काही विस्कळीत प्रश्न

चिनार काथ्याकूट
काही विस्कळीत प्रश्न विषय - स्विस बँक १. स्विस बँकेतला सगळा पैसा काळाचं असतो का ? २. स्विस बँकवाले ," आमच्या येथे काळे पैसे स्वीकारले जातात" अशी जाहिरात करतात का ? ३. स्विस बँकेची भारतात शाखा आहे का ? ४. स्विस बँकेत खातं उघडायला कुठली कागदपत्र लागतात ? विषय - आंतरराष्ट्रीय बाजार १. आंतरराष्ट्रीय बाजार नक्की कुठे भरतो ? २. या बाजारात मोलभाव होतो का ? की "एकच भाव" अशी पाटी असते ? ३. अमेरिकेचा माल विकला गेला नाही म्हणजे 'आर्थिक मंदी ' असा नियम आहे का ? विषय - महागाई १. तेलाचे भाव वाढले तरी महागाई वाढते , कमी झाली तरी वाढते, असं का ? २. महागाई दराला अप्पर कट ऑफ का नसतो ? ३. स्थिर महागाई दर म्हणजे काय ? शेवटी महागाई ती महागाईचं ना ? ४. महागाई दरासारखा 'स्वस्ताई दर' सुद्धा मोजतात का ? की मोजता येत नाही इतका कमी असतो ? विषय -स्विस बँक,आंतरराष्ट्रीय बाजार,महागाई आणी भारत सरकार १. भारत सरकार स्विस बँकेची भारतात शाखा उघडून सगळा काळा पैसा तिथेच का ठेवत नाही ? २. आंतरराष्ट्रीय बाजार भारतात भरवून संसदेतले सगळे नमुने तिथे विकायला का ठेवत नाही ? जाहीर लिलाव केला तरी चालेल ! ३. महागाई जर कायमच राहणार असेल तर तिला भारताचे नागरिकत्व देण्यास काय हरकत आहे ?

50 टिप्पण्या 14,635 दृश्ये

Comments

बॅटमॅन नवीन

माई मोड ऑनः छान प्रश्न विचारलेस रे चिनार्‍या. आता अरविंदा दिल्लीत सत्तेवर आलाय तो या प्रश्नांची उत्तरे द्यायचा थोडा तरी प्रयत्न करेल असे हे म्हणत होते. माई मोड ऑफ.

बॅटमॅन नवीन

In reply to by पिंपातला उंदीर

माई मोड ऑनः धन्यवाद रे पिपातल्या उंदरा. अलीकडे लोक कायपण आयडी घेतात असे हे म्हणत होते. तरी बरं माझ्या आयडीबद्दल काही बोलले नाहीत ते. माई मोड ऑफ.

नाखु नवीन

In reply to by बॅटमॅन

जगव्यापी थोर्र् अवताराला शाळेच्या भिंतीत सीमीत करणार्या प्रव्रुत्तींचा नीषेध. माई प्रत्यक्ष मोदी/मनमोहन्/अडवाणी/बराक्/खोमेनी/सद्दाम यांनाही एकेरी संबोधतात तेव्हा त्यांना फकस्त "शाळे"त कोंबू नये ही विनंती. समस्त माई-नाना स्मारक समिती. ओसाड्वाडी,हवाईनगर.

बॅटमॅन नवीन

In reply to by सूड

आणि रजनीकांतने शिकवणीची जी फी भरली ती नानामाईंनी एके ठिकाणी साठवली तेच ठिकाण आज पद्मनाभस्वामी मंदिर म्हणून ओळखले जाते.

जयराज नवीन

In reply to by बॅटमॅन

सर बॅटमॅन. मिपाचे स्फोटक फलंदाज.._/\_ आमचा प्रणाम घ्यावा.._/\_

श्रीगुरुजी नवीन

In reply to by बॅटमॅन

>>> आणि रजनीकांतने शिकवणीची जी फी भरली ती नानामाईंनी एके ठिकाणी साठवली तेच ठिकाण आज पद्मनाभस्वामी मंदिर म्हणून ओळखले जाते. उत्तंग षटकार!!! थेट मैदानाच्या बाहेर जाऊन पडला!!!!!!

सूड नवीन

In reply to by टवाळ कार्टा

झालंच तर माईंच्या ह्यांनी माईंना ज्यादिवशी प्रपोज केलं तो दिवस भारतीय पंचांगांत वसंतपंचमी म्हणून सुरु झाला. मग गोरे लोक आले, त्यांना पंचांग शष्प कळेना. मग त्यांनी वसंतपंचमी चा व्हलेंटाईन डे केला. आहेस कुठे !!

कॅप्टन जॅक स्पॅरो नवीन

In reply to by बॅटमॅन

आणि माईंचा बड्डे हा गुढीपाडवा म्हणून सुरू झाला.
बुढ्ढीपाडवा असा एक "अलंकार" मराठी भाषेमधे अ‍ॅडवायचा का?

पगला गजोधर नवीन

In reply to by बॅटमॅन

चांगलाच विनोद करतोसरे ब्याटमानां, अलीकडे असे कोणी चांगले विनोद केले की ठसका लागल्यावर, स्त्रेप्सील घ्यायची का ? असे विचारतात हो आमचे हे !

कॅप्टन जॅक स्पॅरो नवीन

In reply to by पगला गजोधर

ठसका लागल्यावर मोड ऑन-ऑफ व्हायला लागले तर मिरजेमधे डॉक्टर पुजारी आहेत. ते करतात हो उपचार.

पगला गजोधर नवीन

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

माहिती रे ज्याकोवा, रोज संध्याकाळी, नानांची नजर चुकवून गणेश मंदिरानंतर, मी गणेश तलावावर डॉक्टरांना भेटते, तिकडून मग आम्ही हळूच मिशन हास्पिटलासमोरचा चहा पितो, मग बाजारपेठेतल्या जुबली शाळेसमोर पाणीपुरी खातो हो, कधी कधी शिवाप्पाचा स्पे चहा घेतो.

बॅटमॅन नवीन

In reply to by hitesh

शनीमारुती मंदिराकडनं नगरपालिकेकडे जाताना वाटेत आशा टॉकीज लागते, चिर्मुरे भट्टीनंतर. ब दर्जाच्या चित्रपटांचे आगार. तिथे जाऊन पिच्चर बघायची आमची इच्छा आज इतक्या वर्षांत पूर्ण झाली नाही.

पगला गजोधर नवीन

In reply to by बॅटमॅन

ब्याटमानां अरे त्याच्याही पुढे सराफकट्टा लागतो, तिथून जाताना, रोज आमचे हे 'पच्चास तोलेका गंठन' घेईन असे म्हणतात बै.

पगला गजोधर नवीन

In reply to by पगला गजोधर

ब्याटमानां अरे त्याच्याही पुढे सराफकट्टा लागतो, तिथून जाताना, रोज आमचे हे 'पच्चास तोलेका गंठन' घेईन असे म्हणतात बै, अच्छे दिन का काय ते आल्यावर, पन आज पर्यंत त्यांचे अच्छे दिनच आले नाहीत .

बॅटमॅन नवीन

In reply to by पगला गजोधर

सराफकट्ट्याहून सरळ पुढे नगरपालिका अन समोर टौन हॉल, तिकडे खाल्लेल्या भेळेसारखी भेळ लंडनमध्येही मिळत नाही असे हे परवा सांगत होते.

भाग्यश्री कुलकर्णी नवीन

In reply to by बॅटमॅन

हित एवढे मिरजेचे हैत ह्ये म्हाइत नव्हतं.अन् त्ये लश्मी मार्केट पासली रेवडी विसरायलाय का काय?

बॅटमॅन नवीन

In reply to by भाग्यश्री कुलकर्णी

लक्ष्मी मार्केटातली रेवडी काय ओ, त्यापेक्षा बसाप्पामधला खाजा अन बर्फी, अन विटा डेरीमधलं श्रीखंड. झालंच तर टौन हॉलजवळची मनोज भेळ अन तासगाव वेस मारुतीजवळची स्टार भेळ. सांगलीत विश्रामबागेतील क्रांती भेळ आणि संभाची भेळ हेही नामांकितच.

कॅप्टन जॅक स्पॅरो नवीन

In reply to by hitesh

होय. खुप वयोवृद्ध आहेत. मुळव्याधीवर जालीम इलाज करतात. बहुतेक आता हयात नसावेत. :(

बॅटमॅन नवीन

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

डागदर जर उपचारादाखल स्ट्रेप्सिल्स देत असतील तर आम्ही आत्ताच्या आत्ता जातो मिरजेस.

श्रीगुरुजी नवीन

In reply to by सूड

>>> झालंच तर माईंच्या ह्यांनी माईंना ज्यादिवशी प्रपोज केलं तो दिवस भारतीय पंचांगांत वसंतपंचमी म्हणून सुरु झाला. मग गोरे लोक आले, त्यांना पंचांग शष्प कळेना. मग त्यांनी वसंतपंचमी चा व्हलेंटाईन डे केला. आहेस कुठे !! आज माईंना त्यांच्या 'ह्यां'च्याकडून व्हॅलेंटाईन दिवसाची काय सिक्रेट गिफ्ट मिळाली असेल याची उत्सुकता आहे.

बॅटमॅन नवीन

In reply to by नाखु

अरे हो की. चुकलंच हां, आयमाय स्वारी. ओसामालाही त्या असेच संबोधत असतील. "मोठे धाडस दाखवलेस हो ओसाम्या. पण तो बुश/क्लिंटन आता तुला सोडायचा नाही. तरी हे म्हणत होते, कशाला अमेरिकेच्या शेपटास हात घालायचा?"

कॅप्टन जॅक स्पॅरो नवीन

In reply to by नाखु

समस्त माई-नाना स्मारक समिती. ओसाड्वाडी,हवाईनगर.
माई-कै.नाना अशी सुधारणा सुचवतो. बाकी ठ्ठो =))

पैसा नवीन

लै भारी प्रश्ण आहेत! नाना-माईचा फार्स संपला असेल तर कोणीतरी उत्तरे द्या बघू!
आंतरराष्ट्रीय बाजार भारतात भरवून संसदेतले सगळे नमुने तिथे विकायला का ठेवत नाही ? जाहीर लिलाव केला तरी चालेल !
याचं उत्तर मला माहित आहे. ते णमुने एकावर एक फ्री दिले तरी णको म्हणतात सगळे!

नाखु नवीन

In reply to by पैसा

आंतरराष्ट्रीय बाजार भारतात भरवून संसदेतले सगळे नमुने तिथे विकायला का ठेवत नाही ? जाहीर लिलाव केला तरी चालेल !
आंतरराष्ट्रीय बाजार हा टाकाऊतून टिकाऊ शोधत असला तरी टिकाऊ (निगरगट्ट्/लोचट) असलेले पण गुणाने "टाकाऊ" कसे घेणार हाही कळीचा प्रश्न आहे !!!

कॅप्टन जॅक स्पॅरो नवीन

In reply to by पैसा

म्या तर ऐकतु की ह्ये णमुणे भार्तात ठेवायसाठी ओबामामामा नी पेश्शल पॅकेज झैर केलयं म्हणुन. खरं खोटं तेलाचं म्हैत!!

स्वामी संकेतानंद नवीन

उत्तरे विषय - स्विस बँक १. नसतो २. नाही. प्रत्यक्ष नाही करत, पण अप्रत्यक्ष होतेच. ३. नाही. ४. त्यांच्या ब्यांकेत खाते उघडायला आवश्यक असलेली कागदपत्रेच लागतात. विषय - आंतरराष्ट्रीय बाजार १. जगभर २. मोलभाव होतो. ३. सध्यातरी. विषय - महागाई १. ऐसा कुच नै बाबा २. असतो. एका मर्यादेपलीकडे महागाई दर जाऊ देणे अर्थव्यवस्थेसाठी मारक असते. ३. स्थिर महागाई दर म्हणजे एका निश्चित, नियंत्रित दराने वाढणारी. ती अर्थव्यवस्थेतली वाढ दर्शवते. ४. मोजतात. डिफ्लेशन दर असतो एक. काही देशांत दिसून येतो. त्यांच्या डोकेदुखीचे कारण आहे ते. विषय -स्विस बँक,आंतरराष्ट्रीय बाजार,महागाई आणी भारत सरकार १. त्या पैशावर व्याज आणि कर मिळणार नाही ना. २. सांगा तुम्ही त्यांना. ३. महागाई मनुष्यप्राणी नाही म्हणून तांत्रिकदृष्ट्या नागरिकत्व देता येत नाही.

सिरुसेरि नवीन

"शनीमारुती मंदिराकडनं नगरपालिकेकडे जाताना वाटेत आशा टॉकीज लागते, चिर्मुरे भट्टीनंतर. ब दर्जाच्या चित्रपटांचे आगार" जग बदलले .. कारण तेथे पुर्वी "वहिनींच्या बांगडया" सारखे चित्रपट लागायचे.

डॉ सुहास म्हात्रे नवीन

काय हे ?! हजारावर वाचने. ३९ प्रतिसाद, पण त्यातले विषयाला धरून जेमतेम २; बाकी बहुतेक सगळे मिरजेच्या गल्लीबोळांतून फिरणारे... पण प्रतिसादकांना त्या गल्ल्यांची चांगलीच माहिती असल्याचे दिसल्याने "गल्ली चुकली" असे पण म्हणता येत नाहीय *unknw*

बॅटमॅन नवीन

In reply to by सिरुसेरि

अगदी अगदी =)) एक सुधारणा फक्तः ते कृपामाई नाही, कॄपामयी उर्फ उच्चारी क्रुपामई आहे.

श्रीगुरुजी नवीन

काही विस्कळीत प्रश्न विषय - स्विस बँक १. स्विस बँकेतला सगळा पैसा काळाचं असतो का ? नाही. २. स्विस बँकवाले ," आमच्या येथे काळे पैसे स्वीकारले जातात" अशी जाहिरात करतात का ? आपल्याकडे येणार्‍या पैशांचा रंग स्विस बँक्स बघत नाहीत. ३. स्विस बँकेची भारतात शाखा आहे का ? आहे. स्विस बँक या नावाची कोणतीही बँक नसून स्वित्झर्लँडमधील बँकांना स्विस बँक्स असे म्हटले जाते. यूबीएस या स्विस बँकेचे भारतात भरपूर व्यवहार आहेत. त्यांची शाखा देखील आहे. ४. स्विस बँकेत खातं उघडायला कुठली कागदपत्र लागतात ? ते खात्याच्या प्रकारावर अवलंबून आहे. विषय - आंतरराष्ट्रीय बाजार १. आंतरराष्ट्रीय बाजार नक्की कुठे भरतो ? कोठेच नाही. कोणत्याही दोन देशांमधील व्यापार हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचाच एक भाग आहे. २. या बाजारात मोलभाव होतो का ? की "एकच भाव" अशी पाटी असते ? भाव या व्यापारातल्या विक्रेता व खरेदीदार देशावर अवलंबून आहे. ३. अमेरिकेचा माल विकला गेला नाही म्हणजे 'आर्थिक मंदी ' असा नियम आहे का ? नाही. विषय - महागाई १. तेलाचे भाव वाढले तरी महागाई वाढते , कमी झाली तरी वाढते, असं का ? फक्त तेलाच्या भावावरच महागाई अवलंबून नसते म्हणून. २. महागाई दराला अप्पर कट ऑफ का नसतो ? मागणी किती वाढेल व पुरवठा किती कमी होईल याला कोणताही कटऑफ नसल्याने महागाई दराला अपर कट ऑफ नसतो. ३. स्थिर महागाई दर म्हणजे काय ? शेवटी महागाई ती महागाईचं ना ? भूतकाळातील एका विशिष्ट तारखेच्या तुलनेत सध्याचे भाव स्थिर असतील तर महागाई दर स्थिर आहे असे समजतात. ४. महागाई दरासारखा 'स्वस्ताई दर' सुद्धा मोजतात का ? की मोजता येत नाही इतका कमी असतो ? स्वस्ताई म्हणजेच महागाईचा उणे दर. विषय -स्विस बँक,आंतरराष्ट्रीय बाजार,महागाई आणी भारत सरकार १. भारत सरकार स्विस बँकेची भारतात शाखा उघडून सगळा काळा पैसा तिथेच का ठेवत नाही ? सरकारकडे काळा पैसा नसतो म्हणून. २. आंतरराष्ट्रीय बाजार भारतात भरवून संसदेतले सगळे नमुने तिथे विकायला का ठेवत नाही ? जाहीर लिलाव केला तरी चालेल ! हे नमुने फुकट मिळाले तरी कोणी घेणार नाही म्हणून. ३. महागाई जर कायमच राहणार असेल तर तिला भारताचे नागरिकत्व देण्यास काय हरकत आहे ? कारण महागाई ही जिवंत नागरिक नाही म्हणून.