काही विस्कळीत प्रश्न

चिनार's picture
चिनार in काथ्याकूट
10 Feb 2015 - 4:13 pm
गाभा: 

काही विस्कळीत प्रश्न
विषय - स्विस बँक
१. स्विस बँकेतला सगळा पैसा काळाचं असतो का ?
२. स्विस बँकवाले ," आमच्या येथे काळे पैसे स्वीकारले जातात" अशी जाहिरात करतात का ?
३. स्विस बँकेची भारतात शाखा आहे का ?
४. स्विस बँकेत खातं उघडायला कुठली कागदपत्र लागतात ?
विषय - आंतरराष्ट्रीय बाजार
१. आंतरराष्ट्रीय बाजार नक्की कुठे भरतो ?
२. या बाजारात मोलभाव होतो का ? की "एकच भाव" अशी पाटी असते ?
३. अमेरिकेचा माल विकला गेला नाही म्हणजे 'आर्थिक मंदी ' असा नियम आहे का ?
विषय - महागाई
१. तेलाचे भाव वाढले तरी महागाई वाढते , कमी झाली तरी वाढते, असं का ?
२. महागाई दराला अप्पर कट ऑफ का नसतो ?
३. स्थिर महागाई दर म्हणजे काय ? शेवटी महागाई ती महागाईचं ना ?
४. महागाई दरासारखा 'स्वस्ताई दर' सुद्धा मोजतात का ? की मोजता येत नाही इतका कमी असतो ?
विषय -स्विस बँक,आंतरराष्ट्रीय बाजार,महागाई आणी भारत सरकार
१. भारत सरकार स्विस बँकेची भारतात शाखा उघडून सगळा काळा पैसा तिथेच का ठेवत नाही ?
२. आंतरराष्ट्रीय बाजार भारतात भरवून संसदेतले सगळे नमुने तिथे विकायला का ठेवत नाही ? जाहीर लिलाव केला तरी चालेल !
३. महागाई जर कायमच राहणार असेल तर तिला भारताचे नागरिकत्व देण्यास काय हरकत आहे ?

प्रतिक्रिया

बॅटमॅन's picture

10 Feb 2015 - 4:17 pm | बॅटमॅन

माई मोड ऑनः

छान प्रश्न विचारलेस रे चिनार्‍या. आता अरविंदा दिल्लीत सत्तेवर आलाय तो या प्रश्नांची उत्तरे द्यायचा थोडा तरी प्रयत्न करेल असे हे म्हणत होते.

माई मोड ऑफ.

पिंपातला उंदीर's picture

10 Feb 2015 - 4:31 pm | पिंपातला उंदीर

*lol* *LOL* :-)) बाकी माई अरविंदाला प्रेमाने अरु म्हणतात

बॅटमॅन's picture

10 Feb 2015 - 4:37 pm | बॅटमॅन

माई मोड ऑनः

धन्यवाद रे पिपातल्या उंदरा. अलीकडे लोक कायपण आयडी घेतात असे हे म्हणत होते. तरी बरं माझ्या आयडीबद्दल काही बोलले नाहीत ते.

माई मोड ऑफ.

बॅटमॅन's picture

10 Feb 2015 - 4:39 pm | बॅटमॅन

त्यांचे हे अरुच्या शाळेत शिकवत असतील हो. =))

पिंपातला उंदीर's picture

10 Feb 2015 - 4:42 pm | पिंपातला उंदीर

*lol* *LOL* :-)) :))

नाखु's picture

10 Feb 2015 - 4:52 pm | नाखु

जगव्यापी थोर्र् अवताराला शाळेच्या भिंतीत सीमीत करणार्या प्रव्रुत्तींचा नीषेध.

माई प्रत्यक्ष मोदी/मनमोहन्/अडवाणी/बराक्/खोमेनी/सद्दाम यांनाही एकेरी संबोधतात तेव्हा त्यांना फकस्त "शाळे"त कोंबू नये ही विनंती.

समस्त माई-नाना स्मारक समिती.
ओसाड्वाडी,हवाईनगर.

टवाळ कार्टा's picture

10 Feb 2015 - 5:03 pm | टवाळ कार्टा

नाना माई प्रत्यक्ष रजनीकांत कडून शिकले हैत म्हणे ;)

अरे रजनीकांत त्यांच्याकडे शिकवणी लावून शिकायचा.

बॅटमॅन's picture

10 Feb 2015 - 6:40 pm | बॅटमॅन

आणि रजनीकांतने शिकवणीची जी फी भरली ती नानामाईंनी एके ठिकाणी साठवली तेच ठिकाण आज पद्मनाभस्वामी मंदिर म्हणून ओळखले जाते.

टवाळ कार्टा's picture

10 Feb 2015 - 6:43 pm | टवाळ कार्टा

अग्गागा...पार स्टेडियमबाहेर मारला की =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 Feb 2015 - 7:06 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

=)) खरचं स्टेडियमच्या बाहेर होता हा. हा षटकार कै.नानांच्या आयडीस "शरदांजलीस" वाहु.

जयराज's picture

11 Feb 2015 - 12:12 am | जयराज

सर बॅटमॅन.
मिपाचे स्फोटक फलंदाज.._/\_
आमचा प्रणाम घ्यावा.._/\_

श्रीगुरुजी's picture

14 Feb 2015 - 9:23 pm | श्रीगुरुजी

>>> आणि रजनीकांतने शिकवणीची जी फी भरली ती नानामाईंनी एके ठिकाणी साठवली तेच ठिकाण आज पद्मनाभस्वामी मंदिर म्हणून ओळखले जाते.

उत्तंग षटकार!!! थेट मैदानाच्या बाहेर जाऊन पडला!!!!!!

झालंच तर माईंच्या ह्यांनी माईंना ज्यादिवशी प्रपोज केलं तो दिवस भारतीय पंचांगांत वसंतपंचमी म्हणून सुरु झाला. मग गोरे लोक आले, त्यांना पंचांग शष्प कळेना. मग त्यांनी वसंतपंचमी चा व्हलेंटाईन डे केला. आहेस कुठे !!

टवाळ कार्टा's picture

10 Feb 2015 - 6:33 pm | टवाळ कार्टा

=))

आणि माईंचा बड्डे हा गुढीपाडवा म्हणून सुरू झाला.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 Feb 2015 - 7:04 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आणि माईंचा बड्डे हा गुढीपाडवा म्हणून सुरू झाला.

बुढ्ढीपाडवा असा एक "अलंकार" मराठी भाषेमधे अ‍ॅडवायचा का?

हाही एकदम ष्टेडियमबाहेर =)) =)) =))

अजया's picture

11 Feb 2015 - 10:28 am | अजया

=))

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Feb 2015 - 10:48 pm | डॉ सुहास म्हात्रे

पगला गजोधर's picture

10 Feb 2015 - 7:25 pm | पगला गजोधर

चांगलाच विनोद करतोसरे ब्याटमानां, अलीकडे असे कोणी चांगले विनोद केले की ठसका लागल्यावर, स्त्रेप्सील घ्यायची का ? असे विचारतात हो आमचे हे !

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 Feb 2015 - 7:28 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ठसका लागल्यावर मोड ऑन-ऑफ व्हायला लागले तर मिरजेमधे डॉक्टर पुजारी आहेत. ते करतात हो उपचार.

पगला गजोधर's picture

10 Feb 2015 - 7:35 pm | पगला गजोधर

माहिती रे ज्याकोवा, रोज संध्याकाळी, नानांची नजर चुकवून गणेश मंदिरानंतर, मी गणेश तलावावर डॉक्टरांना भेटते, तिकडून मग आम्ही हळूच मिशन हास्पिटलासमोरचा चहा पितो, मग बाजारपेठेतल्या जुबली शाळेसमोर पाणीपुरी खातो हो, कधी कधी शिवाप्पाचा स्पे चहा घेतो.

hitesh's picture

10 Feb 2015 - 7:44 pm | hitesh

गणेश मंदिर वाटेने पुढे आले की मग शनी मंदिर लागते.

मग एक षिणोमा ट्वाकीज लागते ना ?

बॅटमॅन's picture

10 Feb 2015 - 7:46 pm | बॅटमॅन

शनीमारुती मंदिराकडनं नगरपालिकेकडे जाताना वाटेत आशा टॉकीज लागते, चिर्मुरे भट्टीनंतर. ब दर्जाच्या चित्रपटांचे आगार. तिथे जाऊन पिच्चर बघायची आमची इच्छा आज इतक्या वर्षांत पूर्ण झाली नाही.

पगला गजोधर's picture

10 Feb 2015 - 7:53 pm | पगला गजोधर

ब्याटमानां अरे त्याच्याही पुढे सराफकट्टा लागतो, तिथून जाताना, रोज आमचे हे 'पच्चास तोलेका गंठन' घेईन असे म्हणतात बै.

पगला गजोधर's picture

10 Feb 2015 - 7:54 pm | पगला गजोधर

ब्याटमानां अरे त्याच्याही पुढे सराफकट्टा लागतो, तिथून जाताना, रोज आमचे हे 'पच्चास तोलेका गंठन' घेईन असे म्हणतात बै, अच्छे दिन का काय ते आल्यावर, पन आज पर्यंत त्यांचे अच्छे दिनच आले नाहीत .

बॅटमॅन's picture

11 Feb 2015 - 1:18 am | बॅटमॅन

सराफकट्ट्याहून सरळ पुढे नगरपालिका अन समोर टौन हॉल, तिकडे खाल्लेल्या भेळेसारखी भेळ लंडनमध्येही मिळत नाही असे हे परवा सांगत होते.

भाग्यश्री कुलकर्णी's picture

12 Feb 2015 - 5:13 pm | भाग्यश्री कुलकर्णी

हित एवढे मिरजेचे हैत ह्ये म्हाइत नव्हतं.अन् त्ये लश्मी मार्केट पासली रेवडी विसरायलाय का काय?

लक्ष्मी मार्केटातली रेवडी काय ओ, त्यापेक्षा बसाप्पामधला खाजा अन बर्फी, अन विटा डेरीमधलं श्रीखंड. झालंच तर टौन हॉलजवळची मनोज भेळ अन तासगाव वेस मारुतीजवळची स्टार भेळ. सांगलीत विश्रामबागेतील क्रांती भेळ आणि संभाची भेळ हेही नामांकितच.

नितिन थत्ते's picture

15 Feb 2015 - 10:11 am | नितिन थत्ते

मिरजेतले लोक लै बाहेरचं खातात असं वाटाय लागलंय....

hitesh's picture

10 Feb 2015 - 7:42 pm | hitesh

कोण ? बिंदुमाधव पुजारी का ?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 Feb 2015 - 7:45 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

होय. खुप वयोवृद्ध आहेत. मुळव्याधीवर जालीम इलाज करतात. बहुतेक आता हयात नसावेत. :(

बॅटमॅन's picture

10 Feb 2015 - 7:45 pm | बॅटमॅन

डागदर जर उपचारादाखल स्ट्रेप्सिल्स देत असतील तर आम्ही आत्ताच्या आत्ता जातो मिरजेस.

श्रीगुरुजी's picture

14 Feb 2015 - 9:25 pm | श्रीगुरुजी

>>> झालंच तर माईंच्या ह्यांनी माईंना ज्यादिवशी प्रपोज केलं तो दिवस भारतीय पंचांगांत वसंतपंचमी म्हणून सुरु झाला. मग गोरे लोक आले, त्यांना पंचांग शष्प कळेना. मग त्यांनी वसंतपंचमी चा व्हलेंटाईन डे केला. आहेस कुठे !!

आज माईंना त्यांच्या 'ह्यां'च्याकडून व्हॅलेंटाईन दिवसाची काय सिक्रेट गिफ्ट मिळाली असेल याची उत्सुकता आहे.

अरे हो की. चुकलंच हां, आयमाय स्वारी. ओसामालाही त्या असेच संबोधत असतील.

"मोठे धाडस दाखवलेस हो ओसाम्या. पण तो बुश/क्लिंटन आता तुला सोडायचा नाही. तरी हे म्हणत होते, कशाला अमेरिकेच्या शेपटास हात घालायचा?"

पगला गजोधर's picture

10 Feb 2015 - 6:10 pm | पगला गजोधर

डीजायनर सूट भारी की मफलर ?

पगला गजोधर's picture

10 Feb 2015 - 6:26 pm | पगला गजोधर

दिल्लीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून, श्री बराक ओबामा राजीनामा कधीपर्यंत देतील ?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 Feb 2015 - 7:02 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

समस्त माई-नाना स्मारक समिती.
ओसाड्वाडी,हवाईनगर.

माई-कै.नाना अशी सुधारणा सुचवतो. बाकी ठ्ठो =))

पैसा's picture

10 Feb 2015 - 8:09 pm | पैसा

लै भारी प्रश्ण आहेत! नाना-माईचा फार्स संपला असेल तर कोणीतरी उत्तरे द्या बघू!

आंतरराष्ट्रीय बाजार भारतात भरवून संसदेतले सगळे नमुने तिथे विकायला का ठेवत नाही ? जाहीर लिलाव केला तरी चालेल !

याचं उत्तर मला माहित आहे. ते णमुने एकावर एक फ्री दिले तरी णको म्हणतात सगळे!

नाखु's picture

11 Feb 2015 - 9:27 am | नाखु

आंतरराष्ट्रीय बाजार भारतात भरवून संसदेतले सगळे नमुने तिथे विकायला का ठेवत नाही ? जाहीर लिलाव केला तरी चालेल !

आंतरराष्ट्रीय बाजार हा टाकाऊतून टिकाऊ शोधत असला तरी टिकाऊ (निगरगट्ट्/लोचट) असलेले पण गुणाने "टाकाऊ" कसे घेणार हाही कळीचा प्रश्न आहे !!!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

11 Feb 2015 - 9:32 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

म्या तर ऐकतु की ह्ये णमुणे भार्तात ठेवायसाठी ओबामामामा नी पेश्शल पॅकेज झैर केलयं म्हणुन. खरं खोटं तेलाचं म्हैत!!

स्वामी संकेतानंद's picture

10 Feb 2015 - 8:21 pm | स्वामी संकेतानंद

उत्तरे
विषय - स्विस बँक
१. नसतो
२. नाही. प्रत्यक्ष नाही करत, पण अप्रत्यक्ष होतेच.
३. नाही.
४. त्यांच्या ब्यांकेत खाते उघडायला आवश्यक असलेली कागदपत्रेच लागतात.

विषय - आंतरराष्ट्रीय बाजार
१. जगभर
२. मोलभाव होतो.
३. सध्यातरी.

विषय - महागाई
१. ऐसा कुच नै बाबा
२. असतो. एका मर्यादेपलीकडे महागाई दर जाऊ देणे अर्थव्यवस्थेसाठी मारक असते.
३. स्थिर महागाई दर म्हणजे एका निश्चित, नियंत्रित दराने वाढणारी. ती अर्थव्यवस्थेतली वाढ दर्शवते.
४. मोजतात. डिफ्लेशन दर असतो एक. काही देशांत दिसून येतो. त्यांच्या डोकेदुखीचे कारण आहे ते.

विषय -स्विस बँक,आंतरराष्ट्रीय बाजार,महागाई आणी भारत सरकार
१. त्या पैशावर व्याज आणि कर मिळणार नाही ना.
२. सांगा तुम्ही त्यांना.
३. महागाई मनुष्यप्राणी नाही म्हणून तांत्रिकदृष्ट्या नागरिकत्व देता येत नाही.

सिरुसेरि's picture

11 Feb 2015 - 10:47 pm | सिरुसेरि

"शनीमारुती मंदिराकडनं नगरपालिकेकडे जाताना वाटेत आशा टॉकीज लागते, चिर्मुरे भट्टीनंतर. ब दर्जाच्या चित्रपटांचे आगार"
जग बदलले .. कारण तेथे पुर्वी "वहिनींच्या बांगडया" सारखे चित्रपट लागायचे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Feb 2015 - 10:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

काय हे ?!

हजारावर वाचने. ३९ प्रतिसाद, पण त्यातले विषयाला धरून जेमतेम २; बाकी बहुतेक सगळे मिरजेच्या गल्लीबोळांतून फिरणारे... पण प्रतिसादकांना त्या गल्ल्यांची चांगलीच माहिती असल्याचे दिसल्याने "गल्ली चुकली" असे पण म्हणता येत नाहीय *unknw*

सिरुसेरि's picture

11 Feb 2015 - 11:55 pm | सिरुसेरि

हा सर्व क्रुपामाईचा परिणाम

बॅटमॅन's picture

12 Feb 2015 - 5:34 pm | बॅटमॅन

अगदी अगदी =))

एक सुधारणा फक्तः ते कृपामाई नाही, कॄपामयी उर्फ उच्चारी क्रुपामई आहे.

श्रीगुरुजी's picture

14 Feb 2015 - 9:22 pm | श्रीगुरुजी

काही विस्कळीत प्रश्न

विषय - स्विस बँक
१. स्विस बँकेतला सगळा पैसा काळाचं असतो का ?

नाही.

२. स्विस बँकवाले ," आमच्या येथे काळे पैसे स्वीकारले जातात" अशी जाहिरात करतात का ?

आपल्याकडे येणार्‍या पैशांचा रंग स्विस बँक्स बघत नाहीत.

३. स्विस बँकेची भारतात शाखा आहे का ?

आहे. स्विस बँक या नावाची कोणतीही बँक नसून स्वित्झर्लँडमधील बँकांना स्विस बँक्स असे म्हटले जाते. यूबीएस या स्विस बँकेचे भारतात भरपूर व्यवहार आहेत. त्यांची शाखा देखील आहे.

४. स्विस बँकेत खातं उघडायला कुठली कागदपत्र लागतात ?

ते खात्याच्या प्रकारावर अवलंबून आहे.

विषय - आंतरराष्ट्रीय बाजार

१. आंतरराष्ट्रीय बाजार नक्की कुठे भरतो ?

कोठेच नाही. कोणत्याही दोन देशांमधील व्यापार हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचाच एक भाग आहे.

२. या बाजारात मोलभाव होतो का ? की "एकच भाव" अशी पाटी असते ?

भाव या व्यापारातल्या विक्रेता व खरेदीदार देशावर अवलंबून आहे.

३. अमेरिकेचा माल विकला गेला नाही म्हणजे 'आर्थिक मंदी ' असा नियम आहे का ?

नाही.

विषय - महागाई
१. तेलाचे भाव वाढले तरी महागाई वाढते , कमी झाली तरी वाढते, असं का ?

फक्त तेलाच्या भावावरच महागाई अवलंबून नसते म्हणून.

२. महागाई दराला अप्पर कट ऑफ का नसतो ?

मागणी किती वाढेल व पुरवठा किती कमी होईल याला कोणताही कटऑफ नसल्याने महागाई दराला अपर कट ऑफ नसतो.

३. स्थिर महागाई दर म्हणजे काय ? शेवटी महागाई ती महागाईचं ना ?

भूतकाळातील एका विशिष्ट तारखेच्या तुलनेत सध्याचे भाव स्थिर असतील तर महागाई दर स्थिर आहे असे समजतात.

४. महागाई दरासारखा 'स्वस्ताई दर' सुद्धा मोजतात का ? की मोजता येत नाही इतका कमी असतो ?

स्वस्ताई म्हणजेच महागाईचा उणे दर.

विषय -स्विस बँक,आंतरराष्ट्रीय बाजार,महागाई आणी भारत सरकार
१. भारत सरकार स्विस बँकेची भारतात शाखा उघडून सगळा काळा पैसा तिथेच का ठेवत नाही ?

सरकारकडे काळा पैसा नसतो म्हणून.

२. आंतरराष्ट्रीय बाजार भारतात भरवून संसदेतले सगळे नमुने तिथे विकायला का ठेवत नाही ? जाहीर लिलाव केला तरी चालेल !

हे नमुने फुकट मिळाले तरी कोणी घेणार नाही म्हणून.

३. महागाई जर कायमच राहणार असेल तर तिला भारताचे नागरिकत्व देण्यास काय हरकत आहे ?

कारण महागाई ही जिवंत नागरिक नाही म्हणून.

काळ्या मांजरांकडे बोट दाखवून ब्लॅक मनी भारतात राजरोस अगोदरपासूनच असल्याचे बोलले जात आहे.

-येक वत्सप्प फर्वर्द.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Feb 2015 - 5:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

म्हणजे, ब्लॅक मनीचा मूळ उगम इजिप्तमध्ये झाला की ;)