सावरकरांचे मनोगत

कवि मानव's picture
कवि मानव in जे न देखे रवी...
10 Jan 2017 - 3:49 pm

सावरकरांचे मनोगत मांडण्याचा प्रयत्न केला आहे - ते मातृभूमी ला उद्देशून हे सांगत आहेत

शतदा नकार मज राजमुकुट सोन्याचा,
मी तृप्त पाहुनी काळ हा स्वातंत्र्याचा,
घेऊन हजारो जन्म तुझ्या उदरातून,
मी सदैव राहीन, दास तुझ्या चरणांचा !!

प्राणांची देऊन आहुती या यज्ञाला,
मी किंचित केले भार कमी खांद्याला,
नसता हे जीवन व्यर्थ मानले असते,
तुझं कारण आले अर्थ नवे मारण्याला !!

चकवून शत्रूला पार समुद्रा केले,
ती जन्मठेप मी हसत-हसत सोसियले,
जरी अंती आले उपेक्षाच मज पदरी,
निळकंठा सम ते अमृत मानूनी प्राशीयले !!

हे भारतवर्षे थोर तुझे उपकार,
तू दिलेस मनगटात बळ न तलवारीला धार,
न तू घेऊन हाती सत्याची विजय पताका,
झळकविलेस करुनी दुष्टांचा संहार !!

आता मोह नसे कुठलेही या देहाला,
खारीचा वाटा माझा या देश सेवेला,
हे हृदय हर्षिले न शीश अभिमानाने झुकले,
वंदन करण्या माझ्या या मातृभूमीला !!

अभय-काव्यइतिहास

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

11 Jan 2017 - 9:25 am | चांदणे संदीप

मनोगताचा उद्देश स्पष्ट होत नाही. शेवटचे कडवे साफ गंडलेले आहे. कविता उगीचच शब्दबंबाळ करून सोडली आहे.

माफ करा, मला तरी आजिबात आवडली नाही. इतरांचे मत कदाचित याऊलट असू शकते.

कवितेवर पहिलाच प्रतिसाद असा येतोय याचा मलाही खेद आहे. पण लक्षात घ्या, खूप अपेक्षेने उघडलेली कविता वाचण्यासाठी!

Sandy

कवि मानव's picture

11 Jan 2017 - 2:27 pm | कवि मानव

संदीप - हरकत नाही.. मी नक्कीच तुमच्या प्रतिक्रियेचा विचार करीन.

मध्यंतरी सावरकरांवर एक व्याख्यान ऐकले आणि त्यातून काहीसा सुचलेली हि कविता.
शेवटचं कडवा नक्कीच थोडा सत्य परिस्थितीशी सोडून वाटतं.

पण दृश्य असा होतं की, माणसाच्या अतृप्त इच्छा असतात आणि त्याला अनुसरून सावरकर मातृभूमीशी मनोगत व्यक्त करत आहेत

मी याला त्यांच्या निरूपणाची कविता म्हणू का कळत नाही... तुम्हाला काय वाटलं ??

समाधान राऊत's picture

11 Jan 2017 - 8:03 pm | समाधान राऊत

छान हो, शब्द जुळवण्याचा छान प्रयत्न
"चकवून शत्रूला पार समुद्रा केले,
ती जन्मठेप मी हसत-हसत सोसियले"
या दोन ओळी कमी केल्यातर सावरकर कुठेच नाहीत किंबहुना इतर वीरांना ही जशीच्या तशी लागु होते.
पहिले चार शब्दसत्र आवडले!!

कवि मानव's picture

12 Jan 2017 - 1:41 am | कवि मानव

धन्यवाद !!

या दोन ओळी कमी केल्यातर सावरकर कुठेच नाहीत किंबहुना इतर वीरांना ही जशीच्या तशी लागु होते. --- मी याला माझा सन्मान म्हणून समजून घेतो :)))) की तुम्ही शालजोडी दिले असे समजू ;)))

हतोळकरांचा प्रसाद's picture

12 Jan 2017 - 12:18 pm | हतोळकरांचा प्रसाद

आशय चांगला आहे!

कवि मानव's picture

12 Jan 2017 - 2:24 pm | कवि मानव

धन्यवाद !!

एकविरा's picture

13 Jan 2017 - 2:54 pm | एकविरा

छान प्रयत्न .

कवि मानव's picture

13 Jan 2017 - 8:36 pm | कवि मानव

धन्यवाद !!

पैसा's picture

14 Jan 2017 - 10:00 am | पैसा

चांगला प्रयत्न. का कोण जाणे अगदी उत्स्फूर्त वाटली नाही. आणि वृत्ततही जरा ओढाताण झाली असावी. याहून चांगले नक्की लिहू शकता.

कवि मानव's picture

15 Jan 2017 - 5:30 pm | कवि मानव

धन्यवाद.. प्रयत्न नक्कीच राहील