आजचा मेनू -१

Bhakti's picture
Bhakti in पाककृती
28 Oct 2023 - 11:33 am

A

जमलाय का मेनू
आली लहर केली बेसनवड्याची काळ्या रश्याची आमटी,कुस्कारायला भाकरी, भुर्रकायला कढी,तोंडी लावायला गुज्जू भरवानी मिरची लोणचे, झणझणीत कांदा काकडी ऐवजी घरात होते किवी..

बेसनवड्याची आमटी
पहिल्यांदा ५ चमचे बेसन,३चमचे ज्वारीचे पीठ घेतले.त्याच लसूण आले हिरवी मिरची जिरे यांचे वाटण घातले.मीठ, हळद, तीळ, हिंग घालून कोमट पाण्यात घट्ट मळले.थोडा वेळ बाजूला ठेवले.

काळ्या रस्सा करायला
धने, तमालपत्र भाजून घेतले.कांदा , खोबरं गॅसवर जाळी ठेवत खरपुस भाजुन घेतले.मिक्सरहून वाटण बारीक केले.

नंतर बेसनवड्या लाटून घेतल्या.हलकेच तळून घेतल्या.फोडणी केल्यावर बारीक केलेले मसाले वाटण परतून घेतले.कोमट पाणी त्यात घातले उकळी आल्यावर तळलेल्या बेसनवड्या त्यात सोडल्या.५-८ मिनिटे उकळी आल्यावर गॅस बंद केला.

- भक्ती

प्रतिक्रिया

अहिरावण's picture

28 Oct 2023 - 1:53 pm | अहिरावण

वारलो !

Bhakti's picture

28 Oct 2023 - 2:24 pm | Bhakti

म्हणजे काय हो रावण?

अहिरावण's picture

28 Oct 2023 - 2:32 pm | अहिरावण

>>म्हणजे काय हो रावण?

अहिरावण. रावण वेगळा अहिरावण वेगळा.

वारलो - मिपावर हा वाकप्रचार आपणासं माहित नाही. जुन्या पाककृती शोधा.

अधिक माहिती https://misalpav.com/node/6472

ओह, बरं अहिरावण आणि महिरावण म्हणजे काय? खुप दिवसांपासुन विचारायचे होते.

अहिरावण आणि महिरावण हे दोन्ही राक्षस रावणाचे भाऊ होते.

अहिरावण's picture

28 Oct 2023 - 3:01 pm | अहिरावण

सहमत

अहिरावण आणि महिरावणानी राम आणि लक्श्मणाला किडनॅप करून नेले होते रॅनसम साठी .

अहिरावण आणि महिरावणानी राम आणि लक्श्मणाला किडनॅप करून नेले होते रॅनसम साठी .

वामन देशमुख's picture

29 Oct 2023 - 1:36 pm | वामन देशमुख

मीपण!

वामन देशमुख's picture

29 Oct 2023 - 1:37 pm | वामन देशमुख

म्हणजे,

मीपण वारलो!

कंजूस's picture

28 Oct 2023 - 6:58 pm | कंजूस

चविष्ट जेवण.

आमच्याकडे ' गोळ्यांची आमटी ' किंवा 'गोळ्यांची कढी ' होते. गुजरातमध्ये ' गोटानी कढी '
हे असले पदार्थ हॉटेलवाले कधीच देत नाहीत.

Bhakti's picture

28 Oct 2023 - 7:34 pm | Bhakti

हे असले पदार्थ हॉटेलवाले कधीच देत नाहीत.
काय सांगता!
' रविवारचा मेनू ' तत्सम प्रकारचा प्रोजेक्ट सुट्टीच्या दिवशी अस़ मनात येतंय, बघूया!

कर्नलतपस्वी's picture

28 Oct 2023 - 7:04 pm | कर्नलतपस्वी

डोळ्यानी खाल्ले,तोंडाला कधी मिळेल......

धन्यवाद!
नक्की योग येईल :)

वामन देशमुख's picture

29 Oct 2023 - 1:37 pm | वामन देशमुख

डोळ्यानी खाल्ले,तोंडाला कधी मिळेल......

मीपण!

चौथा कोनाडा's picture

28 Oct 2023 - 8:23 pm | चौथा कोनाडा

झकास ,.... एक नंबर !

तोंपासु !

जुइ's picture

28 Oct 2023 - 11:44 pm | जुइ

वा! झक्कासं पाकृ. हिवाळ्यात करायला हवी!

स्नेहा.K.'s picture

29 Oct 2023 - 8:39 am | स्नेहा.K.

थंडीत असं गरमागरम जेवण छानच वाटेल!

Bhakti's picture

29 Oct 2023 - 11:08 am | Bhakti

सर्वांना धन्यवाद _/\_

टर्मीनेटर's picture

29 Oct 2023 - 11:51 am | टर्मीनेटर

छान साधा, सोपा, सुटसुटित मेनु 👍

वामन देशमुख's picture

29 Oct 2023 - 1:42 pm | वामन देशमुख

मेनू आवडला.

कधी करून पाहीन.

---

एक शंका: तमालपत्र प्रत्यक्ष खाण्यासाठी वापरतात का?

आम्ही केवळ सुगंधासाठी / स्वादासाठी खड्या मसाल्याचा एक भाग म्हणून तमालपत्र (दालचिनी, मिरे, इलायची, लवंगा, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता असं) नंतर टाकून देण्यासाठी म्हणून वापरतो.

टाकून न देता, पथ्य नसेल तर, खाल्लेत तर उत्तम...

शिवाय, असे पदार्थ आपण, तसे कमी प्रमाणातच वापरतो..

Bhakti's picture

30 Oct 2023 - 10:41 am | Bhakti

सर्वांना _/\_
तमालपत्र मसाल्यात कुटतांना आणि इतरवेळी फ्लेवरसाठी वापरतात,तमालपत्र भात शिजवतांना टाकायचा चांगला स्वाद येतो.अर्थात या सगळ्या गोष्टी स्वादासाठीच वापरतात.बाकी खायचच असेल तर मसाला नाहीतर काढा करावा यांचा.

मुक्त विहारि's picture

30 Oct 2023 - 6:11 pm | मुक्त विहारि

थोडे विषयांतर..

मिरे, लवंग, दालचिनी, वेलदोडे आणि मसाला वेलदोडे ... हे थोड्या प्रमाणात खाल्ले तरी चालतात.

श्वेता व्यास's picture

30 Oct 2023 - 12:25 pm | श्वेता व्यास

वाह छान फोटो, गोळ्यांच्या ऐवजी वड्यांची आमटी करून बघणार आता एकदा.

बेसनवड्या म्हणजेच पाटवड्या का?

Bhakti's picture

30 Oct 2023 - 9:35 pm | Bhakti

नाही ‌.
मी पण आधी पाटोडीच लिहिले होते पण बेसन भाजून शिजवून पाटावर वा तत्सम फ्लैट सरफेसवर थापून बनवतात ती authentic पाटोडी/पाटवडी असं शोधताना समजले :)

पर्णिका's picture

31 Oct 2023 - 10:12 pm | पर्णिका

मेन्यू आवडला ! :)
सध्या आमच्याकडे पोलर कोल्ड फ्रण्टमुळे तापमान बरेच खाली आले आहे. बेसनवड्याची आमटी छान वाटेल या वातावरणांत... एक शंका आहे बेसनवड्या तळून ना घेता वाफवून घेतल्या तर चालतील का ?

हो वाफवून घेतल्या तरी चालेल.अगदी न तळता न वाफवता आमटीला उकळली की तशाच कच्च्या सोडल्या तरी चालेल.नीट शिजल्या की तिन्ही प्रकारात त्या वरती तरंगून येतात ,तेव्हा उकळी बंद करा.

पर्णिका's picture

2 Nov 2023 - 4:07 am | पर्णिका

धन्यवाद भक्ती !
हो मी वाफ़वूनच घेतल्या, जरा व्हेरिएशन म्हणजे कोथिंबीर, खोबरं, खसखस वगैरेंचे सारण भरून रॅव्हिओलीसारख्या वड्या केल्या... अफाट चवीची आमटी झाली. फुलके, वाफाळता भात, आमटी, Tzatziki आणि Lentil Chips असा मस्त बेत झाला.
आजचा मेनू - २ कधी येणार ? :)

वाह मस्त बेत.फोटो पाहिजे होता :)

जरा व्हेरिएशन म्हणजे कोथिंबीर, खोबरं, खसखस वगैरेंचे सारण भरून रॅव्हिओलीसारख्या वड्या केल्या

म्हणजे मोदकाची आमटीची बहिण आहे तर रॅव्हिओली :)
https://www.misalpav.com/node/49294

पर्णिका's picture

6 Nov 2023 - 3:48 am | पर्णिका

अरेच्चा खरंच की मोदकही करू शकत होते. :) पण माझ्या डोक्यात वड्या आणि फ्रीजमध्ये असलेले बाकर संपवणे हेच समीकरण पक्के होते, म्हणून रॅव्हिओली केल्या.

इथे आणि अन्यत्र देखील अनेकदा असे वाचले आहे की अमुक हा पदार्थ हिवाळ्यात करायला छान आहे. या थंडीत आता करून बघणार. किंवा अशा पावसाळ्यात हे सूप करायला उत्तम. पेपरात सुद्धा हिवाळ्यातील पदार्थ, पावसाळ्यातील पदार्थ असे येत असते. हे पदार्थ हिवाळ्यातच जास्त चविष्ट लागतात किंवा काही इतर शास्त्र आहे का त्यामागे ते माहीत नाही. बाकी हिवाळ्यात पौष्टिक वगैरे कारण असेल असे वाटत नाही कारण पौष्टिक तर सदैवच खावे.