२०२२ च्या नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला स्वत:चे वजन केले आणि ते ६८ किलो भरले. माझ्या साडे पाच फूट उंचीसाठी योग्य BMI range १८.५ ते २४.९ अशी आहे. थोडक्यात म्हणजे, मी स्थूलपणाकडे वाटचाल करीत असल्याची ती पहिली चाहुल होती. पुढील वर्षाच्या (२०२३) फेब्रुवारीत होणार्या लांब पल्ल्याच्या शर्यतीत भाग घ्यायचा असल्याने मला वजन कमी करणे भागच होते. तेव्हा ६० किलो हे माझे ध्येय ठरवले आणि लवकरात लवकर ते कसे साध्य करता येईल याचा शोध घेण्यास प्रारंभ केला.
तसे पाहीले तर इंटरनेटवर अक्षरश: हजारो उपाय उपलब्ध आहेत. परंतु मला सोपा, खात्रीशीर, स्वस्त आणि सर्वात मुख्य म्हणजे लॉजिकली पटणारा असा उपाय हवा होता. दोन प्रकार सापडले -
१) डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचा. जे म्हणतात दिवसातून फक्त दोन वेळाच खा.
२) काही विदेशी तज्ञांचा (डॉ. जेसन फुंग, डॉ. स्टर्न एकबर्ग, डॉ. अनवीन इत्यादी). जे म्हणतात दिवसाचे दोन भाग करा. एक १६ तासांचा ज्यात पाण्याव्यतिरिक्त काहीही न घेणे. आणि दुसरा ८ तासांचा, ज्यात दिवसभराचे खाऊन घेणे.
वरील दोन्ही उपायांत एक गोष्ट समान होती ती म्हणजे साखर पूर्णपणे वर्ज्य करणे आणि पिष्टमय पदार्थांचे (कार्बोहायड्रेट) चे प्रमाण कमी करणे. म्हणजेच सोप्या भाषेत धान्ये (गहू, तांदूळ), बटाटे इत्यादी कमी खाणे.
दोन्ही पद्धती लॉजिकली पटल्या असल्यामुळे मी त्यांचे मिश्रण करायचे ठरवले. आणि ८ तासांत दोन जेवणे करणे आणि उर्वरित काळात काहीही न खाणे, असे सुरू केले. अर्थात दोन जेवणांच्या मध्ये विना साखरेचा आणि कमी दुधाचा चहा किंवा कॉफी घेता येत होतीच. परंतु मला त्यात काहीतरी नाविन्य असावे वाटल्यामुळे पुन्हा शोधाशोध सुरू केली. आणि मला गवसली - बुलेटप्रूफ कॉफी.
मूळ पाश्चिमात्य पाककृतीत, फिल्टर कॉफीत क्रीम घालून पिणे असे आहे. मी त्यातील सारांश घेऊन स्वत:ची पाकृ बनवली. फिल्टर कॉफीऐवजी इन्स्टंट कॉफी वापरणे. आणि क्रीमऐवजी खोबरेल तेल वापरणे (शेवटी दोन्हीत १००% फॅट्च).
तर ही आहे सोपी, चटकन होणारी आणि पौष्टिक भारतीय पद्धतीची बुलेटप्रूफ कॉफी.
साहित्य -
इन्स्टंट कॉफी - १ चमचा
खोबरेल तेल - आवडीनुसार १-२ चमचे
गरम पाणी - १ कपभर
(वर सांगितलेल्या उपायांनी माझे वजन अवघ्या दोन महिन्यात ६० किलोंवर आले. मधल्या काळात ४-५ लग्न इत्यादी कौटुंबिक समारंभात भाग घ्यावा लागल्याने तेवढे दिवस ढील द्यावी लागली. ते जमेस धरूनही दोन महिन्यात ८ किलो कमी ही चांगलीच उपलब्धी म्हणायला हवी!)
https://drive.google.com/file/d/1cz5cNbB78f05I-eoaNnFFNLVkYn3p83Q/view?…
वाचने
7858
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
किती वेळा दिवसातून?
वजन कमी होण्याचे कारण
In reply to किती वेळा दिवसातून? by कंजूस
छान माहिती, मीही हेच डाएट
In reply to वजन कमी होण्याचे कारण by सुनील
धन्यवाद
In reply to छान माहिती, मीही हेच डाएट by Bhakti
चांगली माहिती मिळाली.
In reply to वजन कमी होण्याचे कारण by सुनील
धन्यवाद
In reply to चांगली माहिती मिळाली. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
जमेल असं वाटतंय, प्रयत्न
In reply to धन्यवाद by सुनील
शुभेच्छा!
In reply to जमेल असं वाटतंय, प्रयत्न by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
खोबरेल तेल ऐवजी कधी कधी
नक्कीच
In reply to खोबरेल तेल ऐवजी कधी कधी by आंद्रे वडापाव
आज बुलेटप्रुफ काफी प्यायले
In reply to नक्कीच by सुनील
धन्यवाद!
In reply to आज बुलेटप्रुफ काफी प्यायले by Bhakti
चांगली माहीती
चामुंडराय यांचा अन्न प्या आणि
(No subject)