डुलकी

भटकीभिंगरी's picture
भटकीभिंगरी in जनातलं, मनातलं
21 Sep 2016 - 6:48 pm

तो २००८ सालातील ११ मी हा दिवस होता. मी केसरी टुर्स सोबत ओस्ट्रेलिया टूरवर गेले होते. त्या दिवशी आम्ही सिडनीहून सकाळी ८ वाजत कॅनबेरा या कॅपिटल सिटीमध्ये गेलो. जाताना बसमधून बाहेर निसर्गाने उधळलेल्या सौदर्याचा आस्वादघेत गेलो. पूर्वीची राजधानी सिडने होती. पण सिडने समुद्र किनार्यावर आहे. आणी राजधानी समुद्रकिनार्यावर असणे सुरक्षेच्या दृष्टीने ठीक नाही म्हणून नंतर ती कॅनबेराला आणली.

DSCN2065
आमचा ड्रायव्हर ...
पुर्वि हा प्रदेश ओसाड होता. पण व्यवस्थित प्लानिंग करून हे शहर वसवले आहे. त्यामुळे ते अतिषय सुबक आहे. जाताना १२ वाजता आम्ही जेवलो. आम्ही शहरात शिरल्यावर प्रथम बसमधूनच विविध देशांच्या एम्बसीज बघितल्या. ‘न्यू पार्लमेंट हाऊस’ आतून पाहिले. सभागृहात पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते यांच्या शेजारी शेजारी बसण्याच्या जागा आहेत. गोलाकार खुर्च्यांची रचना. आणी पंतप्रधानांच्या समोर अध्यक्षांची खुर्ची. येथून आम्ही वरती गच्च्चीत गेलो.. तेथे मध्यभागी राष्ट्रध्वज आहे. हा बाराही महिने सतत फडकत असतो.फक्त फाटला तरच उतरवला जातो. समोरच वॉरमेमोरिअल हाउस आहे.येथे लाल पिवळ्या रंगांची पाने असलेली अतिशय सुंदर झाडे आहेत. तशी ती रस्त्यांच्या दुतर्फाही आहेत.वारमेमोरीलमध्ये सतत जळणारी ज्योत आहे. बाजूच्या भिंतीवर पहिली महायुध्धात शहीद झालेल्या देशोदेशींच्या जवानांची नावे आहेत. त्यात कित्येक भारतीयांची नावेही आहेत. माउंट Ainsliए वर. हि हाईयस्ट जागा आहे. येथून कॅनबेरा शहर सुरेख दिसते.

DSCN2111
मावळत्या दिनकरा.....
आज दिवसभर खूप फिरणे झाले. परतताना उशीर झाला होता. ०९४५ ला रात्रीचे जेवण घेतले. आम्ही सर्व दमलो होतो. मी खिडकी पाहिजे म्हणून सर्वात मागच्या रिकाम्या विंडोसीटवर बसले. सकाळी लवकर उठलो. दिवसभराचे फिरणे, त्यातच ज्रात्रीचे जेवण झालेले.आता गाडी थेट हॉटेलवर जाणार होती. गाडी सुरु झाली आणी मला गाढ झोप लागली.मधेच कोथेतरीए गाडी थांबली तेव्हा मी डोळे उघडून पाहिले; आणी गाडी इतका वेळ का थांबलेय? सिग्नलला गाडी इतकी कधी थांबत नाही असा विचार करीत परत झोपी गेले.

नंतर केव्हातरी मला परत जाग आली तेव्हा गाडी उभी असल्याचे लक्षात आले. सगळीकडे काळोख होता. साधारणत: गाडी थांबली की आतले दिवे चालू होतात. मी उभी राहिले. पहाते तर गाडीत कोणीच नव्हते.मला वाटले हॉटेल आले. मी पुढे जाऊन खाली उतरले. समोर काळोखात गाड्या पार्क केलेल्या दिसल्या. हॉटेलचा पत्ता नव्हता. मग मी बसला वळसा घालून पलीकडे गेले तर बसचा ड्रायव्हर कारचे दार उघडून आत काहीतरी करत होता.माझी चाहिल लागताच तो वळला. मला पहाताच आश्चर्याने तो उडालाच. मला म्हणाला म्याडम तुम्ही इथे काय करताय? मी त्याला विचारले हॉटेल कुठाय? तो म्हणाला हॉटेल ७/८ मैल लांब अआहे. सर्व तेथे उतरले तुम्हा इथे काय करताय? मी म्हणाले मला झोप लागली होती.हॉटेल आले, सगळे उतरले ते मला कळलेच नाही.मी सर्वात शेवटच्या सीटवर झोपलेली असल्याने मी आत राहिलेय ते कोणाच्या लक्षातच आले नाही.आणि सार्वजण उतरलेत असे समजून ड्रायव्हरने गाडी माझ्यासकट गाडी पार्किंगमध्ये आणली होती.ही जागा म्हणजे शहराबाहेरचे पार्किंग ग्राउंड होते.

DSCN2061
सिडने ब्रिज ..
ड्रायव्हर बिचारा सज्जन होता.टो म्हणाला आता मला तुम्हाला हॉटेलवर पोचवावे लागेल. मग त्याने बस लॉक केली. त्यानंतर त्याच्या गाडीत बसून आम्ही हॉटेलकडे निघालो. कार वेगात धाऊ लागली आणि क्षणभर मनात विचार आला, हा परका देश.आपण घरापासून खूप लांब परदेशांत आहोत. आपल्याला कोणी ओळखीत नाही; येथे आपण कोणाला ओळखत नाही. आपल्याला मदत करणारेही येथे कोणी नाही. इथले रस्ते वैगारेचीही आपल्याला काही माहिती नाही. आपले काही बरेवाईट झाले तरी कोणाला समजणार नाही. या विचारासरशी मी मनातून खूप घाबरून गेले. पण चेहेर्यावर तसे काही न दाखवता शांत राहिले. इथ्क्यात त्याने घरी त्याच्या बायाकोलां फोन लावला की, एक महिला प्रवासी गाडीत झोपाल्यमुळे राहिलेय तिला सोडून मी घरी येतो. यायला थोडा उशीर होईल. ते ऐकून थोडे हायसे वाटले. थोड्याच वेळात आम्ही हॉटेलवर पोचलो आणी माझां जीव भांड्यात पडला. मला हॉटेलपाशी सोडून तो निघून गेला.

DSCN2093

एकाएकी मला जाणीव झाली की एका फार मोठ्या संकटातून मी सुखरूप बाहेर पडलेय. .साऱ्या टुरिस्ट बसेस दिवसभराचे साइट्सीइन्ग झाल्यानंतर ‘पार्किंग झोनमध्ये’ पार्क होतात. हा झोन शहराबाहेर, एका बाजूला, सुनसान जागी असतो. मला सर्व प्रवासी उतरून गेल्यावर बस पार्किंगला पार्क झाल्यावर जाग आली होती अजून २/३ मिनिटे जर जाग आली नसती तर ड्रायव्हर बस लॉक करून गाडी घेऊन निघून गेला असता. तसाही तो निघालाच होता. मग मी या सुनसान जागी बसमध्ये अडकून पडले असते. आणखी ५/६ मिनिटानी मला जाग आलीच असती. कारण बस ए.सी. आणि बसच्या काचा बंद होत्या. हळूहळू साफोकेशान होऊ लागले असते. मला तसेही कोंदट बंदिस्त जागी थांबायला आवडत नाही. गुदमरल्या सारखे होते. काय केले असते मी? या विचाराने आजही अंगावर शहारा येतो.कदाचित कोंडली गेल्यामुळे मी बेशुध्द झाले असते.

काय केले असते मी? मी आरडाओरडा केला असता का? पण या एकाकी जागी कोण ऐकणार होते? कोण आले असते? आणी ओरडूनही कोण येणार होते? उलट माझीच शक्ती वाया गेली असती. बसचे लॉक उघडणे शक्यच नव्हते. बसच्या काचा फोडता आल्या असत्या का? आणि उघडल्या तर वरून उडी मारता आली असती का? कारण इथल्या बसेस उंच असतात. कदाचित.माझा आरडाओरडा ऐकून कोणी आले असते तर? कदाचित म्हटले कारण ती शक्यता फारच कमी होती. पण कोणी आले असते तरी इतक्या रात्री वावरणाऱ्या व्यक्तींवर किती विश्वास टाकता येणार? मी काय केले असते? माझे काय झाले असते? मी बसमधून उतरले नाही; हॉटेलमध्ये मी आले नाही हे कोणाच्या लक्षात कसे आले नाही?अस्वस्थ करणारे असंख्य प्रष्ण..खरोखर एका जीवघेण्या संकटातून मी वाचले होते..

मी हॉटेलमधल्या माझ्या रुममध्ये आले. माझी रुममेट तिची सुटकेस उघडून बसली होती. ती मला म्हणाली, काय ग कोणाशी बोलत बसली होतीस इतका वेळ? की कम्प्युटरवर काम करीत होतीस? छान म्हणजे हिला काहीच गंधवार्ता नव्हती तर ..काय बोलणार..? मी आपली कॉफी घेतली. अंघोळ केली आणी परत झोपी गेले...

प्रवासअनुभव

प्रतिक्रिया

भटकीभिंगरी's picture

21 Sep 2016 - 6:50 pm | भटकीभिंगरी

मार्गदर्शन करावे .

जव्हेरगंज's picture

21 Sep 2016 - 7:13 pm | जव्हेरगंज

फोटोच्या लिंक द्या. संमं अपडेट करतील.

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Sep 2016 - 7:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर प्रवासवर्णन !

मिपावर चित्रे टाकण्याची कृती

चित्रे किंवा त्यांच्या लिंक्स या लेखाच्या एका प्रतिसादात टाका.

राघवेंद्र's picture

21 Sep 2016 - 7:21 pm | राघवेंद्र

मस्त अनुभव :)

जयन्त बा शिम्पि's picture

21 Sep 2016 - 7:31 pm | जयन्त बा शिम्पि

सुखरूप बचावल्या म्हणुन ठीक झाले, पण केसरी टुर्स सोबत ' मार्गदर्शक ' नसतो काय ? सर्व प्रवासी सुखरुप उतरले की नाही हे पहाण्याची जबाबदारी त्याची नसते कां ? आणि पार्किंग लॉट च्या ऐवजी, सायंकाळी एखाद्या गर्दीच्या ठिकाणी,साईटसिंग करतांना, ग्रूपमधुन एकट्या पडल्या असत्या तर ? बरे झाले, आम्ही १९९५ मध्ये ' नेपाळ टूर ' केसरी सोबत केली नाही ते !

एस's picture

21 Sep 2016 - 7:31 pm | एस

भारी!

सुखरुप परतल्यामुळे बरे झालं. पण तुमच्या टुर गाइड वीरुद्ध नक्की कंम्प्लेंट करा. सगळे प्रवासी परत आले की नाही हे चेक करणे त्याची जवाबदारी आहे

अमित खोजे's picture

21 Sep 2016 - 7:37 pm | अमित खोजे

डुलकी हा एवढा अवघड प्रकार ना. बऱ्याच वेळेला मी याचा अनुभव घेतला आहे. दिवसभर फिरल्यामुळे / कामामुळे ट्रेन मध्ये बसल्या बसल्या झोप लागते आणि आपला स्टॉप निघून जातो. परत द्राविडी प्राणायाम घालून मग बस्/सब्वे करत घरी यावे लागते. योग्य वेळेला जाग येईल याचा काहीच भरोसा नाही. म्हणून मला तर वाटते झोप म्हणजे तात्पुरते मरणच. आपल्याला माहीतच नाही आपण केव्हा परत जाग येऊन उठणार.

रातराणी's picture

21 Sep 2016 - 8:05 pm | रातराणी

ही ही डुलकीमुळे कायम दोन स्टॉप पुढेच उतराव लागायचं मला :)

स्वाती दिनेश's picture

21 Sep 2016 - 8:45 pm | स्वाती दिनेश

तुमचा अनुभव चांगला लिहिला आहेत.
टूअर गाइडने खरं तर सगळे उतरल्याचा कॉल घ्यायला हवा होता.
स्वाती

यशोधरा's picture

22 Sep 2016 - 8:27 am | यशोधरा

टूअर गाइडने खरं तर सगळे उतरल्याचा कॉल घ्यायला हवा होता.

हेच म्हणते. अनुभव ड्यांजर आहे! तुम्ही हिमालयन ट्रेक्सबद्दल कधी लिहिणार?

भटकीभिंगरी's picture

22 Sep 2016 - 1:37 pm | भटकीभिंगरी

हो. लिहिणर आहे नक्की !

एकेका ट्रेकबद्दल बैजवार लिहा. करायची तयारी, लागलेले तृएक, अनुभव वगैरे सगळे.

ज्योति अळवणी's picture

22 Sep 2016 - 1:50 am | ज्योति अळवणी

चूक टूर गाईडची आहे. साधारण असाच अनुभव असतो.... त्यांना फक्त एक एक दिवस ढकलायचा असतो असं वाटतं.

तुम्ही अनुभव मात्र छान लिहिला आहात

बापरे! बरे झाले वेळेवर जाग आली.

जयन्त बा शिम्पि's picture

22 Sep 2016 - 4:01 pm | जयन्त बा शिम्पि

डुलकी लागणे हा काही नवीन प्रकार नाही, मला तर खुर्चीत बसल्या बसल्या सुद्धा डुलकी लागते. अशावेळी सौभाग्यवती सुचना करते की बेडवर जावून झोपा, पण बेडकडे जाईपर्यंत, झोपेचा अंमल निघुन जातो. झोप कमी झाल्यामुळे, अती-श्रमामुळे, शरीराला पुरेशी विश्रांती न मिळाल्यामुळे, डुलकी येवू शकते. पण समजा हीच डुलकी एखादे वाहन चालवित असतांना आली तर ? अपघाताला निमंत्रणच ना ? तुमची इच्छा असो वा नसो, निसर्ग आपले काम चोख करीत असतो. मी अशा तर्‍हेने , जास्तीत जास्त वेळ जागे रहाण्याचे प्रयोग स्वतःवर करुन पाहिले आहेत, पण निसर्गापुढे काही चालत नाही. ज्यांना 'विश्व-विक्रम' करावयाचा त्यांना खुशाल विक्रम करू द्यावा. म्हणून झोपेच्या वेळेला झोप घ्यावीच, मग वाहन रस्त्याच्या कडेला लावावे लागले तरी हरकत नाही अथवा कार्यक्रमाला उशीर झाला तरी !

पैसा's picture

22 Sep 2016 - 10:38 pm | पैसा

काटा आला अंगावर!