काजू कतली-------

निवेदिता-ताई's picture
निवेदिता-ताई in पाककृती
20 Oct 2010 - 9:20 pm

साहित्य:- एक वाटी काजू, साखर अर्धी वाटी, साय एक चमचा,पाकासाठी पाणी दोन चमचे.

कॄती:- प्रथम काजूची पूड करुन घ्या.त्याला साय लावा, साखरेमधे पाणी घालून दोन तारी पाक तयार करा.
त्यात काजूची पूड घालून चांगले घोटत रहा, लगेच गोळा तयार होतो, तो गोळा पसरुन एकाच दिशेने लाटा.
व लगेच वड्या पाडा.
मस्त काजू कतली तय्यार.
पटकन खाउन टाकावी.

From

प्रतिक्रिया

पैसा's picture

20 Oct 2010 - 9:21 pm | पैसा

आता फोटो आलाय, कृति गायब आहे. बघ जरा.

शेखर's picture

20 Oct 2010 - 9:25 pm | शेखर

कृती सोपी आहे..
दुकानात जाऊन विकत आणली ;) (ह.घ्या.)

शुचि's picture

20 Oct 2010 - 9:34 pm | शुचि

कातील कतली काळजात रुतली

निवेदिता-ताई's picture

20 Oct 2010 - 10:49 pm | निवेदिता-ताई

ए दुकानात जाउन नाही आणली ..मि स्वता: बनवलीय...नवरात्रात देवीच्या नेवैद्याला बनवली होती.

प्राजु's picture

20 Oct 2010 - 11:03 pm | प्राजु

रेशिपि??

सविता००१'s picture

20 Oct 2010 - 11:11 pm | सविता००१

रेशीपी ??????????????????

रेशिपी???
रेशिपी???
रेशिपी???
रेशिपी???
रेशिपी???
रेशिपी???
रेशिपी???
रेशिपी???
रेशिपी???
रेशिपी???
रेशिपी???
रेशिपी???
रेशिपी???
रेशिपी???
रेशिपी???
रेशिपी???

कुठेय ताई ;-)

पर्नल नेने मराठे's picture

21 Oct 2010 - 11:22 am | पर्नल नेने मराठे

उद्या कोजागिरिनिमित्त करेन.

जागु's picture

21 Oct 2010 - 11:37 am | जागु

मस्त पाकृ.

रत्नागिरीकर१'s picture

21 Oct 2010 - 12:02 pm | रत्नागिरीकर१

छान आहे...करुन पाहते...

मराठमोळा's picture

21 Oct 2010 - 12:25 pm | मराठमोळा

मी एका दिवसात अर्धा किलो काजु कतली खाल्लेली आहे बर्‍याच वेळा. :)
गुलाबजाम (एका वेळी ५२ चे रेकॉर्ड आहे) नंतर कुणाचा नंबर असेल तर तो काजुकतलीचाच :)

चिगो's picture

3 Nov 2010 - 9:59 pm | चिगो

मी एकावेळी ४३ खाल्ले होते. (हॉस्टेलवर फिस्ट मधे)... नंतर महीनाभर नुसते दिसले तरी कसंतरी व्हायचं..

bela's picture

21 Oct 2010 - 3:18 pm | bela

मस्त पाकृ

पैसा's picture

21 Oct 2010 - 3:59 pm | पैसा

थोडी पाठवून दे ग, खूप भराभर संपते!

कातील काजु-कतलीने कलेज्याच्या काचर्‍य-काचर्‍या केल्या :(

आद्य आचारीगुरूंनी आळवलेल्या अनुप्रासामुळे अक्षि अश्रू अवतरले!

परिकथेतील राजकुमार's picture

21 Oct 2010 - 5:41 pm | परिकथेतील राजकुमार

वारलो !!

सध्या वारण्याचा मूड नाही.. तर हादडायचा मूड आहे.. चला घरी काजु-कतली बनवायला मुहुर्त शोधतो..

- (काजू कत्तलकार) पिंगू

ए निवेदिता ताई, मी केली बरं का काजू कतली एकदम सक्सेसफुल्ली. माझ्या नवर्यानी आणि सासर्यांनी अगदी फडशा पाडला. मी
पहिल्यांदा काहि रेसिपी वगैरे वाचुन ट्राय केली आणि ती पण इतकी मस्तं! थँक्यु थँक्यु थँक्यु थँक्यु थँक्यु थँक्यु थँक्यु थँक्यु सो मच!!!