हिंदी चित्रपट प्रश्न !
१. अनुष्का शर्मा यांचे किमान दोन हिट चित्रपट सांगा
२. जॉन अब्राहम यांची निर्मिती असलेला चित्रपट सांगा
३. बेला शेंडे, हृतिक रोशन यांचे योगदान असलेला चित्रपट सांगा
४. चलती का नाम गाडी आणि साडे माडे तीन यांच्या कथेमधला किंवा प्रसंगामधला एखादा फरक सांगा
५. श्रीकृष्णाची व्यक्तिरेखा असलेला अलिकडचा हिंदी चित्रपट सांगा
६. अभिनेत्री टूणटूण यांनी गायलेले सुरेल गाणे
७. मुन्नाभाई एम बी बी एस शी साधर्म्य असणारे मराठीतील दोन चित्रपट सांगा. कसे तेही सांगा
८. आशुतोष गोवारीकर यांनी आपल्या काकांच्या व्यक्तिरेखेचा आधार घेऊन काढलेला चित्रपट कोणता
९. राज कपूर आणि पृथ्वीराज कपूर यांच्या वयातले अंतर किती
१०. विमल रॉय यांनी पुनर्जन्मावर काढलेला चित्रपट सांगा
११. विमल रॉय यांच्या काही शिष्य किंवा सह-दिग्दर्शकांची नावे सांगा
१२. मूळात कॅमेरामन असलेल्या दिग्दर्शकांची नावे आणि त्यांचे चित्रपट सांगा
१३. लता मंगेशकर यांना सर्वप्रथम गायनाची संधी देणार्या निर्मात्याचे आडनाव सांगा
१४. दिलीपकुमार यांचे जन्मगाव कोणते
१५. मराठीतल्या 'आई शप्पथ' या चित्रपटाशी हिंदीतल्या कोणत्या चित्रपटाचे साधर्म्य आढळते. स्पष्ट करा.
१६. विजय भट यांचा 'गु' ने सुरु होणारा चित्रपट सांगा
१७. तसेच त्यांच्या नातवाचाही 'गु' ने सुरु होणारा चित्रपट सांगा
१८. गदिमांची पटकथा असलेले हिंदी चित्रपट सांगा
१९. एकाच वर्षी हिंदी व मराठीमधे सर्वात हिट चित्रपटाला संगीत देणारा संगीतकार कोण
२०. सुधीर फडके यांच्या हाताखाली अनेक संगीतकार तयार झाले, त्यांच्याही हाताखाली अनेक संगीतकार तयार झाले. सुधीर फडके ते गदरचे संगीतकार यांच्यातली परंपरा सांगा
२१. सुधीर फडके यांनी संगीत दिलेली हिंदीतली किमान दोन गाणी सांगा
२२. ए आर रेहमान यांचे फ्लॉप चित्रपट सांगा
२३. मुन्नाभाई एमबीबीएस आणि थ्री इडियट्स यांमधील साम्ये सांगा (दिग्दर्शक, निर्माते तर सांगाच पण चित्रपटातली सुद्धा सांगा)
२४. व पु काळे आणि ये जीवन है इस जीवन का या गाण्यातला संबंध स्पष्ट करा
२५. लक्ष्मी प्यारे यांची बडबडगीते न वाटणारी सुरेल गाणी सांगा
२६. परदेशी धर्मीय नटीने भारतीय धर्मीय मनुष्याशी लग्न केले आहे अशी उदाहरणे सांगा
२७. रमेश भाटकर आणि राकेश रोशन यांच्यातले एखादे साम्य सांगा
२८. भालजी पेंढारकर दिग्दर्शक, पृथ्वीराज कपूर अभिनेते असा हिंदी चित्रपट सांगा
२९. घरातून कुणाचाही वारसा नसताना हिंदी चित्रपटात नायक बनलेल्यांची नावे सांगा
आपल्याशी चर्चा केल्याने आमचेही ज्ञान वाढीस लागेल... अशी अपेक्षा आहे करा मग सुरुवात !
ashujog@gamil.com
प्रतिक्रिया
3 Feb 2015 - 12:52 am | आशु जोग
उत्तरे इथे दिली तरी चालतील
3 Feb 2015 - 12:55 am | मुक्त विहारि
तेच केले...
3 Feb 2015 - 12:55 am | मुक्त विहारि
६. अभिनेत्री टूणटूण यांनी गायलेले सुरेल गाणे ====> अफसाना लिख रही हुं...
१०. विमल रॉय यांनी पुनर्जन्मावर काढलेला चित्रपट सांगा ====> मधुमती (युसुफखान उर्फ दिलीप कुमार २ भुमिका, वैजयंती माला ३ भुमिका)
११. मूळात कॅमेरामन असलेल्या दिग्दर्शकांची नावे आणि त्यांचे चित्रपट सांगा ====> नरीमन इराणी (डॉन १९७८...उर्फ कालिचरणचे विडंबन)
3 Feb 2015 - 1:09 am | पिवळा डांबिस
फोटो आवडला, प्रश्नांना पास
कारण त्याचे एकच खास
उत्कट ते घ्यावे,बाकीचे टाकावे
शिकवून गेले समर्थ रामदास!!!
:)
ह. घ्या...
3 Feb 2015 - 1:32 am | स्वप्नांची राणी
५. ओह माय गॉड
२६. कटरीना कैफ करणार आहे म्हणे रणबीर कपूरशी!
बाकी माझा पण पास. आणि र्हितिक रोशन चा फोटो द्यावा ही विनंती म्हणजे बाकी उत्तरांसाठी थोडे इन्स्पिरेशन मिळेल.
3 Feb 2015 - 1:43 am | अत्रुप्त आत्मा
बेला शेंडे, हृतिक रोशन यांचे योगदान =)))))
3 Feb 2015 - 2:14 am | रेवती
३. जोधा अकबर शिनेमातील भजन.
८. स्वदेस
3 Feb 2015 - 9:45 am | आशु जोग
रेवतीताई
स्वदेस मधे बेला आहे पण हृतिक !
3 Feb 2015 - 4:59 pm | रेवती
जोधा अकबर शिनेमात ऋत्विक रोषन आहे व त्याच शिनेमात बेला शेंडे या गायिकेने म्हटलेले भजन आहे.
3 Feb 2015 - 10:17 pm | आशु जोग
होय तुमचे बरोबर आहे
मी दोन्ही एकत्र वाचले
म्हणून माझा गोन्धळ झाला
3 Feb 2015 - 2:20 am | सानिकास्वप्निल
पीके
जब तक है जान
विकी डोनर
स्वदेस .
पेशावर
गुंज उठी शहनाई
गुलाम
ज्योती कलश छलके - एकच आठवतय ...
जेनिफर केंडल - शशी कपूर
शाहरुख खान
अक्षयकुमार
नवाझुद्दिन सिद्दिकी
सुशांत सिंग
4 Feb 2015 - 1:50 pm | आशु जोग
खूपच प्रश्नांची उत्तरे दिलीत... छान
3 Feb 2015 - 7:49 am | अत्रन्गि पाउस
१. खुश है जमाना आज पहेली तारीख है
२. जीवन डोर तुम्ही संग बांधी
३. ज्योती कलश छलके
3 Feb 2015 - 7:50 am | अत्रन्गि पाउस
मद्रास कॅफे
3 Feb 2015 - 8:48 am | हुप्प्या
१२. हृषिकेश मुखर्जी हे आधी कॅमेरामन होते. मग दिग्दर्शक. सिनेमे आनंद, नमक हराम, अभिमान, गोलमाल, नरम गरम, रंगबिरंगी इ.
२४. ये जीवन है हे पिया का घर ह्या सिनेमातले गाणे आहे. हा सिनेमा मुंबईचा जावई ह्या मराठी सिनेमावर आधारित होता. हा सिनेमा व. पु. काळ्यांच्या कथेवर आधारित होता.
२६. परदेशी धर्मीय म्हणजे काय? भारतीय धर्मीय म्हणजे काय?
२७. रमेश भाटकर आणि राकेश रोशन ह्या दोघांचे वडिल संगीतकार होते.
3 Feb 2015 - 9:44 am | बोका-ए-आझम
ह्रषिकेश मुखर्जी कॅमेरामन नाही, संकलक होते. जशी बिमलदांनी कॅमेरामन-दिग्दर्शक ही परंपरा सुरु केली, तशी ह्रषिदांनी संकलक-दिग्दर्शक ही परंपरा सुरु केली.
3 Feb 2015 - 11:33 am | हुप्प्या
http://en.wikipedia.org/wiki/Hrishikesh_Mukherjee
3 Feb 2015 - 4:25 pm | आशु जोग
बरोबर हुप्प्याजी
व पु काळे यांची मासिकात प्रसिद्ध झालेली कथा होती 'कुचंबणा' त्यावर मुंबईचा जावई, त्यावर पिया का घर
3 Feb 2015 - 9:15 am | बोका-ए-आझम
१. अनुष्का शर्मा यांचे किमान दोन हिट चित्रपट सांगा
रब ने बना दी जोडी, बँड बाजा बारात,पीके
२. जॉन अब्राहम यांची निर्मिती असलेला चित्रपट सांगा
विकी डोनर, मद्रास कॅफे
३. बेला शेंडे, हृतिक रोशन यांचे योगदान असलेला चित्रपट सांगा
४. चलती का नाम गाडी आणि साडे माडे तीन यांच्या कथेमधला किंवा प्रसंगामधला एखादा फरक सांगा
५. श्रीकृष्णाची व्यक्तिरेखा असलेला अलिकडचा हिंदी चित्रपट सांगा
६. अभिनेत्री टूणटूण यांनी गायलेले सुरेल गाणे
अफसाना लिख रही हूँ - चित्रपट दर्द, संगीतकार नौशाद, गीतकार - प्रेम धवन
७. मुन्नाभाई एम बी बी एस शी साधर्म्य असणारे मराठीतील दोन चित्रपट सांगा. कसे तेही सांगा
८. आशुतोष गोवारीकर यांनी आपल्या काकांच्या व्यक्तिरेखेचा आधार घेऊन काढलेला चित्रपट कोणता
स्वदेस
९. राज कपूर आणि पृथ्वीराज कपूर यांच्या वयातले अंतर किती
१०. विमल रॉय यांनी पुनर्जन्मावर काढलेला चित्रपट सांगा
मधुमती
११. विमल रॉय यांच्या काही शिष्य किंवा सह-दिग्दर्शकांची नावे सांगा
ह्रषिकेश मुखर्जी, बासु भट्टाचार्य (जावई)
१२. मूळात कॅमेरामन असलेल्या दिग्दर्शकांची नावे आणि त्यांचे चित्रपट सांगा
बिमल राॅय - बंदिनी, सुजाता, देवदास
अशोक मेहता - मोक्ष
संतोष सिवन - अशोका
१३. लता मंगेशकर यांना सर्वप्रथम गायनाची संधी देणार्या निर्मात्याचे आडनाव सांगा
जोगळेकर (आपकी सेवामे चे निर्माते वसंत जोगळेकर.)
१४. दिलीपकुमार यांचे जन्मगाव कोणते
पेशावर
१५. मराठीतल्या 'आई शप्पथ' या चित्रपटाशी हिंदीतल्या कोणत्या चित्रपटाचे साधर्म्य आढळते. स्पष्ट करा.
१६. विजय भट यांचा 'गु' ने सुरु होणारा चित्रपट सांगा
१७. तसेच त्यांच्या नातवाचाही 'गु' ने सुरु होणारा चित्रपट सांगा
१८. गदिमांची पटकथा असलेले हिंदी चित्रपट सांगा
१९. एकाच वर्षी हिंदी व मराठीमधे सर्वात हिट चित्रपटाला संगीत देणारा संगीतकार कोण
२०. सुधीर फडके यांच्या हाताखाली अनेक संगीतकार तयार झाले, त्यांच्याही हाताखाली अनेक संगीतकार तयार झाले. सुधीर फडके ते गदरचे संगीतकार यांच्यातली परंपरा सांगा
२१. सुधीर फडके यांनी संगीत दिलेली हिंदीतली किमान दोन गाणी सांगा
ज्योति कलश छलके - भाभी की चूडियां,
बांध प्रीती फुलडोर - मालती माधव
२२. ए आर रेहमान यांचे फ्लॉप चित्रपट सांगा
तहजीब
२३. मुन्नाभाई एमबीबीएस आणि थ्री इडियट्स यांमधील साम्ये सांगा (दिग्दर्शक, निर्माते तर सांगाच पण चित्रपटातली सुद्धा सांगा)
२४. व पु काळे आणि ये जीवन है इस जीवन का या गाण्यातला संबंध स्पष्ट करा
२५. लक्ष्मी प्यारे यांची बडबडगीते न वाटणारी सुरेल गाणी सांगा
२६. परदेशी धर्मीय नटीने भारतीय धर्मीय मनुष्याशी लग्न केले आहे अशी उदाहरणे सांगा
जेनिफर केंडाॅल - शशी कपूर
२७. रमेश भाटकर आणि राकेश रोशन यांच्यातले एखादे साम्य सांगा
दोघेही डोक्यात जातात!
२८. भालजी पेंढारकर दिग्दर्शक, पृथ्वीराज कपूर अभिनेते असा हिंदी चित्रपट सांगा
२९. घरातून कुणाचाही वारसा नसताना हिंदी चित्रपटात नायक बनलेल्यांची नावे सांगा
राजेश खन्ना, शाहरुख खान
3 Feb 2015 - 4:22 pm | आशु जोग
संतोष सिवन यांचे नाव वाचून बरे वाटले
अलिकडे त्यांचा तहान नावाचा एक चित्रपट आला होता.
लॉरेन्स डिसूझा - साजन
3 Feb 2015 - 5:03 pm | क्लिंटन
दिलीपकुमारचा जन्म कुठे झाला या प्रश्नाचे सोडून इतर एकाही प्रश्नाचे उत्तर मला माहित नव्हते. टुण्टुण नावाची कोणी अभिनेती आहे हे ही मला माहित नव्हते.
(एक नंबरचा रूक्ष) क्लिंटन
3 Feb 2015 - 5:28 pm | तुषार काळभोर
खरोखरच रुक्ष ब्वॉ तुमी!!
4 Feb 2015 - 11:26 pm | आशु जोग
उरलेले प्रश्नही पहा ना !
6 Feb 2015 - 12:01 am | आशु जोग
7
9
15
18
19
23
25
28
हे प्रश्न राहीलेच की
प्रयत्न करा
धमकी : -अन्यथा राहिलेल्या प्रश्नांसाठी मी नवा धागा काढेन
3 Feb 2015 - 6:35 pm | चौकटराजा
वपुंच्या कथेवर प्रथम मराठीत मुंबईचा जावई हा चित्रपट निघाला मग अनिल धवन , जया भादुरी यांचा पिया का घर निघाला. त्यात हे गीत आहे ये जीवन हे, इस जीवनका यही है यजी है रंगरूप......
3 Feb 2015 - 10:26 pm | अत्रन्गि पाउस
अफसाना लिख रही हुं ...हे उमा देवीने म्हटलेले आहे ...
तेव्हा उमादेवी tuntun म्हणून ओळखली जात नव्हती
3 Feb 2015 - 10:42 pm | आशु जोग
म्हणजे तेव्हाचा तिचा मिपा आय डी वेगळा होता तर
4 Feb 2015 - 4:01 pm | पहिला राजा
उत्तर नंतर , आधी माझा पण १ सोप्पा प्रश्न :
तुम्हाला हे सगळे प्रश्न का पडले ?????
( केव्हा नाही, कारण वेळ ००.४५ दिसते आहे , इतक्या रात्री पर्यंत जागरण केले तरच असे विचार (कम प्रश्न) येऊ शकतात अशी आमची १ शक्यता
4 Feb 2015 - 4:06 pm | जेपी
सारे च्या सारे बाजुला व्हा रे ...
आला रे आला राजा....
6 Feb 2015 - 2:17 am | आदूबाळ
जीवनज्योति
दो आँखे बाराह हाथ
6 Feb 2015 - 2:20 am | आदूबाळ
वसंत देसाई, अण्णा चितळकर यापैकीच उत्तर असणार
6 Feb 2015 - 9:08 am | आशु जोग
आदूबाळ
चित्रपट सुद्धा सांगा
6 Feb 2015 - 4:19 pm | तुषार काळभोर
??
6 Feb 2015 - 4:24 pm | आदूबाळ
चितळकर, देसाई आणि (काही प्रमाणात) राम वाईरकर हेच एका वेळी मराठी + हिंदी चित्रपटांना संगीत देत असत. त्यावरून केलेला अंदाज आहे.
6 Feb 2015 - 11:52 pm | टवाळ कार्टा
अजय - अतुल??
7 Feb 2015 - 12:44 am | आशु जोग
अजय - अतुल?? असतील तर चित्रपटही सांगा
चितळकर असतील तरी चित्रपट सांगा...
वरचे काही प्रश्न सोडवल्यास आपोआप उत्तर मिळू शकेल
7 Feb 2015 - 2:05 am | अर्धवटराव
हिंदी - अग्नीपथ
मराठी.. बक्कळ आहेत कि.
7 Feb 2015 - 4:52 pm | आशु जोग
कुठले वर्ष कोणते चित्रपट
बा द वे
पृथ्वी आणि राज हेही कोणी उत्तरलेले नाही
7 Feb 2015 - 1:27 am | आदूबाळ
पॉइंट आहे.
10 Feb 2015 - 3:46 pm | तुषार काळभोर
१८ वर्षे फक्त
10 Feb 2015 - 4:33 pm | आशु जोग
ग्रेट
15 Feb 2015 - 2:11 pm | प्रदीप
लक्ष्मी प्यारे यांची बडबडगीते न वाटणारी सुरेल गाणी सांगा
म्हणजे नक्की काय हवे आहे, कृपया सोदाहरण खुलासा करावा. (बहुधा बडबडगीते म्हणजे 'सावन का महिमा' च्या ठेक्याची त्यांची गाणी तुम्हाला अभिप्रेत असावीत ?)
15 Feb 2015 - 2:15 pm | प्रदीप
प्रश्नः सुरेल म्हणजे नक्की काय अभिप्रेत आहे? माझ्या व्याख्येनुसार जे सुरात आहे, ते सुरेल. तसे अभिप्रेत असेल तर बरेच काही सांगता येईल. अथवा 'सुरेल' म्हणजे 'छान चाल असलेली' अशापैकी काही व्याख्या असेल तर उत्तर अर्थात अशक्य आहे, कारण 'छान चाल' हे अगदी सब्जेक्टिव्ह प्रकरण आहे.
16 Feb 2015 - 12:32 am | आशु जोग
उपरवाला वेरी गूड वेरी गूड असली गाणी म्हणजे बडबडगीत
.