तुमच्या ID चां उगम काय?? परत 'ठळक' ते नवीन

शानबा५१२'s picture
शानबा५१२ in जनातलं, मनातलं
11 Jun 2010 - 12:18 am

बर तर खुप दीवसांनी लिहतोय्,मधे आपण सर्वच माझ्या माहीतीपुर्ण्/मनोरंजक्/समाजप्रबोधनकारक्/भावुक्/मानाला भिडणा-या आणि तत्सम उच्च प्रतीच्या लेखांपासुन वंचित राहीलात ह्याची मला जाणीव आहे!!
"लिहा ना,लिहा ना!!" अस लाडात येउन सांगणारे निरोप हे ह्या लेखाचे उगमस्थान आहे(निरोप पाठवणारे कोण??).
तर मला काय बोलायच आहे,तर हे की इथल्या सर्व ID मनावर छाप सोडतात.......त्या ID च्या लेख्/प्रतिसादावरुन नाही तर त्यांच्या ID म्हणून असलेल्या शब्दावरुन्/नावांवरुन्/अक्षरांवरुन.............................पण तोच(तिच) ID एखाद्याने का ठेवली/ठेवला हे मला सारख विचारावस वाटत.
जस आपण एखाद्याच्या आडनावावरुन (नावापेक्षा जास्त) त्याच्या स्वभाव,घराणं,राहणीमान असे खुपसे आडनावाशी संबंध नसणारे निष्कर्ष काढतो.......आपण तसेच काहीतरी ID बद्दल करतो.
पण एखाद्याने तोच ID का ठेवला हे जाणुन घ्यावस वाटल्याने मी हा लेख लिहतोय.येथे प्रतिक्रीयेत एखाद्याने "मी हाच ID का ठेवला?" ह्याचे उत्तर वाचायला भेटणे अपेक्षीत आहे.

माझ्यापासुनच सुरवात करतो.................
माझे मित्र (सर्वात अरदांड) मला शाळेत असतानापासुनच 'शान' ह्या नावाने बोलतात.मी त्या माझ बारस दुस-यादा करणा-याला खुप वर्ष बघितलच नाही पण हे नाव चिकटुन गेलय.काहीजणांना माझ खर नावही माहीती नाही.तर तो 'शान'....व.......पेशवे काळातला '......बा'(मराठी साईट असल्याने डोक्यात आल).........आणि ५१२?? :D ............सांगतो नंतर.
आपण सुरवात तर करा?
सहन न होणा-या लोकाग्रहास्तव(??),(कोणी केला????),आम्ही(आम्ही!!! :D ) '५१२' ह्या ID तल्या गुपीताला उघडं करतोय(मिपावर अजुन दुसर काही नको!),
"मी बिल्ला नंबर ५१२"अस एका नाटकात कुलदीप पवार सारख ओरडत असतात्,त्यात मला त्यांची भुमिका आवडली.आणि तात्यांनी "pending request" मधे माझे खुप(4-5) ID ठेवले होते,मग हा शेवटचा ज्याला येथे आग्रही आमंत्रण भेटल त्यात शानबा बरोबर ५१२ राहील होत.

नोंद : लेखाशी संबंधीत नसलेले लिखान करु नये ही विनंती.भले प्रतिसाद नाही आले तरी आम्ही खोट्या आशेवर राहु.
क्रुपया हे वरच काय लिहलय ते ज्यांना समजत नाही त्यांना इतरांनी मदत करावी.

मायबोलीवर अगदी ह्याच विषयावरचा लेख वाचला,मी त्यांच्या कल्पनेची उचलगीरी केली नाही ह्याची आपण नोंद घ्यावी.मी तेथुन माझा लेख उडवला आहे,धन्यवाद.

धोरणविचार

प्रतिक्रिया

शुचि's picture

11 Jun 2010 - 12:23 am | शुचि

छान विषय आहे.
गणेश चालीसामधे "शुचि" शब्द ३ ते ४ दा तरी येतो. ज्ञानेश्वरीत देखील तो येतो.
मला हा शब्द वाचताच मी त्याच्या प्रेमात पडले होते.
हे २ अक्षरी सात्विक नाव - मला फार फार आवडणारं.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

शुचि's picture

11 Jun 2010 - 12:38 am | शुचि

तात्या मला मेल मधे पहील्यांद म्हणाले "शुचि" नको. मी म्हटलं मग "बकध्यान" कसं आहे? मला खरच "बकध्यान" आवडलं कारण लहानपणी मला सगळे बक्या म्हणायचे 8| मग तात्या म्हणाले नको "शुचि" रिक्वेस्ट सापडली, तेच असू देत. =))

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Jun 2010 - 12:04 pm | बिपिन कार्यकर्ते

तात्या मला मेल मधे पहील्यांद म्हणाले "शुचि" नको.

तात्यासाहेब, द्रष्टे आहे. इथे काय वाट लागेल त्यांना बरोब्बर माहित होतं. काय तात्यासाहेब, खरं की नाही? ;)

बिपिन कार्यकर्ते

प्रियाली's picture

11 Jun 2010 - 12:53 am | प्रियाली

मेमरीची साईझ आहे का? आऊटडेटेड असावी. अपग्रेड करा. नाहीतर, असले धागे आम्हाला सहन करायला हवे. :(

टारझन's picture

11 Jun 2010 - 1:32 am | टारझन

=)) =)) =))

- टाराबाईट
मला संत एकनाथांनी स्वप्नात येऊन हा आयडी घेण्याचा आदेश दिला होता.

प्रदीप's picture

11 Jun 2010 - 11:51 am | प्रदीप

छान (मेग्या)बाईट!

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Jun 2010 - 12:02 pm | बिपिन कार्यकर्ते

=)) =)) =)) =)) =))

बिपिन कार्यकर्ते

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

शिल्पा ब's picture

11 Jun 2010 - 1:11 am | शिल्पा ब

घात करणारी मेमरी असावी हि हि हि....

(कैच्या कै) शिल्पा

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Jun 2010 - 12:01 pm | बिपिन कार्यकर्ते

आठाचा घात आहे ५१२ ते मला माहीत आहे.

आठाचे काय घेऊन बसलात ताई, प्रस्तुत ५१२ सगळ्यांचाच घात करतो आहे त्याचे काय? ;)

बिपिन कार्यकर्ते

शानबा५१२'s picture

11 Jun 2010 - 12:52 pm | शानबा५१२

प्रस्तुत ५१२ सगळ्यांचाच घात करतो आहे त्याचे काय?

मी का?? मी तस करतोय आणि मलाच माहीती नाही??

५१२ बद्दल वर खुलासा केलाय.......
नोंद : लेखाशी संबंधीत नसलेले लिखान करु नये ही विनंती.

ब बर आता समजल हे प्रतिसाद लेखाला नसुन दीलेल्या प्रतिक्रीयेंवरच्या उमटलेल्या प्रतिक्रीया आहेत तर......चालु द्या

इंटरनेटस्नेही's picture

11 Jun 2010 - 1:36 am | इंटरनेटस्नेही

माझा आय डी सेल्फ एक्स्पेनेटरि आहे!

--
(जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी इंटरनेटच्या शोधात असणारा) इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

शानबा५१२'s picture

11 Jun 2010 - 1:45 am | शानबा५१२

शिल्पा ब,प्रियाली
चालु द्या.पण................

नोंद : लेखाशी संबंधीत नसलेले लिखान करु नये ही विनंती.

विचार करावा लागेल. :D

शिल्पा ब's picture

11 Jun 2010 - 1:55 am | शिल्पा ब

चालु द्या.पण... लेखाशी संबंधीत नसलेले लिखान करु नये ही विनंती.

आता हे न करता आमचे चालू कसे ठेवणार हा एक चिमुकला पेचच ...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

शानबा५१२'s picture

11 Jun 2010 - 2:02 am | शानबा५१२

=)) =)) =))

अहो मॅडम तुम्ही येथे जाउन काय ते रेखाटत बसा........अगदी मनसोक्त नंतर खुप खुप वेळाने,दीवसांनी येथे या.........त्याचा त्या साईटवर काही परीणाम होणार नाही.
बाकी प्रतिसाद भारी होता =)) =))

शिल्पा ब's picture

11 Jun 2010 - 2:08 am | शिल्पा ब

आमचा भारी प्रतिसाद हलके घेतल्याने मन अगदी भरून आले...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

अडाणि's picture

11 Jun 2010 - 4:44 am | अडाणि

आमच्या बुध्धीची आम्हाला पुर्ण जाण आहे, म्हणून आम्ही 'अडाणि' असे नाव घेतले आहे...

-
अफाट जगातील एक अडाणि.

हैयो हैयैयो's picture

11 Jun 2010 - 7:36 am | हैयो हैयैयो

हैयो हैयैयो!

वणक्कम!

अनेकजण माझ्या 'हैयो हैयैयो' ह्या नांवाचा इतिहास विचारतात, तो जाणून घेण्यासाठी थांबा! वाट पहा! भरू द्या! नीट ऐका! कसे वाटते ते मात्र अवश्य, अवश्य कळवा.

நெஞ்சிலொரு தும்பிப்பறக்கும் ஐயோ! ஐயையோ!
नेञ्चिलोरु तुम्बिप्पर्रक्कुम् हैयो! हैयैयो!
செல்லக்கிளி சிந்துபடிக்கும் ஐயோ! ஐயையோ!
चेल्लक्किळि चिन्दुबडिक्कुम् हैयो! हैयैयो!

निर्रंब नन्रिक्कळ्. वणक्कम्!

हैयो हैयैयो!

शिल्पा ब's picture

11 Jun 2010 - 8:08 am | शिल्पा ब

तुम्ही दिलेलं गाणं ऐकलं पण काहीच बोध झाला नाही...एक तर भाषा माहिती नाही अन नुसतच तिथेही हैयो हैयैयो ऐकून काय कळणार? त्यामुळे तुम्हि आपले सांगून टाका. मराठीत.

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

नावातकायआहे's picture

11 Jun 2010 - 9:25 am | नावातकायआहे

नाडी पैशे देउन बी सापडना म्हनुन म्या त्यातल्या त्यात ओ के भविक्श्य असलेली घेत्लि आन म्हनालो 'नावातकायआहे'? म्हनुन ह्यो आय डी..

विदुषक's picture

11 Jun 2010 - 3:41 pm | विदुषक

आयुष्यातील सगळ्या गोष्टींकडे आम्ही मजेने बघतो म्हणून विदुषक !!!
मजेदार विदुषक

jaypal's picture

11 Jun 2010 - 3:58 pm | jaypal

शान + बा + ५१२ आवडला
शाकाल खुश हुवा/
terte
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

खडूस's picture

11 Jun 2010 - 4:32 pm | खडूस

i thought its self explainatory the way i am

- आहेच मी खडूस
पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत

बॅटमॅन आपला फेव्हरिट्ट हीरो अन शिवाय रात्री जागे राहण्याची लै सवय, सबब बॅटमॅन.

मोदक's picture

22 Nov 2012 - 1:20 am | मोदक

.

इरसाल's picture

26 Nov 2012 - 3:24 pm | इरसाल

मोदक की मादक

त्या मोदकाचे कॉकटेल बनवले तर मादक होईल, नै ;)

(कॉलिंग सोत्रि)

अभ्या..'s picture

22 Nov 2012 - 2:41 am | अभ्या..

मी आणि माझा भाऊ दोघेही सारखे दिसतो.
अगदी जवळचे नातेवाईक सोडले तर सगळेजण फसतात.
त्यामुळे बर्‍याच गोष्टी खपून गेल्या आहेत 'अभिजीत मी नाही' या वाक्यामुळे
इथे बघू आता काय काय खपते ;)

दिव्यश्री's picture

22 Nov 2012 - 12:03 pm | दिव्यश्री

आडणाव अनासपुरे आणी सध्या मुक्काम फोरणला(जर्मनीमध्ये)आहे हे कळावे म्हणूण.....;)

धुमकेतू's picture

22 Nov 2012 - 12:28 pm | धुमकेतू

आम्हाला आधीच माहित होते कि मिपा वरच्या वेगवेगळ्या तारे आणि ग्रहामध्ये आम्ही धुमकेतू सारखे कधी-मधीच दिसणार किवा आदळणार मिपा वर , म्हणून "धुमकेतू" हे नाव घेण्यात आले !!! आणि नावाला जागतो आहोत असे वाटते आहे !!!

ह भ प's picture

23 Nov 2012 - 9:43 am | ह भ प

माझे मित्र मला नेहेमी बोलतात.. गप्पा मारताना मेन टॉपिक सोडुन असंबद्ध बडबडतो (बोलेतो डायरेक्शनच चेंज डिस्कशनची).. समोरच्याशी गप्पा मारताना हळूच इकडे तिकडे (प्रेक्षणिय स्थळं मोस्ट ऑफ द टाईम्स) बघतो.. जाम उचकतात माझ्यावर माझे मित्र..

ज्ञानराम's picture

23 Nov 2012 - 11:38 am | ज्ञानराम

पहिल्यांच इथे आले तेव्हा प्रत्येक जण दुसर्याच आय डी ने वावरत होता.. मला सुचतच नव्हत मी कुठलं नावाने वावराव !!! मग अचानक डोक्यातली घंटी वाजली.... मिसळपाव वरचे ज्ञानेश्वर माऊली आणी तुकाराम महाराजांचे फोटो पाहीले आणी ज्ञानेश्वरांचा "ज्ञान" + आणी तुकारामांचा "राम" असे दोन शब्द एक करुन हा नवा आय डी जन्माला आला...

रणजित चितळे's picture

25 Nov 2012 - 10:08 am | रणजित चितळे

माझेच नाव

मला वाटलेच नाही दुसरे काहीतरी घ्यावे म्हणून

अविनाशकुलकर्णी's picture

25 Nov 2012 - 11:21 am | अविनाशकुलकर्णी

अविनाशकुलकर्णी

अविनाश बेधुंद.स्वच्छंदी..मुक्त जीवन..

कारखान्याच्या जबाब दा~यातुन मुक्त झालो अन या दुनियेत प्रवेश केला..

प्रभाकर पेठकर's picture

26 Nov 2012 - 3:36 pm | प्रभाकर पेठकर

लपून वार करणं आवडत नाही मला. जे आहे ते समोरासमोर, मर्दासारखे.

पेठकरकाका तुमचा प्रतिसाद वाचून, मिपावर धूमकेतू सारख्या आलेल्या दाबांची (दादा बापट) झाली.
काय परा खरंय ना! ;)

मिपावर धूमकेतू सारख्या आलेल्या दाबांची (दादा बापट) झाली.

काय ??

हंस's picture

30 Nov 2012 - 2:17 pm | हंस

गवि तुम्हाला बाकी सगळं उलगडून सांगावं लागतं बाबा!
(ह. घ्या)

प्यारे१'s picture

26 Nov 2012 - 6:08 pm | प्यारे१

आपुन का नाम का इनिशिअल्स है पी आर ए बोले तो प्यारे.
प्यारे डाल्कु आया नै बोलकु १ डाला आगे में

जेनी...'s picture

26 Nov 2012 - 8:37 pm | जेनी...

माझच नाव .
इथं आले तेव्हा कळलं नाहि लोक दुसर्‍या नावाने वावरतायत . मग माझीहि इच्छा झाली
नाव बदलायची बिरुटे काकांना तसं सांगितलहि ... पण त्यांनी नाहि बदलु दिलं :(
त्यांचा सल्ला ऐकावासा वाटला . मग विचारच सोडुन दिला . :)

इंग्रजी 'सिड' चे मराठी रुप म्हणजे 'शिद'... तसेच माझ्या नावाचे व आडनावाचे प्रथम अक्ष्ररे... :)

माम्लेदारचा पन्खा's picture

29 Nov 2012 - 9:28 pm | माम्लेदारचा पन्खा

जिथे मिसळपाव चे नाव.....तिथे मामलेदारची मिसळ हा एकच पर्याय...
त्यामुळे आम्ही त्यांचे पंखे.....

अविनाशकुलकर्णी's picture

5 Dec 2012 - 11:31 am | अविनाशकुलकर्णी

मिसळ पुण्यात बादशाहि ची

माझं नाव सुरभी सुर्वणा. लोकांना वाट्ट माझी दोन दोन नाव आहेत.आणी आधी माहीत नव्ह्त ह्या चित्र - विचित्र नावांन बद्द्ल. म्हणुन फ्कत सुर.

सुहास..'s picture

30 Nov 2012 - 12:09 pm | सुहास..

सिर्फ नाम ही काफी है !

( लोक जातीच्या नावाखाली आडनाव विचारतात म्हणुन शक्य तिथे फक्त नावच वापरतो, अन्यथा नाव आणि वडिलांचे नाव :) )

कपिलमुनी's picture

30 Nov 2012 - 2:30 pm | कपिलमुनी

आणि कपिलमुनीं वरून ठेवला आणि त्यांची तत्वे पटतातही .. म्हणून कपिलमुनी!!

श्री गावसेना प्रमुख's picture

1 Dec 2012 - 2:34 pm | श्री गावसेना प्रमुख

आपण ना भो दादा कोंडक्यांचा मोट्ठा फॅन आहे,त्यांच्या पिक्चर मध्ये गावसेना असायची म्हणुन गावसेना प्रमुख

पक पक पक's picture

1 Dec 2012 - 2:47 pm | पक पक पक

'शान' हा शाण्याचा अपभ्रंश असावा का...? :bigsmile: :crazy: :bigsmile:

आनंदी गोपाळ's picture

2 Dec 2012 - 9:00 pm | आनंदी गोपाळ

मी गोपाळ आहे हो. 'आनंदी' गोपाळ तरी स्वाक्षरी लिहिली आहे अन या माणसाने 'मैत्री' टायटल देऊन व्यनी केलाय ;)
Image and video hosting by TinyPic

रेवती's picture

5 Dec 2012 - 7:54 pm | रेवती

हा हा हा. श्श्या! काय हे!

अय्या मी पण नेहेमी फसते ... णक्कि आनंदी कि गोपाळ ??
कै बै आजकालची नावं घ्यायची पद्धत :-/

कै बै आजकालची नावं घ्यायची पद्धत

हाहाहाहा =))

प्रीत-मोहर's picture

8 Dec 2012 - 12:11 pm | प्रीत-मोहर

मला ह्या "सर्वज्ञ" आयडीचा उगम हवा आहे......च्यायला!!!!

मीपाप्रेमि's picture

6 Dec 2012 - 8:24 pm | मीपाप्रेमि

मला मराठी बोलायला आणि वाचायला येत.लिहायला मात्र जमत नाहि खुप वेळ लागतो.शिक्षण गुजरातित. .टारझन,पिवळाडांबिस असा काहि id हवा होत पण सुचला नाहि. चुक spelling असलेला मीपाप्रेमि id घेतला.मिसळ्पाव मराठी website मस्त आहे.दररोज एक फेरि असतेच.