पौष्टिक मूग भजी

वासु's picture
वासु in पाककृती
23 Dec 2013 - 12:47 pm

काल रविवार होता आणि काहितरी चटक-मटक खाण्याचा मूड होता. मग मूग भजीची आठवण आली. मूग हे कडधान्य आहे आणि ते पौष्टिक पण आहे. घरात मिरची, कोथिंबीर, अदरक-लसूण, बेसन हे होतच. मग पटकन जाऊन
भिजलेले हिरवे मूग घेउन आले.(भिजलेले हिरवे मूग नसल्यास मूगाची डाळ ३-४ तास भिजत घालावे)

आता लगेच तयारीला लागले.

साहित्य :
२५० ग्राम भिजलेले मूग
४-५ हिरव्या मिरच्या (तिखट)
आर्धी गड्डी चिरलेली कोथिंबीर
अर्धा चमचा अदरक-लसूणची पेस्ट
हळद
जीरे
बेसन
मीठ आणि
लाल तिखट
तेल
सौस / हिरव्या चटणी किंवा चिंच,गूळ,खजूराच्या गोड चटणी

आता कृती:

भिजलेले हिरवे मूग असल्यास बारीक वाटून घ्यावे.
मूग डाळ / कच्चे हिरवे मूग असल्यास किमान ३-४ तास पाण्यात भिजत ठेवावे. नंतर त्यातील पाणी काढून टाकून पाणी न घालता बारीक वाटून घ्यावे.

नंतर मिरच्या, कोथिंबीर, जिरे वाटून घ्यावे.

आता एका पातेलात वाट्लेले मूग, बेसन, हळद, लाल तिखट(रन्ग येण्यासाठी, स्वादानुसार), मीठ(स्वादानुसार) आणि वरील वाटलेले मिश्रण एकत्रित करावे.

मग कढईत तेल घ्यावे. मिडीयम हाय गॅसवर कढईत तेल तापत ठेवावे.

चमच्याने किंवा हाताने डाळीचे मिश्रणाचे छोटे गोळे तेलात सोडावे.

भज्यांना गोल्डन ब्राऊन रंग आला कि (अधिकचे तेल असल्यास थोडावेळ कागदावर) काढून टाकावे.

सौस किंवा हिरव्या चटणीबरोबर किंवा चिंच,गूळ,खजूराच्या गोड चटणीबरोबर गरमागरम भज्या खाव्यात. :-)

नोट : मला फोटो कसा टाकायचा हे माहिती नाही. :-( नाहीतर फोटो टाकला असता.

प्रतिक्रिया

मारकुटे's picture

23 Dec 2013 - 12:54 pm | मारकुटे

अदरक? आलं हा साधा सुधा शब्द माहित नाही.

मारकुटे's picture

23 Dec 2013 - 12:55 pm | मारकुटे

मिडीयम हाय गॅसवर - मध्यम आचेवर
गोल्डन ब्राऊन - तपकिरी लालसर

मारकुटे's picture

23 Dec 2013 - 12:57 pm | मारकुटे

प्रतिक्रिया राहिलीच

छान पाकृ. अगदी सगळ्यांना माहिती असेल अशी ;)

वासु's picture

23 Dec 2013 - 1:00 pm | वासु

क्षमा करा हा.. मी पहिल्यान्दाच लिहितिये. मराठीत लिहायला थोड अवघड जातय.

मारकुटे's picture

23 Dec 2013 - 1:01 pm | मारकुटे

ओके.

प्रयत्न करा नक्की जमेल.

प्रभाकर पेठकर's picture

23 Dec 2013 - 1:01 pm | प्रभाकर पेठकर

बेसन = चण्याचे (किंवा चण्याच्या डाळीचे) पीठ
गड्डी = जुडी

सोस = सॉस.

प्यारे१'s picture

23 Dec 2013 - 1:24 pm | प्यारे१

हल्ली पाकृ अशीच असते. ;)
शॅलो फ्राय, डीप फ्राय, प्युरी, मॅश वगैरे.
-'आपण सारे खवय्ये' ते 'सुगरण सुगरण करते संसार' ते 'विष्णू मनोहर' ते अमुल मास्टर शेफ बघितलेला प्यारे

शाला टुम लोग भजी खाने को आया के भाषा?
काय ओ पेठकर काका, कधी किचन मध्ये तरी गेलाय का तरी तुम्ही सांगा तरी? ;)
उगा आपलं....
(मरतंय आता प्यारे)

सूड's picture

23 Dec 2013 - 1:36 pm | सूड

काका!! भाषापण तितकीच महत्त्वाची!! आपणच असं हिंदाळलेलं किंवा इंग्रजाळलेलं रेशिप्यांमध्ये बोलत राह्यलो तर शिंची पुढची पिढी काय शिकणार आँ?
पण काही म्हणा पेरभर आलं, उजव्या हातानेच तेल/ तूप घालणे, आधण. कांद्याच्या/ काकडीच्या अंगच्या पाण्यात पीठ भिजवणे असे शब्द हल्ली कमी ऐकू येऊ लागलेत हो !! आमच्यावेळी असं नव्हतं. ;) *JOKINGLY*

प्रभाकर पेठकर's picture

23 Dec 2013 - 4:22 pm | प्रभाकर पेठकर

>>>>काय ओ पेठकर काका, कधी किचन मध्ये तरी गेलाय का तरी तुम्ही सांगा तरी?<<<<

नाही ब्बॉ! आम्ही आपले स्वयंपाक घरातच लुडबुड करणारे.

फोटो नसल्याने रेशिपी बाद धरली आहे.

मला फोटो कसा टाकायचा हे माहिती नाही.

नाहीतर फोटो टाकला असता.

वासु's picture

23 Dec 2013 - 1:39 pm | वासु

मी 'सॉस' लिहायचा प्रयत्न केला पण लिहायला जमलच नाही. :-(

खर सान्गु तर मी मराठी नाही. तरी माझा प्रयत्न चालू आहे.

s'O's असं लिहून बघा बरं?? ओ कॅप्स ठेवा.

धन्यवाद... अजुन एक विचारायच होत की, एखाद्या अक्षरावर टिम्ब कसा द्यायचा?

प्रचेतस's picture

23 Dec 2013 - 1:48 pm | प्रचेतस

चान चान.
वर धाग्यात बरीच टिंबाटिंबी केलेली दिसतीय की.

हेच लिहायला आलो होतो!! बाई आमच्या मीनाक्षीच्या पावलावर पाऊल ठेवणारसं दिसतंय!! ;)

वासु's picture

23 Dec 2013 - 1:52 pm | वासु

आता ही मीनाक्षी कोण?

होईल हळूहळू ओळख तिच्याशीही!! जरा दम धरा.

अत्रुप्त आत्मा's picture

23 Dec 2013 - 3:20 pm | अत्रुप्त आत्मा

@ मीनाक्षीच्या पावलावर पाऊल ठेवणारसं दिसतंय!! Wink>>> =)) शहमत हाय! =))

दिपक.कुवेत's picture

24 Dec 2013 - 12:47 pm | दिपक.कुवेत

ईकडे अक्षरावर काय अक्षराखाली पण टिंब/टिंबे देता येतं/येतात........त्यासाठि मिपाचे नवकथाकार "जीवनभौ" चे धागे वाचा!

मारकुटे's picture

23 Dec 2013 - 1:43 pm | मारकुटे

तुमच्या इंग्रजीवरुन तुम्हाला कुणी काही बोलले असते तर तुम्ही मी इंग्लिश नाही तरी माझा प्रयत्न चालू आहे असे उत्तर दिले असते का?
नाही.
उलट आपल्याला इंग्रजी येत नाही याची शरम वाटून तुम्ही इंग्रजी सुधारले असते.
अशीच शरम तुम्हाला मराठी येत नाही याची वाटू द्या आणि मराठी सुधरवा. अजूनही वेळ गेलेली नाही.

मारकुटे काका, म्हणुनच सान्गितल कि माझा मराठीत लिहिण्याचा प्रयत्न सुरु आहे.

मला फोटो कसा टाकायचा हे माहिती नाही. :-(

नाहीतर फोटो टाकला असता.

अनुप ढेरे's picture

23 Dec 2013 - 1:51 pm | अनुप ढेरे

http://www.misalpav.com/help.html
तांत्रिक माहितीसाठी हा धागा बघा.

वासु's picture

23 Dec 2013 - 1:53 pm | वासु

धन्यवाद :-)

सुहास..'s picture

23 Dec 2013 - 1:56 pm | सुहास..

कृपया मराठीचा क्लास सुरु करावा ....( हि सुचना अर्थातच ज्याला कळायची त्याला कळली आहे ;) )

पाकृवर भाषासंबधी अजिबात धोरणे नसलेला, दिसले की खा म्हणणारा खादाड्या

युगन्धरा@मिसलपाव's picture

23 Dec 2013 - 1:56 pm | युगन्धरा@मिसलपाव

वासु तुम्ही बिन्धास्त लिहा हो शब्दांपेक्षा भावना मह्त्वाची...

प्रभाकर पेठकर's picture

23 Dec 2013 - 4:32 pm | प्रभाकर पेठकर

'काल येताना माझ्या गाडीत मला खाज आली.'

शब्द जाऊ द्या आणि भावनाही राहू द्या बाजूला. एक अनुस्वार जरी चुकून पडला तरी घोर अनर्थ होऊ शकतो.

दिपक.कुवेत's picture

24 Dec 2013 - 12:42 pm | दिपक.कुवेत

काका "अनुस्वार" राहु द्या....खाज महत्वाची!

जेपी's picture

23 Dec 2013 - 2:07 pm | जेपी

भजी आवडली आहेत .

अवांतर :- युगंधरा @मिसलपाव यांचे बोलणे मनावर घ्या आणी 'मुरलेल्या' सॉरी उरलेल्या भजाच काय कराव यावर पुढचा लेख लगेच लिहा .

जिलेबीबरोबर (मिपावरची नाही, खरोखरची);) मस्त लागतात मुगभजी.

वासु's picture

23 Dec 2013 - 2:18 pm | वासु

अस असेल तर मी पण एकदा ट्राय करेन जिलेबीबरोबर खाण्याचा

ज्ञानोबाचे पैजार's picture

23 Dec 2013 - 4:11 pm | ज्ञानोबाचे पैजार

हि पा.कृ. अंडे घालुन करता येईल का?

हो. एकदा अंड घातलं की काही पण करता येईल.

खिक्क, प्रश्न कितपत कळतो ते बघू आता. *JOKINGLY*

ज्ञानोबाचे पैजार's picture

23 Dec 2013 - 4:23 pm | ज्ञानोबाचे पैजार

या माणसाला कसला शिरीयसनेसच नाही. कुठेपण खिक करतो.
अशाने प्रामाणीक पणे उत्तर देणार्‍याच्या मनात नको त्या शंका येतात.

वरील प्रश्र्ण अतिशय गांभिर्यपुर्वक, जबाबदारीने, आणि कळकळीने विचारला आहे व त्याच्या तितक्याच प्रामाणीक उत्तराची अपेक्षा आहे.

वासु's picture

23 Dec 2013 - 4:14 pm | वासु

अंडे घातल्यावर त्याची चव वेगळी लागेल.

वासु's picture

23 Dec 2013 - 4:15 pm | वासु

अंडे घातल्यावर त्याची चव वेगळी लागेल.

मारकुटे's picture

23 Dec 2013 - 4:15 pm | मारकुटे

कशाची चव वेगळी लागेल?

दिपक.कुवेत's picture

24 Dec 2013 - 12:40 pm | दिपक.कुवेत

काय कुटे......कुटे पण काय पण विचारतात!

देव मासा's picture

25 Dec 2013 - 9:55 pm | देव मासा

मूग भजि फार महाग मिळते गाडी वर, साधारण ३० रु. प्लेट, ति प्लेट पान इव्लि-इव्लिशि,खरच वर संगितल्या प्रमाने एवढे सोप्पे असेल तर, खटाटोप करायला हरकत नाहि, ताडी पिताना हा एक उत्तम चकना आहे.