स्मरण!

पिवळा डांबिस's picture
पिवळा डांबिस in जे न देखे रवी...
4 Oct 2008 - 11:09 pm

फुलवा यांच्या "बाकी खरंच काही नाही" या कवितेवरून सुचलेलं हे मुक्तक....
हे विडंबन नाही, स्वतंत्र कविता आहे....

तुझी आठवण मला आता, सारखी काही येत नाही
डोळे भरणं दूर राहो, श्वासही अडकत नाही...

पावसात भिजतो, ताप येतो, मुकाट गोळ्या खातो मी,
तुझ्या गरम लापशीचं स्वप्नसुद्धा पडत नाही....

शाल पांघरून देखील तुझी माया काही मिळत नाही,
वीस वर्षे झाली आता काळरात्र आठवत नाही...

संसार आहे माझा आता, बाबा नि भावंडं ही
पण आई, तुझ्या नसण्यानं, पोरकेपण जात नाही....

एकटं एकटं वाटतं पण ,तू नेहमीच आठवत नाहीस
विसरलो नाही तुला पण बाकी खरंच काही नाही.......
बाकी खरंऽऽच काही नाही गं......

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

प्राजु's picture

4 Oct 2008 - 11:14 pm | प्राजु

आवडली कविता.
पिडा काका, बरेच दिवसांनी "लेखन करा" वर टिचकी मारली आहे तुम्ही.. अशाच टिचक्या मारत रहा.. :)
कविता/विडंबन आवडले.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

बिपिन कार्यकर्ते's picture

4 Oct 2008 - 11:19 pm | बिपिन कार्यकर्ते

पूर्ण पणे सहमत... १००%

अधिक...

खूप बेचैन झालो वाचून.

बिपिन.

llपुण्याचे पेशवेll's picture

6 Oct 2008 - 11:39 am | llपुण्याचे पेशवेll

अगदी बरोबर बोललीस प्राजू.
डांबिसकाका उत्तम मुक्तक.
पुण्याचे पेशवे

शितल's picture

4 Oct 2008 - 11:18 pm | शितल

काका,
फुलवा यांच्या कवितेच्या साच्यातील कविता आवडली.

एकटं एकटं वाटतं पण ,तू नेहमीच आठवत नाहीस
विसरलो नाही तुला पण बाकी खरंच काही नाही.......
बाकी खरंऽऽच काही नाही गं......


हे खुपच छान जमले आहे.
:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Oct 2008 - 11:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सही रे!!!

पद्मश्री चित्रे's picture

5 Oct 2008 - 12:01 am | पद्मश्री चित्रे

>>एकटं एकटं वाटतं पण ,तू नेहमीच आठवत नाहीस
विसरलो नाही तुला पण बाकी खरंच काही नाही.......
हे खूप छान.

मदनबाण's picture

5 Oct 2008 - 3:50 am | मदनबाण

हेच म्हणतो..

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

सुक्या's picture

5 Oct 2008 - 12:13 am | सुक्या

कवीता लै झ्याक. अजुन लिवा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Oct 2008 - 12:16 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

एकटं एकटं वाटतं पण ,तू नेहमीच आठवत नाहीस
विसरलो नाही तुला पण बाकी खरंच काही नाही.......
बाकी खरंऽऽच काही नाही गं......

काका, माझ्याही मनातलं बोललात!

अदिती

नंदन's picture

5 Oct 2008 - 12:53 am | नंदन

मनाला सल नाही, याचाही सल कुठेतरी असतोच. 'नाही जगात झाली आबाळ या जिवाची, तुझी उणीव चित्ती, आई तरीही जाची' सारखा. कविता अतिशय आवडली.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

ऋषिकेश's picture

5 Oct 2008 - 1:05 am | ऋषिकेश

पावसात भिजतो, ताप येतो, मुकाट गोळ्या खातो मी,
तुझ्या गरम लापशीचं स्वप्नसुद्धा पडत नाही....

वाह!

एकटं एकटं वाटतं पण ,तू नेहमीच आठवत नाहीस
विसरलो नाही तुला पण बाकी खरंच काही नाही.......

क्या बात है!

थेट भिडणारी कविता -- व्यथा... मस्त

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

बेसनलाडू's picture

5 Oct 2008 - 3:46 am | बेसनलाडू

(अस्वस्थ)बेसनलाडू

मुक्तसुनीत's picture

5 Oct 2008 - 10:22 am | मुक्तसुनीत

प्रातिनिधिक कविता. जो अनुभव दिवंगत नातेवाईकांबद्द्ल तोच कमी अधिक फरकाने गतकाळाबद्दल इन जनरल असतो. जुन्या स्मृती असतात , परंतु त्या काळाशी असणार्‍या नात्याचे रेशीमधागे हळुहळू क्षीण होत जातात. प्रस्तरांवर नवे थर चढतात तसे काळ आपल्यावर नवेनवे लेप देत रहातो. प्रसंगी एखाद्या एकेकाळाच्या जिवाभावाच्या व्यक्ती/गोष्टीबद्द्ल सुद्धा आपली अवस्था "हां भई, ऐसा था कुछ कभी" अशी होते.

प्रस्तुत कवितेत आईच्या उल्लेखामुळे एकूण परिणाम गडद होतो.

डांबिसखान , हसवत हसवत रडवता आणि रडू आले की पुन्हा नॉटीनेस करता. त्यामुळे चिमटीत येत नाही. नॉट फेअर हां ! सांगून ठेवतंय् ;-)

अवलिया's picture

5 Oct 2008 - 2:40 pm | अवलिया

सहमत

धनंजय's picture

5 Oct 2008 - 8:36 pm | धनंजय

भलताच नॉटीपणा.

गुंतागुंतीच्या भावनांना हात घातला आहे.

"आई तुझी आठवण येते, रोज रडू येते", या भावना विरहानंतर लगेच असतात. पण कालांतराने जी अर्धवट विस्मृतीतली हुरहुर असते, त्याचे वर्णन क्वचितच आपण वाचतो, बोलतो.

चतुरंग's picture

6 Oct 2008 - 7:39 pm | चतुरंग

काहीकाही अगदी जवळच्या असलेल्या गोष्टी काही काळाने 'डिस्टंट पास्ट' असाव्यात अशा दूरच्या आणि आपल्या हृदयाच्या जवळ नसलेल्या अशा वाटू लागतात खर्‍या!
बोच वाटते, पण दुखतेच असे नाही. वाईट वाटते पण डोळे भरुन येतातच असे नाही. आपलेपण वाटतोही आणि काहीच आपले नाही असेही वाटते.
अशा दुखर्‍या नसांना हात लावता अधून मधून आणि डांबीस नाव सार्थ करता! [(

चतुरंग

यशोधरा's picture

5 Oct 2008 - 10:31 am | यशोधरा

काका, मस्तच लिवल्यात हो..

विसोबा खेचर's picture

5 Oct 2008 - 4:52 pm | विसोबा खेचर

डांबिसा, कविता वाचून त्रास झाला रे..

असो, अन्य काही लिहू शकत नाही, क्षमस्व...

तात्या.

इनोबा म्हणे's picture

5 Oct 2008 - 5:54 pm | इनोबा म्हणे

काका, कविता आवडली.

एकटं एकटं वाटतं पण ,तू नेहमीच आठवत नाहीस
विसरलो नाही तुला पण बाकी खरंच काही नाही.......
बाकी खरंऽऽच काही नाही गं......

ह्या ओळी तर खासच... काळजाला भिडल्या.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

मीनल's picture

5 Oct 2008 - 8:22 pm | मीनल

मी खूपदा आई बाबांना विचारते की तूम्हाला तुमच्या आई बाबांची आठवण येत नाही का?तुम्ही फारस कधी काही बोलत नाही.
ते एवढस म्हणतात ये ते ना.मग काय?
माझ्या प्रश्नाच उत्तर तुमची कविता असेल.
मस्त आहे.

मीनल.

प्रभाकर पेठकर's picture

5 Oct 2008 - 9:50 pm | प्रभाकर पेठकर

एकटं एकटं वाटतं पण ,तू नेहमीच आठवत नाहीस
विसरलो नाही तुला पण बाकी खरंच काही नाही.......
बाकी खरंऽऽच काही नाही गं......

प्रभावी काव्यरचना. आवडली.

फटू's picture

5 Oct 2008 - 11:32 pm | फटू

एकटं एकटं वाटतं पण ,तू नेहमीच आठवत नाहीस
विसरलो नाही तुला पण बाकी खरंच काही नाही.......

खुप छान लिहिलंय पिडाकाका...

सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

विजुभाऊ's picture

6 Oct 2008 - 10:53 am | विजुभाऊ

पि डां काका अगदी मनातलं लिवलत भौ.
डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत

विनायक प्रभू's picture

6 Oct 2008 - 10:57 am | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
आवड्ली कविता

अनिल हटेला's picture

7 Oct 2008 - 8:07 am | अनिल हटेला

आवडली कविता !!!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..