मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हरियाली चिकन

सानिकास्वप्निल · · पाककृती
साहित्यः ५०० ग्राम चिकन साफ करुन, थोडा लिंबाचा रस व किंचित गरम-मसाला लावून १५-२० मिनिटे मॅरीनेट करणे. १/२ वाटीपेक्षा थोडेच जास्त ओलं खोबरं + मुठभर कोथिंबीर + मुठभर पुदिन्याची पाने + तीन-चार हिरव्या मिरच्या असे एकत्र करुन वाटणे. (हिरव्या मिरच्या आपल्या आवडीप्रमाणे घेणे) २ छोटे कांदे बारीक चिरून १ टेस्पून आले+लसूण पेस्ट २-३ तमालपत्र, ३-४ दालचिनीच्या काड्या, २-३ हिरवे वेलदोडे, ३-४ लवंगा १ टेस्पून धणे पावडर १-१/२ टेस्पून गरम-मसाला मीठ चवीनुसार तेल १ चमचा बटर (ऐच्छिक) . पाकृ: प्रथम एका नॉन-स्टीक भांड्यात तेल तापवून खडा मसाला परतून घेणे. त्यात आले+लसूण पेस्ट घालून चांगले परतणे. . त्यात आता बारीक चिरलेला कांदा घालून तो मऊ होईस्तोवर परतणे. . कांदा चांगला मऊ झाला की त्यात तयार केलेले हिरवे वाटण घालणे. मीठ, गरम-मसाला व धणे पावडर घालून एकत्र करणे. . मसाला चांगला मिक्स झाला की त्यात चिकनचे तुकडे घालणे. आवश्यकतेनुसार पाणी घालून, झाकून शिजवणे. . चिकन पूर्ण शिजले की एक चमचा बटर सोडावे. . झटपट असे हरियाली चिकन तयार आहे. कांद्याच्या सॅलॅडसोबत सर्व्ह करा. कांद्याच्या पातळ चकत्या करा व त्या मोकळ्या करा. त्यात थोडा लिंबाचा रस, लाल-तिखट, मीठ व कोथिंबीर घालून मिक्स करा कांद्याचे सॅलॅड (लच्छेदार प्याज) तयार :) .

वाचने 9214 वाचनखूण प्रतिक्रिया 16

जयवी Sat, 03/17/2012 - 16:05
अहाहा.... काय ती रेसिपी....कसले सही फोटो आणि प्रेझेंटेशन...... कशाकशाची तारीफ करावी गं.... !!

मीनल Mon, 03/19/2012 - 05:11
चिकन नाही पण मला ते मणी फार फार आवडले. जयू ताई ने पाहिले का?

In reply to by मीनल

जयवी Mon, 03/19/2012 - 12:34
मीनल..... अगं हो...... ती मोत्यांची रांगोळी आहे....किती सुरेख आहे ना..... !! मी म्हटलं ना.....प्रझेंटेशन एकदम सहीये :)

इरसाल Mon, 03/19/2012 - 11:50
रैवारी मारतोच उभा आडवा हात..................घरुन झणझणीत हिरव्या मिरच्या अनायसेच आलेल्या आहेत, करुन टाकू साग्रसंगीत.