बाप हाय मी - भाग 2

रातराणी's picture
रातराणी in जनातलं, मनातलं
22 Jun 2016 - 1:51 pm

तात्या तुमी कसं हायसा?

तुमची लय आठवण यिती मला. लहानपणापासन तुमी मला कायबी कमी नाय केलं. ज्ये मागितलं त्ये दिलं. तवाचं तुमी मला शिकिवल आसत का नाय सम्द्या गोष्टी नाय मिळत, कवा कवा हराया बी लागतंय तर आज ह्यो दिसचं नसता दिसला. तुमची तरी काय चुक म्हणा. तात्या ह्या पाटलांच्या रक्तातच हाय ओ जिगर. त्ये प्रिन्सदादा बगा. कशात काय न्हाय तरी तुमच्या जिवावर उधळतय कडू. तेला म्हणाव जरा फाटक्या खिशान दोन दिस जगून तरी दाकीव. तात्या परश्या गरीब हाये पर मनान लय चांगला हाये तो. तेच्या ग्वाड मिट्ट सोभवान आमची सारखी भांडणं हूत्यात. पर तो लय खरा हाये ओ. आपल्या घरात कोण सुदीक नाय तेच्या एवढं चांगल आई सोडली तर.

तात्या ऊसाला दर बरा मिळाला न्हव यंदा? आन् आबा, भाऊ सम्दे कसे हायेत? तात्या हिकड आलू न आधी परश्या न मी पत्र्याच्या खोपट्यात राहिलू. किडामुंगीवानी. परश्यान लय कष्ट केलेत तात्या. पैल्यांदा तर घरात केर पण तोच काडायचा, चा सैपाक बनवायचा, आणि बाहेर काम करून येयाचा. आणि एवढं करून का नाय त्यो कदीच कुणाशी चिडून बोलत नाय. कधी चुकीच काम करत नाय. मला तेच्याकड बगुन लय वाईट वाटायचं आन् घरातल काम करायला बी आवडायच नाय.

मग हिथ एक सुमनताई हाये, तिच्याच खोपट्यात राहतू आमी. तिनं मला कंपनीत कामाला लावलं. चिडू नका तात्या. मला म्हायते तुमाला मी असं दुसऱ्याच्या दारात खपलेल आवडायच नाय. माझ लगीन लावून देणार हुता ना त्या दिग्विजयशी. त्यो मला रानीवाणी ठेवील, हिकडची काडी तिकडं करू देणार न्हाय म्हणालावता तुमी. पर खर सांगू तात्या त्याच्याशी लगीन करून ना म्या खरंच किडामुंगीचच आयुष्य जगली आसती. तेंच्या घरात डोक्यावन पदर बी ढळलेला चालत नाय. मला काचेच्या कपाटातल्या बाहुलीगत नव्हत राहायचं तात्या.

तुमी म्हणता मला तिकीट दिलं असत इलेक्शनला पर सगळा कारभार प्रिन्सदादाला दिला असता का नाय? मला नुसती नमस्कारापूरती उभी केली असती.

तेच्यापरास लय ब्येस हाये आता मी. आमी गरीब असून बी आमी आमच्या जिवाव जगतो. कष्टाची भाकरी खातो. मला तर लय भारी वाटतं काम करायला. आमचे सर पण मला लय मानतात. आता मला सूपरव्हायजर करणार हायेत. नुसतं बसून लक्ष ठिवायच कोण कामं करतय. वेळेत कामं पूर्ण करून घ्यायचं. आमचे सर मला म्हणतात

"अर्चना वरी सिटूल्लो बलम कलीगीना ओका अत्यंत शक्तीवांतमेना उन्दि"

नाय कळल ना कायच. मला पण आधी काय कळायची नाय ही भाषा. पण आता जमत हळू हळू. चुकत चुकतच शिकले. म्हणजे ते म्हणतात
"ज्याच्या मनगटात बळ आहे तो खरा पॉवरवाला."

खरं सांगू का तात्या, मला ना तुमचीच आठवण आली ते ऐकून. तुमी कसं एकदा शेतात फिरत फिरत मला सगळं सांगत हुता, आज्ज्यान लावल्याली घराची वाट. मग तुमी तुकडा तुकडा करून जमिवल्याल रान. रात्रीचा दिस करून शेतात गाळलेला घाम. तात्या मला तर घशात कायतरी अडकल्यावानीच झालं ओ. माज्या मैत्रिणीला मग म्या समद सांगत हुती कसं आपलं मोठं रान हाये, केळीच्या बागा हायेत आन् तुमी माजे किती लाड करता सगळ सगळ. तात्या तुम्ही हुता म्हणून मला कवा दुःख न अपमान म्हाईत नाय झाला. पर दुनिया लय येगळी हाये. तुमी तुमच्या पंखाखाली आमाला काय कळू दिलं नाय. आता बाहेर आल्याव सगळ्याची किंमत कळतीया. माणसांची तर जास्तच. तात्या लय प्रॉब्लेममधे जगतात ओ लोक. माझं तर कवा कवा काळीज हलत काय काय लोकांचे हाल बगून. तात्या तुमी म्हणाल म्या असं का बोलाय लागली आता. तुमीच म्हणायचा ना तात्या ताई आता मोठ्या व्हा! झाले बगा.

तात्या आमी आता नवीन घर घेणार हाये. लय मस्त हाये. हवेशीर. परश्या म्हणत हुता आपण खालच घिऊ. पण मीच म्हणलं नाय सगळ्यात वरच्या मजल्यावरचच घ्यायच. आपल्या गावाला कस घराभोवती मोकळ रान हाये. गच्चीवर गेलं की कसं सगळं हिरव हिरव गार दिसायच तसं आता मला हितं कधी बघाय मिळणार. मग मीच म्हणलं रान नाय तर नाय आपण आता उंच उंच आकाशाकड बगु. आमच्या बाळाच नाव आमी आकाशच ठेवलंय. त्याला आमी तात्याच म्हणतो. तुमच्यावरच गेलाय तो पण. तात्या तुमी याल का माज्या घरी. नाय म्हणू नका तात्या आता. तात्या एवढं कसं रागावला तुमी माज्यावर. म्या तुमची लाडकी लेक हाये ना. तात्या एकडाव फक्त तुमी आकाशला बगा. फक्त एकडाव त्याला कडेवर घिऊन फिरवून आणा. म्या तुमाला परत कद्दीसुद्दा त्रास देणार नाय. तुमाला नाय बगायच ना माझं तोंड नका बगु. पर माज्या लेकराचा राग करू नका. माजा जीव तुटतो तात्या तुमची अन आईची आठवण आली की. तात्या याल ना माज्याकड, तात्या हो म्हणा तात्या...तात्या

आर्चि कशी काय हाक मारती म्हणून तात्या अंथरुणावर उठून बसले. घामाने भिजलेले हात चेहऱ्यावरून केसातून फिरवत ते उठले. आर्चीच्या रूम मधे जाऊन लाईट लावून पाहिला. तिच्या पुस्तकांवरून हात फिरवता फिरवता तात्यांचे डोळे भरून आले. तसेच मागं फिरुन ते पुन्हा बेडरूममधे आले आणि लास्ट डायलड़ नंबर लावला.

पलीकडुन फोन उचलताच घसा खाकरून तात्या म्हणाले,

"माघारी फिरा, लगच्या लगी"

"पर तात्या..."

"सांगतोय तेवढं करायच. उलटा सवाल नाय पायजे"

एवढं बोलून तात्यांनी फोन ठेवला. पुढच्या एक तासात प्रिन्स, भाऊ आणि आबा बंगल्यात परत आले होते. असं मधूनच प्लान फिसकटला म्हणून प्रिन्स तणतण करत होता. आर्चीची आई नातवाला घेतलेले स्वेटर पिशवीतून काढून त्यांचे मुके घेत होती, कुरवाळत होती. सगळ्यांना घरी परत जायला सांगून तात्या सोप्यामधल्या झोपाळ्यावर शांत बसले होते. जणू काहीच घडलं नव्हतं. प्रिन्सला वर जाऊन झोप असं सांगून तात्या दिवाण खान्यात आले. पदरात हुंदका दाबून धरलेल्या आपल्या बायकोशेजारी खाली बसत त्यांनी तिच्या खांद्यावर हात ठेवला. एवढे दिवस दोघा मायबापानी अश्रूंना घातलेला बांध कोसळला.
कसेबसे सावरत तात्या म्हणाले,

" काळजी करू नका, आपण सकाळच्या गाडीन जाऊ आर्चीकड. शेवटी कायबी झालं तरी बाप हाये मी..."

कथामुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

नीलमोहर's picture

22 Jun 2016 - 2:11 pm | नीलमोहर

'शेवटी कायबी झालं तरी बाप हाये मी'
- हा खरा बाप.

शेवट जबरदस्त केलाय.

सिरुसेरि's picture

22 Jun 2016 - 2:25 pm | सिरुसेरि

सैराटचा शेवट जरी वास्तववादी , दु:खद आणी धक्कादायक असला तरी त्या निमित्ताने चित्रपट संपल्यावरही प्रेक्षकांना "हा शेवट टाळता आला असता तर ..?" हा विचार करायला परत परत भाग पाडणे हेच सैराटचे यश आहे . हा सुखद शेवट आवडला .

सहमत. जेव्हा प्रत्येक कहानीचा असा सुखद शेवट (दोन्हीकडील कुटुंबांना घेउन) होईल तो सुदिन !!!

स्पा's picture

22 Jun 2016 - 2:32 pm | स्पा

आवडला

पद्मावति's picture

22 Jun 2016 - 2:35 pm | पद्मावति

सुरेख!

जगप्रवासी's picture

22 Jun 2016 - 2:37 pm | जगप्रवासी

जितक्या ताकदीचं अभ्याने लिहिलं होत तितक्याच ताकदीने तुम्ही हा भाग लिहिलात. दोन्ही लेख आवडले. हा वेगळा शेवट आवडला.

पदरात हुंदका दाबून धरलेल्या आपल्या बायकोशेजारी खाली बसत त्यांनी तिच्या खांद्यावर हात ठेवला. एवढे दिवस दोघा मायबापानी अश्रूंना घातलेला बांध कोसळला.
कसेबसे सावरत तात्या म्हणाले,

" काळजी करू नका, आपण सकाळच्या गाडीन जाऊ आर्चीकड. शेवटी कायबी झालं तरी बाप हाये मी...">>>>> एक नंबर

टवाळ कार्टा's picture

22 Jun 2016 - 2:38 pm | टवाळ कार्टा

भारी...कस्स जम्तं हो तुम्हाला :)

कंजूस's picture

22 Jun 2016 - 2:52 pm | कंजूस

भारी.

नाखु's picture

22 Jun 2016 - 2:57 pm | नाखु

रा रा लिहिलय भारी, पण अगदी आय टी त असलेल्या इंजीनीअरला "देवयानी" मालीका पाहून असा असतो खानदानीपणा डोक्यावर पदर घेतल्या खेरीज कुणाशी बोलत नाहीत ही खरी अस्सल खान्दानी मालीका असे तारे तोडताना आणि मित्रांकडून टाळ्या घेताना पाहिले आहे.(सुखावलेपण चेहर्यावरून आणि देहबोलीवरून दिसून येत होते)
तेव्हा घराण्याची अब्रू,खान्दानीपणा यासमोर बापाचे प्रेम वगैरे फालतू आणि क्षुल्लक गोष्टींना व्य्वहारात तरी किंमत नाही (९६ कुळी वाल्यांकडे जास्ती करून काही स्न्माननीय अपवाद असतील त्यांना आगाऊ धन्य्वाद)

रोखठोक नाखु
:मूळ अवांतर: अर्चीचे मनोगत चांगले पण स्वप्नाळू आहे

प्रचेतस's picture

22 Jun 2016 - 2:59 pm | प्रचेतस

छान लिहिलंय.

सस्नेह's picture

22 Jun 2016 - 3:12 pm | सस्नेह

ही कलाटणी आवडली !

अभ्या..'s picture

22 Jun 2016 - 3:38 pm | अभ्या..

ब्येस्ट, एकच लंबर. जमलीय कहाणी. थोडी स्वप्नातलीच पण एक शक्यता म्हणून छान.
.
.
थोडासा डिटेलिंग मधला घोळ म्हणजे कारखाण्याचा चेअरमन हाय तात्या. उसाच्या भाव ईचारणार नाही त्याची पोरगी.

रातराणी's picture

22 Jun 2016 - 5:55 pm | रातराणी

बरोबर आहे ! गल्तीसे मिस्टुक हो गया. :)

वपाडाव's picture

22 Jun 2016 - 3:46 pm | वपाडाव

पण गावच्या बाजात बटबटीतपणा वाटत आहे. जाणुनबुजुन लिहिल्यागत. तिची भाषा थोडी(खुप) कललेली वाटते.

लै म्हंजे लैच स्वप्नीय झालंय सगळं, असो.

रातराणी's picture

22 Jun 2016 - 5:56 pm | रातराणी

सर्व वाचकांची आणि प्रतिसादकांची आभारी आहे. =))

विअर्ड विक्स's picture

22 Jun 2016 - 6:39 pm | विअर्ड विक्स

भाग -२ आवडला. आता परश्यावर पण लिहावे कुणीतरी. कारण त्याचे आईबाप ज्यादा होरपलेत.

जव्हेरगंज's picture

22 Jun 2016 - 6:46 pm | जव्हेरगंज

ग्लिसरीन लावून ठो ठो रडलो !

येउंद्या अजून !!

तुमचं मशीन देतांव का परश्या आन आर्चिला ?
तासांपूरत द्या फकस्त.

प्रीत-मोहर's picture

22 Jun 2016 - 9:32 pm | प्रीत-मोहर

हे भारीच. जव्हेरभाउ हे घ्या मनावर

आनंद कांबीकर's picture

22 Jun 2016 - 10:38 pm | आनंद कांबीकर
प्रीत-मोहर's picture

23 Jun 2016 - 12:05 pm | प्रीत-मोहर

हे आहेच पण क्लिककथा आवडेल वाचायला

रातराणी's picture

22 Jun 2016 - 11:21 pm | रातराणी

राहू दया जव्हेरदादा. आज एका वामा मैत्रीणीन हे वाचून शेरलोक होम्स ला लाजवेल अशा प्रकारे मी ( म्हणजे खरी मी ) आणि रातराणी एक आहोत असा शोध लावला. आता बोला! आणि वर मला सांगितल की जव्हेरगंज छान लिहितात. तेव्हापासून मीच बसलिये रडत :(

बाकी क्लिकक्लिकाट होऊन जौ द्या सैराटचा. कॉलेजच वेगळे करा दोघांचे. आमच्या डोक्याला तापच नको तो. :)

टवाळ कार्टा's picture

23 Jun 2016 - 8:31 am | टवाळ कार्टा

नक्की कुठे कामाला हाहात तुम्ही? :)

रातराणी's picture

23 Jun 2016 - 9:05 am | रातराणी

सध्या अंडर कवर एजंट आहे. पण आमच्या आयडीचा पितळी तांब्या असा सहज उपडा झाल्याने आम्हाला सध्या बाकावर बसवून ठेवले आहे.

टवाळ कार्टा's picture

23 Jun 2016 - 11:11 am | टवाळ कार्टा

=))
जास्त बसू नको...बाक गरम होईल :D

किसन शिंदे's picture

22 Jun 2016 - 7:52 pm | किसन शिंदे

असं दावाया पायजे हुतं खरं, पर नाय दावलं मंजुळंन, म्हनूनतर यवडी चरचा झालीना सैराटवर. असो. लय झ्याक जम्लंय हे बी

ग्रामीण भाषा खूप छान जमली आहे. लेख आवडला

ग्रामीण भाषा खूप छान जमली आहे. लेख आवडला

भाग्यश्री कुलकर्णी's picture

22 Jun 2016 - 10:32 pm | भाग्यश्री कुलकर्णी

मस्त. आवडला हा भाग पण.

बोका-ए-आझम's picture

23 Jun 2016 - 11:39 am | बोका-ए-आझम

एवढ्या लवकर मानसिकता बदलणं थोडं कठीणच आहे. बापाने पुरुषावर मात केलेली आवडेल पण दुर्दैवाने बरेच वेळा पुरुष बापावर मात करतो.

स्वप्नात राहायला चांगलं लिखाण आहे.

विशाखा राऊत's picture

23 Jun 2016 - 6:41 pm | विशाखा राऊत

चांगला शेवट

चांगलं लिहिलंय रे रातराणी ;)

NiluMP's picture

23 Jun 2016 - 10:01 pm | NiluMP

झकास

रातराणी's picture

24 Jun 2016 - 12:08 am | रातराणी

सगळ्यांना खूप खूप धन्यवाद :)

अनाहूत's picture

24 Jun 2016 - 3:03 pm | अनाहूत

खरच खूप छान लिहिल आहे

विदिश सोमण's picture

24 Jun 2016 - 6:03 pm | विदिश सोमण

हा आहे खरा पोरीचा बाप.
अभी दादांनी रंगवलेला बाप पण तगडा आहे पण त्यात तात्या जास्त आणि बाप कमी आहे. पक्का राजकारणी, स्वतःची प्रतिष्ठा आणि घराण्याची अब्रू जपणारा आणि त्याचा माज असलेला (कदाचित खरा पाटील असाच असेल. मी काय प्रत्यक्ष पहिला नाही बॉ)
अजून 20-25 वर्षांनी माझा पोरींनी अस काही केल तर मी आधी तिला विचारेन की तिनी असा का केल, त्यातले पॉसिटीव्ह नेगेटिव्ह समजावून सांगेन. तरी तिला तिच्या निर्णयावर चालायचे असेल तर शुभेच्छा देऊन निघून येईन. नजर ठेवेन जमेल आणि पटेल तशी मदत करेन. काय नाही जमलं तर संबंध तोंडेन पण जीव घेण्याचा विचारही करणार नाही आणि कोणी केला तर त्याला सोडणार नाही. (हे आपल माझा मत आहे. माझी (गावच्या) पाटलाशी कुठलीही बरोबरी शक्य नाही)
दोन्ही आवृत्ती आवडल्या पण रातराणी ताईंची जास्त भावली.

एक मुलीचा बाप