जयप्रभा स्टुडिओ, कोल्हापूर
हे सगळे खरोखर जयप्रभा स्टुडिओच्या प्रेमापायी होते आहे का त्यामागे अन्य काही मतलब आहे?हाच्च तो प्रश्न माझ्यापण मनात आला होता ति बातमी पाहताना.
In reply to जयप्रभा स्टुडिओ by सुनील
अन्यथा, लताबाई तो विकण्यास मुख्यतार आहेतच. त्यांनी तो स्टुडिओ जतन करण्यासाठी ११ कोटींचे नुकसान सहन करण्याची काहीही आवश्यकता नाही!माझे ही काहीसे असेच मत होते. पण आज "पत्र नव्हे मित्र" मध्ये खालील बातमी वाचली. लतादिदींच्या विरोधात चित्रपट महामंडळ कोर्टात या बातमीतील खालील मजकुराने लक्ष वेधून घेतले.
१९३३ साली प्रभात फिल्म कंपनी कोल्हापुरातून पुण्यात स्थलांतरीत झाल्यावर कोल्हापुरातील चित्रपटनिर्मितीचा व्यवसाय जिवंत ठेवण्यासाठी छत्रपती राजाराम महाराज यांनी १९३४ साली कोल्हापूर सिनेटोन या नावाने स्टुडिओ सुरू केला. १९४७ साली देश स्वतंत्र झाल्यावर पुढेही चित्रपटनिर्मिती सुरूच रहावी या हेतूने हा स्टुडिओ काही मोबदल्यात भालजी पेंढारकर यांना देण्यात आला. कालांतराने हा स्टुडियो भालजींनी लता मंगेशकर यांना दिला. भालजींना हा स्टुडिओ देत असताना केवळ चित्रपटनिर्मितीसाठीच वापरावा अशी अट राजाराम महराजांनी घातली होती. तीच अट लता मंगेशकर यांनाही लागू होत असल्याचा मुद्दा महामंडळाने या दाव्यात मांडला आहे.असे असेल तर मात्र लतादीदींना ही वास्तू विकण्याचा हक्क नाही असे म्हणावे लागेल. अथवा विकत घेणाऱ्याला वास्तू चित्रपटनिर्मितीसाठीच वापरावी लागेल.
In reply to लताबाई आणि जयप्रभा स्टुडियो by घाशीराम कोतवाल १.२
In reply to त्या तर वेगळेच म्हणताहेत by श्री गावसेना प्रमुख
In reply to तुम्ही एकटा जीव वाचा साहेब by घाशीराम कोतवाल १.२
In reply to दादा कोंडके by हुप्प्या
In reply to तुम्ही एकटा जीव वाचा साहेब by घाशीराम कोतवाल १.२
In reply to त्या तर वेगळेच म्हणताहेत by श्री गावसेना प्रमुख
In reply to हम्म... by प्रदीप
In reply to +१ पुढे by विकास
In reply to आधीच करून झालंय! by पैसा
In reply to +१ पुढे by विकास
आता त्यांच्याकडून असे काही घडावे अशी सदिच्छा आहे ज्याने कौतुकाबरोबरच कायमस्वरूपी आदरही राहील.म्हणजे आतापर्यंत त्यांनी केलेल्या कार्याचे काय? त्यांनी नक्की काय केले असता आपला (म्हणजे सर्वसाधारण जनतेचा) त्यांच्याविषयी 'कायमस्वरूपी आदर' राहील? अनेक व्यक्ति शांतपणे, कसलाही गाजावाजा न करता, सामाजिक कार्य आपापल्या कुवतीप्रमाणे करीत असतात, लताबाईही तसे काही करत असाव्यात की? सिनेसंगीत सृष्टीतीलच कालच्या काही व्यक्तिंना त्या मदत करत होत्या, ह्याचे एकतरी उदाहरण मला त्या व्यक्तिचे निधन झाल्यानंतर त्या व्यक्तिच्या एका निकटपर्तीयाकडून अगदी नकळत समजले. तशी एकदोन इतरही उदाहरणे इतरांच्या लिखाणातून माहित झालेली आहेत, अजून कित्येक असावीत, कल्पना नाही. आपल्या त्यांच्याकडून सामाजिक कार्याच्या ज्या अफाट कल्पना असतात, त्यातील एक अनेक वर्षांपूर्वी एका सद्ग्रुहस्थांनी मांडली होती-- शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री असतांना त्यांनी राज्य सरकारातर्फे काही व्यक्तिंचा जाहीर सन्मानसोहळा घडवून आणला. त्यात त्यांनी त्यातील प्रत्येक व्यक्तिस शासनातर्फे मानपत्र व एक लाख रूपयांचा धनादेश दिला. ह्या व्यक्तिंमध्ये दुर्गाबाई होत्या, तसेच सुनील गावस्कर व लताबाई हे मान्यवरही होते. दुर्गाबाईंनी ती रक्कम तेथल्या तेथे एका समाजसेवी संस्थेस दान केली. लताबाईंनी तसे काही केले नाही, त्याविषयी ह्या गृहस्थांचा रोष होता! म्हणजे त्यांनी जे काही करायचे, ते अगदी ढोल पिटूनच केले तरच ते खरे! (ह्यात दुर्गाबाईंविषयी अनादर दर्शवावयाचा नाही, पण इतरांनी तसे जाहीरपणे केले नाही, तेव्हा ते म्हणे अनादरास पात्र झाले!) आजच अन्यत्र अशीच एक 'मागणी' वाचली. सरकारने खरे तर तो स्टुडियो घेऊन त्याचे राष्ट्रीय स्मारक केले पाहिजे. पण सरकार आपले कर्तव्य बजावत नसल्याने, समाजातील प्रमुख व्यक्तिंचे (पक्षी: येथे लताबाईंचे) ते कार्य ठरते, म्हणे! वास्तविक सुमारे ४० वर्षे लताबाई त्या स्टुडियोच्या वास्तूची स्वखर्चाने देखभाल करीत आहेत, हेदेखील कुणाच्या ठावी नव्हते. मी वर उल्लेखिलेल्या त्यांच्या मुलाखतीतून ते प्रथम सर्वांना समजले असावे.
In reply to हम्म... by प्रदीप
In reply to सहमत आहे. पण 'स्वतःस एक by अप्पा जोगळेकर
In reply to सदर वास्तू संपूर्णत: by कॉमन मॅन
लताबाईंच्या मालकीची आहे ही वस्तुस्थिती असताना त्यांनी ती वास्तू विकावी, की दान करावी, की तशीच जतन करून ठेवावी इत्यादीबाबतचे सगळे अधिकार सर्वस्वी त्यांचे आहेत. त्यामुळे त्या बद्दल कुणी काही आक्षेप घेण्याचे कारण दिसत नाही..सहमत. इतरांना जर वास्तू जतन करायची इतकीच पडली असेल तर त्यांनी ११ कोटी उभे करून ती वास्तू लतादिदींकडून विकत घेऊन ती जतन करावी. इतकी वर्षे ती वास्तू लतादिदींच्या मालकीची आहे हेच अनेकांच्या गावी नसेल. म्हणजे इतकी वर्षे स्वतःचा पैसा खर्च करून लतादिदी ती वास्तू जपत होत्या तेव्हा हे लोक कुठे गेले होते?म्हणजे जुनी वास्तू जपायची यांच्या भावनांसाठी आणि त्यासाठी हे लेकाचे काहीही करायला तयार नाहीत आणि ती इतरांनी जपावी ही अपेक्षा. असल्यांना अजिबात महत्व द्यायची गरज नाही. पण त्याचबरोबर लतादिदी स्वतःच्या कम्फ्रर्ट साठी पेडर रोडच्या फाय ओव्हरमध्ये अडथळा टाकला होता हे पण विसरता कामा नये. यांच्या घरातला समुद्राचा व्ह्यू जाईल म्हणून हजारो लोकांनी वाहतुकीचा खोळंबा सहन का करायचा? मागे संजय पवार म्हणून पत्रकाराने लिहिलेल्या एका लेखात लतादिदींवर जोरदार टिका या कारणाने केली होती. तरीही त्यांनी त्यांच्या मालकीच्या वास्तूअचे काय करावे हे ठरवायचा अधिकार त्यांचाच.
In reply to बांगला देशी लोकांना पोसणारे by निनाद मुक्काम …
In reply to मुळामधे जयप्रभा स्टुडिओ मधे by अप्पा जोगळेकर
In reply to निर्णय लताबाईंचा! by समीरसूर
जयप्रभा स्टुडिओत होणाऱ्या शूटींगची संख्या रोडावल्याने लता मंगेशकर यांनी स्टुडिओ विकण्याची इच्छा व्यक्त केली.अर्थात, ह्या स्टुडीओमधून भाडे मिळत होते. आणि ते घेण्यात काही गैर देखील नाही. पण जर, "५३ वर्षे एखादी जागा पांढर्या हत्तीसारखी पोसणे सोपे नाही." असे त्या म्हणत असल्या तर ते अर्धसत्य आहे. माझा मुद्दा आत्ता देखील त्यांनी त्या स्टूडीओची काळजी घ्यावी असा नाही. ती त्यांची मालकी आहे आणि त्यांनीच काय करायचे ते ठरवावे... पण बरेच पर्याय असू शकले असते. गुप्ततेने व्यवहार करायच्या आधी जाहीरपणे सांगायचे मी असे करते आहे. कोणाला सांभाळायची आहे का? जर कोणी सांभाळण्यासाठी घेणार असेल तर ते अधिकृतपणे म्हणजे अगदी "ऐतिहासिक वास्तू" म्हणून कायदा करून आणि मोबदला घेऊन ठरवता आले असते. कायदा अशा साठी की जेणे करून नंतर कोणी ती जागा अशीच विकणार नाही, वगैरे... विशेष करून या आधी त्यावरून ओरड झालेली असताना. असो.
In reply to पांढरा हत्ती... by विकास
In reply to निर्णय लताबाईंचा! by समीरसूर
जयप्रभा स्टुडिओत होणाऱ्या शूटींगची संख्या रोडावल्याने लता मंगेशकर यांनी स्टुडिओ विकण्याची इच्छा व्यक्त केली.अर्थात, ह्या स्टुडीओमधून भाडे मिळत होते. आणि ते घेण्यात काही गैर देखील नाही. पण जर, "५३ वर्षे एखादी जागा पांढर्या हत्तीसारखी पोसणे सोपे नाही." असे त्या म्हणत असल्या तर ते अर्धसत्य आहे. माझा मुद्दा आत्ता देखील त्यांनी त्या स्टूडीओची काळजी घ्यावी असा नाही. ती त्यांची मालकी आहे आणि त्यांनीच काय करायचे ते ठरवावे... पण बरेच पर्याय असू शकले असते. गुप्ततेने व्यवहार करायच्या आधी जाहीरपणे सांगायचे मी असे करते आहे. कोणाला सांभाळायची आहे का? जर कोणी सांभाळण्यासाठी घेणार असेल तर ते अधिकृतपणे म्हणजे अगदी "ऐतिहासिक वास्तू" म्हणून कायदा करून आणि मोबदला घेऊन ठरवता आले असते. कायदा अशा साठी की जेणे करून नंतर कोणी ती जागा अशीच विकणार नाही, वगैरे... विशेष करून या आधी त्यावरून ओरड झालेली असताना. असो.
In reply to मंगेशकर कुटुंबियांच्या by शिल्पा ब
In reply to ऐकीव माहीतीवर एका आदरणीय by मराठी_माणूस
In reply to तरी बरं बातमी वरंच दिलीये. by शिल्पा ब
In reply to व्यक्तिपुजा सोडुन द्या पण एक by मराठी_माणूस
हे सगळे खरोखर जयप्रभा