मनमोहक बाली : ०८ : बारोंग लोकनाट्य आणि बाली सफारी पार्क

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
5 Jul 2014 - 6:14 pm

===================================================================

मनमोहक बाली : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९(समाप्त)...

===================================================================

...किनारपट्टीने पायवाटेवरून फिरून मंदिराला अनेक कोनांतून आणि मावळत्या सूर्याच्या अनेक छटांत पाहताना वेळ कसा जातो ते कळतच नाही. शेवटी तो सोन्याचा गोळा समुद्रात पूर्णपणे बुडून गेल्यावर झालेला काळोखच आपल्याला धक्के मारून तेथून बाहेर काढतो.

चवथ्या दिवसाची सकाळ जरा उत्सुकतेतच उजाडली. कारण आज बालीचे पारंपरिक बारोंग लोकनाट्य बघायला जायचे होते. दोन दिवसापूर्वी पारंपरिक केचक नृत्यनाट्याने चकीत केले होते. म्हणून उत्सुकता अधिकच वाढली होती.

न्याहरी घ्यायला गेलो तर तेथे टेबलावर उभा असलेला हा गरूडराज समोर आला...

.

बाहेर पडून प्रवास सुरू झाला. सर्वसाधारण रस्त्यावरून जातानाही बालीचे निसर्गाशी असलेले निरागस नाते सतत पुढे येत राहिले...


बारोंग लोकनाट्य

बारोंग नाटकाच्या रंगमंदिरावर पोहोचलो. त्याच्या आवारातून फिरताना बालीच्या कलाकुसरीचे काही नमुने दिसले...

.

आम्ही वेळेवर पोहोचलो होतो. अगदी रोजच्या वापरातल्या वस्तू वापरून आणि सर्वसाधारण घराच्या अंगणात उभारला आहे असे वाटणारा पण तरीही आकर्षक दिसणारा रंगमंच होता. हळूहळू प्रेक्षकगण जमा होऊ लागला होता...

थोड्याच वेळात वाद्यवृंदही आपल्या जागेवर स्थानापन्न झाला. गंमत म्हणजे त्यांचा बसण्याच्या जागेला एक खराखुरा वृक्ष ढुशी देत होता. निसर्गाशी समरसता असून, असून नक्की किती असू शकेल याचा आपला अंदाज बाली पदोपदी सुखकारक रितीने चुकीचा ठरवत राहते ! ...

बालीच्या पौराणिक कथांत बारोंग हा सत्प्रवृत्तीचे प्रतिनिधित्व करणारा काहीसा सिंहासारखा दिसणारा दैवी प्राणी आहे. त्याविरुद्ध दुष्ट प्रवृत्तींचे प्रतिनिधित्व करणारी रांगदा ही असुरांची राणी आहे. बारोंगमध्ये या दोन प्रवृत्तींचा चाललेला अनादी आणि अनंत झगडा नाटकाच्या रूपात प्रदर्शित केला जातो. कथेत रंग भरायला बारोंगच्या साथीला दोन माकडे असतात आणि रांगदाच्या बरोबर दोन राक्षसी दासी असतात. हे सर्व नाट्य राजा, राणी आणि राजपुत्र यांच्या जीवनात रांगदाने चालवलेली असुरी ढवळाढवळ आणि बारोंगची त्याना होणारी मदत या मुख्य सुत्रावर बेतलेले आहे. त्यामध्ये "राजावर मुलाचा बळी देण्याची वेळ येणे", "राजपुत्राच्या शिवभक्तीमुळे ऐन वेळेला शिवाने प्रकट होऊन त्याचे रक्षण करणे", इत्यादी भारतियांना सहजसाम्य वाटणारे प्रसंग आहेत. बालिनीज भाषेमध्ये होणारे हे लोकनाट्य प्रेक्षकांना नीट समजावे म्हणून इंग्लिशमध्ये लिहिलेली त्याच्या संहितेची प्रत दिलेली असते. शिवाय मधून मधून इंग्लिशमध्ये केल्या जाणार्‍या टिप्पणीने लोकनाट्य समजायला काही अडचण पडत नाही. आकर्षक रंगीबेरंगी वेष, सुंदर नेपथ्य आणि मधून मधून असलेल्या विनोदी विरंगुळ्यामुळे हे लोकनाट्य बघायला खूप मजा येते.

चला तर, बघूया या लोकनाट्यातील काही क्षणचित्रे...


बारोंग

.

.

.

.

.

.

.

या लोकनाट्याचे मला वाटलेले विशेष म्हणजे जरी त्याची कथा चांगल्या-वाईटाच्या झगड्याबद्दल असली तरी ती "चांगल्याचा विजय, वाईटाचा पराजय आणि मग सगळे आलबेल" अश्या नेहमीच्या बाळबोध कल्पनाविलासाने संपत नाही. रांगदाला त्याच्या वाईट वागण्याचा पश्चात्ताप होतो आणि त्याचा बारोंगच्या हाती वध होतो... पण रांगदाचा एक सेवक त्याची जागा घेतो आणि चांगल्या-वाईटाचा झगडा अनंत कालासाठी चालूच राहतो अश्या वास्तविक संदेशाबरोबर हे लोकनाट्य संपते. प्राचीन काळापासून चालत आलेल्या या लोकनाट्यातील ही प्रगल्भता चकित करून जाते !

बाली सफारी पार्क

बारोंग लोकनाट्याची मजा मनात घोळवत बालीच्या नयनरम्य परिसरातून आमचा प्रवास पुढच्या आकर्षणाकडे सुरू झाला. सफारी पार्क म्हणजे प्राणिसंग्रहालयापेक्षा जास्त काय असू शकते अश्या विचाराने रुपरेखेत हा कार्यक्रम आम्ही जरासा मागेच सरकवला होता. पण नंतर तो चुकवला नाही त्याबद्दल स्वत:चे आणि कार्तिकचे आभार मानले. शिवाय पार्कच्या आवारात असलेल्या बालीतल्या एका खास आकर्षणामुळे ती भेट फारच संस्मरणीय झाली ते वेगळे. ते खास आकर्षण पुढच्या भागात येईलच. बाली सफारी पार्कचे संपूर्ण नाव "बाली सफारी आणि मरीन पार्क" असे आहे... "मरीन" भाग केवळ नावापुरताच आहे, पण सफारी भाग मात्र जागतिक तोडीचा आहे.

येथे प्राणिसंग्रहालयाबरोबरच संपूर्ण कुटुंबासह मजेत वेळ घालविण्यासाठी अनेक मनोरंजक क्रीडाविभाग, जलक्रीडा विभाग, प्राण्यांबरोबर खेळ / सफारीसाठी विभाग, प्राणिनाट्यमंच, राहण्याची सोय असणार्‍या झोपड्या / बंगले आणि या सगळ्याची मजा घेत असताना लागणार्‍या भुकेची चमचमीत सोय पाहणारी अनेक रेस्तराँ आहेत.

इथल्या प्राणिसंग्रहालयाचा विशेष म्हणजे इथे प्राणी विशाल जंगलसदृश्य भागांत आरामात मोकळे राहतात आणि त्यांना बघायला येणार्‍या पर्यटकांना बंदिस्त बसमधून फिरून त्यांचे दर्शन करावे लागते. जगभरचे प्राणी येथे त्यांच्या मूळ स्थानाच्या खंडांची नावे दिलेल्या वेगवेगळ्या विभागात राहतात. मार्गदर्शकासह असलेली बससेवा आपल्याला सगळ्या प्राणिसंगहालयाचा फेरफटका मारून आणते. एक भाग प्राण्यांची खास प्रदर्शने आणि प्राण्यांवर बसून करण्याच्या सफारीसाठी राखून ठेवलेला आहे. रात्रीच्या, शैक्षणिक आणि प्राणिसंरक्षणासंबद्धी खास सफारीही असतात. एकंदरीत केवळ "प्राणिसंग्रहालयाची चक्कर" असे नसून "दिवसभर प्राणी-पक्षांच्या सहवासात मजेत दिवस घालवायचे आणि त्याबरोबरच काही माहितीची शिदोरी बरोबर घेऊन परतायचे ठिकाण" असे या पार्कचे स्वरूप आहे.

चला तर फेरफटका मारायला या सफारी पार्कमध्ये. सर्वात प्रथम आम्ही प्राणिनाट्यगृहाकडे मोर्चा वळवला...


प्राणी-पक्षी-नाट्यगृह

.


सर्पकन्या

.


ओरांगउटान आणि त्याची मैत्रीण

.


खास मैत्रिणीने सांगितल्यावर त्या ओरांगउटानने मिनीटाभरात अख्खा नारळ सोलून दिला तर नवल काय !

.


सुमात्राच्या हत्तींचे खेळ

.


पांढरा वाघ

.


अस्वल

.


सुमात्राचे वाघोबा

.


हिप्पो

.


विल्डsबीस्ट / नू

.


आरामात निगुतीने बसून पावसाचा आनंद लुटणारे सिंहकुटुंब

.


वेगवेगळ्या रंगांचे जिराफ

.


झेब्रा

.


तीनरंगी झेब्रा

.


आफ्रिकन खिल्लार

.

"पुरा सफारी" या नावाप्रमाणेच या पार्कच्या एका भागात हिंदू उपासना करण्यासाठी मंदिर आहे...


पुरा सफारीचे कोरी अगुंग

.

सफारी पार्कच्या संस्थळावरील चलत्चित्रफीत...

.

बाली पार्कमधल्या गणेश पार्क नावाच्या विभागात "बाली थिएटर" आहे. त्याच्या प्रवेशव्दाराजवळ कला आणि शास्त्र यांच्या देवतेची (हे त्यांचे वर्णन आहे) ८ मीटर उंचीची बैठी मूर्ती आहे...


गणेश पार्कच्या प्रवेशव्दाराजवळील गणेशमूर्ती

बाली थिएटरमध्ये असलेल्या भव्य मंचावर "बाली अगुंग" नावाचे महानाट्य सादर केले जाते. त्याची माहिती आपण पुढच्या भागात घेऊ...

(क्रमश: )

===================================================================

मनमोहक बाली : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९(समाप्त)...

=================================================================== 

प्रतिक्रिया

दिपक.कुवेत's picture

5 Jul 2014 - 9:09 pm | दिपक.कुवेत

असो नेहमीप्रमाणेच वर्णनासहित फोटोहि मस्त आलेत. बाय द वे ती चित्रफित पाहुन तुमची भेट संस्मरणीय का झाली त्याचा अंदाज आलाय. आत्ताच बोलत नाहि नाहितर माझा पोपट व्हायचा. पुढच्या भागात बघतो माझा अंदाज खरा निघतोय का???

खटपट्या's picture

5 Jul 2014 - 9:40 pm | खटपट्या

सर्वच फोटो अप्रतिम !!
पहिल्या फोटोत तर अस वाटतंय कि गरुड महाराज आता लगेच समोरच खाउन फस्त करतील.
चित्रफित एकदम झकास
माझे ठरलंय - नेक्स्ट डेस्टिनेशन बाली !!!

रेवती's picture

5 Jul 2014 - 11:46 pm | रेवती

वाह! भारीच!
दिपक कुवेतकर, मी बघितली चित्रफित पण अंदाज आला नाही. आता उत्सुकता लागून राहिलीये.
सफारी म्हणजे मुलांना मजा आहे हे नक्की!

दिपक.कुवेत's picture

6 Jul 2014 - 11:02 am | दिपक.कुवेत

माझा काय अंदाज आहे त्याचा व्यनी केलाय.

मधुरा देशपांडे's picture

6 Jul 2014 - 12:57 am | मधुरा देशपांडे

बालीचा निसर्ग आणि संस्कृती सगळ्याचे छान दर्शन घडते आहे. हाही भाग छानच.

आयुर्हित's picture

6 Jul 2014 - 1:15 am | आयुर्हित

अतिशय सुंदर फोटो व वॄत्तांत.

प्रणाम बालीकरांना त्यांच्या निंसर्गप्रेमाबद्दल.
बाली म्हणजे कल्पकता व कलाकुसरीचा कळस!

आवडले .फोटोसह वर्णनामुळे मजा येतेय .

प्रचेतस's picture

6 Jul 2014 - 9:30 am | प्रचेतस

मस्त.
सफारी पार्क जाम भारी आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Jul 2014 - 12:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

दिपक.कुवेत, खटपट्या, रेवती, मधुरा देशपांडे, आयुर्हित, कंजूस आणि वल्ली : सर्वांना अनेक धन्यवाद !

अत्रुप्त आत्मा's picture

6 Jul 2014 - 5:22 pm | अत्रुप्त आत्मा

ह्यो भाग पण मस्त!

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Jul 2014 - 10:58 am | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

नेहमीचीच प्रतिक्रिया. समजून घेणे.

(बाकी तुमच्या लिखाणाचा कॉपीराईट घेऊन ठेवा कृपया. आज ईसकाळमध्ये व्हिएतनामबद्दलचा लेख वाचला. अगदीच तुमचं लिखाण वाचतोय असं वाटलं. http://online4.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4627620368812804344&Se...(%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B0) )

प्यारे१'s picture

6 Jul 2014 - 8:46 pm | प्यारे१

http://online4.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4627620368812804344&Se...(%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B0)

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Jul 2014 - 11:10 am | डॉ सुहास म्हात्रे

व्हिएतनाम सुंदर आणि विविधतेने भरलेला देश आहे. या लांबूळक्या देशाच्या उत्तर आणि दक्षिण सीमेमध्ये २००० किलोमीटर अंतर आहे. ४० पेक्षा जास्त जातीजमाती असलेल्या या देशाची सफर रंगतदार संस्कृती, सुंदर निसर्ग आणि मुख्य म्हणजे व्हिएत लोकांचा हसतमुख मैत्रीपूर्ण व्यवहार यामुळे खूपच स्मरणीय होते. शिवाय पूर्व / दक्षिणपूर्व आशियाई देशांपैकी व्हिएतनामध्ये सर्वात जास्त स्वस्ताई आहे.

एस's picture

7 Jul 2014 - 11:40 am | एस

नेहमीचीच प्रतिक्रिया. समजून घेणे.

आमचीपण. :-)

रच्याकने, ते नीलगाय नसून आफ्रिकेतील ब्लॅक विल्डेबीस्ट आहे. नीलगाय हे भारतातील सर्वात मोठे कुरंगप्रवर्गातील हरीण आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Jul 2014 - 11:46 am | डॉ सुहास म्हात्रे

असं हाय व्हय ? आमी दोनी यंकच समजत व्हतो आतापतूर :( . जरूर ती सुधारणा केली आहे. माहितीबद्दल खास धन्यवाद !

विशाल चंदाले's picture

7 Jul 2014 - 12:00 pm | विशाल चंदाले

आतापर्यंतचे सर्वच फोटो अप्रतिम, घर बसल्या बाली भ्रमणासाठी धन्यवाद.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jul 2014 - 1:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

सूड's picture

9 Jul 2014 - 2:56 pm | सूड

हाही भाग झकास !!

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jul 2014 - 9:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

रायनची आई's picture

9 Jul 2014 - 5:43 pm | रायनची आई

छान आहे..पाच वर्षापूर्वी आम्ही गेलो होतो तेव्हा Bali Safari एवढी developed . नव्हती. जास्त restaurents पण नव्हती..
तिथे आम्ही मोठे मोठे kamodo dragons बघितले होते..आणि मला वाटत तुम्ही ज्याना चिंपॅन्ज़ी म्हटले आहे ती खरे तर orangutan आहेत..

एस's picture

9 Jul 2014 - 6:50 pm | एस

आणि मला वाटत तुम्ही ज्याना चिंपॅन्ज़ी म्हटले आहे ती खरे तर orangutan आहेत..

बरोबर. ओरांगउटान.

The name "orangutan" (also written orang-utan, orang utan, orangutang, and ourang-outang) is derived from the Malay and Indonesian words orang meaning "person" and hutan meaning "forest", thus "person of the forest".

- साभार विकिपीडिया.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jul 2014 - 9:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

ते ओरांगउटानच आहेत. फारच गडबडीत लिहीला होता हा भाग. सुधारणेसाठी खास धन्यवाद !