तारीख १३ आणि १४ मार्च २०१४ हे दिवस अविस्मरणीय राहतील माझ्या आयुष्यात कारण साधुसंत येती घरा...चा अनुभव मला परदेशात घेता आला . श्री.निनाद , श्री.पेठकर काका , सौ . पेठकर काकू आणि आम्ही दोघे असा कट्टा झाला . खरं तर कट्टे झाले २ दिवस सलग . निनाद यांनी मला आधी सांगितले होते कि काका आणि काकू म्युनिक दौर्यावर येत आहेत . मी तयार होतेच , कट्ट्याला हजेरी लावायला . :D
१३ तारखेला सक्काळ सक्काळीच फोणाफोणी करुण आम्ही मरियन प्लात्झ (म्युनिक मधील प्रसिद्ध ठिकाण ) ला भेटायचं ठरवलं . त्यानुसार आम्ही भेटलो . पहिली ओळखपरेड झाली तीही गुथ्थि इष्टयील...काका - निनाद ,निनाद - काका , निनाद - काकू ,काकू - निनाद , दिव्यश्री - काका काकू , दिव्यश्री - निनाद .रेल्वे ठेसनातून बाहेर आल्यावर उंच टॉवर वर गेलो .लैच ड्यांजर होता चढायला *beee* . एका वेळेस एकाच माणूस एकतर वर जाऊ शकतो नाही तर खाली येऊ शकतो .
हाश हुश्श करत करत पोहोचलो वरती ... टॉवर वरती ...काय नजारा होता .आहाहा एवढे जिणे चढल्याचे सार्थक झाले अगदी . म्युनिक शहराचा सुंदर नजारा दिसत होता *BRAVO* . गेल्या ३ वर्षात पहिल्यांदाच त्या ठिकाणी गेले होते . निनाद सुंदर ठिकाण माहिती करून दिल्याबद्दल Tahnk You. :) त्या दिवशी हवामानाची ही कृपादृष्टी होती . इथे ती असेल तरच तुमच्या फिरण्याला मजा आहे . मग म्युनिक बान (रेल्वे, ड्योयीच बान) ने बरेच ठेषण पालथे घातले ...दुपारच्या जेवणासाठी ...गप्पांच्या नादात चुकुण चुकत होतो ...जाणा था जपाण *SCRATCH* असंच काहीस झाल . शेवटी एकदाच हॉटेल नट्राज (नटराज) आल . निनाद म्हणत होते बुफे / बफे घेऊ म्हणून त्यावर बराच खल झाला . शेवटी नटराज फायनल झालं . तिथे मी आणि काकू प्युअर व्हेज म्हणून मिक्स व्हेज आणि दाल माखनी , tandoori रोटी आणि णोण व्हेज वाल्यांनी पण कायतरी मागवला...इसरले ...स्वारी :( ....मस्त जेवणे झाली , फोटू काढले मग आम्ही पुणहा ठेष्णकडे कूच केली .
आम्हाला डखाऊ कोन्संत्रेषण कॅम्पला जायचे होते . त्याप्रमाणे आम्ही डखाऊला पोहोचलो . ठेषण वर उतरलो , बाहेर येउण बशीत बसलो मग त्या कॅम्पच्या इस्टोपला उतरलो . तिथून चालत चालत गेलो , गेटमधून आत शिरलो ...सगळा कॅम्प पाहिला .कामाचा दिवस ( working day ) असल्यामुळे गर्दी नव्हती .खूप हाल हाल करून कैद्यांना मारलंय हे तेथील फोटोज वरून दिसत होत . :( संध्याकाळचे पाच वाजले होते . मुख्य गेस चेंबर बंद झाल होत . निनाद यांनी जर्मन भाषेतून बोलून सांगितलं कि काका काकूंना जाऊ द्या ते १० मिनिटात बघून येतील , ते भारताहून आले आहेत पण त्याने नाही सोडलं . मग आम्ही परत बशीत ... ठेषण ...तिथून बाणीत मग आमच्या घरी .
मुरलेल्या मिपाकराप्रमाणे श्री . निनाद यांनी पेठकर काका आणि माझ्यात कडी सारली आणि भडका कधी उडतो याची वाट बघितली . :)
फोटोज टाकायला अजूनही जमत नसल्यामुळे फोटो टाकले नाहीत . क्षमस्व . :(
बाकीचा वृत्तांत ब्रेक के बाद ...
अवांतर पण महत्वाचे : शुद्धीत राहून प्रतिक्रिया , प्रतिसाद , आपले अमुल्य मत प्रदर्शन करावे . प्रतिसाद /प्रतिक्रिया देताना वैयक्तिक शेरेबाजी टाळावी . कुठल्या प्रतिसादा /प्रतिक्रिये ला फाट्यावर मारायचे , पुणेरी शब्दात उत्तर द्यायचे याचा अधिकार राखून ठेवण्यात आला आहे . दुसरा भाग लिहायचा कि नाही हे ठरवण्याचा सर्वस्वी अधिकार लेखिकेचा राहील . बाकी नेहमीप्रमाणेच सूचनांचे अर्थातच स्वागत राहील . :)
क्रमशः .
काही फोटो....

संग्रहालय
कैद्यांच्या बराकीचा नकाशा

कुप्रसिद्ध गेस चेंबर कडे जाणारा भयाण रस्ता
कुप्रसिद्ध गेस चेंबर माहिती नकाशा
जगातील एका मोठ्या , प्रसिद्ध मुधुशालेतील वाद्यवृंद

डखाऊ कॅम्प परिसर
प्रतिक्रिया
19 Mar 2014 - 2:11 pm | संजय क्षीरसागर
*smile*
19 Mar 2014 - 5:11 pm | आत्मशून्य
एकदम मस्त मस्त मस्त...!
19 Mar 2014 - 2:13 pm | पिलीयन रायडर
फोटो??? वृतांत वाचला नाही.. आधी फोटो द्या..
19 Mar 2014 - 2:14 pm | दिव्यश्री
फोटोज टाकायला अजूनही जमत नसल्यामुळे फोटो टाकले नाहीत . क्षमस्व . Sad
19 Mar 2014 - 2:32 pm | पिलीयन रायडर
हे घ्या... मदत -मिपावर फोटो चिकटवणे.
http://www.misalpav.com/node/13573
आता फोटो पाहिजेतच.. दक्षिणा म्हणुन.. ;)
19 Mar 2014 - 2:32 pm | मितान
आमचाही युरोपातील कट्टा वाचा
http://misalpav.com/node/15062
हे आठवून अन् तुमचा वृत्तांत वाचून जळजळ होतेय. कोकम सरबत घेऊन येते. पुष्का, मेव्या, असुर येताय ना ???
19 Mar 2014 - 2:48 pm | इरसाल
टाकायचं राहिलं का ?
हा माझा पहिलाच कट्टा वृतांत्त लिहायचा प्रेत्न आहे. चु.भु.दे.घे. इति इति.
19 Mar 2014 - 2:49 pm | रेवती
अरे वा!! बीन झायरातीचा कट्टा आवडला.
19 Mar 2014 - 2:52 pm | दिव्यश्री
19 Mar 2014 - 3:19 pm | सूड
तुम्ही ष्टेप बाय ष्टेप गेला नसाल. हम यईच पद्धत वापरते हय. हमारा कैसा क्या अपलोड होउन जाता हय? नीट वाचा बरं परत ते!!
19 Mar 2014 - 3:32 pm | सूड
आणि हो, माझी ही कमेंट पर्सनल वैगरे वाटली तर सोडून द्या बरं!! आमचं बोलणं असंच असतंय, येकदम कंट्री. ;)
19 Mar 2014 - 4:17 pm | प्यारे१
टेढा है पर सरल है यह :)
-कट्ट्याबद्दल अवांतरामुळं 'हाताची घडी तोंडावर बोट' ठेवलेला प्यारे ;)
19 Mar 2014 - 4:34 pm | अत्रुप्त आत्मा
@कट्ट्याबद्दल अवांतरामुळं 'हाताची घडी तोंडावर बोट' ठेवलेला प्यारे>>> +१ :-/
फोटो अवडून सुद्धा..प्यारे काकांशी सहमत झाल्यानी गप्प बसलेला-आत्मू!!! :D
19 Mar 2014 - 4:46 pm | दिव्यश्री
-कट्ट्याबद्दल अवांतरामुळं 'हाताची घडी तोंडावर बोट' ठेवलेला प्यारे Wink>>> ये जम्या नै... काय लिहायचं ते व्यवस्थित लिवा ...मला कळेल अस ...मग पुढच पुढे बघूच ... :P :D
19 Mar 2014 - 3:25 pm | पिलीयन रायडर
वही तो.. तुम गडबड करता हय.. प्रॉपर्तीझ मे जाके यु आर एल चोप्य पस्ते करनेका हय.. ctr+a करेका म्हन्जे सगळी लिंक आती हय.. मग चोप्य पते.. हय क्या और नय क्या..
25 Mar 2014 - 1:18 am | संतोषएकांडे
इथपर्यन्त बरोबर आल्यात तुम्ही. आता एक करा. फोटोची लिन्क आली की नीट बघा की एड्रेस बरोबर जेपीजी पर्यन्त येतोयका ते. नाही तर बोक्ष बंद करून परत प्रॉपर्टी ओपन करा. म्हणजे त्यात लिन्कचा जेपीजी पर्यंतचा एड्रेस येइल. तो पेस्ट करा. म्हणजे फोटो दिसायला लागेल.
19 Mar 2014 - 4:33 pm | मुक्त विहारि
जमल्यास पुढला भाग टाका.
19 Mar 2014 - 4:34 pm | आदूबाळ
ये बात! आठवणी ताज्या झाल्या!
ती मधुशाला "Hofbräuhaus München" आहे ना? त्याची आठवण म्हणून कोस्टर आणि मेनू उचलून आणले होते!
पुभाप्र!
19 Mar 2014 - 4:37 pm | दिव्यश्री
मा. श्री गणपा भौंचे लई लैच आभार .गेले अर्धा तास ते त्यांनी प्रयत्न करून फोटो धाग्यावर डकवले आहेत . धाग्याची शोभा वाढवण्याचा प्रयत्न केला आहे . माझ्यासारखी ' ढ ' शिष्या त्यांना मिळाली नसेल आतापर्यंत . :( असो खूप आभारी आहे . धन्यवाद . :)
19 Mar 2014 - 5:49 pm | रेवती
तरी नाही दिसत फोटू.
20 Mar 2014 - 12:26 am | रेवती
दिसले गं बाई दिसले.
19 Mar 2014 - 4:51 pm | बिपिन कार्यकर्ते
अरे अरे अरे! काय गं तुझी ही भाषा! कीबोर्ड हाणू का टाळके मे? (ह. घ्या)
मजा केलीत तर! पण इतके रथी महारथी युरोपात असताना पहिलाच कट्टा असे कसे बरे? :ड
स्वातीताई, केशवसुमार, पुष्करिणी, मेघवेडा वैग्रे बलाढ्य राहू, केतू, अही, मही आहेत म्हणे तिथे. ;)
19 Mar 2014 - 4:57 pm | बॅटमॅन
फटूही उत्तमच.
मिपावर रहायचं तर इतकं डिफेन्सिव्ह कसं होऊन चालेल =)) हर्कत नाही, नयी लग रहीं हैं आप :D :P आस्ते आस्ते समजून जाईल हो सगळं ;)
(आता पाहू कोणता अधिकार बजावला जातो ते ;) )
19 Mar 2014 - 5:10 pm | अत्रुप्त आत्मा
@(आता पाहू कोणता अधिकार बजावला जातो ते Wink )>>>
19 Mar 2014 - 5:15 pm | बाळ सप्रे
कट्टेकरी कुठायत फोटोत?????
19 Mar 2014 - 5:27 pm | डॉ सुहास म्हात्रे
वा, वा ! युरोपका कट्टा ! भौत भारी !
19 Mar 2014 - 6:15 pm | प्रभाकर पेठकर
कट्ट्याचा वृत्तांत दिव्यश्रीने टाकला आहेच. म्युनिच मध्ये जाण्याअगोदर पासून निनादशी संपर्कात होतोच. दिव्यश्रीची भेट हे एक 'प्लेझेंट सर्प्राईझच' म्हणाना. मजा आली. दोघांनीही वेळातवेळ काढून काका-काकूंना म्युनिच परिसराची, कॉन्संट्रेशन कँपची सफर घडवली. युरोपात शाकाहारी जेवण मिळणे दुरापास्त. त्यामुळे काकूंची (त्यामुळे माझी) भयंकर कुचंबणा व्हायची. दिव्यश्रीच्या घरी भज्यांची तिखट्जाळ आमटी, पोळ्या, भात, पुरण असा 'खास' मराठमोळा खानदेशी बेत तिने अत्यंत थोड्या कालावधीत बनविला आणि आम्हा दोघांनाही आश्चर्याचा तिखट झटकाच दिला. धन्यवाद दिव्यश्री. आमची युरोप सफर अजून चालूच आहे आणि ह्या सफरीत दिवसभर चालूनफिरुन थकल्यावर मिपावर वृत्तांत्त टाकणे मला अशक्यप्राय्य आहे. पण निचिंतीने 'भटकंती' सदरात सर्व स्थळ-काळ वर्णने आणि छायाचित्रे येतीलच.
इस्पिकएक्का ह्यांच्या 'हिवाळ्यातील स्विट्झर्लंड' ह्या लेखातून प्रेरणा घेऊन (त्यांचे विशेष आभार) आणि श्री. बाबासाहेब पुरंदरे ह्यांच्या समवेत लंडनमधील पुस्तक प्रकाशन सोहळा असा मुहूर्त साधत ही सहल आखली होती. परंतु, दुर्दैवाने लंडन शहराचे हवामान, पाऊस, पूरपरिस्थिती पाहून पुस्तक प्रकाशन सोहळा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्या पर्यंत लांबला त्यामुळे लंडन वगळून बाकी युरोपदर्शनाचा घाट घातला आहे. पॅरीस, स्विट्झर्लंड, जर्मनी करत आता राहूल बाबाच्या आजोळी इटलीत पोहोचलो आहे. मुंबईस परतल्यावर माझे 'भटकंती' धागे सुरु होतीलच. पण येता भविष्यकाळ अत्यंत धावपळीचा आणि व्यग्रतेचा आहे. (मस्कतला दोन नविन उपहारगृह सुरु करतो आहे) त्यामुळे कसे काय जमते पाहायचे आहे. त्यापूर्वी, १ पुण्याचा आणि १ मुंबईचा कट्टा मनांत रुंजी घालतो आहे.
ह्या प्रवासात लंडन रद्द झाल्यामुळे आदुबाळ आणि खेडूत ह्यांची भेट होऊ शकली नाही आणि जर्मनीत जाऊनही मधुरा देशपांडे मानहाईमला म्हणजे म्युनिच पासून दूर असल्याने त्यांचीही भेट होऊ शकली नाही ह्याचे शल्य मनांत आहेच.
19 Mar 2014 - 9:15 pm | सानिकास्वप्निल
लंडन रद्द झाल्यामुळे काका मला ही तुम्हाला भेटता आले नाही ह्याचे वाईट वाटत आहे. पुन्हा कधी लंडन फिरण्याचा विचार केला तर नक्की कळवा :)
तुमचे युरोपदर्शन छान सुरु आहे वाचून आनंद झाला. युरोप भटकंती धाग्याची वाट बघत आहे.
19 Mar 2014 - 10:49 pm | आदूबाळ
+१
असेच म्हणतो
21 Mar 2014 - 11:31 pm | हाडक्या
कधी लंडन कट्टा असेल तर आमाला पण कळवा हो..
(कधीपासून कट्टेकरी होऊ पाहणारा) हाडक्या!
19 Mar 2014 - 10:42 pm | मधुरा देशपांडे
काका, तुम्ही इथे धमाल करत आहात हे वाचून छान वाटले. भटकंतीच्या वर्णनाची वाट बघतेय. तुमची भेट होऊ शकली नाही आणि इतक्या मस्त कट्ट्याला येता आले नाही याचे वाईट वाटतेय. तेव्हा पुढचा युरोप दौरा लवकरच ठरवा.
@दिव्यश्री, वृत्तांत आवडला.
19 Mar 2014 - 11:01 pm | दिव्यश्री
Sorry मधुरा...मी खूप घोकल होत तुझ नाव पण शेवटी विसरलेच . खरतरं खूप उचक्या लागल्या असतीलच , खूप आठवण काढली होती तुझी आणि मि. मधुरा यांची . पुढच्या वेळी तुम्ही नक्की या म्युनिकला जंगी कट्टा करूया . :)
21 Mar 2014 - 1:57 pm | पिलीयन रायडर
तुम्ही भारीच आहत हो काका!! अगदी जोरात चालतील ही उपहारगृह!!
22 Mar 2014 - 1:58 am | सूड
>>(मस्कतला दोन नविन उपहारगृह सुरु करतो आहे)
अशा वेळी शेफ, जागा वैगरे कसं मॅनेज करता? आय मीन वेगळा देश त्यात हॉटेल सुरु करत असताना काय काय व्यवधानं पाळावी लागतात. यावर एखादा लेख तुमची काही हरकत नसेल तर तुमच्याकडून वाचायला आवडेल.
22 Mar 2014 - 3:10 am | प्यारे१
अधिक माहिती पेठकर काका देतीलच.
माझ्या माहितीनुसारः एखाद्या 'लोकल' माणसाला पार्टनर म्हणून घ्यावं लागतं. सहसा एक ठराविक रक्कम अथवा नफ्याचा काही ठराविक हिस्सा लोकल ला द्यावा लागतो. (बहुतेकदा वार्षिक ठराविक रक्कम) जागा लिज वर घ्यायच्या आणि शेफ अथवा सगळेच लोक स्वतः काही मुलाखती घेऊन, खर्च करुन, मॅनपॉवर एजन्सी द्वारे घेतले जातात. शक्यतो पेरोल वर घेण्यापेक्षा मॅनपॉवर कन्सल्टन्ट कडून माणसं महिना तत्त्वावर घेतले जातात. काही ठिकाणी स्वतः मालक (लोकल बरोबर स्थापलेल्या कंपनीद्वारे) लोकांना सगळं पुरवतात. व्हिसा, तिकीटचा खर्च, सुट्ट्यांची व्यवस्था, मेडीकल इन्शुरन्स, राहण्याची व्यवस्था, पगार, जेवणखाण इ.इ. सगळं बघावं लागतं.
23 Mar 2014 - 12:56 am | प्रभाकर पेठकर
>>>>शक्यतो पेरोल वर घेण्यापेक्षा मॅनपॉवर कन्सल्टन्ट कडून माणसं महिना तत्त्वावर घेतले जातात.
मस्कतच्या बाबतीत एवढे एक सोडल्यास सर्व माहीती बरोबर आहे. सर्व कर्मचारी आपल्या पे रोलवरच असतात.
19 Mar 2014 - 8:19 pm | श्रीरंग_जोशी
वॄत्तांत आवडला पण जरा थोडक्यात उरकल्यासारखा वाटत आहे.
फोटु छान आहेत पण कट्टेकर्यांचा एकही फोटु नसल्याने अपूर्णता जाणवत आहे.
19 Mar 2014 - 8:25 pm | यशोधरा
धमाल कट्टा झाला की :)
19 Mar 2014 - 9:57 pm | भ ट क्या खे ड वा ला
वृत्तांत आणि अवांतर दोन्ही आवडले. लिहीत रहा.
20 Mar 2014 - 1:22 am | बाळकराम
नशिबवान आहात बर! ;) असो फोटोज छान आले आहेत
20 Mar 2014 - 7:26 pm | यसवायजी
मस्त कट्टा झाला. कट्टेकर्यांचे फोटोपण टाका की.
आणी निनादने काकांना मरियन प्लाट्झचे क्लॉक टॉवर नाही का दाखवले??
डखाऊचा कॅम्प पहायचा राहिलाय. चला निदान फोटोतुन सफर घडली.
20 Mar 2014 - 8:17 pm | भाते
वृत्तांत आणि फोटो आवडले. मिपाकरांचे फोटो पायजेत. :)
पेठकर काका,
गेल्या वेळी तुम्ही अचानक (न कळवता) घारापुरी कट्टयाला हजेरी लावलीत. माझ्या दुर्देवाने त्यावेळी मला कट्टयाला येणे जमले नाही. तेव्हा तुमचा पुढचा मुंबई कट्टा असेल तेव्हा आधी (आम्ही या कट्टयाला येतो आहे) अशी पुर्वसुचना द्यावी अशी नम्र विनंती. मुंबईत येण्याआधी/आल्यावर मला व्यनि केल्यास छानच! :)
आता कट्टा वृत्तांत भाग २ आणि मिपाकरांचे फोटो (जमल्यास खादाडीसकट) पाहिजेत हेवेसांनल. इनोचे पाकीट घेण्यापेक्षा इनोची बाटली कधीही चांगली नाही का? :)
21 Mar 2014 - 1:04 am | प्रभाकर पेठकर
नोंद घेतली आहे.
20 Mar 2014 - 11:57 pm | खटपट्या
कट्टेकर्यांचे फोटो येवुदेत
21 Mar 2014 - 12:15 am | लौंगी मिरची
कट्ट्याचा व्रुत्तांत छानच पण कट्ट्याला कोण कोण होते त्यांचे सदेह फोटोही येऊदेत .
21 Mar 2014 - 1:28 am | श्रीरंग_जोशी
फोटोला 'सदेह' हे विशेषण प्रथमच वाचतोय :-). आजवर वैकुंठगमन करण्यासाठीच वाचले होते.
21 Mar 2014 - 2:29 am | दिव्यश्री
सगळ्या वाचकांचे आणि प्रतिसाद देणार्यांचे आभार . :)
मुवि काका पुढचा भाग टाकणार आहेच .
अरे वा!! बीन झायरातीचा कट्टा आवडला.>>> :)
पिरा.... वही तो.. तुम गडबड करता हय.. प्रॉपर्तीझ मे जाके यु आर एल चोप्य पस्ते करनेका हय.. ctr+a करेका म्हन्जे सगळी लिंक आती हय.. मग चोप्य पते.. हय क्या और नय क्या..>>>माझं मनोधैर्य वाढवल्याबद्दल पेशल आभार .
मीतान लेख वाचते मी सावकाश .एक चक्कर मारून आले आहे त्या धाग्यावर .
प्यारे काकांशी सहमत झाल्यानी गप्प बसलेला-आत्मू!!! बिग्ग्रीन>>> चांगली युती - तुती आहे . *beee*
ती मधुशाला "Hofbräuhaus München" आहे ना? >>> होय . तेच आहे .
स्वातीताई, केशवसुमार, पुष्करिणी, मेघवेडा वैग्रे बलाढ्य राहू, केतू, अही, मही आहेत म्हणे तिथे. >>> मला यापैकी फक्त स्वाती ताई ऐकूण माहिती आहेत आणि बाकीची नावे वाचली आहेत , ओळख नाही .
कट्टावृत्तांत आवडला.>>> धन्यवाद .
मिपावर रहायचं तर इतकं डिफेन्सिव्ह कसं होऊन चालेल Lol हर्कत नाही, नयी लग रहीं हैं आप BiggrinBlum 3 आस्ते आस्ते समजून जाईल हो सगळं Wink
(आता पाहू कोणता अधिकार बजावला जातो ते Wink ) >>> हम्म्म . असो.
नशिबवान आहात बर! Wink >>>लाकूड शिवा . ;) हायेच मी . :)
असो फोटोज छान आले आहेत>>> धन्यवाद . हौशी फोटूग्राफर आहे मी . फक्त फोटो काढून संगणकावर टाकले आणि तेच इथे डकवले आहेत कोणत्याही प्रक्रियेशिवाय .
आणी निनादने काकांना मरियन प्लाट्झचे क्लॉक टॉवर नाही का दाखवले??>>>हे मला माहिती नाही , या प्रश्नाचे उत्तर श्री निनाद अथवा पेठकर काकाच देऊ शकतील .
भाग २ पायजेल >>> हो लिहिणार आहे .सगळ्याच्या शुभेच्छा असू द्या.
कट्ट्याचा व्रुत्तांत छानच पण कट्ट्याला कोण कोण होते त्यांचे सदेह फोटोही येऊदेत .>>> आणि कट्टेकरी कुठायत फोटोत?????>>> कट्टेकरींचे सदेह फोटू फुढल्या भागात येणार आहेत याची कृपया नोंद घ्यावी . :P :D
21 Mar 2014 - 3:31 am | प्रभाकर पेठकर
म्हणजे काय? पाहिलं की. दोन्ही दिवस पाहिलं. एक दिवस तर त्याचे संगित चालू असताना (संपायला आलं होतं) पाहिलं.
नुकतंच हैदराबादचं सालारजंग वस्तू संग्रहलातील घड्याळ पाहिलं होतं. त्याचाच मोठा भाऊ आहे जर्मनीतील मरियन प्लाट्झचे संगित घड्याळ.
21 Mar 2014 - 9:40 am | आरोही
मस्त वृत्तांत ,लेखनाची पद्धत खूप आवडली ..आणि 'नयी हुं मय...पर अकेलीही सब पे भारी हुं मय '
य वाक्याशी खरेच सहमत ...+)
21 Mar 2014 - 2:38 am | बहुगुणी
वृत्तांत आवडला, आणखी असेच कट्टे होवोत आणि त्यांचे स-खादाडी वृत्तांत तुमच्याकडून वाचायला मिळावेत अशी सदिच्छा!
कट्टेकर्यांच्या फोटोंशिवाय वृत्तांताला अपूर्णत्व आहे ते भाग दोन मध्ये पूर्ण करालच :-)
(हा मिपाकरांचा युरोपातला पहिला-वहिला अर्थातच नव्हता हे मितान यांनी सप्रमाण वरती सांगितलंच आहे. स्वाती दिनेश यांनीही याआधी छोटा डॉन आणि केसु यांच्यासह केलेला रॉकलेट कट्टाही वाचनीय होता. त्यांचाच केसु गुर्जी आणि लिखाळ यांच्या बरोबरचा मिसळ कट्टाही वाचल्याचं आठवलं [हे डॉन, लिखाळ आणि केसु हल्ली मिपावर दिसतच नाहीत असं नमूद करू इच्छितो!]) स्वातीताईंनीच मला वाटतं अदितीबरोबरही एक कट्टा केला होता असं vaguely आठवतं आहे, but I could be wrong.)
21 Mar 2014 - 7:47 pm | सखी
आणखी असेच कट्टे होवोत, पेठकर काका युरोपच्या दौ-यावर दिसतात, तुमची आता मस्कतची गडबड झाली की ऊत्तर अमेरीकेतही दौरा आखा असं आधीच आमंत्रण देऊन ठेवते.
मितान तुमच्या कटट्याचेही वर्णन वाचले, मस्तच झालेला दिसतोय तो. पुष्करणीपण सध्या अजिबात दिसत नाही.
स्वातीने मिसळ कट्टा आणि रॉकलेट कट्ट्याबरोबरच भ्रमणमंडळाची स्थापना करुन भ्रमणगाथा आणि पुन्हा भ्रमणगाथा अशा लेखमाला लिहलेल्या सापडल्या.
21 Mar 2014 - 2:43 am | निनाद मुक्काम प...
येसवायाजी
मूळ लेखात उल्लेख केला आहे त्या टोवेर वरून त्या प्रसिद्ध फिरत्या बाहुल्यांच्या घडाळ्याच्या दृष्यासोबत मेरियान प्लाट चे विहंगम दृश्य पाहण्यास मिळते.
फक्त तो टोवेर १३ मजल्यांचा आहे व त्याला चिंचोळा वर्तुळाकार जिना आहे , विजेचा पाळण्याची सोय केलेली नाही.
पेठकर काका व काकूंना मी ह्याची कल्पना दिली तेव्हा
सह्याद्रीच्या ह्या मावळ्याने हे आव्हान स्वीकारले , व
काही मिनिटात आम्ही सर्व छतावर पोहोचलो.
पेठकर दांपत्यांचा हा उत्साह , व फिटनेस पुढे दिवसभर पाहण्यास मिळाला. दोघांच्या चेहऱ्यावर थकल्याची खुण
नव्हती.दिव्यश्री , काका व मी मिपा व म्युन्शन चा इतिहास ह्यावर दिवसभर अखंड बोलत होतो.
काकांनी येथे सांगितल्या प्रमाणे त्यांना सवड मिळेल तेव्हा
ते सचित्र भटकंती मिपावर लिहिणार आहेत. तेव्हा मी अजून काही लिहित नाही.
दिव्यश्री व पेठकर दांपत्यांना मी दुसर्या दिवशी भेटलो
तेव्हा मुख्य रेल्वे स्टेशन जवळील भारतीय उपहारगृह रसोई येथे जाण्याचा माझा बेत होता.
पण दिव्यश्री ने तेथे जाण्यास साफ नकार दिला.
ते हॉटेल पाकिस्तानी माणसाचे असल्याने म्युन्शन मध्ये एवढे भारतीय लोकांची उपहारगृहे असतांना आपण पाकिस्तांनी माणसांना का पैसे द्यायचे असा तिचा सवाल होता.
जातिवंत मिपाकर ह्या नात्याने ह्यावर प्रतिवाद करण्याची आलेली उबळ महतप्रयासाने दाबून मी त्या सूचनेस रुकार दिला.
१५ मिनिटाच्या अंतरावर एका पुणेकराचे भारतीय उपहारगृह होते.
त्याचे मालक माझ्या परिचयाचे आहेत.
मग तेथे खादाडी उरकून आम्ही केंप कडे मार्गस्थ झालो.
दुसर्या दिवशी दिव्यश्री कडे म्युनिक चा पहिला वाहिला खादाडी कट्टा पार पडला.
मग आम्ही सर्व काकांना स्टेशन पर्यंत सोडायला आलो.
काकांसोबत पुढे काही स्टेशन मी जाणार होतो.
गाडी सुटतांना दिव्यश्री ला पेठकर दांपत्यांनी हात हलवून टाटा केले , तिच्या डोळ्यात पाणी तरळले होते.
मस्कत वरून हून लिहिणारा एक मिपाकर त्याच्याशी शुद्ध लेखनावरून वाद घालणारी आमची म्युन्शन ची मिपाकर भगिनी आणि तीन वर्षात म्युन्शन मध्ये राहून एरवी तिला मिपावर भेटणारा
मी ह्यावेळी प्रत्यक्ष भेटलो.
काका , दिव्यश्री वमाझी ह्या दोन दिवसात मिपावरील अनेक विषयांवर चर्चा झाली. आमच्यात अनेक विषयांवर मतांतरे झाली. पण त्याच सोबत आपण मिपाकर आहोत ह्या एक भावनेने एका अनामिक नात्याची वीण पक्की झाली.
पेठकर काकांशी मुंबईत २ तारखेला कट्टा आयोजित झाला तर प्रत्यक्ष भेटण्याची खूप इच्छा आहे. त्यांच्या उर्वरीत युरोपियन भटकंती चे वर्णन ऐकायचे आहे.
पेठेकर दांपत्यांचा स्टेशन वर निरोप घेत असतांना
मनात अशी पाखरे येती ,आणिक स्मृती ठेवुनी जाती ह्या ओळी आल्या.
आता ऋषिकेश म्युन्शन दौरा करणार आहेत असे त्यांनी मला खव मध्ये कळवले होते.
वि र ऑन
अजून एक म्युनशन कट्टा करायला.
21 Mar 2014 - 7:58 am | मुक्त विहारि
"ते हॉटेल पाकिस्तानी माणसाचे असल्याने म्युन्शन मध्ये एवढे भारतीय लोकांची उपहारगृहे असतांना आपण पाकिस्तांनी माणसांना का पैसे द्यायचे असा तिचा सवाल होता."
एकदम योग्य.प्रचंड सहमत.
21 Mar 2014 - 1:48 pm | दिव्यश्री
जातिवंत मिपाकर ह्या नात्याने ह्यावर प्रतिवाद करण्याची आलेली उबळ महतप्रयासाने दाबून मी त्या सूचनेस रुकार दिला.>>> चूक , एकदम चूक , साफ चूक . तुमची उबळ दाबून ठेवली नाहीत तुम्ही . हा त्यावर अगदी वादविवाद झाला नाही . म्युनिक मध्ये दुपारी हॉटेल्स मध्ये बफे /बुफे असते तेही अगदी स्वतात म्हणजे जर सेपरेट मेन्यु सांगितला तर जितका खर्च होयील त्यापेक्षा अतिशय स्वतात दुपारी जेवण मिळते . यावर आपला संवाद झाला आहे . तुम्ही विसरला असला तरी माझ्या लक्षात आहे .
मी कधीही चीनी वस्तू , चायनीज जेवण या वाट्याला जात नाही . देशाच्या सीमेवर आपले सैनिक प्राणपणाला लावून लढतात . त्यांची मुलेबाळे आणि बाकी कुटुंब कोणत्या दडपणाखाली वावरत असतील याची आपण सामान्य माणसे कल्पनाही करू शकत नाही . :( सैनिक हो तुमच्यासाठी ....हे अतिशय सुंदर मराठी गाणं आहे . आवड आणि सवड असल्यास सगळ्यांनी ऐकावे . हे गाणं ऐकताना शहारे येतात आणि डोळे कधी पाणावतात हे आपल्यालाही कळत नाही . स्वतःचे थोडेफार पैसे वाचवण्यासाठी मी अशी तडजोड आयुष्यात कधी केली नाही आणि करणारही नाही . हेच पैसे शेवटी त्या त्या लष्करावर खर्च होऊन आपलीच माणसे मारली जाणार या पापामध्ये मी तरी सहभागी होणार नाही .
पेठकर काकांनी पूर्ण बिलाचा खर्च करून मला लाजवले आहेच . असो पुढच्या कट्ट्याला मी काकांना काहीही खर्च करू देणार नाही याच बोलीवर मी कट्ट्याला येणार आहे. :)
21 Mar 2014 - 8:52 pm | यसवायजी
धन्स निनाद. मजा केलीत तर.
@त्यांना सवड मिळेल तेव्हा ते सचित्र भटकंती मिपावर लिहिणार आहेत. >>
वाट पाहतोय काका.
23 Mar 2014 - 1:12 am | प्रभाकर पेठकर
>>>> अशी पाखरे येती ,आणिक स्मृती ठेवुनी जाती....
निनाद,
माझ्या बाबतीत म्हणशील तर 'अशी गिधाडे येती..' जास्त चपखल ठरेल.
23 Mar 2014 - 2:42 am | निनाद मुक्काम प...
@यावर आपला संवाद झाला आहे . तुम्ही विसरला असला तरी माझ्या लक्षात आहे .
माझ्या लक्षात आहे , पण संवादातून पुढे विसंवाद होऊ नये
म्हणून आपली उबळ .....
तसे पाहता ह्या विषयावर एक स्वतंत्र धागा काढून काथ्याकुट करता येईल
मिपावर माझ्यामते अनिवासी भारतीय आहेत व अनेक भारतीय अनेक कारणास्तव परदेशी जातात. तेव्हा त्यातील अनेक जण देशी उपहारगृहात जातांना पाकिस्तानी , भारतीय
एवढा विचार करत नसतील.
तसे न करण्यामागे काही कारणे आहेत , ती तुम्हास सांगितली नाही कारण ती कदाचित तुम्हाला पटली नसती.
ह्या विषयावर वेळ मिळाल्यास एक वेगळा धागा काढून माझा मुद्दा मांडेल
24 Mar 2014 - 3:21 am | प्रभाकर पेठकर
फार फार वर्षांपूर्वी मीही तसा विचार नाही करायचो.
पण नंतर करु लागलो. पाकिस्तानी उपहारगृह, पाकिस्तानी मनी एक्स्चेंज इत्यादी टाळतो. अर्थात कुठे भारतिय उपहारगृह मिळाले नाही तर उपाशी राहणार नाही.
24 Mar 2014 - 12:36 pm | डॉ सुहास म्हात्रे
+१००
मात्र याला एक अपवाद आहे तो एअर इंडियाचा. पहिल्या काही वर्षांत वारंवार देशभक्तीची उबळ येउन एअर इंडियाने प्रवास केला आणि त्यांनी दर वेळी न चुकता पश्चाताप करायला भाग पाडले. आता कानाला खडा लावला आहे. शक्यता कमी पण जर दुसरा उपायच नसला तर प्रवास रद्द करणार नाही... अजून एकदा बाचाबाचीची फैर झडेल एवढेच ;) . अर्थात त्याने एअर इंडीयाच्या गेंड्याच्या कातडीवर ओरखडाही उमटणार नाही याचीही खात्री आहेच :)
24 Mar 2014 - 9:15 pm | निनाद मुक्काम प...
सहमत
एअर इंडिया चा महाराजा चा पुतळा विनम्रतेने नाही तर त्याच्यावरील कर्जाच्या बोज्याने कायम वाकला असतो.
जनता असते ते कर्ज फेडायला
रेल्वे व एअर इंडिया चे खाजगीकरण झाले पाहिजे.
असे मनापासून वाटते.
25 Mar 2014 - 9:31 am | चौकटराजा
खाजगीकरण अन भारतीय रेलचे ? बापरे हे फार मोठे पाप होईल. पुणे ते दिल्ली टाटा, अम्बानी, रेल्वेने मग रूपय पाच हजार
होणार. हिवाल्यातही ऐअर कंडीशन कोचेस. अनलिमिटेड हादडाई. असे काही नजरे समोर यायला लागलेय.
25 Mar 2014 - 1:34 am | प्रभाकर पेठकर
+१०००००००
शब्द अन शब्द अस्स्साच अनुभव.
24 Mar 2014 - 12:57 pm | प्रमोद देर्देकर
हे तुम्ही परदेशी असताना करता पण मी हे इथं ठाण्यात राहुनही पाळतो. सहसा यवनांच्या कोण्त्याही दुकानात / बेकरीत जात नाही (हॉटेलात जायचा तर प्रश्नच येत नाही). दिव्यश्रीताई म्हणते ते खरे आहे अगदी चिन्यांबबत नाही तर या मुसलमानांच्या बाबातही. काय माहीत यांचा पैसा मुंबईत अतिरेकी कारवायांसाठी सुध्दा वापरला जावु शकतो
बाकी जगभरात जे काही मि.पा. सदस्य पसरले आहेत ते एका अतुट, अनामिक नात्याने (मग कितीही वाद संवाद असो) एकमेकांशी घट्ट बांधले गेलेले आहेत हे अगदि खरं. ही वीण अशीच उत्तरोउत्तर अधिक घट्ट होवो हिच प्रार्थना.
स्वगतः- का बा कुणास ठाऊक मला इतर (मायबोली, ऐसी अक्षरे..., उपक्रम) स्थळांपेक्षा मिसळपावच जास्त आवडते.
24 Mar 2014 - 11:32 pm | खटपट्या
पम्यादादा, बेकरी व्यवसायात यवन सोडले तर आहेत कोण ?
25 Mar 2014 - 12:12 am | आदूबाळ
शेळके ;)
25 Mar 2014 - 9:57 am | प्रमोद देर्देकर
का बरे खटपट्या , भयै लोक गुजराती, पारसी लोक आहेतचकी या लाईन मध्ये.
शिवाय सध्या या गेल्या ५ वर्शात वर्षात संपुर्ण ठाण्यामध्ये धडाधड २५ / ३० तरी बँगलोर अय्यंगार बेकरीज ओपन झाल्यात. आमच्या कळव्यातच एकाच रस्त्यावर ३ दुकाने आहेत. शिवाय ते कोणत्याही बेकरीच्या पदार्थात अंड सुध्दा वापरत नाहीत.
24 Mar 2014 - 11:36 pm | खटपट्या
आणि मग तसं ठरवलं तर वडापाव खाणे बंद करावे लागेल.
25 Mar 2014 - 10:08 am | प्रमोद देर्देकर
साफ चुक. तुमचा पाव आता दुर्गम भागात सुध्दा पोहचलाय. सध्या कोकणी माणुस शहरात धावत आहे. पण भयै लोक डोक्यावर पेटारा घेवुन कोकणातील डोंगर दर्यातुन फिरत बेकरीचे पदार्थ विकत आपली उपजिवीका करत आहेत. आमच्या गावत दर २ दिवसाआड ते येतात. तसेच चालत पुढच्या गावात जातात. गाडीची वाट नाही बघत बसत.
24 Mar 2014 - 3:02 pm | आदूबाळ
हे पाकिस्तानी / चिनी उपहारगृहांत न जायचं लॉजिक झेपलं नाही. (धाग्याचा काश्मीर करणं हा उद्देश नाही हेवेसांनल)
24 Mar 2014 - 3:22 pm | बॅटमॅन
सहमत आहे, आपली राष्ट्रभक्ती जाहीर करायचा हा अंमळ केविलवाणा मार्ग वाटतो. पाकडे पॉलिटिशियन हरामखोर आहेत म्हणून सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिकही हरामीच असतो असे कै नै. माझ्या एका जवळच्या मित्राचे कॉलेज रूममेट्स दोघेही पाकडे आहेत अन त्यांचं छान चाललं आहे.
(ता.क. मित्र हिंदू आहे, इन केस समवन इज वंडरिंग.)
24 Mar 2014 - 5:54 pm | यसवायजी
+१
निनादने दुसरा धागा काढतो म्हटल्यावर जरा वाट पहावी म्हणत होतो.
24 Mar 2014 - 7:06 pm | दिव्यश्री
मी कुठे म्हणाले कि हे मी देशप्रेम,राष्ट्रभक्ती ई. दाखवण्यासाठी करते ??? *SCRATCH*
माझा प्रतिसाद नीट वाचला तर समजेल मला काय म्हणायचं आहे ते . :(
बाकी कुणी कुठे जावं , खावं, प्यावं याच्याशी मला काहीही देण-घेण नाही . मी फक्त माझ मत व्यक्त केल . त्यादिवशीही मी निनाद यांना सांगितलं होत तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता , मी घरून व्यवस्थित खाउन आले आहे . मी तिथे येणार नाही म्हणून मी त्यांच्या जाण्यावर कुठलंही बंधन केल नाही , आडकाठी केली नाही .
धाग्याच काश्मीर करायचं नसेल तर हा विषय इथेच थांबवा . तसेही हा विषय मी काढलेला नाही . शतकी ,द्विशतकी धाग्यांची मला हौस नाही . ज्यांना त्याच्यात रुची असेल त्यांनी जरूर वेगळा धागा काढावा .
25 Mar 2014 - 1:37 am | गणपा
वरील प्रतिसादाने आपण आपल्या स्वाक्षरीला जागणार याची खात्रीच पटली. ;)
25 Mar 2014 - 1:41 am | प्रभाकर पेठकर
>>>>आपली राष्ट्रभक्ती जाहीर करायचा हा अंमळ केविलवाणा मार्ग वाटतो.
केविलवाणा का बरं? मुळात राष्ट्रभक्ती वगैरे मनांत आहे. ती जाहीर करण्याची अजिबात गरज नसते. पण मित्रमंडळींमध्ये सहज संवादात आपले खरे मत मांडले तर ते केविलवाणे ठरते? बरं! ठरू दे. आहे ते आहे.
25 Mar 2014 - 1:06 pm | निनाद मुक्काम प...
सहमत
प्रत्येक माणसांची अनेक मुद्यांवर आपली ठाम मते , गृहीतके असतात. प्रत्येकवेळी आपल्या मतांशी ती सामाईक असणे अनिवार्य नसते , व्यक्ती तितक्या प्रक्रुती असतात.
दिव्यश्री ह्यांचा पाकिस्तानी उपहारगृहात न खाणे किंवा सुधीर काळे ह्यांचा चीनी वस्तूंवर बहिष्कार असे अनेक मुद्दे मला जरी पटले नसले तरी ह्या हेतू मागील त्यांच्या भूमिकेवर मला कधीच संशय नव्हता, ह्या भूमिकेवरून आमच्यात मतांतरे असतील तर प्रत्येकाला आपापली मते असण्याचा अधिकार आहे.
मिपा मला एका कुटुंबासारखे आहे , मतांतरे असून माझा येथील सर्व सद्स्यानावर लोभ आहे.
पण जेव्हा माझी एखाद्याशी मतांतरे होतात तेव्हा तो आयडी कोणाचा आहे ह्यापेक्ष्या मुद्यांना माझा विरोध मी व्यक्त करतो.
हा विरोध वैचारिक असतो , वयक्तिक नसतो , नसावा
लवकरच भेटूया.
एका नवीन शतकी धाग्यासह.
25 Mar 2014 - 12:21 am | विनोद१८
पण सिग्नाचर लाइन 'नयी हुं मय...पर अकेलीही सब पे भारी हुं मय' छानच.
विनोद१८.
26 Mar 2014 - 11:38 pm | पैसा
वृत्तांत, त्याबद्दलची चर्चा, सगळं मस्तच आहे! दिव्यश्री 'नयी हुं मय...पर अकेलीही सब पे भारी हुं मय' अगदी मस्त खरं करून दाखवलंस! आता आम्हाला अजून एक खमकी आणि खमंग मिपाकर मिळाल्याचा प्रचंड आनंद झाला आहे!
27 Mar 2014 - 11:30 am | दिव्यश्री
एक खमकी आणि खमंग >>>अश ना म्हणाच...आपण किती सध्या , सालस, गरीब ,बिचार्या ईई. णा . ;) :P