मुर्ती पुजा आणि सगुण पुजे बाबत बरीच उलट-सुलट चर्चा होत असते. भारतात मुर्ती पुजा केली तर जाते पण तत्त्वज्ञानाच्या बाजूला अद्वैतींचे प्राबल्य असल्यामुळे का काय मुर्ती पुजा आणि सगुण पुजेची बाजुने सहसा परंपरेचा हवाला दिला जातो तर्कसुसंगत मांडणी मात्र कमी दिसते, या धागा लेखात मुर्तीपुजेचे स्वॉट अॅनालिसीस म्हणजे सामर्थ्य, दुर्बलता, संधी, जोखीम
आणि 'वैशिष्ट्य, ऊपयोग, लाभ' ; शंका निरसन अशा प्रकारे मांडणी करण्याचा प्रयत्न आहे.
सामर्थ्य
१.१) निव्वळ प्रेरणा घेण्यासाठी,
देवघर शेवटी एक आदर्शांचा कृतज्ञता आणि श्रद्धायुक्त अल्बम असते का ?
(देवघरात नव्या श्रद्धांचे नवे देव जोडल्यास ? लोक तसे न ठरवताही करतच असतात, सांस्कृतिक समस्येचे निदान होत असेल तर ठरवून नवे अल्बम बनवून घेण्यास काय हरकत असावी. )
१.२) प्रेरणा स्रोत म्हणून बर्याचदा व्यक्ति पूजेचे स्तोम माजवले जाते आणि त्यांच्या शब्दांची -पुस्तकांची पूजा बांधली जाते प्रत्यक्षात काळ बदलतो तसे नव्या परिस्थितीनुसार व्यक्ति-शब्द-पुस्तक पूजेची मंडळी तेवढीशी बदलत नाहीत आणि त्या व्यक्तीचे जुन्याकाळात उपयूक्त मत नव्या काळातही तसेच लावून धरण्याचा आग्रह धरतात. म्हणजे व्यक्ति पूजा आणि शब्द पूजा करु नका म्हणणार्या व्यक्तिंची सुद्धा सातत्याने पूजा काळ बदलल्याचे लक्षात न घेता केली जाते. मुर्तीपूजा हा त्यावर चांगला उतारा आहे की ज्यामुळे त्या व्यक्ति पासून प्रेरणा घेण्याचा मार्ग चालू राहतो पण शब्दपुजेची गरज कमी होते.
१.३) समाजातील विवीध व्यक्ती पूजकांचे समुहघटक मुर्तीपुजेतून सहभागी करुन घेऊन समुहांची भावनिक गरज पूर्ण होते.
१.४) काही वेळा व्यक्ती पूजकांना रचनात्मक आणि सकारात्मक असे काही जमत नाही, किमान काही विध्वंसक अथवा नकारात्म्क गोष्टीत त्यांनी लक्ष घालण्यापेक्षा मुर्तीपूजा बरी पडते.
१.५) नकोशी होणारी व्यक्तीपूजा अथवा शब्दपूजा लादली गेली तर इतरांच्या समाधानापुरता मुर्तीस नमस्कार करता येतो भावना सांभाळून घेता येतात आणि व्यक्ती आणि शब्द पूजेकडे कानाडोळा केल्यास जमून जाते.
१.६) अगदी परस्पर विरोधी आचार-विचारांच्या हुतात्मे, प्रतिकांनाही एका रांगेत बसवून भजता येते प्रत्येकातली आपल्याला आवडलेल्या चांगल्या चांगल्या गोष्टी पासून प्रेरणा घेता येते.
२) व्यक्तिस्वांतंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, फ्रिडम टू कन्सायन्स, यातील सर्वाधिक मोठा स्पेकट्रम मिळतो
३) संस्कृती आणि परंपरांच्या संवर्धनास मुर्तीपूजा अनुकूल राहतात,
४) कलात्मकतेचे संवर्धन, उत्तेजन आणि जोपासना होते
५) मुर्तीपूजा अमूर्त स्वरुपात सुद्धा शक्य होते जसे की पादूका पुजा,
६) ईश्वर असल्यास त्याने केव्हा कुठे आणि कशात असावे या बद्दलचे इश्वराचे स्वातंत्र्य अबाधित रहाते.
७) सोबत कुणी असल्या प्रमाणे भक्ती साहाय्यक
८) सोबत कुणी असल्या प्रमाणे संवाद साधता येतो
९) सोबत कुणी असल्यास सुरक्षीततेची भावना येते तशी भावना बाळगण्यात साहाय्य होऊ शकते. द्विधा मनस्थिती टाळून जोखीम स्विकारणे सुलभ होते.
७) पावित्र्य मांगल्याची पूर्तीची भावना, मानसिक समाधान आणि उत्साह
८) आदर्शाप्रती आदर व्यक्त करणे
९) उत्सव, संबंधीत व्यवसाय वृद्धींगत होणे, पर्यटन
हा लेख एकाच बैठकीत लिहून होण्याची शक्यता कमी आहे तेव्हा टप्प्या टप्प्याने वाढवला जाईल. लेख्नन चालू
*दुर्बलता, मर्यादा आणि जोखीम
१) यातील विश्वास बर्याचदा मिथकाधारीत असतात मिथकांचा आधार नसल्यास अथवा मिथके अपील न झाल्यास विश्वास कमी असू शकतो
२) मिथकांवर अंधविश्वास ठेवल्यामुळे व्यक्ती पुजेचे काही दोष जसे की मिथक अथवा मुर्ती विषयाच्या दुसर्या बाजू बघायला तयार न होणे , इतर तर्क खुल्या मनाने न अभ्यासणे, संकुचितता
३) व्यवहार्य, तर्कसुसंगत, विज्ञानसुसंगत तोडगे शोधणे आणि वापरण्या एवजी कर्मकांडांचा आधार घेणे
४) कर्मकांडात गुंतून जाणे त्यामुळे रचनात्मक समाज कार्यातील सहभाग कमी पडणे
५) एखादी समस्या समजून घेण्यासाठी श्रोताभिमुखते एवजी कर्मकांड स्विकारणे, ज्यांची समस्या समजून घेतली गेली नाही ते प्रतिक पुजा आणि कर्मकांडावर राग काढू शकतात.
६) काही व्यक्ति समुह अथवा समाज घटकांना सामावून न घेता, दूर ठेवण्याचे प्रयत्न समानतेच्या तत्वाचे उल्लंघन केल्यामुळे नाराजी निर्माण होते.
७) साधन संपत्तीच्या अप्रस्तुत वापराची उदाहरणे जसे की सोने जड जवाहीरांचा वापर, दुधाने न्हाऊ घालणे
८) प्रचितीवाद, नवसाला पावणे, बळी परंपरा इत्त्यादी अघोरी अंधश्रद्धा, इत्यादीचा वस्तुतः केवळ प्रतिक पुजेशी संबंध असण्याचे कारण नाही प्रतिक पुजा न करणारे निर्गुण उपासक ही इश्वराला आवाहने करतच असतात चमत्कारांवर विश्वास ठेवतात पण त्यातील अवैज्ञानिकतेचे खापर मुर्तीपुजकांच्या माथी फोडले जाण्याची परंपरा अधिक दिसते. प्रचितीवाद हि इश्वराच्या निर्गुण आणि सगुण पुजेसंबंधी अनेक नकोशा अंधश्रद्धांना कारणीभूत असला तरीही या पुजा प्रचितीवादामुळेच अधिक जोम धरत असाव्यात.
९) मुर्ती भंजकांसोबतचे परस्पर संघर्ष आणि छळाच्या साशंकता असलेले संबंध
***
* मंदिर या शब्दाची व्युत्पत्ती काय आहे ?
* संत एकनाथांचा प्रतिमा आणि मुर्ती पुजन विषयक दृष्टीकोण
* सगुण ब्राह्मण तत्वमिमांसा -
* https://en.wikipedia.org/wiki/Agama_(Hinduism)
* श्रद्धेचे प्रयोजन आणि उपयोजन ?
.
.
* https://www.quora.com/Is-idol-worship-a-part-of-Hinduism-that-is-prescri...
प्रतिक्रिया
7 Mar 2016 - 2:09 pm | आनन्दा
विवेकानंदांच्या प्रवचनात कुठेतरी वाचल्याचे स्मरते, सामान्य माणूस आपल्या मर्यादांमुळे निराकारावर ध्यान करू शकत नाही.. त्याला ध्यान करणे सोपे जावे म्हनून विविध प्रतिके वापरात आली, त्यामुळे मार्ग जरी वेगळे असले तरी देखील अंतिम साध्य त्या मूर्तीच्या पलिकडे जाण्याचेच असते.
29 Mar 2016 - 9:29 pm | सतिश गावडे
"देव नाही" असं सांगणार्या एका धर्मात ते तसं सांगणार्या धर्म-संस्थापकाच्या मूर्तीचीच पूजा केली जाऊ लागली.
29 Mar 2016 - 10:10 pm | मितभाषी
शोकांतिका आहे. काही लोकांनी त्यांना विष्णूचा अवतार डिक्लेअर केले. =))
29 Mar 2016 - 10:12 pm | मितभाषी
त्यांना विष्णूचा अवतार डिक्लेअर का केले असावे ?
29 Mar 2016 - 10:18 pm | आनन्दा
हिंदू धर्म त्यांना आपलासा वाटावा म्हणून, असे ऐकून आहे. हिंदूंनी असे बरेच देव आपलेसे केले आहेत असे म्हणतात.
खखो ते देवच जाणोत.
29 Mar 2016 - 10:29 pm | मितभाषी
जो आख्खं आयुष्य हिन्दू धर्मातील कर्मकांड, बुवाबाजी, अवडंबर इ. विरोधात बोलत राहिला. अशा पाखंडी धर्माला न माणण्याचे आदेश शिष्यांना दिले. त्यांना हिन्दू धर्म आपलासा वाटावा म्हणून.......
व्वा काय लाॅजिक आहे =))
7 Mar 2016 - 2:12 pm | प्रकाश घाटपांडे
मानला तर देव नाही तर दगड हे सश्रद्ध मूर्तिपूजक जाणत असतो. निर्गुण निराकार ईश्वर हा मेंदुला कल्पायला अवघड जात असावा त्यामुळे त्याचे सगुण साकार रुप निर्माण झाले.प्रतिक ही मानवी मेंदुच्या गरजेतून निर्माण झाली. राजमुद्रा, राष्ट्रगीत राष्ट्रध्वज लोगो ही काय आहेत शेवटी प्रतिकच आहेत.तिरंगी झेंडा हा तीन रंगात असलेले मध्ये एक चक्राची आकृती असलेले कापड आहे असे त्याचे वस्तुस्थिती दर्शक वर्णन करता येतील.पण त्याच्या शी निगडीत असलेया भावनेच काय? एक बुद्धीप्रामाण्यवादी उदार राजा असतो. तो अनेकांना दरबारात बोलवून विविध विषयांवर चर्चा वाद संवाद करीत असे. एकदा एक साधु आला. त्याचे आदरातिथ्य राजाने केले. नंतर राजाने त्याच्याशी मुर्ती हा देव नसून एक दगड आहे असा वाद घातला. साधुने राजाची एक तसबीर मागवली. त्या तसबीरीवर नंतर तो थुंकला. राजाला राग आला पण त्याने नम्रपणे विचारले," महाराज मी आपले आदरातिथ्य केले. पण आपण मात्र माझा अनादर केलात." साधु म्हणाला." नाही मी तसबीरीवर थुंकलो राजावर नाही. तसबीर ही केवळ एक वस्तू आहे."
अशा आशयाची बोधकथा आपण वाचतो.प्रतिक या गोष्टीच महत्व सांगणारी ती कथा आहे. केवळ बुद्धीने विचार करुन चालत नाही तर व्यकीच्या भावनिक ही काही गरजा असतात. म्हणुनच ईक्यू देखील महत्वाचा आहे.
29 Mar 2016 - 7:22 am | किचेन
हा विवेकानंद व खेतडिचे महाराज यांच्यामधला संवाद आहे.
29 Mar 2016 - 10:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
घाटपांडे साहेब, इतक्या वर्षापासून मी जालावर आपलं लेखन पाहतो.
आपला प्रवास हा नास्तिकतेकडून आस्तिकतेकडे चालला आहे, असे मत नोंदवू इच्छितो.
-दिलीप बिरुटे
29 Mar 2016 - 9:44 pm | विकास
आपला प्रवास हा नास्तिकतेकडून आस्तिकतेकडे चालला आहे, असे मत नोंदवू इच्छितो.
प्रकाशरावांच्या पहील्याच वाक्यात, "मानला तर देव नाही तर दगड हे सश्रद्ध मूर्तिपूजक जाणत असतो", त्यांनी भुमिका स्पष्ट केली आहे असे वाटते. त्यात आस्तिक नास्तिकतेचा प्रश्न नाही. पण दुसर्यास (केवळ "श्रद्धेच्या अस्तित्वामुळे") कमी न लेखता देखील सुधारक होता येते हे त्यांनी कायमच दाखवले आहे आणि ते कायमच स्वागतार्ह राहीले आहे.
मी प्रकाशरावांच्या बाबतीत बोलू शकत नाही, त्यांचे तेच सांगू शकतील. पण इंग्रजीत एक believer(अस्तिक) atheist (नास्तिक) यांच्या बरोबरच agnostic (अज्ञेयवादी) हा शब्द आहे. आपण अज्ञेय हा शब्द जास्त वापरत नाही. पण येथे सध्या अनेकजण स्वत:ला agnostic म्हणतात - अर्थात "ईश्वर वा मरणोत्तर आयुष्य याविषयी ज्ञान होणे शक्य नाही असे मानणारी व्यक्ती". थोडक्यात पाय जमिनीवर ठेवून वागणारी व्यक्ती.. :)
29 Mar 2016 - 10:51 pm | तर्राट जोकर
+१००
30 Mar 2016 - 12:37 pm | अभ्या..
विकासदादा, ज्ञान होणे शक्य नाही म्हणजे आखून घेतलेली मर्यादा की असे काही ज्ञान अस्तित्वातच नाही?
किंबहुना देव वगैरे न मानता अशा प्रकारच्या ज्ञानाची प्राप्ती व्हावी अशी आस धरणार्याला काय म्हणता येईल?
30 Mar 2016 - 12:48 pm | अमृता_जोशी
+१
अल्बर्ट आइनस्टायीन हेहि agnostic होते.
30 Mar 2016 - 10:11 am | प्रकाश घाटपांडे
धन्यवाद.म्हणजे मी योग्य मार्गावर आहे. नास्तिकांना मी अस्तिकते कडे झुकणारा वाटतो तर अस्तिकांना नास्तिकते कडे. खाली विकास यांनी माझी भूमिका बरोबर मांडली आहे
7 Mar 2016 - 2:15 pm | राजेंद्र मेहेंदळे
विद्वान लोकांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत...
अवांतर--कसे काय बुवा ईतके विविध विषय सुचतात लोकांना
7 Mar 2016 - 2:30 pm | तर्राट जोकर
जे मूर्तिपूजा करतात अशा सर्वसामान्य लोकांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.
29 Mar 2016 - 9:41 am | अत्रे
म्हणजे? कंफ्युझिंग वाक्य आहे.
29 Mar 2016 - 9:47 am | भाऊंचे भाऊ
त्याला धर्म, नाम, रूप, प्रथा, परंपरा यामधे बंदिस्त राखणे मला जड जात सबब आपला पास.
मूर्ती म्हटले की प्राणप्रतिष्ठा वगैरे उपचार शास्त्राने वा श्रध्देने करताना बरेचदा मुळ गोष्ट हरवून जायचा धोका असतो लोक ही प्रतिके काय निर्देश करतात तिकडे दुर्लक्ष करून प्रतिकानाच सत्य मानायचा धोका उत्पन्न होतो त्यामुळे काही विशेष साधनाविधी सोडले तर मी मूर्तिपुजेला प्रोत्साहन देत नाही. अर्थात ज्याचा त्याचा आनुभव वा मार्ग वेग्ळा
29 Mar 2016 - 11:09 am | झेन
अजून एक मर्यादा समाजात जाणवते की आम्हाला आमचा उध्दार करायला कुणीतरी हवा असतो, कुठलातरी देव /बाबा यांची भागीदारी असो नाहीतर सिनेस्टार किंवा राजकारण्यांचे फॅसिनेशन. याला सामाजिक-अर्थिक स्तर , शिक्षण यानेही फरक पडत नाही. दूसऱ्या कशामधे/कुणामधे देव मानला की आपण डोळे बंद ठेवायला मोकळे
29 Mar 2016 - 12:42 pm | भाऊंचे भाऊ
जाउदे तो विचारच नको त्यापेक्षा किमान जन्मानंतरच्या घटनावर कितपत नियंत्रण आहे ? आशा प्रश्नाचा विचार केला की विश्वाचा हां पसारा आपल्या एकट्याच्या नियन्त्रणात नाही ही जाणिव बालपनीच दृढ़ होते मोठेपणी शिंग फुटल्यावर उन्मादात भलेही काही क्षण याचा विसर पडेलही पण काळ आपोआप वास्तव समोर आणतोच... मग अशातुन मी नाही तर दुसरं कोण तरी जो किमान माझ्यापेक्षातरी सॉलिड बलवान आहे त्याला शरणागत होंण ही भावना नैसर्गिकच. इट्स आर्ट ऑफ़ सरवायविंग.... तसे नसते तर ईश्वराला शक्तिमान/संरक्षक/दुष्टांचा खात्मा करणारा (अधून मधून) का म्हटले असते ? कारण इट्स आर्ट ऑफ़ सरवायविंग..... तसाही उठ्सुथ इश्वर दुश्तांचा खात्मा खरेच करत असता तर तो मंदिरात न्हवे सुशिन्च्या कथात अथवा इतिहासाच्या पुस्तकात दीसला नसता काय ?
29 Mar 2016 - 9:39 pm | सतिश गावडे
प्रतिसाद आवडला.
मात्र माझ्यापेक्षा सॉलिड बलवान कुणीतरी आहे त्याला मी ईश्वर न म्हणता निसर्गनियम म्हणतो. आणि हे निसर्गनियम स्थळ-काळ-व्यक्ती निरपेक्ष असतात. कुणी अनन्यभावाने त्यांना शरण गेला काय किंवा शिव्या घातल्या काय, त्यांना काही फरक पडत नाही.
30 Mar 2016 - 10:02 am | भाऊंचे भाऊ
नियम म्हटले की त्याचा करता करविता निर्माण होतो अन फक्त गुणधर्म म्हटले तर त्या वर कर्त्याचा प्रभाव आपण स्वताच गाजवून तो 100% मेन्युपुलेट करु शकतो. अन ही गोष्ट तुम्हाला/इतरांना सिध्द /मान्यआहे असे साकृत दोर्शनी वाटत नाही.. परिणामी आपली " निसर्ग नियम " ही एक पुरेशी समाधानकारक संकल्पना उरत नाही वेन इट कम्स टु आर्ट आफ सर्वायविंग.
30 Mar 2016 - 10:09 am | सतिश गावडे
म्हणजे अस्तित्व टीकवण्यासाठी स्वतःच कुणा सर्वशक्तीमान ईश्वराची कल्पना करायची आणि तिच्यावर आपला भार सोपवून स्वस्थ राहायचे असे म्हणायचे आहे का तुम्हाला?
की सर्वशक्तीमान ईश्वराची कल्पना करायची आवश्यकता नाही. तो आहेच असं म्हणायचे आहे का तुम्हाला?
30 Mar 2016 - 10:37 am | भाऊंचे भाऊ
आपण आपला भार इतरांवर मग तो इश्वर का असेना फक्त हतबल झालेल असताना सोपवू शकतो म्हणून असा जोर ती परिस्थिति निर्माण होत नाही तो पर्यंत मी तुम्ही अथवा कोणीच स्वतावर लादू शकत नाही. त्यामुळे मी कोठलेही मार्गदर्शन करण्यास पात्र नाही पण तुम्हला माझे वाक्यातुन शंका काढायच्याच असतील तर हो इश्वाराचे अस्तित्व मानून जगा हांच माझा तुम्हाला निसंधिग्द सल्ला आहे पण त्यासोबतच त्याच्यावर भार न सोपवता स्वस्थ रहा हां सुध्दा आपणास प्रामाणिक सल्ला आहे.
कसय ईश्वरला प्रेमळ कर्तव्यद्क्ष बापाप्रमाने समजा तो आहे व त्याची कामे कर्तव्य योग्यपणे पार पाडत आहे अन जरुरी नाही की तुम्ही त्याच्यावर अवलंबून असालच.... अन दुर्दैवाने ती वेळ आलीच तर तो जबाबदारी पासून मागे हटनारा नाही
30 Mar 2016 - 7:19 pm | ह.भ.प. मोरघोडे
अप्रतिम बोलताय भाऊ.
स्वतंत्र लेखन करण्याची क्षमता असूनही आपण आजपर्यंत तिकडे दुर्लक्ष का केलेय हे कळत नाही.
30 Mar 2016 - 10:19 am | प्रकाश घाटपांडे
मनाचे व्यवस्थापन - संजय पंडित एक चांगले पुस्तक आहे
http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5442982671766201761?BookNa...
30 Mar 2016 - 10:23 am | सतिश गावडे
हे पुस्तक अप्रतिम आहे. मात्र जाडजुड ठोकळा आहे आणि एकाग्र चित्ताने आणि संयम ठेवून वाचावे लागते.
29 Mar 2016 - 11:23 am | कंजूस
समाजातल्या स्पेशल लोकांनी केलेली , प्रतिष्ठा चिकटवलेली एक लबाडी आहे.
29 Mar 2016 - 1:16 pm | चौथा कोनाडा
मुर्तीपुजा ही वैयक्यिक पातळीवर ( कदाचित) आत्मिक फायद्याची गोष्ट आहे आणि सामाजिक पातळीवर ( बरयाच वेळा) कलेक्टिव्ह बिझनेस/एमएलएम मार्केटिंगची गोष्ट आहे.
या विधानावर जाणकार प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत.
29 Mar 2016 - 9:33 pm | सतिश गावडे
मुर्तीपुजा ही सामाजिक पातळीवर ध्वनी प्रदुषण आणि अस्वच्छता आहे असेही एक निरीक्षण नोंदवतो.
29 Mar 2016 - 9:45 pm | विकास
न देवो विद्यते काष्ठे
न पाषाणे न मृण्मये।
भावेषु विद्यते देवः
तस्मात् भावो हि कारणम्॥
(गरुड़पुराण, उत्तर. ३/१०)
29 Mar 2016 - 10:57 pm | मितभाषी
विकास राव आम्हाला ही देवांची भाषा कळत नाही.
30 Mar 2016 - 12:48 am | विकास
सोप्या मराठीत: भाव तेथे देव!
देव लाकडात(चा) नाही की दगडात(चा) नाही की मातीत(चा)नाही. देव हा श्रद्धेत अथवा भावात असतो...
माडगुळकरांच्या भाषेतः देव देव्हार्यात नाही, देव नाही देवालयी, देव चोरून नेईल, अशी कोणाची पुण्याई
तुकारामाच्या भाषेतः "आहे ऐसा देव वदवावी वाणी| नाही ऐसा मनी ओळखावा||" आणि अर्थातच,
" जेकां रंजले गांजले । त्यांशीं म्हणे जो आपुले ।।
तोची साधू ओळखावा । देव तेथेची जाणावा ।।"
30 Mar 2016 - 9:31 am | सतिश गावडे
असं असूनही भारतातील काही श्रीमंत मंदिरांच्या दानपेटया ओसंडून का बरे वाहत असाव्यात? :)
30 Mar 2016 - 9:51 am | sagarpdy
१. कळतंय पण वळत नाही.
२. फ्याशन व अनुकरण
३. बव्लतपणा
30 Mar 2016 - 10:17 am | भाऊंचे भाऊ
काही मंद बुध्दिवंत तर लोक मंदिराचे परिणामी देवाचे रक्षण स्वता करतात हां काय विरोधाभास खरे तर उलटे व्हायला पाहिजे म्हणून खिल्ली उडवतात... प्रॉब्लम हां आहे की मंदिरे म्हणजे देव नसून ती लोकांची उपासना घरे आहेत. निट वाचा लोकांची इष्ट देवतेबाबतचि उपासना घरे. तिथे लोक उपासना, साधना करतात देव न्हवे म्हणुन त्याचे जतन हे लोकांचे कर्तव्य ठरते इश्वाराचे नाही कारण उपासना थांबली म्हणून इश्वर मरत नाही....
आणि हो श्रीमंत मंदिराच्या दानपेट्या श्रध्देच्या प्रकटीकरणामुळे ओसंडून वाहात आहेत श्रध्देच्या प्रबलीकरणामुळे न्हवे....
तसेही पहिला विठ्ठल दिसला मग अभंग सुरु झाले, पहिली नाथपंथी दीक्षा झाली समाधि अवस्था सिध्द केली मग ज्ञानेश्वरी लिहली... उलटे घडले नाही म्हणून कोणी अभंग गाउन ज्ञानेश्वरी पारायणातुन अध्यात्म, भाव, श्रध्दा यांना फ़ळ येइल या भ्रमात असेल तर तो उलट विचार करतो आहे मुखाने जेवत नाही असेच म्हणावे लागेल
30 Mar 2016 - 7:15 pm | ह.भ.प. मोरघोडे
+1
झकास प्रतिसाद...
30 Mar 2016 - 11:32 am | अत्रे
मला आस्तिक / नास्तिक "असणे" यात फार काही प्रॅक्टीकॅली फरक आहे असे वाटत नाही।
आयुष्यात असे फार कमी क्षण येत असावेत जेव्हा की आपल्याला देव आहे / नाही यावर विचार करावा लागतो। इतर वेळी आपल्याला देव असल्याची/आठवण होते का हे बघायला पाहिजे।
30 Mar 2016 - 11:35 am | अत्रे
सॉरी, चुकीचा धागा। हे त्या मनोविकार वाल्या धाग्यात टाकायचं होतं।
30 Mar 2016 - 12:29 pm | अर्धवटराव
चीन उपग्रह पाडायचे तंत्रज्ञान डेव्हलप करतोय, युरोप अपारंपारीक ऊर्जा क्षेत्र काबीज करतोय, इस्रायल पाण्याच्या प्रत्येक थेंबातुन मोती पिकवतोय, सर्व जग काहिसं जागृत, काहिसं अर्धवट झोपेत २१व्या शतकात आपलं घोडं पुढे दामटायला बघतय... आणि आपल्याला अजुनही मूर्तीपूजेच्या अॅनॅलिसीसची गरज भासतेय...
स्वतःच्या मनगटातलं बळ ओळखलं तर दगडातून नरसींह देखील प्रकटतो, अन्यथा शिवलींगांना विहीरी, तलावाच्या तळाचा आश्रय घ्यावा लागतो. हेच स्वॅट अनॅलिसीस.
30 Mar 2016 - 2:27 pm | विकास
चांगला प्रतिसाद!
30 Mar 2016 - 9:35 pm | मितभाषी
+२
30 Mar 2016 - 9:29 pm | विकास
प्रा. शेषराव मोरे यांचा आजच्या (३० मार्च २०१६) च्या लोकसत्तेतील लेख वाचनीय आहे...
भारतीय सांस्कृतिक ऐक्याचे पहिले सूत्र - अनेकेश्वरवादी एकेश्वरवाद भारतीय संस्कृतीच्या ऐक्याचे पहिले सूत्र होय.
31 Mar 2016 - 11:29 am | माहितगार
सांस्कृतीक एकात्मता बाळगतानाच विवीधतेचे अधिकतम स्वातंत्र्याचा लाभ व्यक्ति आणि समुहांना आपापल्या निवडीच्या प्रतिक पुजनातून घेता येतो असे म्हणता येईल का ?
अवांतर:
प्रा. शेषराव मोरे यांनी धागा लेखाच्या शेवटी बुद्धिवादी, नास्तिक व अधार्मिक असल्याचे नोंदवले आहे. नास्तीक मंडळींचे हिंदू धर्मीयांना योगदान मिळत राहीले असताना ते हिंदू धर्मीयांकडून अॅकनॉलेज केले जाताना दिसत नाही हे खेदजनक असावे.असो
दुव्यासाठी आभार
30 Mar 2016 - 9:35 pm | होबासराव
ह्या दोहोंचा 'सामर्थ्य' शेक्शन मध्ये उल्लेख न केल्या बद्दल णिशेध :)
31 Mar 2016 - 11:17 am | माहितगार
वैशिष्ट्य, ऊपयोग, लाभ या स्वरुपात तुम्ही प्रतिक पुजनाचे कोणते वैशिष्ट्य मांडू इच्छिता त्याचा उपयोग कसा केला जातो आणि लाभार्थीला काय लाभ पोहोचतो असे इस्कटून सांगीतल्यास बरे पडेल.
धागा लेखाचा उद्देश अगदी विरोधकांनाही पटू शकेल अथवा त्यांचे शंका निरसनकरता येईल अशी प्रतिक पुजकांच्या बाजूने तर्कसुसंगत आणि केवळ तर्क सुसंगत मांडणी करणे असा आहे.
20 Jun 2019 - 12:01 am | जॉनविक्क
म्हणजेच STRENGTH, WEAKNESS, OPPORTUNITIES, THREATS.
आपण विषय अजून व्यवस्थित सॉर्ट करणे अपेक्षित होते असो.
माझ्या कुवतीनुसार
STRENGTH - रिलेटिव्ह म्हणता येईल म्हणजे कोणाला खूप मिळेल कोणाला मिळणार नाही. देव प्रसन्न होईलही कदाचित अथवा स्पिरिचुअल बाब सोडली तरी सामाजिक, आर्थिक, राजकीय ध्रुवीकरणाची अफाट क्षमता यात आहे हे नक्की. Big power comes with big responsibility.
WEAKNESS- रिलेटिव्ह म्हणता येईल म्हणजे कोणी वीक होईल(जॉन न्हवे) कोणी होणार नाही, साकल्याने विचार करायची क्षमता नष्ट होणे, स्वकर्तृत्वावर विश्वास कमी होणे, अहंकार वाढणे, नैराश्य येणे. चटकन भावना दुखावल्या जाणे. सामाजिक समानता दृढ करायला हे तत्त्वज्ञान कमकुवत असणे. विसंगत विचारप्रवाह आणि वैविध्यामुळे मुळातच आचरणाबाबत एकवाक्यता नसणे. या गोष्टी तत्वज्ञानाच्या कमकुवत बाबी ठरू शकतात.
OPPORTUNITIES- :) हे ही रिलेटिव्हच. अमेरिकी स्वप्ना प्रमाणे भारतीय स्वप्न असा ही एक प्रकार अघोषित पण ठळकपणे अस्तित्वात आहे आणि तो पूर्ण करायची फार मोठी संधी हे तत्वज्ञान उपलब्ध करते.
THREATS- अर्थात हे एकमेव तत्वज्ञान भारतीय स्वप्न साकार करायची संधी देते असे अजिबात नाही, किंबहूना काळाच्या ओघात हे कितपत टिकू शकते हाच मोठा प्रश्न आहे.
हे ईश्वरी कर्तृत्व आहे की मानवी मनाच्या भावनिक गरजेतून याची उत्पत्ती आहे याचा तर्कशुद्ध पुरावा कुठेच नाही.
आपण 1 किलोमीटर म्हणजे एक किलोमीटर प्रमाण हे नक्कीच जसे वय, लिंग, जात,धर्म, प्रांत यांचा भेद भेदून नेमकं स्थिर युनिट म्हणून वापरू शकतो तसे जेनेरिक व सर्व मनुष्याना समान प्रमाण अनूभव हे तत्वज्ञान देत नाही तसेच शांततेच्या शोधतील सर्वच विचारप्रवाह मूर्तीपूजेचा स्वीकार करत नाहीत.
विशेषतः मूर्तिपूजेचे प्राबल्य वाढण्यापूर्वी त्याच्या नादी न लागता भारतीय स्वप्न प्रत्यक्ष स्वकष्टाने सत्य करणारे तत्वज्ञान विना सांम, दाम, दंड, भेद भारत आणि भारत बाहेर प्रचंड विस्तारले ज्याचा बिमोड वादविवाद कौशल्याने सुरू झाला तरी विना सांम, दाम, दंड, भेद मूर्तिपूजेचे तत्वज्ञान चिरकाल टिकेल अथवा फोफावताना अनुभवास येत नाही. हे या तत्वज्ञाना समोरील प्रमुख धोके वाटतात.
23 Aug 2019 - 12:24 pm | राघव
हे ईश्वरी कर्तृत्व आहे की मानवी मनाच्या भावनिक गरजेतून याची उत्पत्ती आहे याचा तर्कशुद्ध पुरावा कुठेच नाही.
तर्कशुद्ध पुरावा. फार महत्त्व आहे या तर्कशुद्ध शब्दाला. :-)
या तर्कशुद्ध कारणमिमांसेसाठी काही प्रश्न -
- हा पुरावा देण्याचा अधिकार, तुम्ही ग्राह्य धराल असा, कोणाचा?
- कोणत्या स्वरूपातला पुरावा तुम्ही तार्कीक दृष्ट्या ग्राह्य धरणार?
या प्रश्नाला काही संदर्भ लागेल, तर तो असा - ईश्वर अनादी, अनंत, तर्काच्या पलिकडे आणि पुन्हा सगुण, साकार, अनुभव घेण्यायोग्य असा आपल्याकडे सर्व संत सांगून गेलेत.
- ग्राह्य धरण्याजोगा पुरावा मिळाल्यावर आपण त्याची मिमांसा कशी करणार?
- सर्व प्राणीमात्रांना ईश्वराचा अनुभव समानच हवा हा अट्टाहास का आणि कशासाठी?
असो. मी काही फार अनुभवी व्यक्ती नाही. त्यामुळे या विषयात खोलात जाऊन काहीही सांगण्यास खरंतर मी असमर्थ आहे.
फक्त तर्कशुद्ध चर्चेसाठी पाया मजबूत असावा या दृष्टीकोनातून हे काही प्रश्न घालून दिलेत. :-)
राघव
23 Aug 2019 - 12:51 pm | जॉनविक्क
फार महत्व आहे अधिकार या शब्दाला.
कारण हा विषयच असा आहे की अधिकार देणारा असून फार काही फरक पड़तच नाही, तर समजून घेणारा अधिकारी असावा लागतो. आणि जर तो अधिकार तुमच्यकडे नसेल तर समजून देणाऱ्या अधिकार्या व्यक्तीचे हक्काने तीन तेरा त्यांचे अनुयायिच वाजवनार यात शंका नाही.
मग सांगा आपण यात कुठे आहात ?
23 Aug 2019 - 12:54 pm | जॉनविक्क
आपण अधिकाराने समजून देणारे आहात की घेणारे हे स्पष्ट झाले तर चर्चा सुलभ होईल
23 Aug 2019 - 1:19 pm | राघव
ते तर मी आधीच सांगीतलेले आहे, की मी काहीही सांगण्याच्या लायक नाही म्हणून.
फक्त चर्चा तार्कीक आधारावर करायची असल्यास हे प्रश्न फार महत्त्वाचे आहेत हे मी स्वानुभवानं सांगू शकतो आणि त्यांना जरूर संदर्भात वापरावेत, येवढ्याचसाठी इथं दिलेत. बाकी मी पामर. :-)
24 Aug 2019 - 11:42 am | जॉनविक्क
पण चर्चा अमुक व्हावी तमुक असावी हे सांगायला मात्र सगळे पात्र असतात (मीसुध्दा) :)
20 Jun 2019 - 2:21 pm | nishapari
भगवद्गीता हे प्रत्यक्ष श्रीकृष्णाने सांगितलेलं ज्ञान आहे असं आस्तिक श्रद्धाळूंंना सांगून पहा ... " हो , हो आहेच की " चटकन मान्य करतील . पण भगवद्गीता थोडीशी तरी आचरणात आणणारे जाऊच द्या वाचलेलेही कितीतरी कमी सापडतील .. एकतर त्यात जो उपदेश केलेला आहे तो डोक्यावरून जाणारा वाटतो ... आणि अनेक गोष्टी ज्या साध्या सोप्या सांगितल्या आहेत त्या पटत नाहीत .... म्हणजे वरवर पटल्या तरी कोणी स्वीकारू पाहत नाही ....
गीतेतल्या एका श्लोकात श्रीकृष्णाने म्हटलं आहे , विधी ज्यांना बनवायचे त्यांनी बनवलेत ... मी विधीअनुसार पूजा करणाऱ्यांची पूजाही स्वीकारतो पण मी हे बघत नाही की विधी बरोबर करत आहे की नाही मी त्यामागची भावना बघतो ... https://youtu.be/_4dUUdF46sg
दुसऱ्या एका श्लोकात म्हटलं आहे , ज्यांना निर्गुण निराकार पूजा शक्य नसते , जे मला जवळ पाहू इच्छितात ते माझी मूर्तीरुपात पूजा करतात ... निर्गुण रूपाची अथवा सगुण रूपाची पूजा , मी फक्त भक्ताचा भाव बघतो ....
https://youtu.be/JehJQ5o9tSQ
एका ठिकाणी मला आसक्तीरहीत , संपूर्ण समर्पण असलेली भक्ती हवी असते असं म्हटलं आहे .... हे बहुतेकांच्या पचनी पडत नाही ... अध्यात्मिक उन्नतीसाठी भक्ती करणारे थोडे असतात ... बहुतेक आस्तिक हे आपलं सगळं मार्गी लागावं / सगळं सुखवस्तू राहावं , आपलं कुटुंब सुखात सुरक्षित राहावं किंवा काही ना काही अपेक्षा मनात धरून भक्ती करत असतात... मग पूजेचे विधी केल्यावर किंवा ठराविक दिवशी उपास / देवळात जाऊन पूजा वगैरे केल्यावर त्यांना भक्ती केल्यासारखी वाटते ... म्हणजे ती भक्ती नसते असं म्हणायचं नाही पण ते ते विधी केल्यावरच त्यांच्या मनाला समाधान मिळतं ... जे काही मागू इच्छित नाहीत , जे नुसते देवाचे आभार मानायला पूजा करतात त्यातही " जी कृपा केली आहेस ती तशीच असू दे , काही वाईटसाईट घडू देऊ नकोस " असा हेतू असतोच .... आणि सगळं ठीकठाक ठेवलं आहे / सगळं ठीकठाक करू शकेल अशी शक्ती असणारी व्यक्ती म्हणून देवाबद्दल प्रेम / भीती .... एरवी देवाला जाणून घ्यावं किंवा देवाला आवडतील असे गुण प्रेम , अहिंसा , दया वगैरे आपल्या अंगी जर नसतील तर ते निर्माण करण्याचा प्रयत्न करावा अशी कोणाची इच्छा नसते ... शॉर्टकट भक्ती हवी असते .. पूजा केल्यावर ते समाधान मिळतं ... देवाने सांगितलं आहे प्रत्येक जीवात मी आहे असं समजून चला तरी भिकाऱ्याला देण्यासाठी चिल्लर शोधणार खिशात आणि देवळात गेल्यावर 11 , 51 , 101 आपापल्या ऐपतीप्रमाणे पैसे दानपेटीत टाकणार ... वडापावच्या दुकानासमोर तिथे बेंचवर बसून खाणाऱ्या लोकांच्या तोंडाकडे आशाळभूत नजरेने 2 कुत्रे उभे असताना लोक इवला इवला पावाचा तुकडा भिरकावताना पाहिले आहेत , 2 रुपयाचे 4 पाव घेऊन त्यांना घालावेत असं कुणालाही वाटत नव्हतं . पण देवळात गेल्यावर किंवा घरी पूजेला नारळ , उदबत्ती , फुलं बाकीचा खर्च करायला मागे पुढे बघत नाहीत .. नास्तिकांचं ठीक आहे , देवाच्या अस्तित्वावर त्यांचा विश्वासच नाही ... पण आस्तिक जेव्हा जिवंत प्राणी आणि लोकांपेक्षा दगडाच्या मूर्तीवर जास्त खर्च करतात तेव्हा त्यांची भक्ती ही भक्ती आहे की नाही हे देवच ठरवेल , असेलही नसेलही मला माहित नाही ... पण ती स्वार्थापोटी किंवा भीतीपोटी उपजलेली असते असं माझं तरी मत आहे ....
20 Jun 2019 - 9:27 pm | जॉनविक्क
म्हणून मी ते जास्त अनुसरायचा प्रयत्नच करू शकत नाही :(
अथवा मलाच ते समजले नसावं. कोणीही जाणकार मला या अंधारातून बाहेर काढेल तर मी उपकृत होईन...
माझ्या दृष्टीने एक विरोधाभासी तत्वज्ञान गीतेमध्ये आहे आणि मला आश्चर्य वाटते की कोणीच कसे यावर कधी भाष्य केले नाही... ते म्हणजे कर्माचा सिध्दांत ज्यामुळे आपला (पुन्हा पुन्हा) जन्म आहे. आपले आत्ताचे अस्तित्व आहे.
साक्षात श्रीकृष्णाने सांगितलेला हा सिद्धांत असे म्हणतो की जो पर्यंत जीवाचे पूर्वसंचित संपत नाही मला (जीवाला) त्याचे भोग भोगायला पुन्हा पुन्हा जन्म घेणे आवश्यक आहे.
एकही क्षण एकही व्यक्ती यातून मुक्त नाही, किंबहुना आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक बऱ्यावाईट घटना या आपल्या मागील जन्माचे न्हवे तर मागच्या अनेक जन्मातील आपल्याच कर्माचे फळ आहे.
चांगल्याचे चांगले व वाईट कर्माचे वाईट फळ. पण ते भोगायला पुन्हा पुन्हा जन्म घेणे आवश्यक आहे. जोपर्यंत हे कर्मफळ शून्य होत नाही या चक्रातून मुक्ती नाही. म्हणूनच निष्कामतेने कार्यरत राहणे हे कर्मफलापासून सुटका करण्याचे अमोघ अस्त्र आहे. वगैरे वगैरे...
हेच कारण आहे की सर्वशक्तिमान ईश्वराचे फक्त एकदा नाव घेऊन आपण कायमचं मुक्त होत नाही, कारण आपले प्रारब्ध भोग अजून बाकी आहेत आणि त्यातून सुटकेसाठी सतत उपासना, नामसमरण, भजन, कीर्तन वगैरे मार्गाने ते (चांगले व वाईट कर्मफळ) कमी कमी करत राहिले पाहीजे जोपर्यंत जीवाला मोक्ष, मुक्ती मिळत नाही.
माझा प्रोब्लम हा आहे की कर्माचा हा सिद्धांत कितीही तर्कशुद्ध भासला तरी प्रत्यक्षात तो लागू करता येणे या विश्वात ब्राम्हदेवालाही शक्य नाही, कारण ज्याक्षणी कर्मफल शुन्य त्याच क्षणी मुक्ती हे याचे ब्राम्हवाक्य(कृष्णवाक्य म्हणू) आहे.
म्हणजेच हा कर्माचा सिद्धांत जिवाच्या दुसऱ्या जन्मापासूनच लागू होऊ शकतो पण पहिल्या नाही कारण त्यापूर्वी जीवाचे कोणतेही कर्मच अस्तित्वात न्हवते तर मुळात जन्म झालाच कसा ? बरे झाला ते झाला त्याच्या वाट्याला त्वरित मोक्ष, जीवन्मुक्तवस्था, मृत्यू न येता आयुष्य भोगणे आलेच कसे ? जर कर्मफल शुन्य होते तर ?
आणि जर हे कर्मफळ शून्य असूनही या संसाराचे चक्रात मी अजूनही आहे तर आता उपासना, आचरण वगैरे वगैरे करून जेंव्हा हे फळ शून्य होईल तेंव्हा माझ्या मुक्तीची काय हमी ?
थोडक्यात उद्या GST लागु करता येईल नोटबंदि लागू करता येईल पण ज्या क्षणी कर्मसिध्दांत जीवाला लागू होईल त्याक्षणी पूर्व कर्मच अस्तित्वात नसल्याने तो मुक्त होणार नाही काय ? म्हणजे जर कर्म सिध्दांत सत्य आहे तर भौतिक जीव अस्तित्वातच येणे अशक्य नाही का ?
जो प्रश्न मी उपस्थित केला तो गीतेत नक्कीच अर्जुनाने उपस्थित केला नाही, अथवा ज्ञानेश्वरांसारखे संत गीता अनुभवूनही या प्रश्नांवर काही मौलिक भाष्य करत नाहीत म्हणून जाणकारांच्या शोधत मी सदैव असतो काय माहीत कोण कोणत्या स्वरूपात भेटून यावर प्रकाश टाकेल...
23 Aug 2019 - 2:42 am | गामा पैलवान
जॉनविक्क,
बाप स्त्रीसंग करतांना दिसला नाही तर तो आपला बापच नव्हे. अशा प्रकारचा तुमचा आक्षेप आहे.
आ.न.,
-गा.पै.
23 Aug 2019 - 3:27 am | जॉनविक्क
ज्याने संग केलाच नाही त्याला बाप म्हणायची घाई झाल्याप्रमाणे तुमचे विधान आहे
24 Aug 2019 - 11:20 am | गामा पैलवान
जॉनविक्क,
म्हणूनंच आईला विचारायचं असतं की माझा बाप कोण ते. ती सांगेल त्यावर विश्वास ठेवायचा असतो.
वेद व सद्गुरू आईसारखे असतात, हे जगन्मान्य आहे!
आ. न.,
गा.पै.
24 Aug 2019 - 11:34 am | जॉनविक्क
काय केले कर्ण जन्मल्यावर ? आई म्हणजे देव न्हवे.
सदगुरु म्हणजे श्रीकृष्ण न्हवे की त्यांना विचारलेल्या शंका त्यांना उत्तरता येतील. जिथे साक्षात श्रीकृष्ण विरोधाभासी बोलतो आणि यच्चावत सदगुरु यावर मुग गिळुन बसतात तिथे अध्यात्मिक उन्नत्ति न्हवे तर बोलके पोपट तयार करायची व्यवस्था तयार झलिय असे अनुभवाला येत असेल त्याला चूक म्हणनारे तुम्ही कोण ? काय अधिकार (सॉरी औकात असे ऐकावे) आपली ?
24 Aug 2019 - 12:41 pm | माहितगार
@ जॉनविक्क, कोणत्याही अध्यात्मिकांकडे पक्षी धार्मिकांकडे सर्व प्रश्नांची उत्तरे असतात ह्या गृहितकातच मला गफलत वाटते. आपण म्हटल्या प्रमाणे सर्वत्र परंपरेने पढवलेल्या पोपटांचा भरणा असतो. अर्थात अपवादात्मक प्रमाणात का होईना सर्वच विषयांवर मतांतर आणि शास्त्रार्थाचीही परंपराही आहेच.
या निमीत्ताने आई समजूत आणि वास्तव या माझ्या चर्चा धाग्याची जाहीरात करून घेतो. अर्थात 'आई' या पात्राच्या बर्याच मर्यादा परिस्थिती आणि समाजाने लादलेल्या असण्याचीही मोठी शक्यता असू शकते. तसे महाभारताचा काल्पनिक भाग किती या विषयीच्या चर्चा धाग्याची जाहीरात करण्याचाही या निमीत्ताने योग येतोय. काल्पनिक कि खरे काहिही असो, कर्णाला त्यागण्याची वेळ यावी यात दोष कुंतीचा किती आणि स्त्रीच्या मानवी नैसर्गीकतेला स्विकारण्यास असमर्थ ठरणार्या संकुचित सामाजिक मानसिकतेचा किती ? हा ही अनुषंगिक प्रश्न शिल्लक रहातो असे वाटते.
24 Aug 2019 - 12:47 pm | जॉनविक्क
नेमके याच गोष्टीवर तर मला बोट ठेवायचं आहे, आणि समस्त आध्यात्मिकाना/धर्मिकाना त्यांच्या SWOT ची जाणीव निर्माण वा प्रगल्भ व्हावी याची दिशा सापडावी हाच तर हेतू आहे.
24 Aug 2019 - 1:22 pm | गामा पैलवान
मी धार्मिक आहे. पण मी उत्तरं विचारायला गुरूंकडे जात नाही. कारण की मी बुद्धिमान आहे. माझी उत्तरं मीच मिळवतो. मी प्रगल्भ आहे का?
आ. न.,
गा. पै.
24 Aug 2019 - 2:04 pm | जॉनविक्क
24 Aug 2019 - 1:15 pm | गामा पैलवान
जॉनविक्क,
सद्गुरू शोधायची तळमळ मुळातून असायला हवी. भूकंच नसेल तर अन्नशोधन ज्ञानाचा काय फायदा?
आ. न.,
गा. पै.
24 Aug 2019 - 2:05 pm | जॉनविक्क
तळमळ असावी लागते. कष्ट घ्यावे लागतात. आणि मनाची कवाडे उघडी ठेवावी लागतात
23 Aug 2019 - 10:53 am | रविकिरण फडके
पाषाणाचा केला विष्णू
परी पाषाण नोहे विष्णू ।
विष्णुपूजा विष्णूसी अर्पे
पाषाण राही पाषाणरूपे ।।
23 Aug 2019 - 11:23 am | माहितगार
धागा लेखच्या उद्देश्यास अनुसरून खूप चांगली चर्चा व प्रश्न उपस्थित केलेत त्यांबद्दल प्रथम अनेक आभार.
कर्म सिद्धांताचा पुर्ण आवाका ह्या धागा चर्चेतुन कव्हर होईल का या बाबत साशंक आहे तरी माझे व्यक्तिगत मत थोडक्यात मांडायचे झाल्यास; 'मागच्या जन्माची (अ)कर्माची शिक्षा या जन्मात दिली जाते' हे तत्वज्ञान त्या जन्माची (अ)कर्माची शिक्षा त्याच जन्मात दिली जाण्यात सृष्टी/सृटीकर्ता/ किंवा स्वतः कर्मफल तत्वज्ञान अपयशी का ठरते? याचे समाधानकारक उत्तर देताना दिसत नाही त्याही पेक्षा महत्वाचे मागच्या जन्माच्या (अ)कर्म अपयशाची जबाबदारी म्हणून किंवा पालकांना मोक्ष मिळण्यासाठी म्हणून या जन्मी वेठबिगारीचा दृष्टीकोण मला न प्टणारा आहेच. शिक्षा, सक्ती यांनी परीपूर्ण तत्वज्ञान खरी भक्ती निर्माण करु शकते का - शुद्ध भक्ती विरहीत मुर्तीपुजेचा काय उपयोग या बद्दल साशंकता वाटणे स्वाभाविक असावे संबंधीत प्रश्न नीशापरींच्या प्रतिसादातून येऊन गेलेच आहेत .
अर्थात कर्म सिद्धांत = मुर्तीपुजा -असे जॉनविक्क यांनाही म्हणाव्याचे नक्कीच नसणार- कर्म सिद्धांताचा आवाका कुठेही पोहोचवता येऊ शकतो शिवाय पुर्नजन्म वजा केलेला केवळ पुस्तकी धोरणानुसार जगण्याचा कर्मसिद्धांत पाप-पुण्य, ईश्वराने माफ न केलेल्या पापांसाठी कायमच्या नर्काची धमकी बरी की पुर्नजन्मात दु:ख भोगण्याची धमकी बरी ? नास्तीकांच्या दृष्तीने हि फसवी दुविधा आहे कोणतीही आदर्श सृष्टी धमक्यांच्या बळावर चालवणे आदर्श कसे असू शकते हा तात्विक प्रश्न वेगळ्या धागा चर्चेस अधिक उपयूक्त असावा?
धागा लेख उद्दीष्टास अनुलक्षून सर्व मुर्तीपुजा कर्म सिद्धांतासाठी होतात असेही नसावे हे नमुद करुन ठेवणे सयुक्तिक असावे.
नीशापरी
आपला प्रतिसाद आवडला, तौलनीक दृष्ट्या आगम आणि तंत्र मार्गीयांच्या मुर्ती पुजा ही अधिक आसक्ती प्रधान असावी, व्रत वैकल्य ही आगम आणि तंत्र मार्गीय तसेच कर्म सिद्धांतातील आसक्ती प्रधानताही असू शकते. आसक्ती या जन्मातील फळासाठी असो स्वर्गासाठी असो वा मोक्षासाठी आसक्ती युक्त भक्ती भक्ती ठरु शकत नाही म्हणून कर्मासाठी कर्मयोग अशा प्रकारचे काही तत्वज्ञान पुढे येते पण तो या धागा चर्चेचा विषय नाही. अद्वैतीतत्वज्ञान आणि आसक्ती विहीन कर्मयोग च्या भारवलेल्या संत एकनाथांसारख्या संतमंडळींनी वेळोवेळी मुर्तीपुजा आणि व्रत वैकल्यांच्या कर्मकांडाच्या मर्यादांकडे लक्ष वेधण्याचे काम केले नाही असे नाही. बहुधा मानवी मनाची असुरक्षीतता आणि अनुभूतीवादामुळे मुर्तीपुजेतील आसक्तीयुक्त कर्मकांड चालू रहाताना दिसले तरी भारतीय तवज्ञानाची मुख्य विचारधारा षड्रीपुंपासून मुक्तीचा मुख्य आदर्श देणारी आहे. (त्यासाठी मोक्षाचे गाजर आणि पुर्नजन्माचा दंडुका किती उपयूक्त हा दुसर्या चर्चेचा विषय असावा)
मला इथे एक अनुषंगिक मुद्दा हा मांडायचा आहे की आसक्ती युक्त भक्ती ही मुर्तीपुजा विरहीत भक्तीचे -धर्म मार्गांचे सुद्धा वैशिष्ट्य असू शकते ती केवळ मुर्तीपुजेस मर्यादीत नाही म्हणून मुर्तीपुजेतील आसक्तीयुक्त भक्ती, कर्मकांड आणि अंधश्रधांवरही टिका अवश्य करावीच पण आसक्तीयुक्त भक्ती, कर्मकांड आणि अंधश्रद्धा या गोष्टी मुर्तीपुजकांपर्यंत मर्यादीत नाहीत त्यामुळे आसक्तीयुक्त भक्ती, कर्मकांड आणि अंधश्रद्धा हि कारणे देऊन मुर्तीपुजकांविद्रुद्ध द्वेषकारणही होऊ नये या सामाजिक कलहास कारणीभूत महत्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधावेसे वाटते.
दुसरा मुद्दा अंधश्रद्धेतून होणार्या आर्थिक अपव्ययाचा आहे तो मान्यही आहे -त्यासाठीही मुर्तीपुजकांवर अवश्य टिकाकरावी-पण हा मुद्दाही केवळ मुर्तीपुजकांवरील टिकेपर्यंत मर्यादीत नाही , मुर्तीपुजारहीत धार्मीक अनुयायात आणि संस्थात अंधश्रद्धा, कर्मकांड जसे दिसून येते तसे आर्थिक अपव्ययाची मुबलक उदाहरणे दिसून येतात. या मुद्द्यांवरुन टिकाकरताना मुर्तीपुजकांना वेगळे पाडून नये टिका सर्वांवर सारखी करण्यावर भर असावा असे वाटते.
जॉनविक्कांचे स्वॉट अॅनालिसीस
मी वर नीशापरींच्या प्रतिसादास म्हटल्या प्रमाणे जॉनविक्कांचे स्वॉट अॅनालिसीस उत्तमच आहे पण ते केवळ मुर्तीपुजेस लागू होते असे नाही तर मुर्तीपुजा विरहीत धार्मीक तत्वज्ञानांन आणि व्यवहारांनाही जवळपास लागू होत असावे असे वाटते.
23 Aug 2019 - 12:29 pm | राघव
कर्म सिद्धांत नीट समजून घ्यायचा असेल तर हे पुस्तक वाचायला हरकत नसावी -
https://www.bookganga.com/eBooks/Books/details/5572190415884661345?BookN...(Marathi)
23 Aug 2019 - 1:09 pm | माहितगार
कर्मसिद्धांताचा विसृत विचार या धागा चर्चेच्या कक्षेत येत नाही. तरीही अनुषंगिक माहितीसाठी आभार
23 Aug 2019 - 1:23 pm | राघव
खरंय, पण तुम्हीच वरील प्रतिसादात कर्मसिद्धांतावर टिप्पणी केलीत, त्यावरून असे वाटले की कर्मसिद्धांतावर मूलभूत प्रश्न असून त्यांची उत्तरे आपण शोधलीत आणि ती सापडली नाहीत. म्हणूनच इथे धागा दिला. पुस्तक खरंच टीका म्हणून उपयुक्त आहे हे सांगू इच्छितो.
23 Aug 2019 - 1:44 pm | जॉनविक्क
तुम्हाला समजला असेल विषय तर इतर रेफरेन्स ची गरज नाही. जे गणित मी शिकलो ते माझे झाले. मग भलेही ते आत्मसात करणारा मी पहिला नसेन. म्हणून तो माझा सिध्दांत/शोध गणला जाणार नसेलही. पण जे मला प्राप्त झाले ते माझे ज्ञान होय आणि त्यावर शंका समाधानास मी समर्थ आहे इतपत विश्वास नसेल तर चर्चेत पडायला अजुन अवकाश आहे असे मी मानतो.
बाकी गोंदवलेकर महाराज दृष्टांत देऊन लेखन करवीणाऱ्या एका व्यक्तीला मी गीतेमधील कर्मसिध्दांत मला विरोधाभासी का स्पष्ट होतो हे वरील प्रमानेच स्पष्ट करून नामस्मरनाचा गीतेच्या अनुषंगाने आध्यात्मिक पाया ठिसुळच न्हवे तर अस्तित्वहीन आहे म्हटल्यावर तो व्यक्ति अवाक होऊन काही मिनिटे ब्लेंक झाला होता.
थोड़े भानावर आल्यावर तो इतकेच म्हटला की तुमचा प्रश्न अतिशय नेमका आहे, तुम्हाला भेटून मला अतिशय आंनद होतोय, बघू महाराज काय उत्तर देतात ते तुमच्या प्रश्नाना. तुम्हाला मी लवकरच निश्चित कळवेन.
पुढे त्या व्यक्तिने त्यांचे काही आध्यात्मिक लिखाण पुस्तक स्वरुपात प्रकाशीत केले ज्याच्या प्रकाशन समारंभास मला अतिशय प्रेमाने व आवर्जून निमंत्रण दिले. पण अजूनही शंकासमाधान ते करू शकले नाहीत.
असाच अनुभव इस्कॉनमधूनही आला. तिथल्या ज्या ज्या डीवोटी सोबत मी प्रत्यक्ष चर्चा केली ते आजही माझ्याशी वैयक्तिक संपर्क ठेऊन आहेत. विविध कार्यक्रमाचे फोन करून आमंत्रणही देतात अथवा अमुक अधिकारी व्यक्ति शहरात आली आहे तुझा प्रोब्लेम त्यांना सांग भेट घालून देतो म्हणतात पण मी दाखवलेला विरोधाभास अजूनही कोणास खोडता आला नाही. :(
पण हे लोक मला अजूनही आवडतात मी यांच्यातच रमतोही, कारण मी शंका उपस्थित केल्यानन्तर ते माझ्या बापाबद्दलच्या प्रश्नाने न्हवे तर सगल्यांच्या बापाच्या बापाच्या बापाच्या(इनफिनिटी पकड़ा) बापाच्या बापाने म्हणजेच आकाशातल्या बापाने जमीनीवर येऊन असे विरोधाभासी तत्वज्ञान कसे रचले या प्रश्नाने अचंबित झाले आहेत :(
असो यावर सेपरेट धागा काढावा चर्चा वाढवायची असेल तर. कारण हा धागा मूर्तिपूजे संदर्भात आहे आणि आपण त्यावर आधिच विषयांतर केले आहे.
इत्यालम.
23 Aug 2019 - 1:01 pm | Rajesh188
जास्त खोल न जाता वर वर जरी विचार केला तरी सर्वच धर्मात मूर्ती पूजा होते .
मूर्ती म्हणजे ईश्वराचे प्रतीक अशी मूर्तीची व्याख्या केली की खूप प्रश्न न पडता एकच प्रश्न उरतो ख्रिस्त धर्मात येशू आणि मेरी ही ईश्वराची प्रतीक आहेत आणि त्यांची मूर्ती सुधा असते .
मुस्लिम धर्मात मक्केत जे काही आहे ते ईश्वराचे प्रतीक च आहे आणि 786, हा आकडा सुधा ईश्वराचा प्रतीक च आहे म्हणजे मूर्तीच.
बौध्द धर्मात गौतम बोद्ध ह्यांच्या घरोघरी फोटो आहेत आणि त्याची पूजा .
तसेच जैन,shikhपारशी सर्व धर्मात प्रतीके आहेत .
असा एक ही धर्म नाही जो मूर्ती पूजा करत नाही
23 Aug 2019 - 1:06 pm | माहितगार
व्यक्तिगत पातळीवर सर्वच प्रकारची प्रतीकपूजा टाळणार्या व्यक्ती असू शकतात.
23 Aug 2019 - 1:45 pm | Rajesh188
सर्व धातू घन स्वरूपात असतात आणि पारा फक्त द्रव स्वरूपात असतो असे वर्णन करता येईल त्या प्रकारच्या लोकांसाठी .
पाणी धातू हा शब्द घन स्वरूप च दर्शवतो द्रव स्वरूप नाही
23 Aug 2019 - 1:28 pm | Rajesh188
सर्व जगात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात देव ही संकल्पना आहे .
प्राचीन हस्त लिखित आहे,चित्र स्वरूपात पुरावे आहे .
रचना आहेत
त्या मुळे देव नाकारणे ही गोष्ट सहज पचनी पडणारी नाही .
आपण आताच्या काळातील उदाहरण घेवूया .
चंद्रा वर माणूस जावून आला आहे .
त्या चंद्राचे वातावरण विज्ञान चा वापर करून राहण्या योग्य कधी तरी माणूस करेल .
पृथ्वी वरून सर्व प्राणी ,वनस्पती तिथे घेवून गेल्यावर आणि ते तिथे स्थिर झाल्यावर .पृथ्वी नष्ट झाली काही कारणांनी तर चंद्रा वर वाढणारी मानव जात जी प्राथमिक अवस्थेत असेल ती त्यांचे बाप कोणाला मानतील .
पुरावे तर देवू शकणार नाहीत पृथ्वीचं नष्ट झाल्यावर पुरावे कुठे मिळणार.
अशीच घटना पृथ्वी वर सुद्धा होवून गेली असेल अशी शक्यता नाकारता येत नाही .
23 Aug 2019 - 2:28 pm | माहितगार
या धागा चर्चेत नास्तीकांना मज्जाव नाही त्यांच्या टिकेचे स्वागतच आहे पण नास्तीकता अथवा इश्वराचे अस्तीत्व या धागा चर्चेचा अनुषंगिक असेल पण मुख्य विषय नाही.
मुर्तीपुजेसाठी पावित्र्य गृहीत धरणे पुरेसे ठरते, त्यात ईश्वर अस्तीत्व असणे अत्यावश्यक बाब नाही.