मंत्रसामर्थ्य

Primary tabs

यनावाला's picture
यनावाला in काथ्याकूट
14 Nov 2015 - 9:25 pm
गाभा: 

परवा एका कार्यक्रमात एक उच्चशिक्षित अध्यात्मवादी म्हणाले, "ॐ या शब्दात प्रचंड शक्ती आहे. विज्ञानाने हे सिद्ध केले आहे.”
या विधानात काही तथ्य आहे काय ? ॐ ऊर्जेचा प्रत्यय कधी,कोणाला, कोठे, कसा आला ? या प्रचंड ऊर्जेचे अस्तित्व विज्ञानाने कोणत्या पद्धतीने सिद्ध केले? भर सभेत असली विधाने करायला अध्यात्मवादी कसे धजावतात? अर्थात सभेतील अनेक गलिबलांना (भोळसटांना) ती महान सत्ये वाटतात . ते स्वबुद्धीने विचार न करता माना डोलावतात,"वा! काय विद्वत्ता आहे!" असे म्हणतात , हे खरे.
आरोह-अवरोहांसह नाका-तोंडातून शास्त्रशुद्ध सानुनासिक (गेंगाणा) स्वर काढून ॐ-गुंजन करणारे एक्स्पर्टस् आजसुद्धा देशात आहेत.मग आपण अणुभट्टी का उभारतो? ॐ- उच्चारणातील प्रचंड ऊर्जेने टर्बाइने फिरवून विद्युत् निर्मिती का करत नाही? असे करणे शक्य नसेल तर ॐ मध्ये प्रचंड शक्ती असते असे म्हणतात ते कोणत्या अर्थाने? "कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा " अशी ऊर्जेची व्याख्या आहे. ऊर्जा आणि शक्ती हे शब्द समानार्थी आहेत.
हां! अखंड अकरा तास बद्धमूलासन घालून ॐ-जप करणार्‍या व्यक्तीला वाटू शकेल की, " ..आता माझी कुंडलिनी जागृत होत आहे...तिने अर्धे वेटोळे सोडले...दीड उलगडले...साडे तीन वेटोळी संपली...बघा! आता तिने फणा उभारला...सुषुम्णा मार्गाने कुंडलिनी वर वर चालली आहे...ती पाहा...आता ती चंद्र तळ्यातले सतरावीचे अमृतस्तन्य प्राशन करीत आहे...घट्..घट्..घुट्..संपले....आता ती ब्रह्मरंध्र भेदित आहे....फट्.. फट् ..फाट्... फोडले....माझी कुंडलिनी चिदाकाशात विलीन झाली...मी देहातीत झालो... जीवन्मुक्त झालो.. ब्रह्मरूप झालो...आनंद...आनंद...सच्चिदानंद...ब्रह्मानंद!" हे सगळे व्यक्तिगत भ्रम आहेत. त्यांत वैज्ञानिक सत्याचा लवलेश नाही.
** भारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली. त्यावेळी या प्रचंड ओम् ऊर्जेच्या योगाने कोणी कधी प्रतिकार केल्याची एक तरी ऐतिहासिक नोंद आहे का? मूर्तिभंजकांनी सोरटीच्या सोमनाथाची शकले पाडली. तेव्हा ते अविवेकी कृत्य या ॐ-शक्तीच्या आधारे कोणीच कसे रोखले नाही? अल्लाउद्दिन खिलजीने देवगिरीवर स्वारी केली (१३ वे शतक) तेव्हा चांगदेवांसारखे अनेक सिद्धयोगी दूर नव्हते. त्यातील कोणी ॐ-ऊर्जातज्ज्ञ रामदेवरायाच्या सहाय्याला का गेला नाही? देवगिरीचे दौलताबद का होऊं दिले?.
**थोरले माधवराव पेशवे कर्तृत्ववान होते. दुर्दैवाने तरुणपणी त्यांना क्षय रोगाने ग्रासले. अनेक आयुर्वेदाचाचार्यांच्या उपचारांनी गुण आला नाही. अंतिम समयीं मृत्युंजयमंत्रपठणासाठी वेदशास्त्रसंपन्न अशा शेकडो ब्रह्मणांना नियुक्त केले. पण हा महामंत्रजागर निष्फळ ठरला. पेशव्यांचा अकाली मृत्यू टळला नाही.
**" माझा प्रवास"या पुस्तकात विष्णुभट गोडसे यांनी पुढील वर्णन लिहिले आहे:--(हे गोडसे १८५७ साली उत्तर हिंदुस्थानात प्रवासाला गेले होते.)
"शत्रूचा नि:पात होऊन राज्य सुरक्षित राहावे म्हणून झाशीच्या राणीने अनेक अनुष्ठाने केली, मंत्रजप केले. अथर्वशीर्षाची सहस्र आवर्तने झाली. पेशव्यांकडून त्वरित मदत यावी म्हणून शंभर ब्राह्मण विशेष मंत्रजपास बसविले. पण गोरे लोक शहरात शिरून नरसंहार करू लागले. देवाघरचा न्याय मोठा चमत्कारिक. निरपराध लोकांना केवढी मोठी शिक्षा! झाशीवासीयांचे गतजन्मीचे पाप मोठे. सर्व मंत्रजप व्यर्थ ठरले. भटांस मात्र सुग्रास भोजन आणि भरपूर दक्षिणा मिळाली."--- ब्राह्मणांचे शास्त्रोक्त मंत्रजप व्यर्थ गेले याचे कारण झाशीवासीयांचे गतजन्मीचे पाप असे गोडसे भटजी म्हणतात.पण हा कार्य-कारण भाव चुकीचा आहे. मंत्रांत काही सामर्थ्य नसते. म्हणून मंत्रजप व्यर्थ गेले. सुग्रास भोजन आणि भरपूर दक्षिणा या गोष्टींचा लाभ घेणार्‍यांत विष्णुभट हेही एक होते.
अग्निपुराणात मंत्रसामर्थ्याचा अगाध गौरव आहे. त्यातील संग्रामविजय मंत्र:-

:--"ॐ-र्‍हीं चामुण्डे।स्मशानवासिनी किलि किलि हुम् फट्।ॐ-मारय।ॐ-दण्डेन ताडय।ॐ-त्रिशुलेन छेदय।ॐ-चामुण्डे।किलि किलि हुम् फट् स्वाहा।"

लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा मंत्र:-

:---"ॐ श्रीं र्‍हीं र्‍हीं क्लीं क्लीं ऐं कमलवासिन्यै नम:।"

असले हे मंत्र खरे मानणारे लोक पूर्वी होते. आज एकविसाव्या शतकातही आहेत! कुठल्याही मंत्रामध्ये कसलेही दैवी सामर्थ्य नसते. मंत्राने काही साध्य होत नाही.चमत्कार घडू शकत नाही. पूर्वी कधीही घडलेला नाही. भविष्यात कधी होण्याचा संभव नाही. हे वैज्ञानिक सत्य आहे. वरील ऐतिहासिक सत्य घटनांवरून याला पुष्टी मिळते. मंत्रात सामर्थ्य असते ही अज्ञानमूलक, खुळचट कल्पना आहे. मंत्रसामर्थ्याने चमत्कार घडतात ते केवळ पुराणे,परीकथा,बालसाहित्य यांतील काल्पनिक गोष्टींत .हे सर्व तथाकथित शक्तिशाली मंत्र आणि "ओले मंतर फू: मंतर कोले मंतर छू: मंतर" तसेच "आबरा का डाबरा" मंतर यांत मूलत: काही भेद नाही.सर्व सारखेच. निरुपयोगी. असे माझे मत आहे.
अध्यात्मप्रेमी व्यक्ती गायत्री मंत्राचे अफाट गुणगान करतात. "हा मंत्र संपूर्ण विश्वाचा मूलाधार आहे. (म्हणजे काय ?) या मंत्राचे गायन केले की त्याचे ध्वनी-प्रतिध्वनी अनंत अवकाशात दुमदुमतात. जगभर गायत्री मंत्राचा जप केल्यास पृथ्वी भोवतीचे सर्व वातावरण प्रदूषणमुक्त, शुद्ध आणि पवित्र होईल." असले काही ऐकले की आध्यात्मिक श्रद्धावंत हुरळतो. मग सी.डी.लावून

"ॐ भूर्भुवस्व:। तत्सवितुर्वरेण्यम्।भर्गो देवस्य धीमहि।धियो यो न: प्रचोदयात्।"

हा मंत्र ऐकत बसतो. खिडकी उघडी. डास आत येतात.पायांना चावतात.एवढ्या विश्वप्रभावी मंत्राचा डासांवर काहीच परिणाम होत नाही. पायावर चापट्या मारतो. डास मरत नाही. डासाच्या चाव्याने वैतागतो.मंत्राच्या त्याच त्या ओळींचे दळण ऐकून कंटाळतो."आता राहूं दे. नंतर बघू" असे म्हणून मंत्र बंद करतो. दिवा लावून डास शोधायला लागतो. असा आहे या मंत्राचा प्रभाव! कुठल्याही मंत्रात कसलीही ऊर्जा नसते. असले मंत्र म्हणू नये असे नाही. सकाळी स्नान करून,शुचिर्भूत होऊन, मंत्र म्हटल्याने पवित्र झाल्यासारखे वाटत असेल, मनाला उभारी मिळत असेल, उत्साहवर्धन होत असेल, तर तेही नसे थोडके. म्हणून मंत्रजप अवश्य करावा.पण त्याचा उपयोग तेवढाच हे वास्तव जाणावे.
.......................................................................................

प्रतिक्रिया

अनुप ढेरे's picture

14 Nov 2015 - 9:33 pm | अनुप ढेरे

हॅहॅहॅ! छान आहे लेख. आवडला.

चांदणे संदीप's picture

14 Nov 2015 - 10:09 pm | चांदणे संदीप

टाळ्यांचा कडकडाट! लेख आवडला!
काहीतरी सुचतय.... पण तूर्तास रासूदे बाकी लोकांच्या प्रतिक्रिया पाहून परत चक्कर मारतो. :)

(इथे गर्दी होईल हा माझा मिपावरचा अल्प अनुभव सांगतो, त्यामुळे एक कोपरा गाठून बसलेले बरे! कसे?)

;-)
Sandy

पैसा's picture

14 Nov 2015 - 10:15 pm | पैसा

लेख आवडला.

आदूबाळ's picture

14 Nov 2015 - 10:44 pm | आदूबाळ

५०० झाल्यावर येतो.

मागे मंत्रसामर्थ्यावरच्याच, पण उलट्या बाजूने लिहिलेल्या धाग्याने जबरदस्त रनरेट ठेवत तीनशे पार केले होते. तोही धागा दिवाळीच्याच आसपास आला होता.

मंत्र, त्यांचं सामर्थ्य, वगैरे म्हणजे अॅट वर्स्ट आत्मवंचना आणि अॅट बेस्ट "दिल के बहेलाने के लिए ऐ गालिब..."

याॅर्कर's picture

14 Nov 2015 - 11:08 pm | याॅर्कर

जालावर इकडे तिकडे शोधून विविध माहिती हडकून लेख लिहलेला दिसतोय.
.
.
.
कारण हे सगळं मी कोठेतरी याआधी जालावर वाचलयं
.
.
.
असो
(धर्ममार्तंडांच्या प्रतिक्षेत असणारा 'याॅर्कर')

आजची स्वाक्षरी-ॐ/卐

दिवाकर कुलकर्णी's picture

15 Nov 2015 - 2:05 am | दिवाकर कुलकर्णी

ज्योतीषहि ,वास्तुशास्त्रहि असेच थोथांड आहे,
पण भले भले लोक त्याच्या कच्छपी लागतात,
कर्तुत्वावर विश्वास न ठेवता प्रारब्धावर विश्वास ठेवतात.
कधी तरी कुणीतरी लिहीलेली चार पुस्तके वाचून, अशा शास्त्रीना म्हणे
भविष्य उलगडतं,ज्याला कांहीहि आधार नाही अशा अचरट गोष्टी,तुमच्या वरील
अडचणीवर उतारा म्हणून ते सुचवतात.वास्तुशास्त्रिहि इकडचं दार तिकडं करा,
स्वयंपाक घर बदला ,माती आणि मसण काय काय सुचवतात, हातात होकायंत्र
घेवून घरभर फिरतात,आणि एरवी अत्यंत चिकित्सक असणार्या व्यक्तिहि
अशांच्या आहारी जातात.
प्लासीबो इफ़ेक्ट कुठतरी काम करतहि असेल,पण म्हणून त्याच्या कच्छपी लागणं
म्हणजे स्वताची हानी दुसर्याचं हासू असा प्रकार होतो.

याॅर्कर's picture

15 Nov 2015 - 8:12 am | याॅर्कर

वास्तुशास्त्रहि असेच थोथांड आहे,

सकाळची कोवळी किरणे घरामध्ये आली पाहिजेत एवढंच त्यामागे शास्त्र आहे,आणि त्यादृष्टिने घराची रचना असावी.

मारवा's picture

15 Nov 2015 - 12:11 pm | मारवा

सकाळची कोवळी किरणे घरामध्ये आली पाहिजेत एवढंच त्यामागे शास्त्र आहे,आणि त्यादृष्टिने घराची रचना असावी.

बस्स इतकचं
मग इतकी पुस्तके इतके तज्ञ इतके उपाय इतकी तोडफोड इतके परीसंवाद
इतका सगळा तुमुल कोलाहल कशासाठी होता ?

याॅर्कर's picture

15 Nov 2015 - 12:47 pm | याॅर्कर

मग इतकी पुस्तके इतके तज्ञ इतके उपाय इतकी तोडफोड इतके परीसंवाद
इतका सगळा तुमुल कोलाहल कशासाठी होता ?

वास्तूविशारदांची दुकानदारी आहे ही सगळी!
म्हणजे बघा ज्याचा जो व्यवसाय आहे त्याचेच तो मार्केटिंग करतो.आणि ते करत असताना त्यामध्ये इतकी भर टाकतो कि, बापरे बाप!
आणि देवादिकांची भिती घालून बुद्धीभेद केला कि बरेचजण त्याला बळी पडतात.(सगळा माईंडगेम हाय ओ)
.
.
.
मुळ मुद्दा इतकाच कि घर हवेशीर हवे.

जयन्त बा शिम्पि's picture

15 Nov 2015 - 5:36 am | जयन्त बा शिम्पि

खर आहे , पूर्वी मंत्रोच्चार मुखाने व्हायचा , आता यंत्रे निघालीत , त्या यंत्रांचा उद्धार व्हावयास हवा , पण तसे काही होतांना दिसत नाही. त्यामुळ मनाला मूळ समस्येपासून घटकाभर अन्यत्र घेवून जाण्यापुरताच या मंत्रांचा उपयोग होतो , अन्यथा त्यांचा दूसरा काही उपयोग नाही
भाबड्या मनासाठी मंत्रोच्चार ही एक मोठी शक्ती आहे हे वरदान वाटते , पण वैद्न्यानिक दृष्टीकोनातुन ती शक्ती फोल आहे , बकवास आहे .

खर आहे , पूर्वी मंत्रोच्चार मुखाने व्हायचा , आता यंत्रे निघालीत , त्या यंत्रांचा उद्धार व्हावयास हवा , पण तसे काही होतांना दिसत नाही
तुमचे हे मत म्हणजे टेलरींग मशीन कपडे शिवते म्हणून त्याने माणसासारखे बोलायला हवे असा आहे...

बांवरे's picture

15 Nov 2015 - 6:49 am | बांवरे
डासाच्या चाव्याने वैतागतो.मंत्राच्या त्याच त्या ओळींचे दळण ऐकून कंटाळतो

लेखाचे सार सम्दे ह्याच्यात आले !

प्रचेतस's picture

15 Nov 2015 - 7:10 am | प्रचेतस

लेख नेहमीप्रमणेच उत्तम. पण लोकांचे मतपरिवर्तन इतक्या थेट मार्गाने होत नाही, होणार नाही. समाजसुधारणा ही हळूहळू घडवून आणावी लागते.

प्रकाश घाटपांडे's picture

16 Nov 2015 - 8:29 am | प्रकाश घाटपांडे

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Nov 2015 - 1:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत....!

-दिलीप बिरुटे

त्याच बरोबर, आपल्या स्वतः मध्ये काही परिवर्तन घडल्याशिवाय कोणी समाज सुधारु शकणार नाही.

माझा आत्मविश्वास या मंत्राच्या जपामुळे वाढतो याची मेजरमेंट आजच्या युगात नाही. पण याला पर्याय द्याना.

अनेक माणसे पोटाच्या भुकेपेक्षा मानसीक व्याधींनी जास्त ग्रस्त आहेत.

आजच्या भारतीय समाजात अमेरीकन समाजात प्रचलीत असलेले सायकेट्रीस्ट च्या उठ सुट सल्याच्या पध्दतीचे अनुकरण करण्याइतका पैसा, वेळ आणि सायकेट्रीस्ट ची उपलब्धता आहे का ?

मग मंत्रसामर्थ्यावर एखादे पुस्तक वाचुन कोणी अनुभव घेत असेल तर त्याला ते करु द्यावे. कोणा बुवाच्या भजनी लागु नये. किमान भोंदु कोण इतके समजले तर बास आहे.

बाकी योगशास्त्र आदीचा स्वतः अनुभव घ्यावा. मग आपण काय म्हणता ते हळु हळु समाजाला पटेल.

ध्यानाला पर्यायी मनशांती साठी एखादी साईड इफेक्ट नसलेली गोळी मला ही हवीच आहे.

जेष्ठ विचारवंत कै ना ग गोरे यांनी मन शांती साठी मी ध्यान करतो असे म्हणले होते. महात्मा गांधींनी सुध्दा योगानंद परमहंस यांजकडुन क्रियायोगाची दिक्षा घेतली होती. याचे फक्त स्मरण मला या निमीत्ताने होत आहे.

मराठी कथालेखक's picture

5 Apr 2016 - 12:51 pm | मराठी कथालेखक

ध्यानाला पर्यायी मनशांती साठी एखादी साईड इफेक्ट नसलेली गोळी मला ही हवीच आहे.

मन हे स्वप्रयत्नांनी प्रसन्न करावे. एखादे मंत्र, एखादे गाणे ऐकून थोडा वेळ बरे वाटू शकते.
स्वतः गुणगुणत राहिल्यास दीर्घ काळ प्रसन्नता राहील. पण अडीअडचणीच्या वेळी न डगमगणे, (फार जास्त) न घाबरता आल्या प्रसंगाला सामोरे जाणे, अपमानाचे , दु:खाचे क्षण प्रयत्नपुर्वक विसरणे, अहंकाराला वेळीच बाजूला सावरणे हे ठरवून करावे लागते.
यासाठी योग, ध्यान किंवा इतर गोष्टी (ते तुम्हाला मनापासून आवडेल काहीही असू शकते अगदी रॉक संगीत सुद्धा) केवळ सहाय्य करु शकतात, पण निश्चय तुमचाच असला पाहिजे. म्हणजे सर्वात उत्तम कोचिंग क्लासला गेल्याने केवळ कोणी उत्तम गुणांनी उत्तीर्ण होईल वा त्याला विषयाचे सखोल ज्ञान प्राप्त होईल असे नाही. आचरेकर सरांचे सगळेच शिष्य अतिशय चांगले क्रिकेटपटू होणार नाहित. तो निश्चय मनातून आधी व्हायला हवा नाहीतर कोणताच मंत्र, कोणताही गुरु निष्फळ ठरेल.

जेपी's picture

15 Nov 2015 - 10:15 am | जेपी

वर्गणी जमा करावी

नितीनचंद्र's picture

15 Nov 2015 - 10:29 am | नितीनचंद्र

"ॐ या शब्दात प्रचंड शक्ती आहे. विज्ञानाने हे सिद्ध केले आहे.” कसे ? कुठे हा प्रश्न लगेच विचारावा. अशी विधाने करणारे लगेच सावध होतात. आपले शब्द जपुन वापरतात.

"ॐ या शब्दात प्रचंड शक्ती आहे. विज्ञानाने हे सिद्ध केले आहे.” मानसीक शक्ती की शारिरीक हा ही प्रश्न विचारायला हरकत नाही.

आपल्या माहितीसाठी ओंकाराबाबत सर्वात जुनी माहिती योगसुत्रे ग्रंथात आहे.

तस्य वाचक प्रणव: अस महामुनी पतंजली म्हणतात. ओंकाराचा ध्वनी ईश्वराचा वाचक आहे. ओंकार जप म्हणजे ईश्वर उपासना असे महामुनी पतंजली म्ह्णतात. ओंकार जपाने योगमार्गात येणारे अडथळे दुर होतात असे पतंजली मुनींनी म्हणलेले आहे.

आपण योगाभ्यास करणार असाल तर किंवा करत असाल तर त्याचा अनुभव घ्यावा.

प्रकाश घाटपांडे's picture

15 Nov 2015 - 10:31 am | प्रकाश घाटपांडे

लहान मुलांना घोळात घेउन जर तुम्ही आला मंतर कोला मंतर छू! हा मंत्र म्हणलात तर त्याचा बाउ काही काळासाठी का होईना पण पळून जातो. हे माईंड डायर्वटिंग टेक्निक असते.
लग्नात भटजींनी म्हटलेल्या मंत्रांमुळे जोडप्यांना मूल होतात असा समज अनेक श्रद्धाळू कुटुंबात वाढलेल्या लहान मुलात असतो. मी त्यापैकी एक होतोच. श्रीराम जयराम जयजय राम हा मंत्र शौचाच्या वेळी म्हटला तरी चालतो असे आमचे तपस्वी गुरुजी सांगायचे.
सामर्थ्य मंत्रामधे नसून त्यावरील दृढ ( अंध) श्रद्धेमधे असते. जे शॉक अ‍ॅबसार्बर सारखे जीवनाच्या खाचखळग्यात वापरले जाते. औषध उतारे आणि आशीर्वाद हे सुधीर कक्कर यांचे डॉ श्रीकांत जोशी यांनी अनुवादित केलेले पुस्तक जरुर वाचावे.

चित्रगुप्त's picture

15 Nov 2015 - 10:39 am | चित्रगुप्त

झकास लेख. हल्ली काही दुकानात अहोरात्र गायत्री मंत्राचे मशीन लावून ठेवतात. मी त्यांना सांगतो की याने तुम्ही आधी बहिरे व्हाल आणि नंतर हळूहळू वेड लागेल. या मंत्राचा फायदा पहाटे तीन वाजता उठून शुचिर्भूत होऊन एकाग्र चित्ताने एकशे आठ वेळा दररोज कराल, तरच मिळतो.... वगैरे.
एकदा एका दुकानदाराला मी विचारले, आप गाय का दूध पीते है या भैस का ? तो म्हणाला भैस का. मग मी म्हणालो फिर आप को गायत्री मंत्र का नही, भैसत्री मंत्र का जाप करना है, गायत्री का तो उल्टा असर होगा. तो आ वासून बघतच राहीला आणि मी गंभीर पणे बाहेर पडलो .

अत्रुप्त आत्मा's picture

15 Nov 2015 - 11:06 am | अत्रुप्त आत्मा

@भैसत्री मंत्र का जाप करना है, गायत्री का तो उल्टा असर होगा. तो आ वासून बघतच राहीला आणि मी गंभीर पणे बाहेर पडलो .>> http://freesmileyface.net/smiley/laughing/lol-060.gifhttp://freesmileyface.net/smiley/laughing/lol-060.gifhttp://freesmileyface.net/smiley/laughing/lol-060.gif

बाबा योगिराज's picture

15 Nov 2015 - 1:45 pm | बाबा योगिराज

ठ्ठो.....
ख्या ख्या ख्या.

सुबोध खरे's picture

15 Nov 2015 - 10:44 am | सुबोध खरे

हाहाहा

सुबोध खरे's picture

15 Nov 2015 - 10:45 am | सुबोध खरे

भैसत्री भारीच

मांत्रिक's picture

15 Nov 2015 - 10:46 am | मांत्रिक

यनावाला लेख पाडणार...
नास्तिक खीः खीः करणार...
आस्तिक तलवारी काढणार...
राडा होणार निश्चित...
काॅलिंग संजय डांगे, तुडतुडी, बाहुबली,
साथीयों जोरदार हमला हुआ है... आओ... :)
प्यारेची तिखट तिरकस लेखणी मिस करतोय.. :(

(ह.घ्या.)

आनन्दा's picture

15 Nov 2015 - 11:06 am | आनन्दा

आपली तलवार म्यान. बाटगा जास्ती कडवा असतो म्हणतात.
तस्मात खेचरी लावून बसतो, कसे?

याला म्हणतात खरा मार भी पड जाये और आवाज भी आये.
सणसणीत चपराक.....

हळुहळु काही दहा पंधरा हजार वर्षात नक्कीच बदल होणार म्हणजे होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
अजुन झालीच कीतीकशी दोनतीन हजार वर्षे.
रेलगाडी धीरे धीरे
यनावाला फारच घाई बुवा तुम्हाला
थोड आहीस्ता आहीस्ता दमादमाने घ्या म्हणतो मी.
ते नाही का
हयॉ यकलख्त आयी शबाब आहिस्तॉ आहीस्तॉ
उधर है जल्दी जल्दी इधर है आहीस्तॉ आहीस्तॉ
तुम्ही कीनई एकदम आलापी वरुन द्रुतगतीने ताना घेऊ लागतात
मग आमची त्रेधातिरपीट उडते बघा

बोका-ए-आझम's picture

15 Nov 2015 - 2:23 pm | बोका-ए-आझम

बदल हळूहळू होतो. हुकूमशाही असती तर बदल वेगाने होऊ शकतात. पण मग समाजात पुराणमतवादी आणि नवमतवादी यांच्यात संघर्ष उभा राहातो. तुर्कस्तान हे अगदी मोठं उदाहरण आहे. जोपर्यंत धार्मिक स्वातंत्र्य आहे तोपर्यंत सामाजिक सुधारणांचा वेग हा कमीच राहणार. एखादा हुकूमशहा सगळ्या धर्ममार्तंडांचं शिरकाण करून धार्मिक प्रश्न कायमचे सोडवण्याचा प्रयत्न करु शकतो पण ते पूर्णपणे सुटणं कठीण आहे.

हुकुमशाही संदर्भातील विवेचन मार्मिक आणि तुर्कस्तान चे उदाहरण रोचक
प्रतिसाद आवडला.

प्रकाश घाटपांडे's picture

15 Nov 2015 - 3:48 pm | प्रकाश घाटपांडे

थोडे घाई करणारे लोक बी लागतातच की! एक पिअर प्रेशर तयार करायला कोणीतरी पाहिजेच.
तुमचही दमाने घ्यायचा मुद्दा योग्यच आहे. समाजसुधारकांनी समाजाच्या किती पुढे असावे? चार पावले. नाहीतर सुधारक समाजापासून तुटून फक्त पुढेच जायचे व मागे समाज आहे याच काही भानच रहाणार नाही.प्रबोधनाचा वेग समाजाच्या सरासरी गती पेक्शा फारच झाला तर असे होते.त्याच बरोबर सुस्त समाजाला डिवचणार ही कुणी पाहिजे.सुधारकांमधे जहाल व मवाळ पंथ हे नेहमीच असतात.

बोका-ए-आझम's picture

15 Nov 2015 - 5:23 pm | बोका-ए-आझम

Peer Pressure हे बहुतांशी नकारात्मकरीत्या काम करतं असं पाहण्यात येतं. याच लेखाच्या संदर्भात म्हणायचं तर ॐ मध्ये आध्यात्मिक ताकद आहे असे संदेश whatsapp वरुन पुढे पाठवणा-यांची संख्या ही अशा संदेशांचा शास्त्रीय दृष्ट्या प्रतिवाद करणारे संदेश पुढे पाठवणा-यांपेक्षा जास्त असते. Peer Pressure मुळे व्यसनाधीन झालेले peer pressure मुळे व्यायाम करणाऱ्यांपेक्षा नक्कीच जास्त असतील. तुम्ही जर peer pressure ही संकल्पना व्यापक स्वरूपात घेत असाल तर आपल्या देशात जात, धर्म, कर्मकांडं, धार्मिक उन्माद यांचं peer pressure हे नेहमीच कुठल्याही रचनात्मक, सृजनशील कार्यासाठी लागणाऱ्या peer pressure पेक्षा जास्तच असतं.

the Maharashtra Prevention and Eradication of Human Sacrifices, Evil and Aghori Practices and Black Magic Ordinance, 2013,
याच्या शेड्युल मध्ये मंत्रासंबंधित तरतुद दिलेली आहे ती खालीलप्रमाणे आहे. खालील सर्व कृत्ये ही बेकायदेशीर ठरवण्यात आलेली आहेत व त्यासाठी शिक्षेची तरतुद केलेली आहे.
ही एक समाधानकारक बाब आहे.
8- To create a panic in the mind of public in general by way of invoking ghost or mantras, or threaten to invoke ghost, creating an impression that there is a ghostly or wrath of power inapprehensible by senses causing physical injuries and preventing a person from taking a medical treatment and instead diverting him to practice inhuman, evil and aghori acts or treatment, threatening a person with death or causing physical pains or causing financial harm by practicing or tend to practice black magic or inhuman act.

यनावाला's picture

15 Nov 2015 - 1:39 pm | यनावाला

या लेखाविषयीं मि.पा.च्या अनेक वाचकांनी अनुकूल मत व्यक्त केले. त्या सर्वांचे मन:पूर्वक आभार. श्री. यॉर्कर म्हणतात

,"जालावर इकडे तिकडे शोधून विविध माहिती हडकून लेख लिहलेला दिसतोय. कारण हे सगळं मी कोठेतरी याआधी जालावर वाचलयं."

...यांतील दुसरे विधान (हे सगळं मी कोठेतरी या आधी जालावर वाचलयं.") हे खरे आहे. पण त्यांनी काढलेला निष्कर्ष चुकीचा आहे. "ग्लोबल मराठी " या संस्थळावर मी हा लेख लिहिला आहे (डिसेंबर २०१४). तो त्यांनी वाचला. निरीक्षणांवरून निष्कर्ष काढताना सर्व संभाव्य पर्यायांचा विचार करणे आवश्यक ठरते.

अलेच्चा तुम्ही तेच आहात होय?
आपल्या आयडीवरून थोडा गोंधळ झाला.

निरीक्षणांवरून निष्कर्ष काढताना सर्व संभाव्य पर्यायांचा विचार करणे आवश्यक ठरते.

हल्ली अशा धाग्यांवर फार घाई करतो मी.
क्षमस्व.

बाबा पाटील's picture

15 Nov 2015 - 2:12 pm | बाबा पाटील

मार भी पड जाये और आवाज भी न आये. जिओ मेरे शेर,लेख आवडला.

मारवा's picture

15 Nov 2015 - 2:15 pm | मारवा

निरीक्षणांवरून निष्कर्ष काढताना सर्व संभाव्य पर्यायांचा विचार करणे आवश्यक ठरते.

गामा पैलवान's picture

15 Nov 2015 - 2:43 pm | गामा पैलवान

यनावाला,

हे चार मंत्र तुम्ही ऐकलेत का?

ग्रॅड डॉट ई = ऱ्हो बाय एप्सिलन झीरो
ग्रॅड डॉट बी = झीरो
ग्रॅड क्रॉस ई = मायनस डेल बी बाय डेल टी
ग्रॅड क्रॉस बी = म्यू झीरो जे प्लस म्यू झीरो एप्सिलन झीरो डेल ई बाय डेल टी

नाही म्हणता? काय सांगताय काय? माझ विश्वास नाही बसंत. अहो या चार मंत्रांत मानवी अनुभवातली बरीचशी शक्ती एकवटली आहे. अहो या मंत्रामुळेच आपण जगात वेगवेगळ्या ठिकाणी बसलेले असतांनाही मिपावर एकत्र येऊन चर्चा करू शकतो.

अहो, या मंत्रसमुच्चयास मॅक्सवेलची समीकरणे म्हणतात. ती दृश्य रंगांपासून मायक्रोवेव्ह, रेडियो वेव्ह, एक्स रे, गामा रे इत्यादि प्रारणांचे वर्णन करतात. तेच सूर्यप्रकाशाचंही वर्णन करतात. सूर्यामुळेच या पृथ्वीवरील जीवन सुरळीत चालू आहे. म्हणजे हेच मंत्र तुमच्या जगण्याचा मूलाधारही आहेत. आणि तुम्हाला त्यांची गंधवार्ताही नाही? हे तुमच्यासारख्या विज्ञानवाद्याला शोभतं का?

आ.न.,
-गा.पै.

टीप : तुम्हाला या मंत्रांतली ऊर्जा बघायची असेल तर ई क्रॉस एच काढून बघा. त्याला पॉयन्टिग व्हेक्टर म्हणतात. हा एक उपमंत्र आहे. निदान तेव्हढा तरी माहीत करून घ्या.

साती's picture

15 Nov 2015 - 4:26 pm | साती

मग असं करा , जगाच्या चार कोपर्‍यांत चौघांना बसवा. हे तुमचे चार मंत्र एका तालासूरात चौघांना एकत्र म्हणायला सांगा आणि मग बघा चमत्कार - ते कनेक्ट होतात का ते!
अर्थातच जोपर्यंत कंप्युटर किंवा तत्सम साधन नाही , इंटरनेट किंवा तत्सम जुळणी नाही तोपर्यंत हे मंत्र पाठ असून फायदा नाही.
हे म्हणजे पॅरासिटॅमॉलच्या गोळीने ताप कमी होतो म्हणून त्याचा केमिकल फॉर्मूला पाठ करून त्याचा जप ताप आल्यावर करत बसण्यासारखं आहे.

म्हणजे पॅरासिटॅमॉलचा केमिकल फॉर्मूला पाठ असणं काही वाईट नाही , पाठांतर करणे हे ही काही वाईट नाही. पण त्या पाठांतराने ताप कमी होईल असा विश्वास ठेवणे आणि मग मुलाबाळांसकट सगळ्यांनी तापापासून बचाव म्हणून एका ठराविक वेळी, शुचिर्भूत वगैरे होऊन म्हणणे आणि आजारी पडल्यावर हा उपाय सोडून दुसरे काहिच न करणे हे चूक!

गामा पैलवान's picture

15 Nov 2015 - 8:26 pm | गामा पैलवान

साती,

>> अर्थातच जोपर्यंत कंप्युटर किंवा तत्सम साधन नाही , इंटरनेट किंवा तत्सम जुळणी नाही तोपर्यंत हे मंत्र पाठ
>> असून फायदा नाही.

अगदी बरोबर. जुळणी (setup) खेरीज प्रत्यय नाही. मग यनावाला यांनी जुळणीचा काहीही विचार न करता मंत्रांना थेट टाकाऊ ठरवलं ते बरोबर नाही.

आ.न.,
-गा.पै.

मांत्रिक's picture

15 Nov 2015 - 8:32 pm | मांत्रिक

+१११
यनावालांनी कशाचाच अभ्यास केलेला नसावा. नाहीतर अध्यात्मावर चिखलफेक करत बसण्यिपेक्षा विज्ञानातील नव्या कन्सेप्ट, प्रवाह, शोध यावर चांगले लेख लिहिले असते. पण ते न करता ते नित्यनेमाने अध्यात्मावर फालतू टीका करत बसतात. कारण सोपं आहे. त्याला फारसा अभ्यास लागत नाही.

मार्कस ऑरेलियस's picture

16 Nov 2015 - 9:59 am | मार्कस ऑरेलियस

मंत्र ह्या शब्दाची व्युत्पत्ती मननात त्रायते इति अशी आहे । आणि मनन म्हणजे काय हेच यनांना माहीत नाही। आणि तुम्ही कितीही समजावून सांगितले आणि जरी त्यांना पटले तरीही ह्या वयात ते स्वीकारणे हे त्यांच्या अहंकाराला दुखावून जाईल ।

जाऊन दे किती वाद घालणार असल्या स्वमतांध दांभिकांशी ?

असो । वाचून सोडून देऊ आपण :)

संपत्ती अथवा विपत्ती । जैसी पडेल काळगती ।
नामस्मरणाची स्थिती । सांडूच नये । श्रीराम ।।

कवितानागेश's picture

18 Nov 2015 - 11:11 am | कवितानागेश

अहो मन आणि बुद्धीच् जर अमूर्त आहे, तर मनन म्हणजे काय हे सराना विचारता तरी कसे तुम्ही?
वेडे कुठले!!
रेफरेन्स: http://www.misalpav.com/comment/763784#comment-763784

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Nov 2015 - 11:04 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्वमत दांभिकांशी वाद घाला फक्त व्यक्तीगत हल्ले करु नका. वय आणि अभ्यास कोणाचा काढणे हे बरं वाटत नाही.
आपण मंत्र सामर्थ्याचे फायदे सांगा..... आम्ही तोटे सांगु. नै का ?

-दिलीप बिरुटे

मार्कस ऑरेलियस's picture

19 Nov 2015 - 3:06 pm | मार्कस ऑरेलियस

धर्म अध्यात्मिकता ह्या गोष्टी वैयक्तिक नसतात का ? मग धर्म अध्यात्मिक श्रध्दांवर केलेली टिप्पण्णी वैयक्तिक ठरत नाही का ?

आता यनावाला कोणत्याही समुहाचे प्रतिनिधित्व करत नाहीत , करत असते तरीही मी त्यांच्या समुहावर टीका केली नसती कारण मी आधीच्स आंगितल्या प्रमाणे i dont hate in plural .

केवळ एकटाच व्यक्ती अनेक लोकांच्या भावना दुखावणारे लेखन करत असेल तर त्याला प्रतिवाद कसा करायचा ह्यावर एक स्वतंत्र धागा काढु का ?

आपण मंत्र सामर्थ्याचे फायदे सांगा..... आम्ही तोटे सांगु. नै का ?

असं का ? कोणताही अध्यात्मिक माणुस यनावालांच्या मानगुटीवर बसुन ॐ मंत्राचा जप करा , किंवा गायत्री मंत्राचे अनुष्ठान करा असे मागे लागला होता का ? भोळ्याभाबड्या लोकांनी डिफेन्स का करायचा ? ते कोणाच्या मागे लागले नव्हते की नामस्मरण करा म्हणुन . मंत्रसामर्थ्याचे जे काही फायदे तोटे असतील ते जप करणार्‍या पाशीना ! जर यनावालांवर कोणी सक्ती केली तर त्यांचा त्रागा समजु शकतो पण मागील २ धागे पहाता ते केवळ खुस्पट काढण्यासाठीच लिहितात हे निदर्शनास आले आहे .

अभ्यास आणि वय ह्याच साठी काढले की गोंदवलेकर महाराजांचे प्रवचनाचे अत्यंत सोप्प्या भाषेतील पुस्तक आहे , त्यात कोणतीही गुढता नाही अगदी असिक्षित माणसालाही कळेल अशा भाषेत सोदाहरण महाराजांनी बर्‍याच शंकांचे विवचन केले आहे , ते यनावालांनी वाचलेले दिसत नाही . वाचा असे सुचवले तर तुम्ही म्हणाल ते वाचायला आम्ही बांधील नाही हे उत्तर ठरलेले आहेच . आता सर तुम्हीच सांगा की कोणताही अभ्यास नकरता , केवळ काही तर एकांगी मत बनवुन दुसर्‍यांच्या भाव्ना दुखावणारे लेखन जर कोणी सातत्याने करत असेल तर काय करायचे ?

परत एकदा स्पष्ट करतो की कोणीही सश्रध्द माणुस यनावालांच्या मागे हात धुवुन लागला असेल की मंत्रोच्चारण करा तर यना वालांनी त्या व्यक्तीशी जे काही वाद विवाद असतील ते तिथे सोडवावेत , उगाच सगळ्याच सश्रध्द लोकांच्या भावना दुखावायला काय कारण ?

त्यांच्या मागील धाग्यावरही त्यांची मते कशी एकांगी आहेत ह्यावर सविस्तर प्रतिसाद दिला होता मी http://www.misalpav.com/comment/763528#comment-763528 पण यनावाला लेफ्ट बिहाईन्फ करुन पुढे जातात .

आता ह्या इथे पहा http://www.misalpav.com/comment/771778#comment-771778
हा आयाडी शंकराचार्यांवर काहीच्या काही विधाने करत आहे , त्याला दुवा दे संदर्भ दे म्हणुन सांगितले तर नुसतेच मेगाबायटी प्रतिसाद , संदर्भ नाहीच .

बाकी अन्यत्र मी विचारले होते की ज्या मनुस्मृतीच्या नावाने वैदिक सनातन धर्मावर चिखलफेक करत आहात ती मनुस्मृती कोणत्या वेदाचा , उपनिषदाचा भाग आहे ? तर त्यालाही उत्तर आले नाही !!

असो. एकुणच सध्या ही मिपावर टुम निघाली आहे , इथे धर्माचा कोणी अभ्यासक नसल्याने धर्मावर , सश्रध्द लोकांवर वात्टेल ती चिखलफेक करायची अन कोणी प्रतिवाद केलाच तर "वैयक्तिक टिप्पण्णी " असे म्हणत धोरणांच्या मागे लपायचे !

असो कंटाळा आलाय ह्या सगळ्याचा . सकारात्मक चर्चा तर काही नाहीच उगाचच लोकांच्या भावना दुखावत बसवायला काय अर्थ आहे . नकोच हे सगळे . आम्ही सनातन धर्म, उपनिषदे गीता ,अध्यात्,, संत साहित्य , हे सारे मानतो जे की तुमच्या लेखी भोंदुपणा आहे तर असो बापडे . आम्ही आमच्या अज्ञानात खुष रहातो .

माझा आयडी संपादित केला जावा अशी विनंती आधीच केली आहे . आता पुढील चर्चा भेटी अंती :)

मांत्रिक's picture

19 Nov 2015 - 3:18 pm | मांत्रिक

प्रतिसाद उत्तम प्रगोसाहेब.
+१११

बाळ सप्रे's picture

19 Nov 2015 - 3:42 pm | बाळ सप्रे

संपूर्ण प्रतिसादात मंत्रात सामर्थ्य कसे असते याविषयी काहिही भाष्य करता केवळ यनावालांवर भाष्य आहे. त्यांना गोंदवलेकर महाराजांचे प्रव चनाचे पुस्तक वाचण्याचे आवाहन कशासाठी.. त्यात मंत्रात सामर्थ्य कसे असते हे एखाद्या प्रकरणात दिले असल्यास त्याचे विवेचन इथे देउ शकता.

धर्म आणि अध्यात्मिकता वैयक्तिक असते म्हणून धर्मावरील अथवा अध्यात्मातील एखाद्या गोष्टीवरील टीका वैयक्ति क ठरत नाही.
उदा. जर मला ओंकाराने असा फायदा झाला असे विधान असेल तर टीका करण्याचे कारण नाही. पण ओंकाराने असे असे होते असे विधान केल्यास त्यावर ते कसे काय ही टीका योग्य आहे व विधान करणार्‍याने (समर्थन करणार्‍यानी) ते कसे हे दाखवणे / विवेचन करणे अपेक्षित आहे.

नाखु's picture

19 Nov 2015 - 4:34 pm | नाखु

पण तुमचा प्रतीदावा अगदी बिनबुडाचा+अप्रस्तुत आहे.

प्रगो ने साधे आणि सोपे प्रश्न विचारले की. धागा मजकूरांना कोणी जबरदस्ती/शिफारस्/सल्ला/सुचवणी/आग्रह्/गळ घालणे/दडपशाही केली होती का "मंत्र म्हणण्याची/मंत्राचे सामर्थ्य्/व्य्क्तीमहात्म्य्/साधकाला आलेले अनुभव ऐकलेच पाहिजेत असे ???" याचे उत्तर काय आहे?

ते जर नि:संशय हो असेल तर, ज्याने असे म्हटले तर आणि तरच त्यांनी सदर इसमाने केलेले दावे कशे फोल आहेत याची "धुणी-लक्तरे" येथे धुवावीत. उगा त्या आडून साधा घरातील थोरा-मोठ्यांना नमस्कार करणार्या आणि नित्य देवपूजा करणार्या (बाजार+प्रदर्शन नव्हे )किंवा जप करणार्या लोकांची अवहेलना करू नये.

गमतीचा भाग म्हणजे कंपनीतही/कॉलेजातही/आणि आंतरजालावर असे हिरिरीने देव-धार्मीकता-आस्तीकता नको इतकी ताणणारे वयक्तीक आयुष्यात नेमाने "धार्मीक विधी" करतातच करतात.

राहिली बाब त्या मंत्र सामर्थ्याची क्षणभर मानो मानू ते जप-बिप अगदी भुस्काट/बिनडोक्/अडाणी/मागासलेपणाचे आहे, तरी जोपर्यंत त्याचा इतरांना (काडीमात्र) त्रास होत नाही आणि ती व्यक्ती पूर्णतः फक्त त्यावर विसंबून रहात नाही तो पर्यंत कुणालाही त्याचेवर चिखल्फेक करण्याचा आणि येता जाता टिंगल-टवाळी करण्याचा अधिकार पोहोचत नाही.

आणि हो संदर्भातील कुठल्याही संतानी, तुम्ही "निष्क्रीय" रहा फक्त जप करा असे सांगीतले नाही

माझे खुले आव्हान आहे ज्यांना कुणीही सश्रद्ध असण्याची अगदी अ‍ॅलर्जी आहे, त्यांनी फक्त त्यांचे घरातील वरीष्ठांसमोर, (त्यांच्याही हयात नसलेल्या) जेष्ठांचे छायाचित्र घरात खाली जमीनीवर ठेऊन त्यावर फक्त पाच मिनिटे नाचून दाखवावे ( अर्थात जोड्यांसकट)

हे करण्याची तयारी नसेल तर :

  • त्या हयात वरीष्ठांना वाईट वाटेल म्हणून केले नाही.
  • ती आमची संस्क्रूती नाही (या धाग्यावरचा अगदी समर्पक प्रतीसाद घाटपांडे सरांनी दिला आहे, धन्य्वाद सर)
  • आम्हाला काहीही सिद्ध करण्याची गरज नाही.

असली तथ्यहीन आणि पळवाटीची कारणे देऊ नयेत.

तुमच्या घरातील जेष्ठांच्या जितक्या भावना छायाचित्रांमध्ये आहेत नि तितक्याच ईथल्या पापभीरू लोकांच्या आहेत आणि माझ्यासकट कुणीही प्रतीसादक आंधळा नाही(तापात डॉक्टरकडे जायचे सोडून अंगारे धुपारे करीत बसत नाही.

झुंडशाही असह्य झाली म्हणून टंकले अन्यथा मी अश्या धाग्यांपासून दूर राहतो.

भाऊंचे भाऊ's picture

19 Nov 2015 - 9:08 pm | भाऊंचे भाऊ

हा आयाडी शंकराचार्यांवर काहीच्या काही विधाने करत आहे

अद्वैत सिध्द्दांत कर्म सिध्दांताला उघड उघड क्रॉस जातो इतके साधे सोपे म्हणने आहे. या पलिकडे मी काहीही अभिप्रेत करत नाही. तसेच मायावाद ( मायेचे जे स्पश्टीकरण) आहे त्यातील काही भाग बुध्द तत्वज्ञानातील जगाच्या स्पश्टीकरणाशी काही साम्य दाखवतो यापलीकडे माझे कोणतेही म्हणने नाही. उलट तुम्ही(अथवा कोणीही) माझ्या समजुतींना छेद द्याल असे कोणतेही अधिकृत रेफरंस समोर आणले तर मी ते आवश्य आत्मसात करेन हीच माझी आपणा साधुभावस्थिर लोकांना नम्र विनंती आहे. कृपया मला सश्रध्द आणी अश्रद्ध यापैकी कोनत्याही कॅटेगरीमधे बसवु नये ते अद्वैत सिध्दांता विरोधी ठरेल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Nov 2015 - 7:32 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संपूर्ण प्रतिसादात अजूनही व्यक्तीगत टीकाच दिसते. यनावाला यांनी जे लिहिलं त्या विरोधात प्रतिसाद लिहायला हवा होता. गेली आठ वर्ष यनावाला यांना मी व्यक्तीगत ओळखत नाही पण केवळ त्यांच्या लेखनाला ओळखतो त्यांचं लेखन नेहमीच नव विचार आणि विवेकाशी बांधील असते आणि त्यांच्या लेखनीचं ते वैशिष्ट्यच आहे. कोणत्याही परंपरावादी माणसाला ते पटणारं नसतं. आपल्याला लेखकाचं म्हणनं पटत नाही, त्या विषयाचा उत्तम प्रतिवाद व्हावा. लेखकाला कोणी मंत्र म्हणा म्हणु कोणी सश्रद्ध माणुस लेखकाच्या मागे लागले नाहीत, म्हणुन त्यांना वाटत असलेल्या फोलपणाबद्दल काही लिहुच नये, किंवा लिहायचं असल्यास त्यांनी अभ्यास करुन लिहावं हे न पटणारं आहे. यनावालांचा अभ्यास काही उगं आंकाड तांडव करणार्‍या प्रतिसादापेक्षा खुप चांगला आहे यावर माझा विश्वास आहे.

प्रगो एक गम्मत आठवली. मुलींना शिक्षण मिळालं पाहिजे, त्या शाळेत गेल्या पाहिजेत असा जेव्हा विचार आला तेव्हा परंपरावाद्यांनी अशीच काहीसा आरडाओरडा केल्याचे आठवण झाली. केसरीमधी लेखाचे शीर्षक होतं

हिंदुस्थान देश बुडाला, हो, ठार बुडाला.

हे रानडे आणि भांडारकर हे पंडित आणि हे मोडक हे आमच्या समाजाचे पुढारी यांच्या अकला गेल्या तरे कोठे. ज्या वयात बुद्धी आणी विचारशक्तीचा पूर्ण विकास व्हावयाचा व चांगली गोष्ट कोणती वाईट कोणती हे चांगले कळावयाचे त्या त्या वयातच यांना चळ तर लागला नाही ना ? यांना इतके दिवस आम्ही मोठे शहाणे समजत होतो पण आज आता समजली यांची अक्कल सुदैवाने बरे झाले की यांचे बुद्धीमांद्य लवकर बाहेर पडले नाही तर महारष्ट्रात देशातील चटसारी माणसे यांच्या जाळ्यात सापडती काय यांचा हा अविचार.....

बायकांना गाड्यात घालून शाळेत धाडण्याचे हे भिकार चाळे या समाजग्रणींना, परमेश्वरा कोठुन रे सुचले आमची वाट काय होनार शिव शिव शिव यांच्या लहररुपी भोवर्‍यात आमचे सुधारणारुप तारु गर्र गर्र फेर्‍या खाऊन अखेरीस तळ पाहणार किंवा यांच्या तब्यतरुप झंझाच्या झपाट्याने सापडून फजित्यांचे खडकावर त्यांची छकले होणार यांच्या अंधत्वामुळे मुर्खत्वामुळे अविचारित्वामुळे सगळ्या हिंदुस्थानास नाचण्याची अंबील आणि कळण्याच्या भाकरी यावर राहण्याचा प्रसंग येणार. हिंदुस्थानची संपत्ती स्त्री शिक्षणाकडे लावण्यापेक्षा ती समुद्रात तरी का नाही लोक ओतीत.....[केसरीतील निवडक निबंध. पृ. २११]

स्त्री शिक्षणाबद्दल तेव्हाचा आरडा ओरडा पाहुनही स्त्री आज शिकली म्हणुन अनेक गोष्टी सोप्या झाल्या. आधुनिक विचार मांडणार्‍या लेखकाचा नव विचार असाच न पटणारा असतो, तेव्हा लिहिण्यार्‍यांना लिहु द्यावं. कोणी लेखन म्यान करावी म्हणुन वाईट वाटेल इतकं व्यक्तिगत लिहु नये इतकेच माझं म्हणनं आहे.

बाकी आयडी संपादित करण्याची गरज नाही लिहित राहावे वाद व्हावेत आणि वाचकाला कोणत्या तरी एका विचाराच्या बाजुने जाता यावं इतकं जरी झालं तरी मिपाचा आपण योग्य उपयोग केला असे म्हणु नै का. भेटल्यावर बोलूच. :)

-दिलीप बिरुटे

अर्धवटराव's picture

20 Nov 2015 - 12:58 pm | अर्धवटराव

पण केवळ त्यांच्या लेखनाला ओळखतो त्यांचं लेखन नेहमीच नव विचार आणि विवेकाशी बांधील असते आणि त्यांच्या लेखनीचं ते वैशिष्ट्यच आहे.

यातलं काहिच दिसत नाहि लेखनात (चला.. फार तर क्वचीत दिसतं म्हणुया :) ).

आरोह's picture

15 Nov 2015 - 9:42 pm | आरोह

पॅरासिटॅमॉल चे चपखल उदाहरण

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Nov 2015 - 2:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पॅरासिटॅमॉल गोळीचं उदाहारण १००% परफेक्ट.
धन्यु !

-दिलीप बिरुटे

हेमंत लाटकर's picture

9 May 2016 - 4:15 pm | हेमंत लाटकर

जगाच्या चार कोपर्यांत चौघांना बसवा.

पृथ्वी गोल आहे.

मनीषा's picture

15 Nov 2015 - 2:44 pm | मनीषा

हा लेख वाचताना ' घनदाट काळोखात आशेचा किरण ' की काय ते बघितल्याप्रमाणे वाटले.
हल्ली मला मी मिपा वर आले आहे की नैमिष्यारण्यात ? हेच कळेनासे झाले होते.
गेल्या काही काळात इथे मंत्र, तंत्र, जपजाप्यं, गंडे, दोरे, नाड्या इ. ची अक्षरशः गुंतवळ झाली होती. अर्थात तो गुंता या एका लेखाने सुटेल असे नाही.

जप अथवा श्लोक पठणाचा उपयोग मन, विचार स्थिर करण्यासाठी होतो हे मात्रं खरे आहे.

तसेच 'ओम' च्या उच्चारणाबद्दल... विविक्षित पद्धतीने म्हणल्यास त्याचा फायदा होतो.
योगासनांच्या वर्गात, आम्हाला सर्वात शेवटी 'ओम' म्हणण्यास सांगत असत.
काही गायक/गायीका स्वर शुद्ध आणि साफ लागण्यासाठी, रियाजाला सुरुवात करण्या आधी ओम चे उच्चारण करतात असे ऐकले आहे.
अर्थात त्याचा उपयोग श्वसन प्रक्रिया सुयोग्यं पद्धतीने आणि नियमित करण्यासाठी होत असणार.

साती's picture

15 Nov 2015 - 2:48 pm | साती

चांगला लेख!
मागे व्हॉटसॅपवर एका ग्रूपात एकाने ॐ कसा अमुक डेसिबलचा नी कसा तसा प्रभावी आहे याचे प्स्यूडोसायंटीफीक विवेचन केले होते. कुणा एका प्रसिद्ध जर्मन विद्यालयातील अस्तित्वात नसणार्‍या भौतिकशास्त्रज्ञाचा हवाला दिला होता.
पाठवणारा डॉक्टर होता.
मात्र त्यात ॐ ची म्हणून जी काही फ्रिक्वेन्सी दिली होती ती मानवी कानांनी ऐकता येण्यापलीकडची होती.
आणि ॐकार तर आपण स्पष्ट ऐकू शकतो.
हे त्याच्या निदर्शनास आणून दिल्यावर तो चिडला आणि धर्माला उगाच इतक्या विज्ञानाच्या कसोट्या लावू नकोस, तुला आपल्या धर्माचे काही प्रेम नाही का, हे डेसिबलका काय ते प्रत्येकाने कुठे तपासायचे असे काय काय विचारू लागला.
मी म्हटलं आपण एम बी बी एस च्या पहिल्या वर्षालाच कुठली फ्रिक्वेन्सी ऐकू येते नी कुठली नाही, आवाज कसा काम करतो हे सगळे शिकलोय. हे सारे कुणा अज्ञान्याने दुसर्‍या अज्ञान्याला पाठवले असते तर ठिक. पण तू स्वतः डॉक्टर असून , डॉक्टरांच्या ग्रूपवर फॉर्वर्ड काय करतोयस. तर अर्थातच माझी धार्मिक अक्कल निघाली.
:)

मला काय म्हणायचेय, तुम्ही धर्मात आहे म्हणून अगदी प्रेमाने ॐकार म्हणा, पण मग प्स्यूडोविज्ञानाचा आधार देत 'हे कसे सायंटीफिक' सांगत फिरू नका.
आणि तुम्ही विज्ञानाचा आधार देत ते प्रूव्ह करायला पहाताय आणि आम्ही विज्ञानाचा आधार घेत तेच डिसप्रूव केलं तर आमच्या धार्मिकतेची लगेच ऐशीतैशी करू नका.

मारवा's picture

15 Nov 2015 - 3:50 pm | मारवा

+१
हे असे आकडी प्रतिसाद मला अजिबात कधीच आवडत नाही
मात्र आज पहील्यांदा मला दुसर काहीच न लिहीता आल्याने
सातीजी खरच आवडला तुमचा प्रतिसाद

साती's picture

15 Nov 2015 - 6:24 pm | साती

:)

प्रकाश घाटपांडे's picture

15 Nov 2015 - 4:42 pm | प्रकाश घाटपांडे

गण गण गणात बोते या मंत्रात मानवाचे हित जपले आहे. विश्वकल्याणासाठी तो मंत्र आहे असे म्हाराजांच्या एक भक्ताने लिहिले होते.

मारवा यांनी कायद्याचा अभ्यास केलाच आहे. तुम्ही तर पोलीस होतात. बिनविषारी असलात तरी काय झाल ? साप चावल्याच्या भितीने माणस मरतात. मनात आणल तर the Maharashtra Prevention and Eradication of Human Sacrifices, Evil and Aghori Practices and Black Magic Ordinance, 2013, खाली केस ठोकु शकाल.

करायची सुरवात की मुहुर्त बघायचा आहे ?

अरेरे, दिवाळी पाडवा पण गेला. हिंदु संस्कृतीत साडेतीन मुहुर्तापैकी एक होता. आता गुढी पाडव्यापर्यंत वाट पहा.

याॅर्कर's picture

15 Nov 2015 - 6:21 pm | याॅर्कर

नवीन वर्षाची सुरूवात चांगली झाली कि तुमची!!!

श्रीगुरुजी's picture

15 Nov 2015 - 6:27 pm | श्रीगुरुजी

ॐ चे नक्की माहित नाही. परंतु अल्ला हो अकबर या मंत्रात अनेकांना प्रेरणा देण्याचे सामर्थ्य आहे हे जगात सर्वत्र दिसून आले आहे.

पगला गजोधर's picture

15 Nov 2015 - 6:38 pm | पगला गजोधर

'मंत्र' आणि 'घोषणा/ नारा', यांत आपल्यासारख्या विद्वानाने घोळ करावा, या सारखे दुर्देव काय एका महान धर्माचे. हन्त हन्त

आनंदी गोपाळ's picture

15 Nov 2015 - 7:15 pm | आनंदी गोपाळ

श्रीगुरुजी व त्यांचे समविचारी तर हा मंत्र ऐकताच चवताळून उठतात, हे एकदा नव्हे तर अनेकदा दिसून आले आहे.

बाप्पू's picture

15 Nov 2015 - 6:54 pm | बाप्पू

+१ श्रीगुरुजी
दादा दरेकर , तर्रात जोकर यांच्या प्रतीक्षेत. .

मोगा's picture

15 Nov 2015 - 7:41 pm | मोगा

...

चौकटराजा's picture

15 Nov 2015 - 7:01 pm | चौकटराजा

लहानपणी विचित्र विश्व नावाचे मासिक वाचनात यायचे त्यात सगळे दाखले परदेशातले असायचे तसेच हे अध्यात्म संशोधक कुठले न तपासता येणारे दाखले देत असतात त्याने करमणूक या पलिकडे काहीही होत नसते.स्वत: तुम्ही घेउ शकाल असा सोपा अनुभव सांगतो .काळ्या कसदार मातीत पोट्याशियम परम्गग्नेट मिसळा त्यावर समिधा पसरा .साजूक तुपात ग्लिसरीन मिसळा ते समिधावर चमच्याने ओतत रहा व बोम्ब मारा .समिधा पेटू लागतात .अहो अग्निशिवाय समिधा पेटतात .असे आहे बोम्ब मारण्यातील मन्त्र सामर्थ्य !

आदूबाळ's picture

15 Nov 2015 - 7:22 pm | आदूबाळ

मूळ प्रतीत ते "बॉम्ब मारा" असं असेल.

मारवा's picture

15 Nov 2015 - 7:45 pm | मारवा

समिधाच सख्या या त्यात कसा ओलावा
कोठुनी फुलापरी मकरंद वा मिळावा
जात्याच रुक्ष या एकच त्या आकांक्षा
तव आंतर अग्नि क्षणभर फुलवावा

कुसुमाग्रज

माहितगार's picture

15 Nov 2015 - 8:05 pm | माहितगार

साधारणतः अशा स्वरुपाचे अतीरंजनावर टिका करणारा, काही प्रश्न उपस्थीत करणारा वि.का. राजवाडेंचा लेख आठवणीत आहे, पुन्हा मिळाल्यास हवा आहे.

या लेखातील मुद्दे आवडले. प्रकाश घाटपांडे यांचे 'आल्या मतंर' सातींचे पॅरासिटामॉल हि उदाहरणेही आवडली.

अभिजीत अवलिया's picture

15 Nov 2015 - 8:25 pm | अभिजीत अवलिया

हे मंत्र, वास्तुशास्त्र थोतांड आहे. तसेच जवळपास प्रत्येक गावात असणारे महाराज देखील खोटेच असतात असे माझे स्पष्ट मत आहे. ह्या बहुतेक महारांजाचे चमत्कार देखील सारखेच असतात. जसे की गाडीत पाणी टाकून गाडी चालू केली, कुणाचा बरेच दिवस बरा न होणारा आजार हात फिरवून बरा केला.
मी आणी माझा भाऊ पूर्णपणे नास्तिक असल्याने असले मंत्र म्हणणे, घराची वास्तुशांती करणे, महारान्जाची भक्ती करणे असले प्रकार पूर्णपणे फाट्यावर मारतो. अर्थात त्याबद्दल घरच्यांची बोलणी देखील खावी लागतात.

संदीप डांगे's picture

15 Nov 2015 - 9:58 pm | संदीप डांगे

मला, शंभर झाले की बोलवा... पण यनावाला उत्तरे देतील असे वाटत नाही.

संदीप जी
मी यथाशक्ती माझ्या कुवतीप्रमाणे उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो
फक्त एकच नम्र विनंती आहे लिंका देउन वाचायला नका लाऊ.
सरळ तुमचे मत काय ते मांडुन द्या. इथल्या चौकटीतच चर्चा करु.
कारण लिंक लिंक ला काही अर्थ नाही तुम्ही ४ देणार मी ४ देणार परत ते उधार सर्व.

संदीप डांगे's picture

15 Nov 2015 - 10:42 pm | संदीप डांगे

लिंका..? कधी दिल्या मी?

आणि दिल्यातरी लिंका वाचणे आवश्यकच आहे हो, तेवढं सगळं परत टायपत बसायला वेळ नसतो लोकांकडे.

संदीप जी
तुम्ही मला दिल्या अस नाही म्हणत मी
मला म्हणायचय लिंका कस असत ना १ तुम्ही देता १ मी देतो
त्या साखळी ला अंत नसतो आपण इथे समोरासमोर आहोत ना
तर समजा एक लिंक मध्ये तुमचा आवश्यक मुद्दा आहे तर तुम्हाला ज्या अर्थी तो महत्वाचा वाटतो तुम्ही वाचला असेलच तर त्यावीषयी किमान सारभुत सुत्ररुपात तुम्ही इथे लिहुच शकता की नाही ?
व मी ही तेच जर केल तर मग तो लिंक वाचण लिंक पाहण यात चर्चा अडकत नाही.
मग मी तुम्हाला ४ पुस्तक वाचा म्हणेन तुम्ही मला ४ पुस्तक वाचा म्हणणार आपण आता वाचु शकतो का नाही ना ?
मग आतापर्यंत तुमच जे सार आहे ते तुमच्या स्वतःच्या च शब्दात मांडळ व मी ही माझ सार मांडल
तर चर्चा अधिक प्रामाणिक अर्थपुर्ण होइल असे मला वाटते.
मुळात स्वयंपुर्ण होईल.
हे म्हणजे आपण परीक्षेला बसलो की मग वाचण सगळ बंद करतो ना
आता समोर प्रश्न आहेत व सोडवायचे आहेत जे आठवेल जितक शिकलोय जो अनुभव आहे ते सर्व पणाला लावुन
गेट बंद झालेल आहे अशा अर्थाने
समजा आपल्या लिंका पेपर पुस्तके जप्त झालेली आहेत.

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Nov 2015 - 10:17 pm | बिपिन कार्यकर्ते

मंत्र सामर्थ्य, अध्यात्म, विज्ञान, यनावाला, त्यांचे आयुष्य, त्यांचा असलेला / नसलेला अधिकार वगैरे गोष्टी बाजूला ठेवू क्षणभर... पण अध्यात्माची बाजू घेणारे, स्वत:अध्यात्मिक असल्याचे मानणारे, साधना वगैरे करणारे टीका झाली की कसे चवताळून उठतात आणि बेताल व वैयक्तिक टीका करतात / टिप्पण्या करतात ते पाहिले की मौज वाटते. चालू द्या... साधना चालू द्या. जमेल कधी तरी.

आणि नास्तिकवादाचे अनुयायी मुळात कोणताही अधिकार नसणारे, कोणताही आध्यात्मिक अनुभव नसणारे जेव्हा ओंकार व गायत्री मंत्राविषयी वाटेल ते बरळतात, तेव्हा आस्तिकांनी गप्पच बसावे का? इतर सश्रद्ध माणसांचे यात नुकसान होत नाही का? आणि हो, गायत्री मंत्र व ओंकार यांचा अपमान होत असताना तुम्ही गप बसता व नंतर फक्त आस्तिकांना सल्ले देता, यात काही पार्शलिटी होत नाही का?
खरंच सांगा, त्यांचे उद्गार मानवतेला एकत्र आणणार्या वेदांत तत्वज्ञानाचा अपमान करत नाहीत काय?

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Nov 2015 - 10:50 pm | बिपिन कार्यकर्ते

अपेक्षित प्रातिसाद. असो. आता तोंड उघडलेच आहे तर अजून थोडे बोलतो.

माझा रोख / माझी टिप्पणी बेताल आणि संतापाच्या भरात केलेल्या वैयक्तिक टीकेकडे होता. वादाचा प्रतिवाद करू नये असे कुठेच / कधीच म्हणत नाही मी. अर्थातच, तुम्हाला ते कळलेले दिसत नाही. जाऊ द्या झालं.

***

आणि नास्तिकवादाचे अनुयायी मुळात कोणताही अधिकार नसणारे, कोणताही आध्यात्मिक अनुभव नसणारे जेव्हा ओंकार व गायत्री मंत्राविषयी वाटेल ते बरळतात, तेव्हा आस्तिकांनी गप्पच बसावे का?

नका बसू. नकाच बसू. बोला. बाजू मांडा. पण तुम्ही अध्यात्मिक आहात ना? साधना करता ना? मग ते दया, क्षमा, शांती, करुणा वगैरेंचं काही भान ठेवा की. का ते ही जाऊच द्यायचं? जाऊ द्या तर जाऊ द्या.

इतर सश्रद्ध माणसांचे यात नुकसान होत नाही का?

तुम्ही अध्यात्मिक आहात. प्रारब्ध वगैरे मानतच असाल ना? आणि हो... ते सश्रद्ध आणि त्यांचे सद्गुरू काय ते बघून घेतील ना नुकसानीचं.

आणि हो, गायत्री मंत्र व ओंकार यांचा अपमान होत असताना तुम्ही गप बसता व नंतर फक्त आस्तिकांना सल्ले देता, यात काही पार्शलिटी होत नाही का?

चुकीचे गृहितक. त्यामुळे पुढचे गैरलागू.

खरंच सांगा, त्यांचे उद्गार मानवतेला एकत्र आणणार्या वेदांत तत्वज्ञानाचा अपमान करत नाहीत काय?

होतही असेल किंवा नसेल. पण त्यांचा प्रतिवाद करा. तुकाराम महाराजांच्या अंगावर धावून जाणार्‍या मंबाजीने खरा वेदांचा अपमान केला असे मला वाटते. ’मानवतेला एकत्र आणणार्‍या’ वेदांना प्रमाण मानणार्‍यांनी शतकानुशतके मानवांना जनावर बनवून वागविले त्यामुळे वेदांचा अपमान झाला असे मला वाटते. पण ते एक असोच.

पण तुम्ही अध्यात्मिक आहात ना? साधना करता ना? मग ते दया, क्षमा, शांती, करुणा वगैरेंचं काही भान ठेवा की. का ते ही जाऊच द्यायचं? जाऊ द्या तर जाऊ द्या. हा फुकट सल्ला आध्यात्मिक माणसाला देणं सोपं आहे. पण जो व्यक्ती अध्यात्माचा ओ की ठो न कळता उगाच बाष्कळ बडबड करत सुटलाय त्याला तुम्ही काहीच सूचना न देता केवळ मलाच सल्ले देत सुटलाय याला म्हणतात पार्शलिटी....
असो. तुमचा पूर्ण प्रतिसाद पार्शलिटीने भरलाय म्हणून काहीच बोलत नाही. चालू द्या स्वमतांध दांभिकता.

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Nov 2015 - 11:02 pm | बिपिन कार्यकर्ते

_/\_

mystic man's picture

15 Nov 2015 - 11:05 pm | mystic man

तुम्हालाही नमस्कार....

मृत्युन्जय's picture

16 Nov 2015 - 2:19 pm | मृत्युन्जय

कसे चवताळून उठतात आणि बेताल व वैयक्तिक टीका करतात / टिप्पण्या करतात ते पाहिले की मौज वाटते.

बिका त्यासाठी अध्यात्माला कशाला मध्ये आणता? टीका झाल्यावर चवताळुन उठणारे अस्स्तिकच असतात असे काही नाही. नास्तिकही तसेच चवताळुन उठतातच की. किंबहुना असा अनुभव आहे की नास्तिक जास्त चेकाळतात. बेताल आणि वैयक्तिक टीका करण्यामागेही अध्यात्माचा काहिच दोष नाही. मनुष्यस्वभाव आहे तो. योग्य आहे असे म्हणत नाही पण चेकाळुन बेताल वक्तव्य करणार्‍यात नास्तिक अजिबात कमी नसतात किंबहुन स्वत:च्या तर्क्बुद्धीचा त्यांना इतका दर्प असतो की कधीकधी ते जास्त बेताल वक्तव्ये करतात.

अध्यात्माचा उपयोग मनःशांती साठी होतो. ऑंकार पठनाने मन हलके झाल्यासारखे वाटते. पवित्र वाटते. याहुन जास्त ऑंकारात ताकत असेल तर मला माहिती नाही प्रत्ययही नाही. होम हवन केल्याने देखील असेच पवित्र वातावरण तयार होते असे वाटते. आणि जर एखाद्याला तसे वाटत असेल तर जपजाप्य अथवा होमहवन करणे यात काहिच चुकीचे आहे असे मला वाटत नाही. त्याउप्पर आपली मते दुसर्‍यावर लादण्याच्या इर्ष्येने जेव्हा नास्तिक लोक फुकाची बडबड करतात तेव्हा मलाही मौजच वाटते. परंतु याचा संबंध त्यांच्या देवावर विश्वास नसल्याशी आहे असे काही मला वाटत नाही. तो ही अट्टाहासापायी आलेला एक मनोविकारच आहे असे मानुन मी सोडुन देतो.

थोडक्यात सांगायचे तर अध्यात्म किंवा कर्मकांडे यामुळे चमत्कार घडतील अशी काही माझी अपेक्षा नाही पण त्यामुळे एका ठराविक मर्यादेपर्यंत मनःशांती नक्की मिळते. त्याहुन जास्त सामर्थ्य त्याच्यामध्ये किंवा कर्त्यामध्ये असते किंवा असु शकते याबद्दल काही माहिती नाही पण इतके नक्की कळते की एखाद्या माणसाची मनस्थिती खराब असेल तर त्याच्यावर या सगळ्या गोष्टींचा प्रभावही कमी पडेल किंवा पडणारच नाही.

संदीप डांगे's picture

16 Nov 2015 - 2:29 pm | संदीप डांगे

शंभर टक्के सहमत...

प्रस्तुत लेख ज्या हिनपणाने सश्रद्ध माणसांच्या भावनांची खिल्ली उडवतो त्यावरून नास्तिक कसे वागतात याबद्दल आपल्या प्रतिसादातून सांगितलेले सोदाहरण पटते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Nov 2015 - 2:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>>>किंबहुना असा अनुभव आहे की नास्तिक जास्त चेकाळतात

असं काही नाही दोघेही सारखेच असतात. संख्या आणि आवाज कोणाचा जास्त आहे, त्यावरही चेकाळणे अवलंबून असते. बाकी काही मंत्राने मन:शांती बिंती लाभत नसते असं माझंही व्यक्तिगत मत आहे.

-दिलीप बिरुटे

मार्कस ऑरेलियस's picture

16 Nov 2015 - 3:07 pm | मार्कस ऑरेलियस

कसे चवताळून उठतात आणि बेताल व वैयक्तिक टीका करतात / टिप्पण्या करतात ते पाहिले की मौज वाटते.

ती त्यांची स्टाईल असेल हो . चालायचेच .

मिपा वर हा एक ट्रेंड आहे , एकट्या दुकट्याने मोठ्या समुहाच्या भावनांवर चिखलफेक करायची अन त्या समुहातल्या कोणी तरी प्रत्युत्तर दिले की वैयक्तिक टिपण्णी , व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला असले गळे काढायचे !

सुंदर प्रतिसाद रे मृत्युंजया

एकदम परफेक्ट शब्दात मांडलेस

स्नेहांकिता's picture

17 Nov 2015 - 3:06 pm | स्नेहांकिता

बिका त्यासाठी अध्यात्माला कशाला मध्ये आणता?

मला वाटतं, बिकांनी अध्यात्माला मध्ये आणलेलं नसून, वैयक्तिक टीका टाळून अभ्यासूंनी योग्य प्रकारे अध्यात्माची बाजू इथे मांडावी असं म्हटलंय.

अध्यात्माचा उपयोग मनःशांती साठी होतो. ऑंकार पठनाने मन हलके झाल्यासारखे वाटते. पवित्र वाटते.

१०० टक्के सहमत. पण हे जे काही तुम्हाला-आम्हाला हलके, पवित्र 'वाटते', ते सापेक्ष आहे. एखाद्या अधार्मिक व्यक्तीचे मन:शांतीचे परिमाण वेगळे असू शकते.
तस्मात, कुणी कुणाला नावे ठेवण्यपेक्षा किंवा असे लिहिलेच कसे म्हणण्यापेक्षा सुयोग्य प्रकारे प्रतिवाद करावा, ही अपेक्षा बिकांची दिसते, असे मला वाटते.

मार्कस ऑरेलियस's picture

17 Nov 2015 - 3:46 pm | मार्कस ऑरेलियस

सुयोग्य प्रकारे प्रतिवाद

ह्यॅ ह्यॅ ह्यॅ . सुयोग्य प्रतिवाद आला की लगेच खालील पैकी प्रतिसाद द्यायचा

१. तो तुमचा समज आहे.
२. चालूद्या तुमचे निरर्थक अत्मरंजन / अत्मकुंथन .
३. तुम्ही निरर्थक भ्रमवादाचे बळी आहात.
४. आपणास मुद्दा कळलेला नाही.

|| श्री तांब्याराम प्रसन्न ||

( श्रेयाव्हेर : माणणीय सरांच्या एका जुन्या प्रतिसादातुन कॉपीपेस्टीत )

अत्रुप्त आत्मा's picture

17 Nov 2015 - 6:00 pm | अत्रुप्त आत्मा

टनाटनी काय आ.............णे ती मळ मळ!

मृत्युन्जय's picture

17 Nov 2015 - 5:50 pm | मृत्युन्जय

पण अध्यात्माची बाजू घेणारे, स्वत:अध्यात्मिक असल्याचे मानणारे, साधना वगैरे करणारे टीका झाली की कसे चवताळून उठतात आणि बेताल व वैयक्तिक टीका करतात / टिप्पण्या करतात ते पाहिले की मौज वाटते.

मी फक्त वरील वाक्याला उद्देशुन तो प्रतिसाद लिहिला आहे. इथे बिकांचा रोख अध्यात्मिक माणसांकडे आहे म्हणजे "अध्यात्म" मध्ये आलेच. इथे एका ठराविक प्रकारच्या लोकांबद्दल लिहिले आहे म्हणुन त्याच्या विरुद्ध मताचे लोकही याच चुका करतात त्यामुळे माणूस अध्यात्मिक आहे की नाही हे इथे पुर्णतः गैरलागू आहे. तस्मात अध्यात्माला मध्ये आणू नये असे लिहिले होते.


१०० टक्के सहमत. पण हे जे काही तुम्हाला-आम्हाला हलके, पवित्र 'वाटते', ते सापेक्ष आहे. एखाद्या अधार्मिक व्यक्तीचे मन:शांतीचे परिमाण वेगळे असू शकते. तस्मात, कुणी कुणाला नावे ठेवण्यपेक्षा किंवा असे लिहिलेच कसे म्हणण्यापेक्षा सुयोग्य प्रकारे प्रतिवाद करावा, ही अपेक्षा बिकांची दिसते, असे मला वाटते.

अगदी बरोब्बर. आणि मलाही असेच वाटते. त्यामुळेच नास्तिक लोक जेव्हा आपली मते (त्यांची ती मते. आस्तिकांच्या त्या अंधश्रद्धा) इतरांवर लादण्याचा प्रयत्न करतात तेव्हा गंमत वाटते. तुम्ही जे म्हणत आहात अगदी तेच मी म्हटले आहे माझ्या मागच्या प्रतिसादात. खाली उद्धृत करतो:

आणि जर एखाद्याला तसे वाटत असेल तर जपजाप्य अथवा होमहवन करणे यात काहिच चुकीचे आहे असे मला वाटत नाही. त्याउप्पर आपली मते दुसर्‍यावर लादण्याच्या इर्ष्येने जेव्हा नास्तिक लोक फुकाची बडबड करतात तेव्हा मलाही मौजच

वाटते.

मी मिपावर जितके प्रतिसाद पाहिलेत त्यात कुठेही (काही माझ्याकडुन नजरचुकीने राहुन गेले असतील म्हणुन ९५% प्रतिसादात म्हणुयात वाटल्यास) कुणी आस्तिकाने कुठल्या नास्तिकाला "हॅहॅहॅ रे येड्या. नास्तिक तु. तुला काय कळते. देवावर विश्वास ठेवायला शिक जरा नाहितर गाळात जाशील" टाइपचे प्रतिसाद दिलेले दिसत नाहित. या उलट आस्तिकांचे रेवडी उडवणारे, आपणचे काय ते हुषार अश्या थाटाचे, आपली मते आस्तिकांवर लादायचा प्रयत्न करणारे, आस्तिक - नास्तिक वाद उकरुन काढणारे नास्तिकांचे अनेको प्रतिसाद, आणि धागे पाहिलेत (मजे मजेत लिहिलेले आणि डु आयडींनी मुद्दाम उकीर्डे फुंकण्यासाठी टाकलेले प्रतिसाद सोडुन देउ आपण. ते खोडसाळपणेच लिहिलेले असतात)

बाकी सुयोग्य प्रकारे प्रतिवाद करावा अशी बिकांची अपेक्षा असावी याबद्दल माझे काहिही दुमत नाही. गंभीरपणे चर्चा करणार्‍या कुठल्याही माणसाची असेल. माझीही आहे. बिकांबद्दल तर खात्री आहे. पण त्यांचा वरचा प्रतिसाद हा सुस्प्ष्टपणे आस्तिक लोकांच्या प्रतिसादांबद्दल होता. मी त्यात थोडासा बदल केला. आस्तिक लोक चुकीचे प्रतिसाद देतच नाहित असा काही माझा दावा नाही पण नास्तिक या बाबतीत कांकणभर सरसच आहेत असे मी माझ्या प्रतिवादात म्हटले आहे.

बिकांनी केवळ

"टीका झाली की लोक कसे चवताळून उठतात आणि बेताल व वैयक्तिक टीका करतात / टिप्पण्या करतात ते पाहिले की मौज वाटते."

असे लिहिले असते. तर हा आणी त्याच्या आधीचा प्रतिसाद लिहिलाही नसता. पण त्यांच्या प्रतिसादात "पण अध्यात्माची बाजू घेणारे, स्वत: अध्यात्मिक असल्याचे मानणारे, साधना वगैरे करणारे टीका झाली की ......" असे आस्तिकंना उद्देशुन असलेले स्टेटमेंट आल्यामुळे तो प्रतिसाद लिहिला.

आस्तिक काय किंवा नास्तिक काय शेवटी माणसेच. आणि माणासांचे सगळे विकार दोन्ही विचारधारेच्या व्यक्तींमध्ये असणारच. एवढे सांगण्यासाठी तो प्रतिसाद.

बॅटमॅन's picture

17 Nov 2015 - 5:56 pm | बॅटमॅन

कसंय ना मृत्युंजयसाहेब, आस्तिक = मूर्ख, अडाणी, विचार करण्यास अक्षम हे समीकरण सध्याच्या पर्सन ग्रेडिंग अल्गोरिदममध्ये इनबिल्ट बसलेले आहे. किती कुणी विवेकवादी वगैरे झाला तरी त्या कोडची लागण कमीजास्त प्रमाणात झालेलीच असते, त्याला काय करणार?

सुबोध खरे's picture

15 Nov 2015 - 10:24 pm | सुबोध खरे

मी आस्तिक आहे कि नास्तिक
मला नक्की माहित नाही. लौकिकार्थाने मी रोज पूजा करत नाही. किंवा मी आजतागायत सिद्धिविनायक, तिरुपती, शिर्डी किंवा शेगावला गेलो नाही. समोर देऊळ आले तर नमस्कार करतो. कोणताही देव असेल तरीही
कारण आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरम
सर्व देव नमस्कारः केशवं प्रती गच्छति यावर श्रद्धा आहे. मुद्दाम हून कुणालाही त्रास होईल असे कृत्य करीत नाही.
लहान पणची एक आठवण अशी आहे -- चौथी पाचवीत असेन. आगीशी/ ज्योतिशी खेळणे हा आवडता छंद होता. संकष्टीचा दिवस होता आई निरांजन लावून बाहेर गेली होती. निरांजनातील वात वर खाली करण्याच्या नादात ती विझली. तेवढ्यात आई देवघरात आली आणि मी निरांजनाशी खेळतो आहे आणि मी ज्योत विझवली हे तिने पाहिले. तो ओरडली आणि म्हणाली नास्तिक असलास तरी चालेल नालायक होऊ नकोस,
राहिली गोष्ट मंत्रसामर्थ्याबद्दल - मंत्र खरोखरच इतके सामर्थ्यवान असतात का?
शारीरिक सामर्थ्य मंत्र देऊ शकतील का? बहुधा नाही
मानसिक सामर्थ्य मंत्र देतात का? कदाचित होय.
माणूस काम करीत असतो पण त्याचा स्वतःवर संपूर्ण विश्वास नसतो कारण बर्याच गोष्टी मानवाच्या हातात नसतात. मग एखाद्या मोठ्या वयोवृद्ध माणसाने सांगितले कि सर्व ठीक होणार आहे तर त्यावर त्याचा विश्वास बसतो. माणसाला टोकाची परिस्थिती असेल तर कुणाचा तरी हात पाठीवर हवासा वाटतो. भारत सरकार विरुद्ध सर्वोच्च न्यायालयातील खटल्याचे वेळेस माझे वडील माझ्या पाठीशी उभे होते. इतका प्रचंड मानसिक आधार असल्याने मी ती लढाई शेवटी विजयापर्यंत नेऊ शकलो. सर्वच माणसे अशी नशीबवान नसतात म्हणून त्यांना कोणतातरी आधार लागतो. आपली लढाई स्वतःच लढायची असते. म्हणूनच
" भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे" म्हणणारे स्वामी समर्थ लोकांना मानसिक आधार देत असतात "गण गणी गणात बोते" मंत्र म्हणणारे लोक सुद्धा असाच आधार गजानन महाराजांकडून शोधत असतात . मग हि शक्ती मंत्रात असते का? बहुधा नाही ती तुमच्या मनात असते पण "तुझे आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी" या न्यायाने ती त्या त्या माणसाला कुणीतरी दाखवावी लागते. गंभीर आजारात एखादा डॉक्टर असा आधार ठरू शकतो. कठीण आर्थिक परिस्थितीत एखादा मित्र असा आधार दाखवू शकतो.
या मानसिक सामर्थ्याची प्रचीती मला स्वतःला आली होती जी मी येथे माझ्या धाग्यावर लिहिली होती. मन सामर्थ्य http://www.misalpav.com/node/28078.
हे सामर्थ्य जागृत कसे होते हे अजून तरी शास्त्राला कळलेले नाही. ज्यांनी मनोरुग्ण पहिले आहेत त्यांना काबूत ठेवणे किती कठीण आहे ते त्यांना माहित आहे. पंधरा वर्षाच्या मुलावर शारीरिक ताबा ठेवण्यासाठी लष्कराचे चार सैनिक पुरे पडत नाहीत.
म्हणजे मंत्रात शक्ती असते कि नाही. ज्याला त्याचा मानसीक आधार मिळतो त्याच्या दृष्टीने असते आणि ज्याला त्याची गरज पडत नाही त्याच्या दृष्टीने नसते असेच मला वाटते.
यावर काही मित्र म्हणतील डॉक्टर कुंपणावर बसले आहेत आणि कुणालाच नाराज करू इच्छित नाहीत(POLITICALLY CORRECT)
कदाचित असेनही
I AM NEITHER FORWARD NOR BACK WARD.
I AM JUST AWKWARD

याॅर्कर's picture

15 Nov 2015 - 10:31 pm | याॅर्कर

सुंदर/अप्रतिम/मार्मिक/ विश्लेषण.

mystic man's picture

15 Nov 2015 - 10:32 pm | mystic man

धन्यवाद डाॅक्टर! अगदी सोन्यासारखं बोललात.
असा युक्तीवाद केला तर कशाला होतील आस्तिक नास्तिक वाद?

जिथे आधार घेण्याची गरज निर्माण होते
तिथे कमकुवतपणा कमजोरी असमर्थतता आहे हे अगोदर सिद्ध झालेल च आहे ना ?
मग त्याचा गौरव कशासाठी ?
त्याच उद्द्दात्तीकरण कशासाठी ?

आणि यनावाला रिचर्ड डाँकी चा आधार घेतात तो कशाला मग?

सुबोध खरे's picture

15 Nov 2015 - 11:00 pm | सुबोध खरे

मारवा साहेब यात उदात्तीकरण कुठे दिसले?
एखाद्या डॉक्टरने असे सांगितले कि तुमच्या नातेवाईकाचा आजार( उदा कर्करोग) असाध्य आहे अशा परिस्थितीत त्या माणसाने काय करावे अशी अपेक्षा आहे? असे रुग्ण मी रोज पाहतो.
यकृताच्या कर्करोगाच्या रुग्णाच्या बायकोला आणी भावाला तुमच्या भावाकडे फार दिवस नाहीत आणी सध्या उपलब्ध असणारी उपचार पद्धती त्यांना लागू पडणार नाही. यकृताच्या प्रत्यारोपानाला २५-ते ३० लाख रुपये खर्च करूनही सर्वत्र पसरलेला कर्करोग आटोक्यात येणार नाही (हे मीच नव्हे तर नंतर टाटा आणी कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात सांगितले गेले) हे मी २० -२२ दिवसांपूर्वी सांगितले. त्यानंतर ते तिबेटन औषधे घेत होते आणी रोज महा मृत्युंजयाचा मंत्र म्हणत होते. त्याचा काहीही उपयोग होणार नाही हे मला कळत होते
परंतु आपण करीत असलेल्या गोष्टीचा रुग्णाला फायदा होणार आहे या विचाराच्या आधाराने त्या दोघांना उभारी मिळत होती. या मानसिक आधाराची किंमत काय? (आता तो रुग्ण मृत्यू शय्येवर आहे.)
नाही देखिले पंचानना
तोवरी जंबुक करी गर्जना
या न्यायाने नास्तिक लोक स्वतःवर मृत्यूची छाया पडल्यावर गलितगात्र होताना इतकी वर्षे पाहत आलो आहे
म्हणूनच मी म्हटले आहे कि मी नास्तीक आहे कि आस्तिक तेच मला माहित नाही. निदान आईचा सल्ला ऐकून नालायक न होण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे.

नास्तिक लोक स्वतःवर मृत्यूची छाया पडल्यावर गलितगात्र होताना इतकी वर्षे पाहत आलो आहे
खरे आहे. अशा वेळीस नास्तिकता गुंडाळून ते भिका मागू लागतात.

मारवा's picture

16 Nov 2015 - 12:02 am | मारवा

मानसिक आधार जो घ्यावा लागतोय तो शब्दच उघडपणे स्वतः सांगत आहे की संबधित व्यक्ती ही
स्वतःचा विवेक तर्क फायटींग स्पीरीट हरवुन बसलेली आहे.
एक व्यक्ती अमुक इतक्या टोकाला परीस्थीती ताणली गेल्यावर विवेक- तर्क- संघर्ष क्षमता गमावते
दुसरी व्यक्ती अमुक इतक्या टोकाला गमावते. तिसरी व्यक्ती कधीच गमवत नाहीत.
हे त्या व्यक्तीच्या शिक्षण क्षमता अनुभव वैचारीक बैठक कंडीशनींग आदि अनेक घटकांवर अवलंबुन आहे.
तर तुम्ही दिलेल्या उदाहरणात ती दुर्देवी व्यक्ती आवश्यक विवेक तर्क संघर्ष क्षमता हरवुन बसलेली आहे.
आता हे झाल्यावर दोन उपाय आहेत हरवलेली क्षमता पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करणे किंवा प्रवाहपतीत होऊन त्याच्या विरोधी टोकाला उपलब्ध असलेले मार्ग अवलंबणे उदा. मंत्रतंत्र , जप जाप वा इ. इ. ते वरील संबधित दुर्देवी व्यक्तीला बहुधा तिबेटन मंत्रात तो दुसरा मार्ग अवलंबत आहेत,
तर त्यांच्याविषयी पुर्ण सहानुभुती बाळगुन मी असे म्हणेन की
ते चुकीचा मार्ग अवलंबत आहेत त्यांनी विवेक तर्काची कास न सोडता संघर्ष केला पाहीजे. असे करुन काही होणार नाही.
मी त्यांच्याकडे ते एक चुक करत आहेत असे बघतो
त्यात मला त्यांच कौतुक करावस वाटणार नाही राग ही येणार नाही एक सहानुभुती वाटेल कोणी त्यांच्याविषयी मला विचारल तर मी अस म्हणेन
की दुर्देवाने ते चुकीच्या मार्गाने जात आहेत त्यात काही चांगल नाही कौतुकास्पद नाही गौरवास्पद तर नाहीच नाही,
आता टर्मिनल अ‍ॅट द डेथ बेड वर असुनही भीषण आजाराने ग्रस्त असुनही शेवटपर्यंत कुठल्याही ईश्वराला बाबाला मंत्राला मद्तीकरता न बोलावीता आपल्या दुर्धर अखेर खंगत खंगत मृत्युकडे नेणार्या आजारातही ताठ कण्याने स्वयंपुर्णतेने विवेकाने निर्भयतेन व स्वत्;च्या कठोर वैचारीक भुमिकेवर ठाम राहुन प्राण सोडणारे
लोक अनेक लोक माझ्याही अनुभवात आहेत

अटळच आहे मृत्यु तर त्यालाही
अटळच असेल आजार तर त्यालाही
एक ताठ कण्याने कोठल्याही काल्पनिक शक्तीला दुर्बलतेने न आळवता कोठल्याही बाबाला स्मरण न करता
आहे त्या वास्तवाला कठोर नैसर्गिक सत्याला एका डिग्नीटीने
एका स्वछ् निर्मल दृष्टीने त्या सत्याला भिडुन ही जगाचा जीवनाचा निरोप घेता येत असतो.
नेहमीच त्यापुढे हतबल होण्याची रडण्याची आवश्यकता नसते
पुरेसा विवेक वैचारीक बैठक कणखरपणा असल्यास सहजतेने व्यक्ती मृत्यु दुर्धर आजारपण आदीला फेस करु शकते.
करते अस होत सर असेही लोक आहेत जीवनात आणि ते
अस असण गौरवास्पद कौतुकास्पद आहे

सुबोध खरे's picture

16 Nov 2015 - 1:38 pm | सुबोध खरे

मारवा साहेब
तुम्ही म्हणता तसे विवेकी आणि कणखर लोक मीही पहिले आहेत किंवा पाहतो परंतु असे लोक १०० पैकी फारतर १ असतात बाकी ९९ नाहीत. आपला मृत्यू समीप आला असतानाही आपला बुद्धी प्रामाण्यवाद स्पष्टपणे व्यक्त करणारा बर्ट्रांड रसेल सारखा माणूस विरळाच.
"पुरेसा विवेक, वैचारीक बैठक, कणखरपणा " असे सर्व सामान्य माणसांमध्ये असते तर गणपती दुध पितो, मंत्र म्हटल्याने हरवलेली वस्तू सापडते ख्रिस्तःच्या मूर्तीतून रक्त आले असे (अंध)विश्वास का तयार झाले असते.
बाकी वय फार झाले कि मृत्यूची भीती कमी होते. आपण असलो काय किंवा नसलो काय जगाला काही फरक पडत नाही याची जाणीव होते शिवाय आपल्या बरयाचशा श्रद्धा आपल्या उपयोगी पडत नाहीत याचा हि पडताळा येतो. तेंव्हा अनुभव आणि नैराश्याने माणूस जास्त अश्रद्ध होताना दिसतो.

सुबोध जी

तुम्ही म्हणता तसे विवेकी आणि कणखर लोक मीही पहिले आहेत किंवा पाहतो परंतु असे लोक १०० पैकी फारतर १ असतात बाकी ९९ नाहीत. आपला मृत्यू समीप आला असतानाही आपला बुद्धी प्रामाण्यवाद स्पष्टपणे व्यक्त करणारा बर्ट्रांड रसेल सारखा माणूस विरळाच.

मी एखाद्या तरुणाला त्या १०० मधील १ चे उदाहरण आदर्श गौरवास्पद म्हणुन देईल
तुम्ही सांगितलेल्या तिबेटन मंत्र वाल्या व्यक्तीचे उदाहरण देणार नाही. तो एक मानवी कमकुवतता कशी असते, हतबलता असहाय्यता का कशी निर्माण होते त्या हतबलतेच्या परीणामाने माणसे कशी विवेकहीन तर्कहीन वागतात ते वागण्यात कसा निरर्थकता आहे हे सर्व मानवी जीवनातले नकारात्मक पैलु सांगण्यासाठी समजावण्यासाठी देइल.

आदर्श गौरवास्पद उदाहरणासाठी शंभरातला वरील १

बोका-ए-आझम's picture

17 Nov 2015 - 2:34 pm | बोका-ए-आझम

पुण्यात झालेलं जोशी-अभ्यंकर हत्याकांड सगळ्यांना माहित असेल. राजेंद्र जक्कल, दिलीप सुतार, शांताराम जगताप आणि मुनव्वर शाह या चौघांनी या निर्घृण हत्या केल्या. यथावकाश ते पकडले गेले, मग खटला झाला आणि सत्र न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली. जक्कल तेव्हा भर कोर्टात बेशुद्ध पडला होता. इतकंच काय, त्यातल्या दोघांना अक्षरशः खेचत वधस्तंभाकडे न्यायला लागलं. पहिल्याला ज्याला फाशी दिलं त्याच्या फाशीच्या वेळी खटका ओढल्याचा आवाज आला त्याने बाकीच्या तिघांपैकी दोघांचे कपडे खराब झाले. त्यांना परत आंघोळ करायला लावून मग फासावर चढवण्यात आलं - त्याउलट जनरल अरुणकुमार वैद्यांचे मारेकरी जिंदा आणि सुखा हे अगदी शेवटपर्यंत शांत होते. इथे कुठेही कुणाचंही उदात्तीकरण करण्याची इच्छा नाहीये, फक्त मरण समोर आल्यावर लोक एखाद्या विश्वासामुळे किंवा त्याच्या अभावामुळे त्याला कसं सामोरं जातात त्याचं उदाहरण द्यायचं आहे.

मरण समोर आल्यावर लोक एखाद्या विश्वासामुळे किंवा त्याच्या अभावामुळे त्याला कसं सामोरं जातात त्याचं उदाहरण द्यायचं आहे.

+१.

बायदवे, भगतसिंगला जेंव्हा फाशी झाली होती तेंव्हा तुरुंगात त्याने Why I am an Atheist हा निबंध लिहिला होता. भगतसिंग किती धैर्याने मृत्युला सामोरे गेला हे तर आपल्याला माहित आहेच.

मारवा's picture

18 Nov 2015 - 3:40 pm | मारवा

बोकोबा
सुबोधजींनी जे उदाहरण दिले होते ते डेथ बेड वर गंभीर आजारी असतांना तो एकच उपाय विश्वासाचा माणसाकडे या अर्थाने.
त्यावरील प्रतिवादात मी मांडलेलं आहे की ज्याचा विवेक इ. असतो तो विश्वासाच्या अभावतही शांततेने धैर्याने असा स्थितीला फेस करु शकतो.
आता तुम्ही जे उदाहरण दिलेल आहे ते परत धार्मिक व्यक्तीचा विश्वास हा प्रसंगी कीती घातक होऊ शकतो उदा. अतिरेकी धार्मिक विश्वासाच्या भविष्यकालीन धार्मिक कल्याणाच्या आशेने इ. बळावर थंडपणे माणसे मारतात आपण सर्वच बघतो. किंवा मी जणु हत्या नाही धर्मकार्य धर्मसंमतीने योग्य च असे केलेले आहेत असे. जे तुम्ही जिंदा सुखा इ. च्या दिलेल्या उदाहरणातुन दिसते.
तुम्हीच मांडत आहात अजुन एक निगेटीव्ह बाजु जी धार्मिक विश्वासातुन उदभवते.
मी धार्मिक विश्वासातुन उदभवत असलेली लाचारी परावलंबित्व अयोग्य मुल्यांवर विश्वास हे दर्शविले.
तुम्ही आणखी एक बाजु प्ल्स धार्मिक विवेकहिन विश्वास कीती संवेदनशुन्य होऊन थंड पणाने माणस मारु शकतो.
तुम्ही संवेदनशुन्यतेकडे निर्देश केला व उदाहरण दिल, जो धार्मिकांच्या बाबतीतला आहे.
विवेकी व्यक्ती अर्थातच अशा तुम्ही दिलेल्या उदाहरणातल्या सारखी शांत नसते व सुबोधजींच्या उदाहरणातल्या सारखी हतबल नसते.

सुबोध खरे's picture

17 Nov 2015 - 6:26 pm | सुबोध खरे

मारवा साहेब
"आदर्श गौरवास्पद उदाहरणासाठी शंभरातला वरील १" हे बरोबर पण बाकी ९९ % लोकांनी ते धारिष्ट्य कुठून आणायचे? असणं कधी समजावण्याचे प्रसंग आपल्यावर आले आहेत का? केमो चालू असलेला माणूस अमुक बाबांचे तीर्थ तमुक बाबांचा अंगारा लावू का विचारतो त्याला हे "बौद्धिक" कसे उपयोगी पडेल? त्यांना जोवर त्यांच्या केमो मध्ये बाधा येणार नाही अशा गोष्टी करा असेच सांगावे लागते.
पुरेसा विवेक वैचारीक बैठक कणखरपणा अस असण गौरवास्पद कौतुकास्पद आहे
मान्य
पण १०० पैकी ९९ माणसं अशी नाहीत. त्यांना काय ताठ कण्यावर भाषण द्यायचं? चार मंत्र म्हटले असता त्या माणसाला मानसिक शांती मिळत असेल तर त्याला असे उच्च तत्वज्ञान सांगून काय उपयोग?
भाट्याच्या खाडीत बुडणाऱ्या दालद्याला( काही कोकणी मुसलमान दालदी म्हणून ओळखले जातात) विश्वेश्वराच्या घाटीवरून कुराण वाचून दाखवण्यासारखे आहे .--इति पु. ल.

प्रकाश घाटपांडे's picture

17 Nov 2015 - 6:32 pm | प्रकाश घाटपांडे

खर आहे.
अनिश्चिततेला तोंड देण्याच्या प्रत्येकाच्या क्षमता वेगळ्या असतात. तसेच त्या सर्वकालीन सारख्या नसतात. डॉक्टर साहेब आपण तर असंख्य रुग्णाचे भावविश्व जवळून पाहिले आहे. तसेच वैद्यकीय क्षेत्राची बलस्थाने व मर्यादा ही आपण जाणता. त्यामुळे आपले प्रतिसाद वाचनीय असतात.

हे बरोबर पण बाकी ९९ % लोकांनी ते धारिष्ट्य कुठून आणायचे?
असणं कधी समजावण्याचे प्रसंग आपल्यावर आले आहेत का?

असे प्रसंग माझ्यावर काही फार आलेले नाहीत . पण आले तर काय उपाय असावा काय नाही हा वेगळा भाग आहे.
समाज जितका जास्त प्रगती करेल जितकं शिक्षण विवेक इ. च प्रमाण वाढेल
जितकी स्वयंपुर्णता आर्थिक व वैचारीक निर्माण होइल तस तसे वरील समस्या नक्कीच कमी होत जातील अशी खात्री वाटते.
मात्र मोठा प्रश्न हा आहे की तुम्ही कुठल्या मुल्याला महत्व देणार कुठल्या मुल्याचा प्रचार प्रसार करणार.
तुम्ही अज्ञानातुन परावलंबनातुन निर्माण होत असलेल्या भय लाचारी इ. चा गौरव आदर्श समोर ठेवणार
की निर्भयता स्वावलंबन (वैचारीक) इ. चा आदर्श समोर ठेवणार.
हे बघा आदर्शाप्रत पोहोचणं पुर्णपणे हा एक भाग व त्या दिशेने सातत्याने अथक वाटचाल करत राहण हा दुसरा भाग.
तर मान्य आहे की १०० पैकी सर्वच ही आदर्श अवस्था प्राप्त करु शकणार नाहीत पण प्रयत्न तर त्या दिशेनेच करणे व तो
आदर्श डोळ्यासमोरच ठेऊन करणे अगत्याचे नाही का ?
मुळात तुम्ही तुमचा मुल्य निर्णय काय करतात ? आदर्श काय ठेवतात तो आहे ?
एकदा ते निश्चित झाल्यावर त्यात आपण कीती कमी पडतोय कीती अधिक प्रयत्न करण आवश्यक आहे
किती नव्या साधनांची उपायांची गरज आहे हा सर्व पुढचा भाग झाला.
मुळ प्रश्न तुमची निवड कोणत्या बाजुला आहे ?
तुम्ही त्या मानवी असहाय्यतेला हतबलतेच्या बाजुने आहात की मानवी विवेक वैचारीक स्वावलंबन संघर्षशीलता या बाजुने आहात हा आहे.
कारण यावरच पुढे तुमचे प्रयत्न तुम्ही कोणत्या दिशेने वळवता हे आहेत.
मला तुमच्यासारखा प्रसंग (जो कधी येत नाही फारसा ) तर मी अगोदर त्याला विवेकवादाकडे वरील मुल्यांकडे प्रवृत्त होण्यास प्रामाणिक प्रयत्न करेल त्यात मला १००० मधुन २ वेळा समजा जरी यश आलं तरी चालेल. मी त्याकडे एक सुरुवात एक वाटचाल एक छोटी छोटी प्रगतीच्या दिशेने टाकलेली पावल या अर्थाने बघेल.
आणि त्यात ९९८ वेळा येत असलेल्या अपयशाला एक धडा एक अभ्यास एक आपण कुठे कमी पडतोय या अर्थाने बघेल.
प्रश्न कोणत्या बाजुचं कुठल योग्य की अयोग्य कुठला मुल्य कुठली नैतिक भुमिका तुम्ही घेत आहात तो मुलभुत आहे.
प्रयत्न उपाययोजना पुढील भाग
एक प्रथा उदा. चुक आहे की नाही हे ठरवण महत्वाच मानवी की अमानवी हे ठरवण महत्वाच
मग तीचे उच्चाटन कसे करता येईल काय उपाय कीती हजारो वर्ष लागतील आदी बाबी त्यानंतरच्या
अगोदरच्या नव्हेत.

मारवा's picture

18 Nov 2015 - 3:20 pm | मारवा

चार मंत्र म्हटले असता त्या माणसाला मानसिक शांती मिळत असेल तर त्याला असे उच्च तत्वज्ञान सांगून काय उपयोग?

हा तुम्ही तुम्हाला पटत नसलेल्या मात्र समोरच्या व्यक्तीला तात्कालिक फायदा होत असेल तर काय हरकत आहे असे सांगुन असे म्हणताय.
यात तुम्ही त्या व्यक्तीचा तात्कालिक फायदा करुन त्याला कायमचा मानसिक अवलंबनात ढकलताय. उदा. एक भिकारी आहे त्याला आज भुक लागलेली आहे त्याला आजच्या जेवणापुरते तुम्ही पैसे दिले व त्याची आजची महत्वाची तात्कालिक भुक मिटवली. तर तुम्ही नक्कीच संवेदनशीलता दाखवली मात्र तुम्ही जर त्याला त्याऐवजी त्याच्या मुळ आर्थिक परावलंबित्वाच्या समस्येवर जर काही उपाय दिला काही त्याच्या लायक नोकरी मिळवुन दिली. काही त्याच्या हाताला काम दिल आणि कायमस्वरुपे त्याच्या मुलभुत समस्येवर (आर्थिक परावलंबन ) पासुन मुक्ती दिली तर तुम्ही खरया अर्थाने त्याला मोठी मदत केली असा होतो. आता तुम्ही वारंवार जर त्याची तात्कालिक समस्या तात्पुरत्या स्वरुपात सोडवुन देत राहीलात नेहमीच तर तो कायम आयुष्यभर आर्थिक परावलंबनातुन बाहेर येऊच शकणार नाही. याचा अर्थ असा आहे का की जी तात्कालिक मदत तुम्ही त्याला केली ती चुक आहे ? तर नाही ती योग्यच आहे मात्र
हि मदत तात्कालिकच आहे ही अपुर्ण आहे याने त्याच्या जीवनातील मुलभुत समस्या सुटणार नाहीत तो याच्या वारंवार मदतीने कदाचित अधिकच आळशी होत जाईल याची पुर्ण जाणीव ठेऊन व आज ना उद्या त्याच्या साठी या पुढची पायरी घेऊन मोठा उपाय करणे हाच एकमेव उपाय आहे हे भान ही जाणीव अशी मदत करतांना ठेवणे आवश्यक आहे.
या जाणीवे सहीत मात्र सध्या आपला नाईलाज म्हणुन अशी तात्कालिक मदत करत राहण्यात काहीच गैर नाही.
पण तात्कालिक मदत हीच योग्य आहे असे समजुन बसुन त्याच्या मुलभुत समस्येचे अस्तित्वच अमान्य करणे त्याकडे डोळेझाक करणे त्याविषयी उदासीन असणे.
अनेकदा आपली तात्कालिक मदत व आपल्यापुरते साधलेले मदत केल्याचे तात्कालिक समाधान हेच त्या पीडीतासाठी आयुष्यभरासाठी दिर्घकाळासाठी घातक आहे याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे.
उदा. नाना पाटेकर सध्याच्या प्रत्येक कार्यक्रमात म्हणतात तस की मी जी मदत करतोय ती तात्कालिक आहे हा यावरचा कायम स्वरुपी उपाय नाही पण अती बिघडलेल्या परीस्थीतीत सध्या ती देखील महत्वाची आहे असे या विधानात नाना पाटेकर या पुर्ण जाणीवेने की आपण जे करतोय ही तात्कालिक मदत आहे हेच समजुन करतात. त्यांना असलेले हे वास्तवाचे भान फार कौतुकास्पद आहे. ते मी करतोय हेच बरोबर याहुन अधिक काही गरज नाही बस झाली समस्या झालो मी मोकळा असे नाही त्यांना स्वतःच्या आवाजाला कसेबसे थांबवण्यात रस नाही.
वर यनावाला अवहेलना सहन करुन ही जे अशा धाग्यांमार्फत प्रयत्न करतात ते असेच महत्वाचे आहेत. त्यांच्या कडे असलेल्या इतर अनेक सुंदर ज्ञानाला आवडत्या विषयांना मुरड घालुन ते हा सर्व आघात स्वतःहुन ओढवुन घेतात पॉलिटीकली करेक्ट राहण्याचा नेहमी प्रयत्न करण प्रत्येकवेळी स्तुतीची प्रशंसेची आस बाळगुन असण हे ते करत नाहीत.
व दिर्घ मुदतीचा अधिक कष्टाचा त्रासाचा मार्ग कठीण आहे म्हणुन काय उपयोगाचा असा विचार करणे चुक आहे.
एक स्टीफन कोव्हे च्या पुस्तकावर
"Give a man a fish and you feed him for a day; teach a man to fish and you feed him for a lifetime." हा सुविचार आहे जो अनुकरणीय आहे.

विवेकवाद म्हणजे नेमकं काय?

आस्तिकतेच्या प्राथमिक आवश्यक गोष्टी मध्ये विवेक, वैराग्य, शमादिषटक आणि मुमुक्षत्व सांगितलं जातं.
यात विवेक म्हणजे जे नाश पावणारं आहे त्याच्या मागं न जाता जे स्थिर अविनाशी आहे त्याचा विचार करणे व त्याचा पाठपुरावा करणे.
तुमचा विवेक काय सांगतो?

भाऊंचे भाऊ's picture

15 Nov 2015 - 11:09 pm | भाऊंचे भाऊ

असले हे मंत्र खरे मानणारे लोक पूर्वी होते. आज एकविसाव्या शतकातही आहेत! कुठल्याही मंत्रामध्ये कसलेही दैवी सामर्थ्य नसते

.
या विधानात तथ्य नाही असे नमुद करावेसे वाटते. पण अर्धवट विधान न तोडता आपण संपुर्ण वाक्य बघुया.

मंत्राने काही साध्य होत नाही.चमत्कार घडू शकत नाही. पूर्वी कधीही घडलेला नाही. भविष्यात कधी होण्याचा संभव नाही.हे वैज्ञानिक सत्य आहे.

मला विज्ञान फार आवडते. पटत नाही तरीही आवडते. चित्रपट विडीओ गेम्स पासुन ते अनेक बुध्दी भ्रमीत करण्याचे तथा या संपुर्ण प्रुथ्वीचा नाश करायचे सामर्थ्य अन मस्ती विज्ञान मानवामधे अत्यंत व्यवस्थीत निर्माण करु शकते. मिसळपाव सारख्या संस्थळापासुन ते मती भ्रमीत करणार्‍या एच डी पॉर्न स्थळापर्यंत सर्व काही भ्राम मायाजाल विज्ञानच रचु शकते. विज्ञानाच्या या सामर्थ्याला सगळेच घाबरतात त्याच्या प्रभावाने बरेच भ्रमीत होतात. अन विज्ञान किर्तनी रममान होतात हे ही एक उघड गुपित आहेच... पण हळु हळु ते सामजावण्यात मज्या आहे म्हणून विषयाकडे वळुया...

म्हणून मला कायम मनात प्रश्न निर्माण होतो की हे विज्ञान काय आहे ? आणी त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे वैज्ञानीक सत्य म्हणजे नक्कि काय असते हे जरा स्पश्ट कराल का ? माझा तरी वैज्ञानीक सत्य हा शब्द ऐकल्यावर प्रचंड गोंधळ उडतो ( जर तो शब्द विनोद म्हणून योजला नसेल तर) . विज्ञानाच्या नियमाने न चालणारी गोष्ट अस्तित्वात नाही असे विज्ञान ठाम्पणे का म्हण्ते हेही जाणुन घ्यायला आवडेल. हे म्हणजे अमुक धर्माप्रमाने जगाहे आचरण नसेल तर इतर कोणत्याही धर्माचे जगात केले जाणारे आचरण धार्मीक आचरण नाहीच मुळी असा घातक कट्टरतावाद मानु नये ?

वरील ऐतिहासिक सत्य घटनांवरून याला पुष्टी मिळते. मंत्रात सामर्थ्य असते ही अज्ञानमूलक, खुळचट कल्पना आहे

तुकारामांचे एक वाक्य आहे लोका सांगे ब्रम्हज्ञान ... .. ..ण. ( कृपया गाळलेली जागा भरावी)

आजची स्वाक्षरी :- पाहुनी विज्ञानाच्या बलाला भ्रमीष्ट झाला झाला दारु-अ-वाला दारु-अ-वाला.

तुम्ही भाऊंचे भाऊ कधी झालात? पहिले अवतारकार्य संपले का?

भाऊंचे भाऊ's picture

15 Nov 2015 - 11:40 pm | भाऊंचे भाऊ

पाहुनी विज्ञानाच्या बलाला भ्रमीष्ट झाला झाला दारु-अ-वाला दारु-अ-वाला

यासम ओवी मी एका धाग्यावर प्रतिसादात लिहली होती तो प्रतीसाद गायब झाला असे दिसले तितक्यात माझा द-बाहुबली हा आयडी सुध्दा बॅन झाला. असो या चर्चा व्यनीत वा खरडवहीत कराव्यात असा मिपा संस्थळाचा दंडक आहे तुम्ही तो तोदल्याचा मला आनंद आहे असे म्हणून मी अदचणीत येउ इच्चीत नाही.

mystic man's picture

15 Nov 2015 - 11:14 pm | mystic man

हा mystic man कोणाचा डुआयडी
एस - Sun, 15/11/2015 - 22:03
हा mystic man कोणाचा डुआयडी आहे हे ओळखणे अजिबात अवघड नाही
.
एस साहेबांच्या दिव्यदृष्टीने प्रभावित झालो. उद्या मी जर सं.मं.ला विनंती केली की माझे आयडी नाव स्वप्स असे करुन द्या तर मग मी स्वॅप्स साहेबांचा डुआयडी झालो की!!! रामा... रामा...

फारच भाबडे ब्वॉ तुम्ही! असो. बाण बरोबर लागलेला आहे! :-)

भाऊंचे भाऊ's picture

15 Nov 2015 - 11:43 pm | भाऊंचे भाऊ

हा mystic man कोणाचा डुआयडी आहे हे ओळखणे अजिबात अवघड नाही.
एकाने हा म्हाझा डु आयडी अहे काय असे खासगीत विचारले आहे म्हणून स्पश्टीकरण इथेच देतो mystic man हे सदस्यनाम मी तयार केलेले अथवा वापरत नाही.

संपादक मंडळ
इथे जी चर्चा विधायक दिशेने सुरु आहे
त्यात अडथळा आणुन वातावरण कलुषीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
कृपया येथील प्रतिसादांची पाहणी करावी
यात काही चुकीच्या दिशेने जाणरे प्रतिसाद असतील तर त्यावर कार्यवाही करावी ही विनंती,
यात माझाही काही प्रतिसाद चुकीचा वा सभ्यतेच्या मर्यादा ओलांडणारा असेल तर त्यावरही कार्यवाही करावी.
कृपया येथील प्रतिसादांची एकदा तरी पाहणी करावी ही कळकळीची नम्र विनंती.

मांत्रिक's picture

15 Nov 2015 - 11:29 pm | मांत्रिक

इथे जी चर्चा विधायक दिशेने सुरु आहे
त्यात अडथळा आणुन वातावरण कलुषीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे
मग फक्त अध्यात्मावर बेताल टीका होत असेल तर ती विधायक का?
धन्यवाद मारवा साहेब...

मारवा's picture

15 Nov 2015 - 11:33 pm | मारवा

वाद टीका याच्याशी कधीच अडचण नाही
नेव्हर
जो प्रतिसाद व्यक्तीगत पातळी सोडुन होतोय तो तर्कहीन दर्जाहीन भावनाविवश आहे केवळ
ज्याने चर्चा एक इंच देखील सकारात्मकतेने पुढे सरकत नाहीये
किंबुहना ज्याने अडथळाच येतोय केवळ तितक्या आणि तितक्याच मुद्द्यावर आक्षेप आहे.
बाकी कशाचीच अडचण नाही काहीच तक्रार नाही खरच
त्यावरच केवळ आक्षेप आहे.

भाऊंचे भाऊ's picture

15 Nov 2015 - 11:46 pm | भाऊंचे भाऊ

आपल्या विचारांशी मी सहमत आहे. असे प्रतिसाद नक्किच दिले गेले नाही पाहिजेत चर्चा सकारात्मक खुल्या मनाने आणी आवश्यक मुद्याभोवती व भावनेला थारा न देताच घडणे अपेक्षीत आहे.

भंकस बाबा's picture

15 Nov 2015 - 11:35 pm | भंकस बाबा

मी स्वतः नास्तिकतेकडे झुकणारा आहे पण एक खरा घेतलेला अनुभव सांगतो. मध्य रेल्वेवर कर्जत फाट्याला भिवपूरी रोड म्हणून स्टेशन आहे. तेथील उकरुळ गावात मी राहात होतो. माझ्याकडील एका कामगाराच्या बायकोला रात्री ११च्या सुमारास विंचु चावला. बाई पाण्यातून काढलेल्या मासळी सारखी तड़फडत होती. डॉक्टरकडे कर्जतला नेतो बोललो तर नको बोलली . शेवटी गावातील एका मांत्रिकाकड़े नेली. त्याने आत फ़क्त काहीतरी पुटपुटल्यासारखे केले . पंधरा मिनिटांनी बाई पुष्कळशी सावरली. सकाळपर्यन्त विंचुदंशाचे नामोनिशान नव्हते.
काय असेल ते? कदाचित त्या मंत्राने प्लासिबोचे काम केले असेल.
आणि हो याच रायगड जिल्ह्यात विंचुदंशाने माणसे मरतात म्हणून हिंम्मतराव बाविस्करानी आपले सर्व आयुष्य पणाला लावुन संशोधन केले. त्यांचे हे संशोधन लैन्सेट मधे देखील छापुन आले होते.
विचारवंतांनी दोन्ही बाजू बघुन मते मांडावित. गावाचे नाव सविस्तर दिले आहे. खात्री करून घ्यावी

माझा देखील प्रतिसाद
असा चुकीचा आढळला तर तो तात्काळ काढावा
हीच विनंती करतोय
किमान एकदा तरी येथील प्रतिसादांची पाहाणी करावी हीच एकच छोटी विनंती आहे
संपादक मंडळ प्रगल्भ अनुभवी आहे
ते नक्कीच योग्य निर्णय घेतील
त्यांनी च प्रतिसादाचा दर्जा ठरवावा

आनन्दा's picture

15 Nov 2015 - 11:48 pm | आनन्दा

कदाचित यापूर्वी यावर मी लिहिले असेल, पण परत लिहितो - मी ऐकलेले २ अनुभव आणि पाहिलेला एक
१. पहिला अनुभव माझ्या बाबांचा आहे - माझा जन्म तेव्हा व्हायचा होता/ नुकताच झाला होता. आमची म्हैस किडे पडून उठवणीला आली होती. आतापर्यंतच्या लोकांच्या अनुभवानुसार आता तिला वाचवणे कोणालाही शक्य नव्हते, अगदी गुरांच्या डोक्टरनी पण हात टेकले होते.
त्या दिवसांमध्ये माझ्या बाबांचा खाडीपलिकडे दवाखानाजातानाएक दिवस ती म्हैस अगदी मरायला टेकली होती, आणि बाबांना तर दवाखान्यात जायचे होते, त्याप्रमाणे ते गेले, जातानाच गावातील ४ माणसांना सांगून गेले संध्याकाळी फेरी टाका, बहुतेक म्हैस उचलायला लागेल. दवाखान्यात कोणाशी तरी त्या म्हशीचा उल्लेख आला, तेव्हा त्याने सांगितले की इथे कोणीतरी मांत्रिक राहतो, त्याला विचारा. मग त्याला बोलवणे पाठविले, आणि तो आला. त्याने विचारले म्हशीचे नाव काय आहे? यांनी त्याला काय ते नाव सांगितले, आणि त्याने मंत्र टाकला. तेव्हा बाबांना काही त्याचे गांभीर्य कळले नाही, पण गम्मत म्हणजे बाबा घरी आले तेव्हा त्या म्हशीच्या जखमेतले सगळे किडे निघून गेले होते आणि म्हैस पूर्ण बरी होऊन पुढे ४ वर्षे जगली.

२. असाच अनुभव मी आमच्या बैलाच्या बाबतील स्वतः घेतला आहे. सर्व तथाकथोत वैद्यकीय उपाय थकल्यावर मंत्राने त्या बैलाला गुण आलेला मी पाहिला आहे. पण त्यावेळेस त्या माणसाने एक पाळ त्या बैलाच्या तोंडासमोर माळ्यावर ठेवायला सांगितले होते, त्यामुळे या प्रसंगाला एक गुण कमी. तरी सुद्धा औषध आणि रोग्याचा प्रत्यक्ष शारिरिक संपर्क नाही

३ तिसरा प्रसंग पुन्हा माझ्या बाबांचा आहे - वर सांगितल्याप्रमाणे खाडीपलिकडील दवाखान्यात गेलेले असताना तिथे एक गारूडी आला. यांनी सहज त्याला विचारले की तू साप बोलवू शकतोस का? तो म्हणाला हो. एव्हढेच नव्हे तर त्याने असे सागितले की इथे एकूण ३ साप (नाग) आहेत. त्यातले २ माझी आज्ञा मानतात. तिसर्‍याची श्रेणी वरची आहे, त्याला माझ्या आज्ञा लागू होत नाहीत, असे म्हणून त्याने मन्त्र म्हणून कवड्या फेकल्या. २ मिनिटात तिथे २ नाग फुत्कारत हजर झाले, त्या कवड्या म्हणे त्यांच्या फण्यात रुतून बसल्या होत्या. त्यातला एक साप तर बाबांच्या बाजूला फणा काढून उभा होता. त्याने ते साप बाबांना दाखवून एका सापाच्या तोंडातून सो कॉल्ड नागमणी काढून बाबांना दिला.

यामुळे मंत्रांचे सामर्थ्य या गोष्टीबद्दल माझ्या मनात तिळमात्र संदेह नाही. माझे व्यक्तिगत अनुभव आअहेत, पण ते काही कारणाने लिहू शकत नाही.(त्यबद्दय माझ्यावर होणारे सारे आरोप सहन करण्याची माझी तयरी आहे)

बाकी मंत्राच्या सामर्थ्याबद्दल वल्गना करणार्‍यांबद्दल माझ्या मनात राग मात्र आहे. कारण ते एकूणच अध्यात्माचा बाजार मांडतात. आणि मंत्रंमध्ये सामर्थ्य नसते असे म्हणणार्‍यांबद्दल माझ्या मनात दया आहे. नास्तिकता ही त्या माणसाची चुकी नाही असे मी मानतो, एखाद्याला देवाचा अनुभव नसेल तर त्याने देवावर विश्वास का म्हणोन ठेवावा? मी तर नसता बुवा ठेवला.

भाऊंचे भाऊ's picture

15 Nov 2015 - 11:52 pm | भाऊंचे भाऊ

झालं ? समोर वाचुन झाली गिता ? काय फरक पडणार आता ?

काय ? उद्याचा गोंधळ कँसल होइल म्हणताय.. फार सुरेख आशावाद आहे आपला. असो, प्रतिसाद आवडला.

प्रतिवाद करायला कोणी नाही येणार हे मला माहीत आहे. कारण #३ अक्षरशः धडधडीत अंधश्रद्धा(?) आहे. आणि हा अनुभव बाबांनी मला गारूडी खरा की खोटा हे सांगायला नव्हे, तर तो नागमणी घरात बघितल्यावर हा तुम्हाला कसा मिळाला या कुतुहलापोटी सांगितलेला अनुभव आहे. व्यक्तिशः मला माझ्या वडिलांच्या सत्यकथनाबद्दल तिळमात्र संदेह नाही. पण इथल्या विवेकवाद्यांना असेल याबद्दलही माझ्या मनात शंका नाही.
बाकी अगदी तुम्ही त्या गारूड्याने नजरबंदी केली असे म्हणले तरी ती देखील अंधश्रद्धाच नाही का? एखाद्याला काही खायला प्यायला न देता त्याला नुसत्या मनाच्या साअमर्थ्यावर संमोहित करणे ही अंधश्रद्धाच नाही का? (मला हा प्रश्न श्याम मानवांना विचारायचा आहे) या यादीत तर संमोहन देखील आहे. ते विवेकवाद्यांना आरोप करायला कसे काय चालते?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Nov 2015 - 2:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अहाहा ! सापाच्या तोंडातुन सो कॉल्ड नागमणी काढून दाखवला ! व्वा सुरेख. और भी आने दो.

-दिलीप बिरुटे

आनन्दा's picture

16 Nov 2015 - 3:16 pm | आनन्दा

ते वरचे पण पहा की वो जरा. त्यांनी म्हणे मंत्राने साप बोलावला तिथे. पुंगी वाजवून नव्हे. आणि हा खेळ उघड्या मैदानात नव्हे तर जंगलात चालला होता.
असो. तुमच्याबद्दल मनात आदर आहे म्हणून भाषेला आवर घालतोय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Nov 2015 - 11:15 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>> तुमच्याबद्दल मनात आदर आहे
आदराबद्दल आभारी आहे. धन्यवाद.

>>>>म्हणून भाषेला आवर घालतोय.
काय लिहायचं ते व्यक्तिगत शेरेबाजी सोडुन बिंधास्त लिहा आणि व्यक्तिगत शेरेबाजी केली तरी आम्हाला आता काही वाटत नाही. आमची गेंड्याची कातडी झाली आहे, आम्हाला काहीही टोचत नाही. बिंधास्त लिहा.

मंत्राने अजुन काय काय होतं ते लिहा वाचायला आवडेल. :)

-दिलीप बिरुटे

आनन्दा's picture

20 Nov 2015 - 10:43 am | आनन्दा

तुमचा प्रतिसाद तात्विक पातळीवर वाद घालण्याऐवजी प्रतिसाद्कर्त्याची अक्कल काढाण्याकडे जास्ती झुकत होता म्हणून मी वैयक्तिक बोललो. अन्यथा माझी लेखणी सहसा पातळी सोडत नाही. सबब व्यक्तिगत शेरेबाजी करणे हा माझा प्रांत नाही, तस्मात पास.

राहिला प्रश्न अनुभवांचा. त्याबाबतीत इथे काही न बोलणेच उत्तम, कारण माझ्या पूर्वायुष्यात मी देखील अज्ञेयवादाकडे झुकत चाललो होतो, पण काही स्पष्ट वैयक्तिक अनुभवांमु़ळे मी आस्तिक झालो. आणि हे अनुभव संकटात असताना देवाने मदत केली अश्या स्वरूपाचे नाहीत हे स्पष्ट करतो. हे अनुभव कधी बोलायचे झाले तर प्रत्यक्ष भेटलो तरच. ते अनुभव वैयक्तिक असून पब्लिक करता येत नाहीत.

पण म्हणूनच माझ्या मनात प्रामाणिक नास्तिकांबद्दल आदरच आहे. अगदी त्यांनी पातळी सोडली तरी. अर्थात जोपर्यंत ते काही अनैतिकपणा, दांभिकपणा करत नाहीत तोपर्यंत. त्याच न्यायाने माझ्या मनात तुम्ही किंवा प्रकाश घाटपांडे किंवा यनावाला यांबद्दल आदर आहे. म्हणून मी वर थांबलो.

तुम्हाला जर खरेच चर्चा करायची असेल तर वर उल्लेखलेल्या अनुभवांना तुमच्या अनुभवाच्या पातळीवर कसे खोडून काढता येईल याबद्दल लिहा. अनुभवांची सत्यता किंवा विश्वासार्हता याबद्दल टीका करून काहीच साध्य होणार नाही, कारण माझ्या वडिलांनी असत्य संभाषण केलेले मी आजपर्यंत बघितलेले नाही. त्यामुळे तो दांभिकपणा होईल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Nov 2015 - 11:24 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिसाद कसेही असले तरी मी कोणाची अक्कल काढत नाही. मात्र काही प्रतिसाद वाचुन हसुन हसुन पुरेवाट होते. आपला प्रतिसाद वाचुन क्षमा करा पण माझी हसुन हसुन पुरेवाटच झाली आहे हे नम्रपणे नमुद करतो. मंत्र म्हटल्याने म्हशीच्या अंगावरील किडे पळुन जाणे, मंत्र म्हटल्याने नाग फुत्कारत येणे, नागमणी काढुन देणे, हे सर्व हास्यास्पद वाटतं हो बाकी काही नाही.

आपल्या वडीलांबद्दल आणि आपल्याबद्दल आदर आहे पण आपल्या प्रतिसातील गोष्टी न पटणार्‍या आहेत. मंत्राने वरील गोष्टी होतात तर मंत्र म्हटल्याने एटीएममधील पैसे कार्ड न टाकता पीन कोड न टाकता काढून दाखवता येतील का ? मला नाही वाटत असं काही करता येईल. म्हणुन दोन हजार सोळा उजाडले तरी अशा गोष्टी वाचल्या की वाईट वाटते हो बाकी काही नाही. आणि माझ्या प्रतिसादाचंही खूप मनावर घेऊ नका सोडुन द्या. आपले प्रतिसाद मात्र वाचत राहीन.

-दिलीप बिरुटे

प्रश्न हास्यास्पद असण्याचा नसून यामध्ये प्रचलित विज्ञानाच्या बाहेरचे काही नाही हे सिद्ध करण्याचा आणि त्यामागचा कर्यकारणभाव सांगण्याचा आहे.
वर उल्लेखलेल्या घटना सत्य आहेत याबद्दल् संशय नाही. आणि म्हणूनच मी म्हणले तसे हा विषय तात्विक चर्चेने सोडवता येत असेल तर ठीक आहे. नाहीतर वैयक्तिक पातळीवर येऊन शेरेबाजी करण्याची माझी इच्छा नाही. तुम्हीदेखील नेऊ नका. उगीच तुमच्याबद्दलचा आदर कमी होईल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Nov 2015 - 7:49 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्या अनुभवाची तात्विक पातळीवर चर्चा होऊ शकत नाही. मी सांगितलंय मी व्य्क्तिगत शेरेबाजी करत नाही. बाकी मिपावर कोणी माझा आदर करावा म्हणून लिहित नाही. बाकी आपली मर्जी. मला जे वाटतं ते मी लिहिल्या शिवाय राहात नाही, हा माझा प्रॉब्लम आहे.

-दिलीप बिरुटे

-

एकदम परफेक्ट.

आपल्या अनुभवाची तात्विक पातळीवर चर्चा होऊ शकत नाही.

म्हणूनच मी कधीच नास्तिकांशी वाद घालायला जात नाही. कारण त्यांची दुसर्‍याच्या अनुभवावर विश्वास ठेवायची, किंवा स्वतः अनुभव घेण्यासाठी लागणारा वेळ देण्याची देखील इच्छा नसते, आणि अध्यात्माच्या तत्वज्ञानानुसार हे चर्चेचे नसून अनुभवाचे शास्त्र आहे. त्यामुळे दोन आस्तिक किंवा दोन नास्तिक यांच्यामध्ये "चर्चा" होऊ शकते. एक आस्तिक आणि एक नास्तिक यांच्यात "चर्चा" होऊ शकत नाही. आपली वर जी काही "चर्चा" झाली त्याने देखील हेच अधोरेखित केले.

जाता जाता हे मात्र नमूद करू इच्छितो की मी अनुभवांवर आधारलेला आस्तिक आहे, आणि माझे अनुभव बुवा बापूंसारखे प्रार्थना केली आणि कुत्रा मिळाला असे नसून माझ्या अल्पमतीच्या पातळीवर चिकित्सा करूनच स्वीकारलेले आहेत. गंमतीचा भाग म्हणजे मी एकाच वेळी राम-कृष्ण आणि उत्क्रांतीवाद या दोन्हींवर विश्वास ठेवतो. जे खरे म्हणजे हास्यास्पद आहे, पण मला अजून सत्य माहीत नाही. कारण उत्क्रांतीवाद स्वतःचे म्हणणे पुराव्यानिशी सिद्ध करतो, तर मला आलेल्या पॅरानॉरल् अनुभवांमागचा कार्यकारणभाव अजूनही कळलेला नाही.

वर लिहिल्याप्रमाणे मी पूर्वी अज्ञेयवादी होतो, आता आस्तिकतेकडे झुकलेला अज्ञेयवादी आहे. अध्यात्मात त्याला बर्‍याच वेळेस जिज्ञासू असे म्हटले जाते. कारण मला आलेले अनुभव हे प्रचलित विज्ञानाच्या कसोटीवर उतरत नाहीत, आणि जर तसे असेल, तर मला विज्ञानालाच धरून ठेवण्यात रस वाटत नाही. अध्यात्म आणि विज्ञान हे वर कोणीतरी लिहिल्याप्रमाणे एकच कोडे उलगडायचा प्रयत्न करत आहेत, आणि कधीतरी या दोन्ही वाटा एकत्र येतील असा मला विश्वास आहे.
त्यामुळे नास्तिकांना शिव्या घालणारे आस्तिक आणि आस्तिकांना शिव्या घालणारे आस्तिक यांना मी एकाच पारड्यात तोलतो. (काही अपवाद वगळता)

असो. इत्यलम. मी आस्तिक का आहे, आणि आस्तिकवादावरची चर्चा मला का आवडत नाही यामागची ही भूमिका. चु. भु. दे. घे.

प्रकाश घाटपांडे's picture

21 Nov 2015 - 11:35 am | प्रकाश घाटपांडे

मानवता, स्वातंत्र्य समता बंधुता न्याय ही मूल्ये मानणारे अस्तिक वा नास्तिक काहीही असले तरी फरक पडत नाही.
मी अश्रद्ध किंवा सश्रद्ध आहे व जगाने पण तसेच असले पाहिजे अन्यथा ते कीवेस पात्र आहेत. मग बुद्धीचा तोकडेपणा आकलनाच्या मर्यादा वगैरे वगैरे चालू होते जणू काही यांना सगळ्या जगाचे आकलन झाले आहे.

सहमत. आणि याच मुद्द्यावर माझे अनिसशी मतभेद आहेत. कारण ते केवळ प्रबोधन करत नाहीत, तर त्यासोबत व्यक्तिगत निंदानालस्ती आणि आरोप देखील करतात. आणि गंमत म्हणजे एका मिथ्याविज्ञानाचा आधार घेऊन ते एका आध्यात्मिक संस्थेवर आरोप करत आहेत.

जाताजाता, मानवी जीवन सुखकर करणे नुसत्या विज्ञानाला शक्य नाही, तसेच ते नुसत्या अध्यात्मालादेखील शक्य नाही याबाबत माझ्या मनात संदेह नाही. त्यामुळे केवळ एकच बाजू पकडून जाणार्‍यांशी माझे पटत नाही. मग ते केवळ अध्यात्म असो किंवा केवळ विज्ञान.

प्रकाश घाटपांडे's picture

16 Nov 2015 - 3:16 pm | प्रकाश घाटपांडे

आणि मंत्रंमध्ये सामर्थ्य नसते असे म्हणणार्‍यांबद्दल माझ्या मनात दया आहे

मी दयेस पात्र आहे
http://www.misalpav.com/comment/770329#comment-770329

मार्कस ऑरेलियस's picture

16 Nov 2015 - 3:19 pm | मार्कस ऑरेलियस

आणि मंत्रंमध्ये सामर्थ्य नसते असे म्हणणार्‍यांबद्दल माझ्या मनात दया आहे

अहो त्यांन्ना ढुश्शी मारुन दरवाजे तोडणारा दया म्हणायचे असेल बहुतेक =))))

स्यमन्तक's picture

16 Nov 2015 - 1:04 am | स्यमन्तक

लेखन छान आहे... मस्त

दिवाकर कुलकर्णी's picture

16 Nov 2015 - 1:51 am | दिवाकर कुलकर्णी

१९७० च्या आसपासची गोष्ट,मंत्रोचारानं अग्नि निर्माण करतो,हा एकाचा दावा.
(पुणे सोडून हे अन्यत्र कुठे असणार ?)त्यानी होम कुंडं प्रत्यक्षात पेटवून दाखवली.नियत कालीकं
याला जबरदस्त प्रसिध्दि देत.श्री साप्ताहिक व त्यातले अरुण ताम्हणकर हे हिरीरीनं कव्हर
करीत.उलट सूलट चर्चा वेदात हे कसं तपशीलवार आहे पासून त्या ग्रुहस्थाचं उच्चारण कसं सदोष आहे,
पासून ही भंपकगिरी आहे पर्यंत सर्व कांही.हे चर्चा चर्वण अनेक दिवस चालू होतं.अनेक अतिरथी महारथी त्यात
उतरले होते.
आणि शेवटी त्याचा फुगा असा फुटला कि मंत्रोचारण वगैरे सर्व बकवास होतं,होमात समिधा वगैरे जे कांही ते
महाशय टाकायचे त्यात फॉस्फरस असं काही होतं,आणि त्या महाशयाना याचं तपशीलवार ज्ञान होतं कारणं ते
पूर्वी विम्को(काड्यापेटी)कंपनीत कामाला होते.
अशा तर्हेने मंत्रोचारणानं कधीच न पेटलोला तो अग्नि शामक दलाशिवायच विझला.

त्यात दरम्यान अहमदनगरला मंत्रोचारणानं पाऊस पाडतो असा दावा केला होता.
आणि या लोकांचं नशीब असं बलवत्तर कि त्या पावसाचे चार शिंतोडे पडलेहि होते
पण खरतर बिरबलाच्या खिचडी पकवण्याचा तो प्रकार होता.जमिनीवर चार काड्या पेटवून
तोंडातल्या तोडांत कांहीं पुटपुटून वरून जर पाऊस पाडता आला असता तर आणखी काय पाहिजे होतं?

गामा पैलवान's picture

16 Nov 2015 - 1:21 pm | गामा पैलवान

दिवाकर कुलकर्णी,

फॉस्फोरस की काहीतरी म्हणजे नक्की काय? कुठला ज्वालाग्राही पदार्थ वापरलेला? आणि तो प्रतिपक्षाच्या नजरेतून सुटलाच कसा? तुम्हाला इथे प.वि.वर्तकांचा प्रयोग अभिप्रेत होता का? पण त्यावेळी अग्नीकुंडासाठी लागणारी सर्व सामुग्री पूर्वपक्षाने प्रतिपक्षाद्वारे कुंडवर्तुळात पाठवायची अशी अट पाळली होती.

आ.न.,
-गा.पै.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Nov 2015 - 2:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वालावकर सेठ, लेख आवडला. आपण जितके शिकू तितके अधिक अंश्रद्धाळु होऊ असे वाटते. शिक्षणाने विवेक जागृत व्हावा पण ते दिसत नाही. आपला लेख आवडलाच, साती, मारवा यांचे प्रतिसादही आवडले. काथ्याकुट आणि वाद वाचायला मजा आली.

यनावालासेठ लिहित राहा.

-दिलीप बिरुटे

** तानसेन का अजून कोणी महान गायक मेघमल्हार गाऊन पाऊस पडायचा म्हणे. आधुनिक कृत्रिम पाऊस यंत्रणाची काय गरज म्हणतो. मी !

अंतरा आनंद's picture

16 Nov 2015 - 3:10 pm | अंतरा आनंद

लेख आवडला. बरेच जणांनी तावातावाने लेख शेवटापर्यत वाचायचे कष्ट घेतलेले नाहीत की काय असं प्रतिक्रिया बघून वाटले कारण ...

सकाळी स्नान करून,शुचिर्भूत होऊन, मंत्र म्हटल्याने पवित्र झाल्यासारखे वाटत असेल, मनाला उभारी मिळत असेल, उत्साहवर्धन होत असेल, तर तेही नसे थोडके. म्हणून मंत्रजप अवश्य करावा.पण त्याचा उपयोग तेवढाच हे वास्तव जाणावे

.
असं म्हटलय.

जातवेद's picture

16 Nov 2015 - 3:12 pm | जातवेद

अस्स सगळं झालं तर!

आतिवास's picture

16 Nov 2015 - 3:47 pm | आतिवास

निबंध ठाकठीक आहे.
काही नवं दिसलंं नाही.
त्यामुळे यात शंभर प्रतिसाद चर्चा करण्याजोगं काय आहे हे मात्र समजलं नाही.
असो.

बांवरे's picture

16 Nov 2015 - 8:33 pm | बांवरे

सौ सुनारकी और एक अतिवास की !

मारवा's picture

16 Nov 2015 - 3:59 pm | मारवा

इस निबंध मे "जान" है