हिंदी चित्रपट प्रश्न आशु जोग · Tue, 02/03/2015 - 00:45 · जनातलं, मनातलं चित्रपट लेखनप्रकार प्रश्नोत्तरे हिंदी चित्रपट प्रश्न ! १. अनुष्का शर्मा यांचे किमान दोन हिट चित्रपट सांगा २. जॉन अब्राहम यांची निर्मिती असलेला चित्रपट सांगा ३. बेला शेंडे, हृतिक रोशन यांचे योगदान असलेला चित्रपट सांगा ४. चलती का नाम गाडी आणि साडे माडे तीन यांच्या कथेमधला किंवा प्रसंगामधला एखादा फरक सांगा ५. श्रीकृष्णाची व्यक्तिरेखा असलेला अलिकडचा हिंदी चित्रपट सांगा ६. अभिनेत्री टूणटूण यांनी गायलेले सुरेल गाणे ७. मुन्नाभाई एम बी बी एस शी साधर्म्य असणारे मराठीतील दोन चित्रपट सांगा. कसे तेही सांगा ८. आशुतोष गोवारीकर यांनी आपल्या काकांच्या व्यक्तिरेखेचा आधार घेऊन काढलेला चित्रपट कोणता ९. राज कपूर आणि पृथ्वीराज कपूर यांच्या वयातले अंतर किती १०. विमल रॉय यांनी पुनर्जन्मावर काढलेला चित्रपट सांगा ११. विमल रॉय यांच्या काही शिष्य किंवा सह-दिग्दर्शकांची नावे सांगा १२. मूळात कॅमेरामन असलेल्या दिग्दर्शकांची नावे आणि त्यांचे चित्रपट सांगा १३. लता मंगेशकर यांना सर्वप्रथम गायनाची संधी देणार्या निर्मात्याचे आडनाव सांगा १४. दिलीपकुमार यांचे जन्मगाव कोणते १५. मराठीतल्या 'आई शप्पथ' या चित्रपटाशी हिंदीतल्या कोणत्या चित्रपटाचे साधर्म्य आढळते. स्पष्ट करा. १६. विजय भट यांचा 'गु' ने सुरु होणारा चित्रपट सांगा १७. तसेच त्यांच्या नातवाचाही 'गु' ने सुरु होणारा चित्रपट सांगा १८. गदिमांची पटकथा असलेले हिंदी चित्रपट सांगा १९. एकाच वर्षी हिंदी व मराठीमधे सर्वात हिट चित्रपटाला संगीत देणारा संगीतकार कोण २०. सुधीर फडके यांच्या हाताखाली अनेक संगीतकार तयार झाले, त्यांच्याही हाताखाली अनेक संगीतकार तयार झाले. सुधीर फडके ते गदरचे संगीतकार यांच्यातली परंपरा सांगा २१. सुधीर फडके यांनी संगीत दिलेली हिंदीतली किमान दोन गाणी सांगा २२. ए आर रेहमान यांचे फ्लॉप चित्रपट सांगा २३. मुन्नाभाई एमबीबीएस आणि थ्री इडियट्स यांमधील साम्ये सांगा (दिग्दर्शक, निर्माते तर सांगाच पण चित्रपटातली सुद्धा सांगा) २४. व पु काळे आणि ये जीवन है इस जीवन का या गाण्यातला संबंध स्पष्ट करा २५. लक्ष्मी प्यारे यांची बडबडगीते न वाटणारी सुरेल गाणी सांगा २६. परदेशी धर्मीय नटीने भारतीय धर्मीय मनुष्याशी लग्न केले आहे अशी उदाहरणे सांगा २७. रमेश भाटकर आणि राकेश रोशन यांच्यातले एखादे साम्य सांगा २८. भालजी पेंढारकर दिग्दर्शक, पृथ्वीराज कपूर अभिनेते असा हिंदी चित्रपट सांगा २९. घरातून कुणाचाही वारसा नसताना हिंदी चित्रपटात नायक बनलेल्यांची नावे सांगा आपल्याशी चर्चा केल्याने आमचेही ज्ञान वाढीस लागेल... अशी अपेक्षा आहे करा मग सुरुवात ! ashujog@gamil.com वाचन 15898 प्रतिक्रिया 44