विडंबनाची भेळपुरी

घाटावरचे भट's picture
घाटावरचे भट in जे न देखे रवी...
7 Aug 2008 - 5:39 am

(डिस्क्लेमरसाठी कृपया पहिले कडवे पहा)

मिपाकरांनो ऐकून घ्यावे मनातली मांडतो व्यथा
कविता माझी पण ह. घेणे, जरी असे ती यथातथा

नवखा आहे सदस्य मी वय माझे आहे हप्त्याचे
परंतु होई अजीर्ण मजला विडंबनाच्या कवितांचे

हसता हसता पोट दुखे मी पोटदुखीने बेजार
चहुबाजूंनी चाले मजवर विडंबनांचा भडिमार

महान अमुचे केसुगुरुजी महान अन त्यांची शाळा
काव्यावरती काव्य प्रसवतो त्यांच्या छात्रांचा मेळा

या शाळेचा प्रभाव खासा काव्यापुरता नाही बरे
कुठे कुणाचा ग्यासु आणिक कुठे कुणाची बनी फिरे

असे विडंबन चविष्ट जैसी गाडीवरची भेळपुरी
भेळपुरी पण कितीक खावी सांगा मजला खरोखरी

आज जाहल्या भेळपुरीच्या गाड्या त्या जिकडेतिकडे
सात्विक थाळी महाग झाली भूक मिटावी कुणीकडे

कविता

प्रतिक्रिया

सर्किट's picture

7 Aug 2008 - 5:51 am | सर्किट (not verified)

सात्विक थाळी हवी असे तर जुनी आपुली स्थळे बरी
लोणकढे तुप मुबलक तेथे, जर सोसत नसेल ही तर्री

- सर्किट

घाटावरचे भट's picture

7 Aug 2008 - 6:01 am | घाटावरचे भट

मला न ठाऊक जुनी स्थळे ती नाही त्यांचा इतिहास
मनात आले दिले ठोकुनि नाही कुणाचा उपहास

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

सर्किट's picture

7 Aug 2008 - 8:22 am | सर्किट (not verified)

इतिहासाची तमा नसे तर, भविष्य तममय वाटतसे
येथ टिकूनी रहावया मग, कुठलीही चिंताच नसे

- सर्किट

मुक्तसुनीत's picture

7 Aug 2008 - 8:26 am | मुक्तसुनीत

इतिहासाचे ओझे वाही त्याला ते लखलाभ असो
नव्या दमाच्या शूर शिपाया नव्या युगाचे चित्र दिसो !

सर्किट's picture

7 Aug 2008 - 8:31 am | सर्किट (not verified)

नव्या युगाचे चित्रच येथे, दिसते जरि आशादायी
जुन्या युगातुन तरि ही येते, प्रतिसादांची अंगाई

- सर्किट

मुक्तसुनीत's picture

7 Aug 2008 - 8:39 am | मुक्तसुनीत

थेसिस आणि अँटीथेसिस सांगून गेला कुणि वेडा
सांगावेसे वाटे सकला , सिंथेसिस चा मंत्र पढा !

सर्किट's picture

7 Aug 2008 - 8:41 am | सर्किट (not verified)

त्या वेड्याला जाऊन सांगा, थेसिसचा जाणुन अर्थ
सिंथेसिस शब्दात बुडाला, बेसिस देखिल हे व्यर्थ!

- सर्किट

घाटावरचे भट's picture

7 Aug 2008 - 8:34 am | घाटावरचे भट

कुणा दुखवणे उपमर्दाने नाही मुळी माझा हेतू,
डिस्क्लेमर वाचूनही माझा का धरितसा मनी किंतु???

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

सर्किट's picture

7 Aug 2008 - 8:38 am | सर्किट (not verified)

किंतु धरला नाही मनि हा, उगाच तुजला वाटतसे
भाड्या करं रे तूही विडम्बन, कोण तुला तो रोकतसे ?

- सर्किट

घाटावरचे भट's picture

7 Aug 2008 - 8:44 am | घाटावरचे भट

काश असती ऐसी प्रतिभा जर अमुच्याही गाठीशी
लिहिले असते केसुगुरुजीना घेऊन अमुच्या पाठीशी...

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

मुक्तसुनीत's picture

7 Aug 2008 - 8:49 am | मुक्तसुनीत

मिसळपाववर राजहंस हा : केसु , तुमको मान गये ! ,
राजहंस तो चाले म्हणुनि , कवणे परि चालूच नये ! ;-)

केशवसुमार's picture

7 Aug 2008 - 8:27 pm | केशवसुमार

जालावरचा सुमार मी हो, राजहंस मज म्हणू नका
मारा जोडे तुम्ही हवे तर, असल्या पदव्या देऊ नका
(सुमार)केशव

सर्किट's picture

7 Aug 2008 - 8:52 am | सर्किट (not verified)

प्रतिभेची प्रतिमा दाखवुनी, गंडवले तुज आजवरी
संगितातले ज्ञान दावुनी, मामा अजवर तुझा परी

एक सांगतो भटा आज तुज, प्रतिमा ही रे नाही बरी
हत्तीच्या जरि कानामधली, एकच मी मुंगीच खरी

विडंबनातुन सत्यच स्रवते, मूळ प्रकाश कुठे न उरी
सगळे पुतणे भाचे येथे, काका मामा जरी हे शिरी

- सर्किट

घाटावरचे भट's picture

7 Aug 2008 - 9:01 am | घाटावरचे भट

विडंबनातुनि सत्यच स्रवते मान्य असे मज पूर्णपणे
सत्याचा अतिरेक परंतु का उगि कलियुगी वाढविणे?

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

सर्किट's picture

7 Aug 2008 - 9:35 am | सर्किट (not verified)

कली सत्य अन त्रेता युग रे, डिफरंसाची जाण नसे
विडम्बने ही कालातित रे, कधीपासुनी सांगतसे

- सर्किट

घाटावरचे भट's picture

7 Aug 2008 - 9:55 am | घाटावरचे भट

सर्किटकाका माफ करा मज अपुल्या पाया मी पडतो
गरमगरम दूधभात खाण्या सत्वर माघारी जातो....

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

सर्किट's picture

7 Aug 2008 - 9:58 am | सर्किट (not verified)

पाया पडणे मान्य नसे मज, हस्तांदोलन आज करू
काका म्हणशी का रे मजला, कानाखाली तुझ्या फिरु ?

- सर्किट

घाटावरचे भट's picture

7 Aug 2008 - 10:04 am | घाटावरचे भट

काका म्हणणे मान्य नसे जर सर्किटराव तुम्हा म्हणतो
हस्तांदोलन मैत्रीसाठी करण्या हात पुढे करतो...

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

सर्किट's picture

7 Aug 2008 - 10:07 am | सर्किट (not verified)

नेटावरुनी बॉल टाकुनी, विंबल्डन करुनी थकलो
हस्तांदोलन करुनि तुझ्याशी, अंथरुणावर पहूडलो

- सर्किट

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Aug 2008 - 10:14 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

अंथरूणावरुनी उठूनी पहाटे, आत्ता तर मी नेटावर आले
का रे पळशी संकेश्वररावा, आत्ता तर फटका मारू पाहते

घाटावरचे भट's picture

7 Aug 2008 - 10:15 am | घाटावरचे भट

माझ्या सर्व्हिस नंतर तुमचे एस आले सहस्रावधी
रॅ़केट खाली टाकून पळतो भटू विम्ब्ल्डनामधी

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

बेचवसुमार's picture

7 Aug 2008 - 11:01 am | बेचवसुमार

हिहाहा हिहाहा हिहाहा...
विडंबन आणि विम्बल्डन...नावसाधर्म्य रे तु पहा...!
हिहाहा हिहाहा हिहाहा

राक्षसी विकट हास्य हासणारा...बेचवसुमार..

मुक्तसुनीत's picture

7 Aug 2008 - 7:37 am | मुक्तसुनीत

सत्त्व, तमो नि रजोगूण , हे सारे अपुले सवंगडी
मिसळपाववर सकलही जमती , थांबा येथे दोन घडी !

सर्किट's picture

7 Aug 2008 - 8:31 am | सर्किट (not verified)

सत्व कळे हे सुनितांपासुनी, रज अमुचे हे थेंब दिसे
तमोगुणातुन कोण उधळतो, च्यामारी प्रतिसाद पिसे ?

- सर्किट

मुक्तसुनीत's picture

7 Aug 2008 - 8:31 am | मुक्तसुनीत

सत्त्वरजाबरोबर तमाचाही हा झाला सकलां स्पर्श असा ,
म्हणुनचि कोणी सांगून गेले : पाण्या , रे , तव रंग कसा ?

सर्किट's picture

7 Aug 2008 - 8:36 am | सर्किट (not verified)

रंग रंगुनी रंगित झालो, केसु केळूंमुळे जसा
चतुरंगाच्या विडंबनांना, कंटाळी हा भट्या कसा ?

- सर्किट

चिन्मय खंडागळे's picture

7 Jan 2014 - 9:03 pm | चिन्मय खंडागळे

सॉलिड.

मुक्तसुनीत's picture

7 Aug 2008 - 8:40 am | मुक्तसुनीत

हाहा !

विसोबा खेचर's picture

7 Aug 2008 - 8:40 am | विसोबा खेचर

सात्विक थाळी महाग झाली भूक मिटावी कुणीकडे

वा! क्या बात है...!

सर्किट's picture

7 Aug 2008 - 8:42 am | सर्किट (not verified)

काय हा स्वप्रकाशित प्रतिसाद !

वा !

- सर्किट

प्रकाश घाटपांडे's picture

7 Aug 2008 - 8:49 am | प्रकाश घाटपांडे

मैफिलिला मजा आलि बुवा! मराठी पिक्चर मधले सवाल जवाब आठवले.
प्रकाश घाटपांडे

मेघना भुस्कुटे's picture

7 Aug 2008 - 8:52 am | मेघना भुस्कुटे

हुश्श! आता गद्य प्रतिसाद टंकायला हरकत नाही. मजा आली. अगदी श्रीमंत वाटलं. सर्किट, मुक्तसुनीत आणि घाटावरचे भट, तिघांनाही धन्यवाद.

भडकमकर मास्तर's picture

7 Aug 2008 - 9:33 am | भडकमकर मास्तर

काय बोलावं सुचत नाहीये...
तिघांनी अगदी धमाल आणली...
काय सवाल जवाब ..काय आशय ....काय मीटर.... मस्त ...
भट, सर्किट आणि मुक्तसुनीत येकदम धन्यवाद...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

सहज's picture

7 Aug 2008 - 9:40 am | सहज

सहमत.

तिघांनी जाम मजा आणली व ही मैफील मगापासुन लाईव्ह एन्जॉय करायला मिळतीय हा आनंद काही आगळाच

पहिल्यांदा असे झाले असावे की प्रतिसादांनी इतकी मजा आणली. मुळ विडंबनाकडे लक्षच नाही. :-)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Aug 2008 - 9:55 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

सही!

>> पहिल्यांदा असे झाले असावे की प्रतिसादांनी इतकी मजा आणली. मुळ विडंबनाकडे लक्षच नाही.
तसं नाही, पण प्रतिसादांमुळे खूपच मजा आली.

(प्रतिसादांमुळे मुळ विडंबनाकडे दुर्लक्ष न केलेली) यमी

भडकमकर मास्तर's picture

7 Aug 2008 - 10:12 am | भडकमकर मास्तर

टेनिसची मॅचा चाललीया असा वाटतंय....
..वरती नुकतंच हस्तांदोलन झालंय...
आता मॅच संपतेय बहुतेक....

( मजेत इकडच्या कोर्टातले चेंडू तिकडे टोलवले जाताना मॅच पाहणारा )...
भडकमकर मास्तर

_____________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मुक्तसुनीत's picture

7 Aug 2008 - 10:19 am | मुक्तसुनीत

"विंम्बल्डन"चा उल्लेख आलाच आहे वर !
- म्याकेन्रोने फेकलेल्या रॅकेटमुळे कोसळलेला अंपायर ! ;-)

मनस्वी's picture

7 Aug 2008 - 11:08 am | मनस्वी

>> प्रतिसादांनी इतकी मजा आणली. मुळ विडंबनाकडे लक्षच नाही.

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

नंदन's picture

7 Aug 2008 - 11:38 am | नंदन
धनंजय's picture

7 Aug 2008 - 5:32 pm | धनंजय

असेच म्हणतो

ऋषिकेश's picture

7 Aug 2008 - 10:48 pm | ऋषिकेश

असेच म्हणतो.. खूप सह्ही
-('मिसळ'लेला) ऋषिकेश

स्वाती दिनेश's picture

7 Aug 2008 - 11:45 am | स्वाती दिनेश

प्रतिसादांनी इतकी मजा आणली. मुळ विडंबनाकडे लक्षच नाही.
सहजरावांसारखेच म्हणते.
स्वाती

अमिगो's picture

7 Aug 2008 - 11:52 am | अमिगो

क्या बात है...

मृगनयनी's picture

7 Aug 2008 - 12:14 pm | मृगनयनी

सात्विक थाळी महाग झाली भूक मिटावी कुणीकडे
कोबीची पाने सारखी चावुनी तोंडाचीही चव उडे...
ऑप्शन एक, दिला तुम्हा.. पकवा नवल्कोल चे पकोडे...
तरी चव ना उरे जिभेला, खाताना आठवा मनी जोशाकडचे वडे...
:)


वन्दे त्वां भूदेवी आर्यमार्तरम..........
जयतु जयतु पदयुगुलम ते निरन्तरम.........

घाटावरचे भट's picture

7 Aug 2008 - 12:35 pm | घाटावरचे भट

काव्य पाडुनि अति मी दमलो विश्रांतीला द्या वेळ
उसंत द्या मज जरा घालण्या पुढच्या शब्दांचा मेळ

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

केशवसुमार's picture

7 Aug 2008 - 12:29 pm | केशवसुमार

हे चालय काय? :O
काल रात्री इतकी उच्च मॅच झाली आणि आम्ही कुला वर करून झोपलो होतो.. #o
छ्या!!
इथून पुढे मॅच चालू झाली तर लगेच आम्हाला भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा ही विनंती

मुक्ती सर्किट, भट घाटाचे मॅच खेळले काल म्हणे
वरती करूनी कुला केशवा महाग पडले तुज निजणे

(एक सुंदर मॅच पहायला मुकलेला) केशवसुमार
स्वगतः बर झाले लेका तू झोपला होतास.. 'चेंडू' वर लक्ष ठेवण्यात मान मोडली असती..

घाटावरचे भटशेठ,
अतिशय उत्तम कविता.. _/\_
(वाचक निवृत्त)केशवसुमार
स्वगतः
१. केश्या ह्या भटाच्या कवितेचे कधी तू वाट लावली होतीस का? :? मग का तो विडंबनाच्या जीवावर उठला आहे.
२. हा भट दुसर्‍या कुठल्या नावाने कविता करतो शोधायला हवे.. म्हणजे नव्या बॅचच्या अभ्यासक्रमात त्याच्या कविता घेता येतील

घाटावरचे भट's picture

7 Aug 2008 - 12:50 pm | घाटावरचे भट

साक्षात विडंबनशिरोमणींचा कौतुकाचा खलिता????
हेडमास्तरांकडून कौतुक???
सूर्याकडून काजव्याची स्तुती???

स्वगतः
१. भटा, भरून पावलास लेका....या क्षणी मेलास तरी स्वर्गातली शीट पक्की
२. च्यामारी पहिल्यांदा कोणीतरी सगळ्यात वर जे खरडलं होतं त्याच्याबद्दल बोललं...

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

भाऊ ठाकुर's picture

7 Aug 2008 - 12:51 pm | भाऊ ठाकुर

सर्व कवींचे विशेष अभिनंदन

चालु द्या अशीच जुगल्बन्दी

अ फ ला तू न , शब्दच नाहित दुसरे.

II राजे II's picture

7 Aug 2008 - 4:37 pm | II राजे II (not verified)

तिघांनी जाम मजा आणली व ही मैफील मगापासुन लाईव्ह एन्जॉय करायला मिळतीय हा आनंद काही आगळाच

पहिल्यांदा असे झाले असावे की प्रतिसादांनी इतकी मजा आणली.

हेच म्हणतो....

वा ! क्या बात है !

अशी प्रतिभा माझ्या कडे असती ?
तर... मी पाडली असती अशीच शेकडो विडंबने मिपा वरती :D

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

बिपिन कार्यकर्ते's picture

7 Aug 2008 - 5:00 pm | बिपिन कार्यकर्ते

मूळ विडंबन छानच आहे. पण नंतर जे काही घडलंय, हसूण हसून मेलो.... १० मिनिटांनी प्रतिसाद टंकतोय... तमाश्यामधे सवाल-जवाब चालतात तसाच हा उच्च प्रकार होता. आपण तर बुवा जळलो सर्किट, मुक्तसुनित आणि भटोबांवर. काय प्रतिभा ही....

तुम्हाला तिघांनाही..... _||_ (ही कोपरापासून नमस्काराची 'बाहुली' आहे)

बिपिन.

चतुरंग's picture

7 Aug 2008 - 7:38 pm | चतुरंग

केवढा मोठा फड रंगून गेला अन् मी कुठे होतो?

घाटावरचे भट, सर्किट अन् मुक्त खेळती सुनीतही
हळहळशी बघ मनीच रंग्या कसा सोडशी मॅच 'तू ही'

भटोबा उच्च कविता! :)

(स्वगत - रंग्या, नको तेव्हा नेटवर भटकत बसतोस आणि नेमका मॅचच्या वेळेला कुठे रे गेलेलास बोंबलत? X( )

चतुरंग

सचिन पवार's picture

7 Aug 2008 - 8:10 pm | सचिन पवार

सगळी कविता चांगली आहे

नीलकांत's picture

7 Aug 2008 - 10:58 pm | नीलकांत

हा सवाल जवाब आपल्याला जाम आवडला. सर्कीटराव, मुक्तसुनीत आणि घाटावरचे भट, एकदम जबरा सवाल - जवाब.

मस्तच !

नीलकांत

नाखु's picture

8 Aug 2008 - 9:26 am | नाखु

आणी समस्त मिपाकर "गुण्यागोविंदाने" नव्-(झिट) कवितेचा ( विडंबनाच्या सह) आस्वाद घेऊ लागले.... कहाणी सुफळ संपुर्ण....

मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"

नील_गंधार's picture

5 Mar 2010 - 5:15 pm | नील_गंधार

आयच्यान,
कसली प्रतिभा म्हणायची याला!!
सर्किटशेठ,मुक्तसुनीतसाहेब अन घाटावरचे भट तिघेहि जबरी.
लै भारी जुगलबंदी.

नील.

तिमा's picture

8 Jan 2014 - 11:58 am | तिमा

इतक्या वर्षांनंतरही वाचायला मजा आली. अफाट प्रतिभा या ज्येष्ठांची.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Jan 2014 - 12:02 am | डॉ सुहास म्हात्रे

सॉलिड कविता आणि जुगलबंदी ! धन्यवाद तिमा हा धागा वर आणल्याबद्दल.

अनुप ढेरे's picture

10 Jan 2014 - 11:05 am | अनुप ढेरे

हेच म्हणतो !

अत्रुप्त आत्मा's picture

10 Jan 2014 - 10:07 am | अत्रुप्त आत्मा

सॉल्लीड सारे जबाब सवाली ,हसून जाहलो बेजार!
कुठे गेले बिह्राडकरू,अन् कुठे गेला तो शेजारं? :)

जेपी's picture

10 Jan 2014 - 10:23 am | जेपी

सॉलिड सवाल जवाब .

विटेकर's picture

10 Jan 2014 - 11:27 am | विटेकर

खच्चून हाणली जिभल्या चाटत विडंबनाची भेळपुरी
कुठे सांडली कुणा न कळली प्रतिभा ही खरीखुरी

जुने सांडले नवे पातले दर्जा टिकवून असू जरी
मजा चाखुया मनापासुनी काढुनी धागा पुन्हा वरी

एक मेळावा जागतिक सा मिप्यावरती घ्यावा का
जमवून सारे सखे सोबती करुन दाऊ एक " लिमका"

बेडकरासम या मिपाची चव आम्हाला ही स्वर्गीय
नका उठवू बाजार आता जर नसाल तुम्ही बेडेकरीय

अत्रुप्त आत्मा's picture

10 Jan 2014 - 11:41 am | अत्रुप्त आत्मा

ह्हे .... ! उडु दे अजुन दणका! :-D