बिल्ला

Primary tabs

बबन ताम्बे's picture
बबन ताम्बे in जनातलं, मनातलं
6 Aug 2015 - 7:29 pm

शाळेत सायंकाळी पाचचे टोल पडले आणि गण्या, किशा, दिल्या, दस-या, जया ही सगळी चौथीतली पोरे इतरांना ढकलत रस्त्याला लागली. आज गण्या खूप खूष होता. निबंध स्पर्धेत पहीला नंबर आल्यामुळे त्याला पन्नास रुपयांचे बक्षिस मिळाले होते. कधी एकदा आईला सांगतो असे त्याला झाले होते.

"ए गण्या, सांग ना, पन्नास रुपयांचे काय करणारे.." - किशा.

"लय मजा करणारे "- गण्या , " आपल्या सु-याकडं टॉय टॉय करणारी गाडी हाय ना, तशी आणनार हे. ती गाडी गर्कन वळती आन उल्टी उडी बी मारती. मला लय आवडती ती गाडी पण सु-याचा आजा मला हात लावून देत नाय. सु-याला म्हणतो, ते गरीबाचं पॉर हे, रोज आंघूळ बी करीत नाय, तेला हात लावून दिऊ नको.आता त्याला दाखवतोच "

"अजून काय करणारे? " दिल्या.

"अजून? पांडबाच्या हाटेलात भरपेट जिल्बी खाणारे.कवा खाल्लीच नाय" - गण्या.

"आजून ? "

" एक बिल्ला घेणारे खिशावर लावायला. लय भारी वाटतं. लाल निळा गोल बिल्ला आन तेच्याखाली दोन तिरक्या रिबीनी." गण्या.

"हॅ ! बिल्ल्यात कशाला पैशे घालवतो? गुर्जी म्हणले की जो चांगलं काम करील, त्याला हेडमास्तरांच्या हातानी सगळ्यांसमोर बिल्ला लावण्यात यील म्हणून. " दस-या.

"खरंच? चांगलं काम केल्यावर हेडमास्तर बिल्ला लावतील मला? " गण्या.

"खरंच. गोटयानी नाय का परवा एका म्हता-याला यष्टी स्ट्यांडपर्यंत हात धरून नेलं. दिवसभर बिल्ला लावून लय भाव मारत होता." दस-या.

"असं करू ना, " जया, " माझ्याकं फळी हे. बारक्या सुतार म्हंटला वीस रुपयात चांगली बॅट बनवून देतो. पण आय नाही म्हणती. बॅट करायची का? दररोज खेळायला व्हईल "

"बेष्ट आयडीया. पण मी कॅप्टन बरका !" गण्या.

सगळ्या पोरांनी मान डोलावली. घर आलं तसं गण्या "आई ..." हाक मारत सुसाट स्वयपाक घरात घुसला.

चूल बंद दिसत होती. आई आणि तायडी चूलीसमोर चिंताग्रस्त चेह-यानी बसली होती. तायडीने गण्याला चापले,"गण्या, रोजच्यासारखं आल्या आल्या भूक लागली म्हणून आईमागं भूनभून करू नको. आज घरात एक दाणा बी शिल्लक नाय आन आईला आज मजुरीबी मिळाली नाय."

दुस-या दिवशी गण्या शाळेत बिल्ला लावून फिरत होता.

कथा

प्रतिक्रिया

बबन ताम्बे's picture

6 Aug 2015 - 7:38 pm | बबन ताम्बे

त्याबद्द्ल क्षमस्व !
:-)

टवाळ कार्टा's picture

6 Aug 2015 - 8:04 pm | टवाळ कार्टा

शब्दसंख्येला मारा फाट्यावर...त्या शशक स्पर्धेत जास्त कर्ञ करून रडकथा नैतर अर्धवट सोडलेल्या कथाच जास्त आहेत...त्यापेक्षा हि फार म्हणजे फारच उजवी आहे

एस's picture

6 Aug 2015 - 8:20 pm | एस

+१

तेच म्हणतो. शब्दांपेक्षा कंटेंट महत्वाचा. अगदी छान मांडलंयत. खूप आवडलं वाचताना. ग्रामीण बाज छान जमलाय. आपण पक्के ग्रामीण भागात राहिलेले असणार, त्याशिवाय हे जमणार नाही. लिहित रहा असेच मस्त!

बबन ताम्बे's picture

7 Aug 2015 - 2:20 pm | बबन ताम्बे

हो, माझे बालपण ग्रामीण भागात गेले आहे. ही भाषा तिथलीच आहे.

अमृत's picture

1 Sep 2015 - 5:32 pm | अमृत

असेच म्हणतो

उगा काहितरीच's picture

6 Aug 2015 - 7:49 pm | उगा काहितरीच

जास्त हायेत शब्द

श्रीरंग_जोशी's picture

6 Aug 2015 - 7:57 pm | श्रीरंग_जोशी

ही लघुकथा खूप भावली.

मधुरा देशपांडे's picture

6 Aug 2015 - 8:00 pm | मधुरा देशपांडे

कथा आवडली.

मुक्त विहारि's picture

6 Aug 2015 - 8:22 pm | मुक्त विहारि

कथा आवडली

राघवेंद्र's picture

6 Aug 2015 - 8:23 pm | राघवेंद्र

कथा आवडली.

मस्त रे गण्या :))

बबन ताम्बे's picture

7 Aug 2015 - 10:54 am | बबन ताम्बे

.

छानच जमली आहे कथा ! आवडली :)

चौथा कोनाडा's picture

7 Aug 2015 - 1:50 pm | चौथा कोनाडा

सुरेख कथा, ह्रुदयस्पर्शी !

शाळा आणि "नाहीरे" स्तरातील मुलांचे विश्व तंतोतंत उतरलेय !
अश्याच एका घटनेचा साक्षीदार असल्यामुळे कथा मनाला भावली !
लिखते रहो बबनभाई !

[[ अन.... शंभर शब्दांत काय जमली नाही .. यात वाइट काय वाटायचे ?, तुमच्या साठी खास "त्रिशतशब्दकथा" स्पर्धा आयोजित करायला सांगु इथे ]]

बबन ताम्बे's picture

7 Aug 2015 - 2:23 pm | बबन ताम्बे

वाईट नाही वाटले. तसं शंभर शब्दांत कथा बसवणे अवघडच आहे.

माधुरी विनायक's picture

7 Aug 2015 - 2:24 pm | माधुरी विनायक

आवडली. कथा शंभर शब्दात कोंबायच्या अट्टाहासापेक्षा अशा स्वान्त सुखाय लिहिलेल्या कथा भावतात.

अट्टाहास बरोबर पण प्रत्येक वेळी कोंबणं नसतं. कधीतरी 100 शब्द जास्त सुद्धा होतात.

बबनराव
लिखाण आवडलंच!

नाव आडनाव's picture

7 Aug 2015 - 3:08 pm | नाव आडनाव

मस्तं :)

gogglya's picture

7 Aug 2015 - 3:38 pm | gogglya

+१

नाखु's picture

25 Aug 2015 - 3:40 pm | नाखु

शंभर शब्दी कथेपेक्षा शंभर नंबरी कथा झ्याक असते असा अनुभव हाये!!!

गणूचा शेजारी नाखु

नीलमोहर's picture

25 Aug 2015 - 3:44 pm | नीलमोहर

गणू इज द बेश्ट !!

खटपट्या's picture

25 Aug 2015 - 4:05 pm | खटपट्या

खूप छान बबनराव

नितिन५८८'s picture

25 Aug 2015 - 9:01 pm | नितिन५८८

कथा आवडली मस्तच लिहिलय.

एक एकटा एकटाच's picture

26 Aug 2015 - 12:11 am | एक एकटा एकटाच

मस्त

पिलीयन रायडर's picture

26 Aug 2015 - 12:35 am | पिलीयन रायडर

आवडली!

शतशब्दकथा हा एक वेगळाच प्रांत आहे, त्यात थोडक्यात परिणामकारक लिहायचं असतं. ती सुद्धा एक कलाच आहे.

तुम्ही जे लिहीलय ते सुद्धा छानच जमलय.

व्यक्त होणे जास्त महत्वाचे.. शब्दसंख्या नाही.

रातराणी's picture

1 Sep 2015 - 12:45 pm | रातराणी

ही कशी काय राहून गेली होती वाचायची? खूप आवडली कथा. :)

बबन ताम्बे's picture

1 Sep 2015 - 12:56 pm | बबन ताम्बे

गणूची ही पण शशक वाचा.

http://www.misalpav.com/node/32529

रातराणी's picture

1 Sep 2015 - 1:01 pm | रातराणी

ही ही! ती पण छान आहे गोष्ट :) गणू भारीये!

मीता's picture

1 Sep 2015 - 2:43 pm | मीता

मस्त

चिगो's picture

1 Sep 2015 - 4:59 pm | चिगो

मस्त कथा.. जमलीय राव..

यशोधरा's picture

1 Sep 2015 - 5:54 pm | यशोधरा

कथा आवडली.

pradnya deshpande's picture

1 Sep 2015 - 6:15 pm | pradnya deshpande

कथा आवडली

जव्हेरगंज's picture

1 Sep 2015 - 6:21 pm | जव्हेरगंज

व्वा...!!

अतिवासताईंच्या 'आंजी' सारखं 'गणू' हे पात्र जन्माला घालताहात, अल्पावधित लोकप्रिय होणार! गणूच्या आतापर्यंतच्या गोष्टी आवडल्या, शब्दमर्यादांच्या बंधनात बांधून घेऊ नका, चांगलं लिहिता आहात, तसंच लिहीत रहा. पुढील लेखनास शुभेच्छा!

बबन ताम्बे's picture

1 Sep 2015 - 7:45 pm | बबन ताम्बे

गणू वाचकांना आवडतोय हे वाचून खूप आनंद झाला.
लवकरच एका नव्या गोष्टीत गणू पुन्हा भेटीस येईल.
पुन्हा एकदा आभार.

जमल्यास माझे इतर काही पुर्वीचे लेख देखील वाचणे.

लीना घोसाळ्कर's picture

2 Sep 2015 - 1:06 pm | लीना घोसाळ्कर

"व्यक्त होणे जास्त महत्वाचे"... हे अगदी बर्रोबर............
बबन दादा.... खूपच छान आहे कथा......

सस्नेह's picture

2 Sep 2015 - 1:30 pm | सस्नेह

कथा आवडली.

अनुप ढेरे's picture

2 Sep 2015 - 2:14 pm | अनुप ढेरे

मुंशी प्रेमचंद यांची या धाटणीची कथा आहे. ती आठवली.

मी-सौरभ's picture

2 Sep 2015 - 5:24 pm | मी-सौरभ

आवडेश

बोका-ए-आझम's picture

4 Sep 2015 - 1:30 am | बोका-ए-आझम

आवडली.नियमात बसली नाही तर काही बिघडत नाही. कथेसाठी नियम आहेत, नियमांसाठी कथा नाहीत.इ