[स्पर्धेसाठी नाही] - शतशब्दकथा (सिक्वेल) : गणू नाटयस्पर्धा गाजवतो.

बबन ताम्बे's picture
बबन ताम्बे in जनातलं, मनातलं
24 Aug 2015 - 6:45 pm

भाग पहीला :
गणू

"आई, मी शाळेत जाणार नाय" गणू रडत सांगत होता."पोरं मला जाडया जाडया चिडवत्यात. आणखीन मी आन समोरची सरस्वती जोडीनी शाळेत निघालो का पोरं गण्या गणपती ढेर चमकती गण्याची बायकू सरस्वती असं वरडत्यात."
"बरं मी सांगते गुर्जींना पोरांना सांगायला." गणूची आई.
"पण मीच का जाड? "
"ते देवाच्या हातात असतं बाळा.”
आईनी गणूची कशीबशी समजूत काढली.
संध्याकाळी गणू आनंदाने ओरडतच घरी आला. "आई, पुण्याला बाल नाटय स्पर्धा हाये. गुर्जी म्हंटले आपल्याला तब्येतवान राजा पायजे. आख्ख्या वर्गात माझीच निवड झाली.”
"अरे वा! आता देवावर राग नाय ना तुझा? "
"नाय" असे म्हणून गणूने दप्त्तर फेकले आणि आळीतल्या मित्रांना सुवार्ता सांगायला धूम ठोकली.

=============================================================================

भाग दुसरा :

गणू नाटयस्पर्धा गाजवतो.

"गणूची आई, गणूनी कमाल केली चक्रमादित्य राजाच्या भूमिकेत! ऐनवेळी त्यानी त्याच्या मनाने भर टाकून खूप धमाल आणली. पहिलं बक्षिस पटकवलं पोरानी!" पुण्यातील बालनाटयस्पर्धा आटोपल्यावर गुरूजी घरी येऊन गणूचं कौतुक करत होते.

गुरूजी गेल्यावर तायडीने जाम उत्सुकतेने विचारले, "गण्या, सांग ना, तू मनानी काय केलं?"

"अगं मला कोणचीच तुमान बसंना.मंग गुर्जींनी निघताना घाईघाईनी त्यांच्या जुन्या कपडयांच्या गठुडयातून एक पायजमा घेतला. नाटक सुरू झालंन पायजम्यात लई चावायला लागलं. माझ्या एका हातात उपरणं आन दुसरा हात तलवारीवर! खाजवणार कसं? मंग मी वाकडंतिकडं तोंड करून स्टेजवर उडया मारायला लागलो. परिक्षकांना आन प्रेक्षकांना वाटलं राजा चक्रमपणाच करतोय.नाटक संपल्यावर पयला पायजमा काढला. च्यामारी ढेकणं निघाली तेच्यात!" गणू.

कथालेख

प्रतिक्रिया

प्राची अश्विनी's picture

24 Aug 2015 - 6:47 pm | प्राची अश्विनी

:):):)

मी-सौरभ's picture

24 Aug 2015 - 10:49 pm | मी-सौरभ

ढेकुणा मुळे प्रथम क्रमांक. मस्त

प्यारे१'s picture

25 Aug 2015 - 12:25 am | प्यारे१

एक ढेकूण अनेक ढेकणं.
ढेकणांमुळे पयला नंबर. ;)

चौथा कोनाडा's picture

25 Aug 2015 - 7:36 am | चौथा कोनाडा

:-) झकासच !

<<< परिक्षकांना आन प्रेक्षकांना वाटलं राजा चक्रमपणाच करतोय.नाटक संपल्यावर पयला पायजमा काढला. च्यामारी ढेकणं निघाली तेच्यात!" >>>

:-)
अचछा अस आहे तर ! भारीय गणुची स्टोरी !

मांत्रिक's picture

25 Aug 2015 - 7:59 am | मांत्रिक

;) निरागस गणू

नीलमोहर's picture

25 Aug 2015 - 1:04 pm | नीलमोहर

अजून येऊ द्या भारी गणूच्या भारी गोष्टी..

बबन ताम्बे's picture

25 Aug 2015 - 3:24 pm | बबन ताम्बे

गणूची ही कथा पण वाचणे.

बिल्ला

एस's picture

25 Aug 2015 - 2:41 pm | एस

हाहाहाहा!

पैसा's picture

25 Aug 2015 - 2:49 pm | पैसा

=)) =))

gogglya's picture

25 Aug 2015 - 3:01 pm | gogglya

का कोण जाणे आंजी ची आठवण आली. गणू आणी आंजी यांच्या अजुन कथांच्या प्रतिक्षेत...

बबन ताम्बे's picture

25 Aug 2015 - 3:20 pm | बबन ताम्बे

गणूची ही कथा वाचली का?

बिल्ला

मजाही वाटली आणि गणूची दयाही आली..

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Aug 2015 - 1:03 am | डॉ सुहास म्हात्रे

=))

dadadarekar's picture

26 Aug 2015 - 6:02 am | dadadarekar

.

पद्मावति's picture

26 Aug 2015 - 11:32 pm | पद्मावति

मजेदार कथा. आवडली.