न्याय झाला, पण...!

अँड. हरिदास उंबरकर's picture
अँड. हरिदास उंबरकर in जनातलं, मनातलं
29 Nov 2017 - 4:39 pm

न्याय झाला, पण..!
मानवी क्रौर्याची परिसमा ओलांडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणातील तिन्ही दोषींना आज न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. कोपर्डी घटनेतील घृणास्पद विकृती आणि विक्षिप्तपणा बघितला तर या प्रकरणात फाशीशिवाय दुसरी शिक्षा योग्य नव्हती. अत्यंत निर्घृणपणे पीडित तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. कोपर्डी अत्याचार प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला. कोपर्डीतील पिढीतला न्याय मिळावा यासाठी लाखो करोडो जनसंख्येचे महामोर्चे निघाले. दोषींना फासावर लटकविण्याची मागणी सर्व स्तरातून करण्यात आली. जणआक्रोशाचा प्रचंड दबाव असल्याने सरकारलाही हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा लागला. विशेष सरकारी वकील ऍड. उज्वल निकम यांची वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी सबळ पुरवा नसल्याने दोषींना फासावर लटकविण्याची न्यायालयीन लढाई तशी सोपी नव्हती. परंतु, ऍड. उज्वल निकम यांनी परिस्थतीतीजन्य पुराव्याच्या आधारावर मजबूतपणे युक्तिवाद केला. परिणामी तिन्ही दोषींना फाशीची शिक्षा अहमदनगर न्यायालयाने सुनावली आहे. यामुळे कोपर्डीच्या पीडितेला न्याय मिळाला असं म्हणता येईल. परंतु, हा न्याय अजून अपूर्ण आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आदेशावर दोषी अजूनही उच्च न्यायालयात अपील करू शकतात. त्यानंतरही शिक्षा प्रलंबित ठेवण्यासाठी अनेक उपाय दोषींकडे आहेत. त्यामुळे, कोपर्डी घटनेतील आरोपी ज्या दिवशी फासावर लटकविल्या जातील तेंव्हाच पीडितेला पूर्णतः न्याय मिळेल.

'मनुष्यप्राणी' असा शब्द उच्चारून माणूस देखील एक प्राणीच असल्याचे नेहमी उद्युक्त केल्या जाते. मात्र मनुष्य हा प्राणी विचारशील, समाजशील असल्याने त्याच्याकडून माणूसपण जपले जाण्याची अपेक्षा केल्या गेली आहे. नैतिकता सभ्यता सद्सदविवेकबुद्धी असे सद्गुण जपत माणूस रानटी अवस्थेतून आजच्या संगणकयुगापर्यंत वाटचाल करत असल्याचे म्हटले जाते, शिवाय माणसाने आज वैचारिक सुसंस्कृतपणाचा एक नवा टप्पा गाठल्याच्या गप्पाही मारल्या जातात. परंतु माणसाचा मूळ रानटी स्वभाव आजही कायम असून त्याच्या स्वभावातील रानटीपणा विकृत होत असल्याचे अवतीभवती सातत्याने घडणाऱ्या घटनांवरून जाणवत राहते. कोपर्डीच्या घटनेत जो अमानुषपणा या नराधमांनी केला तो प्राण्यातील रानटीपणालाही लाजवणारा होता. एखाद्या बलात्काराच्या घटनेचे वर्णन करू नये. पण या प्रकारातील विक्षिप्तपणा अत्यंत घृणास्पद होता. नराधमाने मुलीचे हात-पाय तोडले. ओठांचा चावून चोथा केला होता. केस उपटले होते. तिला प्रचंड वेदना देऊन एका निष्पाप अल्पवयीन मुलीची नृशंस हत्या केली. नरभक्षक प्राण्याला जसं गोळ्या घालून ठार मारल्या जातं तसेच या माणसातील जनावरांना तात्कळ गोळ्या घालून यमसदनी पाठविल्या जावं, अशा उद्विग्न प्रतिक्रिया त्यावेळी उमटल्या होत्या. परंतु आपल्या न्यायव्यवस्थेचं तत्व जनावरणांनाही मारण्याची परवनगी देत नसल्याने दोषींच्या विरोधात ट्रायल सुरु झाली. आणि आज अखेर या प्रकरणात न्याय आला. न्यायलायाच्या निकालाने समाजमन निश्चितच सुखावले आहे. कोपर्डी पीडितेला न्याय मिळाल्याची भावना व्यक केल्या जातेय. दोषींना फासावर लटकविण्याचा निर्णय देऊन न्यायालयाने फक्त पीडितेला न्याय दिला नाही तर या घटनेनंतर आक्रोश करणाऱ्या संपूर्ण महराष्ट्रातील जनतेच्या दुःखावर मलमपट्टी केली आहे. मात्र जखम अजून पूर्ण बरी झालेली नाही. दोषींना फासावर लटकविण्यासाठी अजून संघर्ष करावा लागणार आहे. शिवाय यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठीच्या उपयांवरही मंथन करावे लागणार आहे.

कोपर्डीसारख्या अमानवीय बलत्कारच्या घटनेत 'न्याय झाला' एवढाच शब्द वापरून हा विषय संपणार नाही तर अनेक गंभीर मुद्दे यासोबत जुडलेले आहेत. शिक्षेची सुनावणी आणि अंलबजावणीत लागणाऱ्या मोठ्या कालावधीमुळे शिक्षेविषयी जनमानसातील धाक आणि विश्वासर्हतेचा प्रश्न जसा समोर येतो तसाच महिलांच्या सुरक्षेतेचा प्रश्नही अजेंड्यावर घ्यावा लागेल. कोपर्डीत एका निष्पाप मुलीचा बळी गेल्यानंतर अवघ्या महाराष्ट्रात जणक्षोभ उसळला होता. कोपर्डीच्या पीडितेला न्याय देण्याची मागणी ज्यावेळी करण्यात येत होती. त्याच्या मागे अशी घटना पुन्हा घडू नये, अशी अपेक्षाही व्यक्त केल्या जात होती . आज कोपर्डीच्या प्रकरणात न्याय झाला, न्यायालयाने त्यांचे काम चोख बजावले. थोड्या उशिराने का होईना दोषी फासावर लटकविल्या जातील, आणि पीडितेला पूर्ण न्याय मिळेल. मात्र लोकांची अपेक्षा अजून पूर्ण झालेली नाही. कोपर्डी सारख्या दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आता पुढाकार घ्यावा लागणार आहे. कोपर्डी घटनेच्या निकालाने अशा विकृत प्रवृत्तीवर जरब बसेल, असं ठामपणे म्हणता येणार नाही. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर देशात कायदे बदलले जागरूकता झाली. तरी कोपर्डीची घटना घडली. यानंतरही बलात्काराचे गुन्हे गुन्हे घडतच आहे. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी कायद्यासोबत मानसिकता ही बदलावी लागणार आहे. समाजातील पुरुषसत्ताक व्यवस्था आणि स्त्री विषयीचा भोगवादी दृष्टिकोन हेचं अशा विकृतींना जन्म देते. बलात्काराच्या विकृत विचारांचा जन्म मेंदूतून होतो, त्यामुळे उपचारही मेंदूवरच करावे लागतील.

विकृत आणि मुजोर मानसिकेतला भयभीत करून अशा कृत्यांपासून परावृत्त करण्यासाठी कोठारातील कोठार शिक्षा देण्याची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. मात्र न्यायप्रक्रियेतील विलंब या उद्देशाला काही प्रमाणत हरताळ फसतो.सत्र न्यायालयाने दोषीला फाशीची शिक्षा दिल्यापासून उच्च ते सर्वोच्च न्यायालय आणि नंतर राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज या प्रवासात दोषीला सवलती तर मिळतात शिवाय शिक्षा अंलबजावणीत उशीर होतो. अर्थात, प्रोसिजर आवश्यक आहेच परंतु या प्रक्रयेलाही काही कालमर्यादा असावी. सत्र न्यायालयाच्या निकालावर उच्च न्यायालयात अपील, नंतर सर्वोच्च न्यायालयाने फाशी सारखी शिक्षा कायम ठेवल्यानंतर तरी अंलबजावणीत विलंब होऊ नये. दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरणातच फाशीची शिक्षा सुनावण्यात येते. संपूर्ण गुन्हेगारी मानसिकतेवर जरब बसावा यासाठी हा निर्णय घेतला जातो. त्यामुळे किमान हा हेतू सफल होण्यासाठी तरी अशा खटल्यांमध्ये कालमर्यादा ठरवनियात यावी. आज कोपर्डी घटनेतील निकाल लागला आहे. दोषींना फाशीची शिक्षा देऊन न्यायालयाने मुजोर प्रवृत्तीला जरब बसविण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले, यात शंका नाही. परंतु कोपर्डीच्या दोषींना फासावर लटकावयला १२ वर्ष लागणार असतील तर कायदाचा धाक कसा निर्माण होईल. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर देशभारतील कायदे बदलण्यात आले होते, या धर्तीवर फाशीच्या शिक्षेअमलबजावणी संदर्भात कालमर्यदा निर्धारित करून त्यानुसार कोपर्डीतील आरोपीना फासावर लटकविल्या गेले तर कोपर्डीच्या पीडितेला खरा न्याय मिळेल..!!

समाजलेख

प्रतिक्रिया

स्वधर्म's picture

29 Nov 2017 - 4:51 pm | स्वधर्म

पोलिस, सरकारी वकील इत्यादींनी वेगाने तपास करून या प्रकरणात पिडीत मुलीला न्याय मिळाला या बाबीशी सहमत. पण…
या आधीच्या खैरलांजी प्रकरणात, किंवा सोनई हत्याकांड, तसेच नितीन अागे या प्रकरणात मात्र याच वेगाने, हाच न्याय होऊ शकला का होउ शकला नाही, याचे वाईट वाटते.

विशुमित's picture

29 Nov 2017 - 4:56 pm | विशुमित

नितीन आगे प्रकरण ज्या वेळेस झाले होते त्यावेळेस खूप हळहळलो होतो. त्यात या प्रकरणातील सगळे आरोपी सुटल्याने तर आणखी वाईट वाटले.

एमी's picture

29 Nov 2017 - 5:32 pm | एमी

सहमत आहे.

नितीन आगे केसमधे सगळेच्या सगळे साक्षीदार उलटले... काय करता येईल असे होऊ नये म्हणून...

इथेदेखील परिस्थितीजन्य पुरावा वापरता आला नसता का!

मराठी कथालेखक's picture

29 Nov 2017 - 6:54 pm | मराठी कथालेखक

नितीन अागे प्रकरणात अखेर न्याय झालाच नाही त्याबद्दल वाईट वाटते.
समाजाला एक मोठी लढाई अजून लढायची आहे ...न्याय.. सर्वांसाठी समान आहे हे अजून समाजाने मान्य करायचे आहे असे दिसते.

राष्ट्रपतींना फाशीच्या शिक्षेवर निर्णय देता येण्याचा अधिकार कशाला हवाय असा प्रश्न मला विचारावासा वाटतो. इतक्या न्यायालयांनी एखाद्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा ठोठावली असेल तर राष्ट्रपतींना त्यात असे काय कायदेशीरदृष्ट्या समजणार आहे की ते ही शिक्षा बदलू शकतात? ह्या तरतुदीचा वापर गुन्हेगारांकडून केवळ वेळकाढूपणा करण्यासाठी केला जातो आणि न्याय अजूनच विलंबाने मिळतो (किंवा मिळतही नाही).

चौथा कोनाडा's picture

29 Nov 2017 - 5:19 pm | चौथा कोनाडा

+१

असली इलॉजिकल अडथळ्यांची मालिका असल्यावर का नाही पराकोटीचा विलंब होणार न्याय प्रक्रियेच्या निर्णयाला, अमंलबजावणी ?
बाकी क्षेत्रा देखील असलाच हलगर्जीपणा !
वेळकाढू लोकांचा देश आहे हा !

<<<वेळकाढू लोकांचा देश आहे हा !>>>
==>> 'अतिमहाप्रचंड' सहमत.
निवांत सगळं, सब रामभरोसे..

NiluMP's picture

29 Nov 2017 - 5:29 pm | NiluMP

+१००

गामा पैलवान's picture

29 Nov 2017 - 7:41 pm | गामा पैलवान

हे कलियुग चालू आहे. इथे फक्त पैसेवाल्यांनाच न्याय मिळतो. कोपरडी प्रकरण अपवाद आहे कारण की लोकांनी उत्स्फूर्त मोर्चे काढले. पण नितीन आगे प्रकरणांत न्याय मिळणार नाही. कारण की आगे कुटुंबीय पैसेवाले नाहीत. कलियुगाचा हा दुष्प्रभाव संपवण्यासाठी हिंदुराष्ट्र आवश्यक आहे.

-गा.पै.

babu b's picture

29 Nov 2017 - 11:26 pm | babu b

अजून हिंदूराष्ट्र आले नाही काय ?

गामा पैलवान's picture

30 Nov 2017 - 1:45 pm | गामा पैलवान

बाबुराव,

ज्याअर्थी अशा नृशंस घटना घडताहेत त्याअर्थी हे हिंदुराष्ट्र नव्हे. इतकं सुद्धा कळंत नाही का? कलियुगाचा प्रभाव, दुसरं काय ! चालायचंच !!

आ.न.,
-गा.पै.

babu b's picture

30 Nov 2017 - 1:52 pm | babu b

काय म्हणता ?!

कलियुगामुळे असे घडते आहे.

मग हिंदुराष्ट्रनिर्मितीला कलियुग संपून पुन्हा सत्ययुग यायला लागेल की काय ?

लंडनमध्ये काय चालू आहे ? कलियुगच का ?

श्रीगुरुजी's picture

29 Nov 2017 - 8:45 pm | श्रीगुरुजी

आजचा निकाल व मागील काळातील २ निकाल पाहिले तर एकंदरीत पोलिस तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होते.

जानेवारी २००४ मध्ये ७२ ब्रिगेडींनी व्यवस्थित योजना आखून एकत्र येऊन पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर हल्ला करून तिथे प्रचंड मोडतोड केली. हे सर्व ७२ जण मराठा जातीचे होते. हल्ल्यानंतर ब्रिगेडच्या संस्थळावर या ७२ जणांचे एकत्रित प्रकाशचित्र छापून त्या सर्वांचा शूरवीर असा गौरव करण्यात आला होता. आम्हीच ही मोडतोड केली असे ते अभिमानाने सांगत होते. या सर्वांना त्यावेळी अटक होऊन १५ दिवसानंतर सर्वांना जामिनावर सोडले होते. त्यानंतर तब्बल साडेतेरा वर्षांनी या गुन्ह्याचा निकाल लागून सर्वांना पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आले. आपणच हा हल्ला केला असा हे सर्व आरोपी जाहिररित्या सांगत होते, परंतु न्यायाधीशांनी त्याची दखल न घेता केवळ पोलिसांनी सादर केलेल्या तपासावरून सर्वांना निर्दोष सोडले.

दुसरी घटना म्हणजे नितीन आगेचा खून. नितीन आगे हा दलित समाजातील शाळकरी विद्यार्थी आपल्या बहिणीकडे बघतो या आरोपावरून त्या मुलीचा भाऊ व त्याच्या ८-९ इतर मित्रांनी नितीन आगेला बेदम मारहाण केली. त्याला चटकेही देण्यात आले व शेवटी फासावर चढवून त्याला मारण्यात आले. हे सर्वजण मराठा होते. काही दिवसांपूर्वीच या खटल्याचा निकाल तब्बल साडेतीन वर्षांनी लागला व खटल्यातील अनेक साक्षीदार फुटल्याने सर्वजण निर्दोष सुटले. नितीन आगेची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या होऊनसुद्धा एकही जणावर आरोप सिद्ध झाला नाही. यावरून "नो वन किल्ड जेसिका!" या प्रकरणाची आठवण झाली.

तिसरी घटना म्हणजे कोपर्डी. या घटनेत उलटे चित्र होते. जिच्यावर बलात्कार होऊन जिचा अत्यंत क्रूरपणे खून केला गेला ती शाळकरी मुलगी मराठा तर या प्रकरणातील तीनही आरोपी दलित. ही घटना उघडकीस आल्यानंतर राज्यभर प्रचंड निषेध मोर्चे निघाले. खटला जलदगती न्यायालयात चालविल्याने घटनेनंतर १७ महिन्यांच्या आत निकाल लागला. सरकारच्या वतीने कसलेले वकील उज्ज्वल निकम यांनी खटला लढविला. शेवटी सर्व आरोपींवर गुन्हा सिद्ध होऊन त्यांना फाशीची शिक्षा दिली गेली.

या तीन घटनांवरून दुदैवाने असे चित्र दिसते की जेव्हा आरोपी मराठा असतात तेव्हा जाणूनबुजून पुरावे कच्चे ठेवले जातात, पोलिस तपासात हलगर्जीपणा करतात, साक्षीदार फोडले जातात व खटले लांबवून शेवटी त्यातील सर्व आरोपी निर्दोष सुटतात. या गुन्ह्यांविरूद्द्ध फारसा जनक्षोभ होत नाही व माध्यमे देखील अशा प्रकरणांना पुरेसे महत्त्व देत नाहीत. खटल्यातील आरोपी निर्दोष सुटल्यानंतर सुद्धा माध्यमे त्याकडे बहुतांशी दुर्लक्ष करतात.

परंतु जेव्हा गुन्ह्यातील बळी मराठा जातीची असते तेव्हा मात्र प्रचंड जनक्षोभ होतो, खटला जलदगती न्यायालयात चालविला जातो, माध्यमे मोठ्या प्रमाणात प्रकरणाची दखल घेतात, पोलिस कसून तपास करतात व भक्कम पुरावे गोळा करतात ज्यामुळे आरोपींवर गुन्हा सिद्ध होतो.

पोलिस तपास व माध्यमे यामध्ये शिरलेला हा जातीयवाद भयानक आहे असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल. आपण मराठा जातीचे असल्याने अशा प्रकरणातून सहज सुटु शकतो हा विश्वास जर गुन्हेगारांमध्ये बळावला तर भविष्यात सर्व समाजाला याचे चटके बसतील.

त्यामुळे एकाच समाजाला दोष देण्यात अर्थ नाही.

निदान जातीचं पाठबळ लाभल म्हणुन एका तरी पीडित स्त्रीला न्याय तरी मिळाला.
मराठा समाज राजकिय द्रुष्ट्या शक्तिशाली आहे व लोकसंख्या पण जास्त आहे.
उलट या निकालानंतर मराठा समाज अजून प्रगल्भ होईल व भविष्यात अशा घटना कुठल्याही जातीच्या माणसाकडून घडल्या तरी निषेध करेल.

तेजस आठवले's picture

30 Nov 2017 - 10:40 pm | तेजस आठवले

+१
माझ्या मते ह्या केस मध्ये मराठा समाजाकडून न्याय मिळवण्यासाठी जो दबाव टाकण्यात आला, त्यामुळे तपास जलदगतीने होऊन निकाल त्वरेने मिळाला असे नक्कीच म्हणता येईल. मराठा मोर्चे जसे आरक्षणाच्या मागणीसाठी होते तसेच ह्या प्रकरणाचा लवकर तपास होऊन दोषींना शिक्षा व्हावी ह्या मागणीसाठीही होते.'नका ठेवू नजर जिजाऊंच्या लेकींवर' असे पोस्टर, घोषणा आणि आवेशपूर्ण भाषणे हे सगळे मोर्चात होते.
जोपर्यंत दोषी फाशीवर चढत नाहीत तोपर्यंत संपूर्ण न्याय झाला असे नाही म्हणता येणार. अजून उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रपती अशी सगळी कायदेशीर प्रक्रिया होऊन फाशी व्हायला बराच काळ लोटू शकतो. बचावासाठी दोषी काहीही युक्तिवाद करू शकतात. पोलिसांनी दबाव आणला, धमक्या दिल्या, मारहाण केली तसेच तपास करणाऱ्या लोकांची जातही पुढे करून युक्तिवाद करू शकतात. त्यामुळे ते फाशी कधी जातील हे सांगता येणार नाही.
कसाब ची लांबवलेली आणि निवडणुकांच्या जरा आधी दिलेली फाशी, याकूब मेनन च्या फाशी नंतर काही लोकांनी काढलेले गळे, अफझल गुरु बद्दल येणारे उमाळे, तसेच १९९२ पासून आत्तापर्यंतच्या सर्व सरकारांनी टाळलेली खलिस्तानी दहशतवादी भुल्लर ची फाशी (शीख मतांसाठी) हे सगळे बघता न्यायव्यवस्था पूर्णपणे आंधळी आहे असे म्हणणे धार्ष्ट्याचे ठरेल.
समजा सगळ्या पायऱ्या पार पडून अंतिमतः फाशी होणार अशी वेळ आली, तरी त्या वेळी जी काही सामाजिक परिस्थिती असेल(राजकीय परिस्थिती, निवडणूक, आरक्षणासाठी काही घटकांचे प्रयत्न आणि इतर काही जाती/धर्मानी केलेला विरोध इ.इ.) त्यावरून फाशी १००% होणारच असे आज छातीठोकपणे कोणी सांगू शकेल का ? कश्यावरुन ह्याही फाशीवर राजकारण केले जाणार नाही ?
आरोप सिद्ध होऊन तुरुंगात गेलेले माजी मुख्यमंत्री भुजबळ ह्यांबद्दल सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे ह्यांनी नुकतेच केलेले व्यक्तव्य काय वेगळे दर्शवते? त्यांच्या वरील सिद्ध झालेल्या आरोपांचा साधा उल्लेखही न करता, त्यांना एक सहानुभूती मिळवून देण्याचा प्रयत्न नाही का हा ? भुजबळांना जेव्हा अटक झाली तेव्हा त्यांच्या जातीमुळेच त्यांना अटक करण्यात आली आहे असे समर्थकांचे म्हणणे काय दर्शवते? इतकेच कशाला अझरुद्दीन जेव्हा दोषी ठरला तेव्हा पण त्याने मी मुस्लिम आहे म्हणूनच मला बळीचा बकरा बनविले जात आहे असा कांगावा वरून आपला धर्म मध्ये आणला नव्हता काय ?
त्यामुळे आपल्याकडे तरी न्यायदेवता पूर्णपणे आंधळी आहे असे म्हणता येणार नाही. सर्वच प्रकरणांचा नीट तपास करून दोषींना शिक्षा झालीच पाहिजे, त्यामध्ये इतर कुठल्याही बाबी आणता कामा नयेत. योग्य आणि खऱ्या न्यायासाठी वैधानिक मार्गाने मागण्या मांडून प्रकरणे धसास लावण्यासाठी दबाव आणणे काही प्रमाणात योग्य ठरते.

शब्दबम्बाळ's picture

30 Nov 2017 - 12:42 am | शब्दबम्बाळ

मराठा समाज तुम्हाला किती प्रिय आहे हे तुमच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत वेळोवेळी दिसतेच आहे!
३ घटनांचा "अभ्यास" करून स्वतःला पाहिजे तसे अनुमान काढायची आपली हातोटी दांडगी आहेच!
महाराष्ट्रात बलात्काराच्या किती घटना होतात बघा, प्रत्येक घटनेमध्ये जात बघून पीडितेवर अत्याचार होतो का? कोपर्डीची घटना "हिडीस" या प्रकारातली होती..
दिल्लीच्या निर्भयासारखी, म्हणून इतक्या टोकाच्या भावना आल्या... तुम्हाला त्यातही जात सोडून काही न दिसणे यात मला तरी काही विशेष वाटत नाही!
लाज वाटते असले सुशिक्षित लोक बघून...

न्यायालयीन प्रक्रिया कशी चालते हे आपल्याला माहित नसेल असे नाही पण मुद्दाम सबंध मराठा समाजावर टीका करायला मिळतेय मग का सोडाल नाही का?

नितीन आगे प्रकरणात न्याय मिळाला पाहिजेच, पण साक्ष फिरवणे कसे रोखणार? अनेक प्रकरणात साक्षीदार कधी धाकाने तर कधी पैशाने साक्ष बदलतात. यातून मार्ग निघाला पाहिजे, आरोपीना जातीचे अधिष्ठान मिळवून द्यायचा हा जो प्रकार तुम्ही करत आहेत तो अत्यंत दुर्दैवी आहे.
मी तरी अजून कुठल्या आरोपीला "मराठा" असूनही शिक्षा झाली म्हणून आंदोलने मोर्चे पहिले नाहीत, समाज असे काही करत नसताना आरोपींची या जातीचा त्या जातीचा अशी विभागणी करून त्यांना उगाच जातींचा आधार मिळवून देऊ नका!

लेखावरच्या प्रतिक्रिया पहिल्या कि लगेच ध्यानात येतंय कि कोपर्डीचा निकाल लागला आणि दुर्दैवी अंत झालेल्या मुलीला न्याय मिळाला यावर प्रतिक्रिया येण्याऐवजी इतर मुद्द्यांना पुढं केलं जातंय...केवळ जातीय विभागणीमुळे... आपली न्यायपालिका जर खरोखर जात बघून निकाल देत असेल तर मग या सगळ्यालाच काही अर्थ नाही ना...
असो, काढत राहा एकमेकांच्या जाती...

एमी's picture

30 Nov 2017 - 5:55 am | एमी

+१

विशुमित's picture

30 Nov 2017 - 12:13 pm | विशुमित

<<<लाज वाटते असले सुशिक्षित लोक बघून...>>>
==>> हे असले सुशिक्षित लोकच इतरांचे डोके भंजाळून सोडतात आणि मज्जा बघत बसतात. वरून ते कसे जातीवादी आणि आम्ही कसे कष्टाळू आणि हुशार ही शेखी मिरवत बसतात.

गुरुजी तुम्हीच सगळ्यात मोठे जातीवादी आहात आणि तुम्हाला सपोर्ट करणारी मिपावरचे काही पिलावळ. तुमच्यासारख्या समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या काडीटाकू लोकांना ठेचून काढणे एवढाच मार्ग आहे.
कोपर्डी प्रकरणी फक्त मुलगी मराठा होती म्हणून सर्व जाती धर्माच्या लोकांनी मराठा मूक मोर्चा मध्ये सहभाग घेतला होता का ?
प्रत्येक मोर्चा मध्ये मुसलमान बांधवानी पाणी-बिस्कीट वाटपाचे काम मुलगी मराठा होती म्हणून घेतले होते का?
पुण्यातल्या मोर्च्याला माझ्या ऑफिस मधल्या वेगवेगळ्या जातीच्या त्यात ब्राह्मण देखील होते, वेळ काढून १ तासासाठी मोर्च्यात सामील झाले होते ते काय मुलगी मराठा जातीची होती म्हणून?
नितीन आगे प्रकरणात गृहमंत्री तर तुमचे लाडके प्राणप्रिय मुख्यमंत्रीच होते. मग पोलिसांचा तपास आणि साक्षीदार कसे काय फिरले? प्रशासनावर वचक नाही का त्यांची ?
तुमच्या डोक्यामध्येच जातीवादाचा कचरा साचला आहे तो आधी साफ करा आणि मग लोकांना सर्टिफिकेटस वाटत फिरा.
उलट महाराष्ट्राने हे सिद्ध केले की बलात्कारासारख्या गुन्ह्यामध्ये माफी नाही, भले तो कोण्या जाती धर्माचा असू देत.

श्रीगुरुजी's picture

30 Nov 2017 - 2:14 pm | श्रीगुरुजी

कोपर्डी प्रकरण झाल्यानंतरच मोर्चे निघाले. त्यापूर्वी किंवा त्यानंतर घडलेल्या घटनांनंतर मोर्चे निघाले नव्हते. यातला अर्थ अगदी स्पष्ट आहे. बलात्कारासारख्या गुन्ह्यात माफी नसेल, पण अत्यंत क्रूरपणे खून करूनसुद्धा निर्दोष सुटता येते हे सुद्धा सिद्ध झाले की. दोन्ही घटनातील आरोपी आणि गुन्ह्याचे बळी पाहिले तर अजून काही गोष्टी स्पष्ट होतील.

महाठक's picture

1 Dec 2017 - 9:50 am | महाठक

प्रचंड सहमत

विशुमित यांच्याशी प्रचंड सहमत

झपाटलेला फिलॉसॉफर's picture

1 Dec 2017 - 8:12 pm | झपाटलेला फिलॉसॉफर

तुमच्यासारख्या समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या काडीटाकू लोकांना ठेचून काढणे एवढाच मार्ग आहे.

भाषा आवरा विशुमित महोदय . तुम्ही स्वतःला समजता तरी कोण?
भाण्डारकर प्रकरणात आरोपी निर्दोष सुट्णे हा पोलिसानी दाखवलेल्या ढिसाळपणाचाच परिणाम आहे हे १००% सत्य आहे. आणि हा ढिसाळपणा जाणूनबुजून सम्भाजी ब्रिगेडला वाचवण्यासाठीच केला गेला हेदेखील १००% सत्य आहे . मग तुमच्या नाकाला एवढ्या मिरच्या का झोम्बतात?

सम्पादक महोदय ,
असल्या जहरी जातीयवादी अशिष्ट भाषेचा वापर मिपावरील एका जुन्याजाणत्या सदस्याबाबत व त्याच्या जातीबाबत करणार्‍या विशुमित या आयडीवर योग्य ती कार्रवाई त्वरित व्हावी ही विनन्ती

...वेडगळ लोक कंपूबाजीची कोल्हेकुई सुरु करतील.

रात्रीचे चांदणे's picture

29 Nov 2017 - 11:07 pm | रात्रीचे चांदणे

या तीन घटनांवरून दुदैवाने असे चित्र दिसते की......
गुरुजी, एखादा अनुमान काढायचा असेल तर तीन घटना पुरेश्या आहेत का? मला वाटते की मराठा समाजा विषयी काही तरी राग आहे तुमच्या मनात. का मराठा समाजातील एकाही गुन्हेगारांना आतापर्यंत शिक्षाच झाली नाही.

मराठी_माणूस's picture

30 Nov 2017 - 10:17 am | मराठी_माणूस

https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/crime/lawyer-who-represents-h...

ही अजुन एक घटना. इथे सरकारी वकील का नाही ?

श्रीगुरुजी's picture

30 Nov 2017 - 10:25 am | श्रीगुरुजी

दोघांना एकत्र उत्तर देतो.

या ३ घटना अगदी अलिकडच्या काळातील आहेत. त्यापूर्वी देखील अशाच स्वरूपाच्या घटना घडलेल्या आहेत. उदाहरणार्थ नामांतराच्या वेळी दलितांना मारहाण करून त्यांच्या झोपड्या जाळलेल्यांना शिक्षा दिल्याचे ऐकिवात नाही. त्यापूर्वी गांधीवधानंतर ब्राह्मणांची घरे जाळलेल्यांना शिक्षा झाल्याचे ऐकिवात नाही. ब्राह्मणांविरूद्ध अत्यंत घाणेरडे लेखन करणार्‍या ब्रिगेडींना शिक्षा झालेली नाही. एकंदरीत जेव्हा एखाद्या गुन्ह्याचा जातीयवादाशी संबंध असतो, विशेषतः त्यात मराठा जातीचा संबंध असतो, तेव्हा तपासयंत्रणा जाणूनबुजून दिरंगाई करतात किंवा तपासात हलगर्जीपणा करून ठिसूळ पुरावे ठेवून गुन्हेगारांना वाचवायचा प्रयत्न करतात असे चित्र उभे राहते. काही प्रकरणात नक्कीच जात बघून गुन्हे होतात (वर उदाहरणे दिलेली आहेत). बलात्कारासारख्या गुन्ह्यात गुन्हेगार जात बघत नाहीत, परंतु तपासयंत्रणा मात्र जातीवर आधारीत तपास करतात असे चित्र नक्कीच वरील घटनांमुळे उभे राहू शकते.

विशुमित's picture

30 Nov 2017 - 12:07 pm | विशुमित

<<<उदाहरणार्थ नामांतराच्या वेळी दलितांना मारहाण करून त्यांच्या झोपड्या जाळलेल्यांना शिक्षा दिल्याचे ऐकिवात नाही. पूर्वी गांधीवधानंतर ब्राह्मणांची घरे जाळलेल्यांना शिक्षा झाल्याचे ऐकिवात नाही.>>>
==>> नामांतराच्या वेळेस घरे जाळायला चिथावणी देणारे हृदय सम्राट कोण्या जातीचे होते हा प्रश्न विचारला तर तुम्हाला रुचणार नाही मग. गुजरात मध्ये दंगे झाले किती जणांना शिक्षा झाली याचा तपशील देता का?
<<<ब्राह्मणांविरूद्ध अत्यंत घाणेरडे लेखन करणार्‍या ब्रिगेडींना शिक्षा झालेली नाही. >>>
==>> संभाजी ब्रिगेडची पुस्तके आता बाजारात उपलब्ध आहेत. ठोका की त्यां लेखकांवर केस पाहू कशी शिक्षा देत नाही कोर्ट ते ?
तुमचा मेन प्रॉब्लेम तुम्ही ब्राह्मण आहात हा आहे तर. त्यामुळे त्या नराधमांना शिक्षा मिळाली आणि त्या छकुलीला न्याय मिळाला याबद्दल तुम्हाला काही सोयरे सुतक दिसत नाही.
<<<एकंदरीत जेव्हा एखाद्या गुन्ह्याचा जातीयवादाशी संबंध असतो, विशेषतः त्यात मराठा जातीचा संबंध असतो, तेव्हा तपासयंत्रणा जाणूनबुजून दिरंगाई करतात किंवा तपासात हलगर्जीपणा करून ठिसूळ पुरावे ठेवून गुन्हेगारांना वाचवायचा प्रयत्न करतात असे चित्र उभे राहते.>>>
==>> काही आधार आहे का की आपले उगाच "मन की बात". मराठा समाजाचे अशा गुन्ह्यांचे आकडेवारी कोठे मिळती का ते बघा.
<<<परंतु तपासयंत्रणा मात्र जातीवर आधारीत तपास करतात असे चित्र नक्कीच वरील घटनांमुळे उभे राहू शकते.>>>
==>> याच्यावर खूप घाम्साम होऊ शकते. शहीद करकरेंनी केलेल्या तपासावर शेवटी पाणी फेरलेच ना.

सिंथेटिक जिनियस's picture

30 Nov 2017 - 2:03 pm | सिंथेटिक जिनियस

ह्रदयसम्राटाने चिथावणी दिली असेल नामांतरावेळेस पण दलितांचीघरे जाळणे,बायकांचा बलात्कार करणे,पोचीराम कांबळेचे तुकडे करणे यासाठी जे क्रुर काळीज लागते ते कुणीही देऊ शकत नाही.ते उलटे काळीज असणारा एक जात दांडगा समुह आहे,त्याच्या विरोधात काही बोलायचे नाही का? हे म्हणजे मुस्कटदाबीचा प्रयत्न आहे.

श्रीगुरुजी's picture

30 Nov 2017 - 2:45 pm | श्रीगुरुजी

सोनई येथील ३ दलित तरूणांची क्रूरपणे हत्या, पाथर्डी तालुक्यातील जवखेडातील दलित कुटुंबातील ३ जणांची क्रूर हत्या (वरिष्ठ जातीतील महिलेशी संबंध असल्याच्या संशयावरून या हत्या करण्यात आल्या) अशी अजून अनेक उदाहरणे आहेत.

अशा उलट्या काळजाची लोकं सर्व जाती समूहामध्ये आढळून येतात आणि त्याचे समर्थन कधीही होऊ शकत नाही.
मुस्कटदाबीच म्हणाल तर ज्याला दाबायला मिळते तो दाबत असतो हे हजारो वर्षाचा इतिहास आहे. त्यासाठी जातीच्या टक्केवारीचा आणि सत्तेतील भागेदारीचा संबंध नसतो.

सुखीमाणूस's picture

30 Nov 2017 - 4:23 pm | सुखीमाणूस

म्हणजे हजारो वर्षे एका समाजाने मुस्कट्दाबी केली म्हणुन
आता दुसर्या समाजाची दादागिरी चालवून घ्यावयाची काय...

श्रीगुरुजी's picture

30 Nov 2017 - 2:27 pm | श्रीगुरुजी

नामांतराच्या वेळेस घरे जाळायला चिथावणी देणारे हृदय सम्राट कोण्या जातीचे होते हा प्रश्न विचारला तर तुम्हाला रुचणार नाही मग. गुजरात मध्ये दंगे झाले किती जणांना शिक्षा झाली याचा तपशील देता का?

गुजरातमधील दंग्यासाठी अनेकांना शिक्षा झालेली आहे. बाबू बजरंगी, माया कोडनानी ही त्यातील प्रमुख नावे. गुगलल्यावर इतर अनेक नावे सापडतील.

संभाजी ब्रिगेडची पुस्तके आता बाजारात उपलब्ध आहेत. ठोका की त्यां लेखकांवर केस पाहू कशी शिक्षा देत नाही कोर्ट ते ?
तुमचा मेन प्रॉब्लेम तुम्ही ब्राह्मण आहात हा आहे तर. त्यामुळे त्या नराधमांना शिक्षा मिळाली आणि त्या छकुलीला न्याय मिळाला याबद्दल तुम्हाला काही सोयरे सुतक दिसत नाही.

पुस्तके प्रसिद्ध झाली तेव्हा व त्यानंतर अनेक वर्षे तुमच्या जाणत्या राजांचा पक्ष सत्तेत असलेले सरकार होते. गृहमंत्री देखील जाणत्या राजांच्या पक्षाचा होता. या तथाकथित, पुरोगामी जाणत्या राजाने किंवा त्यांच्याच पक्षाच्या गृहमंत्र्याने या पुस्तकावर किंवा लेखकांवर कारवाई करणे तर सोडाच, त्यांचा निषेध सुद्धा केला नाही. हेच तथाकथित जाणते राजे ३-४ महिन्यांपूर्वी खेडेकरने लिहिलेल्या नवीन घाणीचे प्रकाशन करण्यास गेले होते व त्या प्रकाशन समारंभात अफझुल्याचे कौतुक करून व ब्राह्मणांवर दुगाण्या झाडण्याचे पुरोगामी व निधर्मी कृत्य करून आले.

त्या नराधमांना शिक्षा मिळायलाच हवी होती व फाशीची पेक्षा दुसरी कोणतीही शिक्षा सौम्य ठरली असती. परंतु त्या गुन्हेगारांना शिक्षा होताना तितकाच घृणास्पद गुन्हा करणारे निर्दोष सुटले याचेही दु:ख आहे.

काही आधार आहे का की आपले उगाच "मन की बात". मराठा समाजाचे अशा गुन्ह्यांचे आकडेवारी कोठे मिळती का ते बघा.

आधीच्या प्रतिसादात काही उदाहरणे दिली आहेत.

याच्यावर खूप घाम्साम होऊ शकते. शहीद करकरेंनी केलेल्या तपासावर शेवटी पाणी फेरलेच ना.

शहीद करकरेंनी तपासात नक्की काय शोधले होते ते एक गूढच आहे आणि ते गूढ उलगडणे आता अवघड आहे कारण तपास सुरू केल्यानंतर महिन्याभरातच ते शहीद झाले. परंतु त्यांच्या काळात संशयावरून ज्यांना पकडून ९ वर्षे तुरूंगात विनाजामीन डांबून ठेवले त्यांच्याविरूद्ध ९ वर्षानंतर सुद्धा पुरावा मिळालेला दिसत नाही आणि त्यांच्याविरूद्ध आरोपपत्र सुद्धा दाखल करता आलेले नाही.

विशुमित's picture

30 Nov 2017 - 3:17 pm | विशुमित

<<<गुजरातमधील दंग्यासाठी अनेकांना शिक्षा झालेली आहे. बाबू बजरंगी, माया कोडनानी ही त्यातील प्रमुख नावे>>>
==>> सूत्रधार मोकार फिरतात त्याचे काय ? आता विचारू नका कोण सूत्रधार म्हणून.

<<<पुस्तके प्रसिद्ध झाली तेव्हा व त्यानंतर अनेक वर्षे तुमच्या जाणत्या राजांचा पक्ष सत्तेत असलेले सरकार होते>>>
==>> आता आहे ना तुमच्या आवडीचे सरकार आणि त्यावेळेस ची पुस्तके सुद्धा बाजारात उपलब्ध आहेत ना आणि हो ह्या 'चालू' सरकारच्या काळातच जाणत्या राजाने पुस्तक प्रकाशनाला हजेरी लावली होती. का गृहमंत्र्यांनी त्यांना रोखले नाही किंवा नंतर अटक केली नाही? मी म्हणतोय ना करा केस तुम्ही, मी येतो अनुमोदन द्यायला.

<<<आधीच्या प्रतिसादात काही उदाहरणे दिली आहेत.>>>
==>> सोयीस्कर आणि तुलनात्मक नसणारे उदाहरणे देऊन आपल्या स्व जातीचे रडगाणे गाणे या व्यतिरिक्त तुमच्या उदाहरणात दम नाही.
नितीन आगे प्रकरणाचा सगळ्यांनीच निषेद केलेला आहेच तरी ही तेढ कशी निर्माण होईल एवढे पहिले गेले आहे.

<<<परंतु त्यांच्या काळात संशयावरून ज्यांना पकडून ९ वर्षे तुरूंगात विनाजामीन डांबून ठेवले त्यांच्याविरूद्ध ९ वर्षानंतर सुद्धा पुरावा मिळालेला दिसत नाही आणि त्यांच्याविरूद्ध आरोपपत्र सुद्धा दाखल करता आलेले नाही.>>>
==>> इथे कसे काय तुम्ही ताडले की तो फक्त संशय होता आणि यात कोणत्याही प्रकारचा सरकारी आणि धार्मिक हस्तक्षेप नव्हता? तुम्ही कोर्टाचा आणि पोलीस तपासाचा हवाला देणार हे सर्वसृत आहे.

श्रीगुरुजी's picture

30 Nov 2017 - 3:41 pm | श्रीगुरुजी

सूत्रधार मोकार फिरतात त्याचे काय ? आता विचारू नका कोण सूत्रधार म्हणून.

कोण आहेत सूत्रधार?

आता आहे ना तुमच्या आवडीचे सरकार आणि त्यावेळेस ची पुस्तके सुद्धा बाजारात उपलब्ध आहेत ना आणि हो ह्या 'चालू' सरकारच्या काळातच जाणत्या राजाने पुस्तक प्रकाशनाला हजेरी लावली होती. का गृहमंत्र्यांनी त्यांना रोखले नाही किंवा नंतर अटक केली नाही? मी म्हणतोय ना करा केस तुम्ही, मी येतो अनुमोदन द्यायला.

खेडेकरवर काही काळापूर्वीच खटला दाखल झाला आहे. तो खटला महाराष्ट्राच्या तत्कालीन पुरोगामी गृहमंत्र्यांनी किंवा पुरोगामी सरकारने दाखल केलेला नसून काही नागरिकांनी दाखल केलेला आहे. पुस्तक प्रकाशनाला हजर राहणे हा घटनेनुसार दखलपात्र गुन्हा नाही. पुस्तक प्रकाशित व्हायच्या आधीच असे करणे तर अशक्य आहे. परंतु खेडेकरची विकृत मनोवृत्ती, पराकोटीचा ब्राह्मणद्वेष आणि पूर्वोतिहास पाहिला तर त्याने इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकात किती गरळ ओकली असेल हे या तथाकथित पुरोगामी जाणत्या राजाच्या लक्षात यायला हवे होते. "ब्राह्मणांचा नि:पात करण्यासाठी शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली" असले तारे त्या पुस्तकात तोडले होते. तिथे जाऊन प्रकाशन समारंभात केलेल्या भाषणात यांनी ब्राह्मणांवर दुगाण्या झाडल्या होत्या. भारतात अ‍ॅट्रोसिटी कायदा आहे परंतु रिव्हर्स अ‍ॅट्रोसिटी कायदा नसल्याने असल्यांचे फावले आहे.

सोयीस्कर आणि तुलनात्मक नसणारे उदाहरणे देऊन आपल्या स्व जातीचे रडगाणे गाणे या व्यतिरिक्त तुमच्या उदाहरणात दम नाही.

मी प्रत्यक्ष उदाहरणे दिली आहे. नुसत्या गोलगोल गप्पा मारण्यापेक्षा तुम्ही मला खोटे ठरविणारी प्रत्यक्ष उदाहरणे द्या.

इथे कसे काय तुम्ही ताडले की तो फक्त संशय होता आणि यात कोणत्याही प्रकारचा सरकारी आणि धार्मिक हस्तक्षेप नव्हता? तुम्ही कोर्टाचा आणि पोलीस तपासाचा हवाला देणार हे सर्वसृत आहे.

आधी पकडलेल्या म्स्लिम संशयितांना सोडून यांना पकडून मोक्का लावून विनाजामीन तुरूंगात डांबले तेव्हा कोणाचे सरकार सत्तेवर होते ते आठवत असेलच. स्थानिक संशयितांना पकडल्यानंतर, "कोणताही मुस्लिम इतर मुस्लिमांची हत्या करणार नाही. विशेषतः मशिदीमध्ये किंवा नमाजाच्या वेळी तर हे शक्यच नाही. या बाँबस्फोटामागे कोणतरी गैरमुस्लिमच असले पाहिजेत." असे जाहिररित्या सांगून जाणूनबुजून तपासाची सुई एका विशिष्ट दिशेने वळविणारे कोण होते ते आठवत असेलच. एका प्रकरणात हात असल्याचे दाखवून पकडल्यानंतर मोक्का लावता यावा यासाठी इतर प्रकरणातही त्यांचे नाव गुंतविण्याचा प्रयत्न कोणी केला ते आठवत असेलच. त्यांच्याविरूद्ध कोणताही पुरावा नसल्याने शेवटपर्यंत आरोपपत्र दाखल करून सुनावणी सुरू करण्याचे कोणत्या सरकारने टाळले ते आठवत असेलच. हे करत असतानाच इशरत जहांला जाहिररित्या निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र कोणी दिले तेही आठवत असेलच. तिच्या घरी जाऊन एक लाखाची मदत देऊन तिच्या नावाचा शहीद असा उल्लेख करून तिच्या नावाने कोणत्या पुरोगामी पक्षाच्या नेत्यांनी अ‍ॅम्ब्युलन्स सुरू केली ते सुद्धा आठवत असेलच.

विशुमित's picture

30 Nov 2017 - 4:15 pm | विशुमित

<<<कोण आहेत सूत्रधार?>>
==>> बाबू बजरंगी, माया कोडवानी हेच प्रमुख सूत्रधार होते की काय, असे मानायला लोक काय दूधखुळी नाही आहेत.

<<< त्याने इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकात किती गरळ ओकली असेल हे या तथाकथित पुरोगामी जाणत्या राजाच्या लक्षात यायला हवे होते.>>>
==>> शरद पवारांचा मी काही प्रवक्ता नाही आहे की त्यांनी काय केले पाहिजे होते आणि काय नाही केले पाहिजे. तुमचा आक्षेप ब्रिगेडच्या पुस्तकांवर आणि तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांवर आहे ना, मी म्हणतो केस री-ओपन करा ना. मी पाठिंबा आणि सहकार्य करतो.
<<<भारतात अ‍ॅट्रोसिटी कायदा आहे परंतु रिव्हर्स अ‍ॅट्रोसिटी कायदा नसल्याने असल्यांचे फावले आहे.>>>
==>> आता कसे बोल्लात ? रिव्हर्स अ‍ॅट्रोसिटी नसल्यामुळे काय प्रश्न निर्माण होतात ते मराठा मोर्च्याच्या धाग्यात मी नमूद केलेच आहेत.
<<< मी प्रत्यक्ष उदाहरणे दिली आहे. नुसत्या गोलगोल गप्पा मारण्यापेक्षा तुम्ही मला खोटे ठरविणारी प्रत्यक्ष उदाहरणे द्या.>>>
==>> भांडारकर संस्थेची आणि कोपर्डी प्रकरणाची तुम्ही तुलना केली. भांडारकर हल्ल्या प्रकरणात असणाऱ्या ब्रिगेडच्या मराठ्यांना शिवसेना आणि भाजप मध्ये असणाऱ्या मराठ्यांनी तोडफोड करून प्रतिउत्तर दिले. बाकी ज्यांच्यामुळे हे झाले ते नाम निराळे राहिले. अगदी आता पण तुमचा हाच प्रयत्न चालू आहे. तेढ निर्माण करायची आणि निवांत मज्जा पाहत बसायचे.
<<<आधी पकडलेल्या म्स्लिम संशयितांना सोडून यांना पकडून मोक्का लावून विनाजामीन तुरूंगात डांबले तेव्हा कोणाचे सरकार सत्तेवर होते ते आठवत असेलच.>>>
==>> आता तुम्ही हिंदू मुस्लिम चालू केले. देशाच्या एकता आणि सार्वभौमत्वावर आघात करणारे सगळेच देशद्रोही आहेत या बद्दल दुमत नसावे.
अजून साध्वी आणि कर्नल निर्दोष सुटलेले नाहीत फक्त जामीन मिळाला आहे तरी त्यांच्या बाबत ममत्व धरणे आणि अ‍ॅम्ब्युलन्स सुरू करणे एकाच तराजूत तोलले पाहिजे.

श्रीगुरुजी's picture

30 Nov 2017 - 8:35 pm | श्रीगुरुजी

बाबू बजरंगी, माया कोडवानी हेच प्रमुख सूत्रधार होते की काय, असे मानायला लोक काय दूधखुळी नाही आहेत.

सूत्रधार कोण होते याचे उत्तर अजूनही दिलेले नाही.

मी म्हणतो केस री-ओपन करा ना. मी पाठिंबा आणि सहकार्य करतो.

खटला बंद झालेला नाही. अशा प्रकरणात सहकार्य करायचे आणि पाठिंबा द्यायचा म्हणजे जे अशा लोकांना समर्थन देतात अशांना अजिबात पाठिंबा द्यायचा नाही. आहे तयारी?

भांडारकर हल्ल्या प्रकरणात असणाऱ्या ब्रिगेडच्या मराठ्यांना शिवसेना आणि भाजप मध्ये असणाऱ्या मराठ्यांनी तोडफोड करून प्रतिउत्तर दिले. बाकी ज्यांच्यामुळे हे झाले ते नाम निराळे राहिले. अगदी आता पण तुमचा हाच प्रयत्न चालू आहे. तेढ निर्माण करायची आणि निवांत मज्जा पाहत बसायचे.

शिवसेना आणि भाजप मध्ये असणाऱ्या मराठ्यांनी तोडफोड करून प्रतिउत्तर दिले? संदर्भ देता का? जेम्स लेनच्या पुस्तकाचा गैरफायदा घेऊन ही मोडतोड करून जातीयवादी वातावरण निर्माण केले गेले व ज्यांनी हे केले ते निर्दोष सुटले. त्यामुळे "ज्यांच्यामुळे हे झाले ते नाम निराळे राहिले" या वरील वाक्याशी सहमत. मी तेढही निर्माण करीत नाही आणि मज्जाही बघत नाही. लागोपाठ ३ खटल्यांच्या निकालातून जे चित्र दिसते तेच फक्त समोर मांडले आहे.

आता तुम्ही हिंदू मुस्लिम चालू केले. देशाच्या एकता आणि सार्वभौमत्वावर आघात करणारे सगळेच देशद्रोही आहेत या बद्दल दुमत नसावे.
अजून साध्वी आणि कर्नल निर्दोष सुटलेले नाहीत फक्त जामीन मिळाला आहे तरी त्यांच्या बाबत ममत्व धरणे आणि अ‍ॅम्ब्युलन्स सुरू करणे एकाच तराजूत तोलले पाहिजे.

निर्दोष सुटले नसले तरी त्यांना अजिबात जामीन मिळू नये याची भक्कम व्यवस्था करण्यात आली होती. मूळ गुन्हेगारांना बाजूला ठेवून यांच्याविरूद्ध कोणतेही पुरावे नसताना खोटे पुरावे निर्माण करून त्यांना ९ वर्षे डांबून ठेवणे अत्यंत नीच कृत्य आहे. निरपराधांना ९ वर्षे विनाजामीन तुरूंगात डांबणे व पाकिस्तानी अतिरेक्याबरोबर असलेल्या तरूणीला शहीद असे मानपत्र देऊन , तिच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करून तिच्या नावाने अ‍ॅम्ब्युलन्स सुरू करणे या एकाच नाण्याच्या बाजू आहेत व दोन्ही बाजू अत्यंत काळ्याकुट्ट आहेत.

बाबू बजरंगी, माया कोडवानी हेच प्रमुख सूत्रधार होते की काय, असे मानायला लोक काय दूधखुळी नाही आहेत.

नरेंद्र मोदी या दंगलींचे सूत्रधार होते, असा तुमचा आरोप असावा. जर हे सत्य असेल, तर भाजप सत्तेत नसताना सुद्धा, सर्वोच्च न्यायालयानं त्यांना दोषमुक्त का केलं? की हे काँग्रेस चं अजून एक अपयश?

नितीन आगे प्रकरणात देखील आरोपींना दोषमुक्त केलंय, पण ते जिल्हा सत्र न्यायालयाने. या मुद्द्याला अनुसरून पुढचा मुद्दा:

आज बहुतेकांची भावना अशी आहे, की आगे प्रकरणात सुटलेले आरोपी दोषी होते, पण त्यांना शिक्षा झाली नाही. या प्रकरणात न्याय झाला नाही. जर मोदी सुद्धा खरोखर दोषी असते, तर ते निवडणुकांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर यश मिळवू शकले असते का?

या ही पुढे, जर ते खरोखर दोषी असले, आणि तरीही जनता त्यांना या कारणासाठी निवडून देत असेल, तर एक समाज म्हणून खरोखर चिंताजनक परिस्थिती आहे.

अनेकदा, "जनमतामुळे" काही चुकीचे निर्णय घेतले जात असतील, तर कठीण आहे. लोकशाही ला बहुमत महत्वाचं असलं, तरी अनेकदा बहुमत म्हणजे सर्व मूर्खांचे एकमत असं असू शकतं.

{“Sometimes a majority simply means that all the fools are on the same side.” ― Claude C. McDonald.}

भांडारकर हल्ल्या प्रकरणात असणाऱ्या ब्रिगेडच्या मराठ्यांना शिवसेना आणि भाजप मध्ये असणाऱ्या मराठ्यांनी तोडफोड करून प्रतिउत्तर दिले.

संदर्भ / विदा आहे का..? का नेहमीप्रमाणे टेपा लावणे सुरू झाले..?

श्रीगुरुजी's picture

5 Dec 2017 - 10:59 pm | श्रीगुरुजी

मी ३-४ दिवसांपूर्वीच संदर्भ मागितला होता.

स्वतःला मर्द बिर्द (स्वतःच) म्हणवून घेणारे संदर्भ मागितले की शेपूट घालताना दिसत आहेत.. अवघड आहे.

babu b's picture

30 Nov 2017 - 12:30 pm | babu b

दाभोळकर , कलबुरगी यांच्या फोटोवर फुली मारून वेबसाइटवर ठेवलेल्यानाही कायदा पकडू शकलेला नाही.

शब्दबम्बाळ's picture

30 Nov 2017 - 12:59 pm | शब्दबम्बाळ

गांधीवधानंतर

वा! स्वजातीय नेभळट गोडसेनी एका निशस्त्र माणसावर गोळी मारून त्याची हत्या केली... ते झाकायला त्या घटनेला "वध" वगैरेची उपमा देण्यासारखी नीच प्रवृत्ती काहीच लोकांमध्ये आढळते त्यापैकी तुम्ही एक दिसता! मंदिर बांधून पूजा पण करा तसल्यांची... आणि मग इतर जातींच्या आणि कायद्याच्या नावाने गळे काढा! आणि परत "फक्त" ब्राम्हणच कसे भारी याचे तुणतुणे देखील वाजवा... तरीपण "इथे" तुम्हाला अनुमोदन द्यायला सवंगडी मिळतीलच!
असल्या जातीयवादी माणसाच्या विचारांवर काय बोलणार...
समाजात फूट पडून तेढ कशी निर्माण करता येईल हीच या लोकांची विचारसरणी...
आपल्या डोक्यातली जातीबद्दलची घाण अशीच पसरवत राहा...

पगला गजोधर's picture

30 Nov 2017 - 2:08 pm | पगला गजोधर

तरीपण "इथे" तुम्हाला अनुमोदन द्यायला सवंगडी मिळतीलच!

आणि कंपूच्या या सवंगड्यांमध्ये, शुध्दीपत्रके देणारे बोवा, झारीबहाद्दर, महालोलखान
हे त्रिकुट येईलच लगेचच...

mayu4u's picture

2 Dec 2017 - 2:48 pm | mayu4u

कावीळ झालेल्याला जग पिवळं दिसतं म्हणतात. चालायचंच!

उत्तर मिळेल अशी अपेक्षा नाहीये, पण तरीही.

mayu4u's picture

4 Dec 2017 - 12:37 pm | mayu4u

... नेहमीप्रमाणे!

अँड. हरिदास उंबरकर's picture

30 Nov 2017 - 12:41 pm | अँड. हरिदास उंबरकर

सन्माननीय स्नेहीजनहो..

'कायद्यासमोर सर्व सामान' हे आपल्या न्यायव्यवस्थेचे मुलभुत तत्व आहे.. 'न्याय' ही एक पवित्र भावना आहे.. न्याया च्या संकल्पनेला जातीपातीच्या रंग - सुगंधाची गरज नसते. अस्मितेची तर त्याहून अधिक अॅलर्जी असते. एवढं लक्षात घेतलं तरी पुरेसं आहे. शेवटी आपण सारी माणसेच आहोत. परस्परांना समजावून घेण्यातच आपलं हित आहे. अदृश्य व काल्पनिक गोष्टींकरता परस्परांशी वाद घालण्यात नव्हे ! एखाद्या प्रकरणात 'न्याय' झाला नसेल तर त्याला तपास आणि पुराव्यांची कमतरता कारणीभूत असू शकेल.. जात नक्कीच नाही.

विशुमित's picture

30 Nov 2017 - 1:52 pm | विशुमित

<<<'कायद्यासमोर सर्व सामान' हे आपल्या न्यायव्यवस्थेचे मुलभुत तत्व आहे.>>>
==>> +१

अश्विनी मेमाणे's picture

30 Nov 2017 - 2:17 pm | अश्विनी मेमाणे

प्रतिसाद छान.मनात असाच वाटत होतं कुठेतरी...तुमच्या शब्दात अजून क्लिअर झालं

श्रीगुरुजी's picture

30 Nov 2017 - 2:30 pm | श्रीगुरुजी

एखाद्या प्रकरणात 'न्याय' झाला नसेल तर त्याला तपास आणि पुराव्यांची कमतरता कारणीभूत असू शकेल.. जात नक्कीच नाही.

काही विशिष्ट प्रकरणातच कसा न्याय होतो व काही विशिष्ट प्रकरणात तपास व पुराव्यांची कमतरता कशी राहते (किंवा जाणूनबुजून ठेवली जाते) हे नक्कीच संशयास्पद आहे. इथे जातीचा नक्कीच संबंध आहे.

सिंथेटिक जिनियस's picture

30 Nov 2017 - 1:00 pm | सिंथेटिक जिनियस

श्रीगुरुजी यांचा प्रतिसाद योग्य आहे.बलात्कार विनयभंग यालाही जात असते हे या निकालाने दाखवून दिले.पिडीत मुलीची आई फक्त मराठा समाजाचे आभार मानते यातच सगळे आले.वास्तवात या प्रकारात आठवले ,प्रकाश आंबेड्कर यांनी आरोपी दलित आहेत म्हणून हयगय करु नका असेच सांगितले होते.पिडीत कुटुंबाला भेटायला आठवले आंबेड्कर जाणार होते पण जातदांडग्यांनी त्यांना भेटू दिले नाही.
फार काही लिहीत नाही पण श्रीगुरुजी यांनी समाजमनाचा धांडोळा त्यांच्या प्रतिसादात उत्तमपणे लिहिला आहे ,त्याची पोच म्हणून हा प्रतिसाद.

विशुमित's picture

30 Nov 2017 - 3:40 pm | विशुमित

| सिंथेटिक जिनियस तुम्ही जर पूर्वीचे टफी असाल तर तुमच्या मनातील जळजळीचा अंदाज आला आहे मला.
सातारला आल्यावर बोलू.

गामा पैलवान's picture

30 Nov 2017 - 1:47 pm | गामा पैलवान

अधिवक्ते हरिदास उंबरकर,

तुम्ही म्हणता की न्याय झाला. पण मला वाटतं की ही केवळ पहिली पायरी आहे. जेव्हा हे गुन्हेगार फासावर लटकत नाहीत तेव्हाच खरा न्याय मिळेल.

आ.न.,
-गा.पै.

अँड. हरिदास उंबरकर's picture

30 Nov 2017 - 4:11 pm | अँड. हरिदास उंबरकर

तुम्ही म्हणता की न्याय झाला.

न्याय झाला, पण.. या हेडिंग मधेच लेखाचा आशय आहे.. न्याय झाला अस म्हणता येईल.. पण पूर्णता न्याय बाकी असल्याचाच या लेखाचा विषय आहे..

लोकहो,

वरील संदेशात चूक आहे. कृपया वाक्य असे वाचणे : जेव्हा हे गुन्हेगार फासावर लटकतील तेव्हाच खरा न्याय मिळेल.

चुकीबद्दल क्षमा असावी.

आ.न.,
-गा.पै.

अमितदादा's picture

30 Nov 2017 - 2:13 pm | अमितदादा

श्रीगुरुजी यांचे प्रतिसाद म्हणजे जातीयवादाचा उत्तम नमुना आहे , एखाद्या समाजाविषयी किती घृणा असावी हे यातून दिसत. गांधी हत्येला गांधी वध म्हणणे म्हणजे पुरता ****पणा आहे. अश्या सर्व समाजातील /धर्मातील जातीयवादी विचारांना ठेचून काढलं पाहिजे. हे ज्या ब्रिगेडी विचारांना उठ सुठ नावे ठेवतात त्यांच्या विचारसरणीतील च ह्यांचे विचार आहेत. जर काही घटनांवरून पूर्ण समाजाला दोषी ठरवत असाल तर अश्याच दोन तीन घटनांवरून आर एस एस हि सर्वात मोठी जातीयवादी संघटना आहे असे तुम्ही मानायला हवे.

नितीन आगे यांना न्याय न मिळने हि अत्यंत तिडीक आणणारी गोष्ट आहे, सरकार ने फास्ट ट्रॅक न्यायालय आणि विशेष पोलीस पथक स्थापन करून दोषींना फाशी होईपर्यंत पाठपुरवठा केला पाहिजे, जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत पाठपुरवठा सोडता कामा नये. जर कोणताही मराठा नेता किंवा संघटना दोषींना प्रत्यक्ष किंवा अप्रतक्षय पाठिंबा देत असतील त्यांना सुद्धा ठोकून काढलं पाहिजे. ऍट्रासिटी कायदा अजून काही वर्षे पातळ होता कामा नये.

प्रत्येक समाजातील जातीयवादी लोक विषारी विचार पसरवत असतात त्यांना वेळीच रोखून कायद्याचं राज्य प्रस्थापित झालं पाहिजे, आजकाल भारतात शक्तिशाली, गुंड आणि श्रीमंत लोकांना गुन्हे माफ आहेत असे भासतेय.

शब्दबंबाळ आणि विशुमित यांच्या प्रतिसादाशी सहमत.

श्रीगुरुजी's picture

30 Nov 2017 - 2:34 pm | श्रीगुरुजी

श्रीगुरुजी यांचे प्रतिसाद म्हणजे जातीयवादाचा उत्तम नमुना आहे , एखाद्या समाजाविषयी किती घृणा असावी हे यातून दिसत.

माझे सर्व प्रतिसाद परत नीट वाचा. काही प्रकरणात तपाससंस्था जातीवर आधारीत तपास करतात असे मी लिहिले आहे.

विशुमित's picture

30 Nov 2017 - 4:34 pm | विशुमित

प्रतिसादाशी प्रचंड सहमत ...

दबाव टाकणारे आणि काड्या टाकणारे सगळे ठोकले पाहिजेत.

एमी's picture

30 Nov 2017 - 5:12 pm | एमी

सहमत आहे.

प्रत्येक समाजातील जातीयवादी लोक विषारी विचार पसरवत असतात त्यांना वेळीच रोखून कायद्याचं राज्य प्रस्थापित झालं पाहिजे, आजकाल भारतात शक्तिशाली, गुंड आणि श्रीमंत लोकांना गुन्हे माफ आहेत असे भासतेय.

१०० टक्के सहमत.
न्याय होणे महत्वाचे तितकेच न्याय झाल्याचे दिसणे देखिल महत्वाचे असते.

कोपर्डी प्रकरणात न्याय झाला म्हणून मुख्यमंत्र्यांनी अ‍ॅड निकम यांचे जाहीर कौतूक केले आहे.
मग नितीन आगे प्रकरणात सदर तपास अधिकारी, सरकारी वकील यांची जाहीरपणे निंदा केल्याचे वाचनात नाही...या प्रकरणाचा फेरतपास वगैरेच्या पण काही घोषणा ऐकण्यात आल्या नाहीत. एकंदरीत हे प्रकरण असेच बाजूला पडणार आणि न्याय होणार नाही असेच दिसतेय. इथेही अनेकजण 'साक्षिदार फिरलेत, त्याला काय करणार ?' असाच सूर लावत आहेत.
बहूधा 'उच्च जातीतल्या मुलीकडे बघण्याचा प्रमाद करतो काय.. अशीच शिक्षा पाहिजे त्या मुलाला' असेच काहीसे अनेकांच्या मनात तर नाही ना अशीच शंका येते.
अजूनही वेळ गेलेली नाही. या प्रकरणाचा फेरतपास व्हावा आणि गुन्हेगारांना कडक शासन व्हावे त्याचबरोबर तपासात दिरंगाई, ढिसाळपणा करणार्‍या पोलिसांवर , साक्षीदारांवर दबाव आणणार्‍यांवर, खटला जाणूनबुजून ढिसाळपणे मांडला असल्यास सदर सरकारी वकीलावर आणि जर न्यायालयाने काही पक्षपातीपणा केला असे दिसले तर त्या न्यायाधिशांवरही कारवाई व्हावी आणि न्यायापुढे सगळे समानच आहेत याचा प्रत्यय समाजाला यावा इतकी अपेक्षा.

श्रीगुरुजी's picture

30 Nov 2017 - 2:37 pm | श्रीगुरुजी

इथेही अनेकजण 'साक्षिदार फिरलेत, त्याला काय करणार ?' असाच सूर लावत आहेत. बहूधा 'उच्च जातीतल्या मुलीकडे बघण्याचा प्रमाद करतो काय.. अशीच शिक्षा पाहिजे त्या मुलाला' असेच काहीसे अनेकांच्या मनात तर नाही ना अशीच शंका येते.

+ १

विशुमित's picture

30 Nov 2017 - 2:55 pm | विशुमित

<<<'साक्षिदार फिरलेत, त्याला काय करणार ?' असाच सूर लावत आहेत.>>>
==>> असा सूर लावलेला नाही उलट साक्षीदारांना संरक्षण दिले पाहिजे हि मागणी आहे.

<<<बहूधा 'उच्च जातीतल्या मुलीकडे बघण्याचा प्रमाद करतो काय.. अशीच शिक्षा पाहिजे त्या मुलाला' असेच काहीसे अनेकांच्या मनात तर नाही ना अशीच शंका येते.>>>
==>> सरसकटीकरण करून अशी काडी लावू वृत्तीलाच तर विरोध आहे.

<<<अजूनही वेळ गेलेली नाही. या प्रकरणाचा फेरतपास व्हावा आणि गुन्हेगारांना कडक शासन व्हावे त्याचबरोबर तपासात दिरंगाई, ढिसाळपणा करणार्‍या पोलिसांवर , साक्षीदारांवर दबाव आणणार्‍यांवर, खटला जाणूनबुजून ढिसाळपणे मांडला असल्यास सदर सरकारी वकीलावर आणि जर न्यायालयाने काही पक्षपातीपणा केला असे दिसले तर त्या न्यायाधिशांवरही कारवाई व्हावी आणि न्यायापुढे सगळे समानच आहेत याचा प्रत्यय समाजाला यावा इतकी अपेक्षा.>>>
==>> हे काम कोणाचे आहे? सरकारचे आहे की नाही?
याचा पाठपुरावा करायला सकल जनतेने एकत्र यायला पाहिजे असे कुठे तुम्ही म्हणताना दिसत नाही.
आणि मला पडलेला एक प्रश्न अशा प्रकरणांमध्ये पोलीस अधिकारी, दबाव टाकणारे, सरकारी वकील, न्यायाधीश एकाच जातीचे निघावेत याची वारंवारता किती असावी?
उगाच मऊ लागले म्हणून कोपऱ्याने खणायचे.

मराठी कथालेखक's picture

30 Nov 2017 - 3:28 pm | मराठी कथालेखक

सरसकटीकरण करून अशी काडी लावू वृत्तीलाच तर विरोध आहे.

मला कठेही एका समाजावर आरोप करायचे नाहीत.
पण दुर्दैवाने दलित समाजाच्या बाबतीत न्याय होताना दिसत नाहीये याची खंत वाटते.

विशुमित's picture

30 Nov 2017 - 4:26 pm | विशुमित

<<<पण दुर्दैवाने दलित समाजाच्या बाबतीत न्याय होताना दिसत नाहीये याची खंत वाटते.>>>
==>> फक्त दलितांबाबतच नाहीतर कोणत्याही समाज घटकांच्या बाबतीत अशा घटना रोखल्या जाव्यात म्हणून आणखी ठोस आणि चांगली उपायोजना काय करता येईल, ह्या साठी सुज्ञ नागरिक म्हणून आपण एकत्र येऊ यात. यावर विचार मंथन होयला हवे.

फक्त दलितांबाबतच नाहीतर कोणत्याही समाज घटकांच्या बाबतीत अशा घटना रोखल्या जाव्यात म्हणून आणखी ठोस आणि चांगली उपायोजना काय करता येईल, ह्या साठी सुज्ञ नागरिक म्हणून आपण एकत्र येऊ यात. यावर विचार मंथन होयला हवे.

+1

नाखु's picture

4 Dec 2017 - 1:11 pm | नाखु

हीच सदिच्छा भावना सर्वदा रहावी

नितवाचक नाखु

मोदक's picture

4 Dec 2017 - 11:40 pm | मोदक

खिक्क..

नक्की एक काय ती भूमिका ठरवा की.. स्वतःला सुज्ञ वगैरे पदव्या (स्वतःच) बहाल करून घेताय आणि याच धाग्यात दुसरीकडे हुकुमशाहीची भाषा वापरून धमक्या पण देताय. रोज छापा काटा करून प्रतिसाद लिहीत असाल तर तसे सांगा, तुमचे बुरखे टरकवण्यात वेळ घालवणार नाही.

दांभीकपणाचे धरण भरले नाही का अजून..?

mayu4u's picture

5 Dec 2017 - 11:40 am | mayu4u

ब्राह्मणांना विरोध, कारण ब्राह्मण जातीयवादी. अन्य साऱ्या जाती मिळून मिसळून एकोप्याने राहतात. हे ब्राह्मणच काड्या घालायला येतात. त्यांना ठेचायलाच हवं!

(स्वगत: ब्रिगेडचं कन्टेन्ट डेव्हलपमेंट चं काम मिळतं का बघायला हवं!)

विशुमित's picture

5 Dec 2017 - 12:47 pm | विशुमित

सगळे नाही तर स्वतःला सगळ्यापेक्षा बाय डिफॉल्ट हुशार समजणारे जातीवादी लोकांचा विरोध आहे.
बाकी डबल सीट बसून लोकांना ब्रिगेडचे शिक्के मारत फिरण्यापेक्षा काहीतरी पोटापाण्याचे बघा. शिक्षणाचा अधिकार मिळाल्यापासून लोक झपाट्याने पुढे निघून चालले आहेत. आहात कुठे तुम्ही ???

त्याची तुम्हाला चिंता नको. आम्ही व्यवस्थित कमावतो, आणि घेतलेली कर्जं फेडतो सुद्धा. कर्जमाफी हवी म्हणून सम्पाची नाटकं करत नाही. :D

विशुमित's picture

5 Dec 2017 - 12:39 pm | विशुमित

खाऱ्या पाण्याच्या धरणाची राहून राहून आठवण येतीय वाटते.
मिटक्या मारत डुबक्या मारत बसा..
तुम्ही काय बुरखे फडताय, तुमच्या सायकलींची चेन कधीच पडली आहे. ती आधी बसवा मग पायडल मारा.

खिक्क.. बिग्रेडी बुरखा फाटला उघडा पडला म्हणून त्रास झाला काय..?

मूळ मुद्दा काय आहे ते बघा.. सूज्ञ बिज्ञ असल्याचा आव आणून चर्चा करताना आपण याच धाग्यात स्वतः हिटलरच्या थाटात न्यायनिवाडा करून शिक्षा सुनावली आहे तो दांभीकपणा बघा मग सायकल आणि चेनची काळजी करा.

इथेही अनेकजण 'साक्षिदार फिरलेत, त्याला काय करणार ?' असाच सूर लावत आहेत. >> कोणत्या अनेक प्रतिसादात दिसला हा सुर?

मराठी कथालेखक's picture

30 Nov 2017 - 4:42 pm | मराठी कथालेखक

नितीन आगे प्रकरणात न्याय मिळाला पाहिजेच, पण साक्ष फिरवणे कसे रोखणार? अनेक प्रकरणात साक्षीदार कधी धाकाने तर कधी पैशाने साक्ष बदलतात

हे 'अनेक' प्रतिसाद आहेत का?

आणि त्याच्या पुढेच लिहिलेय ना कि "यातून मार्ग निघाला पाहिजे"...

मी आणि विशुमितनी पण तेच लिहिलंय. हा प्रॉब्लेम असणार आहे. त्यावर काहीतरी उपाय किंवा workaround शोधायला हवा.

मराठी कथालेखक's picture

30 Nov 2017 - 6:00 pm | मराठी कथालेखक

उगाच वाद घालण्यात मला रस नाही..

मुद्दा हा आहे की नितीन आगे प्रकरणात ढिसाळपणा झाला आहे, राज्य सरकारने उज्वल निकम सारखे ज्येष्ठ वकील इथे लावले नाहीत. आणि आता जो अन्याय झाला त्याबद्दलही मुख्यमंत्री वा अन्य कुणी नेते एक चकार शब्द बोलले नाहीत की त्यांना काही खंत वाटली नाही (निदान माझ्या वाचनात तरी आले नाही) हे महाराष्ट्राचे आणि जातीभेदविरहीत समाजाची स्वप्न बघणार्‍या सर्वांचेच दुर्देव. असो.
यापुढे नवीन मुद्दा असल्याखेरीज चर्चा रेटण्यात मला रस नाही.
धन्यवाद.

babu b's picture

30 Nov 2017 - 8:59 pm | babu b

ॲट्रोसिटी ॲक्ट व रिजर्वेशन यांची अपरिहार्यता लक्षात येते.

शब्दबम्बाळ's picture

1 Dec 2017 - 1:01 am | शब्दबम्बाळ

महान आहात आपण! जातीचा विषय निघाला कि विचारांचे ध्रुवीकरण एका दिशेला किती लगेच होते हेच दिसून येतंय यातून!
ते पूर्ण वाक्य देतो पुन्हा इथे.. तोडून जे सोयीस्कर घेतलंय आपण...

नितीन आगे प्रकरणात न्याय मिळाला पाहिजेच, पण साक्ष फिरवणे कसे रोखणार? अनेक प्रकरणात साक्षीदार कधी धाकाने तर कधी पैशाने साक्ष बदलतात. यातून मार्ग निघाला पाहिजे, आरोपीना जातीचे अधिष्ठान मिळवून द्यायचा हा जो प्रकार तुम्ही करत आहेत तो अत्यंत दुर्दैवी आहे.

हा प्रतिसाद लिहिणार्याची जात कुठली आहे हा विचार न करता वाचला तर यातून कोण हा महान शोध लावू शकेल कि..

'उच्च जातीतल्या मुलीकडे बघण्याचा प्रमाद करतो काय.. अशीच शिक्षा पाहिजे त्या मुलाला'

म्हणजे विचारांचा कल बघा तुमचा कुठे चाललाय, अवघड आहे राव! आणि परत म्हणताय "मला वाद नकोय?"

साक्षीदाराने साक्ष फिरवणे हि गोष्ट फार काळापासून डोकेदुखी ठरलेली आहे, पोलिसांना दिलेले स्टेटमेंट ग्राह्य होत नाही आणि मग अचानक न्यायालयात साक्षीदार साक्ष फिरवतो आणि सगळ्या प्रकारावर पाणी फिरते... मी हेच लिहिले होते कि कधी साक्षीदार पैश्याच्या आमिषाने, कधी धाकाने तर कधी न्यायालयाबाहेरच्या तडजोडीने साक्ष बदलतात!
न्याय व्यवस्था हे कसे रोखू शकेल यातून मार्ग काढावाच लागेल कारण तुम्हा-आम्हाला काय वाटत यावर प्रकरणाचे निकाल लागत नाहीत ते अशा पुराव्यांवरून आणि साक्षींवरूनच लागतात... यातही तुम्हाला तुमच्या मनासारखे काही दिसले नसेल तर अजून एखादे वाक्य लिहूच शकता!

मी मागे एकदा सज्ञान मुलाने किंवा मुलीने त्यांचा जोडीदार (कसला ही असला तरी) निवडला तर त्यात बाकीच्यांनी नाक खुपसण्याचे काही कारण नाही हे एका धाग्यावर लिहिले होते तर "इथलेच" संस्कृतीरक्षक धावून आले होते. मला मुलं-मुलींची "जात" किंवा "धर्म" कोणता असावा याबाबत आपत्ती नाही.

पण इथे आता मराठा समाजावर तोंडसुख घेणारे पलीकडे धाग्यावर मुस्लिम तरुणांसोबत लग्न करू नका हा संदेश देत फिरत आहेत! असला दुतोंडीपणा इथलेच काही निर्लज्ज आयडी करू शकतात आणि तरी पण ते सन्माननीय वगैरे असतात...

पगला गजोधर's picture

1 Dec 2017 - 9:28 am | पगला गजोधर

यांच्या लेखी स्त्रिया मूर्ख, यांच्या लेखी मुस्लिम ख्रिश्चन देशद्रोही, यांच्या लेखी मराठा जातीयवादी, यांच्या लेखी बहुजन हे मेरिट नसलेले व सरकारी जावई, अजून खूप लिस्ट आहे...
आणि हो, ज्ञानवंत विचारवंत बुद्धिवंत प्रातःस्मरणीय हेच,
... सकाळी उठून आरश्यात बघून स्वतः चीच आरती उतरवून, आरशाला टिळा लावणारे हेच...
सकाळी उठून एक पळीभर गोमूत्र सेवन करून, पूर्व दिशेस आपले मुख करून, लॅपटॉपवर धर्माचे रक्षण करणारे हीच ती पिलावळ....

गामा पैलवान's picture

1 Dec 2017 - 1:45 pm | गामा पैलवान

प.ग?, पण हे जे कोणी आहेत ते आरशाला टिळा लावतात ते तुम्हाला कसं कळलं? त्यांच्या आरशात तुम्ही डोकावून पाहायला गेलात आणि दिसायला नको ते दिसलं. बरोबर ना?
आ.न.,
-गा.पै.

मराठी कथालेखक's picture

1 Dec 2017 - 2:43 pm | मराठी कथालेखक

मला कुणाशी व्यक्तिगत वाद करण्यात काडीचा रस नाही. तसेच कोणत्याही जाती धर्माबद्दल मला कोणताही आकस नाही. माझे काही अगदी जवळचे मित्र जातीने मराठा आहेत. खरं तर मी जात -धर्म काही मानतही नाही.
आंतरजातीय / आंतरधर्मीय लग्नाबद्दलही माझा काहीच आक्षेप नाही... हिंदू काय मुस्लिम काय कुणीही कुणाशीही लग्न करावे आनंदात रहावे. पण त्याचवेळी तथाकथित उच्च जातीतले लोक आपल्या घरातील मुलीशी कनिष्ठ समजल्या जाणार्‍या जातीतल्या मुलाने प्रेम केले तर त्याचा जीव घेतात याने तीव्र संताप होतो. आणि काही लोकांचे याला (मला इथे कोणताही मिपाकर अभिप्रेत नाही... पण तुम्ही समाजात लोकांशी बोललात तर तुम्हाला हे नक्कीच आढळेल) उघड वा छुपे समर्थनही दिसून येते हे दुर्देव.
'उच्च जातीतल्या मुलीकडे बघण्याचा प्रमाद करतो काय.. अशीच शिक्षा पाहिजे त्या मुलाला' हा अर्थ मी तुमच्या प्रतिसादातून काढलेला नाही. पण ही भावना समाजात तुम्हाला बर्‍याच प्रमाणात आढळेल ...काही जण अशी टोकाची प्रतिक्रिया व्यक्त करतील तर काही जण थोडं सौम्यपणे म्हणतील "पण त्या मुलाचंही चुकलंच.. आता गावात रहातो तर जात पात कळत नाही का त्याला.. प्रेम करताना थोडा विचार करायला हवा ना" . ..(कृपया मला विदा मागू नका.. .. त्या ऐवजी लोकांशी बोला.)

एक उदाहरण सांगतो.. माझ्या मित्राचं... तो जातीने कुंभार आणि त्याचा प्रेमविवाह झालेला. एकदा बोलताना तो मला सांगत होता की त्याच्या धाकट्या भावाचे एका मुलीवर प्रेम होते आणि त्याला ते कळाले तसे त्याने भावाला आणि त्या मुलीला बोलावून समजावले आणि संबंध तोडायला लावले...मी त्याला सहज विचारले "तू प्रेमविवाह केला आणि भावाच्या प्रेमात मात्र मोडता घातलास रे.." त्यावर तो म्हणाला "अरे तसं नाही.. ती मुलगी मराठा होती. त्यामुळे ते प्रेम सफल झाले नसतेच ..पण उगाच सगळ्या घरादारावर नस्ती आफत ओढावली असती" .. ही भिती कुठून आली ?
वर सांगितल्याप्रमाणे इथे मी कुणा मिपाकराबद्दल बोलत नसून समाजात जे पाहत आहे त्याबद्दल बोलत आहे. कोणता मिपा सदस्य काय विचार करतो, कोणत्या जातीचा आहे , जातीयवादी आहे की नाही वगैरे जाणून घेण्यात मला रस नाही.
तरी तुमच्या प्रतिसादाचा संदर्भ घेतला गेल्याने जो गैरसमज झाला त्याबद्दल क्षमस्व.

पगला गजोधर's picture

1 Dec 2017 - 3:20 pm | पगला गजोधर

प्रतिसादाशी सहमत...

म्हणूनच धर्म व जातीच्या नावाखाली चाललेली दलाली नष्ट व्हावी...
किंवा लोकांनी धर्म व जातीच्या अफूबाजीतून जागे व्हावे...

सबंध प्रतिसादाशी सहमत आहे.

विशुमित's picture

30 Nov 2017 - 3:00 pm | विशुमित

दोन समाजामध्ये तेढ कशी निर्माण होईल एवढेच हे वृत्तपत्रीय बातमी आणि तुम्ही करत आहात.