मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ज्ञानियांच्या मेळ्यामध्ये

अंकुश चव्हाण · · जनातलं, मनातलं
ज्ञानियांच्या मेळ्यामध्ये आम्ही अज्ञानी भाबडे. तुम्हा रुचतील का हो माझे शब्द हे रांगडे. तुम्ही शाल मखमली, आम्ही फाटके घोंगडे. का हो ज्ञान मेळ्यात या आम्हा करता नागडे. जन्म अंधारात गेला, अमुचे सूर्याशी वाकडे. जरा समजून घ्यावे हेची तुम्हासी साकडे. जरा सरावुद्या हात, नीट वळू द्यावे शब्द. मग करू अमुची व्यथा तुम्हासाठी ओवीबद्ध.

वाचने 4156 वाचनखूण प्रतिक्रिया 16

अनिल हटेला Wed, 08/13/2008 - 17:28
अंकुश जी !! येउ देत !! सुरुवात छान आहे !!! अजुनही ओव्या येउ देत !!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

कुंदन Wed, 08/13/2008 - 17:46
जरा सरावुद्या हात, नीट वळू द्यावे शब्द. मग करू अमुची व्यथा तुम्हासाठी ओवीबद्ध. येउ देत अजुन ...

पिवळा डांबिस गुरुवार, 08/14/2008 - 10:30
जन्म अंधारात गेला, अमुचे सूर्याशी वाकडे. जरा समजून घ्यावे हेची तुम्हासी साकडे. जरा सरावुद्या हात, नीट वळू द्यावे शब्द. मग करू अमुची व्यथा तुम्हासाठी ओवीबद्ध. हे विशेष आवडले.... "कालचा पाऊस आमच्या गावात पडलाच नाही... सदरहू पीक आम्ही आसवांवर काढले आहे..." याची आठवण झाली... जियो!

अंकुश चव्हाण Mon, 08/25/2008 - 19:14
नमस्कार मंड्ळी, तुमच्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल मी तुमचा आभारी आहे. असाच क्रुपावर्शाव राहु द्या. आपला क्रुपाभिलाशी, अंकुश चव्हाण.

केशवराव Tue, 08/26/2008 - 00:38
अतिशय सोप्या शब्दात मनाची व्यथा मांडलीत. व्यथा मनाला भिड्ली. अजुन कविता येउद्या. फारच छान!