जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
7 Jan 2015 - 1:37 pm

२०१५ साल उजाडलं तेच अर्थव्यवस्थेत खळबळ घेवुन . काल ( ६ जानेवारी २०१५) रोजी सेन्सेक्स तब्बल ८५० अंशांनी घसरलाय , तेलाच्या किमती गडगडल्या आहेत , रशियन रुबलही संकटात आहे .
एकुणच सर्व अर्थव्यवस्था अस्थिर आहे , प्रचंड वोलाटालिटी आहे मार्केट मधे .

आता ह्या सार्‍याकडे दुर्लक्ष करुन आपल्याला चालणार नाही . Ignorance is actually not a bliss . ह्या आर्थिक घडामोडी नकळत आपल्या जीवनावर प्रभाव पाडत आहेत म्हणुनच ह्यांच्या कडे नीट आणि बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे असे मला वाटते . "प्रपंची पाहिजे सुवर्ण | परमार्थी पंचीकरण "| असं समर्थांनी स्पष्ट सांगुन ठेवले आहे , प्रपंचात पैशाकडे ( सोन्याकडे) लक्ष ठेवणे गरजेचे आहे .

ह्या धाग्यावर जागतिक आर्थिक घडामोडींची चर्चा व्हावी असे अपेक्षित आहे .
लिन्क सह बातमी दिल्यास अधिक उपयुक्त ठरेल :)

अवांतर :
१) अर्थव्यवस्थेतील बरेचसे शब्द इंग्रजी असतात व त्यांचे मराठी प्रतिशब्द फार गंभीर असतात म्हणुन इथे मराठीचा हट्ट धरु नये ही नम्र विनंती .
२) अर्थ्कारण , समाजकारण आणि राजकारण हे हातात हात घालुन चालत असतात त्यामुळे चर्चा तिकडे जाण्याचे शक्यता आहे तरीही अति विषयांतर करुन फोकस डायव्हर्ट करु नये ही विनंती . शेवटी पैशाचा मामला आहे , नो एक्स्क्युज .

"एकामेका सहाय्य करु | अवघे होवु श्रीमंत || "

अर्थकारणप्रकटनबातमी

प्रतिक्रिया

महान सकाळच्या महान संपादकांनी या विषयावर एक महान अग्रलेख सुद्धा लिहून टाकला.

काळा पहाड's picture

29 Jun 2015 - 1:03 pm | काळा पहाड

जर मंदी आलीच तर भारत २००८ प्रमाणे यातून तरुन जाईल का ?

भारत म्हणजे कोण? सामान्य माणूस? बिल्डर्स? राजकारणी? व्यापारी? सरकारी नोकर? व्यावसायिक? सगळे तरून जातात फक्त भार सामान्य माणसावरच पडतो. त्यामुळे तो सोडून बाकीचे तरून जातीलच. सामान्य माणसाचं तसंही काय भलं चाल्लंय?

मदनबाण's picture

29 Jun 2015 - 12:18 pm | मदनबाण

जर मंदी आलीच तर भारत २००८ प्रमाणे यातून तरुन जाईल का ?
त्रास होइल, पण तरुन जाईल अशी आशा तरी सद्ध्या वाटते.येत्या काळात चित्र अजुन स्पष्ट होत जाईल असे धरुन चालुया. { मी विषयातील तज्ञ नाही.}

चायना अपडेट :-
China Stocks Head for Bear Market as Rate Cut Fails to Stop Rout
Why the fall in China's stock market may not be India's gain
A little love from central mama
Wall of Chinese capital buying up Australian properties

न्यूज फ्रॉम ऑस्ट्रेलिया :-
What the Greek debt crisis means for Australia
Housing market puts Australia at risk of becoming nation of 'imprisoned tenant serfs', Liberal MP John Alexander says
Sydney prices up 45 per cent, correction next: BIS Shrapnel
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Girls Like To Swing... ;) :- Dil Dhadakne Do

dadadarekar's picture

30 Jun 2015 - 8:26 am | dadadarekar

आमच्या वैद्य्कीय व्यवसायात रिसेशन नसते

मदनबाण's picture

30 Jun 2015 - 10:39 am | मदनबाण

काल ग्रीस संबंधी बातम्या वाचताना Puerto Rico कडे लक्ष गेले होते { ज्याचा दुवा मागच्या प्रतिसादात दिला आहे.}
Puerto Rico च्या गव्ह्रर्नर ने $70 billion in debt पे करु शकत नाही असे स्पष्ट सांगितले...
त्यांचे स्टेटमेंट :- “This is not about politics,” said Puerto Rico’s governor, Alejandro Garcia Padilla. “It’s about math.”
मग Puerto Rico साठी हे “It’s about math असेल तर १८ ट्रिलीयन + अजुन debt मधे असणार्‍या अमेरिकेचे काय ? या प्रश्नावर का विचार करायचा नाही ? अजुन किती दिवस हा debt गेम चालेल ते फक्त पाहणेच हातात उरले आहे असे वाटते.
एक दुवा :- 'There is no US precedent for anything of this scale or scope'
तिकडे ब्राझिलच्या अर्थव्यवस्थेचे सुद्धा ३-१३ वाजलेले दिसत आहेत !
संदर्भ :- Is Brazil's Economic Hole Getting Deeper? सोर्स :-Forbes
UPDATE 3-Brazil loan defaults climb, in sign economy is struggling
आजच्या दिवशी ग्रीस IMF { International Monetary Fund } ला €1.6bn payment करणे आहे, जे शक्य नाही... पाहुया ग्रीसची पुढची पावले नक्की कुठल्या दिशेकडे आणि कशी वळतात.
Explainer: Greece’s IMF payment
Greek default poses new challenge to IMF credibility
The next act: what happens now in Greece's drama
What the crisis in Greece means for the U.S. and global economies

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chittiyaan Kalaiyaan... :- Roy

मदनबाण's picture

30 Jun 2015 - 2:19 pm | मदनबाण

विकीलिक्स ने नविन फ्रेंच केबल्स रिलीज केल्या आहेत, अमेरिकेच्या NSA ने फ्रेंच फायनॅन्स मिनिस्टर कम्युनिकेशन इंटरसेप्ट केले,तसेच फ्रेंच कॉर्पोरेट्सची $200 million कॉट्रॅक्ट्स सुद्धा इंटरसेप्ट केलीत.
फ्रेंच फायनॅन्स मिनिस्टर चे फ्रान्स अर्थव्यवस्थे बाबतीत कम्युनेकेशन { फ्रान्सच्या अर्थ व्यवस्थेची स्थिती } यामुळे जगा समोर उघडी झाली आहे !
संदर्भ :-
NSA intercept of French treasurer: the economy is "worse than anyone can imagine"
NSA intercepted French corporate contracts worth $200 million over decade – WikiLeaks

NSA wiretapped two French finance ministers, WikiLeaks says
NSA wiretapped two French finance ministers: Wikileaks
https://www.scribd.com/doc/270032184/NSA-France-Leak
NSA France Leak
दुवा :- https://www.scribd.com/doc/270032184/NSA-France-Leak

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chittiyaan Kalaiyaan... :- Roy

मागच्या एका प्रतिसादात { रोलर कोस्टरवाला } Deutsche Bank च्या Co-Chief Executives नी रिझाइन केल्याचे म्हंटले होते. हीच Deutsche Bank मागच्या वर्षाच्या शेवटी पर्यंत roughly 416 million euros of Greek debt कॅरी करत होती !
संदर्भ :-Deutsche Bank Leads Finance Stock Slide Amid Greek-Debt Crisis
तसेच :- Deutsche Bank’s 2014 annual report revealed that the super bank (in size anyway) had an eyewatering €54.7 trillion net exposure to derivatives, a sum, to put it in perspective, which is 20 times in excess of the GDP of the EU economic powerhouse, Germany.
संदर्भ :- Goldman Sachs and Deutsche Bank have indelible links to Greek financial crisis
यातच बँकेवर rate inquiry ची भर पडली आहे ! तर Deutsche Bank Americas Fixed Income Sales मधील लिडरशीप मधे बदल झाल्याचे समजते आहे.
संदर्भ :- German prosecutor launches new rate inquiry at Deutsche Bank: FT
UPDATE 1-German regulator says Deutsche Bank CEO misled Bundesbank -FT
Jaffe Said to Be Leaving Deutsche Bank America Debt Sales
याच Deutsche Bank नी UTI MF मधुन हिंदूस्थानात $1-billion इनव्हेस्टमेंट करुन ठेवली आहे.

संदर्भ :- Foreign investors eye domestic debt, RBI to tighten norms

Max Keiser: I've been watching the stock price of Deutsche Bank today, Germany's largest bank, one of the largest banks in the world, certainly with the biggest derivatives book in the world. They are the counter party to the Greek debt. And their stock got hammered. Deutsche Bank could go the way of Lehman Brothers or Bear Stearns, which would set off a global liquidity crisis that would make 2008 look tame by comparison. Look, the thing about Greece is that the Syriza government has said all along that "we have no money, and we're not going to pay this debt." And now, Jean-Claude Juncker has woken up to the fact of what he has been told now for a year.
संदर्भ :- 'Grexit would trigger liquidity crisis worse than 2008'

जाता जाता :- ग्रीस बाहेर पडल्यास Deutsche Bank वर लक्ष ठेवावे लागेल का ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chittiyaan Kalaiyaan... :- Roy

मदनबाण's picture

1 Jul 2015 - 2:07 pm | मदनबाण

ग्रीक क्रायसिस मधे अनपेक्षित ट्वीस्ट आणि टर्न्स येत आहे... यातलाच आत्ताचा मोठा ट्वीस्ट :-
Alexis Tsipras accepted creditors’ proposals as a basis for compromise to end a standoff over its bailout.
Markets rally on report Greece accepts creditor terms
Alexis Tsipras यांनी क्रेडिटर्सच्या बेल आउट साठी घातलेल्या सर्व अटी मान्य करण्याचे ठरवले आहे.
Alexis Tsipras यांचे हे लिक झालेले पत्र इथे पाहता येइल :-
http://blogs.ft.com/brusselsblog/files/2015/07/ESM-loan-agreement-prior-...

जाता जाता :- Historic Vote May Determine Whether Greece Remains In The Eurozone

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Statement by the IMF on Greece

मदनबाण's picture

3 Jul 2015 - 11:34 am | मदनबाण

Grexit आणि अस्थिर युरोप व युरोची चर्चा जगभरात होत असतानाच आता नविन भर पडली आहे Auxit होण्याची !
ऑस्ट्रियाच्या 260,000 लोकांनी युरोझोन मधुन बाहेर पडण्यासाठी petition साइन केली आहे !
संदर्भ :- Over 260,000 Austrians sign petition on EU exit
260,000 Austrians sign EU exit petition, forcing referendum debate in parliament
ग्रीक भाषेत OXI { ókhi }म्हणजे NO असा अर्थ "नाही" म्हणण्यासाठी उच्चारला जातो... ग्रीस मधे सध्या अनेक ठिकाणी अशा शब्दाचे बॅनर्स लावले गेले आहेत.
असाच एक बॅनर ग्रीसच्या मिनिस्ट्री ऑफ फायनॅन्सच्या इमारतीवर देखील लावला गेला आहे :-
P1
{ फोटो जालावरुन घेतला आहे. }
OXI हा शब्द ग्रीस लोकांसाठी महत्वाचा आहे आणि म्हणुनच त्याची निवड करण्यात आली आहे, कारण याला इतिहासाचा संदर्भ आहे.दर वर्षी २८ ऑक्टोबरला ग्रीस मधे OXI Day म्हणुन साजरा केला जातो. १८ ऑक्टोबर १९४० ला ग्रीसच्या Ioannis Metaxas यांनी इटलीच्या अल्टिमेटमला { Benito Mussolini } OXI म्हणजे "नो" म्हणुन सांगितले होते.
संदर्भ :-
28th October 1940 - The Day Greece said a Loud OXI - NO - to Mussolini and the 2nd World War Took a Different Turn!
Ohi Day

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- حلا الترك و مشاعل بنيتي الحبوبة

वरच्या प्रतिसादात एक व्हिडीयो द्यायचा राहुन गेला आहे तो खाली देत आहे :-

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- حلا الترك و مشاعل بنيتي الحبوبة

मदनबाण's picture

3 Jul 2015 - 10:15 pm | मदनबाण

ग्रीसची स्थिती :-

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- حلا الترك و مشاعل بنيتي الحبوبة

प्रसाद गोडबोले's picture

3 Jul 2015 - 10:45 pm | प्रसाद गोडबोले

बाकी ग्रीस मधे एखादे बेट वगैरे विकत घ्यायला भारी टाइम आहे राव :)

प्रसाद गोडबोले's picture

3 Jul 2015 - 10:55 pm | प्रसाद गोडबोले

ओन अ सीरीयस नोट

मदनबाण , एकुणच ग्रीस क्रायसिस चा आपल्यावर वैयक्तिक कसा परिणाम होइल ह्यावर ज़रा चर्चा करू

मला वाटते की जर ग्रीस eu मधून बाहेर पडला तर संपूर्ण eu छे नुकसान आहे ।( स्पेन सुध्दा ग्रीस च्याच मार्गावर आहे म्हणे )
असे झाल्यास आपले शेयर मार्केट दणकुन कोसळेल । आणि मग काही काळाने रीयल इस्टेट कोसळेल । आशा वेळेला रीयल इस्टेट मधे गुन्तवणुक करता येइल।

आपल्याला काय वाटते ?

मला वाटते की जर ग्रीस eu मधून बाहेर पडला तर संपूर्ण eu छे नुकसान आहे ।( स्पेन सुध्दा ग्रीस च्याच मार्गावर आहे म्हणे )
स्पेन्,इटली, पोर्तुगाल... हे लायनित उभे आहेत... पुढील घडामोडींवरच युरोझोनचे नुकसान कितपत होत जाईल. जर्मनीच्या अ‍ॅजला मर्केल ग्रीसच्या परिस्थितीचा संपूर्ण अंदाज होता हे नव्या विकीलिक्स मधुन स्पष्टच झाले आहे.
संदर्भ :- Greek crisis: NSA phone tap of Angela Merkel reveals she knew Greece's debt was unsustainable
उध्या ५ ग्रीस आणि युरोझोनसाठी अत्यंत महत्वाचा दिवस... ग्रीस आयएमएफ चे कर्ज डिफॉल्ट करणारा पहिला प्रगत देश ठरला आहे. २० जुलै ला ग्रीस ECB ला 3.5 billion euros देणे आहे,ही तारीख अत्यंत महत्वाची आहे.
P1
P2
वरील ग्राफ पाहुन येणार्‍या घडामोडींचा अंदाज येइल... आगे आगे देखीये होता है क्या...

असे झाल्यास आपले शेयर मार्केट दणकुन कोसळेल । आणि मग काही काळाने रीयल इस्टेट कोसळेल । आशा वेळेला रीयल इस्टेट मधे गुन्तवणुक करता येइल।
पुढचा घटनाक्रम कसा उलघडत जातो हे त्यावर अवलंबुन आहे,आत्ताच यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही. बाकी आपल्या देशाच म्हणशील तर स्मार्ट सिटी बनवायची असेल तर स्मार्ट सिटी डिझाइन हवे, स्मार्ट सिटीला जोडणारे मोठे रस्ते हवे. डिजीटल इंडिया घडवायचा असेल तर डि़जीटल नेटवर्क आणि फास्ट इंटरनेट बॅकबोन हवे. या सर्वांसाठी अर्थातच इन्फ्रास्ट्रक्चर हवे ! त्यात जबरदस्त वेगाने डेव्हलपमेंट झाली तरच हे सगळ शक्य आहे.देशाची आंतरराष्ट्रीय पत त्याला देणार्‍या मानांकावरुन कळुन येते. Moody's ने ग्रीस चे रेटींग "Caa3" { Standard & Poor's Ratings :- CCC- }केले आहे... आपल्या रेटींग बाबत सध्याच्या सरकार ने गांभिर्याने विचार केला पाहिजे.आपले "Baa3" असे रेटींग सध्या Moody's ने दिले आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chinta Ta Ta Chita Chita... ;) :- रावडी राठोड

मदनबाण's picture

5 Jul 2015 - 10:05 am | मदनबाण

अ‍ॅंजला मर्केल यांच्या भाषणाच्या आधीच ग्रीसचा OXI प्रोटेस्ट..

Several activists interrupted the German Chancellor Angela Merkel's speech, during the CDU open day marking the 70th anniversary of the party, in Berlin, Saturday.

Bailout conditions: Greece gears up for referendum

हिंदूस्थानी मेनस्ट्रीम मिडीया :-
Greece votes on financial future, government - and maybe euro
Greece votes in referendum with future in euro in doubt
Greece Set to Vote in Crucial Referendum
Alexis Tsipras: The Premier Playing Roulette With Greece's Future

जाता जाता :- Senior Obama Official Says "We Are Going To Kill The Dollar" {Jan 28, 2013}

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मेरा दिल तेरा दिवाना... :- Aa Ab Laut Chalen

श्रीरंग_जोशी's picture

5 Jul 2015 - 7:03 pm | श्रीरंग_जोशी

जागतिक पातळीवरच्या आर्थिक घडामोडींचा एवढा अभ्यास मिपावर होतोय. कुणी महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक स्थितीवर अभ्यासपूर्ण भाष्य केल्यास समाधान वाटेल.

महाराष्ट्रावर सध्या ₹३ लक्ष कोटीं किंवा त्यापेक्षाही थोडे अधिक कर्ज आहे. उत्पन्नाच्या तुलनेत ते खूप अधिक आहे असे वाचले. उत्पन्न व कर्ज यांचे गुणोत्तर भारतातील मोठ्या राज्यांचे पाहिले असता उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्रच सर्वाधिक वाईट अवस्थेत आहे असेही वाचले होते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Jul 2015 - 8:41 pm | डॉ सुहास म्हात्रे

₹ कसं टायपाचं ?

श्रीरंग_जोशी's picture

6 Jul 2015 - 12:08 am | श्रीरंग_जोशी

मी स्वतःच्या ड्राफ्ट इमेल मध्ये ठेवलं आहे.
मिपावर टंकायची वेळ आली कि तिकडून च्योप्य पस्ते करतो :-) .

कुणी महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक स्थितीवर अभ्यासपूर्ण भाष्य केल्यास समाधान वाटेल.
आपणच करावे... :)
मी सध्या ग्रीसमय झालो आहे... :)
ग्रीस अपडेट :-
Opinion polls show 'No' ahead in Greek bailout referendum
GREECE DECIDES: Polls say 'No' voters have the lead
GREECE LIVE: Polls Closed, Exit Surveys Show 51.5% No, 48.5% Yes, 65% Turnout
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मेरा दिल तेरा दिवाना... :- Aa Ab Laut Chalen

मदनबाण's picture

6 Jul 2015 - 9:36 am | मदनबाण

IT'S OFFICIAL: NO WINS BY A LANDSLIDE
P1
ऑफिशिअल दुवा
शेवटी OXI { ókhi }म्हणजे NO चा विजय झाला ! ग्रीसच्या या निकालाचे जगभरात पडसाद उमटत आहेत आणि येणार्‍या काळातील घडामोडी पाहणे आवश्यक ठरणार आहे.
Our NO is a majestic, big YES to a democratic, rational Europe! :- Yanis Varoufakis
Oil Tumbles in Asia as Greek Vote Shakes World Markets
Forex: Euro depressed by Greek ‘No’ vote, markets volatile
Greek referendum: we are back to wild markets of the 2008 banking crisis
जाता जाता :- या घटनेने ग्रीस डॉमिनो इफेक्ट पहायला मिळेल का ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- रिम झीम रिम झीम... :- 1942 A Love Story

मदनबाण's picture

6 Jul 2015 - 9:38 pm | मदनबाण

चायना अपडेट :-
"China’s stock market has lost nearly $3 trillion in value in less than a month."
The Shanghai Composite Index has tumbled 29 percent in the previous three weeks, helping to erase $3.2 trillion of value, on concern leveraged traders are liquidating bets after equity valuations exceeded levels during the country’s stock-market bubble of 2007.
संदर्भ :- China Intensifies Steps to End $3.2 Trillion Stock Rout
China's big, misguided stock market gamble
Will the Communist Party Save China’s Volatile Stock Market?
Panic, invincibility and blame in China's stock market
How Xi Jinping's aura of invincibility has been shaken by China's stock market slide

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- रिम झीम रिम झीम... :- 1942 A Love Story

वरती एक लिंक द्यायची राहिलीच...
Chinese chaos worse than Greece
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- रिम झीम रिम झीम... :- 1942 A Love Story

जून मध्या पासुन चायनिज स्टॉक मार्केट सात्यत्याने खाली कोसळत आहे ! चीन सरकारने ही पडझड थांबण्यासाठी अनेक प्रयत्न केले, परंतु या प्रयत्नांना अजुन यश येताना दिसत नाही. ३ आठवड्यात जवळापास ३०% इतका हा बाजार कोसळला असुन जगभराच्या नजरा चीनी बाजाराकडे खिळुन राहिल्या आहेत.
दुवे :-
China stocks tumble again despite support measures
China stocks tumble again despite support measures
China stocks tumble again despite support measures
El-Erian: Keep a close eye on Chinese stocks
China market turmoil: Share freefall makes little dent in strong Australian gains
China eco uncertainty a potential risk for US chipmakers

SHCOMP:IND :- 3,655.645 -120.267 => 3.19%
संदर्भ :- http://www.bloomberg.com/quote/SHCOMP:IND

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- फार्स ते शोकांतिका

गेल्या वर्षभरात चायनीज स्टॉक मार्केट व्हॅल्युएशन ने डबल झाले होते, जालावर विविध ठि़काणी वाचले त्याप्रमाणे सामान्य मध्यम वर्गीय चीनी नागरिक ते चायनीज मसाज पार्लर मधे काम करणार्‍यां पासुन अगदी सर्व सामान्य चायनीज शेतकर्‍यां पर्यंत सर्वांनी स्टॉक मार्केट मधे पैसे गुंतवले आहेत ! यात स्वतःचे तसेच कर्ज घेउन या लोकांनी चायनीज स्टॉक मार्केट मधे पैसे गुंतवले आहेत. चायनीज इन्व्हेस्टर्स ची शांघाय स्टॉक मार्केट मधे ११२ मिलियन अकाउंट्स तर शेंझेन स्टॉक मार्केट मधे १४२ मिलीयन अकांउंट्स आहेत, या प्रत्येकीत मागच्या काही काळात २० मिलीयन अकांउंट्सची { नविन आणि सामान्य गुंतवणुकदार} भर पडली आहे ! या वरुन या कोसळत्या डोलार्‍यातील फटक्याचा आवाका लक्षात यावा !

संदर्भ :- Speculators run wild on Chinese stock markets
China’s share plunge casts lengthening shadow over global markets
China’s stock-market turmoil may shake more than investors
Mao versus markets as Chinese shares plunge
Greek crisis is nothing compared to China

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- फार्स ते शोकांतिका

भुमन्यु's picture

8 Jul 2015 - 9:37 am | भुमन्यु

चीनच्या पार्श्वभुमीवर भारतीय मार्केट कोसळायला सुरुवात
Sensex slips over 250 pts, Nifty below 8450 on China woes

Greek crisis is nothing compared to China

चायना स्टॉक मार्केट अजुनही कोळसत आहे !
P1
कालच्या प्रतिसादात म्हंटल्या प्रमाणे अनेक सामान्य गुंतवणूकदार ह्या झटक्याने खस्ता हाल झाले आहेत, शिक्षकां पासुन ते शेतकर्‍यांपर्यंत आणि टेलरींग चे काम करणार्‍यां पासुन केस कापणार्‍या नाव्ह्याने या बाजारात स्वतःच्या कष्टाचे जमवलेले पैसे, कर्ज घेउन गुंतवलेले पैसे स्वाहा झाले आहेत !
एक छोटासा रिपोर्ट :-

काही दुवे :-
Chinese share market: Stocks plunge, half of listed stocks suspended from trading
Beijing’s Response to Stock Selloff Reveals Deep Insecurity
China Stocks Drop With U.S. Futures as Contagion Fear Boosts Yen
China may invest $500 billion pension fund into stock market
China is allowing its massive pension fund to buy stocks to support the shaky market
A red flag

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Zara Zara... :- R H T D M

मदनबाण's picture

8 Jul 2015 - 9:44 am | मदनबाण

स्मॉल अपडेट :-
Copper sinks to 2009 levels as China worries weigh
China’s stock-market collapse is not over yet

SHCOMP:IND
3,582.498 => -144.627 = 3.88%
संदर्भ :- http://www.bloomberg.com/quote/SHCOMP:IND

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Zara Zara... :- R H T D M

मदनबाण's picture

9 Jul 2015 - 7:01 am | मदनबाण
अर्धवटराव's picture

9 Jul 2015 - 7:09 am | अर्धवटराव

:)
बातमीत म्हटल्याप्रमाणे ड्रॅगनने आपली करेक्टीव्ह अ‍ॅक्शन घेण्यापुर्वी 'योगायोगाने' हा तांत्रीक दोष उत्पन्न झाला काय...

टवाळ कार्टा's picture

9 Jul 2015 - 11:22 am | टवाळ कार्टा

शक्यता नाकारता येत नाही

भुमन्यु's picture

9 Jul 2015 - 11:40 am | भुमन्यु

मार्केट पडण्यापासुन वाचवण्यासाठीच अफवा पसरवली असावी.

मदनबाण's picture

10 Jul 2015 - 10:52 am | मदनबाण

@ अर्धवटराव,टका,भुमन्यु
ही साधी घटना नसुन अश्या पद्धतीने एक्सचेंज बंद पडणे धोकादायक आहे आणि ही घटना धोकादायक वाटते, जालावर या घटकेला या विषयावर बर्‍याच चर्चा आणि बातम्यांना उधाण आले आहे.
या मागच्या शक्यता !
१} खरच तांत्रिक कारणामुळे एक्सचेंज ठप्प झाले.
२}मुद्दामुन एक्सचेंज बंद केले गेले.
३}हॅकरर्स नी आपली भूमिका बजावली.
ऑगस्ट २०१३ साली नॅसडक असेच ठप्पा झाले होते.
संदर्भ :- Nasdaq market paralyzed by three hour shutdown
या संदर्भात काही अजुन बातम्या :-
NYSE hacked? Anonymous warned of trouble on Wall Street hours before New York Stock Exchange computers taken offline
A very brief history of stock markets being shut down
The New York Stock Exchange Has a Long History of Shutdowns
Here’s What It Looks Like When the New York Stock Exchange Goes Down
याच घटने बरोबर २ घटना सुद्धा घडल्या :-
१} युनायटेड एअरलाईन्सच्या कॉम्प्युटर सिस्टीम्स मधे आउटेज झाला आणि या एअरलाईन्सच्या सर्व फ्लाईट्सवर याचा परिणाम झाला.
संदर्भ :- United check in system is down, nationwide ground stop due to outage
२} वॉल स्ट्रीट जर्नल चे होम पेज डाउन झाले.
संदर्भ :- Wall Street Journal website goes down amid NYSE, United tech problems
बाकी हॅकिंगच्या घटने सध्या अमेरिकेचे ३-१३ वाजले आहेत हे मात्र नक्की !
संदर्भ :- The Latest Hacking Toll
काही अजुन बातम्या :-
पाळणाघरातला ड्रॅगन
भारताबाबत स्थिर अर्थवृद्धीचे भाकीत, तर चीन-अमेरिकेत मंदीसदृशता : ओईसीडी
ग्रीस अपडेट :-

EU हंगामा ! :-

चायना मार्कट अपडेट:-

जाता जाता :- China Bans Stock Sales by Major Shareholders for Six Months { वॉर्निंग ! वॉर्निंग ! वॉर्निंग ! }

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तुम तो धोकेबाज हो... :- Saajan Chale Sasural

भुमन्यु's picture

13 Jul 2015 - 1:53 pm | भुमन्यु

अधिक माहिती बद्दल धन्यवाद


बाकी हॅकिंगच्या घटने सध्या अमेरिकेचे ३-१३ वाजले आहेत हे मात्र नक्की !
संदर्भ :- The Latest Hacking Toll

हा दुवा चालत नसल्याचे लक्षात आल्याने तिथली संपूर्ण बातमी पेस्ट करत आहे.
The computer hack of U.S. Office of Personnel Management federal employee files keeps getting worse. The agency disclosed Thursday that hackers stole 19.7 million background investigation forms and 1.1 million fingerprint records. That’s far more than the 4.2 million personnel files the agency first said had potentially been compromised.

Yet the Obama Administration continues to show no particular urgency about the hack, no one in government has paid any price for allowing it to happen by failing to use encryption to protect the records, and the Chinese who are believed to have done the stealing must be laughing it up.

“Just imagine if you were a foreign intelligence service and you had that data, how it might be useful,” FBI Director James Comey told reporters on Thursday. Good point. Mr. Comey declined to say what the government is doing about it, though he did aver that “this is the subject of a lot of conversation and work in the U.S. government.”

That’s swell, though perhaps not all that reassuring to those whose Social Security numbers and personal vulnerabilities are being scoured in Beijing or some other place that wants to do Americans harm. Here’s a question for Mr. Comey and the White House: Do they consider such a direct cyber attack on American records to be an act of war, or merely one more example of federal government incompetence? Or both?
या खालील दुव्यानी ही बातमी उघडेल असे वाटते...
http://www.google.com/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=1&cad=rja&u...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तुम तो धोकेबाज हो... :- Saajan Chale Sasural

नगरीनिरंजन's picture

11 Jul 2015 - 1:12 pm | नगरीनिरंजन

मार्केट्समध्ये काय होतंय ते तर दिसतंच आहे पण यामागच्या मूळ कारणांचे विश्लेषण करणारा कोणी जाणकार आहे का?
शिवाय चायनाच्या कोसळत्या मार्केटला शॉर्ट करून किंवा पुट घेऊन कोणी गब्बर झालेला मिपाकर आहे का याची उत्सुकता लागून राहिली आहे.

मदनबाण's picture

11 Jul 2015 - 9:35 pm | मदनबाण

यामागच्या मूळ कारणांचे विश्लेषण करणारा कोणी जाणकार आहे का?
तशी बरीच आहे पण, मुख्यत्वे प्रॉपर्टी बबल बर्स्ट होण्याचे थांबवण्यासाठी तिकडचा पैसा स्टॉक मार्केट मधे वळवण्यात आला, तसेच मार्जिन ट्रेडिंग आणि चीन सरकार तर्फे नागरिकांनी पैसे शेअरबाजारा लावलण्यासाठी केलेली जाहिरात बाजी !
सामान्य चीनी माणुस यात मुखत्वे भरडला गेला.
यावर अधिक इकडे :- Shadow banking, margin lending and a real estate bubble: China's stock exchange bloodbath explained
सध्या अनेक कंपन्यांच्या शेअर्स ट्रेडिंगवर बंदी आहे { शेअर्स विकण्यावर बंदी, मेजर शेअर होल्डर्स ना ६ महिन्यांची बंदी } ज्या बाजारात शेअर्स विकण्यासाठी शेअर विकण्यासाठी बंदी असेल आणि मार्केट पॉप अप करण्यासाठी सरकारची प्रचंड धडपड चालते , त्यावेळी बायर्स चा कॉन्फिडंस अजुन कमी होतो आणि पॅनिक अजुन वाढते....
बघण्या सारखी डॉक्युमेंट्री :-

सध्या Chan-hom Typhoon च्या तडाख्यात चीन सापडला असुन त्याचे परिणाम काय आहेत ते पहायला हवे, जवळपास 1.1 million लोक evacuated केले गेले आहेत.
Typhoon Chan-Hom wreaks havoc in China
Typhoon Chan-hom Makes Landfall in China After Hammering Okinawa (FORECAST)
Typhoon pounds China with heavy rains; 1.1 million evacuated
ग्रीस अपडेट :-
Greece news live: Europeans warn Greeks have lost creditors' trust as crunch summit begins
Greece debt crisis: Eurozone predicts tough talks
Greek debt crisis: Tsipras has lost creditors trust say finance ministers- live
Wary euro zone to pass bailout judgment on Greece
Greece Financial Crisis Hits Poorest and Hungriest the Hardest
No EU summit on Sunday if Greece strikes debt deal
इतर अपडेट्स :-
Beyond Greece, the world is filled with debt crises
Is Greece a Template for U.S. State & Local Government Debt Crises?
Watch out for dead-cat bounce in Hong Kong stock market
China’s stock market crash is a problem for the whole world
आपल्यालाही पावसाची चिंता लागुन राहिली आहे ! :(

जाता जाता :- IMF cuts 2015 growth forecast for US, UK, Japan and Canada
Growth in the US is now projected to be 2.5% this year, opposed to the 3.1%the IMF forecast in April. The UK’s growth forecasts have been cut from 2.7% to 2.4% in 2015 and from 2.3% to 2.2% in 2016.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- रात भी है कुछ भीगी भीगी... :) :- MUJHE JEENE DO

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

12 Jul 2015 - 8:55 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

ग्रीस कोसळवणार्‍यांनो जरातरी लाज बाळगा असा लेख येउंद्या.

मदनबाण's picture

12 Jul 2015 - 10:54 pm | मदनबाण

ग्रीस अपडेट :-
Germany reportedly preparing for Greece exit from eurozone
Merkel: Trust has been lost at Greece crisis talks
Russia energy minister says Moscow mulls direct fuel deliveries to Greece
Temporary Greek exit from eurozone on cards, unless tough reforms implemented
चायना अपडेट :-

Authorities in Zhejiang said the province may face 1.9 billion yuan ($410 million) in economic losses, with agriculture the worst affected, Xinhua said.
most powerful July typhoon to hit Zhejiang since the Communist Party took power in 1949, the National Meteorological Centre said.
संदर्भ :- Typhoon Chan-hom: Extensive damage reported as system loses strength; departs eastern China for Korean peninsula
China growth slid to 6.9% in Q2: survey
China growth slows to 6.9% in second quarter: Survey
China passenger car sales fall on economy, market woes
Auto sales in China witness 2.31% drop in June
Watch These Charts To Better Understand China's Stock Market Crash

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- असा कसा देवाचा देव... :- Pandit Raghunath Khandalkar

मदनबाण's picture

13 Jul 2015 - 9:49 am | मदनबाण

Published on Jul 8, 2015

Measures such as restricting IPOs, banning investors with more than 5% stake in a company and insiders from selling stocks for the next six months, and asking insurance companies and banks to buy shares to prop up the market have only added to the sense of panic.
संदर्भ :- Why China, and not Greece, should make you worry

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- युरोझोनमधून ग्रीसची पाच वर्षांसाठी गच्छंती शक्य

मदनबाण's picture

13 Jul 2015 - 11:51 am | मदनबाण

मोअर अपडेट्स फ्रॉम चायना :-
Chinese trade balance 46.54B vs. 55.70B forecast
China’s imports fell for the eighth consecutive month in June, official customs data showed Monday, dropping 6.7 percent year-on-year to 890.67 billion yuan ($142.83 billion)
संदर्भ :- China June imports down 6.7% — govt
मंद झालेल्या चीनी अर्थव्यवस्थेचा परिणाम तिथल्या कार सेल्सवर झालेला दिसतो... अनेक कंपन्यांच्या कार विक्री मधे घट झाली आहे आणि कंपन्यांना त्यांनी बनवलेल्या गाड्या ठेवायला जागा अपुरी पडत आहे.
{ Shenyang, Lianing province parking lots }
P1
P2
अधिक इकडे :- Carmakers Seen Ruing big China Bets as Sales Growth Slows
Why GM Is Back Below Its IPO Price, Part 2 - Chinese Auto Sales Collapse At Fastest Rate In 3 Years
China troubles not good news for India: Assocham
Chinese economic fall may hit India, says Assocham
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- युरोझोनमधून ग्रीसची पाच वर्षांसाठी गच्छंती शक्य

मदनबाण's picture

13 Jul 2015 - 1:35 pm | मदनबाण
प्रसाद गोडबोले's picture

13 Jul 2015 - 7:24 pm | प्रसाद गोडबोले

खतरनाक इंटरेस्टिंग होत चालले आहे राव हे।

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

13 Jul 2015 - 7:45 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

वाचतेय. येणारा काळ कठिण दिसतोय.
भारतिय उद्योजक परिस्थिती खराब आहे हे कधीच मान्य का करीत नाहीत? जी पारदर्शकता अनेक देशात दिसते ती येथे का दिसू नये?

काळा पहाड's picture

13 Jul 2015 - 8:56 pm | काळा पहाड

१. भारतीय उद्योग हे बहुतांशी फॅमिली बिझनेस आहेत. त्यांच्यात ती गुपित ठेवण्याची परंपरा अंगी बाणलेली होतीच. आता ते पब्लिक लिमिटेड असली तरी ती पूर्णपणे गेलेली नाही.
२. कुठलाही बिझनेसमन माझ्या बिझनेसवर परिणाम होईल असं म्हणू शकत नाही. नाहीतर त्याच्या शेअर्स वर पहिला परिणाम होतो.
३. जगातले बरेच उद्योग अपारदर्शक होते किंवा आहेत. उदाहरणार्थ एनरॉन.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

14 Jul 2015 - 11:11 am | माईसाहेब कुरसूंदीकर

विविध देशांतील ,राज्यांतील सरकारांना मात्र हेच लोक नाक वर करून 'सरकारी व्यवहारात पारदर्शकता हवी'असे उच्च रवात सांगत असतात.

दोन वर्षांपासून भारतीय उद्योग वाढ ठप्पच : राहुल बजाज
'अच्छे दिन'साठी 5 वर्ष नाही, 25 वर्षे लागतील: भाजपाध्यक्ष अमित शाह
घ्या... निवडणुकीच्या वेळीच हे सांगायला हवे होते ना ! ;) इथे सामान्य मध्यम वर्गियांची खस्ता हालत झाली आहे,ज्यांना रोजचा दिवस कंठताना १० वेळा महिन्याच्या बजेटचा विचार करायची वेळ आली आहे त्यांना २५ वर्ष म्हणजे काही क्षणच भासतील नाही ? २५ वर्ष म्हणजे फारच कमी सांगितली असं दिसतय...

ग्रीस अपडेट :- डील झाली, पण ती अजुन पूर्णत्वास गेलीली नाही.ज्या ६१.३१ टक्के या विरोधात मतदान केले त्यांचे काय ? Alexis Tsipras यांना ग्रीस पार्लेमेंट, ग्रीस जनता आणि त्यांच्या स्वतःच्या पार्टीत होत असलेल्या विरोध इं गोष्टींचा सामना आता करावा लागणार आहे. 85 billion euros euro bailout आणि फायनॅनशिअल सपोर्ट हे ३ वर्षासाठी, बरं मग ३ वर्षांनी काय ? बॅंका अजुन बंद आहेत आणि बुधवारी उघडतील अशी अपेक्षा आहे,बघुया काय होते ते !
संदर्भ :- Greek PM faces hard sell on bailout deal

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जायकवाडी आटलं, पाणीसाठा अवघ्या 0.34 टक्क्यांवर

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Jul 2015 - 2:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

ग्रीस बेलाआउट ही ग्रीस आणि युरोझोने दोन्ही बाजूंचा अगतिक निर्णय आहे. युरोझोनमधून बाहेर गेल्यास नक्कीच होणारी आर्थिक दुर्दशा ग्रीसला सोसायची नव्हती आणि ग्रीस बाहेर गेल्याने उर्वरीत युरोझोनमध्ये होणार्‍या अनेक अपेक्षित आणि अनपेक्षित राजकीय व आर्थिक पडझडीला तोंड देण्यास युरोझोनेची तयारी नव्हती. गम्मत अशी की ही परिस्थिती दोन्ही बाजूंना (आणि सर्व जगाला) पूर्णपणे आणि उघडपणे माहीत होती, पण दोन्ही बाजू याबाबतीत अज्ञ असल्याचे भासवत एकमेकाशी भावनीक खेळ खेळत अंतिम करारातील अटी जास्तीत जास्त आपल्या बाजूच्या कश्या होतील याचा कसोशीने प्रयत्न करत होत्या. ग्रीस आतापर्यंत "मी जगासमोर नग्न असल्याने आता अजून काय होईल ?" असा आव आणत होता. तर, "आमचे ऐका नाहीतर बाहेर व्हा असे युरोझोन आडून आडून म्हणत होता." हे स्पष्टपणे म्हणण्याची ताकद युरोझोनकडे नाही हे स्पष्ट झाल्यावर ग्रीसने युरो पार्लमेंटमध्ये आणि इतर संस्थांमध्ये "द्यायच्या तेवढ्या दुषणे / शिव्या द्या पण तुमच्याकडे आम्हाला अधिक कर्ज देण्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही" असाच साधारण पवित्रा घेऊन अनेक जाचक अटी कमी करून घेण्याचा पवित्रा घेतला. ग्रीसची जनमत चाचणीही तसेच एक दबावतंत्र होते.

आता प्रत्यक्षात किती प्रमाणात कोण आपल्या दिखाऊ पाहिर्‍यांवरून खाली येऊन हातमिळवणी झाली हे स्वाक्षर्‍यांकित अंतिम कराराचा मसुदा बाहेर आल्यावरच कळेल. माझ्या कयासाप्रमाणे करारात ग्रीसचे पारडे जरासे जास्त वरचे असावे... कारण "फार कडक अटी म्हणजे त्या ग्रीसकडून न पाळल्या जाण्याची खात्री" हे आता रस्त्यावरचे पोरही सांगू शकेल !

ग्रीस आतापर्यंत "मी जगासमोर नग्न असल्याने आता अजून काय होईल ?" असा आव आणत होता. तर, "आमचे ऐका नाहीतर बाहेर व्हा असे युरोझोन आडून आडून म्हणत होता." हे स्पष्टपणे म्हणण्याची ताकद युरोझोनकडे नाही
बर्‍याच प्रमाणात सहमत ! ग्रीसकडे कर्ज घेण्या पलिकडे दुसरा पर्याय होता ?

आता प्रत्यक्षात किती प्रमाणात कोण आपल्या दिखाऊ पाहिर्‍यांवरून खाली येऊन हातमिळवणी झाली हे स्वाक्षर्‍यांकित अंतिम कराराचा मसुदा बाहेर आल्यावरच कळेल. माझ्या कयासाप्रमाणे करारात ग्रीसचे पारडे जरासे जास्त वरचे असावे...
असं सध्या तरी दिसत नाही !
संदर्भ :- Europe To Greece: All Your Government Are Belong To Us
ग्रीसच्या एनर्जी मिनिस्टरनी "राग" आळवायला सुरु केले आहे. :)
संदर्भ :- Greek Energy Minister Lafazanis: ‘Greek PM Needs to Take Back The Agreement’
बाकी युरोझोन पार्लेमेंट्स मधे काय काय घडते ते पाहणे रोचक ठरणार आहे, विशेषतः जर्मनी आणि फिनलँड
जर्मनीत याची बरीच चर्चा होत आहे असे दिसते...
संदर्भ :- 'Merkel saves Greece with our money': What European papers say about Greece
तर फिनलँड म्हणतो :- Finland can’t offer Greece urgent finance now
ग्रीसकडे या सगळ्यासाठी उध्या पर्यंतचाच वेळ उरला आहे !
जाता जाता :- २० जुलैसाठी आता फक्त ६ दिवस राहिले !
संदर्भ :- Why the Real Deadline for Greece Is July 20

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जायकवाडी आटलं, पाणीसाठा अवघ्या 0.34 टक्क्यांवर

प्रसाद गोडबोले's picture

14 Jul 2015 - 8:23 pm | प्रसाद गोडबोले

खतरनाक !!

पण आता ग्रीसला कर्ज देणार कोण ? जर्मनी तर आधीच घाईला आली आहे . इंग्लंड ह्या फंदात पडणार नाही . ( युरोझोन कोसळणे हे कदाचित त्यांच्या तोट्याचेच असले तरीही हे लोक युरोपावर कायम आपला वरचष्मा ठेवायला पाहतात कायम ! )

मुख्य आपल्या भारतवर काय फरक पडेल . माझ्या अंदाजे भारताचे आणि ग्रीसचे तसे विषेश महत्वाचे आयात निर्यात संबंध नाहीत त्यामुळे जो काही फरक पडेल तो डायरेक्ट पडणार नाही , युरोझोनवर ग्रीसचा जो इफ्फेच्त पडेल त्याचा भारतावर इफेक्ट पडेल .

ग्रीस/युरोझोन चा जीडीपी आणि भारताचा जीडीपी ह्यात किती स्ट्राँग कोर्रेलेशन आहे हे पहायला पाहिजे !

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Jul 2015 - 11:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

हे मुद्दामहून वेगळे लिहायचे होते. टंकून होईपर्यंत विजपुरवठा खंडीत झाल्याने बंद पडलेल्या वायफायने ते टाकता आले नाही. नंतर इतर गोष्टीत गुंतल्याने याचा विसर पडला तो आता अचानक आठवेपर्यंत... बघा जीवनातल्या घटना किती अनिश्चित असतात ते !

बेलाआऊटचा निर्णय घेणारे लोक राजकारणी असल्यामुळेच केवळ आताचा ग्रीसच्या बेलआऊटचा निर्णय घेतला गेला आहे. निर्णय घेणारे व्यापारी असते तर "होउंद्या ग्रीसला दिवाळखोर. आतापर्यंतचे सगळे कर्ज बुडीत (व्यापारी तोटा) खात्यात टाका. पण, अजून कर्ज देऊन भविष्यात खात्रीने होणारे अधिक नुकसान विकत घेऊ नका." असा प्रोग्रॅम मॅनेजमेंट शास्त्राप्रमाणे योग्य निर्णय झाला असता.

सत्य हेच आहे की, राजकारणातले निर्णय शास्त्रिय पद्धतीने घेतले जात नसून...
१. हा पैसा माझा वैयक्तीक पैसा नाही, जनतेचा आहे (राजकारण्यांच्या दृष्टीने ही जबाबदारीची जाणीव नसून सुखकारक वस्तुस्थिती असते).
२. घेतलेल्या निर्णयाने माझ्या / माझ्या पक्षाच्या भवितव्यावर कोणते बरे वाईट परिणाम होणार आहेत ? (या प्रश्नाचे स्वतःसाठी सर्वात सोईचे उत्तर शोधण्याची धडपड राजकारणी सतत करत असतात.)
...ते निर्णय, "पहिल्या मुद्द्यातल्या वस्तुस्थितीवर आणि दुसर्‍या मुद्द्यातल्या प्रश्नाच्या उत्तरावर" अवलंबून घेतले जातात.

अमेरिका याच मानसिकतेमुळे आतापर्यंत $१८ ट्रिलियनचे कर्ज उभे करू शकली आहे आणि दिवसेदिवस ते असीम पद्धतीने वाढवतच आहे. अमेरिका तिचे कर्ज कधीकाळी फेडू शकेल हे "शस्त्रिय" पद्धतीने सिद्ध करू शकणार्‍या अर्थतज्ञाला अर्थशास्त्राची पुढली पाच नोबेल पारितोषिके रांगेने द्यायला हरकत नसावी !

फरक इतकाच आहे की, या प्रकारात ग्रीस अमेरिकेचा फाsssर छोटा आणि जागतीक स्तरावर फारशी पत नसलेला भाऊ आहे... पण, सद्याच्या वस्तूस्थितीमध्ये त्याच्या बाजूचे दोन बलवान मुद्दे आहेत...
(अ) तो युरोपमधील देश आहे आणि
(आ) त्याला कोणत्याही अटींशिवाय आंधळेपणाने युरोझोनमध्ये घ्यायचा गुन्हा युरोझोनच्या दादालोकांनी केला आहे!
...आणि ग्रीस काहिश्या अगतिकतेने पण खुपश्या चलाखीने या वस्तूस्थितीतल्या बलस्थानांचा उपयोग करून घेत आहे.

जीवनातल्या घटना किती अनिश्चित असतात ते !
१००% सहमत ! :)
अमेरिका याच मानसिकतेमुळे आतापर्यंत $१८ ट्रिलियनचे कर्ज उभे करू शकली आहे आणि दिवसेदिवस ते असीम पद्धतीने वाढवतच आहे. अमेरिका तिचे कर्ज कधीकाळी फेडू शकेल हे "शस्त्रिय" पद्धतीने सिद्ध करू शकणार्‍या अर्थतज्ञाला अर्थशास्त्राची पुढली पाच नोबेल पारितोषिके रांगेने द्यायला हरकत नसावी !
हा.हा.हा... अगदी सत्य ! :)
बाकी अमेरिकेचे पैसे उडवण्याचे नवनवे कारनामे वाचलेत... त्यातले २ इथे ध्यावेसे वाटतात...
Taxpayers Spend $3.5 Million to Find Out Why Lesbians Are Fat
Congressman Publishes 10 Worst Examples Of Government Waste

बॅक ट्रॅक चायना :-
"China's economy and its stock market are completely uncorrelated at the moment. There's been so much volatility in the market that the GDP print would have to be substantially different than estimates in order to change things."
संदर्भ :- Shanghai Composite widens losses after China GDP

China May Tip World Into Recession: Morgan Stanley
Hedge Funds Reassess China After Market Free Fall
As $170 billion hedge fund Bridgewater noted, "new participants are now discovering that making money in the markets is difficult," and sure enough
संदर्भ :- Chinese Big Cap Stocks Continue To Slide; Bridgewater Warns, “Typical Of Market Dominated by Unsophisticated Investors”
Chinese economic growth based on 'money created from thin air'
China's Tamed Stock Market Might Bite Its Economy

SHCOMP:IND
3,752.931 => -157.634 = -4.02%

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पाच महिन्यांत दीड हजार बलात्कार

या विषयावर मला आवडलेली काही व्यंगचित्रे :-
P1
P2
P3
P4
P5

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पाच महिन्यांत दीड हजार बलात्कार

भुमन्यु's picture

15 Jul 2015 - 1:47 pm | भुमन्यु

सगळी व्यंगचित्रे पुरेशी बोलकी.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Jul 2015 - 8:57 pm | डॉ सुहास म्हात्रे

सगळीच व्यंगचित्रे बोलकी आहेत....

पण शेवटच्या चित्रातील ऑस्ट्रेलियाची अवस्था चित्रकाराचे जागतीक अर्थव्यवस्थेची खरी जाण दाखवते !

प्रसाद१९७१'s picture

24 Jul 2015 - 2:55 pm | प्रसाद१९७१

गेल्या १० दिवसात जगात काही घडत नाहीये का मदनबाण सुट्टीवर गेलेत?

श्रीरंग_जोशी's picture

25 Jul 2015 - 2:17 am | श्रीरंग_जोशी

सौजन्यः द रुल्स.

(function(d, s, id) { var js, fjs = d.getElementsByTagName(s)[0]; if (d.getElementById(id)) return; js = d.createElement(s); js.id = id; js.src = "//connect.facebook.net/en_US/sdk.js#xfbml=1&version=v2.3"; fjs.parentNode.insertBefore(js, fjs);}(document, 'script', 'facebook-jssdk'));

The ugly TruthThe ugly Truth.....! Must watch..!Posted by Shankar Naidu on Saturday, July 6, 2013

@ प्रसाद१९७१
गेल्या १० दिवसात जगात काही घडत नाहीये का मदनबाण सुट्टीवर गेलेत?
हा.हा.हा... :) बर्‍याच उलाढाली झाल्या आहेत आणि मी जरा "ब्रेक" घेतला होता. ;)

काही ट्रिगर सातत्याने आपल्याला येणार्‍या घटनाक्रमा बद्धल सुचना देत असतात,मग ते चार्ट चे ट्रिगर असोत, वा डेटा चे किंवा ह्मूमन बिहेविअरचे... हे ट्रिगर समजणे फार आवश्यक आहे कारण ते आपल्याला एका प्रकारे आगाउ सुचना देत असतात. असे अनेक घटनाक्रम्,बातम्या सातत्याने येत असतात त्यांचा अर्थ काढणे आणि समजुन घेणे हे मोलाचे ठरु शकते. उदा. इथे म्हंटल्या प्रमाणे आशियातला सगळ्यात श्रीमंत माणुस Li Ka-shing ज्यांना चीनचा वॉरन बफेट असे देखील संबोधले जाते, ते २०१३-२०१४ पासुन सातत्याने चीन च्या रिअल इस्टेट मधली त्यांची गुंतवणुक निकालात काढत होते... आज चीनची अवस्था कुठे चालली आहे हे सर्वांनाच दिसत आहे. या व्यक्तीची कॄती ही एक प्रकारचा ट्रिगर होता.
अश्या प्रकारे जागतिक अर्थव्यवेस्थेमधे तांबे या धातुचे स्थान आहे. हा धातु जागतिक अर्थव्यवस्थेची जणू थर्मामिटरच आहे, आणि त्याला "Dr. Copper" हे विशेषण म्हणुनच लाभले आहे. आत्ताच्या घडीला काय स्थिती आहे ? तर :-
Copper Plumbs Six-Year Low as China Stock Selloff Spurs Demand Fears
या वरुन एकंदर जागतिक अर्थव्यवस्थांच्या सध्य स्थिती चा "अंदाज" यावा.जगातली २ सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था चीन आहे आणि त्यांची सध्य स्थिती पाहता त्याचे जगभर परिणाम होतील, मग ते ऑस्ट्रेलिया असो वा सिंगापुर किंवा युरोप असो वा अमेरिका.
सोने खाली पडले ही बातमी आता सर्वश्रुत झाली आहे,चीन ने सोने विकले म्हणुन म्हणा, फेड रेट हाईक करेल या बातमीने गोल्ड सेल ऑफ झाले म्हणा किंवा इतर काही... मध्यंतरी मी काही जुने लेख जालावर शोधले होते, जे सोन्या विषयीच होते...ते आता इथे देत आहे.
How Gold Performs During A Financial Crash
Financial crisis: demand for gold soars as price tumbles
माझा मेंदु मला सांगतो की पडत्या सोन्याची किंमत ही येणार्‍या इकोनॉमिकल क्रायसिसची पूर्व सुचना देत आहे, तसे न-झाल्यास हा फक्त केमिकल लोच्या आहे असे समजावे. ;)
आता अमेरिकेकडे वळुया... सध्या परत सगळ्यांचे लक्ष जेनेट येलनकडे लागलेले दिसुन येत आहे. प्रश्न तोच ! रेट हाईक होणार ? होणार तर कधी ? जेनेट यावेळी स्टेटमेंट देताना कशी शब्द रचना करते ते पहावयास हवे. :)
Fed is likely to delay 1st rate hike in 9 years a bit longer
तेल राहिलेच की... इराण वरचे सॅक्शंन्स उठले ना ? मग इराणी ऑइले ने मार्केट फ्लड होइल का ?
चीन तर सध्या बर्‍याच वेगवगळ्या कारणांमुळे फोकस मधे आहेच... असेच एक अजुन कारण :-
Shock report: China dumps half a trillion dollars: “Something is very, very wrong”

जाता जाता :- मध्यंतरी जालावर वाचताना येता ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वर्ल्ड वाईड क्रॅश होण्याचे संकेत असल्याच्या बातम्या आणि मला वाटत काही व्हिडीयो देखील पाहिले होते. पाहुया ऑक्टोबर काही फार लांब नाही ना ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Infosys, Wipro & TCS lose over 1,00,000 people in last four quarters as automation kicks in

भुमन्यु's picture

29 Jul 2015 - 3:43 pm | भुमन्यु

धन्यवाद, उत्तम माहिती आणि संदर्भांसाठी

मदनबाण's picture

30 Jul 2015 - 10:48 pm | मदनबाण

अपेक्षे प्रमाणेच रेट हाईक जाहीर झाली नाही...
Press Release
Here comes the Fed ...
Analysis:- What U.S. Fed chair Janet Yellen doesn't know: Don Pittis
मिटींग होण्याआधी Danielle DiMartino चा व्हूव.

बाकी व्हेनाज्युएलाची हालत काय ? तर अराजकता ! तिथले मॉल सुद्धा लुटले गेले आहेत !

चीनचा बाजार:- कोसळणे चालुच !
SSE Composite Index
अमेरिकेची स्थिती :-
The post-recession economy is worse than we thought
काल सिंगापुरचा उल्लेख केला अन् आज बातमी...
Singapore's unemployment rate up 2% amid softer economy
The drag on Singapore from China's slowdown

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aao Huzoor Tumko... :- KISMAT

प्रसाद गोडबोले's picture

31 Jul 2015 - 12:11 pm | प्रसाद गोडबोले

मदनबाण ,

भारतातल्या गोल्ड मार्केट वर लक्ष ठेवुन आहात का ? कधी नव्हे ते भारतातुन सोन्याची मागणे कमी झाल्याने रेट कोसळ्त आहे :)

टवाळ कार्टा's picture

31 Jul 2015 - 12:15 pm | टवाळ कार्टा

सोने घ्यावे का? :)

प्रसाद गोडबोले's picture

31 Jul 2015 - 12:21 pm | प्रसाद गोडबोले

सोन्यामध्ये 'कली' लपुन बसलेला असतो म्हणुन शहाण्या माणसाने कधीही सोने घेण्याच्या भागडीत पडुनये :)
- exp(श्री). प्रगो महाराज

सोन्यामध्ये 'कली' लपुन बसलेला असतो म्हणुन शहाण्या माणसाने कधीही सोने घेण्याच्या भागडीत पडु नये
हा.हा.हा... ;) श्रीमद् भागवत महापुराण => परिक्षित => ऋषिंच्या गळ्यात साप घालणे => मिळेलेला शाप => डोक्यावरचा सोन्याचा मुकुट => कारण:- कलि. आठवले. ;)

सध्य स्थिती पाहता सोने अजुन थोडे खाली जाउ शकते, माझ्या मते तरी थोडीशी गुंतवणुक म्हणुन घेण्यात काहीच हरकत नाही. या धातुला "मौल्यवान" धातु म्हणुनच इतिहास आहे, हे मी काही वेगळे सांगायची गरज नाही ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Chandan Sa Badan... :- Saraswatichandra

जाता जाता :-
पीटरचे फेडच्या एफएमओसी मिटींग बद्धलचे लेटेस्ट विचार :-

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Chandan Sa Badan... :- Saraswatichandra

टवाळ कार्टा's picture

31 Jul 2015 - 4:42 pm | टवाळ कार्टा

म्हणूनच विचारले...पोपशास्त्र्यांनी पार डोक्याच्या १ फूट वरून जाणारा प्रतिसाद लिवला

मदनबाण's picture

10 Aug 2015 - 12:38 pm | मदनबाण

अपडेट्स :-
Puerto Rico Defaults on Most of $58 Million Debt Payment
Puerto Rico in default on massive debt
For Norway, Oil at $50 Is Worse Than the Global Financial Crisis
End of Wealth: Raw Materials Crisis Hits Saudi Arabia, Rich OPEC Countries
With crude at $50, oil firms fear deeper crisis than in 1980s
Gross Sees Global Economy Dangerously Close to Deflation
China's government is now the largest player in the nation's stock market
Why people are worried about bond market liquidity
Be Ready for the Next Investing Crisis
येणार्‍या ग्लोबल इकोनॉमिक क्रायसिसच्या टाईम लाईन बद्धल अनेक तज्ञांंमध्ये वेगवेगळी मतांतरे दिसुन येत आहे, काहींचे म्हणणे आहे, की येत्या ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातच याची झलक आपल्याला पहावयास मिळेल, तर काही जण या वर्षाच्या शेवटी तर काही पुढील वर्षीची टाईम लाईनचा "अंदाज" वर्तवत आहेत.

जाता जाता :- This time it's different - it's worse!

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- लिख्खे जो खत तुझे, वो तेरी याद में हज़ारो रंग के नज़ारे बन गये... :- Kanyadaan

काळा पहाड's picture

11 Aug 2015 - 12:41 am | काळा पहाड

ज्या क्षणी फेड रेट्स वाढवेल, त्या क्षणाला क्रायसिस ला सुरवात होईल.

ज्या क्षणी फेड रेट्स वाढवेल, त्या क्षणाला क्रायसिस ला सुरवात होईल.
म्हणुनच तर फेड रेट हाईक करत नाही ना ! ;)
तरी सुद्धा फेड रेट हाईकच्या अपेक्षा काही संपत नाहीत !
संदर्भ :- Fed 'close' to hiking rates, economy near normal: Lockhart
काही अन्य दुवे :-
“To say the U.S. economy is healthy is laughable”: Larry Berman
The US Economy Continues Its Collapse
The US Economy Continues Its Collapse — Paul Craig Roberts
New jobs numbers don’t change case for a patient Fed
Analysts expect Brazil's economy to contract 1.97 pct.
The world's 7th largest economy is in a downward spiral
Brazil faces political, economic chaos with an ‘uncertain future’
UPDATE 2-BTG Pactual CEO says 'worst not over' for Brazil economy
Russia’s recession deepens as economy contracts 4.6%
Russian GDP Plunges 4.6%
CITI: We've identified 'the most important consequence' of China's stock market crash
China Moves to Devalue Yuan
Scottish economy 'thriving' - report
Venezuela's disastrous course
Venezuela Is Running Out of Beer
Venezuelan opposition hold protestin Caracas against food shortages
Chronic shortages: Venezuelan patients resort to pet medications
Looters target Venezuelan food stores as shortages spark frustration

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तुझे जीवन की डोर से बाँध लिया है... :- Asli Naqli

मदनबाण's picture

10 Aug 2015 - 8:37 pm | मदनबाण

Governments Worldwide Will Crash the First Week of October … According to Two Financial Forecasters
Governments Worldwide Will Crash the First Week of October … According to 2 Financial Forecasters
Armstrong has predicted for years that governments worldwide would melt down in a crisis of insolvency and lack of trust starting this October. Specifically, Armstrong predicts that a major cycle will turn on October 1, 2015, shifting investors’ trust from the public sector and governments to the private sector. (Armstrong is not saying that a crash will occur on October 1st ... but that it will be a major turning point which sets us up for a crash within a couple of months)

http://www.armstrongeconomics.com/

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- लिख्खे जो खत तुझे, वो तेरी याद में हज़ारो रंग के नज़ारे बन गये... :- Kanyadaan

मदनबाण's picture

12 Aug 2015 - 1:38 pm | मदनबाण

नाउ इट्स अबाउट जपान... Japan is the third largest economy in the world.
Japan’s government debt hits record high ¥1.057 quadrillion

इतर दुवे :-
Yuan cut clobbers markets, rekindles fear of forex war
China cuts yuan rate against US dollar for second day { लेटेस्ट }
Oil prices fall further as China lets yuan slide
Collateral damage for Aussie as China lets yuan slide
Oil prices hit six-year low
OPEC just kicked oil into the $30s
OPEC Supply Reaches 3-Year High as Iran Pumps Most Since ’12
GUNDLACH: If oil goes to $40 a barrel something is 'very, very wrong with the world'
Moody's cuts Brazil's rating, assigns stable outlook
South African economy faces turbulence: central bank's Kganyago
माझ्या सर्व प्रतिसादांच्या काळात जालावर विविध ठि़काणी शोध घेताना मला कळलेले नविन शब्द :- हायपर इन्फ्लेशन्,ब्लॅक स्वान, फ्रेडी & फेनी {Freddie Mac - Fannie Mae } डाउनवर्ड स्पायरल.

जाता जाता :- करंन्सी वॉर इज एव्हरीव्हेअर नाउ !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ये परदा हटा दो, जरा मुखड़ा दिखा दो... :- Ek Phool Do Mali

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Aug 2015 - 2:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

चीनने काल युवान मध्ये २% मुल्यकपात केली आहे. याचे जागतीक व्यापारावर दूरगामी परिणाम शक्य आहेत. याला उपाय म्हणुन इतर राष्ट्रे त्यांच्या आयातकरांत वाढ करू शकतात. देशोदेशीच्या शेअरमार्केट्स मध्ये घसरण झाली आहे. भारतात याघडीला सेंसेक्स २६० आणि निफ्टी ८५ ने खाली आहे.

अनिरुद्ध.वैद्य's picture

12 Aug 2015 - 2:48 pm | अनिरुद्ध.वैद्य

उत्तम माहिती संकलन आहे. धन्यवाद!

मदनबाण's picture

12 Aug 2015 - 3:08 pm | मदनबाण

आज देखील युवान मधे कपात करण्यात आली आहे { ज्याचा दुवा वरच्या प्रतिसादात लेटेस्ट म्हणुन दिला आहे.}
आपल्या चलनावर आणि अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम :-
Rupee depreciates against US dollar
China devalues yuan; here's how it may impact India
Yuan devaluation to hit Indian exporters, rupee to remain under pressure
How the Chinese Yuan devaluation will impact India?
How China's Devaluation of Renminbi Impacts India
China's yuan devaluation worries Indian industry
करंन्सी वॉर संबंधी काही व्यंगचित्रे :-
P1
P2
P3
वाचनिय दुवे :-
Q&A China devalues the yuan: What you need to know
Why has China devalued its currency now and what impact will it have?
Two big reasons why China devalued its currency

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ये परदा हटा दो, जरा मुखड़ा दिखा दो... :- Ek Phool Do Mali

प्रसाद गोडबोले's picture

12 Aug 2015 - 3:27 pm | प्रसाद गोडबोले

मस्त चित्रे !

अनिरुद्ध.वैद्य's picture

12 Aug 2015 - 4:35 pm | अनिरुद्ध.वैद्य

कार्टून झकास! पण युआन अन डॉलरच्या भांडाभांडीत आपलं रूपड कुठशीक असेल कोणास ठाऊक!

बाळबोध प्रश्न:
बाकी युआनची किंमत कमी झाली तर चायनाला तेल महाग पडायचं का? आणि त्याचा परिणाम उत्पादनावर होणार का?

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Aug 2015 - 10:19 pm | डॉ सुहास म्हात्रे

व्यंगचित्रे एक नंबर !

श्रीरंग_जोशी's picture

13 Aug 2015 - 8:53 am | श्रीरंग_जोशी

हा दुव अगोदरच कुणी दिला असल्यास क्षमस्व.

World's largest economies Timeline.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Aug 2015 - 2:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त आणि उपयोगी ग्राफ आहे.

मदनबाण's picture

16 Aug 2015 - 12:20 am | मदनबाण

१२ ऑगस्टला रात्री 23:30 hrs च्या सुमारास चीन मधे मोठा ब्लास्ट झाला ! हा ब्लास्ट एव्हढा मोठा होता की सॅटॅलाईटने सुद्धा तो टिपला गेला. चीनच्या ब्लॉगर्सच्या मते या ब्लास्टची तुलना त्यांना हिरोशिमाच्या स्फोटाशी कराविशी वाटली. या बद्धल सातत्याने बातम्या येत आहेत आणि व्हिडीयोज सुद्धा.आत्ता पर्यंत या स्फोटात १०४ जण ठार झाल्यीची माहिती आहे.

अधिक इकडे :-China blast zone evacuated over contamination fear; 104 dead
China Tianjin blasts: Evacuations as sodium cyanide found

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Media Censorship: Is China trying to cover up coverage of Tianjin blasts?