काल रविवार होता आणि काहितरी चटक-मटक खाण्याचा मूड होता. मग मूग भजीची आठवण आली. मूग हे कडधान्य आहे आणि ते पौष्टिक पण आहे. घरात मिरची, कोथिंबीर, अदरक-लसूण, बेसन हे होतच. मग पटकन जाऊन
भिजलेले हिरवे मूग घेउन आले.(भिजलेले हिरवे मूग नसल्यास मूगाची डाळ ३-४ तास भिजत घालावे)
आता लगेच तयारीला लागले.
साहित्य :
२५० ग्राम भिजलेले मूग
४-५ हिरव्या मिरच्या (तिखट)
आर्धी गड्डी चिरलेली कोथिंबीर
अर्धा चमचा अदरक-लसूणची पेस्ट
हळद
जीरे
बेसन
मीठ आणि
लाल तिखट
तेल
सौस / हिरव्या चटणी किंवा चिंच,गूळ,खजूराच्या गोड चटणी
आता कृती:
भिजलेले हिरवे मूग असल्यास बारीक वाटून घ्यावे.
मूग डाळ / कच्चे हिरवे मूग असल्यास किमान ३-४ तास पाण्यात भिजत ठेवावे. नंतर त्यातील पाणी काढून टाकून पाणी न घालता बारीक वाटून घ्यावे.
नंतर मिरच्या, कोथिंबीर, जिरे वाटून घ्यावे.
आता एका पातेलात वाट्लेले मूग, बेसन, हळद, लाल तिखट(रन्ग येण्यासाठी, स्वादानुसार), मीठ(स्वादानुसार) आणि वरील वाटलेले मिश्रण एकत्रित करावे.
मग कढईत तेल घ्यावे. मिडीयम हाय गॅसवर कढईत तेल तापत ठेवावे.
चमच्याने किंवा हाताने डाळीचे मिश्रणाचे छोटे गोळे तेलात सोडावे.
भज्यांना गोल्डन ब्राऊन रंग आला कि (अधिकचे तेल असल्यास थोडावेळ कागदावर) काढून टाकावे.
सौस किंवा हिरव्या चटणीबरोबर किंवा चिंच,गूळ,खजूराच्या गोड चटणीबरोबर गरमागरम भज्या खाव्यात. :-)
नोट : मला फोटो कसा टाकायचा हे माहिती नाही. :-( नाहीतर फोटो टाकला असता.
वाचने
17792
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
हिंदीचा घाणेरडा प्रभाव
ईंग्रजीचा घाणेरडा प्रभाव
प्रतिक्रिया राहिलीच
पट्कन लिहल गेल
ओके. प्रयत्न करा नक्की जमेल.
In reply to पट्कन लिहल गेल by वासु
लिखाणही पौष्टीक असू द्या.
हल्ली पाकृ अशीच असते.
काका!! भाषापण तितकीच
In reply to हल्ली पाकृ अशीच असते. by प्यारे१
छे: हो...
In reply to हल्ली पाकृ अशीच असते. by प्यारे१
फोटो नसल्याने रेशिपी बाद धरली
मला फोटो कसा टाकायचा हे माहिती नाही.
In reply to फोटो नसल्याने रेशिपी बाद धरली by सूड
माझा प्रयत्न चालू आहे
s'O's असं लिहून बघा बरं?? ओ
In reply to माझा प्रयत्न चालू आहे by वासु
एखाद्या अक्षरावर टिम्ब कसा द्यायचा?
In reply to s'O's असं लिहून बघा बरं?? ओ by सूड
चान चान.
In reply to एखाद्या अक्षरावर टिम्ब कसा द्यायचा? by वासु
हेच लिहायला आलो होतो!! बाई
In reply to चान चान. by प्रचेतस
मीनाक्षी कोण?
In reply to हेच लिहायला आलो होतो!! बाई by सूड
होईल हळूहळू ओळख तिच्याशीही!!
In reply to मीनाक्षी कोण? by वासु
@ मीनाक्षीच्या पावलावर पाऊल
In reply to हेच लिहायला आलो होतो!! बाई by सूड
ओ तै
In reply to एखाद्या अक्षरावर टिम्ब कसा द्यायचा? by वासु
मराठी अमराठी
In reply to माझा प्रयत्न चालू आहे by वासु
मराठीत लिहिण्याचा प्रयत्न सुरु आहे.
In reply to मराठी अमराठी by मारकुटे
मला फोटो कसा टाकायचा हे माहिती नाही.
http://www.misalpav.com/help
In reply to मला फोटो कसा टाकायचा हे माहिती नाही. by वासु
धन्यवाद
कृपया मराठीचा क्लास सुरु
वासु तुम्ही बिन्धास्त लिहा हो
भावनेइतकेच शब्द महत्वाचे.
In reply to वासु तुम्ही बिन्धास्त लिहा हो by युगन्धरा@मिसलपाव
खि खि खि
In reply to भावनेइतकेच शब्द महत्वाचे. by प्रभाकर पेठकर
भजी आवडली आहेत .
जिलेबीबरोबर (मिपावरची नाही,
मी पण एकदा ट्राय करेन
हि पा.कृ. अंडे घालुन करता
हो. एकदा अंड घातलं की काही पण
In reply to हि पा.कृ. अंडे घालुन करता by ज्ञानोबाचे पैजार
खिक्क, प्रश्न कितपत कळतो ते
In reply to हि पा.कृ. अंडे घालुन करता by ज्ञानोबाचे पैजार
या माणसाला कसला शिरीयसनेसच
In reply to खिक्क, प्रश्न कितपत कळतो ते by सूड
मग चव वेगळी लागेल.
मग चव वेगळी लागेल.
कशाची चव वेगळी लागेल?
In reply to मग चव वेगळी लागेल. by वासु
अंडयाची
In reply to कशाची चव वेगळी लागेल? by मारकुटे
मूग भजि फार महाग मिळते गाडी