बनतो 😀
अर्थात आईचे 'बेरीमध्ये साखर घालून खाणे आरोग्यासाठी चांगले नाही' वगैरे वगैरे उपदेशाचे डोस पाजणे एकीकडे चालू असले तरी आम्हाला त्यावेळी ते (सोयीस्करपणे) ऐकू येत नाही 😂

कानडाऊ योगेशु's picture

27 Feb 2023 - 2:20 pm | कानडाऊ योगेशु

लोणी काढवल्यावर जी खरपुड उरते

आम्ही तिला बेरी म्हणतो.साखर घालून खाल्ल्यावर फार छान लागते.

सस्नेह's picture

27 Feb 2023 - 2:30 pm | सस्नेह

खमंग लेख !
...थालपिठासारखा.

राजेंद्र मेहेंदळे's picture

27 Feb 2023 - 2:31 pm | राजेंद्र मेहेंदळे

लेख वाचुन तोंपासु. आता लवकरच थालिपीठ खाणे आले :(
कविताही मस्त जमली आहे, पण दोन्ही एकत्र का केले? त्या निमित्ताने २ जिलब्या पडल्या असत्या ना?

बाकी पुलं म्हणतात तसं काही काही वाक्यांचे ईंग्लिश मध्ये रुपांतर करता येत नाही. उदा. "आमच्या हिच्या हातच्या थालिपीठाची चव कश्शाकश्शाला म्हणुन नाही"

कर्नलतपस्वी's picture

27 Feb 2023 - 2:43 pm | कर्नलतपस्वी

प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.

आई भाजणीचे खमंग थालीपीठ जरूर करायची... याचे कारण वाचायला आवडेल

याला दोन तीन कारणे असावीत.
त्यावेळेस सर्व कामे हातानेच करावी लागत असतं. फ्रीज,ब्लेडर वगैरे काही नव्हते.
एकतर दुध भरपुर. संध्याकाळी सर्व उरलेल्या दुधाचे दही लावायची. अठवड्याचे दही घुसळणे खुप कष्टाचे काम. पंचवीस तीस भाकर्‍या थापण्यापेक्षा बारा पंधरा थालीपीठला कमी कष्ट. एक थालीपीठ, दोन तीन ग्लास ताक पिले की पोरं गपगार व्हायची.

दुसरे लोणी जास्त वेळ टिकत नसल्याने लगेचच तुप बनवावे लागायचे.

बेरी मधे बाजरीचे रोट कुस्करून आई वासराला खायला द्यायची.

आठरा धान्यांची नावे आठवत नाही पण बर्‍याच प्रकारच्या धान्ये कडधान्य मिळून भाजणी बनायची.

प्रचेतस's picture

27 Feb 2023 - 3:01 pm | प्रचेतस

रात्रीची आमटी उरली तर सकाळी भाजणीच्या पीठात पाण्याऐवजी आमटी कालवून केलेले थालीपीठही खूप भारी लागते.

संजय पाटिल's picture

27 Feb 2023 - 4:07 pm | संजय पाटिल

आमच्याकडे नेहमी करतात!!

टर्मीनेटर's picture

1 Mar 2023 - 10:42 am | टर्मीनेटर

मी लहानपणापासूनच (आवडत नसल्याने) आमटी खात नाही, पण तुम्ही म्हणता तसे भाजणीच्या पीठात पाण्याऐवजी रात्रीची उरलेली आमटी कालवून केलेले थालीपीठ मात्र अतिशय आवडीने खातो 😀

Nitin Palkar's picture

27 Feb 2023 - 7:21 pm | Nitin Palkar

_/\_

तुपाच्या बेरीमध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि गूळ
मस्त खमंग !!!

ख मं ग.

Nitin Palkar's picture

27 Feb 2023 - 8:18 pm | Nitin Palkar

अठरा धान्यांवरून सहज सुचलं ..
अठरा विश्वे दारिद्र्य, अठरा पगड जात, अठरा धान्यांचे कडबोळे हे वाक्प्रचार शाळेत असताना शिकलो होतो.

सुखी's picture

27 Feb 2023 - 10:19 pm | सुखी

वर्णन वाचून तोपासू

खमंग इथवर दरवळला.लोण्याबरोबर थालिपीठ हे सर्वात सुखकारी आहे.आजच मेथीचे थालिपीठ बनवले.भाजणी बनवणे जमत नाही सतत.तेव्हा मिश्र पीठावर समाधान मानावे लागते.रचक्याने तुझ्यासारखे खमंग थालिपीठ कोणीच करत नाही-इति माझी लेक 

थालीपीठ आणी लोण्यासाठी
आजही मन माझं झुरतयं.

मराठमोळ्या थालीपीठा बरोबर मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.


_/\_

श्वेता व्यास's picture

28 Feb 2023 - 3:19 pm | श्वेता व्यास

थालिपीठ पुराण आवडले.
मीही तुमच्याप्रमाणेच थालिपीठप्रेमी!

उत्तम बनलेले थालिपीठ म्हणजे जीव की प्राण. आरोग्याच्या दृष्टीने वयानुसार ज्या गोष्टींचा त्याग करावा लागला त्यात लोणी आणि तूप हे आहेत. त्यामुळे थालिपीठ या गोष्टीची अर्धी गंमत गेली. दही वगैरे ठीक क्याटेगरीतले.

थालिपीठ हा पदार्थ तयार भाजणीचा किंवा ऐनवेळी पिठे मिसळून केलेला असा दोन्ही प्रकारे खाल्ला आहे. दोन्हीची आपापली मजा असते.

थालीपीठ मस्तच. त्यात आईच्या हातच्या थालीपीठाची चवच न्यारी.

थालीपीठ मस्तच. त्यात आईच्या हातच्या थालीपीठाची चवच न्यारी.

कांदा घालून केलेले भाजणीचे थालीपीठ, त्यावर घरच्या पांढऱ्याशुभ्र लोण्याचा गोळा आणि जोडीला दही आणि साजूक तूप म्हणजे परमोच्च सुख.
सोमवार, मंगळवार आणि गुरुवारी आई शक्यतो कांद्याचा वापर असलेले पदार्थ बनवणे टाळते त्यामुळे सोमवारी इडली, मंगळवारी डोसा आणि गुरुवारी ढोकळा असे पदार्थ सकाळच्या नाश्त्याला असतात! पण आठवड्यातलया ईतर दिवशी एकदातरी भाजणीचे (कांदा घालून केलेले) थालीपीठ किंवा मोकळी भाजणी घरात आवर्जून बनतेच बनते!
भाजणीचे वडे आणि दही/लोणी खायलाही मला प्रचंड आवडते. अत्यंत आवडत्या पदार्थावरचा हा खमंग लेख खूप आवडला 👍

आता इतकी चर्चा चालूच आहे तर.. आणखी एक व्हेरीयंट.
भाजलेल्या वांग्याच्या गरात भाजणी कालवून त्या गोळ्याचे थालिपीठ म्हणजे वांग्याचे थालिपीठ हाही भारी प्रकार आहे. अधे मधे असतो नाश्त्याला.

टर्मीनेटर's picture

1 Mar 2023 - 11:12 am | टर्मीनेटर

भाजलेल्या वांग्याच्या गरात भाजणी कालवून त्या गोळ्याचे थालिपीठ म्हणजे वांग्याचे थालिपीठ हाही भारी प्रकार आहे.

लवकरच हा पदार्थ खाण्यात येईल!
खरपूस भाजलेल्या वांग्याचे भरीत आवडत असल्याने हे वांग्याचे थालीपीठही बहुतेक आवडेल 😀

गवि's picture

1 Mar 2023 - 11:27 am | गवि

उत्तम

इथे फोटो टाका. आणि गरमागरमच खा.

BTW वांगं कोणतं घ्यायचं? भरिताचं मोठं-लंबुळकं का भरल्या वांग्यांसाठीचं असतं ते पिटुकलं?
काये... आता तुम्ही हा पदार्थ सुचवलाच आहे तर लगेचच बनवून बघावा म्हणतो... नाहीतरी आज एकटाच आहे, त्यात आईने तीन -चार दिवसांपूर्वीच मस्त खमंग भाजणी दळली आहे तेव्हा "मौका भी है और दस्तूर भी है" मग उशीर कशाला? आजच दुपारच्या जेवणासाठी वांग्याचे थालीपीठ बनवतो 😀

बाकी काही खास बदल/ऍडिशन करावे लागतील का नेहमीचीच रेसीपी वापरून बनवू?

आंजावर, तूनळी वर अनेक ठिकाणी वांग्याचे थालिपीठ पाकृ आहे. फार वेगळी प्रक्रिया नाही. भरताचे मोठे भाजलेले वांगे, किंवा तयार पण उरलेले भरीत किंवा काहीवेळा उकडलेले वांगे, कांदा इत्यादि मिसळून भाजणीचे पीठ भिजवावे.

शुभस्य शीघ्रम.. :-))

फोन करके वांगा मंगायेला हैं... आजच बनवण्यात येणार वांग्याचे थालीपीठ!
बाकी अक्ख मोठं वांगं एकट्यासाठी जास्त होईल त्यामुळे अर्ध्याचे थालीपिठ आणि अर्ध्याचे मस्त पैकी दही घालून भरीत बनवतो... मात्र इकडे घरचे पांढरेशुभ्र लोणी नसल्याने अमूल बटर, दही, साजुक तुप आणि भरीताबरोबर ते खाण्यात येईल. रेसीपी आणि फोटोज लवकरच टाकण्यात येतील 😀

हुश्श...
जवळच्या एका खानावळीत जाउन वांगं चुलीवर मस्त खरपुस भुजल्यांव!
1
आता थालीपीठ आणि भरीत बनवायला संध्याकाळ पर्यंत वाट बघावी म्हणतो; म्हणजे स्मर्नऑफ विथ ग्रीन चिली अँड लेमनच्या जोडीने ते खायला जास्त मजा येईल 😂

गवि's picture

1 Mar 2023 - 3:50 pm | गवि

क्या बात है..!!

काल टर्मिनेटर साहेबांनी स्मरणोफच्या नादात थालिपीठ बेत रहीत करून भाजलेले वांगे मीठ मिरपूड पेरुन खाल्लेले असावे असा अंदाज. ;-))

टर्मीनेटर's picture

2 Mar 2023 - 11:37 am | टर्मीनेटर

नाही हो :)
काल दुपारीच भाजलेले वांगं सोलून-कापून त्यात कांदा, कोथिंबीर आणि मीठ घालून चांगले कालवून घेतले आणि संध्याकाळी बनवायचे असल्याने तो माल सरळ फ्रिज मध्ये ठेऊन दिला. हा पण पुढे स्मर्नऑफच्या नादात प्रत्यक्ष थालीपीठ आणि भरीत तयार होईपर्यंत रात्रीचे दहा वाजले हा भाग निराळा 😀
अर्थात दोन्ही मस्त झाले होते त्यामुळे खायला मजा आली हे.वे.सां.न.ल. एक चांगला चविष्ट पदार्थ सुचवलात त्याबद्दल आभारी आहे, आज दुपारनंतर सचित्र रेसिपी टाकतो...

टर्मीनेटर's picture

2 Mar 2023 - 5:35 pm | टर्मीनेटर

पोस्टेड 😀 https://www.misalpav.com/node/51157
१५

कर्नलतपस्वी's picture

2 Mar 2023 - 7:33 pm | कर्नलतपस्वी

सिमरनची मजाच काही वेगळी.

वामन देशमुख's picture

3 Mar 2023 - 2:25 pm | वामन देशमुख

टर्मिनेटर भौ, तुमचे साग्रसंगीत प्राशन-भक्षण आवडले.

सिमरनाप होडका* न् भाजलेली वांगी हे कॉम्बी मस्त वाटतेय, रविवारी कोणत्यातरी मित्राला गळ घालून ट्राय करिन.

---

अवांतर: बाकी वांग्याच्या भरिताची चर्चा वाचून लहानपणीच्या शेतातील ताजी तोडलेली वांगी भाजून खाण्याच्या आठवणी जाग्या झाल्या.

---

सवांतर: * हो, मराठवाड्यातल्या बार्समध्ये हाच बरोबर उच्चार आहे!

---

अती-अवांतर: Puncture हा शब्द देवनागरी लिपीत अनेक ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारे लिहिलेला दिसतो. त्याचप्रमाणे Smirnoff चा उच्चार कुठेकुठे कसा होतो याची एक यादी बनवायला हवी.

Nitin Palkar's picture

2 Mar 2023 - 12:10 pm | Nitin Palkar

इनो मागवण्यात आले आहे.

टर्मीनेटर's picture

2 Mar 2023 - 12:20 pm | टर्मीनेटर

ENO काम करें सिर्फ 6 सेकंड में...
😀 😀 😀

बिनकांद्याचे फक्त तिखट , मीठ, ओवा तीळ कोथींबीर घालून केलेले सोवळ्यातले थालीपीठही मााझी आई स्वतासठी करायची तेही तिच्या अनुभवी हातांच्या चवीमुळे व वेगळ्या चवीमुळे छान लागे . गेले ते बालपणाचे व शाळेचे दिवस ऊरल्या त्या आठवणी!! अर्था त रम्य सुंदर दिवस नव्हते पैशाची टंचाई खाण्यासठी विविध पदार्थ व आवडते संदर भेळ,फरसण, विकतचे काहीच नसायचे आई रेोजचा स्वैपाक घरकाम संभाळूत व तिच्या पैशात, वेळेत बससेल शक्य असतील ते पदार्थ आम्हाला खाऊ घाली कारण मंबई शहरात व गुजराथी गावातली रहाणी attractions पैसे खर्चायला भरपूर, ,व महागाई पाच मुलाचे खर्च आईवडिलांना औषधे कपडालत्ता व शिक्शणाचा मोठा खर्च आईवडिलांना बघावा लागे. त्यामुळे हौस मौज कशी ती नाहीच पण खूप आवश्यक गोष्टीही नाहीच्या पाढ्यात जमा होणार्या ज्या पुढे नोकरी लागल्यावर भरून निघाल्या.

बिनकांद्याचे फक्त तिखट , मीठ, ओवा तीळ कोथींबीर घालून केलेले सोवळ्यातले थालीपीठही मााझी आई स्वतासठी करायची तेही तिच्या अनुभवी हातांच्या चवीमुळे व वेगळ्या चवीमुळे छान लागे . गेले ते बालपणाचे व शाळेचे दिवस ऊरल्या त्या आठवणी!! अर्था त रम्य सुंदर दिवस नव्हते पैशाची टंचाई खाण्यासठी विविध पदार्थ व आवडते संदर भेळ,फरसण, विकतचे काहीच नसायचे आई रेोजचा स्वैपाक घरकाम संभाळूत व तिच्या पैशात, वेळेत बससेल शक्य असतील ते पदार्थ आम्हाला खाऊ घाली कारण मंबई शहरात व गुजराथी गावातली रहाणी attractions पैसे खर्चायला भरपूर, ,व महागाई पाच मुलाचे खर्च आईवडिलांना औषधे कपडालत्ता व शिक्शणाचा मोठा खर्च आईवडिलांना बघावा लागे. त्यामुळे हौस मौज कशी ती नाहीच पण खूप आवश्यक गोष्टीही नाहीच्या पाढ्यात जमा होणार्या ज्या पुढे नोकरी लागल्यावर भरून निघाल्या.

बिनकांद्याचे फक्त तिखट , मीठ, ओवा तीळ कोथींबीर घालून केलेले सोवळ्यातले थालीपीठही मााझी आई स्वतासठी करायची तेही तिच्या अनुभवी हातांच्या चवीमुळे व वेगळ्या चवीमुळे छान लागे . गेले ते बालपणाचे व शाळेचे दिवस ऊरल्या त्या आठवणी!! अर्था त रम्य सुंदर दिवस नव्हते पैशाची टंचाई खाण्यासठी विविध पदार्थ व आवडते संदर भेळ,फरसण, विकतचे काहीच नसायचे आई रेोजचा स्वैपाक घरकाम संभाळूत व तिच्या पैशात, वेळेत बससेल शक्य असतील ते पदार्थ आम्हाला खाऊ घाली कारण मंबई शहरात व गुजराथी गावातली रहाणी attractions पैसे खर्चायला भरपूर, ,व महागाई पाच मुलाचे खर्च आईवडिलांना औषधे कपडालत्ता व शिक्शणाचा मोठा खर्च आईवडिलांना बघावा लागे. त्यामुळे हौस मौज कशी ती नाहीच पण खूप आवश्यक गोष्टीही नाहीच्या पाढ्यात जमा होणार्या ज्या पुढे नोकरी लागल्यावर भरून निघाल्या.

Bhakti's picture

3 Mar 2023 - 8:58 pm | Bhakti

मका थालिपीठने सुफळ संपूर्ण :)
मक्याचे थालिपीठ
G

https://www.misalpav.com/node/51158#comment-1161126

कर्नलतपस्वी's picture

3 Mar 2023 - 10:17 pm | कर्नलतपस्वी

मका पण सर्व समावेशक आहे.
मका चाट,अप्पे बनवताना मक्याचे दाणे आता मक्याचे थालीपीठ.

भक्ती,थालीपीठाचा रंग,रूप सुंदर आहे डोळ्याने चाखले. आता बनवायला सांगतो.

पर्णिका's picture

4 Mar 2023 - 2:08 am | पर्णिका

स्मरणरंजनपर लेख आवडला. आजीच्या हातच्या थालीपीठाची आठवण आली.
माझी आजी शुक्रवारी, श्रावणात, नवरात्रीतील अष्टमीला देवीला थालीपीठ, लोणी, लोणचे असा खास नेवैद्य दाखवायची. ती चव, तो खमंग वास आणि ते नेवैद्याचे ताट... आज तुमचा हा लेख वाचून ते पुन्हा सगळे मनानेच अनुभवले. खूप खूप धन्यवाद !