अलीशिया - भाग ३

पिवळा डांबिस's picture
पिवळा डांबिस in जनातलं, मनातलं
9 Jan 2009 - 9:01 am

(पूर्वसूत्रः "आय लाईक यू", माझ्या पाठीवर जोरदार थाप मारत अलीशिया उद्गारली, "वुई आर गोईंग टू बी व्हेरी गुड फ्रेंन्डस!!!"
तिची बत्तिशी अगदी पुरेपूर खरी ठरली होती.....)

जसजसे दिवस जात चालले तसतशी मला तिच्याबद्दल अधिकाधिक माहिती होत होती. काही तिच्याकडून पण बरीचशी माझ्या बाकीच्या सहध्यायांकडून.....

अलीशिया गर्भश्रीमंत होती. तिचे वडील हे पेशाने जवाहिरे होते. त्यांचा व्यापार फक्त अमेरिकेतच नव्हे तर बँकॉ़क, हाँगकाँग, ऍन्टवर्प असा जगभर पसरला होता. जगभर फिरती चालायची त्यांची! भारतातही त्यांचे क्लायंट्स होते म्हणे! सुरतेतल्या खड्यांना पैलू पाडणार्‍या कारागिरांशीही त्यांचे कॉन्टॅक्टस होते....
तिची आई तिच्या लहानपणीच वारली होती. ती प्रसिद्ध बिडनहार्न कुटुंबाच्या वंशजांपैकी होती. हे कुटुंब म्हणजे ज्यांनी डेल्टा एअरलाईन्स आणि कोकाकोला सारख्या कंपन्या स्थापन करण्यात पुढाकार घेतला होता त्यापैकी....
त्यांचे या दोन्ही कंपन्यामध्ये ढीगभर शेअर्स होते. त्यातलेच काही (म्हणजे भरपूर!) अलीशियाच्या वाट्याला वंशपरंपरेने आलेले होते....

इतर बर्‍यापैकी सधन असलेल्या सुंदर मुली कॉलेजात रोज वेगवेगळे ड्रेसेस घालून जातात. पण अलीशिया मात्र रोज निरनिराळे दागिने घालून यायची. एकदा घातलेला दागिना पुन्हा रिपीट नसायचा! इतर मुलींचा नुसता जळफळाट व्हायचा!!! आता मात्र पहिल्या दिवशी तिच्या कानातले डूल हे खर्‍या हिर्‍यांचेच होते याविषयी माझ्या मनात काही संदेह उरला नव्हता...

आर्थिकदृष्ट्या सुसंपन्न अलीशियाचं कौटुंबिक जीवन मात्र फारसं सुखावह नव्हतं. तिच्या बापाने हिची आई वारल्यावर दुसरं लग्न केलं होतं. ती सावत्र आई हिला फारसं नीट वागवत नव्हती.....

"यू वोन्ट बिलीव्ह", अलीशिया मला एकदा म्हणाली होती, "अदर चिल्र्डेन क्राय व्हेन दे आर सेन्ट टू द बोर्डिंग स्कूल! आय वॉज सो हॅपी!!!!"
"व्हाय?"
"आय वॉज जस्ट फेड अप विथ माय स्टेप-मदर्स ऍट्रोसिटीज!!"
"डिड युवर फादर लाईक युवर गोईंग टू द बोर्डिंग स्कूल?"
" नो ही डिडंन्ट! बट ही कुड्न्ट से एनिथिंग टू माय स्टेपमॉम!! पुअर गाय!!!!" तिला बापाविषयी राग असायच्या ऐवजी करूणाच होती....

पाचवीपासूनचं शिक्षण बोर्डिंग स्कूलमध्ये करून अलीशिया युनिव्हर्सिटीत गेली. भूगर्भशास्त्रात बॅचलर करून तिने प्रेशियस स्टोन्स हे स्पेशलायझेशन घेऊन मास्टर्स डिग्री मिळवलेली होती. आता आमच्याबरोबर एम्.बी.ए. करत होती.

'ही सगळी डॅडींची इच्छा!" मला एकदा म्हणाली होती, " मला खरं तर अक्वेस्टेरीयन सायन्समध्ये जायचं होतं!!"
"रियली?"
"हो, मला घोडे खूप आवडतात. मला घोडे पाळणं आणि अस्सल घोड्यांची पैदास करणं यात खुप इंटरेस्ट आहे"
"तुला काय बाई, सहज साध्य आहे ते! तू श्रीमंत आहेस! घेशील एखादं हॉर्स-रँन्च कुठेतरी"
"कुठेतरी घेशील नव्हे, मी टेनेसीमध्ये एक पाचशे एकरांचं रँच घेतलंही आहे. सध्या त्यावर केबिन (जंगलातील घर) बांधायचं काम सुरू आहे" तिने मला एक अर्धवट बांधकाम झालेल्या पण प्रशस्त आणि आलिशान केबिनचा फोटो काढून दाखवला...
"पण डॅडी म्हणतात हे घोडे वगैरे सगळं एक छंद म्हणून ठीक आहे, पण खरी करियर हवीच!!!"
"मग काय चुकलं? बरोबरच आहे तुझ्या डॅडींचं!"
"तुम्ही सगळे पुरुष म्हणजे एकदम हावरटच असता! असा कितीसा पैसा लागतो जगायला?"
"मला फारच कमी लागतो गं!", मी. "तुझा एक दागिना विकलास ना तरी माझं त्याच्यात वर्षानुवर्ष भागेल!!"
"यू आर सो सिली!!!", माझ्या डोक्यावर एक टप्पल मारत ती म्हणाली....

आमचं आमच्या प्रोजेक्टवर काम सुरूच होतं. आम्ही आम्हाला नकळतच निरनिराळे रोल घेतले होते. एका मुलीचं काम लायब्ररीत जाऊन माहिती गोळा करण्याचं. दुसरीचं ती माहिती वाचून त्यातली आम्हाला उपयुक्त असलेली माहीती बाजूला काढणं. माझं गणित (इतरांच्या मानाने) चांगलं असल्याने फायनान्शियल ऍनेलेसिस करण्याचं काम माझ्याकडे आलं. अलीशिया मला ग्रूपचा "स्पॉक" म्हणायची. अलीशियाची स्पेशालिटी म्हणजे मार्केटींग! तिच्या त्या सोनेरी डोचक्यातून अशा काही भन्नाट कल्पना निघायच्या की आम्ही आश्चर्यचकित होउन जायचो.....

शेवटी आमच्या प्रोजेक्ट प्रेझेन्टेशनचा दिवस येऊन ठेपला. मार्केटिंग मास्टर अलीशिया ही ग्रूपतर्फे प्रेझेन्ट करणार होती. तिला लागेल तो फिनान्शियल डेटा पुरवायचं काम माझ्याकडं होतं. मी तिच्या स्टेजच्या मागे एका खुर्चीवर बसलो होतो आणि तिला लागेल तशी महिती पुरवत होतो. दुसर्‍या एका पाच जणांच्या टीमला आमच्या प्रोजेक्टवर टीका करायचं काम होतं.....

त्या दिवशी अलीशिया एकदम नटून सजून आली होती. नेहमी ती शर्ट्-पँन्ट घालायची. आज मात्र ती सूट घालून आली होती, अगदी स्टॉकिंग्जसकट!!! काळ्या रंगाचा तो ड्रेस तिला अगदी खुलून दिसत होता. पेन्सिल स्कर्ट आणि लो कटच्या ब्लाऊजमध्ये तिचं सौंदर्य अगदी उजळून उठलं होतं. त्यातच तिचे ते दागिने...

"अलिशिया इज लुकिंग व्हेरी ब्यूटिफूल टुडे!!" मी कौतुकाने माझ्याबरोबरच्या मुलाला, जिमला, म्हणालो.
"येस! गॉडस डॅम्न क्रुयेल जोक!!!" तो तंद्रीत असल्यासारखा म्हणाला...
"व्हॉट? व्हाय डू यू से सो?" मी चमकून त्याच्याकडे पाहिलं....
"नथिंग! नेव्हर माईंड!!!" तो चपापला...

तितक्यात प्रेझेन्टेशन सुरु झालं. अलिशियाने मस्तच प्रेझेन्टेशन केलं. प्रतिस्पर्धी टीमच्या प्रश्नांनाही तिने सडेतोड उत्तरं दिली. तिला लागेल तो फिनान्शियल डेटा तिच्या पाठीमागे बसून मी पुरवत होतो. त्यावर झर्रकन एक नजर टाकून ती विचारलेल्या प्रश्नांचं व्यवस्थित खंडन करत होती. आमचं टीमवर्क मस्त जमून आलं होतं....

प्रेझेन्टेशन संपलं. सगळ्यांनी टाळ्या वाजवून आमच्या ग्रूपचं अभिनंदन केलं. प्रोफेसरांनीही आमच्या कामगिरीचं कौतुक केलं...
"वेल डन, अलीशिया!", मी तिचं अभिनंदन केलं...
"कुडंन्ट हॅव डन विदाऊट यू, मिस्टर स्पॉक!!", तिने सगळ्या वर्गासमोर माझा गालगुच्चा घेतला. आख्खा वर्ग हसला. आता उरलेल्या सेमेस्टरसाठी माझं नांव ठरलं होतं.....
"व्हॉट आर यू डुइंग टुनाईट?", अलीशियाने मला विचारलं
"नथिंग! आय विल बी इन माय अपार्टमेंट!!"
"फरगेट युवर रूम! आय वॉन्ट टू टेक यू आउट फॉर डिनर. यू हेल्प्ड मी अ लॉट टुडे ड्युरिंग द प्रेझेंन्टेशन"
"ओह! थँक यू!"
"बी रेडी बाय सिक्स ओ क्लॉक!! आय विल पिक यू अप!!" माझ्याकडे पाठ फिरवून अलीशिया चालत सुटली.

तिला पाठमोरं पहात रहाणं आज जास्तच सुखावह होतं! तिच्या पेन्सिल स्कर्ट्मुळे!!!!!!

चार-साडेचारच्या सुमाराला अलीशियाचा फोन आला....
"यू वोन्ट माईंन्ड इफ माय फ्रेंन्ड जॉईन्स अस फॉर डिनर, डू यू?", अलीशिया.
"आय ऍम फाईन विथ इट'

क्लिक...
फोन बंद झाला...

बरोबर सहा वाजता खाली पार्किंग लॉटमध्ये अलीशियाच्या गाडीचा हॉर्न वाजला. मी गाडीत बसल्यावर तिने फर्रर्रर्र आवाज करत गाडी रस्त्याला लावली....
"आपण कुठे जातोय जेवायला?" माझ्या पोटात शंका! आता कुठलं अमेरिकन फूड खायला लागतंय, देव जाणे!!!
"वी आर गोईंग फॉर ईतालियन फूड", चला, देव पावला, काय नाय तर तिथे पिझ्झा तरि खाता येईल!!!
"व्हेअर इज युवर फ्रेंन्ड?"
"शी विल जॉईन अस इन द रेस्टॉरंट!!"

गावाबाहेर असलेल्या एका महागड्या इटालियन हॉटेलापाशी गाडी थांबली. मी हे हॉटेल अनेकदा पाहून (अर्थातच बाहेरून!!!) त्याचं मनातल्या मनात कौतुक केलं होतं....
आत जाण्याचा प्रश्नच नव्हता! तिथल्या वेटरला माझ्यापेक्षा जास्त पैसे मिळत असावेत!!!

आम्हाला तिथल्या होस्टेसने स्थानापन्न केल्यावर विचारलं, "व्हॉट वुड यू लाईक टू ड्रिंक?"
"वॉटर", मी सांगितलं. अलीशिया खळखळून हसली....
"नॉट दॅट, डमी! शी इज आस्किन्ग अबाऊट द वाईन!!"

त्या विषयात आमचा सगळा आनंदीआनंदच होता. तोपर्यंत मी प्यायलेली वाईन म्हणजे आमच्या गोव्याची पोर्ट वाईन! ती हिथे मिळते का ते माहिती नव्हतं.....

शेवटी अलीशियानेच इटालियन कियान्टीची ऑर्डर दिली. आम्ही गप्पा मारत बसलो होतो. आता तिने लिंबाच्या पिवळ्या रंगाचा शर्ट घातला होता आणि काळ्या रंगाची पँट! केस मोकळे सोडले होते....

तितक्यात...

"हाय सेरा!", अलीशियाने हाक मारली....
ती मुलगी चटकन पाठीमागे वळून आमच्याकडे पाहू लागली. नजरेत ओळख पटून आमच्या टेबलापाशी येऊ लागली. मी तिच्याकडे थक्क होऊन पहात होतो.....
पाच फूट ऊंची, अलीशियासारखीच गोरी पान, पिवळे धम्मक सोनेरी केस पाठीपर्यंत आलेले, अतिशय पातळ आणि नाजूक बांधा आणि निळेभोर डोळे!!!! इतके गडद निळे डोळे मी त्यापूर्वी आणि त्यानंतरही कधी पाहिले नाहीयेत! प्रशान्त महासागराच्या खोल पाण्याप्रमाणे!! त्यात आपण सरळ बुडून मरावं अशी इच्छा आपल्या मनात उत्पन्न करणारे!!! एखादी मॉडेल किंवा चित्रतारका असावी अशी पर्सनॅलिटी!!!!

"आयला, या अलीशियाच्या मैत्रिणीपण तिच्यासारख्याच एकसे एक देखण्या दिसतायत!!", मी आपला मनातल्या मनात!!!!

सेरा आमच्या टेबलापाशी आली. अलीशियाने तिची माझ्याशी ओळख करून दिली. सेराने अमेरिकन पद्धतीप्रमाणे माझ्या गालाला गाल लावून मला विश केलं. मग अलीशियाच्या शेजारी बसून तिचं दीर्घ चुंबन घेतलं....

नंतर मला त्या मेजवानीतलं फारसं काही आठवत नाही....
कियान्टी वाईन मस्त होती, जेवणही झकास असावं.....

मला फक्त आठवतं ते एका प्रणयी युगुलाचं हितगुज! दोघी एकमेकींना चिकटून बसल्या होत्या, एकमेकींना वारंवार कवळत होत्या....
माझ्या नजरेसमोर लहानपणी गावी पाहिलेली उन्हांत खेळणारी दोन पिवळ्या धम्मक नागांची जोडी दिसत होती! एकमेकांना विळखा घातलेली!!!
इथे फरक फक्त इतकाच की या नागिणी होत्या! पण तशाच पिवळ्याधम्मक- सोनेरी केसांच्या!!!!!
सकाळी जिम ने काढलेल्या उद्गारांचा अर्थ मला आत्ता कळत होता!

अलीशिया लेस्बियन होती!!!!!!!!!

पुढ्ली सर्व संध्याकाळ मी गप्पच होतो. जेवण संपल्यावर सेरा निघून गेली. अलीशिया मला तिच्या गाडीतून माझ्या अपार्टमेंटपर्यंत सोडायला आली. गाडीतही आम्ही गप्प होतो. अर्धी वाट संपल्यानंतर अलीशियाच म्हणाली,
"सो हाऊ आर यू फिलींन्ग? आर यू शॉक्ड? आर यू ऍन्ग्री विथ मी?"
"ओह, सो मेनी क्वेश्चन्स, सो लिटल ब्रेन!!" मी हसून तिला चिडवलं. मला हसलेला पाहून ती ही हसली. मनावरचं खूप मोठं दडपण उतरल्यासारखी...
"सो, हाऊ ऍम आय फिलिंग?, आय ऍम ऑल राईट मॅडम! ऍम आय शॉक्ड? येस ऍब्सोल्यूटली!! मी ज्या देशातून आणि समाजातून आलोय तिथे गे कपल्स तर सोडाच पण स्ट्रेट कपल्सही असं पब्लिक प्लेसमध्ये एकमेकांना आवळत- चिवळत नाहीत. आम्ही त्या बाबतीत बरेच ऑर्थोडॉक्स आहोत. मी तुझ्यावर रागावलोय का? नाही! मला तुझा मुळीच राग आलेला नाही"
"मोस्ट मेन डू गेट ऍन्ग्री", ती मॅटर-ऑफ-फॅक्टली म्हणाली.
"लुक अलीशिया, यू आर माय फ्रेंन्ड! आय ट्रीट यू ऍज माय फ्रेंन्ड! तुझं सेक्स्चुअल ओरिएंटेशन काय आहे याला माझ्या दृष्टीने फारसं महत्त्व नाही. तुझ्या सौंदर्याचं मला जरूर कौतुक आहे पण तुझ्याविषयी मला अभिलाषा नाही. मला माझी स्वतःची फियान्सी भारतात आहे"
"रियली? यू आर एंगेज्ड? डू यू हॅव हर पिक्चर? शो मी! शो मी!!!!" अलीशिया चित्कारली. मी माझ्या पाकिटातून फोटो काढून दाखवला...
"ओ! शी इज व्हेरी प्रिटी!! व्हॉट डज शी डू?" मी सर्व माहिती पुरवली...
"डज शी लव्ह यू?", काय पण येडपट प्रश्न? पण तो विचारणारं डोकं अमेरिकन होतं ना!!!
"ते तूच तिला विचार! पुढल्या सेमेस्टरला इथे येणारे ती"
"रियली? दॅट वुड बी ग्रेट!" अलीशिया अतिशय आनंदाने म्हणाली, "यु नो, आय वॉज व्हेरी वरीड! आय वॉन्ट अस टू बी द बेस्ट फ्रेंन्डस! आय डिडंट वॉन्ट टू लूज यू ओव्हर धिस! बट बिईंग द फ्रेंन्ड आय डिडंन्ट वॉन्ट टू हाईड धिस फ्रॉम यू आयदर! फ्रेंन्डशिप मस्ट बी बेस्ड ऑन ट्रुथ ऍन्ड ओपननेस!!"
"आय ऍग्री!!" मी सहमत झालो.

त्यानंतर आमची मस्त मैत्री जमली. असंख्य विषयांवर आम्ही गप्पा मारल्या, चर्चा केल्या, कधीकधी भांडलोही!! वादावादीत कधी ती जिंकायची तर कधी मी!! एकदा असंच ती रिपब्लिकन असल्याचा उल्लेख झाला. मी आश्चर्य व्यक्त केलं.
"का? मी गे आहे म्हणून मी ऑटोमॅटिकली डेमोक्रॅट असलीच पाहिजे असं तुला वाटतं का?", अलीशिया
"तसं नाही पण गे लोकांच्या हक्कांबद्दल डेमोक्रॅटसच पाठिंबा देत आहेत ना, म्हणून मला वाटलं", मी.
"लुक, आय सपोर्ट स्मॉल बिझिनेस, आय लाईक स्मॉल गव्हर्नमेंट! आय डोन्ट लाईक लेबर युनियन्स, आय डोन्ट लाईक हाय टॅक्सेस! आय वॉन्ट द युएसए टू बी अ रिच, स्ट्राँन्ग ऍन्ड मायटी नेशन!! माय होल लाईफ, माय होल पर्सनॅलिटी, डजन्ट हॅव टू रिव्हॉल्व्ह अराऊंड माय बीइंग गे ऑर लेस्बियन! दॅट इस जस्ट वन पार्ट ऑफ माय लाईफ विच फ्रॅन्कली इज नन ऑफ द सोसायटीज बिझिनेस!!"
"आय ऍग्री!" मलाही ते पटलं.

त्यानंतर ती मला निरनिराळ्या ठिकाणी घेऊन जायची. ती, सेरा आणि मी गे बार मध्येसुद्धा जाऊन बसायचो. तिथे गेल्यागेल्याच अलीशिया डिक्लेअर करून टाकायची, "धिस इज माय फ्रेंन्ड! ही इज स्ट्रेट!" मग कोणीही माझ्याशी लगट वगैरे करत नसे. एका मित्राशी वागावं तसंच सर्वजण माझ्याशी अतिशय सभ्यपणे वागत असत. पुढेपुढे त्यांना माझी इतकी सवय झाली की कधी मी नसलो कि तेच अलीशियाला माझी खुशाली विचारत असत.
या मित्रमंडळींकडून मला या गे-लेस्बियन संबंधांबद्दल खूप माहिती मिळाली. माझे सर्व गैरसमज दूर झाले. दहा-वीस वर्षे सुरळीत चालू असलेल्या त्यांच्या रिलेशन्शिप्स पाहून माझा त्यांच्या उत्छ्रंखलतेबद्दलचा गैरसमज दूर झाला. केवळ लग्न करता न आल्यामुळे त्यातून निर्माण होणार्‍या भावनिक आणि व्यवहारिक अडचणी समजल्या. पुढे माझी प्रेयसी मला येऊन जॉईन झाल्यावर आम्ही चौघांनी गावात खूप धूडगूस घातला...

कॉलेजची दोन्-तीन वर्षे भुर्रकन उडून गेली.....

डिग्री मिळाल्यावर मी नोकरी निमित्त न्यूयॉर्कला मूव्ह झालो. अलीशिया तिच्या वडिलांबरोबर त्यांच्या बिझिनेसमध्ये काम करू लागली. सुरवातीला फोन, मग कधीतरी ग्रीटींग असे कॉन्टॅक्ट होते. नंतरच्या दहा-पंधरा वर्षात तेही कमीकमी होत गेले. गेले पाच वर्षे तर काहीच संपर्क नव्हता.....

आणि आज तिचा असा अकस्मात हक्काचा फोन! काय काम असेल बरं तिचं माझ्याकडे?

.........

.........

"वुई आर हियर, सर", ड्रायव्हरच्या शब्दांनी मी भानावर आलो....

मनाचा वेग काय जलद असतो! काही मिनिटांतच मी इतका फिरून आलो होतो....

हॉटेलच्या पोर्चमध्ये कार उभी होती. मी कारमधून खाली उतरलो. ड्रायव्हरचे आभार मानून मी वळलो तोवर त्याने माझी बॅग रिसेप्शन काऊंटरपाशी उभ्या असलेल्या एका तरूणीच्या हातात दिली आणि काही शीघ्र संभाषणही केलं. बहुदा मी कोण, काय, वगैरे सांगितलं असावं...

"वेलकम डॉ. ***! प्लीज बी सीटॅड हियर इन द फोरिये! मदाम विल बी हिअर इन अ फ्यू मिनिटस!!" इतक्या वर्षांमध्ये माझा जसा डॉक्टर झाला तशी अलीशियाची मदाम झाली होती....
"हाऊ वॉज द फ्लाईट?"
"व्हेरी कंफर्टेबल!" ती समजून उमजून हसली. कदाचित तिनंच ती चार्टर फ्लाईट बुक केली असेल...
"वुड यू लाईक समथिंग टू ड्रिंक व्हाईल यू वेट? अ ग्लास ऑफ वाईन परहॅप्स!!!"
"नो, जस्ट वॉटर वुड बी फाईन!!" मघाची प्लेनमधली शॅम्पेन अजून डोक्यात होती....

तिने दिलेल्या ग्लासातील पाणी हळूहळू सिप करत मी हातपाय ताणून बसलो होतो. इतक्यात,

"हे बडी! सो यू आर हियर ऍट लास्ट!!!" मागून हाक आली....

तोच चिरपरिचित आवाज.....

आणि तेच खळखळून हसणं.....

(क्रमशः)

अलीशिया - भाग १

अलीशिया - भाग २

साहित्यिकदेशांतर

प्रतिक्रिया

सुचेल तसं's picture

9 Jan 2009 - 9:11 am | सुचेल तसं

वा!!! छान चालू आहे... पुढचा भाग येऊ द्या आता लवकर..

Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

छोटा डॉन's picture

9 Jan 2009 - 9:14 am | छोटा डॉन

पहिल्या २ भागात संभाळलेला तोल व्यवस्थीत इथे पळ संभाळला आहे.
"आलीशिया" ही व्यक्तीरेखा ह्या भागात मस्त रंगवली गेली. पुढील भागाची उत्कंठा वाढ्वण्यासाठी "अचुक ठिकाणी" क्रमशः टाकले आहे.
तुर्तास इतकेच, सविस्तर प्रतिक्रीया ह्या विकांतात ...

लिहीत रहा, आम्ही वाचतो आहोतच.

------
छोटा डॉन

प्राजु's picture

9 Jan 2009 - 8:24 pm | प्राजु

प्रचंड उत्कंठा वर्धक लेखन..
लवकर लिहा..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अवलिया's picture

9 Jan 2009 - 9:33 am | अवलिया

वेल डन मिस्टर स्पॉक

(स्ट्रेट) अवलिया

अवलियाची अनुदिनी

सहज's picture

9 Jan 2009 - 9:38 am | सहज

हाही भाग सुंदर

वाचतो आहे.

यशोधरा's picture

9 Jan 2009 - 9:40 am | यशोधरा

मस्तच चाललय, पटपट लिहा की पुढच...

मुक्तसुनीत's picture

9 Jan 2009 - 9:41 am | मुक्तसुनीत

डांबिसखानाने काही दिवसांपूर्वीच टाकलेला नवा लेख न वाचण्याचे महत्पाप माझ्याहातून घडले होते. त्याचे परिमार्जन आज तीन्ही भाग वाचून केले. डांबिसखानाने आम्हाला याआधीच खिशात टाकलेले आहे हे आम्ही वेळोवेळी लिहिले आहे. ते सगळे सरेंडर विधी आधीच झाल्याने , हा लेख जमलाय . अगदी हातखंडा जमलाय हे लिहिताना फारच गुळगुळीत वाटते आहे !

एकूण डांबिसखानाच्या आत्मचरित्राचे हे सुटे सुटे चॅप्टर्स वाचताना मनात येते की , काय साला जाम माणूस आहे ! जिथे कुठे जाईल तिथे काडेचिराईताप्रमाणे रहाणार नाही.मग तो पाकीस्तानी रूममेट असो , तो जॉर्ज नावाचा त्याचा गुरू असो की ही ऍलिशिया असो. साला शूर मर्दाचा पवाडा गायला , शाहिराची जिगर पण तेव्हढीच पाहिजे. डांबिसखान , आम्हा बहुतेकांच्या आयुष्यात असे धबधबे येऊन पडून जातात पण बहुतेक सर्व नर्मदेतले गोटे असतो. तुम्ही मात्र जिथे जाल तिथून आयुष्याचे पात्र भरभरून घेतले आहे यात शंका नाही. च्यामारी तुम्ही फिक्शनचा प्रयत्न करा बॉ ! फर्मास कथा लिहाल ! एकदम सीरीयसली सांगतोय ! :-)

नि३'s picture

9 Jan 2009 - 9:45 am | नि३

च्यामारी तुम्ही फिक्शनचा प्रयत्न करा बॉ ! फर्मास कथा लिहाल ! एकदम सीरीयसली सांगतोय !

१००% सहमत....

---नि३.

वेताळ's picture

9 Jan 2009 - 9:46 am | वेताळ

खुपच सुंदर लेखन...कुठेही वेग कमी जास्त नाही.आता अलिशियाच्या प्रेमातच पडलो आहे. =))
पुढील भागाची वाट पहात आहे
वेताळ

दिपक's picture

9 Jan 2009 - 9:51 am | दिपक

अलिशियाचा ३रा भाग अजुन आला नाही म्हणुन २ऱ्या भागाला प्रतिक्रिया देणार होतो.. सकाळी दिसला :) तेव्हा कामे बाजुला ठेवुन वाचला.

हा पण मस्तच ! प्रत्येक भागात झटके मिळाताहेत.. पुढच्या भागात काय असेल याची उत्सुकता लागलीये.

भाग्यश्री's picture

9 Jan 2009 - 9:58 am | भाग्यश्री

भारीच लिहीताय काका!!

http://bhagyashreee.blogspot.com/

नंदन's picture

9 Jan 2009 - 10:08 am | नंदन

लिहिलंय, काका. पुढच्या भागाची वाट पाहतो.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Jan 2009 - 10:11 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

झकास लिहिताय काका ... आणि योग्य वेगात गाडी पळत्ये. पण ते क्रमशःच्या पिट स्टॉपमधून लवकर बाहेर या!

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Jan 2009 - 10:15 am | बिपिन कार्यकर्ते

अतिशय छान व्यक्तिचित्र. सुंदर.

बिपिन कार्यकर्ते

मनस्वी's picture

9 Jan 2009 - 10:16 am | मनस्वी

वा! सकाळ छान झाली!
मस्त लिहिलंय पिडाकाका.

मॅन्ड्रेक's picture

9 Jan 2009 - 10:38 am | मॅन्ड्रेक

अतिशय छान व्यक्तिचित्र. सुंदर.

सहमत.

केवळ_विशेष's picture

9 Jan 2009 - 10:40 am | केवळ_विशेष

सकाळची सुरुवात मस्त झाली...

पुढचा भागही येऊंद्या लवकर...

नीधप's picture

9 Jan 2009 - 10:57 am | नीधप

मस्तच!!
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

राघव's picture

9 Jan 2009 - 11:10 am | राघव

...मस्त-रापचिक-झक्कास-भन्नाट-क्लास-लय भारी-१ नंबर-सह्ही... :X
आरं किती इसेसनं द्यावाची... आमास्नी शबुद नाय म्हाईत की जास्त... :)
फकस्त येकच प्राब्लेम हाये.. थ्ये क्रमसा थेवडं डोचकं खातंव बगा.. न्हाई, आपली काय बिसाद तुमास्नी क्रमसा टाकू नका म्हनाची.. येक पानभर लिवाला घेतलं हुतं आपुन मागं तर फेफरं याचं बाकी र्‍हालं हुतं.. तुमी तर आमचे बाप मानुस.. म्हुन म्हनतो टाका क्रमसा पन थोडं बिगीबिगी टाका.. :B
(रंगलेला) मुमुक्षु

श्रावण मोडक's picture

9 Jan 2009 - 11:13 am | श्रावण मोडक

पुढे काय? मध्ये खंड दीर्घ नको. दुसऱ्या आणि तिसऱ्या भागांसारखा.

घाटावरचे भट's picture

9 Jan 2009 - 11:15 am | घाटावरचे भट

अफलातून!!!!! काकानु, लैच भारी!!!

विसुनाना's picture

9 Jan 2009 - 11:30 am | विसुनाना

व्यक्तीचित्रण आणि कथानक दोन्ही आवडले.

विनायक प्रभू's picture

9 Jan 2009 - 11:49 am | विनायक प्रभू

चिज बडी है मस्त मस्त

चेतन's picture

9 Jan 2009 - 11:47 am | चेतन

सही लिहलयं तुमच्या लेखणितुन म्हणे सरस्वती की काय ति ओघावते आहे. =D>
खरचं प्रत्येक भाग उत्कंठा वाढवणारा आहे.
वाचायला घेतला की संपेपर्यंत थाबावतचं नाही

पुढच्या भागाची वाट पाहतोय.

चेतन

आनंदयात्री's picture

9 Jan 2009 - 12:29 pm | आनंदयात्री

यक नंबर !!
हा ही भाग आवडला.

परिकथेतील राजकुमार's picture

9 Jan 2009 - 12:59 pm | परिकथेतील राजकुमार

पुढचा भाग लवकर येउ द्यात ! रोज एक भाग लिहा =))

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

मदनबाण's picture

9 Jan 2009 - 1:38 pm | मदनबाण

मस्तचं...
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत...

मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -

मॅन्ड्रेक's picture

9 Jan 2009 - 2:32 pm | मॅन्ड्रेक

मनाचा वेग काय जलद असतो! काही मिनिटांतच मी इतका फिरून आलो होतो....

अगदि सहि.

अनिल हटेला's picture

9 Jan 2009 - 2:47 pm | अनिल हटेला

सॉलीड जमलाये हा भाग देखील !!
पूभाप्र.....
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

मैं जिंदगी का साथ निभाता चला गया| हर फिक्र को धुएं में उडाता चला गया|

चतुरंग

लिखाळ's picture

9 Jan 2009 - 8:42 pm | लिखाळ

मस्त ! मजा येतेय.. पुढचा भाग लिहा लवकर.

सोनेरी डोके (सुपीक प्रमाणे), पोटातला प्रश्न, मॅटर-ऑफ-फॅक्टली.. हे सर्व मस्त !

इतके गडद निळे डोळे मी त्यापूर्वी आणि त्यानंतरही कधी पाहिले नाहीयेत! प्रशान्त महासागराच्या खोल पाण्याप्रमाणे!! त्यात आपण सरळ बुडून मरावं अशी इच्छा आपल्या मनात उत्पन्न करणारे!!!

दि पु चित्र्यांची 'सफायर' ही कथा आठवली :)

-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

सुक्या's picture

9 Jan 2009 - 10:12 pm | सुक्या

पिडा काका . .
सही जमलाय. अगदी ओघवत्या शैलीत लिहीलेले तीनही भाग वाचले. वाचकाला गुंगवुन ठेवण्याची ताकत तुमच्या लेखनात आहे.

पुलेशु (आयला जमलं की ! आता कसं गावातुन शेराकडं आल्यागत वाटतयं)

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

धनंजय's picture

9 Jan 2009 - 10:35 pm | धनंजय

जमले आहे.

व्यक्तिरेखा आवडली.

रेवती's picture

9 Jan 2009 - 11:03 pm | रेवती

आता शेवटच्या भागालाच प्रतिक्रीया देइन.
छान लिहिताय असं कितीवेळा म्हणायचं?
त्यानंतर पुन्हा एक प्रश्न येतोच.
पुढचा भाग कधी?

रेवती

शितल's picture

10 Jan 2009 - 1:02 am | शितल

काका,
एकदम सह्ही लिहिले आहे. :)
चला अलीशिया शब्दात सापडली म्हणायची तुमच्या. ;)

अंतु बर्वा's picture

10 Jan 2009 - 6:05 am | अंतु बर्वा

छान लिहील आहे...

लवंगी's picture

10 Jan 2009 - 7:41 am | लवंगी

छान लिहीलय. मजा येतेय वाचायला.

सुनील's picture

10 Jan 2009 - 8:02 am | सुनील

हा भागही मस्त!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्रभाकर पेठकर's picture

10 Jan 2009 - 7:38 pm | प्रभाकर पेठकर

आज तिन्ही भाग एकदम वाचले. एकाहुन एक सरस उतरले आहेत. आपणाजवळ लेखनाची, वाचकांना गुंतवून ठेवण्याची अप्रतिक कला अवगत आहे. त्यामुळे वाचनाचा निखळ आनंद मिळतो. अभिनंदन.

निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Jan 2009 - 7:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आज तिन्ही भाग एकदम वाचले. एकाहुन एक सरस उतरले आहेत. आपणाजवळ लेखनाची, वाचकांना गुंतवून ठेवण्याची अप्रतिम कला अवगत आहे. त्यामुळे वाचनाचा निखळ आनंद मिळतो. अभिनंदन.

सखाराम_गटणे™'s picture

10 Jan 2009 - 8:25 pm | सखाराम_गटणे™

पिडाशेठ, असेच म्हणतो !

----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.