जयप्रभा स्टुडिओ, कोल्हापूर

हुप्प्या's picture
हुप्प्या in काथ्याकूट
29 Aug 2012 - 1:13 am
गाभा: 

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/15894252.cms
वर दिलेल्या बातमीप्रमाणे कोल्हापूरचा जयप्रभा स्टुडिओ हा ऐतिहासिक दृष्टया महत्त्वाचा आहे आणि तो टिकावा असे बहुतेक कोल्हापूरकरांना वाटते. हा सध्या लता मंगेशकरांच्या मालकीचा आहे आणि तो त्यांनी सुरेश वाडकरांच्या मदतीने एका बिल्डरला विकला आहे असे म्हणतात.
त्यामुळे कोल्हापूरात लताबाई आणि सुरेश वाडकरांविरुद्ध असंतोष उसळला आहे.
इतक्या गुणी कलाकारांविरुद्ध असे जनमत उभे रहाणे क्लेषकारक वाटते.
कुणी कोल्हापूरकर वा अन्य जाणकार ह्यावर प्रकाश टाकतील का? हे सगळे खरोखर जयप्रभा स्टुडिओच्या प्रेमापायी होते आहे का त्यामागे अन्य काही मतलब आहे?
कुणी बडी असामी ११ कोटी की काय जी किंमत आहे ती चुकवून ती वास्तू जतन करुन तिथे एखादे वस्तुसंग्रहालय का नाही उघडत?

प्रतिक्रिया

बॅटमॅन's picture

29 Aug 2012 - 1:20 am | बॅटमॅन

हे सगळे खरोखर जयप्रभा स्टुडिओच्या प्रेमापायी होते आहे का त्यामागे अन्य काही मतलब आहे?

हाच्च तो प्रश्न माझ्यापण मनात आला होता ति बातमी पाहताना.

सुनील's picture

29 Aug 2012 - 1:59 am | सुनील

कोल्हापूर महापालिकेने ११ कोटींचे रोखे विक्रीस काढावेत. येणार्‍या पैशातून पालिकेने तो स्टुडिओ लता मंगेशकर यांच्याकडून विकत घ्यावा आणि त्याचे जतन करावे. पालिकेने नियमित बजेटमधील रक्कम इथे वळवू नये.

अन्यथा, लताबाई तो विकण्यास मुख्यतार आहेतच. त्यांनी तो स्टुडिओ जतन करण्यासाठी ११ कोटींचे नुकसान सहन करण्याची काहीही आवश्यकता नाही!

विश्वनाथ मेहेंदळे's picture

2 Sep 2012 - 1:01 pm | विश्वनाथ मेहेंदळे

अन्यथा, लताबाई तो विकण्यास मुख्यतार आहेतच. त्यांनी तो स्टुडिओ जतन करण्यासाठी ११ कोटींचे नुकसान सहन करण्याची काहीही आवश्यकता नाही!

माझे ही काहीसे असेच मत होते. पण आज "पत्र नव्हे मित्र" मध्ये खालील बातमी वाचली.
लतादिदींच्या विरोधात चित्रपट महामंडळ कोर्टात
या बातमीतील खालील मजकुराने लक्ष वेधून घेतले.

१९३३ साली प्रभात फिल्म कंपनी कोल्हापुरातून पुण्यात स्थलांतरीत झाल्यावर कोल्हापुरातील चित्रपटनिर्मितीचा व्यवसाय जिवंत ठेवण्यासाठी छत्रपती राजाराम महाराज यांनी १९३४ साली कोल्हापूर सिनेटोन या नावाने स्टुडिओ सुरू केला. १९४७ साली देश स्वतंत्र झाल्यावर पुढेही चित्रपटनिर्मिती सुरूच रहावी या हेतूने हा स्टुडिओ काही मोबदल्यात भालजी पेंढारकर यांना देण्यात आला. कालांतराने हा स्टुडियो भालजींनी लता मंगेशकर यांना दिला. भालजींना हा स्टुडिओ देत असताना केवळ चित्रपटनिर्मितीसाठीच वापरावा अशी अट राजाराम महराजांनी घातली होती. तीच अट लता मंगेशकर यांनाही लागू होत असल्याचा मुद्दा महामंडळाने या दाव्यात मांडला आहे.

असे असेल तर मात्र लतादीदींना ही वास्तू विकण्याचा हक्क नाही असे म्हणावे लागेल. अथवा विकत घेणाऱ्याला वास्तू चित्रपटनिर्मितीसाठीच वापरावी लागेल.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

29 Aug 2012 - 8:57 am | घाशीराम कोतवाल १.२

जयप्रभा स्टुडियो जो भालजी पेंढारकार ह्यांच्या मालकीचा होता तो त्यांनी काही काराणामुळे लता मंगेशरकांकडे गहाण ठेवला होता तेव्हा दादा कोंडकेंनी लताबाई कडुन विकत घेउन भालजी पेंढारकारांना द्यायचा ठरविला होता पण लताबाईंनी स्टुडियो परत द्यायला नकार ही दिला नाही व होकार ही दिला नाही त्यांनी तो स्टुडियो बळकावला
संदर्भ दादा कोंडकेच आत्मचरित्र एकटा जीव

श्री गावसेना प्रमुख's picture

29 Aug 2012 - 9:39 am | श्री गावसेना प्रमुख

चित्रपटतपस्वी भालजी पेंढारकर आर्थिक अडचणीत आले होते. त्यामुळे या स्टुडिओचा लिलाव व्हायची नामुष्की आली होती. त्यावेळी मी हा स्टुडिओ विकत घेऊन लिलाव टाळला. एवढेच काय माझ्या आदराचे स्थान असलेल्या भालजी पेंढारकर यांच्या ताब्यातच मी स्टुडिओ ठेवला. त्यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार समारंभात पुन्हा स्टुडिओ त्यांच्याच नावावर करण्याची मी जाहीर समारंभात घोषणाही केली; पण भालजींनी त्यास नकार दिला. ते म्हणायचे, "तुझा स्टुडिओ आहे. तू नाममात्र पाचशे रुपये तरी भाडे घे, पण मी तसे केले नाही.
इती लताजी!

घाशीराम कोतवाल १.२'s picture

29 Aug 2012 - 10:33 am | घाशीराम कोतवाल १.२

तुम्ही एकटा जीव वाचा साहेब

हुप्प्या's picture

29 Aug 2012 - 10:46 am | हुप्प्या

दादा कोंडके हे मोठे कर्तृत्ववान होते पण त्यांना थापा मारायची वाईट खोड होती. त्यामुळे त्यांचे दावे फारसे ग्राह्य मानता येत नाहीत. इसाक मुजावर ह्यांनी दादा कोंडक्यांवर पुस्तक लिहिले आहेत त्यात त्यांनी सोदाहरण हे स्पष्ट केले आहे.
उदा. दादा कोंडक्यांचे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमधे नाव आहे ही शुद्ध थाप आहे. आणि ही लोणकढी (बहुधा) त्यांनीच घडवली आहे.

कवटी's picture

29 Aug 2012 - 11:29 am | कवटी

गावसेनाप्रमुख व हुप्प्या,
दुसरी बाजू व्यवस्थीत पुढे आणल्या बद्दल धन्यवाद!
ज्यांना स्टुडिओ विषयी कळकळ वाटते त्यांनी ट्रस्ट स्थापून त्याद्वारे पैसे (रोखे / वर्गणी वगैरे) उभारून ती जागा विकत घ्यावी व जतन करावी....
लताबैंनी पदराला खार लाऊन ती वास्तू जतन/राष्ट्रार्पण करावी ही मागणी चुकीची वाटते.

प्रदीप's picture

29 Aug 2012 - 10:49 am | प्रदीप

एकच बाजू सांगतात. दुसरी बाजू असते ह्यावर ज्यांचा विश्वास असतो, ते सर्व, जरूरीप्रमाणे ती समजावून घेण्याचा प्रयत्न करतात.

चित्रपटतपस्वी भालजी पेंढारकर आर्थिक अडचणीत आले होते. त्यामुळे या स्टुडिओचा लिलाव व्हायची नामुष्की आली होती. त्यावेळी मी हा स्टुडिओ विकत घेऊन लिलाव टाळला. एवढेच काय माझ्या आदराचे स्थान असलेल्या भालजी पेंढारकर यांच्या ताब्यातच मी स्टुडिओ ठेवला. त्यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार समारंभात पुन्हा स्टुडिओ त्यांच्याच नावावर करण्याची मी जाहीर समारंभात घोषणाही केली; पण भालजींनी त्यास नकार दिला. ते म्हणायचे, "तुझा स्टुडिओ आहे. तू नाममात्र पाचशे रुपये तरी भाडे घे, पण मी तसे केले नाही.

या बातमीत भालचंद्र कुलकर्णी मास्तर काय म्हणतात ते ही पहा..

प्रदीप's picture

29 Aug 2012 - 10:40 am | प्रदीप

ह्याविषयी प्रथम चर्चा सुरू झाली, (सुमारे तीन वर्षांपूर्वी) ती महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री (बहुधा कै. विलासराव देशमुख) ह्यांनी केलेल्या काही वक्तव्यामुळे. तेव्हा लताबाई त्या वास्तूची विक्री करणार आहेत ह्या बातमीमुळे कोल्हापूरात म्हणे लताबाईंविरूद्ध असंतोष उफाळला होता. त्यावेळी लताबाईनी व्यथित होऊन, कधी नव्हे ते, दै. सह्याद्रीला दिलेल्या मुलाखतीत सविस्तर, व माझ्या मते नेमके, सडेतोड उत्तर दिलेले होते. तेव्हा तो दुवा मी जपून ठेवला होता, पण मराठी वर्तमानपत्रे आर्काईव्ह फारशी करत नसावीत, एका वर्षभराने तो धागा नष्ट झाला. तेव्हा आता ती मुलाखत माझ्या समोर नाही. आठवणीतून त्याविषयी येथे लिहीत आहे.

श्री गावसेना प्रमुख ह्यांनी वर दिलेले म्हणणे तेव्हा त्या मुलाखतीत मी वाचल्याचे आठवते. तसेच बाईंनी हेही निदर्शनास आणून दिले होते की इतकी वर्षे त्यांनी त्या स्टुडियोची वास्तू स्वखर्चाने जतन केली. त्यावेळी कुणालाही, ती एक ऐतिहासिक वास्तू आहे, ते एक national monument वगैरे आहे, तेव्हा त्याच्या जतनासाठी खर्च करावा असे वाटले नाही. (म्हणजे कुणीही त्या खर्चाचा भार उचलण्याची कधीही तयारी दर्शवली नाही). आता त्या तो विकत आहेत तर इतका धुरळा का उडावा?

लताबाईंनी तेव्हा हेही म्हटल्याचे स्मरते की त्या एक स्त्री आहेत म्हणून ह्या बातमीचा जास्त गवगवा केला जात आहे.

लताबाईंना आता इतका पैस कशास हवा आहे, वगैरे बाबी गौण आहेत. (हाच प्रश्न खरं तर प्रत्येकाने स्वतःस विचारून पहावा, जी उत्तरे येतील त्यावरून प्रामाणिकपणे स्वतःच्या गरजा कमी कराव्यात, ... पण 'स्वतःस एक न्याय, व इतरांसाठी वेगळा', ही खास मराठी मध्यमवर्गीय रीत आहे. असो.. हे अवांतर आहे). त्यांनी स्टुडियो खरेदी केला होता, इतकी वर्षे जतन केला, आता तो विकण्याचा सर्व निकषांवर (म्हणजे खास मध्यमवर्गीय मराठी <इतरांसाठी> मॉरलिस्टिक निकष जमेस धरूनही) त्यांना जरूर हक्क आहे. ज्यांना ह्याविषयी प्रचंड संताप वगैरे आहे, त्यांनी स्थानिक महापालिका/ तत्सम सरकारी उपक्रमांवर दबाव आणून तो बाजारभावात लताबाईंकडून विकत घ्यावा.

विकास's picture

29 Aug 2012 - 7:43 pm | विकास

वरील तसेच सुनील आणि तत्सम प्रतिसादांशी सहमत. मात्र एक नक्की वाटते की ती ऐतिहासिक वास्तू म्हणून जतन करून नावारूपाला आणावी.ते नक्कीच एक चांगले पर्यटन स्थळ होऊ शकते असे वाटते. ते त्यांनी अथवा इतर खाजगी कंपनीने कमर्शिअल करावे का सरकारने हा वेगळ्या चर्चेचा मुद्दा आहे.

बाकी लताबाईंना इतका पैसा कशाला हवा वगैरे प्रश्न अप्रस्तुत आहेत. पण एका विशिष्ठ वयात आणि आयुष्यात सर्वोच्च शिखर गाठल्यावर (ज्याच्या पायथ्याशीच इतर नजिकच्या भविष्यात घुटमळू शकतील) आता त्यांच्याकडून असे काही घडावे अशी सदिच्छा आहे ज्याने कौतुकाबरोबरच कायमस्वरूपी आदरही राहील.

पैसा's picture

29 Aug 2012 - 8:01 pm | पैसा

पुण्यातलं दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल. दीदींनी वाढवलेली चार भावंडं आणि हजारों गाणी. एक माणूस एका आयुष्यात काय करू शकतो आणखी?

बाकी हे आता ओरडणारे लोक स्टुडिओचा लिलाव होणार होता तेव्हा कुठे गेले होते आणि मराठी सिनेमावाले फार नसताना इतकी वर्षं लताबाई स्टुडिओचा खर्च कसा चालवत होत्या याबद्दल काही बोलत नाहीयेत हे विशेषच.

"आता या वयात पैसे कशाला" वगैरे म्हणण्याबद्दल मला असं वाटतं की आपल्या नंतर भाचेमंडळींना नुकसानीचं एक खटलं वारसा म्हणून देण्यापेक्षा लताबाई आपल्या हयातीत्तच सगळी आवराआवर करत आहेत की काय?

मृत्युन्जय's picture

30 Aug 2012 - 12:36 pm | मृत्युन्जय

"आता या वयात पैसे कशाला" वगैरे म्हणण्याबद्दल मला असं वाटतं की आपल्या नंतर भाचेमंडळींना नुकसानीचं एक खटलं वारसा म्हणून देण्यापेक्षा लताबाई आपल्या हयातीत्तच सगळी आवराआवर करत आहेत की काय?

अगदी हाच विचार माझ्या मनात आला. लताबाईंनंतर हे गावगुंड त्यांच्या पुढच्या पिढीचे जिणे हराम करतील त्या प्रॉपर्टीपायी. त्यामुळे अश्या डिस्प्युटेड गोष्टींची विल्हेवाट बहुधा लतादीदींनी त्यांच्या हयातीतच लावावीशी वाटत असावे.

प्रदीप's picture

29 Aug 2012 - 9:21 pm | प्रदीप

आता त्यांच्याकडून असे काही घडावे अशी सदिच्छा आहे ज्याने कौतुकाबरोबरच कायमस्वरूपी आदरही राहील.

म्हणजे आतापर्यंत त्यांनी केलेल्या कार्याचे काय? त्यांनी नक्की काय केले असता आपला (म्हणजे सर्वसाधारण जनतेचा) त्यांच्याविषयी 'कायमस्वरूपी आदर' राहील?

अनेक व्यक्ति शांतपणे, कसलाही गाजावाजा न करता, सामाजिक कार्य आपापल्या कुवतीप्रमाणे करीत असतात, लताबाईही तसे काही करत असाव्यात की? सिनेसंगीत सृष्टीतीलच कालच्या काही व्यक्तिंना त्या मदत करत होत्या, ह्याचे एकतरी उदाहरण मला त्या व्यक्तिचे निधन झाल्यानंतर त्या व्यक्तिच्या एका निकटपर्तीयाकडून अगदी नकळत समजले. तशी एकदोन इतरही उदाहरणे इतरांच्या लिखाणातून माहित झालेली आहेत, अजून कित्येक असावीत, कल्पना नाही.

आपल्या त्यांच्याकडून सामाजिक कार्याच्या ज्या अफाट कल्पना असतात, त्यातील एक अनेक वर्षांपूर्वी एका सद्ग्रुहस्थांनी मांडली होती-- शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री असतांना त्यांनी राज्य सरकारातर्फे काही व्यक्तिंचा जाहीर सन्मानसोहळा घडवून आणला. त्यात त्यांनी त्यातील प्रत्येक व्यक्तिस शासनातर्फे मानपत्र व एक लाख रूपयांचा धनादेश दिला. ह्या व्यक्तिंमध्ये दुर्गाबाई होत्या, तसेच सुनील गावस्कर व लताबाई हे मान्यवरही होते. दुर्गाबाईंनी ती रक्कम तेथल्या तेथे एका समाजसेवी संस्थेस दान केली. लताबाईंनी तसे काही केले नाही, त्याविषयी ह्या गृहस्थांचा रोष होता! म्हणजे त्यांनी जे काही करायचे, ते अगदी ढोल पिटूनच केले तरच ते खरे! (ह्यात दुर्गाबाईंविषयी अनादर दर्शवावयाचा नाही, पण इतरांनी तसे जाहीरपणे केले नाही, तेव्हा ते म्हणे अनादरास पात्र झाले!)

आजच अन्यत्र अशीच एक 'मागणी' वाचली. सरकारने खरे तर तो स्टुडियो घेऊन त्याचे राष्ट्रीय स्मारक केले पाहिजे. पण सरकार आपले कर्तव्य बजावत नसल्याने, समाजातील प्रमुख व्यक्तिंचे (पक्षी: येथे लताबाईंचे) ते कार्य ठरते, म्हणे!

वास्तविक सुमारे ४० वर्षे लताबाई त्या स्टुडियोच्या वास्तूची स्वखर्चाने देखभाल करीत आहेत, हेदेखील कुणाच्या ठावी नव्हते. मी वर उल्लेखिलेल्या त्यांच्या मुलाखतीतून ते प्रथम सर्वांना समजले असावे.

अप्पा जोगळेकर's picture

29 Aug 2012 - 10:21 pm | अप्पा जोगळेकर

सहमत आहे.
पण 'स्वतःस एक न्याय, व इतरांसाठी वेगळा', ही खास मराठी मध्यमवर्गीय रीत आहे. असो.. हे अवांतर आहे)
जनरलायझेशन करणारे हे वाक्य का लिहिले ते कळले नाही. जर हे अवांतर आहे हे माहीत होते तर लिहिलेच कशाला ?

प्रदीप's picture

29 Aug 2012 - 10:28 pm | प्रदीप

लताबाईंना इतका पैसा हव कशाला, हे अवांतर आहे, असे मला म्हणायचे होते. माझ्या वाक्यरचनेवरून तुमचा गैरसमज झाला आहे, त्याबद्दल दिलगीर आहे.

इरसाल's picture

29 Aug 2012 - 11:56 am | इरसाल

मोर्चेपुरकरांन्नी त्यांच्या महाराजांनी महालाचे हॉटेल केले तेव्हा काय मोर्चा काढला नाय म्हणे.

कॉमन मॅन's picture

29 Aug 2012 - 12:17 pm | कॉमन मॅन

सदर वास्तू संपूर्णत: लताबाईंच्या मालकीची आहे ही वस्तुस्थिती असताना त्यांनी ती वास्तू विकावी, की दान करावी, की तशीच जतन करून ठेवावी इत्यादीबाबतचे सगळे अधिकार सर्वस्वी त्यांचे आहेत. त्यामुळे त्या बद्दल कुणी काही आक्षेप घेण्याचे कारण दिसत नाही..

पुण्याचे वटवाघूळ's picture

29 Aug 2012 - 12:43 pm | पुण्याचे वटवाघूळ

लताबाईंच्या मालकीची आहे ही वस्तुस्थिती असताना त्यांनी ती वास्तू विकावी, की दान करावी, की तशीच जतन करून ठेवावी इत्यादीबाबतचे सगळे अधिकार सर्वस्वी त्यांचे आहेत. त्यामुळे त्या बद्दल कुणी काही आक्षेप घेण्याचे कारण दिसत नाही..

सहमत. इतरांना जर वास्तू जतन करायची इतकीच पडली असेल तर त्यांनी ११ कोटी उभे करून ती वास्तू लतादिदींकडून विकत घेऊन ती जतन करावी. इतकी वर्षे ती वास्तू लतादिदींच्या मालकीची आहे हेच अनेकांच्या गावी नसेल. म्हणजे इतकी वर्षे स्वतःचा पैसा खर्च करून लतादिदी ती वास्तू जपत होत्या तेव्हा हे लोक कुठे गेले होते?म्हणजे जुनी वास्तू जपायची यांच्या भावनांसाठी आणि त्यासाठी हे लेकाचे काहीही करायला तयार नाहीत आणि ती इतरांनी जपावी ही अपेक्षा. असल्यांना अजिबात महत्व द्यायची गरज नाही.

पण त्याचबरोबर लतादिदी स्वतःच्या कम्फ्रर्ट साठी पेडर रोडच्या फाय ओव्हरमध्ये अडथळा टाकला होता हे पण विसरता कामा नये. यांच्या घरातला समुद्राचा व्ह्यू जाईल म्हणून हजारो लोकांनी वाहतुकीचा खोळंबा सहन का करायचा? मागे संजय पवार म्हणून पत्रकाराने लिहिलेल्या एका लेखात लतादिदींवर जोरदार टिका या कारणाने केली होती.

तरीही त्यांनी त्यांच्या मालकीच्या वास्तूअचे काय करावे हे ठरवायचा अधिकार त्यांचाच.

कॉमन मॅन's picture

29 Aug 2012 - 12:29 pm | कॉमन मॅन

मालमत्ता विक्री कायदा १८८२ अन्वये लताबाईंना सदर वास्तू नक्कीच विकता येईल..

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

29 Aug 2012 - 1:07 pm | निनाद मुक्काम प...

बांगला देशी लोकांना पोसणारे महाराष्ट्र सरकार लता मंगेशकर ह्यांच्या कडून हि जागा सहज विकत घेऊ शकते. व तेथे महाराष्ट्रीय सिनेमांचे संग्रालय उभारू शकते.
ह्याच जागेत राज कपूर ने आपल्या आयुष्यातील पहिला शॉट दिला. व अश्या अनेक घटनांचे हा स्टुडीयो साक्षीदार आहे. परदेशात अशी ऐतिहासिक स्थळे जतन करून ती सुशुल्क पाहण्याची सोय आहे. व्यावसायिक पातळीवर सुद्धा हे फायदेशीर ठरते.

कॉमन मॅन's picture

29 Aug 2012 - 1:16 pm | कॉमन मॅन

सहमत आहे..

अप्पा जोगळेकर's picture

29 Aug 2012 - 10:27 pm | अप्पा जोगळेकर

मुळामधे जयप्रभा स्टुडिओ मधे विशेष असे काय आहे हे कोणी सांगेल काय ? की भालजी पेंढारकरांनी उभारला आणि राज कपूरने तिथे पहिला शॉट दिला एवढेच त्याचे महत्व आहे ?

चिरोटा's picture

29 Aug 2012 - 11:30 pm | चिरोटा

हेच विचारायचे होते. कदाचित कोल्हापूरमध्ये सगळेच ऐतिहासिक असल्याने असेल्.राज कपूरने पहिला शॉट तिकडे दिला ह्यात विशेष काय आहे? त्याने पहिला शॉट कुठेतरी दिलाच असता.
तरीही काही महत्व असलेच तर स्टुडियोचा बिग बाझार/कोल्हापूर सेंट्रल होवू नये.

समीरसूर's picture

30 Aug 2012 - 10:47 am | समीरसूर

मी स्वतः जयप्रभा स्टुडिओ पाहिलेला आहे. अडगळीत गेलेल्या सुतारकामाच्या, रंगपटाच्या दालनांखेरीज आणि खेड्यातली घरे वाटावीत अशा घरांच्या सेटखेरीज तेथे आता काहीही नाही. अर्थात मी हा स्टुडिओ १९९९ साली पाहिला होता. यातले आता तेथे काय शिल्लक असेल हा ही मुद्दा आहेच. अजून काही नवीन तयार होण्याची शक्यता तशी धुसरच आहे.

माझ्या माहितीप्रमाणे लतादीदींनी हा स्टुडिओ १९५९ पासून पोसला होता. ५३ वर्षे एखादी जागा पांढर्‍या हत्तीसारखी पोसणे सोपे नाही. त्या केवळ लतादीदी आहेत म्हणून त्यांनी स्वतः नुकसान सहन करत बसावे अशी अपेक्षा ठेवणे सर्वस्वी चूक आहे. सगळीकडे पैशाची गंगा वाहत असतांना एखाद्याच व्यक्तीने निस्वार्थ वगैरे भाव जपावा अशी अपेक्षा करणे मूर्खपणाचे आहे. आपले राजकीय नेते कधी जवळचा दमडा तरी खर्च करतात काय? जे लोकं रस्त्यावर येऊन आंदोलने करीत आहेत त्यांनी नव्या आण्याची तरी निस्वार्थ वृत्ती दाखवली आहे काय?

आपल्या देशात स्मारके वगैरे किती भयंकर परिस्थितीत असतात हे आपण नेहमीच पाहतो. कुणालाच त्या स्मारकांविषयी प्रेम, आस्था, आदर नसतो. भारतीय लोकांना साधा आदर करणे देखील जमत नाही. प्रत्येक मोठ्या व्यक्तीवरून किंवा घटनांवरून वाद उकरून काढून राजकारण करायचे तेवढे आपल्याला जमते. आपण काही कुठल्या स्मारकांमधून कधी प्रेरणा-ब्रिरणा घेत नाही. त्यामुळे निदान आपण तरी स्मारके वगैरे बांधायच्या फंदात पडू नये. इतकीच जयप्रभा स्टुडिओची काळजी असेल तर ज्यांना त्याचे स्मारक व्हावे असे वाटत असेल त्यानी पुढाकार घेऊन पैसे उभे करून तो स्टुडिओ लतादीदींकडून रीतसर विकत घ्यावा आणि स्मारक निर्माण करावे. लतादीदी थोर गायिका आहेत म्हणून दातृत्वाची अपेक्षा त्यांच्याकडून बाळगणे चुकीचे आहे!

विकास's picture

30 Aug 2012 - 6:41 pm | विकास

म.टा. मधील बातमीतले सुरेश वाडकरांचे विधान खाली देत आहे.

जयप्रभा स्टुडिओत होणाऱ्या शूटींगची संख्या रोडावल्याने लता मंगेशकर यांनी स्टुडिओ विकण्याची इच्छा व्यक्त केली.

अर्थात, ह्या स्टुडीओमधून भाडे मिळत होते. आणि ते घेण्यात काही गैर देखील नाही. पण जर, "५३ वर्षे एखादी जागा पांढर्‍या हत्तीसारखी पोसणे सोपे नाही." असे त्या म्हणत असल्या तर ते अर्धसत्य आहे.

माझा मुद्दा आत्ता देखील त्यांनी त्या स्टूडीओची काळजी घ्यावी असा नाही. ती त्यांची मालकी आहे आणि त्यांनीच काय करायचे ते ठरवावे... पण बरेच पर्याय असू शकले असते. गुप्ततेने व्यवहार करायच्या आधी जाहीरपणे सांगायचे मी असे करते आहे. कोणाला सांभाळायची आहे का? जर कोणी सांभाळण्यासाठी घेणार असेल तर ते अधिकृतपणे म्हणजे अगदी "ऐतिहासिक वास्तू" म्हणून कायदा करून आणि मोबदला घेऊन ठरवता आले असते. कायदा अशा साठी की जेणे करून नंतर कोणी ती जागा अशीच विकणार नाही, वगैरे... विशेष करून या आधी त्यावरून ओरड झालेली असताना. असो.

प्रदीप's picture

30 Aug 2012 - 7:58 pm | प्रदीप

वाडकरांनी जरी असे म्हटले असले तरी आपण आपल्या सामान्य ज्ञानावरून काही अंदाज बांधू शकतो.

मराठी चित्रपट व्यवसाय जवळजवळ नेहमीच तोट्याचा राहिला आहे (ह्यात गेल्या सुमारे ७- ८ वर्षांचे नव्या दमाचे चित्रपट मी धरत नाही. त्यातील कुठलाही जयप्रभा स्टुडियोत चित्रीत केला असण्याची शक्यता जव़ळजवळा शून्य, तेव्हा त्यांच्या इथे विचार नाही). तेव्हा एकंदरीतच वर्षाकाठी निर्मीत होणार्‍या चित्रपटांची संख्या अगदीच कमी. त्यातून सर्वच संबंधित इन्फ्रास्ट्रक्चर मुंबई येथे असल्याने कोल्हापूरास चित्रीकरणास फारसे कुणी कित्येक वर्षे जात नसावे? अजून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे-- पूर्वीच्या काळी, म्हणजे ३०, ४० व ५० च्या दशकांत, चित्रपट निर्मीती कंपन्यांचे स्वतःचे स्टुडियो असत, जसे प्रभात (पुणे), राजकमल (मुंबई), जयप्रभा (कोल्हापूर) वगैरे. हे मॉडेल हॉलीवूडमधे अजून वापरले जाते. तेव्हा भालजींची स्वतःची प्रॉडक्शन्स म्हणजे त्या स्टुडियोचे कॅप्टिव्ह गिर्‍हाईक. त्या प्रॉडक्शन कंपनीचा शेवटचा चाललेला चित्रपटा 'तांबडी माती', १९६९ साली निर्मीत झालेला आहे.

ह्या सर्वांचा विचार करता समीरसूर ह्यांनी १९९९ साली स्टुडिओ बंदच पाहिला, त्याचे आश्चर्य वाटले नाही.

जयप्रभा तर दूरच राहिले, मुंबईचेच कित्येक स्टुडियो गेल्या वीसेक वर्षांत बंद पडलेले आहेत (मेहबूब, प्रकाश ही काही प्रमुख नावे). तेव्हा, अलिकडेपर्यंत जयप्रभामधून काही मिळकत होत होती असे समजले तर ते आश्चर्यकारकच म्हटले पाहिजे.

विकास's picture

30 Aug 2012 - 6:41 pm | विकास

म.टा. मधील बातमीतले सुरेश वाडकरांचे विधान खाली देत आहे.

जयप्रभा स्टुडिओत होणाऱ्या शूटींगची संख्या रोडावल्याने लता मंगेशकर यांनी स्टुडिओ विकण्याची इच्छा व्यक्त केली.

अर्थात, ह्या स्टुडीओमधून भाडे मिळत होते. आणि ते घेण्यात काही गैर देखील नाही. पण जर, "५३ वर्षे एखादी जागा पांढर्‍या हत्तीसारखी पोसणे सोपे नाही." असे त्या म्हणत असल्या तर ते अर्धसत्य आहे.

माझा मुद्दा आत्ता देखील त्यांनी त्या स्टूडीओची काळजी घ्यावी असा नाही. ती त्यांची मालकी आहे आणि त्यांनीच काय करायचे ते ठरवावे... पण बरेच पर्याय असू शकले असते. गुप्ततेने व्यवहार करायच्या आधी जाहीरपणे सांगायचे मी असे करते आहे. कोणाला सांभाळायची आहे का? जर कोणी सांभाळण्यासाठी घेणार असेल तर ते अधिकृतपणे म्हणजे अगदी "ऐतिहासिक वास्तू" म्हणून कायदा करून आणि मोबदला घेऊन ठरवता आले असते. कायदा अशा साठी की जेणे करून नंतर कोणी ती जागा अशीच विकणार नाही, वगैरे... विशेष करून या आधी त्यावरून ओरड झालेली असताना. असो.

चौकटराजा's picture

30 Aug 2012 - 1:15 pm | चौकटराजा

कोणतेही स्मारक वा वास्तू दोन कारणासाठी जपले जाते . एक ते जपण्यासारखे सुंदर घडवलेले असते व पुढच्या पिढ्यानी ते पहाण्याचा आस्वाद घ्यावा. दुसरे कारण भावनिक - त्या पासून प्रेरणा मिळावी, मिळते
वगैरे. माझा पाठिंबा पहिल्या कारणास आहे. दुसर्‍यास नाही. तात्याराव सावरकर , गांधीजी , आंबेडकर यांचे कार्य माहीतच नसेल तर केवळ त्यांचे पुतळे , त्यांच्या नावाचे पूल, त्यांच्या नावाचे रस्ते , त्यांच्या नावाची उद्याने यानी प्रेरणा येईल काय ? बिलकुल नाही. आज मराठीत जे उत्तमोत्तम दिग्दर्शक निर्माण होत आहेत त्यानी जयप्रभा , आर के स्टुडिओ पाहून प्रेरणा घेतली की भालजी , राजकपूर यांचे चित्रपट पाहून ? उद्या कोणी म्हणेल लताबाई नी पहिले गाणे ज्या माईक वर गाणे गायले तो हजार वर्षे जपून ठेवा ! त्यापेक्षा त्यांचे गायन जपून ठेवणे जास्त युक्त नाही काय ? शेवटी स्टुडिओ काय माईक काय ही साधने आहेत त्यातून कार्यदर्शन होत नाही.

भालजींबद्दल वाटत असेल तर त्यानी आपले घर सोडुन उरलेल्या मालमत्तेवर त्याचे स्मारक उभारावे असे मला वाटते.पहिली मदतीची पावती माझी असेल.
बाकी माझ्या जागेत काय करणार ते मी बघुन घेईन.कट्ट्यावर बसुन ,दुसर्‍याच्या पैश्याचा चहा ढोसणार्‍या लोकाचा सल्ला मात्र घेणार नाही.

कोल्हापुरी वेताळ

उगा काहितरीच's picture

30 Aug 2012 - 9:22 pm | उगा काहितरीच

जे लोक तेथे वस्तुसंग्रहालय कारु इच्छीतात त्यांना एकत्र बोलवायला पाहिजे व जो सर्वात जास्त बोली लावेल त्याला स्टुडिओ विकावा म्हनजे स्टुडिओच्या जागी वस्तुसंग्रहालय होईल व दिदींना जास्त पैसे पण मिळ्तील. !

सुहास's picture

31 Aug 2012 - 1:00 am | सुहास

लताबाई ज्यावेळी जयप्रभा स्टुडिओ मध्ये वस्तुसंग्रहालय वग्रै करायला तयार होतील तेव्हा त्या पेडर रोड फ्लाय ओव्हरला ही तयार होतील असा काही लोकांचा अंदाज आहे... ;)

--सुहास

शिल्पा ब's picture

31 Aug 2012 - 4:38 am | शिल्पा ब

मंगेशकर कुटुंबियांच्या पैशाच्या वखवखीबद्दल बरेच ऐकुन आहे त्यामुळे धक्का अजिबात वाटला नाही.

पण स्टुडीओ जर कायदेशीररीत्या त्यांच्या नावावर असेल तर बाकी कोणाचा त्यांच्या निर्णयावर काहीही बोलण्याचा अधिकार नाही. फारच वाटलं तर लोकांनी किंवा ज्या कोणाला फार वाटत असेल त्यांनी हा स्टुडिओ विकत घेउन काय घालायचा तो गोंधळ घालावा.

मराठी_माणूस's picture

2 Sep 2012 - 3:59 pm | मराठी_माणूस

ऐकीव माहीतीवर एका आदरणीय कुटुंबा बद्दल असे उद्गार हे अत्यंत घृणास्पद आहे.

शिल्पा ब's picture

2 Sep 2012 - 11:57 pm | शिल्पा ब

तरी बरं बातमी वरंच दिलीये. आम्ही व्यक्तिपुजक नाहीत त्यामुळे फार काही वाटतं नाही.

मंगेशकर, तेंडुलकर वगैरे मंडळी त्यांच्या क्षेत्रात कीतीही उत्तम असली तरी त्यापेक्षा जास्त महत्व द्यायची गरज नाही...कोणीही असु.

बाकी तुमचं चालु द्या.

मराठी_माणूस's picture

3 Sep 2012 - 8:03 pm | मराठी_माणूस

व्यक्तिपुजा सोडुन द्या पण एक नागरिक म्हणून स्वतःच्या मालकिच्या जागेचा व्यवहार करण्याचे अधिकार मान्य करणार का नाही?
मत मांडताना शब्दांचे तारतम्य आवश्यक आहे

सूड's picture

3 Sep 2012 - 11:22 pm | सूड

>> पण एक नागरिक म्हणून स्वतःच्या मालकिच्या जागेचा व्यवहार करण्याचे अधिकार मान्य करणार का नाही?
स्वतःच्या मालकीची जागा ? ती त्यांच्याच मालकीची जागा आहे, हे तुम्हांला कसं हो ठाऊक ?

जयप्रभा स्टुडिओ जैसे थे ठेवा: न्यायालय
http://abpmajha.newsbullet.in/entertainment/art-literature/19648
वाचकांसाठी दुवे:-
http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNe...

http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNe...

http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNe...

http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNe...

बाकी पेडर रोड उड्डाणपुला बाबत सुहासशी बाडीस...

विजुभाऊ's picture

4 Sep 2012 - 6:35 pm | विजुभाऊ

त्या जागेत एखादे चांगले आयटीपार्क उभे राहील्/हाटेल उभे राहील . कोल्हापुरातल्या लोकाना कामधाम मिळेल.
किमानपक्षी आयपीएल साठी स्टेडियम होईल.
स्टुडीओ नुसताच ठेवून त्याच्या उपयोग कबड्डीचे मैदान म्हणून सुद्धा होणार नाही.
लोकाना रोजगार निर्माण होऊ द्यावयाचा नाही म्हणून हे सारे खेळ आहेत.

प्रभाकर पेठकर's picture

10 Sep 2012 - 10:04 am | प्रभाकर पेठकर

जयप्रभा स्टुडिओ विक्री व्यवहार रद्द झाला आहे. खरेदीदारानेच कोल्हापुरकरांच्या भावना लक्षात घेऊन हा व्यवहार रद्द केल्याची घोषणा केली.