प्रेमही जरुरीपुरतंच करावं...
सोयीचं आहे, आवडीचं आहे म्हणून
जास्त करत गेल्यास
त्यची सवय होते
आणि ती वाढत वाढत जाऊन
शेवटी त्याचं व्यसन होतं...
व्यसन कोणतंही वाईटच...
आधी ज्या गोष्टीचं व्यसन, त्याची तल्लफ येते,
मग हळूहळू त्याची अधिकाधिक मात्रा आवश्यक वाटते
न मिळाल्यास विथड्रॉवल सिम्प्टम्स
आणि सर्वांत भयानक म्हणजे
एका व्यसनासोबत अनेक व्यसनांची
आधी चटक आणि मग सोबत...
प्रेमही जरुरीपुरतंच करावं...
सोयीचं आहे, आवडीचं आहे म्हणून
आहारी जाऊ नये...
प्रतिक्रिया
17 Oct 2014 - 9:56 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तब्येतीची काळजी घ्या. व्यसनाच्या आहारी जाऊ नका. :)
प्रेम असं जरुरीपुरतं करता येत असतं का ?
(जो या फंदात पडला तो मेलाच इतकं कळतं मला)
-दिलीप बिरुटे
17 Oct 2014 - 10:27 am | खटपट्या
हो सरांच बरोबरे !! उद्या म्हणाल लग्न जरूरीपुरताच करा म्हणून :)
ह. घ्या.
17 Oct 2014 - 4:03 pm | संजय क्षीरसागर
बॉल पार स्टेडियम बाहेर टोलवला आहे *smile*
तुमच्या कल्पनेतली कविता अशी होईल :
लग्न जरुरीपुरतंच करावं...
सोयीचं आहे, आवडीचं आहे म्हणून.
जास्त करत गेल्यास
त्यची सवय होते
आणि ती वाढत वाढत जाऊन
शेवटी त्याचं व्यसन होतं...
17 Oct 2014 - 4:11 pm | माम्लेदारचा पन्खा
जळी स्थळी काष्ठी पाषाणी मीच दिसतोय का हो तुम्हाला?
खटपट्याना काय वाटेल मग?
17 Oct 2014 - 4:17 pm | संजय क्षीरसागर
द क्रेडिट गोज टू खटपटराव!
17 Oct 2014 - 4:23 pm | पैसा
हे काय णवीण? तुम्ही ओशो भगवानाचे अवतार आहात का काय?
17 Oct 2014 - 4:32 pm | माम्लेदारचा पन्खा
बादवे... आशारामने पण तेच केलं जे ओशोनी सांगितलं...पण त्यानं थीअरी कमी आणि प्रात्यक्षिक जास्त दाखवलं ...
17 Oct 2014 - 11:01 am | माम्लेदारचा पन्खा
वरून कितीही नाही म्हटलं तरी
मनात तुझ्याच प्रेमाची ओढ आहे
इत र कोणत्याही व्यसनापेक्षा
हे व्यसन कितीतरी गोड आहे !
17 Oct 2014 - 11:44 am | रुमानी
मस्त@ माम्लेदारचा पन्खा....!
17 Oct 2014 - 1:08 pm | सस्नेह
*smile*