गंप्या भल्या पहाटे पक्षी निरीक्षणास निघाला ,तो जेव्हा गावाबाहेर पडला तेव्हा त्याला एका झोपडी बाहेरील कोंबड्याच्या दडब्यातून काही आवाज आला ,त्याने तेथे थांबून ऐकण्यास सुरुवात केली,तेथे एक कोंबडी ,कोंबड्यास म्हणत होती ,अहो लवकर उठा ,तुम्हाला आरवायचे नाही का ?तुमच्या शिवाय लोक उठतील कसे?त्यावर कोंबडा आळसावत म्हणाला अग आता माझे काम मशीद वाले कर्णे लावून अजान देवून करतात ,मला मस्त झोपू दे ,गंप्या हसत ह्सत पुढे निघाला थोड्याच वेळात गंप्या जंगलात पोचला ,नुकताच सूर्योदय झाला होता,गंप्या एका झाडा खाली बसून आपल्या दुर्बिणीने पक्षी निरीक्षण करू लागला एवढ्यात त्याच्या कानावर एका पोपटीणीचा आवाज आला ,अहो जरा लांब व्हा,तो पहा चावट मनुष्य आपल्या कडे कसा एकटक पाहत आहे,आता जंगलात सुद्धा आपल्याला प्रायव्हसी नाहीं ,पोपट व पोपटीण गंप्या कडे रागाने पाहत उंच उडून गेले जंगलात तळ्याकाठी गम्प्या पोचला तेव्हा एक बगळा दुसऱ्यास म्हणत होता आता माश्यांना पूर्वी सारखी चव राहिली नाही,त्यांना दारूचा वास येतो ,त्यावर दुसरा बगळा म्हणाला अरे हल्ली शहरातले लोक येथे येतात,धिंगाणा घालतात,दारू पिवून बाटल्या तलावात फेकतात ,माश्यांना फरसाण टाकतात त्यामुळे मासे चविष्ट लागत नाहीत ,ते खावून आपल्याला ग्यासेस होतात ते ऐकून गम्प्यास शहरी लोकांची चीड आली,गंप्या बसला असतांना सातभाई पक्षांचा थवा तेथे आला ,त्यातील एकाचे लक्ष गंप्या कडे गेले,तो इतरांना म्हणाला तो माणूस आपल्याला पाहण्यास आला आहे,त्याला म्हणावे नुसतेच पाहू नको ,आमच्या कडून काही शिक,आम्ही सर्व कसे एकोप्याने राहतो,तुम्ही कधीच एकोप्याने राहत नाही ,एका ठिकाणी पोट खपाटीला गेलेली गिधाडे आपसात बोलत होती,ह्या खादी ग्रामोद्योग वाल्यांनी बाकीचे उद्योग करायचे सोडून आमचे खाद्य घश्यात घातले,पूर्वी मेलेल्या जानवरां वर आपला हक्क होता,आता जानवर मेले कि हि शहरी गिधाडे त्यांना पळवून नेतात व आपली उपासमार होते,
पहाटे मशिदीच्या कर्ण्यातून अजान ची घोषणा होऊ लागली त्या कर्कश्य आवाजाने गंप्या एकदम जागा झाला ,त्याला पडलेल्या स्वप्नांचे त्याला हसू आले
प्रतिक्रिया
11 Aug 2013 - 3:45 pm | विजुभाऊ
पहाटेची अजान तुम्हाला खटकते. गणपतीत रात्री उशीरापर्यन्त चालणारा कानठाळी बसवणरा धांगडधिंगा. चालतो.
कधीही वेळीअवेळी होणार्या काकडाअरत्या वगैरे बद्दल काहीच बोलत नाहीत.
दिवाळीत फटाक्याम्च्या आवाजाने /धुराने किती पक्ष्याना जनावराना काय त्रास होत असेल या बद्दल अवक्षर नाही.
सम्क्रांतीच्या दिवसात पतंग उडवण्यातुन किती पक्षी बळी पडतात त्याबद्दल नाही.
बहुतेक स्वप्न देखील बायस्ड व्हायला लागली आहेत.
11 Aug 2013 - 9:54 pm | शिल्पा ब
तुम्हाला आजपासुन विजुचिच्या ही पदवी देण्यात येत आहे.
12 Aug 2013 - 11:50 pm | धमाल मुलगा
विजुभाऊ शाह अब्दाली ह्यांच्याशी तह-ए-दिल से सहमत!
-धमाल महंमद बिन तुघलक.
13 Aug 2013 - 3:45 am | रामपुरी
चार दिवस दिवाळी, १-२ आठवडे पतंग, १० दिवस गणपती यावर बंदी आलीच पाहिजे. आणि "रोज" पहाटे कानाचे पडदे फाटतील एवढ्या मोठया आवाजात मशीदीवर कर्णे लावून कर्णमधूर अजान झालीच पाहिजे. ते तर लोकांना झोपेतून उठवायचे पवित्र काम करतात. आणि मोठ्या आवाजात कर्णे लावा हे तर पैगंबरानच लिहून ठेवलंय कुराणात. त्याला कुणाचा काय इलाज.