Skip to main content

फ्रुट कस्टर्ड व चेरी व्हॅनीला शेक

लेखक प्राजक्ता पवार यांनी बुधवार, 27/04/2011 या दिवशी प्रकाशित केले.
फ्रुट कस्टर्ड : साहित्य : दुध - अर्धा लिटर , कस्टर्ड पावडर - २ चमचे , साखर - ४ चमचे , फ्रेश क्रीम - ४ चमचे , फळे - सफरचंद , द्राक्षे , पपई , डाळींब , संत्रे इ कृती : प्रथम अर्धी वाटी दुध वेगळे काढुन घ्या व त्यात कस्टर्ड पावडर घालुन एकत्र करा. उरलेले दुध , साखर घालुन गरम करा . एक उकळी आल्यावर त्यात कस्टर्ड पावडरचे मिश्रण ह्ळुहळु घाला व चमच्याने मिसळा. दोन मिनिटे दुध गरम करुन नंतर ते थंड करायला ठेवा. त्यात फ्रेश क्रीम घालुन मिसळुन घ्या. सर्व फळांचे तुकडे करुन घ्या. त्यामध्ये तयार केलेले कस्टर्ड घालुन नीट एकत्र करा व थंड करुन सर्व्ह करा. चेरी व्हॅनीला शेक : साहित्य : चेरी ( canned ) - १ वाटी , दुध - १ कप , व्हॅनीला आईसक्रीम - २-३ स्कुप , व्हॅनीला इसेंस - अर्धा छोटा चमचा. कृती : प्रथम चेरी व थोडे दुध ब्लेंडरमध्ये घालुन एकत्र करुन घ्या. नंतर त्यात उरलेले दुध , व्हॅनीला आईसक्रीम व व्हॅनीला इसेंस घालुन पुन्हा एकदा ब्लेंडरमध्ये नीट मिसळुन घ्या व थंडगार सर्व्ह करा.

वाचने 5901
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया


In reply to by परिकथेतील राजकुमार

खपेश!!!!!

आहा आहा............मस्तच .......... फ्रुट कस्टर्ड मध्ये -- पारले जी व क्रिम बिस्कीटे पण घाला छान लागते,

फ्रुट कस्टर्ड वर जेली घालून पण खुप छान लागतं. दोन्ही पाकृ मस्तच आहेत :)

काय झॅन्टामॅटिक सजवलंय! ए...कधी येऊ हादडायला? :D

म्हंटल सकाळच्याला पहिला धागा खादाडीचा उघडावा, म्हणुन इथे डोकावलो. ;) लय भारी पाकॄ हाय...फोटु बी लयं झकास हायेत. (चेरी प्रेमी) ;)

चेरी व्हॅनीला शेकही छान आहे, पण स्ट्रॉबेरीज जास्त आवडतात व सध्या फक्त "दीपिका शेकची" जरा जास्त भूरळ आहे त्यामूळे....

वा छानच आहे कधी देताय खायला...............

सर्व प्रतिक्रीया देणार्‍यांचे आभार !