ज्ञानियांच्या मेळ्यामध्ये
ज्ञानियांच्या मेळ्यामध्ये
आम्ही अज्ञानी भाबडे.
तुम्हा रुचतील का हो
माझे शब्द हे रांगडे.
तुम्ही शाल मखमली,
आम्ही फाटके घोंगडे.
का हो ज्ञान मेळ्यात या
आम्हा करता नागडे.
जन्म अंधारात गेला,
अमुचे सूर्याशी वाकडे.
जरा समजून घ्यावे
हेची तुम्हासी साकडे.
जरा सरावुद्या हात,
नीट वळू द्यावे शब्द.
मग करू अमुची व्यथा
तुम्हासाठी ओवीबद्ध.
वर्गीकरण
अंकुश जी
अरे ... एकदम सह्ह्ही!
मस्त रे ....
येउ देत
क्या बात
झकास!!! http://suchel
हा हा हा
वा छान!
छान
सुन्दर
कविता आवडली, अंकुशराव!
In reply to कविता आवडली, अंकुशराव! by पिवळा डांबिस
असेच म्हणतो
In reply to कविता आवडली, अंकुशराव! by पिवळा डांबिस
सहमत
ज्ञानियांच्या मेळ्यामधे...
फारच छान !
सुंदर!