गणपती भी अल्लाह है !

पंख's picture
पंख in जनातलं, मनातलं
18 Dec 2010 - 12:46 pm

काल-परवा काही कामानिमित्त सोलापूरला जाणे झाले. आता पुणे-सोलापूर प्रवास महामार्गावरुन करणे अशक्यच वाटते, त्यामुळे ट्रेनचा पर्याय निवडला.. तिकडुन येताना दुपारच्या ईंद्रायणी एक्सप्रेसमध्ये अतिरीक्त डब्यात आरक्षण मिळाले होते. शुक्रवार त्यात मोहरम त्यामुळे गर्दी असणार हे अपेक्षित होतेच पण आरक्षणही अतिरीक्त ड्ब्यात मिळाल्याने काहिसा नाखूषच होतो.. पण पर्याय नसल्याने आत घुसून माझी जागा शोधली.. जागा मात्र खिडकीशेजारी असल्याचे बघुन जरा हायसे वाटले. (आम्ही नेहमीचे रेल्वेप्रवासी नसल्याने आरक्षण करताना ex02 म्हणजे अतिरीक्त डबा असतो हे समजले नाही त्यामुळे अगोदर हा डबा सापडायलाच पळापळ झाली !).. थोड्यावेळाने माझ्याशेजारी एक मुस्लीम महिला येऊन बसली (तिच्या बुरख्यामुळे कळले !). तिच्यासोबत एक ५-६ वर्षांचा लहान मुलगाही होता..दिसायला चुणचुणीत होता. प्रवास सुरू होऊन थोडा वेळ जाताच त्या मुलाने माझ्याशी संभाषण सुरू केले. ते अशाप्रकारचे होते..-
तो मुलगा- "आप कहां जा रहे हो?"
मी- "पुणे जा रहां हू , तुम कहां जा रहे हो?"
"मै भी पुणे जा रहां हू, आपका पुणे कब आयेगा ?"
"अरे बेटा, पुणे एकही है, ६ बजेतक पुणे आ जायेगा", ईति मी..
"नही, हमारा पुणे एकदम रातको आयेगा !", मग त्याच्या मम्मीकडे वळून, "है ना अम्मी?".. त्याच्या अम्मीचा डोळा लागला होता. डोळे अर्धवट ऊघडत ती पुटपुटली, "बेटा ऊन्हे परेशान मत करो" अन तिने परत डोळे झाकले. त्यानंतर तो मुलगा शांत बसला.. ५ मिनिटे गेल्यावर मीच त्याला विचारले, " अच्छा? तो पुणे मे किसके पास जा रहे हो?"
तो मुलगा- "मामू के पास, मामू को लडकी हुइ है ना, ईतनीसिच है !"
"तुम्हारा नाम क्या है?", मी.
"शिराज ! मेरे मामूनेही रखा है नाम."
" अच्छा तुम्हारे मामा कितने बडे है?"
"मामा नही, मामू ! वो तुमसेभी बडे है" नंतर बाहेरच्या झाडाकडे बोट दाखवत, " वो पेड जितने बडे है !"
मला हसू आलं. मी म्हणालो, " मेरे मामा भी ईतने बडे है."
मग ह्या पिल्लाने आकाशाकडे बोट दाखवून मला म्हणाला, " मेरे मामू तो अल्ला जितने बडे है."
अल्ला शब्द ऐकल्याने मी त्याला सहज विचारले, "अल्ला मतलब क्या?" "नही पता, पर वो सबसे ज्यादा ताकतवर होता है!".. "हम्म..." , मी विचारले, " तुम्हे ईश्वर पता है?" "नही." मी नंतर जरावेळ शांत बसलो.. माझ्या हातात माझा मोबाईल होता, त्यात स्क्रीनसेव्हरला मी गणपतीचा एक अप्रतिम फोटो सेट केलाय, त्याकडे शिराजचे लक्ष गेले अन तो मला म्हणाला, "मुझे ये गणपती पता है!"
"अच्छा तो बताओ गणपती कौन है?", ईति मी.
"गणपती भी अल्लाह है !"
त्याच्या ह्या ऊत्तराने मी अवाक झालो. त्याला विचारले, " ये तुम्हे किसने बताया?"
" मेरी अम्मीने", त्याच्या अम्मीच्या कुशीत शिरत शिराज म्हणाला....
त्या चिमुरड्याच्या ह्या निरागस ऊत्तराने मी भारावलो होतो... पण त्याला असे संस्कार देणार्‍या त्याच्या अम्मीलाही मी मनोमन प्रणाम केला...
दांभिक धर्मनिरपेक्षतेचे पांघरुण घालून हिंडणार्‍या अन समाजात तेढ निर्माण करणार्‍या लांडग्यांपेक्षा मला शिराज अन त्याची अम्मी धार्मिक ऐक्याचे खरेखुरे निरागस राजदूतच वाटले......

प्रवासअनुभव

प्रतिक्रिया

लेख आवडला.
धरमाच्या नावाने गाजावाजा करणार्याच्या कानाखाली चागली चपराक आहे.

नगरीनिरंजन's picture

18 Dec 2010 - 12:58 pm | नगरीनिरंजन

मनभावन कहाणी. पण तरीही एखाद्या हिंदू मुलाने मुस्लिम माणसाला अल्लाह पण गणपती आहे असं म्हटल्यास त्याची काय प्रतिक्रिया असेल याचे औत्सुक्य वाटल्याशिवाय राहात नाही.

शिल्पा ब's picture

18 Dec 2010 - 1:23 pm | शिल्पा ब

+१
बाकी लेख अन त्या मुलाच्या आईची शिकवण आवडली...आम्ही पण असेच समजून वागायचो आधी...त्याचे परिणाम काही चांगले नाही दिसले...असो...वेळ बदलत असते...फक्त वेळेत बदलायला हवी.

नगरीनिरंजन's picture

18 Dec 2010 - 11:07 pm | नगरीनिरंजन

कृपया माझा वरील प्रतिसाद सुधारित रुपात असा वाचावा म्हणजे जर कोणाला तो उजव्या हिंदुत्ववादी मनोवृत्तीचा वाटत असेल तर तसे वाटणे बंद होईल:
"मनभावन कहाणी. पण तरीही एखाद्या बौद्ध मुलाने मुस्लिम माणसाला अल्लाह पण बुद्ध आहे असं म्हटल्यास त्याची काय प्रतिक्रिया असेल याचे औत्सुक्य वाटल्याशिवाय राहात नाही."
(संपादकांनी वेळ झाल्यास योग्य ते बदल करावेत ही विनंती)
असा प्रतिसाद देण्याचा खुलासा:
१. माझ्या माहितीप्रमाणे मुस्लिम धर्मात व्यक्तिपूजा व मूर्तिपूजा निषिद्ध आहे. ़खुदा निराकार असून मूर्त स्वरूपात पाहणे वा तुलना करणे पाप समजले जाते.
२. लहान निरागस वयात आईने शिकवलेले पाळले जाते की मोठेपणी मिळालेल्या धर्मशिक्षणाचा पगडा जास्त असतो?
या दोन गोष्टींमुळे प्रतिक्रियेबद्दल औत्सुक्य आहे.

क्रेमर's picture

19 Dec 2010 - 12:25 am | क्रेमर

खालील गाणे साहिर लुधियानवी या मुस्लिम कवीने लिहिले आहे. या गाण्यावरून मुस्लिमांनी दंगे केल्याचे/ पुतळे जाळल्याचे ऐकिवात नाही.

नगरीनिरंजन's picture

19 Dec 2010 - 5:27 am | नगरीनिरंजन

हम्म हे चांगले उदाहरण आहे. म्हणजे ते नियम इतके कडक नसून प्रतिक्रिया साधारण अशीच असेल असे समजतो. "वंदे मातरम"ला विरोध असण्याची कारणे बहुधा राजकीयच जास्त असावीत.

योगी९००'s picture

18 Dec 2010 - 1:45 pm | योगी९००

लेख आवडला..मुलाच्या आईची शिकवण ही आवडली..

अवांतर :
ईंद्रायणी एक्स्प्रेस मुंबई-पुणे अशी आहे ना? मग पुणे-सोलापूर कधीची झाली?

चिंतामणी's picture

18 Dec 2010 - 4:22 pm | चिंतामणी

ईंद्रायणी एक्स्प्रेस मुंबई-पुणे अशी आहे ना? मग पुणे-सोलापूर कधीची झाली?

बरीच वर्षे झालीत. मुंबई-पुणे मग पुणे-सोलापूर जाते. आणि तशीच परत येते.

प्रभो's picture

21 Dec 2010 - 1:00 am | प्रभो

दुपारी २-६ सोलापुर -पुणे इंद्रायणी
संध्याकाळी ६-९ पुणे-मुंबै इंद्रायणी.... गाडी तीच..नंबर आणी तिकिट वेगळं..

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

18 Dec 2010 - 4:07 pm | निनाद मुक्काम प...

सारे हिंदू भारतात येशू ख्रिश्त आहेत असे मला वाटते .त्यांना त्यांच्या देशात नेहमीच सुळावर चढवले जाते
नाही का ?

महेश-मया's picture

18 Dec 2010 - 4:14 pm | महेश-मया

दांभिक धर्मनिरपेक्षतेचे पांघरुण घालून हिंडणार्‍या अन समाजात तेढ निर्माण करणार्‍या लांडग्यांपेक्षा मला शिराज अन त्याची अम्मी धार्मिक ऐक्याचे खरेखुरे निरागस राजदूतच वाटले.....

खरोखर अशी आई जर सगळ्याची असती तर केवढे बरे झाले असते,

परिकथेतील राजकुमार's picture

18 Dec 2010 - 4:33 pm | परिकथेतील राजकुमार

शिराजची अम्मी मोठी हुषार स्त्री दिसते.

अतिउजव्या हिंदू गटांकडून असलेला अधिक धोका तिने वेळीच ओळखलेला आहे.

हा खरा अनुभव असेल तर त्या मुलाच्या आईचं कौतुक जी अशी शिकवण देतय.

नसेल तर एक चांगली कथा. :)

काही प्रतिसाद वाचुन मात्र पराच्या या मताशी नाईलाजाने सहमत म्हणायची पाळी येतेय.

शहराजाद's picture

18 Dec 2010 - 10:14 pm | शहराजाद

+१

नगरीनिरंजन's picture

18 Dec 2010 - 10:36 pm | नगरीनिरंजन

कोणता प्रतिसाद वाचून त्या मतास नाईलाजाने सहमती द्यावी लागली ते जाणण्याचेही औत्सुक्य आहे.

वाहीदा's picture

19 Dec 2010 - 12:33 am | वाहीदा

काही प्रतिसाद वाचुन मात्र पराच्या या मताशी नाईलाजाने सहमत म्हणायची पाळी येतेय.

There are some things
I may not know
There are some places
I can't go

But I'm sure
Of this one thing
That God is real
For I can feel
Him deep within

Yes, God is real
Real in my soul

--Morris, Kenneth

जर मनात आलं तर सगळे( अ ते झ ) धर्मंच णश्ट करुन टाकु ... च्यायला हाय काय नाय काय :)
णा रहेगा बांबु ना वाजेगी तुतारी

- माणुस

नरेशकुमार's picture

18 Dec 2010 - 5:20 pm | नरेशकुमार

माझ्या मते 'अ' कोन्ताच धर्म नाहि, सगळि धर्मे 'झ' आहेत,

अविनाशकुलकर्णी's picture

18 Dec 2010 - 11:17 pm | अविनाशकुलकर्णी

आई महान असते..शिराज माता महान आहे..

प्राजु's picture

18 Dec 2010 - 11:31 pm | प्राजु

चांगला आहे हा अनुभव. मलाही आलेले आहेत असे काही अनुभव.

माझ्या एका मुस्लिम मैत्रीणीचा भाऊ गणेश चतुर्थीला जन्मला. त्यांच्या घरात या गोष्टीचे खूप कौतुक आहे.
आणि त्यापेक्षा सुद्धा.. त्या मुलाला लहानपणा पासून गणपतीच्या मूर्तींचे वेड आहे. त्यामुळे त्याला भेट वस्तू म्हणून सुद्धा त्याचे नातेवाईक त्याला गणेश मूर्तीच देतात. त्या मूर्ती त्याने एका कपाटात अतिशय जपून ठेवलेल्या आहेत. खूप वेगवेगळ्या मूर्ती आहेत त्याच्याकडे.
(याचा अर्थ तो गणेश भक्त आहे असा होत नाही.. याची कल्पना आहे..) :)

शिल्पा ब's picture

18 Dec 2010 - 11:51 pm | शिल्पा ब

कोणाचे भक्त व्हा नाहीतर नका होऊ पण जे आहेत त्यांना केवळ ते वेगळ्या "देवाचे " भक्त आहेत म्हणून उगाच गोळ्या घालत फिरणे म्हणजेच धर्मांधपणा.

हल्लीच कोणीतरी इथे मिपावर video टाकला होता ज्यात newyork मध्ये time square वर दोन धर्मांध मुसलमान " आमचाच धर्म श्रेष्ठ आहे आणि जे तो मानत नाहीत किंवा इतर धर्माचे आहेत त्यांना मारून टाका हा अल्लाचा आदेश आहे " असे खुलेआम प्रचार करत होते...youtube सुद्धा हा video बघायला मिळेल...अशा लोकांशी प्रेमाने ते बदलतील अशी अशा बाळगणे हाच मूर्खपणा आहे एवढेच नाही तर आपण विरोध केला नाही तर त्यांना आमंत्रण दिल्यासारखेच आहे. हि कीड सगळ्या जगाला लागलीये..
आता कोणाला माझं असं बोलणं आक्षेपार्ह्य वाटत असेल तर वाटू दे.

हा संपूर्ण प्रतिसाद फक्त प्राजुला नाही.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

19 Dec 2010 - 10:55 am | निनाद मुक्काम प...

एक साधी घटना
मी एक निरक्षण केले आहे .
.आभू धाबी व येथे जर्मनीत हे हिरवे लोक जेव्हा बॉलीवूड बद्दल बोलतात तेव्हा सलमान शाहरुख हे खान असल्याने वारंवार पठाण असल्याचा उल्लेख करतात .त्यामुळे सीमेपलीकडील वाल्यांना ते अधिक जवळचे वाटतात .एकदा मी त्यांना म्हटलं सलमानच्या घरी गणपती असतो .(मूर्ती पूजा ) तर शाहरुख च्या घरी हिंदू धर्माचा प्रभाव आहे असे त्याची बायको खुलेआम सांगते .(वरील गोष्टी यु ट्यूब वर आहेत .)
आता एक हिंदू आणि भारतीय म्हणून मला त्यात काहीच वावगे वाटत नाही .मुळात आम्ही आमीर चे कौतुक करतो .पण फरदीन चे नाही ह्यात मुलभूत कारण त्यांची अभिनय शमता आहे .त्यांचे आडनाव आम्ही कधीच आमच्या वयक्तिक आवडी निवडीच्या मध्ये आणत नाही .बाय द वे त्यांनी मूर्ती पूजा केली ह्यावर तुमचे काय मत आहे .इट्स ओके फॉर यु? .(तेव्हा मात्र त्यांची तोंड पाहण्यासारखी होती .) धर्मांध लोकांमध्ये मुठभर देशभक्त नक्कीच निघतात ,पण काय आहे .तांदूळ निवडताना आपण खडे वेचून बाहेर टाकतो .कारण तांदुळाच्या तुलनेत खडे कमी असतात .पण भारतात खड्यासारखे अत्यंत कमी देशभक्त व तांदळासारखे भरपूर धर्मांध आहेत .

डॉ अशोक कुलकर्णी's picture

19 Dec 2010 - 11:59 am | डॉ अशोक कुलकर्णी

!!!!!

इंटरनेटस्नेही's picture

19 Dec 2010 - 4:20 pm | इंटरनेटस्नेही
अर्धवटराव's picture

20 Dec 2010 - 2:15 am | अर्धवटराव

हे कोवळे अंकुर (कुठल्याहि प्रकारच्या) धर्मांधतेपासुन सुरक्षीत राहो हिच इच्छा !!

(निधर्मी) अर्धवटराव

हाहाहा :)
प्रसंग आवडला. नगरीनिरंजन, शिल्पा ब आणि पराशी सहमत.