मिपावर्धापनदिनाच्या शुभेच्छा...

Primary tabs

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
9 Sep 2013 - 9:57 am

समस्त मिपाकरांना गणेशोत्सवाच्या आणि मिपावर्धापनदिनाच्या अनेकानेक शुभेच्छा..

तसेच नीलकांत आणि मिपाचे सर्व संचालकमंडळ यांचे मनःपूर्वक आभार, अभिनंदन आणि शुभेच्छा..!

आपला नम्र,
(मिपा संस्थापक) तात्या.

----
कृपया आम्हाला येथे भेटा - शिळोप्याची ओसरी - https://www.facebook.com/groups/kbdbliberal/

संस्कृतीप्रकटन

प्रतिक्रिया

पैसा's picture

9 Sep 2013 - 10:03 am | पैसा

सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!

मुक्त विहारि's picture

9 Sep 2013 - 10:36 am | मुक्त विहारि

विशेषतः

मिपा संस्थापक तात्या यांना तर स्पेशल...

मला मिपाने फार भरभरून दिले आहे.ह्या सुखाची किंमत कशातही करता येणार नाही...

मिपा आणि मिपाकर असेच एकमेकांवर प्रेम करत राहो हीच अपेक्षा आहे..

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

10 Sep 2013 - 11:09 am | मिसळलेला काव्यप्रेमी

एक्झाटली, हेच म्हननार व्हतो...
ह्या सुखाची किंमत कशातही करता येणार नाही अन् मिपासारखी दुसरी जिवाभावाची चावडी कुटंबी गावनार न्हाई...
मुळात सुखाची व्याख्या नीट समजावून देणारी माणसे इथेच भेटली. कुणाकुणाचे नाव घ्यावे?
आणि हि तर सुरवात आहे, असेच बहरत बहरत या रोपट्याचा वटवृक्ष होवो हिच मनापासून शुभेच्छा.

प्रकाश घाटपांडे's picture

9 Sep 2013 - 10:36 am | प्रकाश घाटपांडे

तात्या आपण लावलेल रोपट कस फोफावलय ते पहा! सर्वांना शुभेच्छा!

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Sep 2013 - 11:03 am | डॉ सुहास म्हात्रे

अभिनंदन !!!

मिपाचे संस्थापक, चालक, संपादक, आणि सर्व मिपाकर मित्र मंडळींना अनेकानेक शुभेच्छा !

मिपा सापडले आणि मी मराठीत काहीबाही लिहू लागलो ! आता तर त्यात आणि इतरांशी जाल-चर्चा करण्यात पण मजा वाटायला लागली आहे. रोज एकदा तरी एखादा लेख वाचून अथवा त्यापेक्षा जास्त वेळेस खुसखुशीत प्रतिसाद वाचून खळखळून हसू येते आणि मन प्रसन्न होते. त्याबद्दल मिपाचे आभार !!

मिपा असेच वर्षानुवर्षे वृद्धिंगत होवो आणि आपल्या सर्व मिपाकरांची मैत्री अशीच खेळिमेळीत वाढत राहो हीच मनोकामना आज व्यक्त कराविशी वाटते आहे.

चिगो's picture

9 Sep 2013 - 11:26 am | चिगो

मिपा आपला जिवाभावाचा यारदोस्त आहे.. लगे रहो, यारां..

मिपा व्यवस्थापन,
आतापर्यंतच्या वाटचाली बद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा! गेल्या सांत वर्षात खूप काही दिलेत. येणारी पुढिल अनेक वर्षे भरभरून खूप काही मिळावे हीच अपेक्षा! मिपा परिवाराचा सदस्य असल्याचा अभिमान वाटतो.

उगा काहितरीच's picture

9 Sep 2013 - 11:36 am | उगा काहितरीच

+1

भ ट क्या खे ड वा ला's picture

9 Sep 2013 - 12:01 pm | भ ट क्या खे ड वा ला

सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

तिमा's picture

9 Sep 2013 - 12:06 pm | तिमा

मिपा

रिटायर झाल्यावर कुठल्या तरी बुढ्ढा क्लब मधे जाण्यापेक्षा, रोज मिपा वर हजेरी लावल्याने माझे मन वृद्ध झाले नाही. ज्ञान, चेष्टा-मस्करी, तोंडाला पाणी सुटणार्‍या पाकक्रिया आणि सर्वात महत्त्वाच्या 'प्रतिक्रिया', ज्या कधी पोट धरधरुन हंसवतात तर कधी अंतर्मुखही करतात. मिपा हे एकच असे व्यसन आहे की जे, सुटू नये म्हणून सर्वांनी प्रयत्न करावेत.

संजय क्षीरसागर's picture

9 Sep 2013 - 12:16 pm | संजय क्षीरसागर

सगळी टेक्निकल टीम विथ अखिल संपादक मंडळाला संकेतस्तळाच्या वर्धापनदिनी मन:पूर्वक शुभेच्छा. आणि सर्व लेखक, कवि आणि सदस्यांना लगे रहो!

तात्या आणि नीलकांत व इतर टेक टीमचे यानिमित्ताने आभार मानतो. मिपामुळे जी मजा येते त्याला तोड नाही. खर्‍या अर्थाने ग्लोबल नेटवर्क असलेले मिपा उत्तरोत्तर मोठे होवो आणि मायबोलीइतका पसारा वाढो अशी यानिमित्ताने शुभेच्छा व्यक्त करतो.

अभ्या..'s picture

10 Sep 2013 - 10:58 am | अभ्या..

+१
व्हय म्हाराजा.

विनोद निंबाळकर's picture

9 Sep 2013 - 1:22 pm | विनोद निंबाळकर

मिपाचे संस्थापक, संपादक, तांत्रिक टीम व सर्व मिपाकर मित्र मंडळींना वर्धापन दिनाच्या आणि गणेशोत्सवच्या हार्दिक शुभेच्छा!!

आतिवास's picture

9 Sep 2013 - 2:04 pm | आतिवास

अभिनंदन. पुढील वाटचाल निर्विघ्न आणि आनंददायी व्हावी यासाठी शुभेच्छा.
संपादक मंडळ मिपा चालू राहावे म्हणून जी मेहनत घेते त्याबद्दल त्यांचेही यानिमित्ताने आभार.

केदार-मिसळपाव's picture

9 Sep 2013 - 2:30 pm | केदार-मिसळपाव

मिसळपाव, वाढ-दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

नीलकांत's picture

9 Sep 2013 - 7:04 pm | नीलकांत

मिपाच्या सातव्या वर्षात पदार्पनाबद्दल सर्वांना शुभकामना. तसेच मिपावर प्रेम करणार्‍या सर्व मिपाकरांचे मनापासून आभार.

- नीलकांत

विसोबा खेचर's picture

9 Sep 2013 - 7:05 pm | विसोबा खेचर

धन्यवाद मालक.. :)

त्यामुळे आता ही फुलं देतो

pic

पिलीयन रायडर's picture

9 Sep 2013 - 7:28 pm | पिलीयन रायडर

मिपाला खुप खुप शुभेच्छा!!!!
तात्यांचे मि.पा काढल्या बद्दल आणि नीलकांतचे मि.पा चालु ठेवल्याबद्दल आभार!!
संपादकांचे लष्कराच्या भाकर्‍या बडवल्या सारखे स्वतःचा वेळ घालुन (आणि नस्ते शिव्याशाप खाऊन सुद्धा) इथे मॉनिटरगिरी केल्याबद्दल धन्यवाद!!!

प्रकाश घाटपांडे's picture

9 Sep 2013 - 7:39 pm | प्रकाश घाटपांडे

आणि सर्व मेंबरांना पण धन्यवाद द्या की! त्यांच्या मुळेच मिपाला हे भाग्य आहे

जॅक डनियल्स's picture

9 Sep 2013 - 7:46 pm | जॅक डनियल्स

मिपाकर आणि मिसळपाव ला हार्दिक शुभेच्छा !

जेपी's picture

9 Sep 2013 - 8:37 pm | जेपी

हार्दिक शुभेच्छा

पाषाणभेद's picture

9 Sep 2013 - 8:59 pm | पाषाणभेद

समस्त मिपाकरांना गणेशोत्सवाच्या आणि मिपावर्धापनदिनाच्या अनेकानेक शुभेच्छा..

तसेच तात्या, नीलकांत आणि मिपाचे सर्व संचालकमंडळ यांचे मनःपूर्वक आभार, अभिनंदन आणि शुभेच्छा..!

(अन आम्हीच आम्हाला शुभेच्छा द्यायच्या का?)
आपला नम्र,
(मिपा वापरकर्ता) पाभे.

सौ.मुवि's picture

9 Sep 2013 - 9:15 pm | सौ.मुवि

हार्दिक शुभेच्छा...

मी-सौरभ's picture

9 Sep 2013 - 9:30 pm | मी-सौरभ

सर्वांनाच शुभेछा!!

llपुण्याचे पेशवेll's picture

9 Sep 2013 - 9:48 pm | llपुण्याचे पेशवेll

मिपाला शुभेच्छा. अनेक जुने मित्र मिपावर येत नाहीत किंवा हाकलले गेले आहेत त्यांची राहून राहून फार आठवण येते.
जसे टार्‍या, कोदा, परा, आंद्या, रंगा-रेवती, प्राजु, मितान, प्रसन्न केसकर, केसु, चित्तर, लांबड लावावी तितकी कमीच. तसेच मोडक, यकु अशा काही मित्रांची आठवण देखील अस्वस्थ करून जाते.

हैला! पुप्या, लेका मला हाकललस मिपावरून? थांब बघते तुझ्याकडे!

llपुण्याचे पेशवेll's picture

11 Sep 2013 - 10:15 am | llपुण्याचे पेशवेll

अरे वा रेवतीकाकू आहे की इथे. रंगाकाका दिसत नाही हल्ली. प्राजु पण कुठे गुडूप्प झालीये कळत नाही.

मुक्ती's picture

9 Sep 2013 - 10:09 pm | मुक्ती

वाढदिवसाच्या सर्वांनाच शुभेच्छा!

या मोजकाचा संकल्प करणारे तात्या; स्वयंपाकघर नेहमी तय्य्यार ठेवणारे निलकांत, टेक्ल्नीकल टीम; नैवेद्याचे पावित्र्य जपणारे संपादक मंडळ; आणि आपापल्या टाळ-मृदुंगासह आरतीला हजर असणारे सभासद, वाचक... सर्वांची जय हो :)

गणपतीबाप्पा मोरया.

>>या मोजकाचा संकल्प करणारे..
-- या मोदकाचा संकल्प करणारे

विजुभाऊ's picture

9 Sep 2013 - 10:28 pm | विजुभाऊ

पेशव्या खरे आहे रे.
मिपा मुळे मला इकडे फार काही लांब आल्यासारखे वाटत नाही.

अत्रुप्त आत्मा's picture

9 Sep 2013 - 11:03 pm | अत्रुप्त आत्मा

सर्वांना मि.पा. वर्धापनाच्या अनेकानेक शुभेच्छा! http://www.sherv.net/cm/emo/happy/thumbs-up.gif
=================================
मि.पा.ही आमची लहानपणीची खेळण्याबागडण्याची क्रिकेट-गल्ली आहे! त्याही शिवाय मोठं होताना जे काही पचवलं..अंगी लागलं/लागलं नाही अश्या अनेक गोष्टींची उजळणी/नविन शिकवणी देणारी साळा पण आहे. :)
=================================
समांतर-स्मायल्या आणी मी यांची अफ्फाट जोडी जमली,ती मि.पा.मुळेच... http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-dancing.gif

अब स्मायली हमारा श्वास है। http://www.sherv.net/cm/emoticons/yes/happy-yes-smiley-emoticon.gif
और हम स्मायली के पास है॥ http://www.sherv.net/cm/emo/happy/too-happy-smiley-emoticon.gif

मुक्त विहारि's picture

10 Sep 2013 - 7:34 am | मुक्त विहारि

"नविन शिकवणी देणारी साळा पण आहे."

चित्रगुप्त's picture

9 Sep 2013 - 11:47 pm | चित्रगुप्त

सर्वप्रथम मिपा ही अद्भुत वस्तु जन्मास घालणार्‍या तात्यांना अनेक धन्यवाद आणि शुभेच्छा.
व्यवस्थापन, संपादन करणार्‍या सर्वांना, आणि सर्व सल्लागार, लेखक, वाचक, प्रतिसादक मिपाकरांना शुभकामना.
उत्तरोत्तर मिपा असेच समृद्ध होत जाओ, आणि अधून-मधून येणार्‍या इडापिडा टळोत.

विनोद१८'s picture

9 Sep 2013 - 11:52 pm | विनोद१८

*good* *THUMBS%%_%%UP* :GOOD: :good: *GOOD* *THUMBS UP*

अभिनन्दन...!!!!.. अभिनन्दन...!!!!.... अभिनन्दन...!!!!......


.......समस्त मिपाकराना, मिपाच्या ७ व्या वर्धापन दिनाच्या हार्दीक शुभेच्छा....!!!!!!!!!

मिपा अशीच उत्तरोत्तर वाढो व लोकप्रिय होवो अशी कामना करतो. *pleasantry* *db* :db:

विनोद१८

सुहास झेले's picture

10 Sep 2013 - 1:13 am | सुहास झेले

शुभेच्छा आहेतच... चिअर्स :) :)

शशिकांत ओक's picture

10 Sep 2013 - 1:16 am | शशिकांत ओक

मिपाच्या सप्तम वर्धापनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

10 Sep 2013 - 3:11 am | निनाद मुक्काम प...

मिपा चे अभिनंदन
ह्या निमित्ताने विनोद आठवला
मिपा जेव्हा तांत्रिक कारणाने बंद होते तेव्हा चेपू वर मी
मिसिंग मिसळपाव असे लिहिले होते.
तेव्हा मला माझ्या पुणेकर मित्राने
ये की पुण्यात तुला कडक मिसळ खायला घालतो असे सुनावले होते.
मिसिंग मिसळपाव अशी लिहिण्याची वेळ परत न येवो हीच गणराया कडे प्रार्थना

मिपावर योगायोगानेच आलो. ( हिंदी चित्रपटात हिरो हिरॉईनचा योगायोगाने एकमेकांचा धक्का लागणे, पुस्तके खाली पडणे, किंवा सायकलींची टक्कर होणे या चालीवर ) . मग "तुझसे खूबसूरत कोई नही" या स्टाईल वर दुसर्‍या संस्थळांकडे तिरका कटाक्षही टाकला नाही. सुरवातीला काहीनी तरास दिला पण या पीच वरचा बॉन्स लगेच कळून आला. या फोरमच्या
आयडीयेची कल्पना राबविणारे तात्या ( सचिन ) पुढे चालविणारे नीलकांत ( महेश कोठारे) व तांत्रिक मांत्रिक डोके चालविणारे प्रशांत ( अशोक सराफ) यांचा ऋणी आहे. गणपती बाप्पा मोरया ! मिपावर तुम्हीही एकदा या !

प्रशांत म्हणजे अशोक सराफ???????????
प्रशांत दामले म्हणा हवे तर. ;)

चौकटराजा's picture

10 Sep 2013 - 7:47 am | चौकटराजा

शून्य मनस्क शेजार्‍यांपेक्षा इथले चिमटे काढणारे अआ, वल्ली, स्नेहांकिता, मोदक, पकपकपक , धन्या, अभ्या, धमू , श्रीरंग जोशी यांचा स्नेह मोलाचा आहे. सोत्री, क्लिंटन, इस्पिक एक्क्का , चित्रगुप्त काका, विकास. श्री गुरूजी ,.बॅटमॅन यांचा पंखा आहे.

मुक्त विहारि's picture

10 Sep 2013 - 9:58 am | मुक्त विहारि

आम्ही तर ह्या मंडळी शिवाय इतरही अनेक मंडळींचे हावरे वाचक आहोत. त्यांत तुम्ही आणि पिडा काका पण आहातच..

सार्थबोध's picture

10 Sep 2013 - 8:59 am | सार्थबोध

सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!

सुमीत भातखंडे's picture

10 Sep 2013 - 9:44 am | सुमीत भातखंडे

वर्धापन दिनाच्या आणि गणेशोत्सवच्या हार्दिक शुभेच्छा!!!
मिपाला पर्याय नाही.

चावटमेला's picture

10 Sep 2013 - 10:15 am | चावटमेला

संस्थापक आणि सदस्यांचे अभिनंदन आणि पुढील प्रवासासाठी शुभेच्छा, तसेच मिपाने दिलेल्या अमूल्य ठेव्यासाठी मनापासून आभार.

कवितानागेश's picture

10 Sep 2013 - 10:23 am | कवितानागेश

मिसळपाव संस्थापकांचे, नीलकांतचे अभिनंदन आणि सर्व सदस्यांना शुभेच्छा.:)

संपादक मंडळ's picture

10 Sep 2013 - 10:31 am | संपादक मंडळ

मिपा संस्थापक श्री तात्या अभ्यंकर, विद्यमान चालक-मालक श्री. नीलकांत, सर्व आजी-माजी-भावी संपादक-सल्लागार, तांत्रिक समिती, सदस्य आणि असंख्य वाचक यांना श्रीगणेशचतुर्थी आणि मिपाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि धन्यवाद!

ए धतड् ततड् धतड् ततड्धतड् ततड्..

सातव्या वर्षात गेलं मिपा

षटवर्षपूर्तीचे गीत एका सुरात गात

सातव्या वर्षाचे स्वागत..

अत्रुप्त आत्मा's picture

10 Sep 2013 - 6:19 pm | अत्रुप्त आत्मा

कोमल... नविन स्मायली लै भारी! http://www.sherv.net/cm/emo/happy/happy.gif

स्मायली जालं-हितं ध्येय्यम्। कोमला न आत्मा स्तुति:॥ http://www.sherv.net/cm/emoticons/smile/happy-wink-smiley-emoticon.gif

कोमल's picture

11 Sep 2013 - 10:13 am | कोमल

>>>कोमला न आत्मा स्तुति:

चिअर्स गुर्जी...

अमोल केळकर's picture

10 Sep 2013 - 10:46 am | अमोल केळकर

मिसळ पाव परिवारास शुभेच्छा :)
गणपती बाप्पा मोरया

अमोल केळकर

पुण्याचे वटवाघूळ's picture

10 Sep 2013 - 11:03 am | पुण्याचे वटवाघूळ

हार्दिक शुभेच्छा. मी मिपाचे वाचन अगदी पूर्वीपासून करत आलो आहे. वर्षभर नुसते वाचल्यावर सदस्यत्वासाठी अर्ज केला आणि नंतर ३-४ महिन्यांनी सदस्यत्व मिळाले.सदस्यत्व मिळाल्यानंतरही वर्षभर मराठी नीट लिहिता येत नसल्याने तसा वाचनमात्रच होतो. तरीही प्रत्येक लेख, प्रत्येक प्रतिसाद वाचला आहे इथला मी.मिपामुळे माझे जीवन अत्यंत समृध्द झाले आहे. सर्व संस्थापकांचे, संपादकांचे आणि सदस्यांचे आभार. मिपाची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत जाओ आणि मराठी वेबसाईटमध्ये मिपाच पहिल्या क्रमांकाची वेबसाईट बनो ही शुभेच्छा.

पुण्याचे वटवाघूळ

विटेकर's picture

10 Sep 2013 - 11:09 am | विटेकर

काव्य- शास्त्र - विनोदाने माणसाचे जीवन समृद्ध होते. मिपाने असे समृद्ध जीवन जगण्यची संधी मला दिली याबद्दल आभार !
मिपा ही मर्मबंधातील ठेव आहे !

माझ्यासकट सर्वांचे अभिनंदन :)
आणि आपल्या सर्वांनाच शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी.. :)

संस्थापक आणि सदस्यांचे अभिनंदन आणि पुढील प्रवासासाठी शुभेच्छा !

सन्दीप's picture

10 Sep 2013 - 12:01 pm | सन्दीप

वर्धापन दिनाच्या आणि गणेशोत्सवच्या हार्दिक शुभेच्छा

दत्ता काळे's picture

10 Sep 2013 - 12:10 pm | दत्ता काळे

मिपाच आणि मिपापरिवाराला हार्दिक शुभेच्छा.

सर्वसाक्षी's picture

10 Sep 2013 - 9:59 pm | सर्वसाक्षी

मिपाचे संस्थापक, चालक, सल्लागार, कार्यकर्ते व सदस्यांचे अबिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

किसन शिंदे's picture

11 Sep 2013 - 8:01 am | किसन शिंदे

मिपाचे संस्थापक, चालक, सल्लागार, कार्यकर्ते व सदस्यांचे अबिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

.

+१ ह्येच म्हणतो.

शुभेच्छा द्यायच्या राहिल्या!

pic

अभ्या, जिओ!

नि३सोलपुरकर's picture

11 Sep 2013 - 5:42 pm | नि३सोलपुरकर

मिपाचे संस्थापक, चालक, सल्लागार, कार्यकर्ते व सदस्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

संक्षी शी १००% सह्मत - इतकी सुरेख सजावट करणार्‍या अभ्यालाही अनेकानेक शुभेच्छा!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Sep 2013 - 6:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नीलकांत आणि टीमचे मनःपूर्वक अभिनंदन. या वर्षात सापडलेला एक उत्तम कलाकार म्हणजे अभ्या.
उत्तम सजावट करणा-या अभ्याला स्पेशल शुभेच्छा.....!!!

-दिलीप बिरुटे
(मिपाकर)