डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना श्रद्धांजली !

धर्मराजमुटके's picture
धर्मराजमुटके in जनातलं, मनातलं
20 Aug 2013 - 9:48 am

नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार पुण्यात ओंकारेश्वर पुलावर सकाळी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.
या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. जरी त्यांच्या विचारांबाबत मतभेद असले तरी अशा प्रकारच्या हल्ला हा महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीवरचा हल्ला आहे. महाराष्ट्र वैचारिक अधोगतीच्या दिशेने चालला आहे हे निश्चित !

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना श्रद्धांजली !

समाजप्रकटन

प्रतिक्रिया

दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली.

घाटावरचे भट's picture

20 Aug 2013 - 6:10 pm | घाटावरचे भट

मनःपूर्वक श्रद्धांजली!! महाराष्ट्रात फोफावलेली गुंडगिरी आणि कायदा, पोलिस वगैरे गोष्टींची रसातळाला गेलेली किंमत पुनश्च अधोरेखित झाली.

श्रीरंग_जोशी's picture

20 Aug 2013 - 6:12 pm | श्रीरंग_जोशी

डॉ. दाभोळकरांच्या हत्येचा निषेध.

अंधश्रद्धा - जादुटोणा विरोधी विधेयकाचे कायद्यात रुपांतर व त्याची कडक अंमलबजावणीच त्यांच्या कार्याला योग्य ती श्रद्धांजली ठरेल.

उपास's picture

20 Aug 2013 - 6:38 pm | उपास

"आई गं!" ही पहिली प्रतिक्रीया आली तोंडातून.. लाजिरवाणी गोष्ट आहे एक समाज म्हणून आपल्याला. "पटले नाही विचार, टाक संपवून" ही वृत्ती पुन्हा पुन्हा वर येतेय. सतिश शेट्टींच्या हत्येचं पूर्ण राजकारण केलं गेलं.. आर्.टी.आय. च्या चळवळीचं अपरिमित नुकसान झालं तेव्हा.. शासनाला दोष देऊन थांबता येणार नाही, खूप चुकीच्या दिशेने वेगात चाल्लोय आपण. सामाजिक कार्यकर्त्यांना जीव ओतून काम करायला कसा धीर देणार आता! निराश वाटतय एकदम.. असं काही झालं की सामाजिक चळवळींचा वेग अतिशय मंदावतोच, ते कधीही न भरुन येणारं नुकसान असतं! डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या नावानेच विधेयक आणणं हीच खरी आदरांजली असेल त्यांना, बाकी सरकार काही करेल असं वाटत नाही, त्यांच्यावर तितका विश्वास राहिला नाही हे उघड सत्य आहे!

अर्धवटराव's picture

20 Aug 2013 - 6:42 pm | अर्धवटराव

सरांना विनम्र श्रद्धांजली.

आपलं प्रतिबींब बघवत नाहि तर रूप टीकठाक करण्याऐवजी आरसा फोडायचा... हे कृत्य केवळ अविचारी नव्हे तर आत्मघाती आहे.

सरांचं शरीर संपवलं तरी त्यांचे विचार संपणार नाहित वगैरे गप्पा तात्वीक म्हणुन ठीक आहे, पण एक माणुस निर्भीडपणे समाजाला त्याच्या उणीवा दाखवुन देत होता. तो आता गेला, तर त्या कार्याचे व्हायचे ते नुकसान झालेच :(

वर गविंनी म्हटलय तसं, हा प्रकार केवळ वैचारीक मतभेदातुन झाला असावा असं वाटत नाहि. कुठे तरी हितसंबंध दुखावले गेले असावेत. अनिंस हि संस्था काहि खुप पैसा बाळगुन नसावी, व त्यात राजकीय फायदा देखील नसावा, त्यामुळे सरांच्या खुर्चीवरुन हे कांड झालेलं नाहि. सरांच्या कोअर वर्तुळातल्या लोकांना काहि कल्पना असेल... त्यांनी आता अधिक सावधानी बाळगण्याची गरज आहे.

मेणाबत्ती मोर्चावाल्यांना हस्तिदंती मनोर्‍यातले समाजसुधारक म्हणुन हिणवले जाते... पण आजघडीला पुणे शहरात या मंडळींनी मोर्चा काढण्याची अत्यावष्यकता आहे. या खुनावर समाजाने सक्रिय प्रतिक्रीया द्यायलाच हवी.

अर्धवटराव

अत्यंत दु:खद घटना!

थंडगार राख's picture

20 Aug 2013 - 6:49 pm | थंडगार राख

मनःपूर्वक श्रद्धांजली!!

अनिता ठाकूर's picture

20 Aug 2013 - 7:15 pm | अनिता ठाकूर

आजच्या काळापेक्षाहि प्रतिकूल परिस्थितीत पूर्वी समाजसुधारकांनी, प्रचंड टीका सहन करीत काम केले, पण तेव्हा विरोधकांनी असे खून नाही केले. आज जे घडले ते भयंकर आहे. मन सुन्न झाले.

आनन्दिता's picture

20 Aug 2013 - 7:23 pm | आनन्दिता

दाभोळकरांना दोन तीन वेळा प्रत्यक्ष भेटायची संधी मिळली... प्रचंड कार्यक्षम व्यक्तीमत्व....

कट्टर नास्तिकाला ओंकारेश्वरा जवळ म्रुत्यु यावा हा कसला विचित्र योग....

भावपुर्ण श्रद्धांजली!!

भ ट क्या खे ड वा ला's picture

20 Aug 2013 - 7:33 pm | भ ट क्या खे ड वा ला

महाराष्ट्र वैचारिक अधोगतीच्या दिशेने चालला आहे ह्यापुढे पुरोगामी महाराष्ट्र म्हणवणार नाही, हे नक्की.

सुधीर's picture

20 Aug 2013 - 8:44 pm | सुधीर

अत्यंत दु:खद घटना!

जुबेर बिजापुरे's picture

20 Aug 2013 - 9:05 pm | जुबेर बिजापुरे

काही वर्षापुर्वी तळेगावमधे आर्.टी.आय कार्यकर्ते सतिश शेट्टी यांची हत्या, पत्रकार जे.डे. यांची मुंबईत केलेली हत्या आठवल्या एकदम
+१

पाषाणभेद's picture

21 Aug 2013 - 4:51 am | पाषाणभेद

पत्रकार जे.डे. यांच्या हत्येमागे गँगवॉर तसेच डबल गेम करणे, ब्लॅकमेलींग असे बरेच पदर आहे.

गंगाधर मुटे's picture

20 Aug 2013 - 9:14 pm | गंगाधर मुटे

दाभोळकरांना भावपूर्ण श्रद्धांजली!!

मात्र अनिसवाल्यांचे विचार मला कधिच मानवले नाही. मुळात श्रद्धा आणि अंधश्रद्धा हा भेदच मला एकतर मुर्खपणाचा किंवा आपापल्या परिने आपापल्या सोईची व्याख्या करण्याचा प्रकार वाटतो. मी कॉलेजात असताना कॉलेजमध्येच श्याम मानव यांच्या उपस्थितीत अंधश्रद्धा निर्मुलनावर एक परिसंवाद झाला होता. त्या परिसंवादात मी उपस्थित केलेल्या प्रश्नांना तर्कशुद्ध उत्तर श्याम मानव देवू शकले नव्हते. ३० वर्ष उलटले पण मला अजून उत्तर काही मिळाले नाही आणि मिळण्याची शक्यता नाही. दुसर्‍याची बुवाबाजी संपवून आपली बुवाबाजी किंवा आधुनिक बुवाबाजी सुरू करण्यासारखाच हा प्रकार असतो.
असो. विचार पटो ना पटो, कुणाचाही अशा तर्‍हेने अंत व्हावा, हे दु:खदायकच.

पुन्हा एकदा दाभोळकरांना भावपूर्ण श्रद्धांजली!!

खटपट्या's picture

20 Aug 2013 - 10:12 pm | खटपट्या

सर,

३० वर्षापुर्वी आपण वीचारलेला प्रश्न काय होता? ज्याचे आपल्याला समाधानकारक उत्तर मिळाले नव्हते.

रमताराम's picture

20 Aug 2013 - 11:02 pm | रमताराम

<<मुळात श्रद्धा आणि अंधश्रद्धा हा भेदच मला एकतर मुर्खपणाचा किंवा आपापल्या परिने आपापल्या सोईची व्याख्या करण्याचा प्रकार वाटतो. >> साफ असहमत.
<<त्या परिसंवादात मी उपस्थित केलेल्या प्रश्नांना तर्कशुद्ध उत्तर श्याम मानव देवू शकले नव्हते.>> आपण श्याम मानव किंवा दाभोळकरांना निरुत्तर केले असा दावा करणारे तुम्ही पहिलेच नाही हे नोंदवून ठेवतो.

<<दुसर्‍याची बुवाबाजी संपवून आपली बुवाबाजी किंवा आधुनिक बुवाबाजी सुरू करण्यासारखाच हा प्रकार असतो.>> हा तर चक्क ठोकून देतो ऐसा जी प्रकार आहे. असल्या भोंगळ विधानाला सिद्ध करता येत नाही तसेच असिद्धही. तेव्हा 'मी निरुत्तर केले' हा दावा करता येतोच.

तुमच्या सर्वच मुद्द्यांना विस्तृत उत्तरे द्यायची तयारी आहे पण 'आज' ते औचित्याला धरून होणार नाही म्हणून थांबतो. कधीतरी भेटून बोलू या.

रमताराम's picture

20 Aug 2013 - 11:04 pm | रमताराम

ता.क. माझा नि अंनिस वा दाभोळकरांचा कोणताही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध नाही किंवा त्यांचे सारेच मुद्दे मला पटत होते असे नाही. तेव्हा माझा प्रतिसाद केवळ तुमच्या प्रतिसादाचा प्रतिवाद समजावा.

रमताराम's picture

20 Aug 2013 - 11:07 pm | रमताराम

अरेच्या उद्धृते कुठे गेली??? संदर्भच हरवले की.
मुटे यांचे हे तीन मुद्दे उद्धृत केले होते. जे गायबले.

मुळात श्रद्धा आणि अंधश्रद्धा हा भेदच मला एकतर मुर्खपणाचा किंवा आपापल्या परिने आपापल्या सोईची व्याख्या करण्याचा प्रकार वाटतो.

त्या परिसंवादात मी उपस्थित केलेल्या प्रश्नांना तर्कशुद्ध उत्तर श्याम मानव देवू शकले नव्हते.

दुसर्‍याची बुवाबाजी संपवून आपली बुवाबाजी किंवा आधुनिक बुवाबाजी सुरू करण्यासारखाच हा प्रकार असतो.

Nile's picture

21 Aug 2013 - 6:08 am | Nile

"मानव यांच्या उपस्थितीत अंधश्रद्धा निर्मुलनावर एक परिसंवाद झाला होता. त्या परिसंवादात मी उपस्थित केलेल्या प्रश्नांना तर्कशुद्ध उत्तर श्याम मानव देवू शकले नव्हते"

म्हणजे त्यांनी तुम्हाला दिलेले उत्तर तुम्हाला कळले नाही का पटले नाही?

"३० वर्ष उलटले पण मला अजून उत्तर काही मिळाले नाही"
३० वर्षात अजून किती लोकांना विचारलात प्रश्न?
बाकी ३० वर्षांनंतर तुम्ही स्वतःच प्रश्न विसरलेला दिसता, नाहीतर लिहला असतात. असो.

विकास's picture

20 Aug 2013 - 9:57 pm | विकास

इ-सकाळमधे दाभोळकरांवरील वृत्ताच्या खाली लिहीलेले पण कविवर्य मंगेश पाडगावकरांनी लिहीलेला उदासबोध...
दुवा.
आज हयात असते रामदास । तर भोवती बघुन हरामदास । अन्तरी जाले असते उदास । लागोन चिन्ता ॥ १ ॥ समर्थाचिया सेवका वक्र पाहे । ऐसा गल्लीगल्लीत गुन्ड आहे । त्यांचेवरी संरक्षण छत्र आहे । पोलीस पुढाऱ्यांचे ॥ २ ॥ या सत्याचा लागता शोध । कुठुन सुचता असता दासबोध ? लिहिला असता उदासबोध । श्रीसमर्थांनी ॥ ३ ॥ भ्रष्टाचारे पोखरला देश । दीन जनांसी अपार क्लेश । दुर्जना यश । सज्जना अपेश सर्वत्र दिसे ॥ ४ ॥ नीतीचा डोळा काणा । प्रत्येक माणूस दीनवाणा । सर्व फ़ोलपटे नाही दाणा । पीक ऐसे ॥ ५ ॥ देवतांसी उचलून धरती । वेडेविद्रे नाच करती । भसाड ओसाड आरती । झोकून दारू ॥ ६ ॥ कबीर सांगे अल्लाची महती । मुंगीच्या पायी घुंगुर वाजती । तरी ते अल्लाशी ऐकु येती । ऐसे म्हणे ॥ ७ ॥ येथे अल्लासी बहिरा मानती । ठणाणा ध्वनीक्षेपक आणती । त्यातुन कर्कश बांग हाणती। अल्लासाठी ॥ ८ ॥ कंडम बरगड्यांच्या जनतेवरी । बिल्डर, स्मगलर, गुन्ड राज्य करी । प्रत्येक नेता खिसे भरी । हाती धरून तयांसी ॥ ९ ॥ दुष्काळ खणी, भुई फाटे । शोष पडून विहीर आटे । काळा कडु गहिवर दाटे । गळ्यात भविष्याच्या ॥ १० ॥
सत्या सामोरे पहाण्यासाठी । त्राण असावे लागे गाठी । भेकड पळपुट्याचे पाठी । हिजडा लागे ॥ ११ ॥
ग्रंथ नाम उदासबोध । कवी जनतेचा संवाद । काळा कडु आतला विषाद । हलका केला। ॥ १२ ॥

पिवळा डांबिस's picture

20 Aug 2013 - 11:11 pm | पिवळा डांबिस

डॉ. नरेन्द्र दाभोळकरांना श्रद्धांजली...

मंदार कात्रे's picture

20 Aug 2013 - 11:28 pm | मंदार कात्रे

भारत हा सर्व धर्म संमभाव असा देश आहे, तरीही भारतात कोणीही काहि केले तरी काही लोकांना हिंदुचाच वास येतो .

शैलेंद्रसिंह's picture

20 Aug 2013 - 11:59 pm | शैलेंद्रसिंह

यदाकदाचित ह्या नाटकात कर्णाचं पात्र सारखं ’हा आपला अपमान आहे’ असं बोलतं..तेव्हा दुर्योधन त्याला आठवण करुन देतो की हा आपला नाही तुझा अपमान आहे.
त्याच धर्तीवर इथे सांगावेसे वाटतेय की हिंदुंवर कोणी आरोप करत नाहीये, काही स्वयंघोषित ठेकेदार आहेत हिंदु धर्माचे जे रोज उठसुठ दाभोळकरांवर टिका करायचे त्यांच्यावर काही लोकांनी आरोप केले आहेत हे नक्की. पण म्हणुन समस्त हिंदुंवर आरोप होतोय असं भासवुन कोणी उर बडवायची गरज नाहीये. जसे रोज दाभोळकरांवर आरोप व्हायचेत की ते मिशनरींचे हस्तक आहेत, फ़क्त हिंदुंधर्मींयांविरुद्धच बोलतात वगैरे वगैरे..तसेच हेही फ़क्त आरोप आहेत कि काही मंडळींनी दाभोळकरांविरुद्ध इतका अपप्रचार केला की त्यातुन हा hate crime घडला असावा. शेवटी १०-१५ वर्षांनी चौकशीतुन काहीतरी बाहेर येईल, पण तोवर आरोप-प्रत्यारोप चालणारच. हिंदुंचा त्याच्याशी काहीही संबंध नाही.

रिमेंबर, इन्स्पायर, प्रोग्रेस : असा RIPचा नवा अर्थ लावावा असे व्यक्तिमत्त्व.

विकास's picture

21 Aug 2013 - 12:55 am | विकास

हा अर्थ प्रथमच ऐकला आणि आवडला. दाभोळकरांच्या बाबतीत तो खर्‍या अर्थाने योग्य आहे.

बॅटमॅन's picture

21 Aug 2013 - 2:51 am | बॅटमॅन

जबरी अर्थ!!!

पाषाणभेद's picture

21 Aug 2013 - 4:44 am | पाषाणभेद

जे झाले ते फारच दु:खदायक आहे. एका महान विचारांची हत्या झाली. निषेध करावा तितका थोडाच.
डॉ. नरेन्द्र दाभोळकरांना श्रद्धांजली.

अशा माणसाची हत्या करेपर्यंत मजल का जाते? आर्थिक राजकारण असलं तरी इतके वर्ष अंनिसचं कार्य असूनही या बुवाबाजीवाल्यांची दुकानं जोरात सुरूच होती ना!! कदाचित कोणीतरी त्यांचा विरोध वैयक्तिक घेउन हत्या केली असावी. हि घटना महाराष्ट्रात घडली हे अविश्वसनीय आहे.

मारेकरी पकडला जाणार नहिच !

श्रद्धांजली !

धमाल मुलगा's picture

21 Aug 2013 - 8:31 am | धमाल मुलगा

एका विशिष्ट विचारांसाठी झोकून देऊन काम करणारा तळमळीचा 'माणूस' आज संपवला गेला.
पण ह्या हत्येला ज्या पध्दतीनं रंग दिला जातो आहे ते पाहून आश्चर्य वाटल्यावाचून रहात नाही. 'अमुक एका विचारांनी ही हत्या केली' असं बेजबाबदारपणाचं विधान केलं की परिस्थितीचा रंग काय नी कसा बदलतो हे न उमजण्याइतपत आपले पुढारी निरागस नक्की नसावेत.
जेव्हा विचारांनी ही हत्या केली असं म्हणलं जातं तेव्हा 'नक्की विचारच असावेत का?' हा प्रश्न पडल्यावाचून रहावत नाही. आजवर महाराष्ट्रात केवळ विचारांना विरोध म्हणून खून पडले नाहीत (नसावेत) . हां, आर्थिक भानगडींच्या मूळावर एखादा सेवाभावी कार्यकर्ता येत असेल तर त्याची विल्हेवाट लावणं तसं आपल्याकडं नवं नाही.
आपण भाबड्या जनतेला दिसतो तो केवळ अंधश्रध्दा निर्मुलन चळवळीचा पदर. पण ह्या चळवळीच्या माध्यमातून कुणाच्या आर्थिक गणितांच्या शेपटावर कसा पाय पडला असेल हे कुठं आपल्याला ठाऊक असतं? अन अश्यांचे लागेबांधे कुठे कसे जुळलेले असू शकतात हे तर तुम्हा-आम्हा सर्वसामान्यांच्या गावीही नसतं.
बरं, त्यातून आणि, निवडणूका जवळ येताहेत. वातावरण तापवण्यासाठीची दिशाही काहीशी दिसते आहे काही प्रभृतींच्या विधानांमधून... त्यावरुन तर मनातला संशय अधिकच गडद होतो. आज इतकी वर्षं झाली डॉ.दाभोळकरांच्या चळवळीला; जादूटोणा विरोधी कायद्याचं घोंगडंही भिजत घालून आता बराच काळ लोटला. कोणत्याही चळवळीचा नेता हा त्या चळवळीच्या सुरुवातीच्या अन तरुणपणाच्या काळात अधिक प्रखर आणि सक्रिय असतो. दाभोळकरांना संपवायचं असतं तर तोच काळ जास्त योग्य नव्हता काय? निदान गेलाबाजार जादूटोणा विरोधी कायद्याबद्दल चर्चा सुरु झाली तो तरी. पण नाही...ही हत्या तेव्हा नाही झाली! म्हणजे ही हत्या विचारांच्या विरोधातून झाली नाही असाही निष्कर्श काढता येऊ शकतो का?

नाखु's picture

21 Aug 2013 - 9:11 am | नाखु

एकमात्र "(डोके) शाबूत" प्रतिसाद (बाकी मिपावर पण राजकारण्यांसारखी या मुद्द्यावरून चिखलफेक करू नये अशी वाचन मात्र मिपाकरची प्रार्थना)
साळ्गावकर्-दाभोळकर यांचे विचारांवर चर्चा/माहिति लेख हिच मिपाकरांकडून ऊचित श्रद्धांजली ठरेल.

श्रीगुरुजी's picture

21 Aug 2013 - 12:54 pm | श्रीगुरुजी

डॉ. नरेंद्र दाभोळकर व जयंत साळगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली! दाभोळकरांना गोळ्या घालून मारणे हा नालायकपणाचा व क्रूरतेचा कळस आहे. खुन्यांना लवकरात लवकर पकडून जास्तीत जास्त कठोर शिक्षा द्यायला पाहिजे.

काल बर्‍याच मराठी वाहिन्यांवरच्या प्रतिक्रिया ऐकल्या व चर्चा पाहिल्या. एकंदरीत सर्वांनी संशयाची सुई सनातन प्रभातकडे वळविली आहे. ज्या खुन्यांनी गोळ्या झाडल्या ते सराईत व्यावसायिक सुपारी किलर असावेत. भरदिवसा, वर्दळीच्या ठिकाणी, पोलिस चौकीपासून १०० मीटरच्या आत चालत येऊन अचूक गोळ्या घालणे हे व्यावसायिक भाडोत्री मारेकर्‍यांचेच काम असणार. असे मारेकरी हे राजकीय पुढारी, माफिया, बांधकाम व्यावसायिक, गुन्हे करणार्‍या टोळ्या यांच्याशी संबंधित असतात. सनातन प्रभात सारखी फक्त पनवेल परिसरात थोडेसे अस्तित्व असलेली संघटना असे कृत्य करेल असे प्रथमदर्शनी वाटत नाही. अशी शक्यता पूर्णपणे फेटाळता आली नाही तरी शक्यता कमी वाटते. जादूटोणा विरोधी विधेयकामुळे सुद्धा ही हत्या होईल असे वाटत नाही, कारण हे विधेयक गेली १७ वर्षे प्रलंबित आहे व ते विधिमंडळात कधीही मंजूर होणार नाही ही सर्वांनाच खात्री आहे. अंधश्रद्धा निर्मूलन किंवा हे विधेयक या विषयांबाबतीत गेल्या काही दिवसात असे काहीही नवीन घडले नव्हते की ज्यामुळे त्यांचा खून करण्यास कोणीतरी प्रवृत्त व्हावे. त्यांनी गेल्या २ महिन्यांपासून जातपंचायतीविरूद्ध आवाज उठविला होता. एखादी जात पंचायत यामागे असावी का? खुनाचे नेमके कारण व हेतू लक्षात येत नाही. सनातन प्रभात किंवा एखादी जातपंचायत यामागे असण्याची थोडीशी शक्यता असली तरी त्यांचा मुख्य हेतू लक्षात येत नाही. त्यांचा एखादा जागेचा वाद होता का हे माहिती नाही. पण पुण्यात "साधना"ची कार्यालये ही सदाशिव पेठ, शनिवार पेठ अशा मोक्याच्या ठिकाणी आहेत आणि पुण्यात लँड माफिया देखील आहेत. एकंदरीत झालेला प्रकार अत्यंत दुर्दैवी व वाईट आहे.

आनंदी गोपाळ's picture

21 Aug 2013 - 8:51 pm | आनंदी गोपाळ

साधनेची कार्यालये दाभोलकरांची वैयक्तिक मालमत्ता होती काय?
स्पेक्युलेशन्स आर ऑलराईट, पण हे लँड माफिया प्रकर्ण पटत नाही.

कुणी केले असावे याबद्दल मला स्वतःला मत नाही. पण पोलिसतपास होऊन सत्यच काय ते बाहेर येईल अशी अंधश्रद्धा यानिमित्ताने बाळगायला काय हरकत आहे?

धर्मराजमुटके's picture

20 Aug 2014 - 9:22 am | धर्मराजमुटके

आज २० ऑगस्टला नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला वर्ष झाले. त्यांच्या खुनाचे कसलेच धागे-दोरे अद्याप पोलिस-सरकारच्या हाती लागलेले नाहीत. त्याच्या निषेधाचा आवाज सर्व समाजाच्या हृदयापर्यंत आणि आजूबाजूला लपून बसलेल्या खुन्यांच्या निदान कानापर्यंत पोचावा म्हणून त्याच दिवशी पुण्यात होणाऱ्या रिंगणनाट्यामागची भूमिका.

अधिक माहिती या दुव्यावर ..
Dabholkar

मंदार दिलीप जोशी's picture

20 Aug 2014 - 12:01 pm | मंदार दिलीप जोशी

आत्तापर्यंत खून झालेल्या सगळ्यांना श्रद्धांजली वाहा. उगाच एखाद्याला ग्लोरिफाय करु नका.

बाळ सप्रे's picture

20 Aug 2014 - 1:07 pm | बाळ सप्रे

नुसतं खून झालेल्यांना कशाला ग्लोरीफाय करायचं.. आत्तापर्यंत सगळ्या मेलेल्या सगळ्यांना श्रद्धांजली वाहा !!

मृगनयनी's picture

20 Aug 2014 - 1:12 pm | मृगनयनी

:) सहमत- मंदार.. & बाळ... उगीचच एखाद्याला ग्लोरिफाय करणे चुकीचेच वाटते.

२० ऑगस्ट'ला ज्यांचा ज्यांचा खून झालाये.. किंवा ज्यांना ज्यांना मृत्यू आलाये.. त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली!!!..

गेल्यावर्षी महामृत्यू पावलेले प्रसिद्ध ज्योतिषी 'ज्योतिर्भास्कर'- "श्री जयन्त साळगांवकर" यांना भावपूर्ण श्रद्धांजली!!! ..
तसेच आजच निधन पावलेले प्रसिद्ध योगाचार्य- "अय्यांगार गुरुजी" यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली !!!!

त्याचप्रमाणे स्व. पंतप्रधान- श्री. राजीव'जी गांधी यांच्या जयन्तीनिमित्त त्यांच्या स्मृतीस "विनम्र अभिवादन"!!!!!

:) .... :)

धन्या's picture

20 Aug 2014 - 1:16 pm | धन्या

महामृत्यू

ही काय भानगड आहे? माणसाच्या मरण्यातही काही स्पेशालिटी असते का?

मृगनयनी's picture

20 Aug 2014 - 1:32 pm | मृगनयनी

ही काय भानगड आहे? माणसाच्या मरण्यातही काही स्पेशालिटी असते का?

अं.. हो.. नॅचरली - म्ह्णजे .. जीवनातील सर्व कर्मे करून, समाजोन्नतीसाठी उचित कार्य केल्यावर, तसेच सर्व मनातील इच्छा तृप्त झाल्यावर वृद्धापकाळी आलेला किंवा माहित असलेला मृत्यू... म्हणजे- महामृत्यू अश्या व्यक्तींना सु-गती प्राप्त होते. सहसा अश्या लोकांच्या पिंडाला कावळा पटकन शिवतो... :) . कारण यांच्या कोणत्याच इच्छा मागे उरलेल्या नसतात. :) .. :)

दाभोळकरांना आलेला मृत्यू- हा अचानक होता. ध्यानी मनी नसताना, जगण्याची किंवा समाजासाठी अजून कार्ये करण्याची इच्छा मनात असताना मनाविरूद्ध आलेला मृत्यू हा व्यक्तीला सहसा पुढे "गती" प्राप्त करून देत नाही. ते स्वत: जरी आत्मा मानत नसले, तरी "पुराणा"नुसार "अश्या" पद्धतीने मृत्यूमुखी पडलेल्या शरीरातील आत्म्यांना "पिशाच-योनी" प्राप्त होते. ..... ( आणि प्लँचेट करून कुणीही त्यांना सहज बोलावू शकते !!! ;) .. ;) हं हं.. )
अश्या आत्म्यांना मुक्ती मिळणे अवघड असते.... :) शेवटी आयुष्यात केलेल्या आपापल्या ""कर्मा""नुसारच प्रत्येकाला मृत्यू आणि मुक्ती मिळत असते.

आपल्या या प्रतिसादाने मला महानिर्वाण प्राप्त झाले आहे.

प्यारे१'s picture

20 Aug 2014 - 2:33 pm | प्यारे१

महानिर्वाण म्हणून स्वतःला मोठं करण्याचा क्षीण प्रयत्न.

असो.

महानिर्वाण म्हणून स्वतःला मोठं करण्याचा क्षीण प्रयत्न.

हे तुम्ही कशावरुन ठरवलंत?

आणि शब्द नेमके वापरत चला. "ग्लोरीफाय करण्याचा क्षीण प्रयत्न" म्हणा. *lol*

प्यारे१'s picture

20 Aug 2014 - 2:46 pm | प्यारे१

ब्वार.

बॅटमॅन's picture

20 Aug 2014 - 2:53 pm | बॅटमॅन

मलाही. महानिर्वाण प्राप्त होवून दुसर्‍या बिगब्यांगमध्ये तयार झालेल्या आकाशगंगेत दुसरा जन्मही मिळाला, आहात कुठे!

तुमच्या पूर्वीच्या जन्मात महानिर्वाण प्राप्त झाल्यानंतर पिंडाला कावळा लगेच शिवला होता का?

पिंडाला कावळा लगेच शिवला होता का?

म्हणजे काय? फॉक्कन शिवला म्हणतानाच दुसरा जन्म मिळाला, नैतर तरंगत राहिलो असतो कयामतीपरेंत.

धन्या's picture

20 Aug 2014 - 3:41 pm | धन्या

वर मृगनयनी यांनी म्हटल्याप्रमाणे,

जीवनातील सर्व कर्मे करून, समाजोन्नतीसाठी उचित कार्य केल्यावर, तसेच सर्व मनातील इच्छा तृप्त झाल्यावर वृद्धापकाळी आलेला किंवा माहित असलेला मृत्यू... म्हणजे- महामृत्यू अश्या व्यक्तींना सु-गती प्राप्त होते. सहसा अश्या लोकांच्या पिंडाला कावळा पटकन शिवतो...

तुमच्याही बाबतीत हेच झाले असणार.

बॅटमॅन's picture

20 Aug 2014 - 3:43 pm | बॅटमॅन

असेल बॉ. आमचा पिंड त्या भाताच्या मुदीत कैद होता आणि कावळ्याने त्याला चोच मारताक्षणी आम्ही दुस्रीकडे जन्मास आलो, इतकेच आठवते आहे. बाकी अगोदरच्या जन्मातलं आता काय आठवत नाही.

माणसाच्या मृत्यूसमयी त्याचे सारे संस्कार त्याच्या चित्तात साठवले जातात. मानसाचा पुढचा जन्म जेव्हा होतो तेव्हा एखादया बॅकप हार्ड डिस्कवरुन नविन संगणकात ज्याप्रमाणे जुन्या संगणकातील फाईल्स कॉपी कराव्यात त्याप्रमाणे हे जुन्या संस्कार नव्या जन्मात उचलले जातात.

असं म्हणतात हा. खरे खोटे ते धर्मशास्त्र पंडीत जाणोत. :)

बॅटमॅन's picture

20 Aug 2014 - 4:19 pm | बॅटमॅन

असेलही. :)

बाळ सप्रे's picture

20 Aug 2014 - 1:25 pm | बाळ सप्रे

दाभोलकर हे मंदार जोशी ( व तुमच्या) विचारांच्या अगदी विरुद्ध विचारांचे असल्याने आलेल्या तिरस्कारात्मक प्रतिक्रियेला उपहासाने उत्तर द्यायचा प्रयत्न निष्फळ म्हणायचा..

खून झाल्यामुळे ग्लोरीफिकेशन होत नसते. त्यांच्या कार्याने ते आधीच झालेय.

तुमचा प्रतिसादात देखिल मेलेल्या सर्वांना श्रद्धांजली म्हणून नंतर तिघांचा खास उल्लेख आहेच.. ..

प्रसाद गोडबोले's picture

20 Aug 2014 - 1:43 pm | प्रसाद गोडबोले

खून झाल्यामुळे ग्लोरीफिकेशन होत नसते. त्यांच्या कार्याने ते आधीच झालेय.

लोल

मंदार दिलीप जोशी's picture

20 Aug 2014 - 2:28 pm | मंदार दिलीप जोशी

डोंबलाचं ग्लोरिफिकेशन. ते नॅचरल मृत्यू ने मेले असते तर इतका आक्रोश झालाच नसता. एकादाच अरेरे म्हणुन लोक पुढे गेले असते. हत्या झाली म्हणून एक माणूस महात्मा झाला नाही तर यांच्यासारखीच त्यांची क्रेडिबिलिटी खड्ड्यात गेलेली होती.

शिवाय त्यांची हत्या त्यांच्या कार्यामुळेच झाली असा सोयिस्कर अर्थ काढला अनेकांनी. ती हत्या अनिस मधल्या आर्थिक भानगडींनी पण झालेली असू शकते.

उचलली बोटे आपटली कळफलकावर. :)

मंदार दिलीप जोशी's picture

20 Aug 2014 - 2:48 pm | मंदार दिलीप जोशी

अंदाज व्यक्त केलेला आहे.

हत्या झाल्यावर ज्यांनी गांधींची हत्या केली त्यांनीच दाभोलकरांनी केली असे तारे आपल्या एका मंत्र्यांनी तोडले होते त्याला पारावरच्या गप्पाही म्हणवत नाही

प्यारे१'s picture

20 Aug 2014 - 2:34 pm | प्यारे१

बोटांना काही मांस?

काही पुरावा की उगाच पारावरच्या गप्पा?

मंदार दिलीप जोशी's picture

20 Aug 2014 - 2:47 pm | मंदार दिलीप जोशी

ते तुम्हालाही लागू होतं ;)

धर्मराजमुटके's picture

20 Aug 2014 - 1:18 pm | धर्मराजमुटके

श्री. मंदार आणि बाळ.
आपल्या भावना पोहोचल्या. यात दाभोळकरांना ग्लोरीफाय केलेय म्हणजे नक्की काय केले आहे ते कळाले नाही.
तुम्ही या धाग्यावरच्या सगळया प्रतिक्रिया वाचल्यानंतर प्रतिक्रिया दिलीय की फक्त धाग्याचे शीर्षक वाचून प्रतिसाद दिला आहे हे जाणून घेण्यास उत्सुक आहे.

बाळ सप्रेंची मिपावरील वाटचाल पाहता त्यांचा प्रतिसाद उपहासात्मक असावा असे वाटते.

मंदार दिलीप जोशी's picture

20 Aug 2014 - 2:30 pm | मंदार दिलीप जोशी

डोंबलाचं ग्लोरिफिकेशन. ते नॅचरल मृत्यू ने मेले असते तर इतका आक्रोश झालाच नसता. एकादाच अरेरे म्हणुन लोक पुढे गेले असते. हत्या झाली म्हणून एक माणूस महात्मा झाला नाही तर यांच्यासारखीच त्यांची क्रेडिबिलिटी खड्ड्यात गेलेली होती.

शिवाय त्यांची हत्या त्यांच्या कार्यामुळेच झाली असा सोयिस्कर अर्थ काढला अनेकांनी. ती हत्या अनिस मधल्या आर्थिक भानगडींनी पण झालेली असू शकते.

नरेंद्र दाभोळकर हे एक फार थोर व्यक्तिमत्व होतं. त्यांना ग्लोरीफाय करायला त्यांच्याएवढ्याच ताकदीचा माणूस पाहिजे. इथे आपण बहुतेक सगळे बोलघेवडे आहोत. (कुणी खरंच कृतीशील कार्यकर्ता असेल तर क्षमस्व).

मंदार दिलीप जोशी's picture

20 Aug 2014 - 2:59 pm | मंदार दिलीप जोशी

नरेंद्र दाभोळकर हे एक फार थोर व्यक्तिमत्व होतं.>> थोडीशी सुधारणा सुचवतो. माझ्या माहितीतल्या अनेकांना हत्या झाली तेव्हा दाभोलकरांची झाली म्हणून काहीही सोयरसुतक नव्हतं. इतर कुठल्याही हत्येनंतर यावी तशीच प्रतिक्रिया होती. त्यामुळे त्यांच्या क्षेत्रात थोर व्यक्तिमत्व होतं असं म्हणा.

आणि मोठं करायला किंवा ग्लोरिफाय करायला फार काही करावं लागत नाही. अहो मिडियाने हर्षद मेहतालाही मोठं केलं होतं. अर्थातच हर्षद मेहता हे शेअर मार्केटच्या क्षेत्रातलं थोर व्यक्तिमत्व होतंच म्हणा :D

प्यारे१'s picture

20 Aug 2014 - 3:02 pm | प्यारे१

जोशी साहेब,
अगदीच चुकीच्या तुलना करु नका.
असे केल्याने आपल्या बुद्धीच्या मर्यादा उघड होतात.
नरेंद्र दाभोलकर जे काम करत होते ते प्रामाणिक होतं.
त्या कामामध्ये दुसर्‍या कुणालाही गोत्यात आणण्याची काही गरज/ इच्छा/ हेतू नव्हते.

त्यामुळे असोच्च!

मंदार दिलीप जोशी's picture

20 Aug 2014 - 3:08 pm | मंदार दिलीप जोशी

त्या कामामध्ये दुसर्‍या कुणालाही गोत्यात आणण्याची काही गरज/ इच्छा/ हेतू नव्हते.>>

तुमच्या बुद्धीच्या मर्यादा हे खरं मानून चालण्यात आहेत. हिंदूधर्म निर्मूलन समिती असं नाव ठवलं नाहीतर तेच करायचं बाकी होतं फक्त.

प्यारे१'s picture

20 Aug 2014 - 3:23 pm | प्यारे१

हिंदू धर्म असा संपणार नाही त्यामुळं त्याबद्दल काळजी करु नये. ८०% हिंदूंच्या देशात ८०% अंधश्रद्धा असतात वगैरे गणित दाभोलकरांनी मांडलेलं होतं. मी दाभोलकर समर्थक नाही मात्र हर्षद मेहताबरोबर तुलना अगदीच चुकीची होती हे आपण देखील मान्य करायला हरकत नाही.

बाकी काही लोकांच्या पोटावर पाय आणण्याचा प्रयत्न नक्की झाला.
अर्थात कायदा केल्यानं सगळ्या गोष्टी संपतात वगैरे भोळेपणा आपण कराल असं वाटत नाही.
उलट कायदा केल्यानं त्या कायद्याच्या विरोधी गोष्टी करणारांना अधिक फायदा होण्याची शक्यता जास्त वाटते.
(सोनोग्राफीचं उदाहरण आहेच)
मुळात कायद्याची अम्मलबजावणी बर्‍याचदा होत नसल्यानं तर अजिबातच काळजीचं कारण नाही.

मंदार दिलीप जोशी's picture

20 Aug 2014 - 3:25 pm | मंदार दिलीप जोशी

बरं.

लोक डॉ. दाभोलकरांबद्दल चांगलं बोलत आहेत तर तुमचा एव्हढा जळफळाट का होत आहे?

मंदार दिलीप जोशी's picture

20 Aug 2014 - 3:09 pm | मंदार दिलीप जोशी

माझा कुठे जळफळाट होतोय? लोकांनी असल्या गोष्टींवर वेळ फुकट घालवू नये इतकीच इच्छा आहे फक्त.

मग कशात घालवावा? बुवा बाबा बापूंच्या नादी लागावे?

मंदार दिलीप जोशी's picture

20 Aug 2014 - 3:24 pm | मंदार दिलीप जोशी

ते तुमचे तुम्ही ठरवा. मी काय सांगणार?

धन्या's picture

20 Aug 2014 - 3:28 pm | धन्या

मग लोक जर एखादया मृत व्यक्तीबद्दल चांगलं बोलत असतील तर तुम्ही तुमच्या मनातील गरळही ओकू नका.

अगदीच लोकांनी असल्या गोष्टींवर वेळ फुकट घालवू नये इतकीच इच्छा असेल तर डॉ. दाभोलकरांची विचारधारा कशी चुकीची होती, त्याने समाजाचे कसे नुकसान झाले हे लिहा. नुसते कळफलक बडवून अंदाज व्यक्त करण्यापेक्षा हे करुन दाखवा.

मंदार दिलीप जोशी's picture

20 Aug 2014 - 3:33 pm | मंदार दिलीप जोशी

मग लोक जर एखादया मृत व्यक्तीबद्दल चांगलं बोलत असतील तर तुम्ही तुमच्या मनातील गरळही ओकू नका.>>
कृपया वय्यक्तिक बोलू कहा. तुमचे गटारवजा तोंड बंद करा आधी - असे मी म्हणू शकतो पण म्हणणार नाही ;)

अगदीच लोकांनी असल्या गोष्टींवर वेळ फुकट घालवू नये इतकीच इच्छा असेल तर डॉ. दाभोलकरांची विचारधारा कशी चुकीची होती, त्याने समाजाचे कसे नुकसान झाले हे लिहा. नुसते कळफलक बडवून अंदाज व्यक्त करण्यापेक्षा हे करुन दाखवा.
>>

अंदाज व्यक्त करु नको? का म्हणून?
मात्र हा सल्ला चांगला आहे. कधीकाळी रिकामटेकडा झालो तर दाभोलकरांची विचारधारा कशी चुकीची होती हे नक्की लिहेन.

कृपया वय्यक्तिक बोलू कहा. तुमचे गटारवजा तोंड बंद करा आधी - असे मी म्हणू शकतो पण म्हणणार नाही

गिरे तो भी टांग उपर. चालू दया तुमचे.

मंदार दिलीप जोशी's picture

20 Aug 2014 - 3:37 pm | मंदार दिलीप जोशी

तुमच्या टांगांची काळजी करा.

हेहे. त्याची कल्जी नसावी.

मंदार दिलीप जोशी's picture

20 Aug 2014 - 3:44 pm | मंदार दिलीप जोशी

बरं

प्रसाद गोडबोले's picture

20 Aug 2014 - 3:53 pm | प्रसाद गोडबोले

धन्या/मंद्या लढ तु !! *BRAVO*

औचित्यभंग!!संपादक मंडळावर विसंबून मी आपल्याला खालील उत्तर देऊ इच्छितो-

माझ्या माहितीतल्या अनेकांना हत्या झाली तेव्हा दाभोलकरांची झाली म्हणून काहीही सोयरसुतक नव्हतं.

माझ्या माहितीतल्या अनेकांना तसे ते होते. आम्हाला स्वतःला होते. आणि आपल्या वाक्यावरून असे वाटते, की आपल्या माहितीतीलही काही जणांना या गोष्टीचे सोयरसूतक होते. पण मुळात या वाक्याचे महत्त्व ठरेल ते याने, की आपल्या माहितीत कोण लोक येतात. इथे लक्षात घेण्याची गोष्ट अशी, की सहसा आपण आपल्या समविचारी लोकांमध्ये रहाणे प्रीफर करतो. त्यामुळे जेव्हा आपण म्हणता की माझ्या माहितीतील अनेकांना, तेव्हा त्याचा खरा अर्थ हा की आपल्या स्वतःला (-त्याचे काही सोयरसूतक नव्हते). आता हा वैयक्तिक विषय झाला. आपल्या दृष्टीने ही चांगली गोष्ट म्हणावी लागेल, कारण आमच्यासारखे आपण दु:खी नाहीत.

त्यामुळे त्यांच्या क्षेत्रात थोर व्यक्तिमत्व होतं असं म्हणा.

"त्यांच्या क्षेत्रात" हे वेगळे म्हणावे लागत नाही. काही क्षेत्रे सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शी असतात. त्यांचे कार्य अशा स्वरूपाचे होते. आणि आपण मिडीयाचा उल्लेख वर प्रथमच केला आहेत. इतका वेळ तुम्ही इथल्या सदस्यांना सांगत होतात त्यांना ग्लोरीफाय करू नका म्हणून. माझा प्रतिसाद त्या अनुषंगाने होता.

रच्याकने , हर्षद मेहेता हा थोर होता असे आपले प्रामाणिक मत आहे का?

हर्षद मेहेताचा उद्देश होता की व्यवस्थेतील त्रुटी शोधून त्या आहेत तोवर स्वतःचा फायदा करून घेणे. त्याच्या जवळ जे गेले ते सर्व पस्तावले.

मंदार दिलीप जोशी's picture

20 Aug 2014 - 3:57 pm | मंदार दिलीप जोशी

माझ्या ऑफिसमधे सगळे समविचारी नाहीत. तिथे तर कुणाला काहीच पडलेली नव्हती. "काय चाल्लंय पुण्यात कठीणे" अशी प्रतिक्रिया व्यक्त केली गेली. म्हणजे गटारात पडून एखादा सायकलस्वार मेल्यावर जशी प्रतिक्रिया येईल तशीच.

रच्याकने , हर्षद मेहेता हा थोर होता असे आपले प्रामाणिक मत आहे का?>> त्याच्या क्षेत्रात थोर. दाभोलकर कसे त्यांच्या कंपूत थोर होते. तसाच.

असंका's picture

20 Aug 2014 - 4:14 pm | असंका

आपल्या ऑफीसमध्ये सगळे समविचारी नाहीत हे ऐकून वाईट वाटले. अशा संस्था , आणि नैसर्गिक रीत्या तिथे काम करणारे लोक नावारूपाला येणे जरा अवघड असते. सहसा लोक आपल्यासंबंधीच्या अशा गोष्टींना अपमानास्पद मानून चारचौघात सांगणे टाळतात, म्हणजे तार्कीक दृष्ट्या वागणारे.

दाभोळकरांच्या संघटन कौशल्याला आपण कंपूबाजी म्हणत आहात? गटारीत पडून सायकलस्वार मेला असे आपण कधी स्वत: पाहिले आहे का? हे तर्कसंगत वाटत नाही! आपल्याला तर्कसंगत न वागता केवळ चिखलफेक करायची आहे का?

श्रद्धांजलीच्या धाग्यावर येऊन हे सगळे बोलणे हे आपल्या दृष्टीने योग्य आहे का?

मंदार दिलीप जोशी's picture

20 Aug 2014 - 4:28 pm | मंदार दिलीप जोशी

आपल्या ऑफीसमध्ये सगळे समविचारी नाहीत हे ऐकून वाईट वाटले. अशा संस्था , आणि नैसर्गिक रीत्या तिथे काम करणारे लोक नावारूपाला येणे जरा अवघड असते. >> काय पण समज आहे हो तुम्हाला. भन्नाटच. काम करणार्‍यांकडे कामाच्याबाबतीत लागणारी हुशारी आणि टीमवर्क, तसेच कंपनीच्या भल्याचा विचार असणे असणे महत्वाचे असते. तुमच्या माहितीसाठी...आमचे ऑफिस दिवसागणिक प्रगती करत असून अस्मादिकांना नुकतीच पदोन्नती मिळालेली आहे. तेव्हा काळजी नसावी.

सहसा लोक आपल्यासंबंधीच्या अशा गोष्टींना अपमानास्पद मानून चारचौघात सांगणे टाळतात, म्हणजे तार्कीक दृष्ट्या वागणारे.>> वरची कमेंट वाचा. तुमची वैचारिक दिवाळखोरी समजेल.

दाभोळकरांच्या संघटन कौशल्याला आपण कंपूबाजी म्हणत आहात? >> हो.

गटारीत पडून सायकलस्वार मेला असे आपण कधी स्वत: पाहिले आहे का? हे तर्कसंगत वाटत नाही! >> पेपर वाचत चला. याहून अतार्किक पण सत्य बातम्या असतात. नुसता संध्यानंद वाचत असणार तुम्ही.

आपल्याला तर्कसंगत न वागता केवळ चिखलफेक करायची आहे का?>>
चिखलफेक आणि सत्यकथन यातला फरक सम्जून घ्या. मी सत्य बोलत आहे.
सांगितलेना,

श्रद्धांजलीच्या धाग्यावर येऊन हे सगळे बोलणे हे आपल्या दृष्टीने योग्य आहे का?>> योग्य-अयोग्यचा प्रश्नच नाही इथे. सत्य कथन करणे हे महत्वाचे आहे.

वैचारीक दिवाळखोरी हा आपला माझ्यावरचा वैयक्तिक हल्ला होता. मीही अनवधानाने वैयक्तिक बोललो होतो. त्याबद्दल माफी मागून एवढीच विनंती करतो, की कृपया माझे जे चुकेल ते तसेच दाखवा, जशास तसे करत बसलो, तर सगळेच आंधळे होऊ.

पदोन्न्ती बद्द्ल हार्दिक अभिनंदन.

दाभोळकरांच्या संघटनेचा संघर्ष हा विशेष भाग होता. त्यांचे कामच प्रस्थापित विचाराविरूद्ध निर्भिडपणे जाऊ शकणार्‍यांना एकत्र आणायचे असे होते. त्यांनी असे लोक एकत्र आणले. त्यांना बळ दिले. धाडस दिले. साधा मनातल्या मनात विचार करून बघा, दाभोळकर म्हणून तर जाऊच दे, एक कार्यकर्ता होणं पण किती अवघड आहे. आणि असे अगणित लोक, त्यांनी बांधले. कंपू म्हणालात म्ह्णून त्यांची किंमत कमी नाही होत.

मंदार दिलीप जोशी's picture

20 Aug 2014 - 5:04 pm | मंदार दिलीप जोशी

मी पण वैय्यक्तिक प्रतिटिप्पणीबद्दल दिलगीरी व्यक्त करुन थांबतो :)

मी ही दिलगीरी व्यक्त करतो. शब्दाला शब्द वाढत गेला.

माझंही म्हणणं एव्हढंच होतं की मृत व्यक्तीच्या श्रद्धांजलीच्या धाग्यावर त्या व्यक्तीबद्दल नकारात्मक चर्चा नको. डॉ. दाभोलकरांचे विचार सार्‍यांनाच पटतील किंवा पटायला हवेत असं काही नाही. मात्र ती चर्चा वेगळ्या धाग्यावर करता येऊ शकते.

प्रसाद गोडबोले's picture

20 Aug 2014 - 5:23 pm | प्रसाद गोडबोले

मी ही दिलगीरी व्यक्त करतो.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

24 Aug 2014 - 12:59 pm | विश्वनाथ मेहेंदळे

मी ही दिलगीरी व्यक्त करतो.

मी ही आता दिलगीरी व्यक्त करूनच टाकतो.

मृगनयनी's picture

20 Aug 2014 - 3:10 pm | मृगनयनी

डोंबलाचं ग्लोरिफिकेशन. ते नॅचरल मृत्यू ने मेले असते तर इतका आक्रोश झालाच नसता. एकादाच अरेरे म्हणुन लोक पुढे गेले असते. हत्या झाली म्हणून एक माणूस महात्मा झाला नाही तर यांच्यासारखीच त्यांची क्रेडिबिलिटी खड्ड्यात गेलेली होती.

शिवाय त्यांची हत्या त्यांच्या कार्यामुळेच झाली असा सोयिस्कर अर्थ काढला अनेकांनी. ती हत्या अनिस मधल्या आर्थिक भानगडींनी पण झालेली असू शकते.

१०८ % सहमत!!!! दाभोळकरांची हत्या ही नक्कीच त्यांच्या कार्यामुळे घडलेली नाही. "अंनिस" मधल्या आर्थिक भानगडी आणि "एका" प्रॉपर्टीचे वाद त्यांच्या हत्येस कारणीभूत ठरलेले आहेत!!! काही राजकीय व्यक्तींचा देखील यात हात असू शकतो. तसेच त्यांचा खुनी सापडू नये.. व "मूळ" कर्त्या'चे नाव समोर येऊ नये.. म्हणून सर्वांचीच धडपड चालू आहे.
अर्थात या हत्येचा फायदा मात्र 'अ‍ॅक्ट' पास होण्यासाठी मात्र पुरेपूर करवून घेता आला. खर्‍या खुन्याविषयी अज्ञान असणार्‍या आणि दाभोळकरांवर श्रद्धा असणार्‍या लोकांनी बोम्बा मारू नये म्हणून लगेच "पद्मश्री" पण बहाल केला गेला. पण याचा अर्थ दाभोळकरांना "शहीद" किंवा "महात्मा" अश्या पदव्या देण्याची गरज आहे, असे वाटत नाही.

काही वर्षांपूर्वी हिन्दु- धर्माच्या नावाने आणि परंपरांच्या नावाने खडे फोडणार्‍या दाभोळकरांना मात्र शेवटी हिन्दु धर्मानुसार "अग्नी" देण्यात आला. रूढी-परम्परांविषयी प्रचन्ड चीड असणार्‍या दाभोळकरांना अंनिस'वाल्यांनी आणि कुटुम्बियांनी शेवटी अग्नि देण्यापेक्षा पारशी धर्मानुसार एखाद्या विहिरीत टाकून किमान भूतदया तरी दाखवायला हवी होती... किंवा रूढीविरुद्ध मुलाचे नाव "हमीद" ठेवून आपल्या पाखंडी'पणाचे गोडवे लोकांना गायला लावणार्या दाभोलकरांना "हमीद"ने एखाद्या कबरीत तरी दफन करायला हवे होते. कदाचित दाभोळकरांबद्दल सॉफ्ट कॉर्नर असणार्‍यांना हे खूप आततायी वाटू शकतं. पण या फक्त "होऊ शकलं असतं" अश्या शक्यता वर्तवल्या आहेत!!!

जे पोलिस आणि सीबीआयलासुद्धा माहिती नाही ते तुम्हाला माहिती आहे. ग्रेट. :)

जे पोलिस आणि सीबीआयलासुद्धा माहिती नाही ते तुम्हाला माहिती आहे. ग्रेट. Smile

हाहाहा हं .. हं.. .. धन्या.. असं तुम्हाला वाटतंय.. पण तसं नाहीये... "खरा खुनी" कोण आहे... हे पोलिस आणि सीबीआय या खात्यांपैकी काही जणांना माहित आहे. परन्तु दुर्दैवाने ते ओपन करण्याची मुभा त्यांना नाही. "प्लॅन्चेट" या प्रकाराबद्दल पॉझिटीव्हली बोलल्यावर डॉ. विजय भटकरांना देखील जीवे मारण्याची धमकी दिली गेली.. त्यामुळे नाईलाजाने त्यांना नन्तर आपले शब्द फिरवावे लागले. तीच गोष्ट "मृत्यूनन्तरचा प्रवास" यावर पी.एच डी. केलेल्या पुण्यातील वक्त्या- "मेधा खाजगीवाले" यांची. हं हं... शेवटी आपला "जीव" सगळ्यांनाच प्यारा असतो की!!!! :)

जपून रहा गो तू पण. कल्जी घेने.