भुईक

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
6 Nov 2015 - 8:05 pm

"नाकाला नुसती धार लागली हुती, रगात नुसतं ठिबकत हुतं" बापुराव घुश्श्यातचं बोलला.
"आरं पण यवढं झालचं कसं?, लिंब्यानं कायचं कसं न्हाय क्येलं" पाटील पानाचा तोबरा भरत बोललं.
"यका बुक्कीत कुठं येवढं रगात येतं व्हयं, गणा बिना फुटला आसल" चवढ्यावर बसलेला मारुती घाऱ्या डोळ्यांनी बघत बोलला.
"ते काय नाय पाटील पोराचा जीव बीव गेला आसता तर, केवढ्याला पडलं आसतं बोला" बापुराव पेटला.
"येका बुक्कीत जीव जायला त्येच्यात काय आवसानच न्हाय वयं, उग काय बी बोलू नगु , घ्या मिटवा मिटवी करुन" पाटील सामोपचाराचं बोललं.
"आसं कसं मिटवायचं, ह्येच्या नाग्याचं डोस्कं बिस्क फुटलं आसतं तर घीतली आसती का ह्यनं मिटवामिटवी करुन?" बापुराव काय थांबायचं नाव घेत न्हवता.
"आरं नाग्या काय तुला आसा तसा वाटला वय? पाय लावुन पळुन ग्येलं तुजं पोरगं म्हायतंय का?"मारुतीरावानं बी आता बार भरला.
"मारुतीराव लय त्वांड आलं काय बोलाय, नाग्यासंग तुलाबी हितं ऊलटं टांगीन, पोरावर जरा ध्यान ठिव, परवा बी म्हणं त्यानं नळात कुणाला तरी बुडवलं" पाटलानं पटका गुंडाळायला घेतला.
"नळाला पाणीच न्हायतर काय बुडवता, आलीकडच्या डबक्यात पोरं पवत हुती, तिथच कायतरी झालं, म्याबी त्येला दोन मुस्काडात ठिवुन दिल्या म्हणा" मारुतीरावानं आपली बाजू पष्ट केली.
"नळाला पाणी न्हाय मनतुय, मग ऊसाचं काय केलयं?" पाटलानं आजुन एक पान काढलं.
"यादवाचं घेतलयं इकात, जमवायच आपलं कसंतरी, यवढा म्हैना गेला की खाल्लाकडच्या तुकड्यात पाईपलाईन टाकायचीय, नळाचं पाणी डायरेक शेतात" मारुतीरावानं बी टोपी वर सारली.
"पाटील, जित्राबास्नी खायला कुटं कडवाळ हायका कुणाचं?" मगापस्न घुम्यावनी बसलेल्या म्हादुबाला आता वाचा फुटली.
"व्हय, लय हाल ओ जित्राबाचं, नुसता कडबा किती खात्याली?" शेजारी बसलेला एकनाथनं त्याचीच री ओढली.
"त्ये काय नाय पाटील, मला चारशेची नुस्कान भरपाई पायजेल, पोराला दवाखान्यात न्ह्यायचय, नाक नुसतं सुजलयं" बापुरावनं काय आपला हेका सोडला न्हाय.
" धा रुपयला गुळी मिळती, हितं गावच्या दवाखान्यात दाखव, उग कायबी सांगु नगू, ही रोख धा रुपय घी आन मिटवुन टाक" मारुतीराव खिशात हात घालतचं बोलला.
"येकुलतं यक पोरगं हाय पाटील, उग हिततिथं दाखवणार न्हाय, आपुन काय चारशेच्या खाली येणार न्हाय, नसता रातच्याला कोयता तयारच हाय, पुना मागनं काय बुलु नगासा" बापूरावचं डोळं आता लालभडक होत चाललं.
"आन आमी काय बांगड्या भरल्यात्या वय, घराम्हागं तलवार पुरुन ठिवलीय, दसऱ्याला पुजा करताना समद्या गावानं बघितलयं" मारुतीरावानं बी फुशारकी मारली.
"बापू, चारशे लैच हुत्यातयं, बघ जरा काय कमी करता आलं तर" पाटील बंडीत हात घालत बोललं. आतल्या खिशातनं शंभराच्या नोटांच बिंडेल काढलं. एक एक करत समद्या पंधराच्या पंधरा नोटा मोजल्या. आन वरच्या काय नोटा हातात घीऊन बोललं,
"म्हादुबा, सहाशे हाईत, सखुबाईला दी, खुरपायच्या बायांची हाजरी मनावं, आन आजुन दोन बाया वाढीव मनावं" म्हादुबानं हात पुढं करुन नोटा घेतल्या. एक एक करत पुना समद्या मोजत राहीला. मारुतीरावाचं काळीज क्षणभर थांबुन पुन्हा धडकलं. बापुरावाचं तर धडाधडा धडकुन पुन्हा मुळपदावर आलं.
"पाटील, बारदाना आणायचा हुता मक्याला, त्येलाबी आजुन दुनीकशी लागतील" म्हादुबा ईमानदारीनं बोलला.
"व्हय बारदाना बी लागलचं, मका नुसती कांबळ्यावर पडुन हाय" एकनाथनं पुन्हा एकदा त्याची री ओढली.
"सकाळपस्न पोरगं थंडीतापानं फणफणलयं, मला जेवानसुदीक गेलं न्हाय" बापूराव आपलं घोडं दामटवत राहिला.
"आपल्याकडं काय पैका न्हाय गड्या, ह्या धा ची बी आता पुडी घ्यायचीय" मारुतीरावानं तर हातच झटकलं.

पाटील तोबऱ्यावर तोबरं भरत राहिलं. म्हशीच्या शेणापासुन ते केळीच्या पट्टीपर्यंत विषय काढत आन खिशातल्या नोटा चार पाच वेळा मोजत म्हादुबा घुम्यावाणी बसुन राहिला. एकनाथ बी आळस देत त्याची री ओढत गेला.
ह्या गोंधळात आख्खी दुपार गेली. शेवटी ठरलं आसं की 'बघु ऊंद्याच्याला'. आन लिंबाखालची चावडी ऊठली.

***********************************************************************

रातच्याला लिंब्या उड्या हाणतच खेळाय गेला.पोरं शिवनापाणी खेळत हुती. सुटणी झाली. नाग्यावर राज्य आलं. लिंब्या लांब पळत सुटला. डाव्या हातानं शेंबुड पुसत नाग्या त्याच्या म्हागं लागला. पळता पळता लिंब्या थांबला आन म्हागनं येणाऱ्या नाग्याच्या तोंडावर त्यानं जोरदार ठोसा मारला. नाग्या धडपडतच खाली बसला.
नाकाला नुसती धार लागली हुती, रगात नुसतं ठिबकत हुतं.

कथाप्रतिभा

प्रतिक्रिया

जेपी's picture

6 Nov 2015 - 8:18 pm | जेपी

हम्म..

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 Nov 2015 - 8:22 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

हम्म

चांदणे संदीप's picture

6 Nov 2015 - 8:35 pm | चांदणे संदीप

हम्म

आवडि's picture

6 Nov 2015 - 8:47 pm | आवडि

च्यामारि हे वाचताना बि लैच तरास व्हायला लागलाय....बन्घु उन्द्याच्याला ? मन्ग बघु उन्द्याचाला

जव्हेरगंज's picture

6 Nov 2015 - 9:06 pm | जव्हेरगंज

हम्म

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Nov 2015 - 9:22 pm | बिपिन कार्यकर्ते

हे उत्तम. शैलीचा सोस जरा कमी केला असं वाटतंय. म्हणूनच आवडलं.

जव्हेरगंज's picture

6 Nov 2015 - 9:40 pm | जव्हेरगंज

_/\_
हलकंफुलकं काहीतरी लिहायचं होतं. असंच आपलं :)

पीके's picture

6 Nov 2015 - 10:35 pm | पीके

हम्म...

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Nov 2015 - 10:37 pm | बिपिन कार्यकर्ते

मी असं मुद्दाम लिहिलं कारण तुमच्या शैलीत तोचतोपणा वाटू लागला होता. आणि गाडी शेवटी लैंगिकतेकडेच जायची कुठे तरी. त्याला हरकत नाही, पण मग पहिल्या ओळीलाच पुढे काय आणि कसं होणार हे कळल्यावर वाचायला मजा येईना.

जव्हेरगंज's picture

6 Nov 2015 - 10:53 pm | जव्हेरगंज

च्यायला असं होतं होतं का ते ....
देन ओके,
एखादी फेल जाणारचं :-(

संदीप डांगे's picture

6 Nov 2015 - 11:33 pm | संदीप डांगे

खुप सुंदर... झक्कास. जव्हेरगंजबाबाकी जय....!!!

जव्हेरगंज's picture

6 Nov 2015 - 11:42 pm | जव्हेरगंज

कथेत छोटेमोठे बदल केलेत.
आणि शीर्षक पण बदललयं.

धन्यवाद!.

आतिवास's picture

7 Nov 2015 - 10:53 am | आतिवास

कथेत छोटेमोठे बदल केलेत.
दोन-तीन कथांच्या प्रतिसादात तुमचं हे वाक्य वाचलं. तुम्ही संपादक आहात का हो? :-)
बाकी आधीच्या कथेत नेमके काय बदल केलेत हे (पुन्हा वाचून) कळणं अवघड असतं हे लक्षात आलं.

जव्हेरगंज's picture

7 Nov 2015 - 6:25 pm | जव्हेरगंज

तुम्ही संपादक आहात का हो? :-)>>>>>>>>>
नाही ओ, तेवढं कुठं आमी...

संमं ला सांगुन करुन घेतो!

कपिलमुनी's picture

7 Nov 2015 - 12:47 am | कपिलमुनी

हम्म

प्रभाकर पेठकर's picture

7 Nov 2015 - 2:39 am | प्रभाकर पेठकर

छान, मस्त आहे कथा.

शिव कन्या's picture

7 Nov 2015 - 2:00 pm | शिव कन्या

छान जमलंय.

टवाळ कार्टा's picture

7 Nov 2015 - 2:09 pm | टवाळ कार्टा

मस्तय

एक एकटा एकटाच's picture

7 Nov 2015 - 6:30 pm | एक एकटा एकटाच

आता चांगली जमलीय
पहिल्यापेक्षा

अजुन येउ द्यात

कथेत केलले बदल जाणवले नाहीत..त्यामुळे पुनश्च:
.
.

.
.
हम्म..

यशोधरा's picture

7 Nov 2015 - 6:51 pm | यशोधरा

शीर्षकाचा अर्थ काय?

जव्हेरगंज's picture

7 Nov 2015 - 6:59 pm | जव्हेरगंज

उदाहरण देऊन सांगतो.
"म्या त्याला भुईक करुन बुक्की मारली".

वेगळ्या भाषेत 'ढिश्युम' !
:)

नूतन सावंत's picture

9 Nov 2015 - 8:45 am | नूतन सावंत

'ढिश्युम' !

पैसा's picture

9 Nov 2015 - 9:34 am | पैसा

कथा आवडली.

स्वाती दिनेश's picture

9 Nov 2015 - 4:04 pm | स्वाती दिनेश

कथा आवडली.
स्वाती

तुषार काळभोर's picture

9 Nov 2015 - 4:58 pm | तुषार काळभोर

शीर्षक आवडलं

जव्हेरगंज's picture

9 Nov 2015 - 6:17 pm | जव्हेरगंज

smile

प्रदीप's picture

9 Nov 2015 - 9:02 pm | प्रदीप

पण शेवटचे स्पष्टीकरण नसल्यास बरे झाले असते असे वाटले.

जव्हेरगंज's picture

9 Nov 2015 - 10:54 pm | जव्हेरगंज

धन्यवाद प्रदीप,

खरतर जिथे ***** दिलेत तिथेच कथा संपवणार होतो.

शेवट यासाठी की दुसऱ्या दिवशी चावडीत बापू आणि मारुतीच्या उलट्या भुमिका असणार ... असं काहीतरी.... :)