लहानपणी शिकवणीला प्रथम शब्द शिकवतात तो “श्री” म्हणून म्हटलं प्रथम लेख लिहावा तो “श्री” चे नाव घेऊनच.
आपले म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपती बाप्पा. पूर्वी देवपूजा शास्त्रोक्त पद्धतीने केली जायची परंतु आता मात्र देवदर्शनाचे किंबहुना देवाचेच मार्केटिंग सुरु झाले आहे.
गेल्याच आठवड्यात सासू-सासरे मुंबईस आले तेव्हा म्हटलं मुंबई दर्शनाची सुरुवात “श्री” चे नाव घेउनच करू.
१२ वा. सुमारास सिद्धिविनायक, दादर येथे पोहोचलो. गाडीतून पाय काढला तोच दुकानाचे मार्केटिंग अधिकारी मागे लागले त्यांचा ससेमिरा चुकवत नेहमीच्याच दुकानात गेलो. बाप्पांसाठी प्रसाद घेतल्यानंतर मंदिराच्या गेट पाशी आलो. तिथे उभ्या असलेल्या security guard नी सो called formality म्हणून checking केली. आत गेलो तर आणखी मार्केटिंग अधिकारी, पण हातात अगोदरच घेतलेले ताट पाहून परत गेले. वाटल कशासाठी हि जबरदस्ती . . .आणि नाही घेतल्यावर दाखवलेला राग.
सिंदूर लेपन चालू असल्याने अर्धा तास थांबाव लागणार होत. यजमान आपल्या आई-वडिलांना मंदिराबद्दल, खास प्रसंगी होणाऱ्या गर्दीबद्दल माहिती देत होते. ऊन अगदी कडक पडले होते जणू काही बापांच्या दर्शनासाठी परीक्षाच होती ती . . .
रांगेत अनेक कॉलेज ग्रूप आढळून आले, हातामध्ये महागडे फोन ज्याच आकारमान कानापासून खांद्यापर्यंत होत. काही जण जप करत होते तर काही गप्पा. एवढ्यात रांग पुढे सरकायला लागली. एका बाजूला ५० रू. देउन पासधारकांची रांग होती.
१०-१५ मी. आम्हाला आत सोडले तेव्हा माणसांचा एक लोंढाच पुढे ढकलला गेला. माझे सासू-सासरे तर बुचकळ्यात पडले होते. त्यांना घेउन आम्ही पुढे सरकत होतो. एवढ्यात समोरून पासधारकांना सुद्धा सोडण्यात आले. दोन्ही रांगा एकत्र मिळाल्या.....देव जाणे तो पास कशासाठी ?
गणपती बाप्पा नीटसे दिसत सुद्धा नव्हते आत पायरीवरून खाली उतरलो तोच नेमण्यात आलेले प्रतिनिधी “पुढे सरका , बाहेर जा, हो गया क्या आपका” घोषणा देत होते. कस बस गर्दीला जुमानत आत प्रवेश केला बघितल न बघितल तोच आम्ही बाहेर ढकलले गेलो. २-३ मी. साठी आम्ही कुंभ मेळ्यात हरवतात तसे वेगळे झालो आणि मग शोधाशोध करून भेटलो एकदाचे. समोरच्या जागेत बसून प्रार्थना करावी तर आधीच housefull. एका रिकाम्या जागी बसावं तर आधीच बसलेला लहान मुलगा म्हनाला “मेरी mummy आ रही है” झालं …… इथे सुद्धा reservation. नंतर मिळाला एकदाचा एक कोपरा बसलो २ मी. देवाचे नाव घेतले आणि उठलो आणि बघत होते तो लोकांचा लोंढा त्यांना नुसते बाहेर ढकलले जात होते. त्यांनी तिथे उभे राहू नये म्हणून तिथे उभे असलेले कर्मचारी त्यांना baricade सरकवून पुढे ढकलत होते. मनाचा संताप होत होता पण नुसताच . . .
मारुती रायाचे दर्शन घेतले आणि मूषक मामचे दर्शन करावयास गेलो तर तिथे सुद्धा रांग प्रत्येकजण उंदीर मामाच्या कानात आपली इच्छा सांगत होता , वेळेचे काही बंधन नाही आम्ही आपले हात जोडले आणि नारळ exchange करण्याच्या रांगेत उभे राहिलो अख्खा नारळ देऊन अर्धा घेतला. एका भिंतीवर चौकोनी आकारात संगमरवर बसवले होते तिथे प्रत्येक जण आपल्या बोटाने जाऊन काहीतरी लिहीत होता. मला पाहून आश्चर्य वाटले की कितीतरी लोक ते पाहून तेच करत होते कसलीही शहनिशा न करता.
हे एवढ लिहिण्याच कारण कि एवढी प्रतीक्षा करून, धक्का बुक्का खाऊन आपल्याला आपल्या बाप्पाला एक क्षणसुद्धा बघता न याव. मग हे जे नट – नटी येतात त्यांना का एवढा प्राधान्य द्याव. काल कोण म्हणे तर अमिताभ बच्चन आलेला आपल्या प्रिय सुनेसोबत काकड आरतीला (त्यांच्या ह्या सासरा – सून प्रेमाबद्दल एक वेगळाच लेख लिहावा लागेल ), आज कोण तर चक्क सनी लिओनी.
संताप करतच बाहेर पडले आणि पतीने कारण विचारले असता सांगितले तेव्हा तो म्हणाला तू किती लाखांचे डोनेशन देतेस कि त्यांनी तुला vip treatment व बाप्पांचे मनमुराद दर्शन घेण्याची मोकळीक द्यावी. ह्यावरच उत्तर कळलेच नाही....मनात म्हटलं मला माझ्या बाप्पांना डोळे भरून बघण्यासाठी मनी श्रद्धा असावी कि मी धनी . . . .
इतक्यात driver आला त्याला प्रसाद दिला आणि निघालो पुढे मुंबई दर्शनाला ....”बाप्पांची धावती भेट घेऊन”
प्रतिक्रिया
5 Mar 2013 - 3:31 pm | संजय क्षीरसागर
असं ज्याला वाटतं त्याला सदैव असाच त्रास होणार!
5 Mar 2013 - 3:46 pm | स्पा
याबाबतीत लै वेळा सहमत
5 Mar 2013 - 9:23 pm | मोदक
+११११११११११११११११
5 Mar 2013 - 3:59 pm | Dhananjay Borgaonkar
हे बाजारीकरण वाढतच जाणर यात तिळमात्र शंका नाही.
5 Mar 2013 - 3:59 pm | दादा कोंडके
लेकीन इस सब की जड 'गणपती आहे' असं वाटणंच आहे. ;)
5 Mar 2013 - 4:09 pm | संजय क्षीरसागर
'गणपती आहे' की नाही हा मुद्दा नाहीये. सगळे गणपती (तरी) एक आहेत की नाही असा सवाल आहे!
5 Mar 2013 - 6:48 pm | प्यारे१
गणपती नाहीच्चे! पुढे????
(परा मोड>>> कोण गणपती? )
5 Mar 2013 - 8:29 pm | दादा कोंडके
म्हणजे उद्या त्यांनी घरात (तुळजा)भवानी नाही म्हणून तुळजापुरला गेले तर चालेल का तुम्हाला?
सांगा सांगा.
आता का गप्प क्षीरसागर साहेब?
नाही, आता तुम्ही बोलाच.
5 Mar 2013 - 10:12 pm | धन्या
जिकडे तिकडे शोधीत का रे, फीरशी वेडयापरी...
वसे तो देव तुझ्या अंतरी...
अर्थात देव आहे असं मानत असाल तर. नसाल तर प्रश्नच मिटला. :)
5 Mar 2013 - 11:53 pm | अत्रुप्त आत्मा
@अर्थात देव आहे असं मानत असाल तर. नसाल तर प्रश्नच मिटला. >>> +++१११
6 Mar 2013 - 1:02 am | संजय क्षीरसागर
गाडी त्यांची, ड्रायवर त्यांचा आपण कोण आडवणार त्यांना?
देव (असेल तर) तो एकच आहे (आणि ते ही त्याला मानणारे ठामपणे सांगतात) इतकंच आपण सांगू शकतो. मग मारूतीला जायचं का म्हसोबाला... का कोणताही एक फोटो बास आहे, हे ज्याचं त्यानं ठरवावं.
5 Mar 2013 - 5:36 pm | सुहास झेले
अगदी अगदी.....
5 Mar 2013 - 3:33 pm | तुमचा अभिषेक
सिद्धिविनायक अंगारकीच्या दिवशी जा नक्की कधीतरी. गरीब श्रीमंत सारे भेद गळून पडतील. सरसकट सार्यांचेच हाल होतात. भोगले आहेत स्वत:.
तेव्हाच कानाला खडा लाऊन बाप्पांची माफी मागितली होती, यापुढे कधी अंगारकी किंवा साधी संकष्टीच काय, मंगळवारी किंवा विकांतालाही तुझ्या दर्शनाला येणार नाही. कधी मधल्या एखाद्या दिवशी भेटू, मग तू आहेस आणि मी आहे.
तसेही कशावरून गर्दीच्या दिवशी बाप्पाच मंदीरातून पळ काढत नसतील.. ;)
5 Mar 2013 - 3:55 pm | अभ्य
देव देवारयात नाही.. या गाण्याच्या ओळी आठवतात.. सिद्धीविनायक ची हि अवस्था तर तिकडे साईबाबांची पण तीच अवस्था
शिर्डी ला तर जाववत नाही.. असो घरी बसून मनोभावे हात जोडले तरी देवा पर्यंत भावना पोचतात.. तुम्हाला झालेल्या त्रासाची कल्पना आहे कारण कधीतरी मी हि गेलोय या मनस्तापातून.. संजय साहेबांशी सहमत..
5 Mar 2013 - 4:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सिद्धीविनायकाच्या दर्शनाचा असाच अन्भव घेतला आहे. श्रद्धेने नमस्कार केला की तो सर्व देवांना पोहचतो. पण, आपले संस्कार रितीभाती या गोष्टी आड येतात. असो. अजून एकदा सिद्धीविनायकाला जायचं आहे. मिपाकरांच्या नादी लागून क्रिकेट वर्ल्ड कप अंतिम सामन्याच्या वेळेस बोलून गेलो दर्शनाला येईन. एवढं सिद्धीविनायकाचं ओझं बाकी आहे. :)
-दिलीप बिरुटे
5 Mar 2013 - 4:59 pm | संजय क्षीरसागर
हात्तीच्या! आहो, निदान `भारताची लोकसंख्या ६० कोटी कर, दर्शनाला येईन' म्हणायचं. औरंगाबादहून तुम्हाला घेऊन चालत सिद्धिविनायकला गेलो असतो.
5 Mar 2013 - 5:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>> भारताची लोकसंख्या ६० कोटी कर, दर्शनाला येईन' म्हणायचं.
क्रिकेटच्या म्याचच्या वेळी भावनेच्या भरात बोलून गेलो. आणि देवाकडे, सर्व गोष्टींचा अनुक्रमांक ठरलेला असतो त्याच्या त्याच्या पद्धतीने एकेके विषय पटलावर आले की तो निर्णय घेतो. त्यामुळे लोकसंखेच्या विषय त्याच्या पटलावर येईल तेव्हा त्याचा डिसिजन झालाच समजा. :)
>>>>औरंगाबादहून तुम्हाला घेऊन चालत सिद्धिविनायकला गेलो असतो.
अरे बाप रे चालत...औरंगाबाद टू सिद्धिविनायक...कब्बी नै.
-दिलीप बिरुटे
5 Mar 2013 - 5:10 pm | संजय क्षीरसागर
मुलं गणपतीला होतात का माणसाला?
तुम्ही बिनधास्त राहा हो. गणपती जर लोकसंख्या ६० कोटी करू शकतो तर बिरूटे का चालत जाऊ शकणार नाहीत?
5 Mar 2013 - 9:17 pm | मोदक
संक्षी, खर्र खर्र सांगा...
प्राडाँना जायचे तिकडे जावूदे पण त्यांनी पायपिटीचे ३० / ४० धागे टाकू नयेत अशी तुमची (मनातली खर्री खुर्री) इच्छा आहे ना..? ;-)
सर्वांनी हलके घ्या हो!
5 Mar 2013 - 4:56 pm | श्रिया
संजय क्षीरसागर आणि प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांच्या खालील प्रतिसादांशी प्रचंड सहमत!
घरातला गणपती आणि सिद्धिविनायक यात फरक आहे असं ज्याला वाटतं त्याला सदैव असाच त्रास होणार!
श्रद्धेने नमस्कार केला की तो सर्व देवांना पोहचतो
देवावर किती भक्ती आहे, ह्याचे मोजमाप त्या देवस्थानाला किती दान केले ह्या आधारावर केले जाते ते खरच दुखदायक आहे.
5 Mar 2013 - 5:02 pm | संजय क्षीरसागर
बिरूटेसरां बरोबर मला बसवल्याचा तिव्र निषेध!
5 Mar 2013 - 5:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
निषेध पोहचला. नका बसू आमच्याबरोबर.
चला आता तिकडे खरडफळ्यावर. (उठाबसायच्या गप्पा तिकडे करु.)
-दिलीप बिरुटे
(उठाबसायचा नाद असलेला)
5 Mar 2013 - 5:25 pm | संजय क्षीरसागर
(निषेध गणपतीला साकडं घालण्याचा आहे)
5 Mar 2013 - 9:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>> बसायचं तर केंव्हापण पुण्याला या हो!
मनःपूर्वक आभार.
>>> (निषेध गणपतीला साकडं घालण्याचा आहे)
मी गणपतीला साकडं घालीन नै तर म्हसोबाला साकडं घालीन.
मला काय करायचं ते मी करीन. तुम्हाला कशाचा निषेध करायचा तो करा.
-दिलीप बिरुटे
(धार्मिक )
5 Mar 2013 - 5:26 pm | शिद
हे असले प्रसंग आता प्रत्येक देवस्थानी अनुभवण्यास येतात...सामान्य माणसाचा नाईलाज आहे कारण पैसा बोलता है...
5 Mar 2013 - 10:17 pm | धन्या
सामान्य माणसाचा नाईलाज असतो हे समजण्यासारखे आहे. पण अशावेळी देव काय करतो? की त्याला बोलणार्या पैशाचा वाटा मिळतो? :)
6 Mar 2013 - 4:33 pm | शिद
देवाला कसला आला आहे वाटा??? तो तर बिचारा समोर होत असलेल्या भ्रष्टाचाराकडे निमुटपणे विषिण्ण होऊन पहात असतो...आणखी त्याच्याकडे दुसरा पर्याय तरी काय आहे?
6 Mar 2013 - 4:34 pm | शिद
:( :( :(
6 Mar 2013 - 6:53 pm | धन्या
त्याने असं नको करायला. आपण पुराणांमधून, महाभारत, रामायणातून इतके चमत्कार ऐकतो. असाच एखादा चमत्कार त्याने आताही करायला काय हरकत आहे. तो सर्वव्यापी, सर्वज्ञानी आणि सर्वशक्तिमान आहे. त्याच्यासाठी काय अवघड आहे?
कदाचित, हे कलियुग असल्यामुळे तो काही चमत्कार करत नसेल. एकदा कलीयुगाची वर्ष संपली, मानवजातीच्या पापांचा घडा पुर्ण भरला की मग एकदम नव्या सृष्टीला जन्म देण्यासाठी तो एकदम महाप्रलयच करेल.
5 Mar 2013 - 5:34 pm | इरसाल
ती मानता कधी पुरी करता ते बोला आधी.
नाय तर पुढचा वोर्ल्द कप गेला म्हणुन समजा हातचा.
5 Mar 2013 - 7:01 pm | एम.जी.
सोमवारी देवीला... मंगळवारी दत्ताला.... बुधवारी गणपतीला... गुरुवारी मारुतीला... शुक्रवारी शंकराला..आणि शनिवारी दत्ताला जावे...
असे त्रास किंचित कमी होतात...
5 Mar 2013 - 10:24 pm | धन्या
मग जायचेच कशाला.
देवदर्शनाला जाताना देहाला जितक्या जास्त यातना होतात तितके जास्त पुण्य गाठीला जमा होते. तसे नसते तर डोंबीवली कल्याणवरुन फास्ट ट्रेन असताना लोकं सोमवारी रात्रीपासून प्रभादेवीला चालत कशाला निघाली असती, किंवा ते वडीलांची मधूशाला वाचणारे बच्चनसाहब आपला गाडयांचा ताफा सोडून जुहूवरुन प्रभादेवीला चालत कशाला आले असते?
इतकंच काय हे साधं गणित अडाणी शेतकर्यांनाही कळतं. मरापम च्या पंढरपूरला जाणार्या थेट गाडया असतानाही ते एक दिड महिना वारीत चालत जातात.
छ्या. लोकांना साध्या साध्या गोष्टीसुद्धा माहिती नसतात. म्हणूनच या देशात पाप वाढून भ्रष्टाचार फैलावला आहे.
6 Mar 2013 - 12:07 am | दादा कोंडके
सहमत!
दरवर्षी कोजागिरीला सोलापुर ते तुळजापुर पायी जाणार्या मित्राला यष्टीने का जात नाहीस असं विचारलं तर तो म्हणाला देवाला पायी जावं लागतं आणि ते सुद्धा अनवाणी. मी म्हणालो मग आत्मक्लेशच करून घ्यायचे असतील तर मग नागडा का जात नाहीस? किंवा मग रस्त्यावरून लोळत का जात नाहीस? ही ग्वाट वाइल्ड, यु नो. :)
6 Mar 2013 - 6:42 pm | ५० फक्त
किंवा मग रस्त्यावरून लोळत का जात नाहीस? -
आहेत असे देखील आहेत, सोलापुरातली रुपाभवानी ते तुळजापुरची तुळजाभवानी लोटांगण घालत जाणारे.
6 Mar 2013 - 7:36 pm | दादा कोंडके
म्हणजे आजुबाजूला पण हटयोगी आहेत.
याच अनुशंगाने हा दिलेला प्रतिसाद आठवला.
5 Mar 2013 - 7:14 pm | रेवती
अगदी असाच प्रकार (मोठ्या प्रमाणावर) तिरूपतीला आहे. आपण निदान ढकलले जातो पण जगन्नाथ पुरीला पंड्ये भक्तांना लाथा मारून बाजूला सारतात असे ऐकले आहे. दर्शन लवकर व्हावे व बरोबरील वृद्ध व्यक्तींना फारसे ताटकळावे लागू नये म्हणून मैत्रिणीने या पंड्याला पैसे दिले. नंतर हे पंड्ये लोकांना लाथा मारून आपल्याला दर्शनाला जागा करून देतील असे कोणाच्या स्वप्नातही नव्हते. तीही अशीच संतापली होती. नंतर तिने तिच्या सासूबाईंकडून पुन्हा अश्या देवस्थानांना भेटी न देण्याचे कबूल करून घेतले. मी कधी देवस्थानांना भेट देऊ शकेन असे वाटत नाही. या देवळांच्या आजूबाजूचा परिसर भक्तांशी सतत बिझनेस करत असतो. ते लोक म्हणतील तसेच आपल्याला करावे लागते नाहीतर रागराग.
5 Mar 2013 - 10:29 pm | धन्या
मला तर अशा वेळी देवाचाच राग येतो. समोर एव्हढा तमाशा चालू असताना तो मात्र ठोंब्यासारखा बसून असतो.
6 Mar 2013 - 5:19 am | स्पंदना
अग तिरुपतीचा एक किस्सा सांगते.
सिंगापुर मध्ये एक धमाल नेव्हीमधला माणुस भेटला होता. साउथैंडीअन! त्याच्या बायकोचे केस फार कुरळे होते. एकदा तीने जाउन ते स्ट्रेटन केले. याला ते फारस आवडल नसाव, तर एकदा याने तीला हाक मारली अन तीने "ओ" नाही दिली तर हा म्हणाला ते स्ट्रेटन केल्यामुळे तुझे अॅटीने खराब झालेत. रेंज पकडत नाहीत.
ते जाउ दे. तर हा अतिशय हजरजबाबी अन कोणत्याही परिस्थीतीत थंड चेहर्याने जोक करणारा माणुस. तिरुपतीला जाउन दर्शनाच्या रांगेत बसायची व्यवस्था आहे तेथे, सहकुटुंब! दर्शनाला खुप वेळ लागतो म्हणुन तेथे बसायच्या मंडपात पण गेटस आहेत की माणसं पुढे जाउ नयेत. तर ते असे बसले असताना गेट उघडल, आता पुढच्या मंडपात जाउन बसायच! तोवर मागुन एक शहाणा " मुझे जरा जल्दी है। जाने दो " अस करत पुढे घुसत होता. त्या पठ्ठ्याने एकदा गेट उघडल की तिन मंडप पार करायच ठरवल असाव. तर तो या फॅमिलीला ओलांडुन पुढे गेल्यावर, हे महाशय मागुन पुढच्या लोकांना उद्देशुन म्हणाले" अरे भाई इन्हे भगवान के घर जाने की बहोत जल्दी है। जाने दो। हटो भाई भगवानके घर जाना है। जाने दो।" त्या माणसाचा पायच पुढे पडेना अन भवताल सारा हास्यात बुडाला.
5 Mar 2013 - 8:57 pm | आदूबाळ
मुंबईला नोकरीला होतो तेव्हा सिद्धिविनायकापासून पायी ५ मिनिटे अंतरावर रहायचो. गणपतीबाप्पाच्या स्पेशल दिवशी (अंगारकी, विनायकी वगैरे) रांग घरापर्यंत यायची. अनवाणी येणारे, लोळपाटणी घेत येणारे भक्त पहायला मिळायचे. गंध लावून पैसे मागणारे, भिकारी, आधीच वाहिलेली फुले काढून परत विकणारे असे अनेक अनेक नमुने ओळखीचे झाले होते. इतका उबगवाणा प्रकार असतो की यंव रे यंव. त्यामुळे कधी आत जावंसं वाटलं नाही.
देवाला शोभा भक्तांमुळे येते म्हणतात. इथे भक्तच देवाला बाजारात उभा करतात.
5 Mar 2013 - 9:44 pm | प्यारे१
१. उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यान धारणा, तृतीया प्रतिमापूजा, तीर्थयात्रा अधमाधम...!
२. लहान पणी केलेलंच मोठेपणी सुरु राहीलं तर हसं होतं! प्रत्येक साधनाचं मूल्य नि मर्यादा असतात. विशिष्ट गणपतीची विशिष्ट वेळी पूजा केली की तो प्रसन्न होईल ह्या सारखी चुकीची श्रद्धा नाही. ही ह्या साधनेची मर्यादा आहे. असं करण्यानं आपल्याला एक शिस्त लागते, आपल्या शरीराला 'तप' घडतं, त्याचं हे मूल्य आहे. दोन्ही आपापल्या जागी रास्त आहे पण म्हणून आयुष्यभर हेच करीत राहणं अपेक्षित नाहीच्च.
बाकी धंदा सगळ्याच गोष्टींचा झालेला असल्यानं लिहीलेलं मान्य आहेच.
पंढरीला पांडुरंग,पुंडलिक नि चंद्रभागा एवढंच खरं आहे, बाकी सगळं सगळीकडे मिळतंच. :)
5 Mar 2013 - 10:48 pm | धन्या
प्रतिमापूजा केली नाही किंवा तीर्थयात्रेला गेलो नाही तर आपण सात्विक आणि धार्मिक प्रवृत्तीचे आहोत हे लोकांना कळणार कसं? मी जर "अविरत हरीचे मनात चिंतन" करत राहीलो तर ते माझ्यापुरतंच नाही का राहणार?
काहीही. आले मोठे शहाणे. तुमच्या सारख्या सो कॉल्ड भक्तांमुळे अर्चनेचे पावित्र्य नष्ट झाले आहे.
हे तुमच्या पोटदुखीचे खरं कारण आहे. ज्याला तुम्ही धंदा म्हणताय तो धंदा नसून ती सेवा असते. मंदीरांच्या आसपास असणारे हे छोटेमोठे व्यावसायिक नाममात्र सेवामुल्य घेऊन तुम्ही बेलफुलांची सोय करत असतात. राहीली गोष्ट पैसे घेऊन तुम्हाला वेगळ्या रांगेतून लवकर दर्शन घडवणार्यांची. त्यात गैर काही नाही. पैसेवाले तेच असतात ज्यांनी मागच्या जन्मी पुण्य केलेले असते. त्या पुण्याईच्या जोरावरच तर ते या जन्मी धनवान झालेले असतात. मग ते पुण्य आणि पर्यायाने त्या पुण्याईने मिळालेल्या पैशाच्या जोरावर लवकर देवदर्शन करुन घेण्यात काहीच गैर नाही.
काहीही. उद्या तुम्ही चार पाच एकर जागा खरेदी करुन त्याच्यावर प्रती पंढरपूर वसवलंत तर तुम्हाला कोणी नको का म्हणणार आहे. पण तुम्ही तसं करणार नाही. कारण तसं प्रती पंढरपूर उभं करायला विठोबा काही श्रीमंतांचा देव नाही.
6 Mar 2013 - 1:01 am | विश्वनाथ मेहेंदळे
हे वाक्य मान्य आहे तुम्हाला ??
6 Mar 2013 - 7:38 am | धन्या
खर्या साधकाला ईश्वरापर्यंत जाणारे सारेच रस्ते चांगले वाटायला हवेत. हा मार्ग चांगला आणि तो मार्ग वाईट असा दुजाभाव असायलाच नको.
ह. भ. प. प्यारेमहाराज वाईकर यांच्या उत्तराच्या प्रतिक्षेत.
6 Mar 2013 - 6:51 pm | ५० फक्त
मा. श्री. प्यारे , मा.श्री. धन्या व मा. श्री. विमे, अशी मात्तबर मंडळी आल्याशिवाय मिपावर आध्यात्म्याला रंग चढत नाही हे एकच वैश्विक सत्य आहे.
तुम्ही तिघं मिळुन धागा काढा नाहीतर नाटक तरी लिहा , 'रायगडावरच्या गवतात जेंव्हा अध्यात्माला जाग येते.'
6 Mar 2013 - 7:23 pm | प्यारे१
त्या मा टिंब श्री टिंब चा नक्की काय अर्थ आहे हो माननीय श्रीमान ५० राव? ;)
नुस्तं लिहाय्चं काय?
व्यावसायिक प्रयोगच करुया!
विमे ला नाटक दिग्दर्शनाची आवड आहेच नाहीतरी... काय विमे? :)
7 Mar 2013 - 12:15 am | विश्वनाथ मेहेंदळे
हे कुठून आले मधेच ???
7 Mar 2013 - 12:14 am | विश्वनाथ मेहेंदळे
आयला, मी काय केले आत्ता ? एक साधा सरळ प्रश्न विचारला की केवळ दुसर्याचे वचन म्हणून उधृत करत आहात की पटले आहे.
वरील चर्चेचा आणि रायगडावरील चर्चेचा काहीही संबंध नाही याची नोंद घ्यावी.
6 Mar 2013 - 7:12 pm | प्यारे१
@ विमे,
तुकाराम महाराजांच्या अभंगातला चरण आहे. १००% मान्य आहे. (कारण खाली येईल.)
@ धन्या,
आधीचा प्रतिसाद पुन्हा वाचावा जी विनंती.
ध्यान धारणा, व्रत वैकल्यं, तीर्थयात्रा, प्रतिमापूजा ही सगळी साधनं आहेत नि ती वेगवेगळ्या टप्प्यावरच्या साधकांसाठी दिलेली साधने आहेत...!
प्रत्येक साधनाची एक मर्यादा आहे तसंच साधनांचं मूल्य आहे. त्या त्या पातळीवर गेल्यावर आधीचं साधन सोडून (काम झालंय असं आत जाणून घेऊन) पुढचं साधन हाती घेतलं जाऊन (आधीच्या साधनाची चेष्टा न करता- खरंच तसं असेल तर चेष्टा होत नाहीच्च) साध्याची प्राप्ती करुन घेणं हे जास्त महत्त्वाचं! साधनात अडकून राहीलं तर साध्य बाजूला राहतं!
पुण्यातल्या घराहून एव्हरेस्ट च्या सर्वोच्च ठिकाणी जायचं असल्यास आधी घर सोडणं, रिक्षात बसून स्टेशन आल्यावर रिक्षा सोडणं, मग ट्रेन मध्ये बसून योग्य स्टेशन आल्यावर ट्रेन सोडणं असं करत करत एव्हरेस्टचा पायथा देखील सोडावा तेव्हा वर जाऊ शकतो! बर्याचदा ट्रेन मध्ये बरं वाटत असतं म्हणून ट्रेन न सोडता वार्या करत बसला तर एव्हरेस्टला जाणं नाही होणार!
म्हणूनच तेच तेच साधन करत न बसता पुढचे साधन स्वीकारुन अंतिम ध्येयाकडे वाटचाल करण्याची (देव शोधावया गेलो देवचि होऊनि ठेलो - तु.म.) ओढ असली पाहीजे.
वर तूच उपहासानं लिहील्याप्रमाणं 'दाखवायचा' परमार्थ न करता देवाची भक्ती करायची असेल तर वर दिलेला चरण अत्यंत सार्थ ठरतो!
तुकाराम महाराजांनी लिहीलेला चरण त्यांच्या 'पोचलेल्या पातळीवरुन' लिहीलेला जाणवतो.(अद्वैतस्थिती)
सह-ज अवस्था म्हणजे आत्मस्थिती, सगळ्यात उत्तम.
(सह-ज : जोडीनं जन्माला आलेलं, ना हर्ष ना दु:ख, आनंदी स्थिती
ध्यान धारणा हा प्रकार साधकांसाठी आहे जे आधीच बर्यापैकी स्थिर झालेले आहेत, संकटं आल्यावर अथवा काही कारणांनी इतर विचार डोक्यात असणारांसाठी प्रतिमा/ मूर्तीपूजा करुन मूर्तीचं स्वरुप नि त्याचे गुणवर्णन व त्याची भक्ती हा भाग अपेक्षित आहे
तर तीर्थ यात्रा नि इतर व्रत वैकल्य ही काहीच न करण्यापेक्षा काहीतरी करावं म्हणून आहे.
कर्म, उपासना आणि ज्ञान असे साधन प्रकार आहेत त्यात ८०-१६-४ अशी सरासरी मांडणी केली गेलेली दिसते. कर्मप्रधान ८० % लोकांसाठी: पूजा अर्चा, यज्ञ, व्रत, वार्या इ.इ.
उपासना : १६ % लोक नामस्मरण, ग्रंथ वाचन इ.
ज्ञानः उपनिषदे इ. चा अभ्यास व त्यातल्या विचारांचे चिंतन, निदिध्यासन!
मुळात आपले ध्येय जर देवाला 'भेटणे' हे असेल तर देव म्हणजे कोण/ काय इथून सुरुवात केली पाहिजे!
धन्याचं याबाबत वाचन असल्याचं ठाऊक असल्यानं संक्षिप्त लिहीलं आहे.
6 Mar 2013 - 7:18 pm | धन्या
मी केवळ निमित्तमात्र आहे हो. तुमच्याकडून जास्त सविस्तर माहिती बाहेर यावी म्हणून थोडं डीवचलं.
माझा हेतू साध्य झाला. :)
5 Mar 2013 - 11:44 pm | उपास
देवदर्शनात स्थानमहात्म्य आहे, पण लोकसंख्याच इतकी वाढलेय, करणार काय! देवळात जाण्यामागे, त्यापेक्षा विशिष्ट देवळात जाण्यामागे भक्ताची श्रद्धा असते, त्यातून आत्मिक बळ मिळतं. मला स्वतःला तासन तास रांगेत उभं राहून लालबागच्या राजाचं दर्शन घेणार्यांची गंमत वाटते, पण ज्याला ज्यातून आनंद मिळतो तो घेऊ द्यावा असं वाटतं. तुम्ही येडे आहात, उगाच पायपीट करता, वारी वगैरे करण्यापेक्षा घरी देव्हार्यात पांडुरंगाचं दर्शन घ्या असं सामान्य, रांगड्या माणसाला सांगून काय साधणार! ह्या देवस्थानांवर हजारोंचे संसार उभे आहेत, पण अपप्रवृत्ती इतक्या वाढल्यात की तो देव शांत कसा असं वाटल्यावाचून राहावत नाही. कुण्या शेटजीने करोडो रुपये देवस्थानांवर उधळल्याची बातमी वाचली की कुठे चाल्लोत आपण असं वाटत राहतं पण मन ही आता इतकं मेलय आणि आयुष्य इतक फास्ट झालय की ह्या गोष्टी त्या क्षणापुरत्या खटकतात, नंतर जैसे थे!
हे सगळं वाचलं की संदिपची 'नास्तिक' आठवल्यावाचून राहावत नाही.. जबरा लिहिलेय!
- उपास
(जेव्हा सिद्धीविनायक जुनं देऊळ होतं तेव्हा दर संकष्टीला गिरगावातून जाणारा)
6 Mar 2013 - 7:40 am | धन्या
संदिप म्हणजे संदिप खरे का?
6 Mar 2013 - 7:43 am | उपास
संदिपच्याच आवाजात यु ट्युब वर- naastik
6 Mar 2013 - 12:26 am | बाबा पाटील
जर शक्य असेल तर्,अक्षयकुमारचा स्पेशल २६ पहा,जमल तर थोडी अॅक्टींग करुन पहद्,डायरे़क्ट कुठल्याही मंदिरात कुठल्याही देवाच दर्शन मिळते....
6 Mar 2013 - 1:16 am | निमिष ध.
देवस्थानाचा नुसता बाजार झाला आहे हे खरे. तेच तर देवूळ चित्रपटात दाखवायचा प्रयत्न केला आहे. खरा भाव बाजूला राहून नुसता बेगडी देखावा दिसतो आहे. ज्या साई बाबांनी आयुष्यभर फाकीरासारखे काढले. त्यांच्याच शिर्डीत आता सोन्याचे सिंहासन आणि इतकी सुरक्षा. तिकडे जावे की नाही असा प्रश्न पडतो. राजकारण्यांनी तर संस्थान राजकीय पुनर्वसनाचे केंद्र बनवले आहे. निवडणुकीत हारला तर संस्थान चा कारभारी बनवतात.
तरीसुद्धा जर तुमचा भाव खरा असेल तर देव दर्शनातून जो आनंद मिळतो तो अवर्णनीय असतो. माझा स्वतः चा अनुभव. तिरुपती च्या रांगेत कितीही वेळ उभे राहिले तरी जे दोन क्षणांसाठी दर्शन होते - त्या देवाच्या चेहऱ्यावरचा भाव तुम्हाला काही सांगत असतो. आता हे प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात पण शेवटी म्हणतात ना "मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव … देव अशाने पावायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही "
6 Mar 2013 - 1:22 am | रेवती
निवडणुकीत हारला तर संस्थान चा कारभारी बनवतात.
हा हा हा. कठीण आहे बुवा! राजकीय पुनर्वसन. हा हा हा.
6 Mar 2013 - 1:29 am | निमिष ध.
श्रीरामपूर आणि कोपरगाव च्या बर्याच लोकन्चे पुनर्वसन झाले. शेवटी न्यायालयाने नविन कारभारी मन्डळ बरखास्त केले.
6 Mar 2013 - 11:48 am | अग्निकोल्हा
मुर्तिचच काय, तसं तर जिवंत वाघाच्या/मांजराच्या/अथवा अगदी माझ्या आखोमे आंखे डालके पाहिले तरीही त्यातील भाव प्रत्येकाला विवीधच वाटतिल. इतकच काय ही माझी प्रतिक्रिया जे वाचतील त्यांना त्यातुन विवीधच भाव दिसतील/ निर्माण होतील. पण मुळातच ही प्रक्रिया केवळ आपल्याच मनातिल भावनांचे/ पुर्वग्रहांचे निव्वळ प्रतिबिंब होय.
जेव्हां देवाच्या चेहर्यावरचा भाव विवीध वयाच्या लोकांना लिंगभेदाचा परिणाम नसता विवीध मनस्थितीमधे, विवीध प्रापंचीक परिस्थितीमधे असतानाही केवळ एकच व कच असा कधिही न बदलणारा असा एकमेव भाव अनुभवास येइल तेव्हांच त्यात सॉलिड दम म्हणता येइल.. तेव्हांच तो साक्षात देवाचा भाव असेल, अन्यथा आपापल्या मनस्थितीच्या प्रतिबिंबांना उगाच प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात समजणं स्वतःची फसवणुकच जास्त वाटते.
6 Mar 2013 - 6:47 pm | ५० फक्त
तसं तर जिवंत वाघाच्या/मांजराच्या/अथवा अगदी माझ्या आखोमे आंखे डालके पाहिले तरीही त्यातील भाव प्रत्येकाला विवीधच वाटतिल - असा प्रकार प्रत्येकानं ज्याच्या त्याच्या जबाबदारीवर करावा ही नम्र विनंती.
6 Mar 2013 - 5:25 am | स्पंदना
किती वर्षे राहिले मुंबईत. पण सिद्धेविनायकाच दर्शन एकदा चुकुन मैत्रीणींबरोबर होते म्हणुन विनासायास घडलं . तेव्हढच,
बाकी देव आपल्यावर नजर ठेवुन असताना, एव्हढ त्याच्या पुढ्यात कश्याला जायला हवं म्हणते मी? बघत असतो तो आपल्याला. आहे तेथुन नमस्कार करायचा. बास!
6 Mar 2013 - 11:07 am | परिकथेतील राजकुमार
'आपल्या बाप्पाला' बघायला विशिष्ठ ठिकाणीच जायला लागते का? कै च्या कै !
बाकी अजून चार दिवसांनी 'मानवता हीच इश्वरता' या टैपात बाबा आमटे, गाडगेबाबा इ. इ. एखादा लेख लिहून टाका, म्हणजे लवकरच विचारवंत म्हणून आपली वाटचाल सुरु होईल.
6 Mar 2013 - 4:45 pm | निश
देवाच्या दारी आपण ऐकटे नसतो हजारो लाखो लोक आलेले असतात. प्रत्येकालाच जर थोडा थोडा वेळ
6 Mar 2013 - 8:00 pm | कवितानागेश
श्या:, मला एकदा तरी आयुष्यात असा कठोर अनुभव यायला हवा..
मस्त लेख टाकेन चिड्चिड करणारा!
...पण माझे मेलीचे नशीबच वाईट्ट. ;)
8 Mar 2013 - 7:38 pm | दादा कोंडके
तुमचं जुहूमधलं अध्यात्म दिसतय. :)
8 Mar 2013 - 4:19 pm | निश