साहित्यः
५०० ग्राम चिकन साफ करुन, थोडा लिंबाचा रस व किंचित गरम-मसाला लावून १५-२० मिनिटे मॅरीनेट करणे.
१/२ वाटीपेक्षा थोडेच जास्त ओलं खोबरं + मुठभर कोथिंबीर + मुठभर पुदिन्याची पाने + तीन-चार हिरव्या मिरच्या असे एकत्र करुन वाटणे. (हिरव्या मिरच्या आपल्या आवडीप्रमाणे घेणे)
२ छोटे कांदे बारीक चिरून
१ टेस्पून आले+लसूण पेस्ट
२-३ तमालपत्र, ३-४ दालचिनीच्या काड्या, २-३ हिरवे वेलदोडे, ३-४ लवंगा
१ टेस्पून धणे पावडर
१-१/२ टेस्पून गरम-मसाला
मीठ चवीनुसार
तेल
१ चमचा बटर (ऐच्छिक)
पाकृ:
प्रथम एका नॉन-स्टीक भांड्यात तेल तापवून खडा मसाला परतून घेणे. त्यात आले+लसूण पेस्ट घालून चांगले परतणे.
त्यात आता बारीक चिरलेला कांदा घालून तो मऊ होईस्तोवर परतणे.
कांदा चांगला मऊ झाला की त्यात तयार केलेले हिरवे वाटण घालणे. मीठ, गरम-मसाला व धणे पावडर घालून एकत्र करणे.
मसाला चांगला मिक्स झाला की त्यात चिकनचे तुकडे घालणे. आवश्यकतेनुसार पाणी घालून, झाकून शिजवणे.
चिकन पूर्ण शिजले की एक चमचा बटर सोडावे.
झटपट असे हरियाली चिकन तयार आहे. कांद्याच्या सॅलॅडसोबत सर्व्ह करा.
कांद्याच्या पातळ चकत्या करा व त्या मोकळ्या करा. त्यात थोडा लिंबाचा रस, लाल-तिखट, मीठ व कोथिंबीर घालून मिक्स करा कांद्याचे सॅलॅड (लच्छेदार प्याज) तयार :)
प्रतिक्रिया
17 Mar 2012 - 2:33 pm | जाई.
वा
अशक्य आहेस
17 Mar 2012 - 2:35 pm | अत्रुप्त आत्मा
नॉनव्हेजीटेरियन अस्तो तर
17 Mar 2012 - 2:36 pm | गणपा
लज्जतदार दिसतय.
17 Mar 2012 - 2:45 pm | सोना-शार्वील
मस्तच! चिकन आणि प्रेझेंन्टेशनही!
17 Mar 2012 - 4:05 pm | जयवी
अहाहा.... काय ती रेसिपी....कसले सही फोटो आणि प्रेझेंटेशन...... कशाकशाची तारीफ करावी गं.... !!
17 Mar 2012 - 4:07 pm | जयवी
.
17 Mar 2012 - 6:01 pm | निश
सानिकास्वप्निल जी,मस्त आहे पा़ककॄती.
नक्कि करुन बघणार.
17 Mar 2012 - 7:42 pm | प्राजु
काय सांगणार नेहमी नेहमी!!!
____/\____
18 Mar 2012 - 9:22 am | ५० फक्त
नेहमीपेक्षा वेगळं म्हणुन सांगतो, यावेळी फोटो जरा गंडले आहेत.
18 Mar 2012 - 11:31 am | jaypal
झक्क्कास (५० फ्क्त शी फोटो बाबत सहमत) मला पालक आवडतो म्हणुन मी हिरव्या चटणीत पालक देखिल घालतो.
18 Mar 2012 - 2:00 pm | प्रभाकर पेठकर
भारतात आलात की एक पार्टी ठेऊन आम्हाला बोलवा बुआ! किती ते नुसतं जळवायचं...! अभिनंदन.
19 Mar 2012 - 5:11 am | मीनल
चिकन नाही पण मला ते मणी फार फार आवडले. जयू ताई ने पाहिले का?
19 Mar 2012 - 12:34 pm | जयवी
मीनल..... अगं हो...... ती मोत्यांची रांगोळी आहे....किती सुरेख आहे ना..... !! मी म्हटलं ना.....प्रझेंटेशन एकदम सहीये :)
19 Mar 2012 - 11:50 am | इरसाल
रैवारी मारतोच उभा आडवा हात..................घरुन झणझणीत हिरव्या मिरच्या अनायसेच आलेल्या आहेत, करुन टाकू साग्रसंगीत.
19 Mar 2012 - 1:13 pm | सुहास झेले
मस्त.. मस्त :) :)
29 Mar 2012 - 5:18 pm | प अमोल
चिकन पाहुन भुक लागली
*********अमोल*******