विहार...भाग ४ (अंतिम)

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
27 Mar 2017 - 3:09 pm

आधीच्या तीन भागांची लिंक
http://www.misalpav.com/node/39239
http://www.misalpav.com/node/39266
http://www.misalpav.com/node/39271

वॉर्डमधल्या डॉक्टरांनी अहमदला सांगितले,
"उद्या सकाळी इरफानला डिस्चार्ज मिळणार."

एकीकडे मुलगा बरा झाल्याचा आनंदामुळे अहमदच्या चेहऱ्यावर हसू होते. पण मनात कुठेतरी तो अस्वस्थ होता. गेले कित्येक दिवस एक प्रश्न स्वत:ला विचारण्यापासून त्याने अडवून धरला असला तरी आता ती वेळ आली होती. असा प्रसंग कदाचित सगळ्यांच्याच आयुष्यात एकदातरी येतोच. उद्याच्या अंधकारमय भविष्यात जायला मनसुद्धा कचरत असते. त्यामुळे हा आनंदाचा क्षण कधी संपूच नये असे वाटून जाते.

"आता पुढे काय????",अहमदने स्वतःला विचारले.

घरी जायला मिळणार म्हणून इरफान खुशीत होता पण त्याला न्यायचे तरी कोणत्या घरी? नवीन घरमालकाने दिलेली मुदत संपल्यावर अहमदच्या बायकोने बिऱ्हाड तात्पुरते तिच्या माहेरी हलवले होते.इरफानला तिथे नेण्याशिवाय पर्याय नव्हता.पण किती दिवस? पुढील काही दिवस इरफानची काळजी घेणं आवश्यक होतं. त्याच्या महिन्याच्या औषधांचा खर्च तीन-चार हजाराच्या घरातला असणार हे अहमदला जाणवले. कुटुंबाच्या उपजीविकेचं साधन असलेली होडीसुद्धा आता साथीला नव्हती.

अहमद अस्वस्थ होऊन वॉर्डात येरझाऱ्या घालत होता. त्याचवेळी त्याला बाजूच्या पेशंटचा मुलगा येताना दिसला. तोसुद्धा जरा टेन्शनमध्ये वाटत होता. हे कुटुंब महाराष्ट्रीयन होतं. वडिलांच्या किडनी स्टोनच्या ऑपरेशनसाठी तो आईवडिलांसोबत आला होता. अहमदला बघून तो हसला.
"कैसे हो अहमद चाचा?"
"ठीक हू बेटा. दवाईयां लाने गये थे?"
"हा"
"कुछ परेशान लग रहे हो."
"नहीं..दिनभर भागदौड चल रही थी.इसलिये थोडा थक गया हू. इरफान कैसा हैं? कल डिस्चार्ज मिलनेवाला हैं तो खुश ही होगा."
"हा..खुश हैं"
"चलो अच्छा हैं. चाचाजी आपसे एक बात केहनी थी."
"हा कहो बेटा"
"आपके जैसा इन्सान मैने कभी नहीं देखा."
"ऐसा क्यो केह रहे हो?"
"मैं यहा आने के बाद आपने नसीब को कोस राहा था.मेरे पिताजी के साथ ही ऐसा क्यो हो रहा हैं वगैरा वगैरा. देखा जाये तो इरफान के सामने मेरे पिताजी का केस कुछ भी नहीं हैं. पर मैने आपको कभीभी नसीब को कोसते हुये नहीं देखा. इरफान के सामने आपने एक बार भी अपना दर्द नहीं जताया. उसके सामने आप हमेशा मुस्कुराते रहते हैं. इरफान बता रहा था की आप एक छोटेसे गाव में मछुआरे हैं.माफ किजीयेगा, लेकिन मुझे आपकी हालत का अंदाजा हैं. इरफान के ऑपरेशन के लिये कितना पैसे लगा होगा इसका भी मैं अंदाजा लगा सकता हू. पर आपको एक बात बताऊ? इरफान के जगहं अगर मैं होता, तो मेरे पिताजी शायद इससे भी ज्यादा पैसा आसानीसे लगा देते. पर आपके जीतनी हिम्मत हमारे पुरे खानदान में कोई नहीं जुटा पाता. इन दिनो इरफान और आपसे काफी लगाव हो गया हैं. पैसे के बारे में आपकी हालत देखके मुझे इरफान कि चिंता होती हैं. पर जब मैं आपके तरफ देखता हू तो मैं निश्चिन्त हो जाता हू."

अहमद त्याचं बोलणं ऐकून थक्क झाला होता. स्वतःच एवढं कौतुक त्याने कधीच ऐकलं नव्हतं. तो मुलगा चुकीचंही बोलत नाहीये हे अह्मदला जाणवलं.पण त्याचवेळी स्वतःची परिस्थितीही त्याला जाणवली. तो त्याला अडवून म्हणाला,
"शायद तुम सही केह रहे हो बेटा.अबतक तो मैने हिम्मत जुटायी थी.पर अब मैं हार चुका हू. मेरे पास अब कुछ भी नहीं हैं. ना घर,ना पैसे ! जिस नावं के सहारे मेरा घर चलता था अब वो भी नहीं हैं."

"चाचाजी भलेही ये बात मैने आपसे ही सीखी हैं. पर अब आपको ही बताना चाहुंगा."

"कौनसी बात?"

"चाचाजी नावं नहीं हैं तो क्या हुआ...पुरा समंदर आपका हैं!!!"

आता अहमद खरोखर स्तब्ध झाला! त्याला ज्या प्रेरणेची गरज होती ती त्याला अनपेक्षितपणे मिळाली होती. अहमदला हायसं वाटायला लागलं. त्या मुलाला धन्यवाद देऊन अहमद इरफानजवळ आला. इरफान शांत झोपला होता. त्याच्या चेहऱ्याकडे बघून अहमदने मनोमन काहीतरी ठरवले.

सकाळी लवकर उठून अहमदने सगळ्या डिस्चार्ज फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या.तिथून निघण्याआधी अहमदने वॉर्डातल्या सगळ्या पेशंट्सची भेट घेतली. मुख्य डॉक्टरांना भेटून त्यांचेही आभार मानले. इरफानला घेऊन तो सलीमच्या घरी गेला. या काळात सलीम आणि कुटुंबीयांनी अहमदला प्रचंड आधार दिला होता.अहमदने सलीमला मिठी मारून त्याचे आभार मानले. दुसऱ्या दिवशी इरफानला घेऊन अहमद त्याच्या गावी परतला. भविष्य अनिश्चित होतं पण अहमद निश्चयी होता. काही दिवसांतच अहमदने एक खोली भाड्याने घेऊन बिऱ्हाड तिथं हलवलं. उपजीविकेचा प्रश्न अजून सुटायचा होता. एका मित्राकडून होडी भाड्याने घेऊन परत मासेमारी सुरु करायचं त्याने ठरवलं.मित्रानेही कमी भाड्यात आनंदाने अहमदला होडी दिली. बाकी खर्चांसाठी अहमदने रात्रपाळीतही कुठेतरी काम करायचं ठरवलं.

ठरल्याप्रमाणे पहिल्या दिवशी अहमद होडी घेऊन निघाला. नेहमीच्या ठिकाणी पोहोचल्यावर अहमदने होडी थांबवून माश्यांचे जाळे बाहेर काढले.
आणि,
"अनिश्चित भविष्याला काबीज करण्यासाठी अथांग समुद्रात दूरवर जाळे फेकले!!"

समाप्त.

कथाअनुभव

प्रतिक्रिया

शेवट आवडला. सकारात्मक.

सुमीत's picture

27 Mar 2017 - 6:49 pm | सुमीत

नविन द्रुष्टिकोन मिळाला

मराठी कथालेखक's picture

27 Mar 2017 - 7:02 pm | मराठी कथालेखक

छान आहे.

छान आहे गोष्ट..आधी इरफान आणि त्याच्या विहरनार्‍या किडनीची वाटत होती पण ही तर अहमदच्या हिमतीची गोष्ट आहे..

बापू नारू's picture

29 Mar 2017 - 11:04 am | बापू नारू

आवडली कथा, शेवटही छान केलात

पैसा's picture

2 Apr 2017 - 5:14 pm | पैसा

अगदी सकारात्मक शेवट आहे

चारही भाग आजच वाचले मस्त होती कथा.