डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना श्रद्धांजली !

धर्मराजमुटके's picture
धर्मराजमुटके in जनातलं, मनातलं
20 Aug 2013 - 9:48 am

नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार पुण्यात ओंकारेश्वर पुलावर सकाळी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.
या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. जरी त्यांच्या विचारांबाबत मतभेद असले तरी अशा प्रकारच्या हल्ला हा महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीवरचा हल्ला आहे. महाराष्ट्र वैचारिक अधोगतीच्या दिशेने चालला आहे हे निश्चित !

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना श्रद्धांजली !

समाजप्रकटन

प्रतिक्रिया

अत्यंत शरमेची आणि दुखःदायक आणि तितकीच संतापजनक घटना आहे.
>>महाराष्ट्र वैचारिक अधोगतीच्या दिशेने चालला आहे >> +१ ह्यापुढे पुरोगामी महाराष्ट्र म्हणवणार नाही, हे नक्की.

शशिकांत ओक's picture

24 Feb 2014 - 1:06 am | शशिकांत ओक

मारेकऱ्यांचा पत्ता?
एक प्रतिक्रिया सहा महिने

स्पा's picture

20 Aug 2013 - 9:57 am | स्पा

:(

मदनबाण's picture

20 Aug 2013 - 9:57 am | मदनबाण

अत्यंत वाईट बातमी ! :(
‘कालनिर्णयकार`जयंत साळगावकर यांचं देखील आज निधन झाले आहे. :(

मृगनयनी's picture

20 Aug 2013 - 11:56 am | मृगनयनी

'अंनिस" कार श्री. नरेन्द्र दाभोळकरांना भावपूर्ण श्रद्धांजली...
'कालनिर्णय' कार श्री. जयन्त सांळगांवकरांना भावपूर्ण श्रद्धांजली...

एक -महान ज्योतिष-अभ्यासक जयन्त साळगांवकर आणि दुसरे महान ज्योतिष विरोधक- नरेन्द्र दाभोळकर... यांचा दुर्दैवी मृत्यू एकाच दिवशी व्हावा.. हाही एक विचित्र योगायोग किन्वा दैवदुर्विलास !!! .... ~*~*~*~

दादा कोंडके's picture

20 Aug 2013 - 12:12 pm | दादा कोंडके

हाही एक विचित्र योगायोग किन्वा दैवदुर्विलास !!!

डॉ. नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली आहे. आणि साळगावकरांचा नैसर्गिक मृत्यु झाला आहे.

ज्योतिषवाल्या आणि बापू-अम्मावाल्या मंडळींना खरोखरच डॉ दाभोळकरांना आदरांजली वाहायची असेल तर त्यांच्या गुरूंचे फोटो आणि स्वतःच्या पत्रिका जाळून टाकाव्या.

मृगनयनी's picture

20 Aug 2013 - 12:24 pm | मृगनयनी

ज्योतिषवाल्या आणि बापू-अम्मावाल्या मंडळींना खरोखरच डॉ दाभोळकरांना आदरांजली वाहायची असेल तर त्यांच्या गुरूंचे फोटो आणि स्वतःच्या पत्रिका जाळून टाकाव्या.

कृपया.. धाग्याचे गाम्भीर्य पाळावे....

अनिरुद्ध प's picture

20 Aug 2013 - 1:22 pm | अनिरुद्ध प

+१११

पिशी अबोली's picture

20 Aug 2013 - 2:20 pm | पिशी अबोली

+१

प्रसाद१९७१'s picture

20 Aug 2013 - 2:57 pm | प्रसाद१९७१

ज्योतिषवाल्या आणि बापू-अम्मावाल्या मंडळींना खरोखरच डॉ दाभोळकरांना आदरांजली वाहायची असेल तर त्यांच्या गुरूंचे फोटो आणि स्वतःच्या पत्रिका जाळून टाकाव्या.

सहमत

जॅक डनियल्स's picture

20 Aug 2013 - 10:38 pm | जॅक डनियल्स

ज्योतिषवाल्या आणि बापू-अम्मावाल्या मंडळींना खरोखरच डॉ दाभोळकरांना आदरांजली वाहायची असेल तर त्यांच्या गुरूंचे फोटो आणि स्वतःच्या पत्रिका जाळून टाकाव्या.

आणि ती राख पण फेकून द्यावी -अंगारा म्हणून वापरू नये.
राख म्हणजे सिलिका-आलुमिना-लोह -काल्शीयम -अमोर्फस पदार्थांचे मिश्रण असते.

सुबोध खरे's picture

20 Aug 2013 - 11:38 pm | सुबोध खरे

संतो, कर्म कि गती न्यारी
मूरख को तुम राज दियत हो
पंडित फिरत भिखारी

मृगनयनी's picture

20 Aug 2014 - 1:15 pm | मृगनयनी

संतो, कर्म कि गती न्यारी
मूरख को तुम राज दियत हो
पंडित फिरत भिखारी

:) :) सहमत आणि धन्यवाद सुबोध'जी... :)

प्रभाकर पेठकर's picture

20 Aug 2013 - 10:03 am | प्रभाकर पेठकर

दोनही मृतात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

भावना कल्लोळ's picture

20 Aug 2013 - 2:12 pm | भावना कल्लोळ

भावपूर्ण श्रद्धांजली.

पिंपातला उंदीर's picture

20 Aug 2013 - 10:05 am | पिंपातला उंदीर

धक्कादायक, संतापजनक, असहिष्णू, भ्याड

महाराष्ट्र वैचारिक अधोगतीच्या दिशेने चालला आहे ह्यापुढे पुरोगामी महाराष्ट्र म्हणवणार नाही, हे नक्की.

प्रचेतस's picture

20 Aug 2013 - 10:05 am | प्रचेतस

भावपूर्ण श्रद्धांजली.

सौंदाळा's picture

20 Aug 2013 - 10:07 am | सौंदाळा

आता बदल घडवणारी समाजसेवा करताना विचार करायला लागेल.
काही वर्षापुर्वी तळेगावमधे आर्.टी.आय कार्यकर्ते सतिश शेट्टी यांची हत्या, पत्रकार जे.डे. यांची मुंबईत केलेली हत्या आठवल्या एकदम :(
हल्लेखोरांना लवकरात लवकर पकडुन कडक शिक्षा व्हावी.
डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना श्रद्धांजली. अंधश्रद्धेविरुद्धचा लढा पोरका झाला.

शिवोऽहम्'s picture

20 Aug 2013 - 10:09 am | शिवोऽहम्

:(

महाराष्ट्रात आज जे काही चालल्रे आहे, विचारांचा प्रतिवाद लाठ्या-काठ्या किंवा गोळ्यांनी देण्याचा जो पायंडा पडतो आहे त्याबद्दल काय बोलायचं?

राजा कालस्य कारणम् हेच खरंय.

उपाशी बोका's picture

20 Aug 2013 - 10:14 am | उपाशी बोका

एकदम धक्कादायक बातमी.

अमोल केळकर's picture

20 Aug 2013 - 10:15 am | अमोल केळकर

महाराष्ट्राचे दोन दिग्गज व्यक्तीमत्व श्री जयंत साळगावकर आणि डॉ नरेंद्र दाभोळकर

या दोघांना भावपूर्ण श्रध्दांजली.

ज्या भ्याड पध्दतीने डॉ नरेंद्र दाभोळकरांवर पुण्यात हल्ला झाला त्याचा जाहीर निषेध

नानबा's picture

20 Aug 2013 - 10:22 am | नानबा

दुर्दैवी घटना!
डॉ. दाभोळकरांना भावपूर्ण श्रद्धांजली, आणि गुन्हेगार लवकर पकडले जातील एवढीच (माफक) अपेक्षा.

दादा कोंडके's picture

20 Aug 2013 - 10:35 am | दादा कोंडके

डॉ दाभोळकरांना आदरांजली.

खूनी पकडले जातील कदाचित पण खरे गुन्हेगार पकडले जाण्याची शक्यताच नाही.

पांथस्थ's picture

20 Aug 2013 - 11:08 am | पांथस्थ

खूनी पकडले जातील कदाचित पण खरे गुन्हेगार पकडले जाण्याची शक्यताच नाही.

पुर्ण पणे सहमत! कर्ते करविते बाजुलाच राहतील.

हुप्प्या's picture

20 Aug 2013 - 10:43 am | हुप्प्या

एका बुद्धीमान, बुद्धीवादी विचारवंताची अशी हत्या होणे लाजिरवाणे आहे. ह्या माणसाचे स्वच्छ, तर्कशुद्ध विचार ऐकणे हा एक आनन्ददायक अनुभव होता. त्यांच्या ध्येयवादी अन्धश्रद्धाविरोधी चळवळीबद्दल मला आदर आहे. बाबा आमटे, पु.ल. देशपांडे ह्यांच्या पंक्तीतला हा माणूस.
माझ्या महाराष्ट्रात असे काही होते आहे हे अजूनही खरे वाटत नाही. हे एक दु:स्वप्न असावे अशी आशा.

माझी ह्या थोर माणसाला श्रद्धांजली. असे शेकडो, हजारो दाभोळकर पुन्हा निर्माण होवोत. आणि ह्या निंद्य कृत्यामागे असणार्‍या सगळ्यांना फाशी होवो.

चौकटराजा's picture

20 Aug 2013 - 10:43 am | चौकटराजा

म्हाराष्ट्र गाडगे बाबांचा आहे, फुल्यांचा आहे, आंबेडकरांचा आहे, तुकोबांचा आहे, शाहू महाराजांचा आहे, ज्ञानदेवांचा आहे
मग अशा महान परंपरा असलेल्या म्हाराष्ट्रात लोकाना अशी अवदसा का आठवते ? की वरील सगळी थोर मंडळी फक्त
पुतळे उभारण्यासाठी आपण वापरीत आहोत ?

ज्ञानोबाचे पैजार's picture

20 Aug 2013 - 10:46 am | ज्ञानोबाचे पैजार

दाभोळकरांसारख्या व्यक्तीमत्वाचा अशा प्रकारे झालेला अंत मनाला क्लेश देउन गेला.
पाशवी आणि विकृत मनोवृतीचे लोकच अशा प्रकारचे कृत्य करु शकतात.
या हत्येचा निषेध करण्यापलिकडे आपण काहीच करु शकत नाही याचा खेद होतो आहे.
दाभोळकरांना भावपुर्ण श्रध्दांजली.
पैजारबुवा,

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Aug 2013 - 11:03 am | डॉ सुहास म्हात्रे

दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली.

विचार जुळत / आवडत नाहीत म्हणून अशी ह्त्या करणे हे भ्याडपणाचे आणि समाजाच्या प्रकृतीबद्दलच्या चिंतेचे कारण आहे !

हे अज्ञानी लोकांना कळेल तो सुदिन
pic

दाभोळकर अत्यंत महत्त्वाचं काम करत होते. ते कार्य पुढे जावं यासाठी त्यांनी कार्यकर्ते निर्माण केलेत. घटना केवळ महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण देशाच्या मानसिकतेला लज्जास्पद ठरावी अशी आहे.

मृत्यू तर सर्वांनाच आहे. दाभोळकरांचा मृत्यू त्यांच्या कार्याला झळाळी देवो आणि `हत्या करावी' इतका हा प्रभावी विचार काय होता? याचा जनमानसाला विचार करायला प्रवृत्त करो, या आशेनं विनम्र श्रद्धांजली वाहतो.

अवतार's picture

20 Aug 2013 - 11:35 am | अवतार

जी व्यवस्था टिकवण्यासाठी शस्त्रांचा वापर करून दडपशाही करावी लागते ती व्यवस्था नष्ट होण्याची सुरुवात झालेली असते.

शिवोऽहम्'s picture

20 Aug 2013 - 12:19 pm | शिवोऽहम्

सहमत.

मालोजीराव's picture

20 Aug 2013 - 11:07 am | मालोजीराव

निशस्त्र आणि बुद्धिवादी व्यक्तीवर केलेला भ्याड हल्ला…जे कोण याच्या मागे असेल त्याची बौद्धिक पातळी किती खालची असेल याचा अंदाज येतो

बिपिन कार्यकर्ते's picture

20 Aug 2013 - 11:10 am | बिपिन कार्यकर्ते

हे खरंच घडतंय?

लाल टोपी's picture

20 Aug 2013 - 11:21 am | लाल टोपी

विचाराचा प्रतिवाद विचाराने केला गेला पाहिजे विरोधी आवाज अशा प्रकारे चिरडून टाकाणा-या प्रवृत्त्ती आजकाल बोकाळ्त आहेत. ऋषीतुल्य डॉ.दाभोळकरांच्या भ्याड हत्येचा करावा तेवढा विरोध कमी आहे. भावपूर्ण श्रध्दांजली.

मृत्युन्जय's picture

20 Aug 2013 - 11:28 am | मृत्युन्जय

अतिशय शरमेची बाब महाराष्ट्रासाठी. हल्ला आणि हत्या कोणी केली असेल सर्वांनाच माहिती असेल पण बोलणार कोणीच नाही हे अजुन एक दुर्दैव. बौद्धिक पातळीवर दाभोळकरांशी चर्चा आणि प्रतिवाद न करु शकणार्‍या लोकांकडुन अजुन काहीच अपेक्षा नाही म्हणा. किडे पडुन मरतील त्यांचे मारेकरी आणि त्यांचे कर्ते करविते एवढाच शाप देउ शकतो.

खटपट्या's picture

20 Aug 2013 - 11:30 am | खटपट्या

अतीशय सुन्न करणारी घटना!!!! काही सूचत नाहीये.....

गवि's picture

20 Aug 2013 - 11:40 am | गवि

फारच वाईट..

नेमकी काय उद्देशाने हत्या झाली असावी हे समजायला वेळ लागेल. केवळ वैचारिक विरोधातून झाली असेल हे मानायला कठीण वाटतं. पण कोणीतरी मारेकरी घातले म्हणजे सगळा महाराष्ट्र प्रतिगामी झाला किंवा त्यांच्या विचारांचा पराभव झाला असे नव्हे.

पण तरीही इतका काळ कोणत्याही भीतीखेरीज सर्वत्र संचार करणार्‍या व्यक्तीचा असा अंत होण्याने कोणत्याही चळवळीच्या कार्यकर्त्यांमधे दहशतीचं वातावरण तयार झालं तर ते जास्त दुर्दैवी ठरेल. पोलीस तरी कोणाकोणाला संरक्षण देणार?

धर्मराजमुटके's picture

20 Aug 2013 - 12:43 pm | धर्मराजमुटके

गवि,
तुमचं म्हणणं पटतयं पण महाराष्ट्रात अशा घटना दखल घेण्याजोगत्या प्रमाणात वाढत आहे. बुद्धीजीवी वर्ग अशा प्रकारच्या घटनांचा विरोध यशस्वीपणे करु शकत नाही. आपण करत आहोत तो केवळ वांझोटा विरोध आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी केवळ सरकारच नव्हे तर सामान्य जनता काय करु शकेल या शक्यतेचा विचार या करायची वेळ आली आहे.
विशेषतः पुणे जे विचारवंतांसाठी आणि विद्येसाठी नावाजलेले आहे तिथे अशा घटना घडणे जास्त दु:ख देऊन जातात.

दादा कोंडके's picture

20 Aug 2013 - 2:02 pm | दादा कोंडके

नेमकी काय उद्देशाने हत्या झाली असावी हे समजायला वेळ लागेल. केवळ वैचारिक विरोधातून झाली असेल हे मानायला कठीण वाटतं.

मग काय चोरीच्या उद्देशाने हत्या झाली असेल काय?

पण कोणीतरी मारेकरी घातले म्हणजे सगळा महाराष्ट्र प्रतिगामी झाला किंवा त्यांच्या विचारांचा पराभव झाला असे नव्हे.

एखाद्या गोष्टीची एक समाज म्हणून जबाबदारी घेणार आहोत का?

मग काय चोरीच्या उद्देशाने हत्या झाली असेल काय?

नव्हे. वैचारिक विरोधामुळे (तात्विक कारणाने) हत्या झाली असावी हे पटत नाही याचा अर्थ एकदम चोरीचा उद्देश असं का वाटावं.

उलट यामधे असा अर्थ होता की या अंधश्रद्धा-आधारित व्यवसायांचं जाळं इतकं पसरलं असावं आणि त्यातलं अर्थकारण इतकं मोठं आणि कदाचित संघटितही असावं की अंनिससारख्या संस्थांच्या कार्य आणि मागण्यांमुळे कुठेतरी त्यातले आर्थिक आदि हितसंबंध धोक्यात आल्याची जाणीव त्या क्षेत्राला होऊन त्यांनी हे पाऊल उचललं असणार. यात दहशत बसवण्याचाही उद्देश असू शकतो. त्यामुळे आणखीनच मानसिक हानी होऊ शकते.

दादा कोंडके's picture

20 Aug 2013 - 2:35 pm | दादा कोंडके

हम्म.

अंनिससारख्या संस्थांच्या कार्य आणि मागण्यांमुळे कुठेतरी त्यातले आर्थिक आदि हितसंबंध धोक्यात आल्याची जाणीव त्या क्षेत्राला होऊन त्यांनी हे पाऊल उचललं असणार.

एव्हडा थेट संबंध लाउन भर दिवसा डोक्यात गोळ्या घालायला ते अंडरवर्ल्ड मधल्या कुठल्या ग्यांग मध्ये काम करत नव्हते. त्यामुळे हत्या निसंशय वैचारिक विरोधातूनच झाली आहे. आता तो खून कुण्या अम्मा-बापूच्या लोकांनी केलाय, कुण्या जोतिषाने केलाय की कुण्या वारकर्‍यानं ते पोलिस शोधून काढणार नाहितच. :(

बॅटमॅन's picture

20 Aug 2013 - 2:40 pm | बॅटमॅन

पोलीस शोध लावतील की नाही-बहुतेक नाहीच-हा भाग अलाहिदा.

पण वैचारिक विरोध असेल तर इतकी वर्षे काही नाही आणि आत्ताच काय झालं एकदम? आर्थिक हितसंबंध आणि अंधश्रद्धा विरोधी विधेयक हेच कारण सयुक्तिक वाटते.

प्रसाद१९७१'s picture

20 Aug 2013 - 2:53 pm | प्रसाद१९७१

ह्या खूनाचा शोध नक्कीच लागणार नाही.
एखाद्या पाकिटमाराला पकडून न्यायालयात उभे करतील जास्तित जास्त.

क्लिंटन's picture

20 Aug 2013 - 10:39 pm | क्लिंटन

पण वैचारिक विरोध असेल तर इतकी वर्षे काही नाही आणि आत्ताच काय झालं एकदम? आर्थिक हितसंबंध आणि अंधश्रद्धा विरोधी विधेयक हेच कारण सयुक्तिक वाटते.

+१.

दाभोळकरांना श्रध्दांजली.

वाटाड्या...'s picture

20 Aug 2013 - 10:29 pm | वाटाड्या...

आता कसं बोल्ला गविभाऊ...

हे सगळं एका अर्थव्यवस्थेशी निगडीत आहे. कोणाच्या विचारांनी लोकांना बदलायचं असतं तर हा बापु नी तो बुवा/अम्मा/राम कडं लोक कशाला जातील. जो कोणी ही अर्थव्यवस्था बदलायला जाईल तोच रसातळाला जाईल ह्याची समाजानी पुर्ण सोय केलेली असते. सध्या त्या पुट्ट्पुर्थीची अवस्था बघायला गेलात तर कळेल. मुख्य माणुस नाही म्हण्ल्यावर अर्थव्यवस्था कोलमडली पण ते नैसर्गीक कारण आहे. मुख्य माणुस असतानां जा बरं, मग कळेल काय खरं आहे ते. उगाच नाही त्या अर्थव्यवस्थेचे सो कॉल्ड सैनीक हल्ला करत. कुठे तुकोबांचा/नाथमहारांजाचा वारसासमाज नी कसलं काय? रामदासकाकांनी एका लेखात सांगीतल्याप्रमाणे हे होतच राहणार आणि समाज पुढे जातच राहणार. फक्त मागच्या पिढीतील फ्रॉडस्टरपेक्षा पुढच्या पिढीतला फ्रॉडस्टर अर्थव्यवस्थेची आणि पर्यायाने ती टिकवण्याची पुढची पायरी गाठणार हेच अंतीम सत्य.

आत्मा मृत होत नाही. शरीर मॄत होत असतं, म्हणुन मॄतात्म्यास म्हणणार नाही पण सुटलेल्या आत्म्यांस सदगती लाभो एवढेच..

- वाट्या...

दादा कोंडके's picture

22 Aug 2013 - 6:48 pm | दादा कोंडके

मा. मुखमंत्रीच म्हणतायत.

दाभोलकरांवर कोणत्याही राजकीय पक्षांनी हल्ला केला नसल्याचे सांगून चव्हाण म्हणाले, हा वैचारिक मतभेदाचा विषय आहे. ज्यांनी हा हल्ला घडवून आणला ते नक्कीच राजकीय पक्ष नाहीत. जादूटोणाविरोधी विधेयक विधीमंडळात मांडले जाऊ नये आणि ते मंजूर होऊ नये, असे ज्यांना वाटत होते, त्यांनीच दाभोलकरांचा आवाज कायमचा बंद केला. अशा प्रकारचे हल्ले करणाऱया संघटनांना समाजाने वाळीत टाकले पाहिजे, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पिशी अबोली's picture

20 Aug 2013 - 2:03 pm | पिशी अबोली

+१

आज सकाळीच बातमी समजली आणि हादरलेच..
ऑफिसातल्या सहकर्मचार्‍याने विचारलं, "काय झालं?"
मी, "अरे, नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली."
तो, "सो सॉरी, नात्यातले होते का?"
मी अजूनच सुन्न.. :(

यशोधरा's picture

20 Aug 2013 - 11:55 am | यशोधरा

आमच्याकडे तीच परिस्थिती आहे ऑफिसमध्ये.

मृत्युन्जय's picture

20 Aug 2013 - 12:24 pm | मृत्युन्जय

अगदी अगदी. मराठी माणसालाही नरेंद्र दाभोळकर माहिती नाहित हे नव्यानेच कळाले. आत्ताच एकाशी बोलत होतो तर नरेंद्र दाभोळकर कोण हे समजावुन सांगत होतो तेव्हा मी " ते नाही का ते जे जादू टोणा अंधश्रद्धा वगैरे विरुद्ध......" तर फक्त जादू शब्द ऐकुन ओह ते मॅजिशियन का? माहिती होते ते मला. ऐकले होते. " असे उत्तर आले. मी स्वतःच्याच उरल्यासुरल्या झिंज्या उपटुन घेतल्या.

बॅटमॅन's picture

20 Aug 2013 - 12:33 pm | बॅटमॅन

औघड आहे सारंच :(

मी, "अरे, नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली."
तो, "सो सॉरी, नात्यातले होते का?"

दाभोळकरांच्या विचारांची हत्या आधीच झाली होती. आता शरिराची झाली.

दोन प्रचंड मोठी माणस आपल्यातुन आज गेली. फार वाईट झाल. ऐक देवावर नितांत भक्ती असलेले व दुसरे दैव वादावर कडक आसुड ओढणारे. फार म्हंजे फार वाईट झाल. आज अजुन दोन चांगली माणस आपल्यातुन गेली.

आतिवास's picture

20 Aug 2013 - 11:55 am | आतिवास

सुन्न!
अशा घटना होत राहतात, एकामागून एक.
प्रत्येक वेळी असं काही यापुढे होणार नाही, होऊ नये असं वाटतं ... आणि तरीही ..
समाज म्हणून आपण किती हतबल होत चाललो आहोत!!

अधिक काही केले पाहिजे .... आपण प्रत्येकानेच!

अवतार's picture

20 Aug 2013 - 11:59 am | अवतार

फलज्योतिषाचे समर्थन करणारे आणि विरोध करणाऱ्यांचे एकाच दिवशी निधन व्हावे हा केवळ योगायोगच म्हणावा लागेल!

कवितानागेश's picture

20 Aug 2013 - 12:11 pm | कवितानागेश

वाईट बातमी.
श्रद्धांजली.

निखिलचं शाईपेन's picture

20 Aug 2013 - 12:26 pm | निखिलचं शाईपेन

अपवाद म्हणून किंवा हे त्यातल्या त्यात ओके आहे किंवा आमच्यात बाबा या गोष्टी चालत आल्यात आणि आम्ही पाळतो त्या, काय हार्म्लेस आहेत, या मानसिकतेतून मग क्रूरपणा बाबतच्या संवेदना बोथट होत जातात. त्यातून मग कुंडली, राशीभविष्य हे ठीक आहे पण नरबळी म्हणजे खूप वाईट असल्या अतिफालतू आणि मूर्ख विचारांचा पगडा एकूणच बऱ्याच लोकांवर आहे. कुठलाही वैज्ञानिक आधार नसताना केवळ परंपरा म्हणून मानल्या गेलेल्या अनेक गोष्टी हळू हळू बदलतील म्हणून शहाणे लोक आयदर त्याबाबतीत बोलायचे टाळतात किंवा मग एखादा बोलला तर सगळे अतिमूर्ख त्याचा समाचार घेतात. हि श्वापदे कळपाने राहतात. तेव्हा ज्याचा पुरावा नाही ते खरे नाही हि मानसिकता संपूर्णपणे अंगिकारली जाईल तेव्हाच हे मृत्यूसत्र थांबेल. आज एका शहाण्या माणसाचा खून झाला पण समाजाने काय गमावलेय हे जाती पाती मानणाऱ्या, दरबारात जाणाऱ्या (उ दा भोंदु लोक आणि त्यांचे दरबार आणि दाराबारातली ती वेडी लोकं), कुंडलीगिरी करणाऱ्या लोकांना संपूर्णपणे कळणे गरजेचे असले तरी खरंच खूप अवघड आहे.

नरेंद्र दाभोलकरांना श्रध्दांजली …

-निखिल.

उर्मिला००'s picture

20 Aug 2013 - 12:27 pm | उर्मिला००

अजुन विश्वास बसत नाहीये.जाहीर निषेध या भ्याड कृत्याचा.

अनिरुद्ध प's picture

20 Aug 2013 - 12:28 pm | अनिरुद्ध प

दोनही मृतात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

दत्ता काळे's picture

20 Aug 2013 - 12:47 pm | दत्ता काळे

नरेंद्र दाभोळकरांना भावपूर्ण श्रध्दांजली आणि त्यांच्यावरील हल्ल्याचा निषेध.
बौद्धिक पातळीवर दाभोळकरांशी चर्चा आणि प्रतिवाद न करु शकणार्‍या लोकांकडुन अजुन काहीच अपेक्षा नाही म्हणा. .... हेच म्हणतो.

गणपा's picture

20 Aug 2013 - 12:56 pm | गणपा

अतिशय खेदजनक बातमी.
भ्याडांचा निषेध !

पुरोगामी महाराष्ट्राचा युपी बिहार होत चाललाय,जिथे मुद्दे संपतात तिथे गुद्दे सुरु होतात्,या बाबा बुवांकडे प्रतिकार करण्याकरिता मुद्दे च संपले होते, पण यांना एक कळत नाही माणसे मारुन विचार संपत नाहित्,उलट आणखी जोमाने उभे राहतात्,या गोष्टीचा नुसताच पोकळ निषेध व्यक्त करुन उपयोग नाही तर विरोधात खंबिरपणे उभे राहणे गरजेचे आहे मी तयार आहे मित्रनो,तुमची तयारी आहे का ? सर्व नेटीझन एकत्र येउन याविरोधात रान उठवु शकतात्,निदान मि.पाने तरी याबाबत पुढाकार घ्यावा ही विंनती....

पुरोगामी महाराष्ट्राचा युपी बिहार होत चाललाय

खंप्लीट सहमत.

कोमल's picture

20 Aug 2013 - 11:10 pm | कोमल

+१

आशिष दा's picture

20 Aug 2013 - 1:20 pm | आशिष दा

अतिशय खेदजनक बातमी. एक GREAT माणूस गेला.

पण नरेंद्र दाभोळकरांबद्दल पूर्ण आदर ठेऊन तरीही म्हणावसं वाटतं की-

आंतरजालावर RIP वाचून गंमत वाटली. तथाकथित RATIONAL BEINGS पण देहा नंतर काही उरतं असा मानू लागली की काय ? किती मोठी IRONY ?

सर्वसाक्षी's picture

20 Aug 2013 - 1:22 pm | सर्वसाक्षी

डॉ दाभोळकरांच्या हत्येचा निषेध. समाजप्रबोधन करणारी व्यक्ति ज्यांच्या नजरेत सलत आहे अशांचेच हे काम असावे. ही तर मुस्कटदाबी झाली. अंधश्रद्धा निर्मूलनातला एक खंदा कार्यकर्ता हरपला, हे समाजाचे नुकसानच नव्हे तर दुर्दैव आहे. या हत्येच्या मुळाशी जाणे आवश्यक आहे.
डॉ. दाभोळकर आणि श्री. साळगांवकर यांना विनम्र श्रद्धांजली.

मनीषा's picture

20 Aug 2013 - 1:31 pm | मनीषा

आदरपूर्वक श्रद्धांजली !

पिशी अबोली's picture

20 Aug 2013 - 2:07 pm | पिशी अबोली

अत्यंत भ्याड कृत्य आहे. निषेध.
आता याचा आधार घेऊन भावना भडकावायचा प्रयत्न लोक करतील. डॉ. दाभोळकरांचा विवेकीपणा समाजात टिकावा एवढीच इच्छा. :(

माणुस मरतो पण विचार नाही. जादुटोणाविरोधी विधेयकाला सर्वप्रकारे पाठिंबा देणे हीच दाभोलकरांना खरी श्रद्धांजली ठरेल. नाहीतर नुसतेच "जन पळ्भर म्हणतील हाय हाय.."

विचार मरू नये हे म्हणणे जास्त योग्य ठरेल.

प्रसाद१९७१'s picture

20 Aug 2013 - 2:51 pm | प्रसाद१९७१

ह्या दुर्दैवी घटने इतके आश्चर्य वाटण्या सारखे काय आहे?
ह्या देशामधले आमदार, खासदार, नगरसेवक बघितले तर सज्जन माणसांचे खून होणार हे सांगायला कशाला पाहिजे.

इशा१२३'s picture

20 Aug 2013 - 2:52 pm | इशा१२३

समाजाला अत्यंत गरज असणार्‍या व्यक्तीची अशाप्रकारे हत्या हि खरच मनाला ह्ळह्ळ वाटणारी.निषेध करावा तितका कमीच!

दिपक.कुवेत's picture

20 Aug 2013 - 2:53 pm | दिपक.कुवेत

आणि ह्या दोघांना भावपूर्ण श्रध्दांजली.

डॉ. दाभोळकरांच्या हत्येमागचं कारण वैचारिक असो, राजकीय वा आर्थिक -- "बोला आमच्याविरूद्ध हवं तेवढं! आमच्या समाजातले दोष दाखवलेत म्हणून जीवे मारण्याचे फतवे का निघणार आहेत? तेव्हा रहा सुरक्षित आणि करा टीका." छापाचं जे लंगडं समर्थन अनेकदा वाचायला/ऐकायला मिळे -- त्यातला फोलपणा निदान आता तरी अशांच्या ध्यानी यावा, ही अपेक्षा बाळगणंदेखील व्यर्थ आहे; असं वाटायला लावणारे काही प्रतिसाद (फेसबुकावर/अन्यत्र) वाचले आणि ही दु:खद बातमी ऐकल्यावर वाटलेली खंत अधिक गडद झाली.

बॅटमॅन's picture

20 Aug 2013 - 3:19 pm | बॅटमॅन

दुर्दैवानं खरंय. :(

सानिकास्वप्निल's picture

20 Aug 2013 - 3:07 pm | सानिकास्वप्निल

भावपूर्ण श्रद्धांजली

राही's picture

20 Aug 2013 - 3:44 pm | राही

हुतात्मा बनलेल्या वैचारिक क्रुसेडर्स् च्या साखळीतला आणखी एक दुवा. हा दुवा अखेरचाच ठरो आणि ही साखळी इथेच थांबो अश्या आशेच्या एका किरणाचीही अपेक्षा करता येऊ नये इतपत वातावरण काळेकुट्ट झाले आहे. आयुष्यभर आपले युद्ध अहिंसकतेने लढणार्‍याचा अंत हिंसामय असावा हे इतिहासाला मान्यच जणू.
जयंतराव साळगावकरांना श्रद्धांजली.

वाईट बातमी. श्रद्धांजली. :-(

अत्रुप्त आत्मा's picture

20 Aug 2013 - 4:04 pm | अत्रुप्त आत्मा

:( :( :(

संचित's picture

20 Aug 2013 - 4:21 pm | संचित

१० वर्षा आधी स्वत: च्या हाताने कुठलेही शस्त्र न वापरता शस्त्रक्रिया करणारा आणि अंनिस ला आव्हान देणारा तो असलं बाबा कुठे गेला?

पद्मश्री चित्रे's picture

20 Aug 2013 - 4:29 pm | पद्मश्री चित्रे

विचार पटले नाहीत म्हणून त्या माणसाची हत्या करणे हे खरच चूक आहे.भावपूर्ण श्रद्धांजली.

पैसा's picture

20 Aug 2013 - 4:42 pm | पैसा

हे सगळं खरंच घडलंय का? अजून विश्वास बसत नाही. उत्तर भारतात अशा घटना घडतात असे म्हणून आम्ही वाळूत डोकं खुपसून बसलो होतो! :(

ब़जरबट्टू's picture

20 Aug 2013 - 5:15 pm | ब़जरबट्टू

अगदी, आज महाराष्ट्र पण अधोगतीला लागलाय... :(

विकास's picture

20 Aug 2013 - 5:17 pm | विकास

आत्ता येथे सकाळी सकाळी जालावर वर्तमानपत्र वाचायला घेतले आणि दाभोलकरांची बातमी ऐकून सुन्न झालो. महाराष्ट्र खरेच वाळूत डोके खुपसून बसलेला आहे. या घटनेचे कुठलेही राजकारण न करता त्याच्या मुळाशी जाऊन मारेकरी आणि बोलवते धनी शोधणे गरजेचे आहे असे वाटते.

स्वतः दाभोलकरांचा अध्यात्म (यात फिलॉसॉफी आली, अंधश्रद्धा म्हणून नाही) विश्वास होता का माहीत नाही. म्हणून त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी असे मी माझ्या श्रद्धेने म्हणतो आणि त्यांनी सुरू केलेले अंधश्रद्धा निर्मुलनाचे कार्य पुढे योग्य दिशेने चालूच राहूंदेत अशी प्रार्थना करतो.

मनिमौ's picture

20 Aug 2013 - 4:51 pm | मनिमौ

राजा कालाय कारणम हे खरेच . रोज कलियुग आहे हे नव्याने जाणवते आहे.

तिमा's picture

20 Aug 2013 - 4:54 pm | तिमा

सकाळपासून अत्यंत अस्वस्थ आणि उद्विग्न आहे. बातमी कळल्यापासून कामातले लक्षच उडाले. शेवटी लवकर घरी आलो. काय चाललंय हे आपल्या महाराष्ट्रात ?
जास्तीतजास्त लोकांनी या अंधश्रद्धेपासून मुक्ती घ्यावी हीच डॉक्टरांना उचित श्रद्धांजली ठरेल.

चौकटराजा's picture

21 Aug 2013 - 9:05 am | चौकटराजा

मी आध्यात्म वा हे श्रद्धा अंधश्र्द्धा याबाबतीत अगदी दाभोलकरच असल्याने मला घरचा माणूस गेल्याचे दु: ख झाले. मी त्यांना एक अगदी छोटी मदत केली होती. बाकी त्यांच्या कार्यात झोकून द्यायचे राहिले. कारण ते यात्री होते मी शंकेखोर आहे. माणूस जन्मत:च काही तरी बरेच बरोबर घेऊन येतो. त्याला बलदण्यासाठी चळवळी , उपदेश यांच्यापेक्षा अनुभवाचा झटकाच अधिक उपयुक्त असे माझे मत आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Aug 2013 - 5:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अत्यंत दु:खदायक घटना आहे. भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो.

-दिलीप बिरुटे

सखी's picture

20 Aug 2013 - 8:09 pm | सखी

अत्यंत दु:खदायक घटना आहे.भ्याड हल्ल्याचा मी निषेध करते - सुन्न करणारं आहे हे सगळं...