अतर्क्य???

जिन्क्स's picture
जिन्क्स in जनातलं, मनातलं
1 Sep 2012 - 2:12 am

'लोकांना आलेले अतर्क्य अनुभव' ह्या विषयावर ह्याच्या आधी हि बरेच लेख आणि चर्चा वाचलेले आहेत. अशा लेखांची ह्या आधी मी खिल्ली हि उडवली आहे, पण अशा प्रकाराची एखादी गोष्ट आपल्या सोबत घडते तेव्हा परिस्थिती पूर्णं पने वेगळी असते. असाच काहीसा मला आलेला अनुभव मी इथे देत आहे.
आपण मोटरसायकल वर लडाखला जावं अस मला फार दिवसांपासून वाटत होत. सुट्टी पासून पैश्याची जमवाजमव पर्यंत बऱ्याचं अडचणी आल्या. प्रबळ इच्छे च्या जोरावर ह्या सगळ्या अडचणी वर मात करत पुण्यातून आम्ही १२ जण ह्या मोहिमेवर निघालो. पुण्यातून जम्मू पर्यंत रेल्वे नि जाऊन तिथून आमची 'बाइक एक्स्पेडिशन' सुरू होणार होती. आमच्या दुचाकी आधीच जम्मू ला रवाना केल्या होत्या. जम्मू - स्रीनगर - कारगिल - लेहं - नुब्रा - पंगोंग - त्सोमोरिरी - त्सोकार - सार्चू - केलांग - मनाली - चन्दीगड असा आमचा १७ दिवसांचा भरगच्च कार्यक्रम होता. सगळं काही सुरळित चललेलं होत. तिबेट पठाराचं सौंदर्य आणि हिमालयाची उत्तुंग शिखर बघून आम्ही सगळेच मंत्रमुग्ध झालेलो होतो. प्रत्येक वळण एक लॅंडस्केप होता. लेह वरून निघून अवघड बारालच्छा ओलांडून आम्ही लाहौल खोऱ्यात आलो होतो. तिथे एका गावात (गावाच नाव देत नाही). आमचा मुक्काम होता आणि तिथेच 'ती' घटना घडली.
आमचा मुक्काम गावा च्या थोडा बाहेर एका कँप साईट मध्ये होता. समोर २ नध्यांचा संगम आणि मागे एका उत्तुंग शिखराची पार्श्वभूमी असा फारच सुंदर नजारा होता. कँप साईट मागे थोड्या अन्तरावर एक मॉनेस्ट्री पण होती. त्या मॉनेस्ट्री पुढे सुंदर फुले उमलली होती. आम्ही तिथे पोचलो तेव्हा साधारण ६ वाजले होते. उजेड असे पर्यंत मॉनेस्ट्री पुढे असलेले फुलांचे सुरेख फोटो मिळतील हे जाणून मी सामान टाकल्या टाकल्या कॅमेरा घेऊन निघालो. इतर लोक रात्रीच्या जेवणाची तयारी आणि इतर कार्यक्रमात मग्न झाले. मॉनेस्ट्री समोरचा भाग म्हणजे छोटा स्वर्ग होता जणू. मावळती कडे निघालेला सूर्य, समोर २ नद्यांचा संगम, पाण्याचा घोंघावणारा आवाज, घरट्याकडे निघालेले पक्षी. फारच सुरेख संध्याकाळ होती. ते सगळं पाहून मी अंतर्मुख झालो. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात जिथे मनाची संवेदनाशीलता फार पूर्वीचं वारली असते किंवा कोमा मध्ये गेलेली असते तिथे अंतर्मुख वगैरे होण्याचे क्षण फार क्वचित येतात. पण तिथल्या एकूण वातावरणात अशी काही जादू होती की तिथेच बसावं, कोणाशीच बोलू नये, काहीही ऐकू नये , नुसतं ते सगळं अनुभवावं डोळ्यांनी.. कानांनी. अशा मूड मध्ये होतो तेवढ्यात माझं लक्ष त्या झाडाकडे गेलं. एकूणच ते झाड त्या वातावरणात कुठेच बसत नव्हतं. सगळं काही हिरवं, जिवंत , चैतन्यमय अस्तनी ते एकच झाड मेलेलं होत. त्याच्या खोडावर एक हि पान नव्हत. त्या वातावरणात मला तो विरोधाभास हि आवडला. त्या झाडाचा हिरव्या पार्श्वभूमी वर सुरेख फोटो येईल म्हणून मी कॅमेरा घेऊन झाडाजवळ गेलो. इथे मला हे नमूद करावंस वाटत की त्या क्षणी मी फार प्रसन्न मूड मध्ये होतो. मी कॅमेराच्या विवफाइंडर मधून फोकस करत होतो. उजेड बराच कमी झालेला होता म्हणून शटर स्पीड बराच कमी ठेवावा लागत होता. मी हे सगळं जमवत असता क्षणी पाठीमागून पानांची सळसळ ऐकू आली. मी त्या सळसळी कडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. मी एक फोटो घेतला जो मला हवा तसा आला नाही. मी दुसरा प्रयत्न सुरू केला आणि पुन्हा ती सळसळ. मी घाबरण्याच्या अजिबात मूड मध्ये नव्हतो (निसर्गाने अंतर्मुख - भारावून वगैरे) . मी एकदा मागे वळून पाहिले. अंधार बराच वाढलेला होता. विवफाइंडर मध्ये बघत असल्यामुळे जाणवला नाही पण अंधार बराच वाढलेला होता. दिवसमावळी नंतर अंधार खूप लगेच पडतो आणि डोंगराच्या कुशीत असलो की फारच लवकर ( माझं (बिचारं) लॉजिकल मन) . मी परत फोटोच्या प्रयत्नाला लागलो. हा फोटो जमलाच पाहिजे. नीट घेतला तर हा फोटो - ऑफ - संध्याकाळ होईल. आणि पुन्हा ती सळसळ . ह्या वेळी आणखी स्पष्टं, आणखी जोरात. ह्या वेळी सळसळी सोबत अंगावर शहारा ही... का???.. थंडी येवढी हि नव्हती की अंगावर शहारा येईल. मनात एक बारीकसा चोरटा विचार... ह्या भागात काही अनैसर्गिक तर नाही ना??? .. इथून निघावं.... पण फोटो हवा तसा जमला नव्हता. थोडा प्रयत्न करून जमला असता. मी अजून एक फोटो साठी ट्राय मारायचा ठरवला ( आता आश्चर्य वाटत त्या निर्णया वर) . पुन्हा तो विवफाइंडर... अरे अंधार वाढला वाटत... फ्लॅश ऑन करावा काय... भारी इफेक्ट वाटेल. वारा ... जोराचा वारा... टोपी उडून जाईल की काय एवढा जोराचा. सळसळ आणि वाऱ्याने मस्त टायमिंग साधलं होतं ( आमच्या मनातील तेन्व्हाचे विचार)... मी इकडे विवफाइंडर मध्ये बघितले की तिकडे सळसळ/वारा सुरू. फार कौतुक झाले फोटोग्राफी चे अस म्हणून मी सगळं काही आवरले आणि आमच्या कँप साईट कडे निघालो. इथे मला परत नमूद करावंस वाटत की त्या सळसळी बद्दल मला थोडं आश्चर्य वाटलं पण मी घाबरलो नव्हतो. नंतर कदाचित मी हे सगळा विसरून हि गेलो असतो. त्या झाडाकडे पाठ करून मी कँप साईट कडे निघालो. ७-८ पावलं चाललो असेल. आणि ते घडलं...पाठी मागून कोणीतरी जोराचा धक्का दिला. मी जोरात तोंडावर आपटलो. माझ्या कॅमेराची बॅग पुढे थोड्या अंतरा वर पडली. तोंडात माती गेली होती. मागे वळून पाहिले... कोणीच नव्हत (फक्त काळ्या डोंगराच्या पार्श्वभूमीवर ते निश्पर्णी झाड) . हा काय प्रकार आहे ??? मला कोणीतरी ढकलेल होत... मी ठेच लागून किंवा इतर कुठल्या कारणाने अजिबात पडलेलो नव्हतो. भीती ...प्रचंड भीती. मी उठलो. कंबरेत कळ, कोपरे खरचटलेले. मला लवकरात लवकर माझ्या लोकांमध्ये जायचं होत. इतका वेळ मला आवडलेला तो निसर्ग, ती फुलं मला काहीही नको होत. मला माझ्या आसपास लोकं हवी होती. जोरात बोलणारी आवाज करणारी लोकं. गर्दीत जायचं होत मला. कॅमेरा बॅग उचलून मी पळत पळत मॉनेस्ट्री पर्यंत आलो. २० पावलं पळालो असेल. पण केवढा दम लागला... का??? मॉनेस्ट्री.. कोणत्या का धर्माची असेना पण ही देवाची जागा आहे ( उगीच आपल्या वेड्या मनाची समजूत) . धाप लागल्या मुळे मी तिथे बसलो. माझे दीर्घं श्वासांच्या आवाज मलाच ऐकू येत होता. कस झालं ते कळाल नाही. पण मला त्या मॉनेस्ट्री च्या ओट्यावर झोप लागली. जाग आली तेव्हा मी तिथेच होतो. माझा मित्र मला शोधत आला होता. त्यानेच मला उठवलं होतं.
तो - अरे इथे येऊन काय झोपलायस??? सगळे तुला किती शोधत आहेत... आणी हे तोंडाला माती का लावली आहेस??? कुठे माती खाल्लीस? .. ऑ (गमतीने)
मला काय बोलाव तेच कळत नव्हत, जरी बोललो तरी शब्द नीट बाहेर येतील का हेच माहीत नव्हतं. माझ्या समोर माझा मित्र उभा आहे हेच माझ्या साठी खूप सुखावणार होतं. ह्या जागी मी एकटा नाहीये, माझ्या सोबत माझा मित्र आहे आणि तो मला इथून घेऊन जाणार आहे. इकडे त्याच पुराण चालूच होतं.
तो - अरे सांग ना.. पडलास का कुठे??? फोटो कढतांनी पडलास का? त्या इब्लिस (त्याचाच शब्द) फोटो पायी जीव जाणार आहे एकदा तुमचा.
मी त्याचा हात धरला. घट्ट धरला. मला आता कोत्याही क्षणी रडू कोसळेल अस वाटत होतं. त्याची बडबड चालूच होती. मला घडलेलं सगळं त्याला सांगायचं होतं. पण आधी त्या ठिकाण वरून दूर जायचं होतं.
त्याच्या आधार घेऊन मी आमच्या कँप साईट वर गेलो. अनिकेत फोटो कढतांनी पडला येवढंच सगळ्यांना कळाल ( अनिकेत नि फोटो कढतांनी माती खाल्ली - मित्रांच्या भाषेत) . मी माझ्या तंबूत गेलो. प्रचंड तहान लागली होती. कोणी तरी पाणी आणून दिलं. मला घडलेलं सगळं सांगायचं होत. पण मी माणसांच्या गर्दीत आहे ह्याचा पण आधार वाटत होता. एव्हाना काही मित्रान्नी ड्रेसिंग सुरू केलं होत. ते ड्रेसिंग करत अस्तांनीच मला परत झोप लागली. अनिकेत फोटो काढत अस्तांनी पडला - कंबरेला आणि गुढघ्यांना थोडा लागलेलं आहे, सीरियस काही नाही, तो आता झोपलेला आहे - एवढीच माहिती कँप मध्ये पसरली. रात्रीतून मला प्रचंड ताप भरला. रात्रीतून मी मराठीतच अगम्य अस काहीतरी बोलत होतो (इति मित्र) .
तर हा होता अनुभव. दुसऱ्या दिवशी माझा ताप उतरला आणि आम्ही मुक्काम हालवला. हा अनुभव टंकतानी पण माझ्या अंगावर शहार्या मागून शहारे येत आहेत. ह्या खोलीत एकटं बसू वाटत नाही. अनुभवातून बाहेर यायला मला बऱ्या पैकी वेळ लागला. आज विचार करताना अस वाटतं की खरंच तिथे काही अनैसर्गिक असेल का? बाकी गोश्टिन्साठी आपण वैज्ञानिक कारण देऊ शकतो पण तो धक्का... मी अनुभवलेला तो धक्का मी कधिच विसरनार नाही. कारण तो मी अनुभवलेला आहे.

त्या संध्याकाळी काढलेल्या झाडाचे फोटो इथे देत आहे....

प्रवासप्रकटन

प्रतिक्रिया

कौशी's picture

1 Sep 2012 - 2:23 am | कौशी

फोटो दिसत नाही..

सुरुवाती पासून वाचताना सखाराम गटणे ची फार आठवण येत होती.

फोटो दिसत नाहीये. बाकी अनुभव इंट्रेस्टिंग आहे.

भडकमकर मास्तर's picture

1 Sep 2012 - 3:30 am | भडकमकर मास्तर

फोटो पाहून धक्का बसला नाही. झाडासारखा दिसत नाहीये.. . दोन निळी टिंबे आणि एक गुलाबी त्रिकोण दिसत आहे... फोटो थोडा मोठा टाकला तरी चालेल...
अवांतर : वीकांताला करून बघेन...

मोनास्ट्रीज मध्ये बहुतेकदा तिथले धर्मगुरु बरीड असतात.
वाचलात ना? लाखो पाये।

हेच का ते अदृश्य फोटोतलं झाड, छान दिसतंय ओ.

अन्या दातार's picture

1 Sep 2012 - 2:40 pm | अन्या दातार

माताय! ५० फक्त संपादक झाले की काय? का नर्मदातटी न जाताही कुंडलिनी वगैरे जागृत झाली? :|

तिमा's picture

1 Sep 2012 - 10:48 am | तिमा

तुमच्या अनुभवावर मला अविश्वास दाखवायचा नाही. पण या निमित्ताने मला आमच्या लडाखच्या ट्रीपचा अनुभव आठवला. आमच्या आधी आमचे काही नातेवाईक तिथे जाऊन आले होते. आणि ते सगळे शपथेवर सांगत होते की ,तिथल्या 'मॅग्नेटिक हिल' या स्पॉटवर कुठल्याही कॅमेर्‍याने स्थिर फोटो येत नाही, फोटो हलतो. पुरावा म्हणून ते त्यावेळी काढलेले अनेक फोटो दाखवत होते. नंतर आम्ही तिथे गेल्यावर मी आवर्जून त्या स्पॉटवर गेलो. आमचा ड्रायव्हर त्या जागेवर गाडी उभी करायला घाबरत होता. त्यालाच विचारुन त्या नेमक्या स्पॉट वरुन मी फोटो काढले. एकही हलला नाही!

अमोल केळकर's picture

1 Sep 2012 - 2:08 pm | अमोल केळकर

छान :)

अमोल केळकर

निनाद's picture

3 Sep 2012 - 11:17 am | निनाद

म्हणजे बोर्ड आणि क्यामेरा एकाच क्षणी हलला म्हणा की...

पैसा's picture

1 Sep 2012 - 5:35 pm | पैसा

अनुभव तुमचा आहे. त्याबद्दल आम्ही काही बोलणं ठीक नाही. पण एक म्हणजे ते झाड हॅरी पॉटर मधल्या झाडाची आठवण करून देतंय आणि दुसरं म्हणजे थोड्या प्रयत्नाने तुम्ही चांगलं लिहू शकता हे नक्की!

लेह्,लडाखचे फोटू आणि वर्णन?

बापरे अनुभव जबरी विचीत्र आहे. पण एखादा असा अनुभव येणे हे एक प्रकारे चांगले कारण त्यामुळे "ओपन माईंडेडनेस" येतो. पंचेंद्रियांना जाणवणारे जग म्हणजे सर्व काही हा भ्रम दूर होतो.

गोंधळी's picture

2 Sep 2012 - 8:26 pm | गोंधळी

खरचं अतर्क्य आहे.

मी_आहे_ना's picture

3 Sep 2012 - 10:08 am | मी_आहे_ना

खरंच 'अतर्क्य'

निनाद's picture

3 Sep 2012 - 10:17 am | निनाद

मी इकडे विवफाइंडर मध्ये बघितले की तिकडे सळसळ/वारा सुरू. हे इंट्रेस्टिंग आहे.
कस झालं ते कळाल नाही. पण मला त्या मॉनेस्ट्री च्या ओट्यावर झोप लागली.
ते ड्रेसिंग करत अस्तांनीच मला परत झोप लागली. रात्रीतून मला प्रचंड ताप भरला. रात्रीतून मी मराठीतच अगम्य अस काहीतरी बोलत होतो
ही लागलेली झोप नेहमीची नसावी असे वाटते.

असेच काहीसे आधी पण वाचले आहे. बहुदा एका किल्ल्यावरच्या सहलीत असा प्रकार झाल्याचे वाचले आहे. त्यात एका माणसाचा मृत्य झाला होता आणि लेखकाच्या मित्राला त्याची संवेदना स्वप्नात जाणवली होती. तेव्हाही ताप चढल्याची नोंद लेखनात त्यांनी केली आहे.

प्रसंग वेगळा आहे. तुम्ही व्यवस्थित परत आलात हे बरे झाले.

जेनी...'s picture

3 Sep 2012 - 11:10 am | जेनी...

भयानक .
त्या झाडाचा फोटो पहाण्याची प्रबळ इच्छा आहे .
फोटो दिसत नाहिय .क्रुपया कुणीतरी लक्ष घाला .

तिथे एका गावात (गावाच नाव देत नाही). आमचा मुक्काम होता आणि तिथेच 'ती' घटना घडली.

असे का? गावाचे नाव दिल्याने काय फरक पडणार आहे? उलट जो कुणी त्या भागात जाणार असेल व ज्याला कुणाला असले अणुभव घ्यायची हौस असेल त्याला मदत होईल ना... (उदा. तिरशिंगरावांचे मॅग्नेटिकचे फटू)

बाकी श्टोरी जबर्‍या आहे.

अवांतरः झाडाच्या फोटोत काळ्या बैक्ग्राउंडवर पांढर्‍या त्रिकोणात उद्गार्वाच चिन्ह दिसतय... सगळ्यांनाच तसे दिसतय / तेच झाड आहे की मलाच दिसत नाहिये?

त्या संध्याकाळी काढलेल्या झाडाचे फोटो दिसत नाहीत खरंच इथेही काही अनैसर्गिक असेल का? आता तर अजुनच घाबरायची वेळ आहे. :(

सूड's picture

3 Sep 2012 - 3:39 pm | सूड

माताय, कुनी झाड धरलं म्हनायचं ह्ये. फोटु बी दिसंना झालाय.

तुमच्या या विचित्र अनुभवामागे मानवी शक्तीच असेल एवढेच सांगू शकतो.
कुणालातरी अशी गोष्ट करता येत असेल ती त्याने करुन पाहिली.

सुमीत भातखंडे's picture

9 Sep 2012 - 9:12 pm | सुमीत भातखंडे

अनुभव जबरा...पण फोटो दिसत नाय राव

ग्रेटथिन्कर's picture

9 Sep 2012 - 10:04 pm | ग्रेटथिन्कर

बुलेटच्या एक्झॉस्टचा जसा फटकारा लांबपर्यंत बसतो ,तसा वार्याचाही फटका बसतो वैज्ञानिक परिभाषेत त्याला काय म्हणतात ते आता आठवत नाही. फक्त वारा स्ट्रीमलाईनमध्ये वेगात वाहत असेल तरच असे घडते. तुम्हाला सळसळ ऐकु येत होती याचे कारण वारा असावा व धक्का देणारापण तोच .

माझीही शॅम्पेन's picture

9 Sep 2012 - 11:12 pm | माझीही शॅम्पेन

वार्याचाही फटका बसतो

चुकुन एक वेलांटी राहिली अस वाटून प्रतिसाद पुन्हा वाचला

(स्ट्रेट थिन्कर शॅम्पेन)

त्यात शॅम्पेन नावात असलेल्या आयडिकडून असा प्रतिसाद. =))

शित्रेउमेश's picture

4 Mar 2016 - 10:51 am | शित्रेउमेश

अनुभव भयानक...पण फोटो दिसत नाय राव... बघा काहितरी....