मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जयप्रभा स्टुडिओ, कोल्हापूर

हुप्प्या · · काथ्याकूट
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/15894252.cms वर दिलेल्या बातमीप्रमाणे कोल्हापूरचा जयप्रभा स्टुडिओ हा ऐतिहासिक दृष्टया महत्त्वाचा आहे आणि तो टिकावा असे बहुतेक कोल्हापूरकरांना वाटते. हा सध्या लता मंगेशकरांच्या मालकीचा आहे आणि तो त्यांनी सुरेश वाडकरांच्या मदतीने एका बिल्डरला विकला आहे असे म्हणतात. त्यामुळे कोल्हापूरात लताबाई आणि सुरेश वाडकरांविरुद्ध असंतोष उसळला आहे. इतक्या गुणी कलाकारांविरुद्ध असे जनमत उभे रहाणे क्लेषकारक वाटते. कुणी कोल्हापूरकर वा अन्य जाणकार ह्यावर प्रकाश टाकतील का? हे सगळे खरोखर जयप्रभा स्टुडिओच्या प्रेमापायी होते आहे का त्यामागे अन्य काही मतलब आहे? कुणी बडी असामी ११ कोटी की काय जी किंमत आहे ती चुकवून ती वास्तू जतन करुन तिथे एखादे वस्तुसंग्रहालय का नाही उघडत?

वाचन 9581 प्रतिक्रिया 0