मंत्रसामर्थ्य
:--"ॐ-र्हीं चामुण्डे।स्मशानवासिनी किलि किलि हुम् फट्।ॐ-मारय।ॐ-दण्डेन ताडय।ॐ-त्रिशुलेन छेदय।ॐ-चामुण्डे।किलि किलि हुम् फट् स्वाहा।"लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा मंत्र:-
:---"ॐ श्रीं र्हीं र्हीं क्लीं क्लीं ऐं कमलवासिन्यै नम:।"असले हे मंत्र खरे मानणारे लोक पूर्वी होते. आज एकविसाव्या शतकातही आहेत! कुठल्याही मंत्रामध्ये कसलेही दैवी सामर्थ्य नसते. मंत्राने काही साध्य होत नाही.चमत्कार घडू शकत नाही. पूर्वी कधीही घडलेला नाही. भविष्यात कधी होण्याचा संभव नाही. हे वैज्ञानिक सत्य आहे. वरील ऐतिहासिक सत्य घटनांवरून याला पुष्टी मिळते. मंत्रात सामर्थ्य असते ही अज्ञानमूलक, खुळचट कल्पना आहे. मंत्रसामर्थ्याने चमत्कार घडतात ते केवळ पुराणे,परीकथा,बालसाहित्य यांतील काल्पनिक गोष्टींत .हे सर्व तथाकथित शक्तिशाली मंत्र आणि "ओले मंतर फू: मंतर कोले मंतर छू: मंतर" तसेच "आबरा का डाबरा" मंतर यांत मूलत: काही भेद नाही.सर्व सारखेच. निरुपयोगी. असे माझे मत आहे. अध्यात्मप्रेमी व्यक्ती गायत्री मंत्राचे अफाट गुणगान करतात. "हा मंत्र संपूर्ण विश्वाचा मूलाधार आहे. (म्हणजे काय ?) या मंत्राचे गायन केले की त्याचे ध्वनी-प्रतिध्वनी अनंत अवकाशात दुमदुमतात. जगभर गायत्री मंत्राचा जप केल्यास पृथ्वी भोवतीचे सर्व वातावरण प्रदूषणमुक्त, शुद्ध आणि पवित्र होईल." असले काही ऐकले की आध्यात्मिक श्रद्धावंत हुरळतो. मग सी.डी.लावून
"ॐ भूर्भुवस्व:। तत्सवितुर्वरेण्यम्।भर्गो देवस्य धीमहि।धियो यो न: प्रचोदयात्।"हा मंत्र ऐकत बसतो. खिडकी उघडी. डास आत येतात.पायांना चावतात.एवढ्या विश्वप्रभावी मंत्राचा डासांवर काहीच परिणाम होत नाही. पायावर चापट्या मारतो. डास मरत नाही. डासाच्या चाव्याने वैतागतो.मंत्राच्या त्याच त्या ओळींचे दळण ऐकून कंटाळतो."आता राहूं दे. नंतर बघू" असे म्हणून मंत्र बंद करतो. दिवा लावून डास शोधायला लागतो. असा आहे या मंत्राचा प्रभाव! कुठल्याही मंत्रात कसलीही ऊर्जा नसते. असले मंत्र म्हणू नये असे नाही. सकाळी स्नान करून,शुचिर्भूत होऊन, मंत्र म्हटल्याने पवित्र झाल्यासारखे वाटत असेल, मनाला उभारी मिळत असेल, उत्साहवर्धन होत असेल, तर तेही नसे थोडके. म्हणून मंत्रजप अवश्य करावा.पण त्याचा उपयोग तेवढाच हे वास्तव जाणावे. .......................................................................................
In reply to ज्योतीषहि ,वास्तुशास्त्रहि by दिवाकर कुलकर्णी
वास्तुशास्त्रहि असेच थोथांड आहे,सकाळची कोवळी किरणे घरामध्ये आली पाहिजेत एवढंच त्यामागे शास्त्र आहे,आणि त्यादृष्टिने घराची रचना असावी.
In reply to वास्तूशास्त्र by याॅर्कर
सकाळची कोवळी किरणे घरामध्ये आली पाहिजेत एवढंच त्यामागे शास्त्र आहे,आणि त्यादृष्टिने घराची रचना असावी.
बस्स इतकचं
मग इतकी पुस्तके इतके तज्ञ इतके उपाय इतकी तोडफोड इतके परीसंवाद
इतका सगळा तुमुल कोलाहल कशासाठी होता ?
In reply to इतकच होतं तर ? by मारवा
मग इतकी पुस्तके इतके तज्ञ इतके उपाय इतकी तोडफोड इतके परीसंवाद इतका सगळा तुमुल कोलाहल कशासाठी होता ?वास्तूविशारदांची दुकानदारी आहे ही सगळी! म्हणजे बघा ज्याचा जो व्यवसाय आहे त्याचेच तो मार्केटिंग करतो.आणि ते करत असताना त्यामध्ये इतकी भर टाकतो कि, बापरे बाप! आणि देवादिकांची भिती घालून बुद्धीभेद केला कि बरेचजण त्याला बळी पडतात.(सगळा माईंडगेम हाय ओ) . . . मुळ मुद्दा इतकाच कि घर हवेशीर हवे.
In reply to खर आहे , पूर्वी मंत्रोच्चार by जयन्त बा शिम्पि
डासाच्या चाव्याने वैतागतो.मंत्राच्या त्याच त्या ओळींचे दळण ऐकून कंटाळतोलेखाचे सार सम्दे ह्याच्यात आले !
In reply to लेख नेहमीप्रमणेच उत्तम. पण by प्रचेतस
In reply to लेख नेहमीप्रमणेच उत्तम. पण by प्रचेतस
In reply to समाजसुधारणा ही हळूहळू घडवून आणावी लागते. by नितीनचंद्र
ध्यानाला पर्यायी मनशांती साठी एखादी साईड इफेक्ट नसलेली गोळी मला ही हवीच आहे.मन हे स्वप्रयत्नांनी प्रसन्न करावे. एखादे मंत्र, एखादे गाणे ऐकून थोडा वेळ बरे वाटू शकते. स्वतः गुणगुणत राहिल्यास दीर्घ काळ प्रसन्नता राहील. पण अडीअडचणीच्या वेळी न डगमगणे, (फार जास्त) न घाबरता आल्या प्रसंगाला सामोरे जाणे, अपमानाचे , दु:खाचे क्षण प्रयत्नपुर्वक विसरणे, अहंकाराला वेळीच बाजूला सावरणे हे ठरवून करावे लागते. यासाठी योग, ध्यान किंवा इतर गोष्टी (ते तुम्हाला मनापासून आवडेल काहीही असू शकते अगदी रॉक संगीत सुद्धा) केवळ सहाय्य करु शकतात, पण निश्चय तुमचाच असला पाहिजे. म्हणजे सर्वात उत्तम कोचिंग क्लासला गेल्याने केवळ कोणी उत्तम गुणांनी उत्तीर्ण होईल वा त्याला विषयाचे सखोल ज्ञान प्राप्त होईल असे नाही. आचरेकर सरांचे सगळेच शिष्य अतिशय चांगले क्रिकेटपटू होणार नाहित. तो निश्चय मनातून आधी व्हायला हवा नाहीतर कोणताच मंत्र, कोणताही गुरु निष्फळ ठरेल.
In reply to झकास लेख. हल्ली काही by चित्रगुप्त

In reply to झकास लेख. हल्ली काही by चित्रगुप्त
In reply to यनावाला लेख पाडणार... by मांत्रिक
In reply to आपली तलवार म्यान. बाटगा by आनन्दा
In reply to समाजसुधारणा हळुहळु घडवुन आणावी लागते by मारवा
In reply to लोकशाही व्यवस्था असल्यामुळे by बोका-ए-आझम
In reply to समाजसुधारणा हळुहळु घडवुन आणावी लागते by मारवा
In reply to थोडे घाई करणारे लोक बी by प्रकाश घाटपांडे
,"जालावर इकडे तिकडे शोधून विविध माहिती हडकून लेख लिहलेला दिसतोय. कारण हे सगळं मी कोठेतरी याआधी जालावर वाचलयं."...यांतील दुसरे विधान (हे सगळं मी कोठेतरी या आधी जालावर वाचलयं.") हे खरे आहे. पण त्यांनी काढलेला निष्कर्ष चुकीचा आहे. "ग्लोबल मराठी " या संस्थळावर मी हा लेख लिहिला आहे (डिसेंबर २०१४). तो त्यांनी वाचला. निरीक्षणांवरून निष्कर्ष काढताना सर्व संभाव्य पर्यायांचा विचार करणे आवश्यक ठरते.
In reply to धन्यवाद! by यनावाला
निरीक्षणांवरून निष्कर्ष काढताना सर्व संभाव्य पर्यायांचा विचार करणे आवश्यक ठरते.हल्ली अशा धाग्यांवर फार घाई करतो मी. क्षमस्व.
निरीक्षणांवरून निष्कर्ष काढताना सर्व संभाव्य पर्यायांचा विचार करणे आवश्यक ठरते. In reply to हे मंत्र कोणी ऐकलेत का? by गामा पैलवान
In reply to मग असं करा! by साती
In reply to ये हुई ना बात ! by गामा पैलवान
In reply to +१११ by मांत्रिक
In reply to अनुमोदन by प्रसाद गोडबोले
In reply to अनुमोदन by प्रसाद गोडबोले
In reply to व्यक्तिगत होतंय ना हे ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपण मंत्र सामर्थ्याचे फायदे सांगा..... आम्ही तोटे सांगु. नै का ?असं का ? कोणताही अध्यात्मिक माणुस यनावालांच्या मानगुटीवर बसुन ॐ मंत्राचा जप करा , किंवा गायत्री मंत्राचे अनुष्ठान करा असे मागे लागला होता का ? भोळ्याभाबड्या लोकांनी डिफेन्स का करायचा ? ते कोणाच्या मागे लागले नव्हते की नामस्मरण करा म्हणुन . मंत्रसामर्थ्याचे जे काही फायदे तोटे असतील ते जप करणार्या पाशीना ! जर यनावालांवर कोणी सक्ती केली तर त्यांचा त्रागा समजु शकतो पण मागील २ धागे पहाता ते केवळ खुस्पट काढण्यासाठीच लिहितात हे निदर्शनास आले आहे . अभ्यास आणि वय ह्याच साठी काढले की गोंदवलेकर महाराजांचे प्रवचनाचे अत्यंत सोप्प्या भाषेतील पुस्तक आहे , त्यात कोणतीही गुढता नाही अगदी असिक्षित माणसालाही कळेल अशा भाषेत सोदाहरण महाराजांनी बर्याच शंकांचे विवचन केले आहे , ते यनावालांनी वाचलेले दिसत नाही . वाचा असे सुचवले तर तुम्ही म्हणाल ते वाचायला आम्ही बांधील नाही हे उत्तर ठरलेले आहेच . आता सर तुम्हीच सांगा की कोणताही अभ्यास नकरता , केवळ काही तर एकांगी मत बनवुन दुसर्यांच्या भाव्ना दुखावणारे लेखन जर कोणी सातत्याने करत असेल तर काय करायचे ? परत एकदा स्पष्ट करतो की कोणीही सश्रध्द माणुस यनावालांच्या मागे हात धुवुन लागला असेल की मंत्रोच्चारण करा तर यना वालांनी त्या व्यक्तीशी जे काही वाद विवाद असतील ते तिथे सोडवावेत , उगाच सगळ्याच सश्रध्द लोकांच्या भावना दुखावायला काय कारण ? त्यांच्या मागील धाग्यावरही त्यांची मते कशी एकांगी आहेत ह्यावर सविस्तर प्रतिसाद दिला होता मी http://www.misalpav.com/comment/763528#comment-763528 पण यनावाला लेफ्ट बिहाईन्फ करुन पुढे जातात . आता ह्या इथे पहा http://www.misalpav.com/comment/771778#comment-771778 हा आयाडी शंकराचार्यांवर काहीच्या काही विधाने करत आहे , त्याला दुवा दे संदर्भ दे म्हणुन सांगितले तर नुसतेच मेगाबायटी प्रतिसाद , संदर्भ नाहीच . बाकी अन्यत्र मी विचारले होते की ज्या मनुस्मृतीच्या नावाने वैदिक सनातन धर्मावर चिखलफेक करत आहात ती मनुस्मृती कोणत्या वेदाचा , उपनिषदाचा भाग आहे ? तर त्यालाही उत्तर आले नाही !! असो. एकुणच सध्या ही मिपावर टुम निघाली आहे , इथे धर्माचा कोणी अभ्यासक नसल्याने धर्मावर , सश्रध्द लोकांवर वात्टेल ती चिखलफेक करायची अन कोणी प्रतिवाद केलाच तर "वैयक्तिक टिप्पण्णी " असे म्हणत धोरणांच्या मागे लपायचे ! असो कंटाळा आलाय ह्या सगळ्याचा . सकारात्मक चर्चा तर काही नाहीच उगाचच लोकांच्या भावना दुखावत बसवायला काय अर्थ आहे . नकोच हे सगळे . आम्ही सनातन धर्म, उपनिषदे गीता ,अध्यात्,, संत साहित्य , हे सारे मानतो जे की तुमच्या लेखी भोंदुपणा आहे तर असो बापडे . आम्ही आमच्या अज्ञानात खुष रहातो . माझा आयडी संपादित केला जावा अशी विनंती आधीच केली आहे . आता पुढील चर्चा भेटी अंती :)
In reply to धर्म अध्यात्मिकता ह्या गोष्टी by प्रसाद गोडबोले
In reply to धर्म अध्यात्मिकता ह्या गोष्टी by प्रसाद गोडबोले
In reply to संपूर्ण प्रतिसादात मंत्रात by बाळ सप्रे
- त्या हयात वरीष्ठांना वाईट वाटेल म्हणून केले नाही.
- ती आमची संस्क्रूती नाही (या धाग्यावरचा अगदी समर्पक प्रतीसाद घाटपांडे सरांनी दिला आहे, धन्य्वाद सर)
- आम्हाला काहीही सिद्ध करण्याची गरज नाही.
In reply to धर्म अध्यात्मिकता ह्या गोष्टी by प्रसाद गोडबोले
हा आयाडी शंकराचार्यांवर काहीच्या काही विधाने करत आहेअद्वैत सिध्द्दांत कर्म सिध्दांताला उघड उघड क्रॉस जातो इतके साधे सोपे म्हणने आहे. या पलिकडे मी काहीही अभिप्रेत करत नाही. तसेच मायावाद ( मायेचे जे स्पश्टीकरण) आहे त्यातील काही भाग बुध्द तत्वज्ञानातील जगाच्या स्पश्टीकरणाशी काही साम्य दाखवतो यापलीकडे माझे कोणतेही म्हणने नाही. उलट तुम्ही(अथवा कोणीही) माझ्या समजुतींना छेद द्याल असे कोणतेही अधिकृत रेफरंस समोर आणले तर मी ते आवश्य आत्मसात करेन हीच माझी आपणा साधुभावस्थिर लोकांना नम्र विनंती आहे. कृपया मला सश्रध्द आणी अश्रद्ध यापैकी कोनत्याही कॅटेगरीमधे बसवु नये ते अद्वैत सिध्दांता विरोधी ठरेल.
In reply to धर्म अध्यात्मिकता ह्या गोष्टी by प्रसाद गोडबोले
In reply to प्रगो नाय पटलं. :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पण केवळ त्यांच्या लेखनाला ओळखतो त्यांचं लेखन नेहमीच नव विचार आणि विवेकाशी बांधील असते आणि त्यांच्या लेखनीचं ते वैशिष्ट्यच आहे.यातलं काहिच दिसत नाहि लेखनात (चला.. फार तर क्वचीत दिसतं म्हणुया :) ).
In reply to मग असं करा! by साती
In reply to मग असं करा! by साती
In reply to मग असं करा! by साती
जगाच्या चार कोपर्यांत चौघांना बसवा.पृथ्वी गोल आहे.
In reply to घाटपांडे- मग काय केस ठोकायची का ? by गॅरी शोमन
In reply to गुढी पाडवा २०११ ला अपघात होऊन माझापाय मोडला. by मोगा
In reply to ॐ चे नक्की माहित नाही. परंतु by श्रीगुरुजी
In reply to ॐ चे नक्की माहित नाही. परंतु by श्रीगुरुजी
In reply to +१ श्रीगुरुजी by बाप्पू
In reply to विचित्र विश्व आणि आपण by चौकटराजा
In reply to विचित्र विश्व आणि आपण by चौकटराजा
In reply to मला, शंभर झाले की बोलवा... पण by संदीप डांगे
In reply to संदीप जी यनावालांच माहीत नाही मी प्रयत्न करतो फक्त by मारवा
In reply to लिंका..? कधी दिल्या मी? by संदीप डांगे
In reply to मंत्र सामर्थ्य, अध्यात्म, by बिपिन कार्यकर्ते
In reply to आणि नास्तिकवादाचे अनुयायी by mystic man
आणि नास्तिकवादाचे अनुयायी मुळात कोणताही अधिकार नसणारे, कोणताही आध्यात्मिक अनुभव नसणारे जेव्हा ओंकार व गायत्री मंत्राविषयी वाटेल ते बरळतात, तेव्हा आस्तिकांनी गप्पच बसावे का?नका बसू. नकाच बसू. बोला. बाजू मांडा. पण तुम्ही अध्यात्मिक आहात ना? साधना करता ना? मग ते दया, क्षमा, शांती, करुणा वगैरेंचं काही भान ठेवा की. का ते ही जाऊच द्यायचं? जाऊ द्या तर जाऊ द्या.
इतर सश्रद्ध माणसांचे यात नुकसान होत नाही का?तुम्ही अध्यात्मिक आहात. प्रारब्ध वगैरे मानतच असाल ना? आणि हो... ते सश्रद्ध आणि त्यांचे सद्गुरू काय ते बघून घेतील ना नुकसानीचं.
आणि हो, गायत्री मंत्र व ओंकार यांचा अपमान होत असताना तुम्ही गप बसता व नंतर फक्त आस्तिकांना सल्ले देता, यात काही पार्शलिटी होत नाही का?चुकीचे गृहितक. त्यामुळे पुढचे गैरलागू.
खरंच सांगा, त्यांचे उद्गार मानवतेला एकत्र आणणार्या वेदांत तत्वज्ञानाचा अपमान करत नाहीत काय?होतही असेल किंवा नसेल. पण त्यांचा प्रतिवाद करा. तुकाराम महाराजांच्या अंगावर धावून जाणार्या मंबाजीने खरा वेदांचा अपमान केला असे मला वाटते. ’मानवतेला एकत्र आणणार्या’ वेदांना प्रमाण मानणार्यांनी शतकानुशतके मानवांना जनावर बनवून वागविले त्यामुळे वेदांचा अपमान झाला असे मला वाटते. पण ते एक असोच.
In reply to अपेक्षित प्रातिसाद. असो. आता by बिपिन कार्यकर्ते
In reply to पण तुम्ही अध्यात्मिक आहात ना? by mystic man
In reply to _/\_ by बिपिन कार्यकर्ते
In reply to मंत्र सामर्थ्य, अध्यात्म, by बिपिन कार्यकर्ते
In reply to कसे चवताळून उठतात आणि बेताल व by मृत्युन्जय
In reply to कसे चवताळून उठतात आणि बेताल व by मृत्युन्जय
In reply to कसे चवताळून उठतात आणि बेताल व by मृत्युन्जय
कसे चवताळून उठतात आणि बेताल व वैयक्तिक टीका करतात / टिप्पण्या करतात ते पाहिले की मौज वाटते.ती त्यांची स्टाईल असेल हो . चालायचेच . मिपा वर हा एक ट्रेंड आहे , एकट्या दुकट्याने मोठ्या समुहाच्या भावनांवर चिखलफेक करायची अन त्या समुहातल्या कोणी तरी प्रत्युत्तर दिले की वैयक्तिक टिपण्णी , व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला असले गळे काढायचे !
In reply to कसे चवताळून उठतात आणि बेताल व by मृत्युन्जय
In reply to कसे चवताळून उठतात आणि बेताल व by मृत्युन्जय
बिका त्यासाठी अध्यात्माला कशाला मध्ये आणता?मला वाटतं, बिकांनी अध्यात्माला मध्ये आणलेलं नसून, वैयक्तिक टीका टाळून अभ्यासूंनी योग्य प्रकारे अध्यात्माची बाजू इथे मांडावी असं म्हटलंय.
अध्यात्माचा उपयोग मनःशांती साठी होतो. ऑंकार पठनाने मन हलके झाल्यासारखे वाटते. पवित्र वाटते.१०० टक्के सहमत. पण हे जे काही तुम्हाला-आम्हाला हलके, पवित्र 'वाटते', ते सापेक्ष आहे. एखाद्या अधार्मिक व्यक्तीचे मन:शांतीचे परिमाण वेगळे असू शकते. तस्मात, कुणी कुणाला नावे ठेवण्यपेक्षा किंवा असे लिहिलेच कसे म्हणण्यापेक्षा सुयोग्य प्रकारे प्रतिवाद करावा, ही अपेक्षा बिकांची दिसते, असे मला वाटते.
In reply to बिका त्यासाठी अध्यात्माला by सस्नेह
सुयोग्य प्रकारे प्रतिवादह्यॅ ह्यॅ ह्यॅ . सुयोग्य प्रतिवाद आला की लगेच खालील पैकी प्रतिसाद द्यायचा १. तो तुमचा समज आहे. २. चालूद्या तुमचे निरर्थक अत्मरंजन / अत्मकुंथन . ३. तुम्ही निरर्थक भ्रमवादाचे बळी आहात. ४. आपणास मुद्दा कळलेला नाही. || श्री तांब्याराम प्रसन्न || ( श्रेयाव्हेर : माणणीय सरांच्या एका जुन्या प्रतिसादातुन कॉपीपेस्टीत )
In reply to सुयोग्य प्रकारे प्रतिवाद by प्रसाद गोडबोले
In reply to बिका त्यासाठी अध्यात्माला by सस्नेह
आणि जर एखाद्याला तसे वाटत असेल तर जपजाप्य अथवा होमहवन करणे यात काहिच चुकीचे आहे असे मला वाटत नाही. त्याउप्पर आपली मते दुसर्यावर लादण्याच्या इर्ष्येने जेव्हा नास्तिक लोक फुकाची बडबड करतात तेव्हा मलाही मौजचवाटते. मी मिपावर जितके प्रतिसाद पाहिलेत त्यात कुठेही (काही माझ्याकडुन नजरचुकीने राहुन गेले असतील म्हणुन ९५% प्रतिसादात म्हणुयात वाटल्यास) कुणी आस्तिकाने कुठल्या नास्तिकाला "हॅहॅहॅ रे येड्या. नास्तिक तु. तुला काय कळते. देवावर विश्वास ठेवायला शिक जरा नाहितर गाळात जाशील" टाइपचे प्रतिसाद दिलेले दिसत नाहित. या उलट आस्तिकांचे रेवडी उडवणारे, आपणचे काय ते हुषार अश्या थाटाचे, आपली मते आस्तिकांवर लादायचा प्रयत्न करणारे, आस्तिक - नास्तिक वाद उकरुन काढणारे नास्तिकांचे अनेको प्रतिसाद, आणि धागे पाहिलेत (मजे मजेत लिहिलेले आणि डु आयडींनी मुद्दाम उकीर्डे फुंकण्यासाठी टाकलेले प्रतिसाद सोडुन देउ आपण. ते खोडसाळपणेच लिहिलेले असतात) बाकी सुयोग्य प्रकारे प्रतिवाद करावा अशी बिकांची अपेक्षा असावी याबद्दल माझे काहिही दुमत नाही. गंभीरपणे चर्चा करणार्या कुठल्याही माणसाची असेल. माझीही आहे. बिकांबद्दल तर खात्री आहे. पण त्यांचा वरचा प्रतिसाद हा सुस्प्ष्टपणे आस्तिक लोकांच्या प्रतिसादांबद्दल होता. मी त्यात थोडासा बदल केला. आस्तिक लोक चुकीचे प्रतिसाद देतच नाहित असा काही माझा दावा नाही पण नास्तिक या बाबतीत कांकणभर सरसच आहेत असे मी माझ्या प्रतिवादात म्हटले आहे. बिकांनी केवळ
"टीका झाली की लोक कसे चवताळून उठतात आणि बेताल व वैयक्तिक टीका करतात / टिप्पण्या करतात ते पाहिले की मौज वाटते."असे लिहिले असते. तर हा आणी त्याच्या आधीचा प्रतिसाद लिहिलाही नसता. पण त्यांच्या प्रतिसादात "पण अध्यात्माची बाजू घेणारे, स्वत: अध्यात्मिक असल्याचे मानणारे, साधना वगैरे करणारे टीका झाली की ......" असे आस्तिकंना उद्देशुन असलेले स्टेटमेंट आल्यामुळे तो प्रतिसाद लिहिला. आस्तिक काय किंवा नास्तिक काय शेवटी माणसेच. आणि माणासांचे सगळे विकार दोन्ही विचारधारेच्या व्यक्तींमध्ये असणारच. एवढे सांगण्यासाठी तो प्रतिसाद.
In reply to पण अध्यात्माची बाजू घेणारे, by मृत्युन्जय
In reply to मी आस्तिक आहे कि नास्तिक by सुबोध खरे
In reply to मी आस्तिक आहे कि नास्तिक by सुबोध खरे
In reply to मी आस्तिक आहे कि नास्तिक by सुबोध खरे
In reply to मानसिक आधार देणं घेणं याचं उद्दात्तीकरण कशासाठी ? by मारवा
In reply to मारवा साहेब यात उदात्तीकरण by सुबोध खरे
In reply to मारवा साहेब यात उदात्तीकरण by सुबोध खरे
In reply to सुबोध जी by मारवा
In reply to अटळ मृत्युच्या वास्तवाला भिड्ण्याची एक अजुन रीत असु शकते by मारवा
In reply to मारवा साहेब by सुबोध खरे
तुम्ही म्हणता तसे विवेकी आणि कणखर लोक मीही पहिले आहेत किंवा पाहतो परंतु असे लोक १०० पैकी फारतर १ असतात बाकी ९९ नाहीत. आपला मृत्यू समीप आला असतानाही आपला बुद्धी प्रामाण्यवाद स्पष्टपणे व्यक्त करणारा बर्ट्रांड रसेल सारखा माणूस विरळाच.
मी एखाद्या तरुणाला त्या १०० मधील १ चे उदाहरण आदर्श गौरवास्पद म्हणुन देईल
तुम्ही सांगितलेल्या तिबेटन मंत्र वाल्या व्यक्तीचे उदाहरण देणार नाही. तो एक मानवी कमकुवतता कशी असते, हतबलता असहाय्यता का कशी निर्माण होते त्या हतबलतेच्या परीणामाने माणसे कशी विवेकहीन तर्कहीन वागतात ते वागण्यात कसा निरर्थकता आहे हे सर्व मानवी जीवनातले नकारात्मक पैलु सांगण्यासाठी समजावण्यासाठी देइल.
आदर्श गौरवास्पद उदाहरणासाठी शंभरातला वरील १
In reply to मारवा साहेब by सुबोध खरे
In reply to अगदी अगदी! by बोका-ए-आझम
मरण समोर आल्यावर लोक एखाद्या विश्वासामुळे किंवा त्याच्या अभावामुळे त्याला कसं सामोरं जातात त्याचं उदाहरण द्यायचं आहे.+१. बायदवे, भगतसिंगला जेंव्हा फाशी झाली होती तेंव्हा तुरुंगात त्याने Why I am an Atheist हा निबंध लिहिला होता. भगतसिंग किती धैर्याने मृत्युला सामोरे गेला हे तर आपल्याला माहित आहेच.
In reply to अगदी अगदी! by बोका-ए-आझम
In reply to अटळ मृत्युच्या वास्तवाला भिड्ण्याची एक अजुन रीत असु शकते by मारवा
In reply to मारवा साहेब"आदर्श गौरवास्पद by सुबोध खरे
In reply to मारवा साहेब"आदर्श गौरवास्पद by सुबोध खरे
हे बरोबर पण बाकी ९९ % लोकांनी ते धारिष्ट्य कुठून आणायचे?
असणं कधी समजावण्याचे प्रसंग आपल्यावर आले आहेत का?
असे प्रसंग माझ्यावर काही फार आलेले नाहीत . पण आले तर काय उपाय असावा काय नाही हा वेगळा भाग आहे.
समाज जितका जास्त प्रगती करेल जितकं शिक्षण विवेक इ. च प्रमाण वाढेल
जितकी स्वयंपुर्णता आर्थिक व वैचारीक निर्माण होइल तस तसे वरील समस्या नक्कीच कमी होत जातील अशी खात्री वाटते.
मात्र मोठा प्रश्न हा आहे की तुम्ही कुठल्या मुल्याला महत्व देणार कुठल्या मुल्याचा प्रचार प्रसार करणार.
तुम्ही अज्ञानातुन परावलंबनातुन निर्माण होत असलेल्या भय लाचारी इ. चा गौरव आदर्श समोर ठेवणार
की निर्भयता स्वावलंबन (वैचारीक) इ. चा आदर्श समोर ठेवणार.
हे बघा आदर्शाप्रत पोहोचणं पुर्णपणे हा एक भाग व त्या दिशेने सातत्याने अथक वाटचाल करत राहण हा दुसरा भाग.
तर मान्य आहे की १०० पैकी सर्वच ही आदर्श अवस्था प्राप्त करु शकणार नाहीत पण प्रयत्न तर त्या दिशेनेच करणे व तो
आदर्श डोळ्यासमोरच ठेऊन करणे अगत्याचे नाही का ?
मुळात तुम्ही तुमचा मुल्य निर्णय काय करतात ? आदर्श काय ठेवतात तो आहे ?
एकदा ते निश्चित झाल्यावर त्यात आपण कीती कमी पडतोय कीती अधिक प्रयत्न करण आवश्यक आहे
किती नव्या साधनांची उपायांची गरज आहे हा सर्व पुढचा भाग झाला.
मुळ प्रश्न तुमची निवड कोणत्या बाजुला आहे ?
तुम्ही त्या मानवी असहाय्यतेला हतबलतेच्या बाजुने आहात की मानवी विवेक वैचारीक स्वावलंबन संघर्षशीलता या बाजुने आहात हा आहे.
कारण यावरच पुढे तुमचे प्रयत्न तुम्ही कोणत्या दिशेने वळवता हे आहेत.
मला तुमच्यासारखा प्रसंग (जो कधी येत नाही फारसा ) तर मी अगोदर त्याला विवेकवादाकडे वरील मुल्यांकडे प्रवृत्त होण्यास प्रामाणिक प्रयत्न करेल त्यात मला १००० मधुन २ वेळा समजा जरी यश आलं तरी चालेल. मी त्याकडे एक सुरुवात एक वाटचाल एक छोटी छोटी प्रगतीच्या दिशेने टाकलेली पावल या अर्थाने बघेल.
आणि त्यात ९९८ वेळा येत असलेल्या अपयशाला एक धडा एक अभ्यास एक आपण कुठे कमी पडतोय या अर्थाने बघेल.
प्रश्न कोणत्या बाजुचं कुठल योग्य की अयोग्य कुठला मुल्य कुठली नैतिक भुमिका तुम्ही घेत आहात तो मुलभुत आहे.
प्रयत्न उपाययोजना पुढील भाग
एक प्रथा उदा. चुक आहे की नाही हे ठरवण महत्वाच मानवी की अमानवी हे ठरवण महत्वाच
मग तीचे उच्चाटन कसे करता येईल काय उपाय कीती हजारो वर्ष लागतील आदी बाबी त्यानंतरच्या
अगोदरच्या नव्हेत.
In reply to हे बरोबर पण बाकी ९९ % लोकांनी by मारवा
चार मंत्र म्हटले असता त्या माणसाला मानसिक शांती मिळत असेल तर त्याला असे उच्च तत्वज्ञान सांगून काय उपयोग?
हा तुम्ही तुम्हाला पटत नसलेल्या मात्र समोरच्या व्यक्तीला तात्कालिक फायदा होत असेल तर काय हरकत आहे असे सांगुन असे म्हणताय.
यात तुम्ही त्या व्यक्तीचा तात्कालिक फायदा करुन त्याला कायमचा मानसिक अवलंबनात ढकलताय. उदा. एक भिकारी आहे त्याला आज भुक लागलेली आहे त्याला आजच्या जेवणापुरते तुम्ही पैसे दिले व त्याची आजची महत्वाची तात्कालिक भुक मिटवली. तर तुम्ही नक्कीच संवेदनशीलता दाखवली मात्र तुम्ही जर त्याला त्याऐवजी त्याच्या मुळ आर्थिक परावलंबित्वाच्या समस्येवर जर काही उपाय दिला काही त्याच्या लायक नोकरी मिळवुन दिली. काही त्याच्या हाताला काम दिल आणि कायमस्वरुपे त्याच्या मुलभुत समस्येवर (आर्थिक परावलंबन ) पासुन मुक्ती दिली तर तुम्ही खरया अर्थाने त्याला मोठी मदत केली असा होतो. आता तुम्ही वारंवार जर त्याची तात्कालिक समस्या तात्पुरत्या स्वरुपात सोडवुन देत राहीलात नेहमीच तर तो कायम आयुष्यभर आर्थिक परावलंबनातुन बाहेर येऊच शकणार नाही. याचा अर्थ असा आहे का की जी तात्कालिक मदत तुम्ही त्याला केली ती चुक आहे ? तर नाही ती योग्यच आहे मात्र
हि मदत तात्कालिकच आहे ही अपुर्ण आहे याने त्याच्या जीवनातील मुलभुत समस्या सुटणार नाहीत तो याच्या वारंवार मदतीने कदाचित अधिकच आळशी होत जाईल याची पुर्ण जाणीव ठेऊन व आज ना उद्या त्याच्या साठी या पुढची पायरी घेऊन मोठा उपाय करणे हाच एकमेव उपाय आहे हे भान ही जाणीव अशी मदत करतांना ठेवणे आवश्यक आहे.
या जाणीवे सहीत मात्र सध्या आपला नाईलाज म्हणुन अशी तात्कालिक मदत करत राहण्यात काहीच गैर नाही.
पण तात्कालिक मदत हीच योग्य आहे असे समजुन बसुन त्याच्या मुलभुत समस्येचे अस्तित्वच अमान्य करणे त्याकडे डोळेझाक करणे त्याविषयी उदासीन असणे.
अनेकदा आपली तात्कालिक मदत व आपल्यापुरते साधलेले मदत केल्याचे तात्कालिक समाधान हेच त्या पीडीतासाठी आयुष्यभरासाठी दिर्घकाळासाठी घातक आहे याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे.
उदा. नाना पाटेकर सध्याच्या प्रत्येक कार्यक्रमात म्हणतात तस की मी जी मदत करतोय ती तात्कालिक आहे हा यावरचा कायम स्वरुपी उपाय नाही पण अती बिघडलेल्या परीस्थीतीत सध्या ती देखील महत्वाची आहे असे या विधानात नाना पाटेकर या पुर्ण जाणीवेने की आपण जे करतोय ही तात्कालिक मदत आहे हेच समजुन करतात. त्यांना असलेले हे वास्तवाचे भान फार कौतुकास्पद आहे. ते मी करतोय हेच बरोबर याहुन अधिक काही गरज नाही बस झाली समस्या झालो मी मोकळा असे नाही त्यांना स्वतःच्या आवाजाला कसेबसे थांबवण्यात रस नाही.
वर यनावाला अवहेलना सहन करुन ही जे अशा धाग्यांमार्फत प्रयत्न करतात ते असेच महत्वाचे आहेत. त्यांच्या कडे असलेल्या इतर अनेक सुंदर ज्ञानाला आवडत्या विषयांना मुरड घालुन ते हा सर्व आघात स्वतःहुन ओढवुन घेतात पॉलिटीकली करेक्ट राहण्याचा नेहमी प्रयत्न करण प्रत्येकवेळी स्तुतीची प्रशंसेची आस बाळगुन असण हे ते करत नाहीत.
व दिर्घ मुदतीचा अधिक कष्टाचा त्रासाचा मार्ग कठीण आहे म्हणुन काय उपयोगाचा असा विचार करणे चुक आहे.
एक स्टीफन कोव्हे च्या पुस्तकावर
"Give a man a fish and you feed him for a day; teach a man to fish and you feed him for a lifetime." हा सुविचार आहे जो अनुकरणीय आहे.
In reply to हे बरोबर पण बाकी ९९ % लोकांनी by मारवा
असले हे मंत्र खरे मानणारे लोक पूर्वी होते. आज एकविसाव्या शतकातही आहेत! कुठल्याही मंत्रामध्ये कसलेही दैवी सामर्थ्य नसते. या विधानात तथ्य नाही असे नमुद करावेसे वाटते. पण अर्धवट विधान न तोडता आपण संपुर्ण वाक्य बघुया.
मंत्राने काही साध्य होत नाही.चमत्कार घडू शकत नाही. पूर्वी कधीही घडलेला नाही. भविष्यात कधी होण्याचा संभव नाही.हे वैज्ञानिक सत्य आहे.मला विज्ञान फार आवडते. पटत नाही तरीही आवडते. चित्रपट विडीओ गेम्स पासुन ते अनेक बुध्दी भ्रमीत करण्याचे तथा या संपुर्ण प्रुथ्वीचा नाश करायचे सामर्थ्य अन मस्ती विज्ञान मानवामधे अत्यंत व्यवस्थीत निर्माण करु शकते. मिसळपाव सारख्या संस्थळापासुन ते मती भ्रमीत करणार्या एच डी पॉर्न स्थळापर्यंत सर्व काही भ्राम मायाजाल विज्ञानच रचु शकते. विज्ञानाच्या या सामर्थ्याला सगळेच घाबरतात त्याच्या प्रभावाने बरेच भ्रमीत होतात. अन विज्ञान किर्तनी रममान होतात हे ही एक उघड गुपित आहेच... पण हळु हळु ते सामजावण्यात मज्या आहे म्हणून विषयाकडे वळुया... म्हणून मला कायम मनात प्रश्न निर्माण होतो की हे विज्ञान काय आहे ? आणी त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे वैज्ञानीक सत्य म्हणजे नक्कि काय असते हे जरा स्पश्ट कराल का ? माझा तरी वैज्ञानीक सत्य हा शब्द ऐकल्यावर प्रचंड गोंधळ उडतो ( जर तो शब्द विनोद म्हणून योजला नसेल तर) . विज्ञानाच्या नियमाने न चालणारी गोष्ट अस्तित्वात नाही असे विज्ञान ठाम्पणे का म्हण्ते हेही जाणुन घ्यायला आवडेल. हे म्हणजे अमुक धर्माप्रमाने जगाहे आचरण नसेल तर इतर कोणत्याही धर्माचे जगात केले जाणारे आचरण धार्मीक आचरण नाहीच मुळी असा घातक कट्टरतावाद मानु नये ?
वरील ऐतिहासिक सत्य घटनांवरून याला पुष्टी मिळते. मंत्रात सामर्थ्य असते ही अज्ञानमूलक, खुळचट कल्पना आहेतुकारामांचे एक वाक्य आहे लोका सांगे ब्रम्हज्ञान ... .. ..ण. ( कृपया गाळलेली जागा भरावी)
आजची स्वाक्षरी :- पाहुनी विज्ञानाच्या बलाला भ्रमीष्ट झाला झाला दारु-अ-वाला दारु-अ-वाला.
In reply to असले हे मंत्र खरे मानणारे लोक by भाऊंचे भाऊ
In reply to तुम्ही भाऊंचे भाऊ कधी झालात? by आनन्दा
पाहुनी विज्ञानाच्या बलाला भ्रमीष्ट झाला झाला दारु-अ-वाला दारु-अ-वालायासम ओवी मी एका धाग्यावर प्रतिसादात लिहली होती तो प्रतीसाद गायब झाला असे दिसले तितक्यात माझा द-बाहुबली हा आयडी सुध्दा बॅन झाला. असो या चर्चा व्यनीत वा खरडवहीत कराव्यात असा मिपा संस्थळाचा दंडक आहे तुम्ही तो तोदल्याचा मला आनंद आहे असे म्हणून मी अदचणीत येउ इच्चीत नाही.
In reply to हा mystic man कोणाचा डुआयडी by mystic man
In reply to हा mystic man कोणाचा डुआयडी by mystic man
In reply to संपादक मंडळाला एक नम्र विनंती by मारवा
In reply to मांत्रिक महोदय by मारवा
In reply to कदाचित यापूर्वी यावर मी by आनन्दा
In reply to झालं ? समोर वाचुन झाली गिता ? by भाऊंचे भाऊ
In reply to कदाचित यापूर्वी यावर मी by आनन्दा
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to ते वरचे पण पहा की वो जरा. by आनन्दा
In reply to लिहा भो बिंधास्त. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to तुमचा प्रतिसाद तात्विक by आनन्दा
In reply to नै नै. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to प्रश्न हास्यास्पद असण्याचा by आनन्दा
In reply to व्यक्तिगत शेरेबाजी नाही by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपल्या अनुभवाची तात्विक पातळीवर चर्चा होऊ शकत नाही.म्हणूनच मी कधीच नास्तिकांशी वाद घालायला जात नाही. कारण त्यांची दुसर्याच्या अनुभवावर विश्वास ठेवायची, किंवा स्वतः अनुभव घेण्यासाठी लागणारा वेळ देण्याची देखील इच्छा नसते, आणि अध्यात्माच्या तत्वज्ञानानुसार हे चर्चेचे नसून अनुभवाचे शास्त्र आहे. त्यामुळे दोन आस्तिक किंवा दोन नास्तिक यांच्यामध्ये "चर्चा" होऊ शकते. एक आस्तिक आणि एक नास्तिक यांच्यात "चर्चा" होऊ शकत नाही. आपली वर जी काही "चर्चा" झाली त्याने देखील हेच अधोरेखित केले. जाता जाता हे मात्र नमूद करू इच्छितो की मी अनुभवांवर आधारलेला आस्तिक आहे, आणि माझे अनुभव बुवा बापूंसारखे प्रार्थना केली आणि कुत्रा मिळाला असे नसून माझ्या अल्पमतीच्या पातळीवर चिकित्सा करूनच स्वीकारलेले आहेत. गंमतीचा भाग म्हणजे मी एकाच वेळी राम-कृष्ण आणि उत्क्रांतीवाद या दोन्हींवर विश्वास ठेवतो. जे खरे म्हणजे हास्यास्पद आहे, पण मला अजून सत्य माहीत नाही. कारण उत्क्रांतीवाद स्वतःचे म्हणणे पुराव्यानिशी सिद्ध करतो, तर मला आलेल्या पॅरानॉरल् अनुभवांमागचा कार्यकारणभाव अजूनही कळलेला नाही. वर लिहिल्याप्रमाणे मी पूर्वी अज्ञेयवादी होतो, आता आस्तिकतेकडे झुकलेला अज्ञेयवादी आहे. अध्यात्मात त्याला बर्याच वेळेस जिज्ञासू असे म्हटले जाते. कारण मला आलेले अनुभव हे प्रचलित विज्ञानाच्या कसोटीवर उतरत नाहीत, आणि जर तसे असेल, तर मला विज्ञानालाच धरून ठेवण्यात रस वाटत नाही. अध्यात्म आणि विज्ञान हे वर कोणीतरी लिहिल्याप्रमाणे एकच कोडे उलगडायचा प्रयत्न करत आहेत, आणि कधीतरी या दोन्ही वाटा एकत्र येतील असा मला विश्वास आहे. त्यामुळे नास्तिकांना शिव्या घालणारे आस्तिक आणि आस्तिकांना शिव्या घालणारे आस्तिक यांना मी एकाच पारड्यात तोलतो. (काही अपवाद वगळता) असो. इत्यलम. मी आस्तिक का आहे, आणि आस्तिकवादावरची चर्चा मला का आवडत नाही यामागची ही भूमिका. चु. भु. दे. घे.
In reply to एकदम परफेक्ट.आपल्या अनुभवाची by आनन्दा
In reply to मानवता, स्वातंत्र्य समता by प्रकाश घाटपांडे
In reply to कदाचित यापूर्वी यावर मी by आनन्दा
आणि मंत्रंमध्ये सामर्थ्य नसते असे म्हणणार्यांबद्दल माझ्या मनात दया आहेमी दयेस पात्र आहे http://www.misalpav.com/comment/770329#comment-770329
In reply to आणि मंत्रंमध्ये सामर्थ्य नसते by प्रकाश घाटपांडे
आणि मंत्रंमध्ये सामर्थ्य नसते असे म्हणणार्यांबद्दल माझ्या मनात दया आहेअहो त्यांन्ना ढुश्शी मारुन दरवाजे तोडणारा दया म्हणायचे असेल बहुतेक =))))
सकाळी स्नान करून,शुचिर्भूत होऊन, मंत्र म्हटल्याने पवित्र झाल्यासारखे वाटत असेल, मनाला उभारी मिळत असेल, उत्साहवर्धन होत असेल, तर तेही नसे थोडके. म्हणून मंत्रजप अवश्य करावा.पण त्याचा उपयोग तेवढाच हे वास्तव जाणावे. असं म्हटलय.
हॅहॅहॅ! छान आहे लेख. आवडला.