लाख दिवे विझु नये
त्याने स्वताचीच वात केली
तुंम्ही दिवस पाहिला
त्याची कायमची रात झाली
नभी चंद्र्मा खेळ्तो
खाली माझा रवी तळपे हा
सार्या दगड्-धोंड्यात
माझा एक तारा झळके हा
घाव सोसले सोसले
त्याने ह्रद्याची ढाल केली
तुंम्ही दिवस पाहिला
त्याची कायमची रात झाली
वीर गती मिळे त्याला
डोळा पाणी का आणावे
पण लाख मेल्या मनांसाठी
एक त्याने का मरावे?
तरी झुंजला झुंजला
त्याने वाद्ळाला मात दिली
तुंम्ही दिवस पाहिला
त्याची कायमची रात झाली
हार्-फुले फिके शब्द
सारा क्षणाचा देखावा
धग चितेची तशीच
खेळ सत्तेचा पहावा
आज माझा रवी मावळला
उद्या तुमचा जाइल
आज बैल सत्तेवर
उद्या राज्य रेड्याचे येइल
काय मरणाचे मोल
झुंज त्याची व्यर्थ गेली
तुंम्ही दिवस पाहिला
त्याची कायमची रात झाली
प्रतिक्रिया
5 Dec 2008 - 3:48 pm | अभिजीत मोटे
आवडली. सद्यपरिस्थीतीचे अतिशय चपल्लख वर्णन.
............अभिजीत मोटे.
5 Dec 2008 - 6:08 pm | केदार केसकर
खुप सही कविता आहे.
आज बैल सत्तेवर
उद्या राज्य रेड्याचे येइल
काय मरणाचे मोल
झुंज त्याची व्यर्थ गेली
तुंम्ही दिवस पाहिला
त्याची कायमची रात झाली
किती बरोबर आहेत या ओळी. एकदम perfect!
मला पण या विषयावर काहीतरी लिहावेसे वाटतयं. पण सध्या मी या सगळ्या प्रकरणामुळे उदासीन झालोय. कशाचा काही उपयोग होणारच नसेल तर का लिहायचं. तुझ्यासाठी मला इतकचं लिहावसं वाटतं.
तुझ्या प्रश्नाचे उत्तर लेका तुला कधीच मिळणार नाही
कुणीही तुझ्यासाठी तुझ्या जिवंत चितेत जळणार नाही
पण थोडातरी आज, माझ्या शब्दांचा मान राख
सगळं जाणणारी असेल तुझी संजीवन राख
त्या राखेतून शिकू आम्ही पुरुषार्थाचे सूत्र
भांगेत भरु, चालू करु संहाराचे सत्र
मेलो तरी असे मरु की आमची राख पुन्हा पुन्हा
उठेल,राहील उभी, अन् करेल सिंह्गर्जना
केदार
5 Dec 2008 - 9:21 pm | llपुण्याचे पेशवेll
एकदम चपखल शब्दात मांडल्या आहेत भावना...
पुण्याचे पेशवे
6 Dec 2008 - 7:44 pm | श्रीकान्त पाटिल
हार्-फुले फिके शब्द
सारा क्षणाचा देखावा
धग चितेची तशीच
खेळ सत्तेचा पहावा
आज माझा रवी मावळला
उद्या तुमचा जाइल
आज बैल सत्तेवर
उद्या राज्य रेड्याचे येइल
काय मरणाचे मोल
झुंज त्याची व्यर्थ गेली
तुंम्ही दिवस पाहिला
त्याची कायमची रात झाली
हा खेळ असाच चालु रहाणार , सत्ताधिशाना कसली आली चिन्ता सामान्यान्ची
त्याना खुर्चीच प्यारी , लाल दीव्यान्चि झालि सवय आता मोडु कशी हीच चिन्ता त्यान्ची
हे बळ आहे आपल्याच मनगटात , फक्त हवा निर्धार निवडण्या योग्य माणसान्शी
एक गठ्ठा मते आपुली पडु देत पेटीत , होइल दाणादाण तयान्ची मोजणी समयी
हाच निर्धार आपुला असो सन्घटीत ,हीच बापुड्याचि विनन्ती आपणासी ...