शिव जयन्ती निमित्त -
बहुत यवन पीडिती स्वधर्माते,
महाराज.., शिवछत्रपती अवतरले त्राते |
मांडुनी मोडिली क्षेत्रे.....
विरश्रिये संचविली, गलितही गात्रे |
उभविले स्वराज्य भगव्द्ध्वजाते,
महाराज.., शिवछत्रपती अवतरले त्राते |
शिवबा दे अम्हा झगडण्यास स्फूर्ती,
उखडूच ते हात जे फोडिती मूर्ती |
धर्मरण स्थंडील अता हे धगधगते ,
महाराज.., शिवछत्रपती अवतरले त्राते |
छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय !!
---- सागर लहरी
प्रतिक्रिया
19 Feb 2009 - 10:07 pm | विकास
कविता आवडली. शिवाजीकडे मागणे करणे म्हणजे सावरकरांची, "हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजीराजा" पटकन आठवते.
तशी कमी माहीत असलेली गदीमांची खालील कविता शिवाजीचे मराठी टिकवण्यासंदर्भात महत्व छान सांगते त्याची देखील आपली कविता वाचताना आठवण झाली.
From Nasata Jhala Jara Shivaraya
19 Feb 2009 - 10:10 pm | लिखाळ
वा !
सागरलहरींची कविता आवडली..
विकास, तुम्ही दिलेली गदिमांची कविता कधी ऐकली नव्हती. आभार. शेवटचे कडवे फारच छान आहे.
-- लिखाळ.
19 Feb 2009 - 10:19 pm | विकास
>>शेवटचे कडवे फारच छान आहे.
वास्तवीक त्यात सर्व मराठी वाचवण्यासंदर्भातील तात्पर्य येते - जसा मराठी, महाराष्ट्र, हिंदवी स्वराज्यास एक शिवाजी लागला, तसाच तो निर्माण करायला एक जिजाबाई पण लागली. थोडक्यात अवांतर करत इतकेच म्हणावेसे वाटते की, पालकांनी आपले काम केले तर जे काय टिकवायचे, घडवायचे अथवा बिघडवायचे ते होईल...
19 Feb 2009 - 10:24 pm | लिखाळ
एकदम बरोबर.
रेड रेड ऍप्पल खायला घालणारे आणि हॅप्पीबर्थडेला एंजोय करायला मुलाला धाडणारे पालक त्या मुलावर भाषेचे काय संस्कार करतात देव जाणे..असो.. जीजाबाई आणि शिवाजी यांना प्रणाम करुन प्रतिसाद आवरतो.
थोडे विषयांतर केल्याबद्दल क्षमा करा.
-- लिखाळ.
20 Feb 2009 - 12:28 am | सुभाष
कविता फारच प्रेरणा देणारी आहे.शिवाजी महारा़ज झाले झाले नसते तर ???कल्पनाच करवत नाही ! कवि भुषण म्हणतो...........
वेद राखे विदित पुरान राखे सारयुत रामनाम राख्यो अति रसना सुधर मे !
हिन्दुन की चोटी राखी ,रोटी राखी है सिपाहिनकी,कान्धेमे जनेऊ राख्यो माला राखी गरमे !!
मीडि राखे मुगल मरोहि राखे पातसाह, वैरी पीसि राखे वरदान राख्यो करमे !
राजन की हद्द राखी तेग बल सिवराज्, देव राखे देवल स्वधरम राख्यो घर मे !!
अर्थ....शिवाजीराजाने आपल्या तलवारीच्या जोरावर वेद आणि पुराणे यान्चे सरक्षण केले.सर्वस्वाचे सार असे जे रामनाम ते हिन्दूच्या जिव्हेवर कायम ठेवले.हिन्दून्ची शेन्डी राखली आणि शिपायान्ची रोटी (ऊपजीविका)चालविली.खान्द्यावरील जानवी आणि गळ्यातील माला सुरक्षित ठेवल्या.मोन्गलान्चे यथास्थित मर्दन केले व बादशहास मुरगाळून टाकले. इतके करून आपल्या हाती वर देण्याचा अधिकार ठेवला.देवळात देव व घरात कुलधर्म कुलाचार कायम ठेवले.
22 Feb 2009 - 10:42 pm | सागरलहरी
माझ्या बोबड्या बोलान्चे कौतुक करणा-या आपणा सर्वान्चे आभार ...
अढीत आंबा पिकू दे तरी, वास जरासा घुमुदे तरी
लहान आहे कविता माझी, वयात तिजला येऊ दे तरी....
माझ्यापेक्षा बापलोक ते, कितीक झाले पूर्व सूरी,
सरस्वती ज्या प्रसन्ना आणिक, शब्दसंपदा पाणी भरी...
रसिक थोर नमितो तुम्हा, कवने माझी आवडली जरी,
काजव्याने या थोर जनांशी, न च करावी बरोबरी ...
--- सागर लहरी
19 Feb 2009 - 10:10 pm | प्राजु
सुरेखच. खरंच हे हिंदू नृसिंहा ची आठवण झाली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
19 Feb 2009 - 10:23 pm | अवलिया
कविता छान आहे...
यवन या शब्दाऐवजी म्लेंच्छ हा शब्द जास्त बरोबर झाला असता असे वाटते.
--अवलिया