मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रेमही जरुरीपुरतंच करावं...

अजब · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
प्रेमही जरुरीपुरतंच करावं... सोयीचं आहे, आवडीचं आहे म्हणून जास्त करत गेल्यास त्यची सवय होते आणि ती वाढत वाढत जाऊन शेवटी त्याचं व्यसन होतं... व्यसन कोणतंही वाईटच... आधी ज्या गोष्टीचं व्यसन, त्याची तल्लफ येते, मग हळूहळू त्याची अधिकाधिक मात्रा आवश्यक वाटते न मिळाल्यास विथड्रॉवल सिम्प्टम्स आणि सर्वांत भयानक म्हणजे एका व्यसनासोबत अनेक व्यसनांची आधी चटक आणि मग सोबत... प्रेमही जरुरीपुरतंच करावं... सोयीचं आहे, आवडीचं आहे म्हणून आहारी जाऊ नये...

वाचने 2407 वाचनखूण प्रतिक्रिया 10

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 17/10/2014 - 09:56
तब्येतीची काळजी घ्या. व्यसनाच्या आहारी जाऊ नका. :) प्रेम असं जरुरीपुरतं करता येत असतं का ? (जो या फंदात पडला तो मेलाच इतकं कळतं मला) -दिलीप बिरुटे

In reply to by खटपट्या

संजय क्षीरसागर 17/10/2014 - 16:03
उद्या म्हणाल लग्न जरूरीपुरताच करा म्हणून
बॉल पार स्टेडियम बाहेर टोलवला आहे *smile* तुमच्या कल्पनेतली कविता अशी होईल : लग्न जरुरीपुरतंच करावं... सोयीचं आहे, आवडीचं आहे म्हणून. जास्त करत गेल्यास त्यची सवय होते आणि ती वाढत वाढत जाऊन शेवटी त्याचं व्यसन होतं...

In reply to by संजय क्षीरसागर

माम्लेदारचा पन्खा 17/10/2014 - 16:11
जळी स्थळी काष्ठी पाषाणी मीच दिसतोय का हो तुम्हाला? खटपट्याना काय वाटेल मग?

In reply to by माम्लेदारचा पन्खा

संजय क्षीरसागर 17/10/2014 - 16:17
द क्रेडिट गोज टू खटपटराव!

In reply to by माम्लेदारचा पन्खा

पैसा 17/10/2014 - 16:23
हे काय णवीण? तुम्ही ओशो भगवानाचे अवतार आहात का काय?

In reply to by पैसा

माम्लेदारचा पन्खा 17/10/2014 - 16:32
बादवे... आशारामने पण तेच केलं जे ओशोनी सांगितलं...पण त्यानं थीअरी कमी आणि प्रात्यक्षिक जास्त दाखवलं ...

माम्लेदारचा पन्खा 17/10/2014 - 11:01
वरून कितीही नाही म्हटलं तरी मनात तुझ्याच प्रेमाची ओढ आहे इत र कोणत्याही व्यसनापेक्षा हे व्यसन कितीतरी गोड आहे !