फ्रुट कस्टर्ड व चेरी व्हॅनीला शेक

प्राजक्ता पवार's picture
प्राजक्ता पवार in पाककृती
27 Apr 2011 - 4:23 pm

फ्रुट कस्टर्ड :

साहित्य : दुध - अर्धा लिटर ,
कस्टर्ड पावडर - २ चमचे ,
साखर - ४ चमचे ,
फ्रेश क्रीम - ४ चमचे ,
फळे - सफरचंद , द्राक्षे , पपई , डाळींब , संत्रे इ

कृती : प्रथम अर्धी वाटी दुध वेगळे काढुन घ्या व त्यात कस्टर्ड पावडर घालुन एकत्र करा.
उरलेले दुध , साखर घालुन गरम करा . एक उकळी आल्यावर त्यात कस्टर्ड पावडरचे मिश्रण ह्ळुहळु घाला व चमच्याने मिसळा. दोन मिनिटे दुध गरम करुन नंतर ते थंड करायला ठेवा. त्यात फ्रेश क्रीम घालुन मिसळुन घ्या.

सर्व फळांचे तुकडे करुन घ्या.

त्यामध्ये तयार केलेले कस्टर्ड घालुन नीट एकत्र करा व थंड करुन सर्व्ह करा.

चेरी व्हॅनीला शेक :

साहित्य : चेरी ( canned ) - १ वाटी ,
दुध - १ कप ,
व्हॅनीला आईसक्रीम - २-३ स्कुप ,
व्हॅनीला इसेंस - अर्धा छोटा चमचा.
कृती : प्रथम चेरी व थोडे दुध ब्लेंडरमध्ये घालुन एकत्र करुन घ्या. नंतर त्यात उरलेले दुध , व्हॅनीला आईसक्रीम व व्हॅनीला इसेंस घालुन पुन्हा एकदा ब्लेंडरमध्ये नीट मिसळुन घ्या व थंडगार सर्व्ह करा.

प्रतिक्रिया

डोळ्यांचे पारणे फीटले...आता जिभेचे चोचले कधी पुरवता ?? कधी येऊ?

परिकथेतील राजकुमार's picture

27 Apr 2011 - 4:42 pm | परिकथेतील राजकुमार

मराठमोळा's picture

29 Apr 2011 - 3:11 pm | मराठमोळा

खपेश!!!!!

निवेदिता-ताई's picture

27 Apr 2011 - 7:11 pm | निवेदिता-ताई

आहा आहा............मस्तच ..........

फ्रुट कस्टर्ड मध्ये -- पारले जी व क्रिम बिस्कीटे पण घाला छान लागते,

दोन्ही पदार्थांचे फोटू छान आलेत.

सानिकास्वप्निल's picture

27 Apr 2011 - 8:31 pm | सानिकास्वप्निल

फ्रुट कस्टर्ड वर जेली घालून पण खुप छान लागतं.
दोन्ही पाकृ मस्तच आहेत :)

धमाल मुलगा's picture

27 Apr 2011 - 8:40 pm | धमाल मुलगा

काय झॅन्टामॅटिक सजवलंय!

ए...कधी येऊ हादडायला? :D

गणपा's picture

28 Apr 2011 - 12:38 am | गणपा

काय झॅन्टामॅटिक सजवलंय!

+१
कातील फोटो आहे.

म्हंटल सकाळच्याला पहिला धागा खादाडीचा उघडावा, म्हणुन इथे डोकावलो. ;)
लय भारी पाकॄ हाय...फोटु बी लयं झकास हायेत.

(चेरी प्रेमी) ;)

प्यारे१'s picture

28 Apr 2011 - 12:12 pm | प्यारे१

काय छळ आहे....श्श्श्या!

प्राजु's picture

28 Apr 2011 - 10:22 pm | प्राजु

जबरी फोटो.

पुनर्जन्म झाला ... आगागागागा :) आपला फेव्हरिट आयटम आहे हा ;) लपलपलप :)

-

नगरीनिरंजन's picture

29 Apr 2011 - 9:06 am | नगरीनिरंजन

माझाही फेवरिट आयटम आहे हा पण लपायची गरज नाही. ;-)
मस्त!

आत्मशून्य's picture

29 Apr 2011 - 2:35 am | आत्मशून्य

चेरी व्हॅनीला शेकही छान आहे, पण स्ट्रॉबेरीज जास्त आवडतात व सध्या फक्त "दीपिका शेकची" जरा जास्त भूरळ आहे त्यामूळे....

पियुशा's picture

29 Apr 2011 - 3:04 pm | पियुशा

वॉव मस्तच यार !
:)

इरसाल's picture

29 Apr 2011 - 3:54 pm | इरसाल

वा छानच आहे कधी देताय खायला...............

प्राजक्ता पवार's picture

30 Apr 2011 - 1:01 pm | प्राजक्ता पवार

सर्व प्रतिक्रीया देणार्‍यांचे आभार !